✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/01/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा* 💥 ठळक घडामोडी :- १८४८- पहिली मुलींची शाळा भिडे वाड्यात  सुरू. १८६२ - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले. 💥 जन्म :- १८९२ - महादेव हरिभाई देसाई गांधीवादी कार्यकर्ते. १८९४ - सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. १९०२ - कमलाकांत वामन केळकर भारतीय भूवैज्ञानिक. १९३६ - राजा राजवाडे साहित्यिक. १९४३ - रघुनाथ माशेलकर . 💥 मृत्यू :- १७४८ - योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ. १९५५ - शांतिस्वरूप भटनागर भारतीय रसायनशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राष्ट्र सेवा दलाकडून ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्कारांची घोषणा, प्रतिभा शिंदे, अनिता ढोले व प्रियांका तमायचीकर यांचा समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *विनाअनुदानित गॅस सिलेंडर 120 रुपयांनी स्वस्त; अनुदानित गॅस सिलेंडरमध्ये 5.11 रुपयांची कपात* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *सुधीर भार्गव यांची मुख्य माहिती आयुक्तपदी निवड, मंगळवारी राष्ट्रपती भवनात घेणार शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला राज्यात सर्वोत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार, राज्य सहकारी बँक असोसिएशनने केले जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली : तिहेरी तलाकवर राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ, गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज 2 जानेवारीपर्यंत स्थगित.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बंगळुरू - कर्नाटकमधील ज्येष्ठ अभिनेते सी.एच. लोकनाथ यांचे निधन, 350 चित्रपटात केलं होतं काम.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *महाराष्ट्राच्या स्मृती मानधानाचा ICC कडून गौरव, 11 वर्षांनंतर भारतीय खेळाडूला मिळाला मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/Bks4qsAT6S Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नवीन वर्ष सुखाचे जावो*        *🄷 🄰 🄿 🄿 🅈* *🄽 🄴 🅆  🅈 🄴 🄰 🅁*        2⃣0⃣1⃣9⃣ https://prajawani.in/news_page.php?nid=647 वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वर्ष नवे स्वप्न नवे* प्रत्येक वर्षाच्या डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासूनच नूतन वर्षाची चाहूल लागलेली असते. पुढच्या वर्षी कुठला नवीन संकल्प करावा, असा विचार सुरू होतो. काहींच्या मनात सुरू असलेले विचार 'थर्टी फर्स्ट'च्या रात्रीच रंगबिरंगी मद्याच्या सुंगधात तर काहींचे सिगारेटच्या धुरात विरून जातात. परंतु, काहींचे संकल्प मात्र काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे असतात. हे लोक आपले संकल्प कृतीतही आणतात. त्यांचे हे संकल्प एक- दोन दिवसासाठी नव्हे तर वर्षानुवर्ष पाळले जातात. मग त्यांची प्रेरणा घेऊन आपणही यावर्षी काही संकल्प करूया आणि ते पाळूयाही. *ह्या परीपाठाच्या प्रसारणा सोबतच* नूतन वर्ष सुरु होत आहे.धावत्या जगासोबत धावत असताना जीवनरूपी प्रवासात आपल्याला विविध प्रवृत्तीचे लोक भेटतात. आपण त्यांना गुणदोषांसहीत स्वीकारत असतो. त्यामुळे आपण काही अशा गोष्टींच्या इतके आहारी जातो, की त्याचा आपल्याला तर मन:स्ताप तर होतोच. परंतु, त्याच्या दुपटीने आपल्या कुटुंबाला होत असतो. आपण आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन अशा गोष्टींपासून पिच्छा सोडवून घेण्यासाठी निमित्ताची वाट बघत असतो. परंतु, त्या निमित्तासोबत आपल्या मनावरही आपला ताबा असला पाहिजे. स्वत:साठी वेळ काढा - घरातील कामकाज व नोकरीतील टेन्शन यात 'सॅंडविच' होत असते. त्यामुळे व्यक्तीचा स्वत:कडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. दिवसभरातून किमान 10 ते 15 मिनिटे स्वत:साठी काढून ठेवली पाहिजे. या पंधरा मिनिटात आपण एखादा छंद जोपासू शकता. व्यायाम करून फिट राहू शकता. सकारात्मक विचार करायला शिका - एखाद्या चांगल्या गोष्टीचा उलटा अर्थ काढणे, त्यामुळे विनाकारण अधिक विचार करणे व त्या गोष्टीचा उगाच बाऊ करणे, हा आपला स्वभाव बनून जातो. त्यामुळे आपल्या मनावर तसेच आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. त्यासाठी नवीन वर्षात सशक्त व सकारात्मक विचारसरणीचा संकल्प केला पाहिजे. आपला विचार सकारात्मक असला म्हणजे भविष्यात आपले कोणीच वाईट चिंतणार नाही, हे ठामपणे ठरविले पाहिजे. अशा गोष्टी आपला आत्मविश्वास वाढवत असतात. अगदी कठिण परिस्थितीत आपल्याला सामना करण्याची हिंमत देतात. स्वत:ची कामे स्वत: करा - आपल्याला सगळ्यात जास्त त्रास स्वत:मुळेच होतो. कुठली ना कुठली वाईट सवय आपल्याला जडलेली असते. त्यात आपला आद्य शत्रू म्हणजे आळस. आपण किमान स्वत:ची तरी कामे स्वत: केली पाहिजेत. नियोजन आखून कामे उरकली पाहिजे. त्यामुळे आपल्याला कामाची शिस्त लागते.. *नव-वर्षाची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी वाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात*     *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही…! