जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁 जीवन विचार🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰
एकाग्रता साध्य करण्यासाठी
मनुष्याच्या डोळ्यांपुढे एखादे विधायक ध्येय आणि त्याला अनुरुप विधायक साधना पाहिजे.

पर्वताच्या माथ्यावर पडणारे पाणी जर नाना दिशांना वाहत गेले , तर ते कोठेच राहत नाही, सारे नाहीसे होते.

परंतु तेच पाणी जर एका दिशेने वाहत जाईल तर त्या पाण्याची पुढे नदी होईल , तिच्यातून शक्ती उत्पन्न होईल,  तिचा देशाला उपयोग होईल.

 त्याप्रमाणे मनुष्य आपली शक्ती नाना प्रकारच्या उद्योगांत न दवडता ती एकत्र करून एकाच कार्यात सुव्यवस्थितपणे ओतील तरच त्याच्या हातून काही कार्य होईल.
यालाच गीतेने🙏 ' स्वधर्म '  हे नाव दिले आहे.

=====================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 शब्दांकन /संकलन/ 🙏🏼

No comments:

Post a Comment