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य कोणते ?*            पश्‍चिम बंगाल *२) रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?*          मुंबई *३) ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी झाली ?*           १९६५ *४) स्मार्ट सिटी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे शहर कोणते ?*              भुवनेश्‍वर *५) इस्त्रोची स्थापना कधी झाली ?*             १९६९   *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुरेश सावंत, नांदेड ● नंदन नांगरे ● भास्कर रेड्डी ● बालाजी वरगंटवार ● अतुल चव्हाण ● दिलीप धामणे, हिंगोली ● अनिकेत भारती, नांदेड ● राज जयस्वाल, माहूर ● धोंडिबा गायकवाड, धर्माबाद ● शेख बिस्मिल्ला सोनेशी ● मनमोहन कदम, धर्माबाद ● पांडुरंग कोकुलवार, नांदेड ● संजय पाटील शेळगावकर ● सतीश शिंदे ● मधुकर गिरमे ● सविता धर्माधिकारी, लातूर ● चंद्रकांत दामेकर, नांदेड ● सुनेत्रा बेल्लूरकर ● लक्ष्मीकांत बेंकट, करखेली *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• @@ *गुगली* @@ *नववर्षाभिनंदन* मावळत्याचा आदर नव्याचे स्वागत आहे अशांचीच किंमत जे या न्यायाने वागत आहे मावळत्याकडून धडा नव्या कडून शिकायला हव सर्वांना सुखा समाधानाच आनंदाच जावं हे वर्ष नव *नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा*         शरद ठाकर     सेलू जि परभणी     8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 〰 ‼  *विचार धन*  ‼ 〰 *एक छोटी कथा सांगितली जाते. एका दुष्काळी प्रदेशातील एक दुष्काळी गाव. नद्या, विहिरी आटलेल्या, पाण्यासाठी दशदिशा, आम्हा फिरविशी जगदीशा...अशी अवस्था. पावसाळा सुरू होतो. पाऊस काही येईना. शेवटी सगळा गाव एकत्र येतो. गंभीर परिस्थितीवर गंभीर चर्चा होते. उपाय सुचविले जातात. शेवटचा प्रयत्न म्हणून गावालगतच्या डोंगरावर जाऊन पावसासाठी देवाची प्रार्थना करायचे ठरते. सारा गाव ठरल्याप्रमाणे एकत्र येतो. थकलेली, तहानलेली पावलं नव्या उमेदीनं डोंगराकडे चालायला लागतात.* *या सर्व मोठ्या माणसांमध्ये एक मुलगा हातात छत्री घेऊन चालत असतो. या मुलाकडे बघून सर्वांना  आश्चर्य वाटते. पावसाचा टिपूस नाही. येण्याची शक्यताही नाही आणि हा चिमुरडा सोबत छत्री घेऊन आलाय. शेवटी एकजण त्या चिमुरड्याला विचारतो..'बाळा, तू ही छत्री सोबत आणलीस?' छोटा मुलगा उत्तरतो. 'पावसासाठी प्रार्थना करायला आपण डोंगरावर जात आहोत आणि मी प्रार्थना केल्यावर पाऊस येणारच आहे. म्हणून मी छत्री सोबत घेतलीय.' हा स्वत:च्या प्रार्थनेवरचा ठाम विश्वास! एकूण दुसरं पाऊल पडणार आहे. या विश्वासावरच पहिलं पाऊल उचलावं लागतं.*     〰 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      नर नारी के सूख को, खांसि नहि पहिचान त्यों ज्ञानि के सूख को, अज्ञानी नहि जान। सारांश ज्ञानी माणसाला सुखाचा खजिना प्राप्त झालेला असतो. तो सुखाला कधीच पारखा होत नाही. सुखाच्या शोधासाठी स्वतःचं अस्तिव गमावून तो फसव्या मृगजळाच्या मागं धावत सुटत नाही. आपल्या कडच्या उपलब्ध साधनातून तो आनंदाची निर्मिती करतो. त्यात त्याला त्याच्या आनंद लहरी समाधान देत असतात. मात्र अज्ञानी माणूस सुखाच्या शोधात कस्तुरी मृगासारखा स्वतःची व स्वतः जवळील कस्तुरीची ओळख नसल्यामुळे धाव धाव धावतो अन ऊरी फुटून आत्मघात करून घेतो. सुखाचे कारंजे स्वतःच्या ठायीच दडलेले असूनही ते उजागर करता न आल्याने तो सुखाला पारखा होत असतो. त्याचे कारण म्हणजे अज्ञान. अज्ञानी माणूस केवळ भ्रमात जगत असतो. त्याला इच्छित गोष्ट साध्य झाली नाही की तो हताश व खिन्न होतो. हे हताशपण त्याला नैराश्याकडेही नेऊ शकते. मात्र ज्ञानी माणसाचं तसं नसतं तो भ्रमात जगत नाही. आपल्या आवाक्यातल्याच गोष्टी साध्य करण्याची त्याची कोशिश असते. त्यात तो यशस्वी नाही झाला तरी हिमत हारत नाही. अपयशाची कारणे शोधतो व नव्या उमेदीने पूनर्रभरारी घेत असतो. नपुंसकाला समागमाचे सुख काय कळणार ? तसे अज्ञान्याला ज्ञानी माणसाच्या सुखाची काय लज्जत चाखता येणार बरे !     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अज्ञानाला दूर घालवायचे असेल,दु:खाला दूर करायचे असेल,आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल,इतरांना आपलेसे करावे वाटत असेल,अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा. ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने सहज मारली काढून जीवन सुखी व समृद्ध केले आहे.ज्यांनी स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही.ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून.या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान. जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. ©व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *अज्ञान - Ignorance* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *मन करारे प्रसन्न* एक खूप प्राचीन कथा आहे. श्वेतकी नावाचा एक राजा होता. तो खूप यज्ञ करत असे. त्यामुळे त्याची खूप ख्याती झाली होती. त्याने एकदा सलग बारा वर्षे अग्नीदेवाला अखंड शुद्ध तुपाची आहुती दिल्याने अग्नी देवाची पाचनशक्ती वाढली. याचा वाईट परिणाम असा झाला, की अग्नीदेवतेचे तेज कमी झाले आणि तो मंद पडला  मग त्याने ब्रह्मदेवाकडे धाव घेतली आणि त्यांना तेज परत मिळविण्याचा मार्ग विचारला. तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला खांडव येथील जंगल जाळून टाकण्याचा सल्ला दिला. त्याने तसे केले, परंतु इंद्रदेवाने पाणी टाकून ती आग विझवली. मग त्याने कृष्ण आणि अर्जुनाला आपल्या साह्यतेचे आवाहन केले.  अर्जुनाने अग्नी देवाला विनंती केली, की मला देवेंद्राशी युद्ध करण्यासाठी तू शस्त्रे पुरवायची. अग्नी देवाने त्याला गांडीव धनुष्य आणि दिव्यास्त्र दिले, तर कृष्णाला एक चक्र भेट दिले. यानंतर अग्नी देवाने आपल्या शक्तीद्वारे पुन्हा खांडव जंगल जाळण्यास सुरुवात केली.  वाढत्या आगीने पृथ्वीवर मात्र हाहाकार माजला. त्यावर परत देवेंद्राने आपल्या शक्तीने पाऊस पाडण्यास सुरुवात केली, परंतु अर्जुन आणि कृष्णाने पावसाला रोखले. यावेळी इंद्राच्या मदतीला देव, असुर, यक्ष, राक्षस, सर्प असे अनेक जण धावून आले, परंतु या साऱ्यांचा कृष्ण आणि अर्जुनापुढे निभाव लागला नाही.  अखेर अग्नी देवतेने आपली आग पसरवल्याने त्यांची तब्बेत पूर्ववत झाली. आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेज परतले. तात्पर्य इतकेच की, जर शरीर सुखी असेल, तर मनही प्रसन्न राहते. आणि मन प्रसन्न तर चेहऱ्यावर आपोआप तेज दिसते.  तुम्हाला ताजेतवाने दिसायचे असेल तर तुम्हाला आपले शरीर तर स्वस्थ ठेवायलाच हवे. परंतु, याच सोबत आपले मनही प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*वाट ही वेडी जराशी* *वाट ही वेडी जराशी* *तुझ्या प्रेमळ स्वप्नाशी* *भाव पुलकीत होई माझे* *संवेदनशील या जीवाचे.* 〰〰〰〰〰〰 *✍प्रमिला सेनकुडे (हदगाव) नांदेड.*

*चारोळी* *सरले वर्ष तरीही* *सुख नाही उगवले* *गडद अंधारातले दिस अजूनही नाही सरले....?* ✍ प्रमिला सेनकुडे नांदेड

न🔨यन वाट शब्द ओठांवर येऊन नयनी ओघळल्या अश्रूंचा धारा* *संवेदनशील भाव कोमेजून गेले* *कशासाठी देतोस वेदनेस थारा* मी सारं मज जीवनाचे शोधीले शब्दांतुनी तुझीया भाव मज सुकोमल जाहले कशासाठी?देतोस आता दुःख गेलीत लया वाट पाहूनीया चांदण्याचा साज शृंगार तो गंधाळला अन् गंधाळलेल्या आसमंतात नयनमनोहर आसवांचा जाहला नेञास करारी लागे मग नजरेसमोर नजरेचा का आहेत आडवाटा ?? अन् ओसरलेल्या अश्रूतही संवेदना आहेत तुझ्या..... ............ अन् ओसरलेल्या अश्रूतही संवेदना आहे तुझ्या ....... संवेदना आहे तुझ्या....... 〰〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला सेनकुडे (हदगाव.)

*वाट ही वेडी जराशी* वाट ही वेडी जराशी तुझ्या प्रेमळ स्वप्नाची नित्य मज आठवण मनात येई उराशी तुझ्या गोड शब्दांनी भाव सजले माझा मनी तुझ्यासारखे नाही कोणी मज न दिसे जगी जीवनी असे रुप तुझे गंधाळलेले श्वासात माझा वसलेले ध्यासात तू , श्वासात तू वाट वेडीस लाविलीस तू तुझ्या शब्द अमृताची गोडी मज कैसी लागीली अन् तुला न बोलताही वाट ही वेडीची जराशी न गेली ध्यास तुझ्या प्रेमाचा भक्ती आणि प्रितीचा मोहन माझा मनातला जडलाय जीव जीवातला........ 〰〰〰〰〰〰〰 दिनांकः३०-१२-२०१८ 〰〰〰〰〰〰 *✍प्रमिला सेनकुडे* *नांदेड (ता.हदगाव)*

🌹 *जीवन विचार*🌹 〰〰〰〰〰〰〰 (दिनांक३०- १२- २०१८) माणसाने आपल्या बाह्य सौंदर्यापेक्षा त्याच्या आंतरिक सौंदर्यावर लुब्ध झालेले अतिउत्तम. कारण सौंदर्य हे सत्य शोधण्याच्या दृष्टीत असते. आणि ही सौंदर्यात सत्य शोधण्याची दृष्टी आपण सामान्य माणसात उपजत करू शकत नाही. म्हणून त्यांना सत्य दाखवावे; म्हणजे सौंदर्याची परिभाषा आपोआपच समजेल, दिसेल. मानवी जीवन सामर्थ्यानं आणि सौंदर्यानं पुलकित झालेलं आहे. या सामर्थ्यमय जीवनाच्या वाटेवर संकटाचे आभाळ कोसळले तर ते मोठ्या हिंमतीने सामर्थ्यशालीपणाने दूर सारावे. आणि सौंदर्याचे क्षण आले तर ते आनंदानं हर्षमय मनाने उल्हासीतपणे जगावेत, अनुभवावेत. असे म्हणतात "सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे, तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे." या जगातील सर्वश्रेष्ठ प्राणी मानव आहे. स्त्री आणि पुरुष ही त्याची दोन भाग आहेत, रुपं आहे. माणसाने फुलासारखे आपले जीवन जगावे या 'या जगण्यावर या जन्मावर शतदः प्रेम करावे'........ *"सौंदर्य ही परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील श्रेष्ठ सर्जन आहे."* असे मनू ह्या विचारवंताने आपल्या विचारातून स्पष्ट केले आहे. गवताच्या पात्यावर पडलेल्या मोत्यासारखं दवबिंदू हे सौंदर्याचं लेणं आहे.श्रावणातील सौंदर्य मनाला खुदकन हसवत असत. कितीही झालं तरी सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. 'जशी दृष्टी तशी 'सृष्टी. *तरीही आणखी पुन्हा एकदा सांगावस वाटतं...* माणसाने बाह्य सौंदर्य पाहण्यापेक्षा त्याचे आंतरिक सौंदर्य पाहणे आवश्यक आहे. 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.

*शेवट* *शेवट हा वर्षातला कधी* *नववर्षाचा उंबरठ्यावर* *आला कळलेच नाही मज आता सरत्यापरी* *दुःख सावरता सावरता आलेली संकट ही झेलता सुखाचे क्षण येतील तरी भावना मनी मज आता* *आगमन नववर्षाचे होईल* *शेवट तरी न होईल ह्या* *संघर्षमय जीवनाचा* *आयुष्यातील शेवटच्या* *क्षणापरी ह्या* *आरंभ जरी दुःखाचा* *शेवटही होईल त्याचा* *जीवनाचे हे जीवन गाणे* *वर्षावर्षाने पुढे पुढे जाणे*दिनांक ३१-१२-२०१८ 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला सेनकुडे हादगाव जिल्हा नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/12/2018 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वर्षातील शेवटचा दिवस* 💥 ठळक घडामोडी :- २0१२: अनुदानाचे पैसे रोख स्वरूपात लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याची अभिनव योजना देशातील २0 जिल्ह्यांमध्ये सुरू होणार. २0१३ : घरकुल घोटाळ्यातील संशयित आमदार गुलाबराव देवकर यांना अटक. २0१५ : सरकारी नोकर्‍यांमध्ये श्रेणी तीन आणि चारच्या पदांसाठी मुलाखती घेण्याचा प्रघात बंद करण्याची पंतप्रधानांची घोषणा. 💥 जन्म :- १९१0 श्रेष्ठ गायक मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म. 💥 मृत्यू :- १९२६ इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - सिक्किम येथील बर्फाच्छादित प्रदेशात अडकलेल्या 2500 नागरिकांची भारतीय सैन्याकडून करण्यात आली सुटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हॅवलॉक द्वीपचं नामकरणं स्वराज द्वीप, नील द्वीपचे शहीद द्वीप तर रॉस द्वीपचं नाव नेताजी सुभाषचंद्र द्वीप असं केलं.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *जळगाव : जामनेरमध्ये राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास ग्रंथदिंडीने सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कोलकाता - दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक मृनाल सेन यांचे निधन, ते 95 वर्षांचे होते* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेची निवडणूक स्वतंत्र लढणार- नारायण राणे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे - पहिल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या 65 किलो गटात महाराष्ट्राच्या सोनबा गोंगणेला सुवर्ण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मेलबर्न कसोटीत विजय मिळवून विराट कोहलीने परदेशात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधाराच्या विक्रमाशी केली बरोबरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/3j1UDW5e5S Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 31 डिसेंबरला वर्ष संपते तसे कॅलेंडर देखील संपते आणि खुंटीला नवीन कॅलेंडर लटकविली जाते. त्याविषयीचा लेख *हर कॅलेंडर कुछ कहता है ।* https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_30.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *नागोराव सा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            इतिहासाचार्य विश्‍वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म १२ जुलै १८६३ रोजी पुण्यात झाला.ते मराठी इतिहास-संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. बी.ए. पयर्ंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले हाते.१८९८ साली त्यांनी लिहिलेल्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. जुलै ७, १९१0 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली. राजवाडे म्हणायचे, ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्‍चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेला नाही. महाराष्ट्राच्या विचारविश्‍वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते.त्यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी. ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले होते. नंतरही इतिहाससंशोधक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या र्मयादा स्पष्ट केल्या. तथापि, राजवाडे यांचे वाक्य न वाक्य ब्रह्मवाक्य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच. विशेष म्हणजे मराठी विचारविश्‍वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.” *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) मुख्य निवडणूक आयुक्त आणि सहआयुक्ताची नेमणूक कोण करतात ?* राष्ट्रपती *२) कोणत्या वनस्पतीची पोषण पद्धती परजीवी प्रकारची असते ?* अमरवेल *३) 'द कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स'ची स्थापना कधी करण्यात आली ?* १९२६ *४) तामिळनाडूच्या पश्‍चिमेकडील १0 जिल्ह्याचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?* कोंगुनाड *५) युरोप खंडाची राजधानी म्हणून ओळखलं जाणारं शहर कोणतं ?*              माश्रेलिस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सचिन चव्हाण ●  शशांक पुलकंठवार ●  ताहेर पठाण ●  अमोल बुरुंगुळे ●  प्रकाश तामसकर ●  रामचंद्र रेड्डी सामोड ●  किरण अबुलकोड ●  शिवाजी खुडे ● राजेश्वर रामपुरे ● रेहान खान ● मारोती बोलेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *विश्वास* नाती टिकवायला महत्त्वाचा विश्वास आहे विश्वास म्हणजेच नात्यातला श्वास आहे श्वासावीना जसे माणूस जगत नसतो अविश्वासाने कोणी प्रेमाने वागत नसतो    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण मित्राला बोलतो, 'उद्या मला सकाळी फोन कर, मग आपण ठरवू या.' असं म्हणताना आजची रात्र सुखरूप पार करून उद्याची सकाळ आपण अनुभवणार आहोत यावर आपला ठाम विश्वास असतो. असे छोटे छोटे विश्वास ठेवल्याशिवाय गाडा पुढे हाकता येत नाही.* *एक बस स्टँडच्या फलाटाला लागते. आपण गावाच्या नावाची पाटी वाचून खात्री करून घेतो आणि बसमध्ये चढतो. तिकीट काढतो. सोबतचा घडी केलेला पेपर उघडून वाचायला लागतो किंवा डोळे बंद करून डुलक्या घेतो. हलणा-या बसमध्ये निवांतपणे खिडकीतून बाहेर बघत बसतो. काही वेळा चिल्लर पैशांवरून कंडक्टरशी वाद होतात. वळण घाटाचा रस्ता पार करून आपल्या थांब्यावर बस आणून सोडते. या सगळ्या प्रवासात बस चालवणा-या ड्रायव्हरचा चेहराही आपण पाहिलेला नसतो. त्या ड्रायव्हरच्या भरोशावर आपण बसमध्ये निवांतपणे बसलेलो असतो. कंडक्टरशी रुपया आठाण्यावरून वाद करणारा प्रवासी स्वत:चा जीव, चेहराही न पाहिलेल्या ड्रायव्हरच्या हवाली करतो. किती विश्वास ठेवतो आपण अनोळखी माणसावर.. 'विश्वास' फार महत्वाचा असतो.*    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   दूजा हैं तो बोलिये, दूजा झगड़ा सोहि दो अंधों के नाच मे, का पै काको मोहि। सारांश विधाता निर्गुण निराकार आहे. तो सर्व विश्व व्यापून उरलेला आहे. तरी त्याची विभिन्न मुर्त रूपे उभी करून एकमेकात विनाकारणंच भांडून घेणार्‍यास उद्देशून महात्मा कबीर म्हणतात परमात्मा वेगवेगळा असता तर तुमचं म्हणणं मान्य केलं असतं. माझाच देव श्रेष्ठ आहे व इत्तरांचा चुकीचा आहे असे माणण्यातच तर भांडणाचं मुळ दडलेलं आहे. तेच भांडणाला कारण ठरतं. दोन अंधांच्या नाचण्यावर कोण अांधळा कोणत्या कारणाने त्या अंधावर मुग्ध किवा प्रसन्न होईल ? लिळाचरित्रात आंधळ्यांचा दृष्टांत सांगितलेला आहे. एका गावात सहा आंधळे असतात. त्यागावी एक हत्ती येतो. आंधळ्यांना हत्ती पाहाता येत नाही. प्रत्येक आंधळा आपआपल्या परीने हत्तीला चाचपून घेतो. त्यांना झालेल्या स्पर्श ज्ञानावरून ते हत्तीच्या रूपाचं वर्णन करायला लागतात. ज्याच्या हाती कान लागला, तो हत्ती सुपासारखा असल्याचे सांगतो. ज्याने सोंड चाचपली, तो हत्ती मुसळासारखा आहे म्हणतो. ज्याने पाय चाचपले, तो हत्ती खांबासारखा असल्याचे सांगतो. ज्याचा स्पर्श हत्तीच्या पोटाला झाला, त्याचे म्हणणे असते हत्ती पोत्यासारखा आहे. ज्याने पाठ चाचपून घेतली, तो हत्ती भिंतीसारखा असल्याचे सांगतो. ज्याने शेपटीला स्पर्शलेले असते, त्याला हत्ती खराटा म्हणजे झाडूसारखा भासतो. शेजारीच त्यांचा संवाद ऐकणारा एक डोळस असतो. त्याने पूर्ण हत्ती पाहिलेला असतो. तो संवाद ऐकून म्हणतो, तुम्ही तर फक्त हत्तीच्या अवयवांनाच हत्ती समजत आहात . प्रत्यक्षात हत्ती तर महाकाय आहे. तसं विधात्याचं स्वरूपही विश्वात्मक आहे.तो सर्वव्यापी आहे. त्याला जाणण्याची आत्मदृष्टी जवळ असायला हवी.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकल्प करा अथवा करु नका शेवटी निर्णय तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज रहा.कारण ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न करा म्हणजे तुमचे तुम्हाला निश्चितच मिळेल.मी असे करणार आहे मी तसे करणार आहे असे जगाला सांगत सुटू नका.जग काही म्हणतील त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही किती दिवस चालणार ?चार दिवस तुम्ही त्यांच्यासमोर करणार आणि काही दिवस निघून गेले की, पुन्हा तेच करणार.म्हणजे तुमचा तुमच्यावर विश्वास नाही असेच होईल ना ! संकल्प असे करा की,ते आयुष्यभर आपल्या जीवनासाठीच आहेत.मग तुम्हाला वर्षाची किंवा वर्ष संपल्यानंतर नवीन वर्षाच्या प्रारंभी करायची काही गरजच नाही.दिवस,महिने,वर्ष येतात जातात याकडे लक्ष देऊ नका,पण आयुष्य हे एकदाच येते आणि ते अमर्यादित म्हणजेच आयुष्याच्या शेवटपर्यंत असेल.आपण केलेले संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या मनाचा ठाम निर्धार असला की,काही दर वर्षी शेवटी सोडायचे आणि नवीन धरायचे किंवा करायचे असेही करायचे नाही.काळ आणि वेळ कुणासाठी थांबत नाही तर आपण काळाची पावले ओळखून आपण आपले जीवन आनंदमय आणि सुखमय कसे जाईल याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.तुम्ही निर्माण केलेले आणि प्रत्यक्ष जीवनात अनुसरलेले संकल्प हे इतर लोक आपोआपच अनुकरण करतील आणि करायलाही लागतील.हा तुमचा तुम्ही सुरवातीपासून केलेला आदर्श संकल्प नवीन वर्षासाठी इतरांना अनुकरणीय ठरेल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *अपघात - Accident* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *वरपांगी पाहून निर्णय न घेणे* एका प्रवासी बोटीला भर समुद्रात अपघात होतो. त्यावर एक जोडप प्रवास करत असत. ते दोघेही जीवरक्षक बोटीपाशी येतात. त्यांना दिसत की बोटीत एकच जागा शिल्लक आहे. पती,पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो! पत्नी बुडत्या बोटी वर थांबते! बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगते! शिक्षक गोष्ट सांगायचे थांबून विचारतात, "पत्नी पतीला काय म्हणाली असेल? बहुतेक विद्यार्थी म्हणतात, मला तुम्ही धोका दिलात! मी तुम्हाला ओळखलेच नाही!!" एक मुलगा मात्र गप्पच असतो. शिक्षक त्याला विचारतात, "अरे, तुला काय वाटते ते पण सांग!" तो मुलगा म्हणतो, "गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा!" शिक्षक चकित होउन विचारतात, "तुला ही गोष्ट माहीत आहे का?" तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो," नाही गुरुजी, पण माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!" "तुझे उत्तर बरोबर आहे!" शिक्षक हलकेच म्हणाले. बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केले. बऱ्याच वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते. त्यातून असे समजते की तीच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो आणि ती त्यातून वाचणार नसते! त्या मुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो! त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, "तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती! पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून याव लागल!" *तात्पर्यः* चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठी, कधी कधी मोठी गुंतागुंत असते जी आपल्या सहज लक्षात येत नाही! त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेऊ नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/12/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *जागतिक जैवविविधता दिन*        💥 ठळक घडामोडी : १९९४ - माझगाव डॉकने तयार केलेली क्षेपणास्त्र वाहक नौका भा.नौ.द. नाशक भारतीय नौदलात दाखल. २००५ - बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी. 💥 जन्म :- १८४४ - उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील. १९०० - मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतीय नट, गायक. १९१७ - रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक. १९४२ - राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते. 💥 मृत्यू :- १९६७ - पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ. १९७१ - दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कांदा निर्यातीचं अनुदान 5 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांवर, केंद्र सरकारचा निर्णय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ परिसरात 1 जानेवारीला पाच सभांना परवानगी, सोशल मीडियावरही पोलिसांची देखरेख* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *इस्रोच्या 'मिशन गगनयान'साठी 10 हजार कोटी रुपये मंजूर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीतील एक महत्त्वपूर्ण निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याची केंद्र सरकारची तयारी; केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *खामगाव : भारिप बहुजन महासंघाकडून बुलडाणा लोकसभेसाठी बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांची उमेदवारी जाहीर.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : एसटीच्या 3 हजार 307 कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट, इच्छित ठिकाणी होणार बदली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *2017 प्रमाणे यंदाही सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला विराट कोहली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नांदेड मनपाचे मुख्य लेखाधिकारी श्री संतोष कंदेवार यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला लेख *प्राथमिक शिक्षक ते मुख्य लेखाधिकारीचा प्रवास* https://prajawani.in/news_page.php?nid=602 वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एच. डी. कुमारस्वामी* एच. डी. कुमारस्वामी हे कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.ते यापूर्वीसुद्धा २00६-७ दरम्यान कर्नाटकचे १८वे मुख्यमंत्री होते. हे कर्नाटक जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे अध्यक्ष आहेत. कुमारस्वामी कन्नड चित्रपटांचे निर्माता आणि वितरक आहेत. त्यांचे वडील एच.डी. देवेगौडा भारताचे माजी पंतप्रधान आहेत. कुमारस्वामी यांना त्यांची पत्नी अनितापासून निखिल नावाचा मुलगा आहे. निखिल कन्नड चित्रपट अभिनेता आहे. कुमारस्वामी यांना कन्नड आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री राधिकापासून शमिका नावाची मुलगी आहे.धर्मनिरपेक्ष जनता दलाचे कर्नाटकातील एक कार्यकर्ते होन्नालोगेरे प्रकाश यांची हत्या झाल्यानंतर जनता दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करणार्‍या हल्लेखोरांना गोळ्या घाला, असे वक्तव्य करून कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी नवा वाद निर्माण केला आहे. कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर दु:खी होणे समजू शकते, परंतु हल्लेखोरांना अटक करून कठोरातील कठोर शासन करण्याची भूमिका कुणीही घ्यायला पाहिजे. मग ते भले ते विरोधक असले तरी! त्यातही पुन्हा सत्ताधार्‍यांची जबाबदारी अधिक असते, याचे भान कुमारस्वामी यांना राहिले नाही आणि ते भलतेच बोलून गेले. कुमारस्वामी हे कर्नाटकातील शेतकर्‍यांचे लाडके मुख्यमंत्री आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व राकट दिसत असले तरी प्रत्यक्षात ते भावनाशील असल्याचे सांगितले जाते आणि त्याचा प्रत्यय अधुनमधून येत असतो. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर काही दिवसांतच कार्यकर्त्यांसमोर बोलताना ते भावुक झाले आणि आपण भगवान शंकराप्रमाणे आघाडीचे विष पितोय, कोणत्याही क्षणी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतो, असे वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. त्याबाबत त्यांनी नंतर घूमजाव केले. हल्लेखोरांना गोळ्या घालण्याच्या वक्तव्याबाबतही त्यांनी ह्यमी भावनेच्या भरात चुकीचा शब्द वापरला, ती केवळ तात्कालिक प्रतिक्रिया होती. आदेश नव्हते, असे स्पष्टीकरण दिले आहे. यातला प्रांजळपणा गृहित धरला तरी कुणाही राज्यकत्यार्ला ही भाषा शोभणारी नाही, तो बेजबाबदारपणा आहे. एकूणच भारतीय राजकारणात वाढत चाललेला हिंस्रपणा सर्व राजकीय विचारधारांच्या लोकांनी आत्मसात केला आहे, हेच यातून दिसते. अधून मधून त्यांचे कर्नाटकमधील सरकार पडणार असल्याच्या चर्चा होतात. आताही त्यांच्या पक्षातील एक मोठा गट भाजपाशी संधान साधून बाहेर पडणार असल्याची चर्चा असून यामुळे या राज्यातील जदसे व काँग्रेस आघाडीचे चर्चा लवकरच पडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) निकोबार द्विपबेटात किती बेटे आहेत ?* १९ *२) भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणारे राज्य कोणते ?* उत्तर प्रदेश *३) पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे पार पडली ?* नवी दिल्ली *४) बोरलॉग पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ?* कृषी क्षेत्र *५) विल्यम शेक्सपिअरच्या निधनाला किती वर्षे पूर्ण झाली ?* ४०० *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  संतोष हणमंतराव कंदेवार मुख्य लेखाधिकारी, मनपा नांदेड ● संजय आंध्रस्कर ● विजय रणभिडकर ● सुरेश सुतार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काळ* मी मी म्हणणाराला काळ जिंकता येत नाही कितीही मी मी म्हणा काळ गुलाम होत नाही मी मी म्हणणाराला काळाला शरण जावे लागते काळा पुढे सर्वांनाच नतमस्तक व्हावे लागते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दोन पायांवर उभं राहून काटेरी बाभळीची छोटी छोटी पानं लुसूलुसू खाणारी बकरी पाहिलीत का तुम्ही? समोरचे दोन पाय बाभळीच्या झाडाला लावून मागच्या दोन पायांवर अवघड आसनात उभी असते. पोटातल्या भुकेमुळं त्या आसनावरची पकड मजबूत असते. त्यामुळं तोल जात नाही. उलट एक आकर्षक डौल तयार होतो. शिवाय काटे टाळून छोटी छोटी पानं खाण्याचं कसब खासच. एखाद्या योग्याला ध्यान लागावं तसं बकरीने या आसनात मन एकाग्र केलेलं असतं. डोंगराच्या अवघड कपारीत बरेचदा बकरी दिसते. त्या अवघड कपारीत बकरी जाते कशी? हा गहन प्रश्न आहे. त्या कपारीतून पाय घसरला तर खाली खोल दरी असते. म्हणजे त्या बकरीची शेवटची ब्या-ब्या ही कुणाला ऐकू येणार नाही. पण त्या जीवघेण्या कपारीत बकरी जाते, यामागे असते फक्त भूक !* *भक्ष्यावर झेप मारणारा पक्षी किंवा वाळक्या पानांवर पायाचा आवाज न करता दबक्या पावलांनी चालणारा चित्ता डिस्कव्हरी चॅनलवर हमखास दिसतो. आभाळातून नेमकेपणानं भक्ष्य हेरून त्यावर झाप मारून भक्ष्याला अलगद उचललं जातं, यातलं वेळेचं नियोजन कमाल असतं. एक क्षण जरी इकडचा तिकडं झाला तरी शिकार निसटू शकते. पाण्यावर झाप मारून पाण्यातला मासा अलगद उचलणारा पक्षी तर अद्भूत असतो. जेंव्हा पोपट राघू गाभूळ्या कैरीवर उलटा होऊन कैरी टोकरतो..उलटं टांगून घेणा-या राघूची झेंड्यासारखी हलणारी शेपूट भुकेची पताका होऊन फडकत असते.* *"जेंव्हा जेंव्हा कोणी भुकेविरूद्ध संघर्ष करायला पाय रोवून उभा राहतो..तेंव्हा तेंव्हा तो सुंदर दिसू लागतो."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🦆🦆🦆🦆🦆🦆संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     पाहन पूजै हरि मिलै तो मै पूजूँ पहार । ताते तो चक्की भली पीसि खाय संसार । सारांश : दगड-धोंडे पूजणार्‍यांचा समाचार घेताना महात्मा कबीर म्हणतात की दगाड-धोंडे पूजल्यामुळे इच्छित साध्य झालं असं होईल, मनोकामना पूर्ण होतील किवा देवाची प्राप्ती होणार असेल तर मी अख्खा पर्वतच पूजायला तयार आहे. त्यापेक्षा दगडापासून बनलेल्या जात्याची काळजी घ्यायला मला आवडेल. कारण हे जातं धान्य भरडण्याच्या कामी येतं. त्यापासून पीठ मिळतं. त्यामुळे जगातील जीवांची भूक तरी भागते. श्रद्धेच्या नावाखाली लोक दगडा-धोंड्याला पूजत राहातात. काही जण रंग फासलेले किंवा हळदी-कुंकू लावलेले दगड दिसताच हात जोडतात. गाडीवरून जाताना मंदिर येताच गाडीचा भोंगा वाजवतात. जसा काही मंदिरातला देव झोपलाय अन आवाज देवून हे त्याला जागं करित आहेत. पहावं ते नवलंच ! एकाचं बघून दुसरा करणार अन ती प्रथाच होणार. आज संगणक युगात वावरताना आंतरजालात दडलेलं जगाचं ज्ञान संगणकावर एका क्लिक मध्ये आपल्यासमोर येतं. संगणक माहिती आदान प्रदानाचं यंत्र आहे. .हे माहित असून सुद्धा त्याला चालू करण्यापूर्वी त्याची पूजा अर्चा करणारे . त्यावर धर्माचे सांकेतिक ठसे उमटवणारे, अज्ञानाचं जोखड वाहणारे ढोंगी बुवा, मौलवी यांचं विज्ञानानंच बणवलेल्या माईकवरून 'ये विज्ञान फिज्ञान सब झुट है । म्हणनं अन विज्ञान शिकलेल्या श्रोतृ समुदायाकडून माना हलवून प्रतिसाद देणं किती ढोंगी व भंकस पणाचा कळस आहे बरं हा ! अशी मानसिकता पाहिली की दया यायला लागते. कोणता संस्कार व शिकवण देत आहेत बरं आपल्या वर्तन अन करणीतून भावी पिढ्यांसाठी ! खरंच का जगू शकत नाही माणूस ढोंगाशिवाय ! का झिडकारत नाही अज्ञानाची काजळी ? विज्ञान आणि मानवतावादाचा मेळ घालत विचारचनं विवेकाचे दीप प्रज्वलित करता आले तर जीवनात दररोजच दिवाळी साजरी होईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांच्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीशी आपली तुलना करु नका यापेक्षा आपल्या जीवनात कोणता चांगला बदल करायला हवा ते पहा.ज्यामुळे आपल्या चांगल्या बदललेल्या जीवनशैलीचे इतरांना अनुकरण करता येईल.त्यात तुम्हालाही समाधान वाटेल आणि इतरांनाही तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळाले याचा आनंद वाटेल.लोक तुमच्या वाईट गोष्टींचे कधीच अनुकरण करत नसतात हे लक्षात असू द्या.म्हणून सदैव आपल्या जीवनात आपल्यातले असलेले दुर्गुण शोधायला शिका आणि इतरांच्या मध्ये असलेले चांगले गुण शोधून आपल्या जीवनात घेऊन त्यांचे अनुकरण करायला शिका म्हणजे आपणही इतरांसारखे नक्कीच चांगले जीवन बनवू शकू. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रकरण - Episode* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *व्‍यवहारज्ञानाचे धडे*  एका शहरात दररोज संध्‍याकाळी एक महात्‍मा प्रवचन देत असे. त्‍यांची ख्‍याती एका धान्‍याच्‍या व्‍यापा-यानेही ऐकली होती. तो आपल्‍या मुलासोबत प्रवचन ऐकण्‍यास आला. प्रवचन सुरु झाल्‍यानंतर दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते. काही ज्ञानाच्‍या गोष्‍टी सां‍गत असताना ते म्‍हणाले,''या जगात जितके प्राणी आहेत. त्‍या सर्वांमध्‍ये आत्‍मा वावरत असतो.'' ही गोष्‍ट व्‍यापा-याच्‍या मुलाला हृदयस्‍पर्शी वाटली. त्‍याने मनोमन हा विचार आचरणात आणण्‍याचा संकल्‍प केला. दुस-या दिवशी तो एका दुकानावर गेला तेव्‍हा त्‍याच्‍या वडिलांनी त्‍याला काही वेळ दुकान सांभाळण्‍यास सांगितले. ते स्‍वत: दुस-या कामासाठी बाहेर निघून गेले. त्‍यानंतर काही वेळाने तेथे एक गाय आली. दुकानासमोर ठेवलेले धान्‍य खाऊ लागली. मुलाने त्‍या गायीला हाकलण्‍यासाठी लाकूड उचलले पण त्‍याच्‍या मनात विचार आला. गाय आणि माणूस दोघांनाही जीव आहे.मग भेदभाव का मानायचा? ती धान्‍य खात असेल तर खाऊ दे. तेवढयात व्‍यापारी तेथे आले त्‍याने गायीला धान्‍य खाताना पाहून मुलाला म्‍हणाले,'' अरे तुझ्यासमोर ती गाय धान्‍य खाते आहे? आणि तू आंधळा झाल्‍यासारखा गप्‍प बसून का आहेस? आपले किती नुकसान होते आहे याची काही कल्‍पना आहे की नाही? तिला हाकलून का दिले नाहीस?'' मुलगा म्‍हणाला,'' बाबा, काल तर महाराज म्‍हणाले की, सगळे जीव एकसारखे आहेत, मी गायीमध्‍ये पण एक जीव पाहिला'' तेव्‍हा व्‍यापारी म्‍हणाले,''मूर्खा, अध्‍यात्‍म आणि व्‍यापार यात गल्‍लत एकसारखे करायची नसते.'' तात्‍पर्य :- सारासार बुद्धीचा वापर करून जीवन जगल्‍यास जीवन सुखदायी होते.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/12/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *हुतात्मा शिरीषकुमार जयंती*        💥 ठळक घडामोडी : १६१२ - गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले. १८३६ - स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले. १८४६ - आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले. १८७९ - डंडी, स्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार. 💥 जन्म :- १९२६- शिरीषकुमार यांचा जन्म. १९३२ - धीरूभाई अंबाणी, भारतीय उद्योगपती. १९३७ - रतन टाटा, भारतीय उद्योगपती. १९४०- ए के अँटनी माजी मंत्री १९५२- अरुण जेटली केंद्रीय मंत्री . 💥 मृत्यू :- १९६७ - द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय. १९७१ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक. १९७७ - सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी. २००० - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत. २००० - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक. २००३ - चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. २००३ - कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे. २००६ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर, राज्यसभेतही मंजूर होईल- गृहमंत्री राजनाथ सिंह* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई- ९९वे नाट्यसंमेलन होणार नागपूरमध्ये, २२ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०१९ ला होणार नाट्यसंमेलन, ९९ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली; ११ वर्षात तुकाराम मुंढे यांची १४वी बदली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, 25 लाख कर्मचाऱ्याना मिळणार याचा फायदा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *उत्तर प्रदेशातील महाकुंभमेळ्यासाठी दीड वर्षात उड्डाणपुलांसह ६७१ विकास प्रकल्प'* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *गाझीपूर येथे कचरा आणि टाकाऊ प्लास्टिकपासून वीज निर्मितीचा प्रयोग येथे राबवला जात आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मेलबर्न - बॉक्सिंग डे कसोटीमध्ये भारताने आपला पहिला डाव 7 बाद 443  धावांवर डाव घोषित केला असून,भारताचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज माघारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/MXaGlNn Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *भाग आठवा* वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_25.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हिवाळ्यातील आहार* हिवाळ्यात पचनशक्ती उत्तम राहते. त्यामुळे या दिवसात काहीही खाल्लं तरी पचतं, असं म्हटलं जातं. मात्र, या दिवसातही आहाराकडे विशेष लक्ष दिलं जायला हवं. त्या बाबतचा हा कानमंत्र.. ४ थंडीत मिळणार्‍या गाजर, नवलकोल आदी भाज्या पौष्टिक असतात. थंडीपासून शरीराचं रक्षण करणार्‍या असतात. थंडीतल्या सर्दी, खोकला, फ्लू आदी आजारांना दूर ठेवण्यासाठी त्यांच्या सेवनाचा लाभ होतो.  ४ थंडीत ग्रीन टीचं सेवनही उपयुक्त ठरतं. ग्रीन टी मध्ये भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. यामुळे घातक बॅक्टेरियांचा प्रभाव कमी होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास अँटीऑक्सिडंट मदत करतात.  ४ हिवाळ्यात लसूण खाणं चांगलं. लसणामुळे शरीराला उर्जा मिळते.  ४ गरम दुधात मध घालून प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. थंडीत दुधात साखरेऐवजी मध घालावं.  ४ हिरव्या भाज्यांमधली अ आणि क ही जीवनसत्त्वं थंडीत आरोग्यासाठी लाभदायी ठरतात.  ४ संत्री, दाक्ष आदी फळातील क जीवनसत्त्वामुळे त्वचेचं पोषण होतं. कोलेस्टरॉॅल कमी करण्यासोबत ही फळं चयापचय क्रिया वाढवतात.  ४ या दिवसात प्रथिनयुक्त आहार घ्यावा. कबरेदकांचं प्रमाण जास्त असणारे ब्रेड, पांढरा भात असे पदार्थ टाळावे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करले पाहिजे, आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) इंडियन अँग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्युट कोठे आहे ?* पुसा (नवी दिल्ली) *२) सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री कोण ?* आदिल अल जुबेर *३) 'द इंडियन स्ट्रगल' हे पुस्तक कोणी लिहिले ?* नेताजी सुभाषचंद्र बोस *४) संगमरवर खडक कोणत्या राज्यात आढळतो ?* राजस्थान *५) जागतिक दूध दिन कधी साजरा केला जातो ?* १ जून *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  साई पाटील जुन्नीकर ●  व्यंकटेश माडेवार ●  वृषाली वानखडे ●  अजय तुमे ●  योगेश शंकर ईबीतवार ●  नंदकिशोर सोवनी ●  ओमसाई गंगाधर सीतावार ●  सचिन आठवले ●  रुकमाजी कट्टावाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विचार* आवड अन् उत्साहाने काम उत्कृष्ट बनते उगीच विचार कशाला की जग काय म्हणते जगाचा विचार केल्यास कोणी काही करू शकत नाही जगाचा विचार करणारा कधी महान ठरू शकत नाही शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'सहजस्थिती किंवा नीजस्थिती' कशी असते यासाठी एक साधे मोटारचे उदाहरण घेऊन स्पष्ट करू. मोटार चालकापाशी क्लच, ब्रेक, आणि अॅक्सिलेटर या तीन गोष्टी महत्वाची भूमिका बजावत असतात. चालकाचे काम संतुलित, संयमित मोटर चालविणे हे असते. त्याच्या पायाखालच्या अॅक्सिलेटरमुळे गाडीचा वेग वाढतो. आपल्या आयुष्यात सुखकारक, आनंददायक घटना घडल्या की आपल्या चित्तवृत्ती उचंबळून येतात. मन था-यावर रहात नाही... आणि प्रतिकूल, क्लेशकारक, घटना घडली की तेच मन काळवंडते, कोमेजते, मलूल, उदास आणि खिन्न होते. गाडीसमोर कोणी अनपेक्षित आले की आपण कचकन् ब्रेक दाबतो. तेव्हा होते तशी ही अवस्था असते.* *पण गाडी तर चालू राहिली पाहिजे आणि इंजिनशी तिचा असलेला थेट संबंध काही इच्छित काळापुरता तुटला पाहिजे, तेव्हा आपण क्लच दाबतो. ही जी अवस्था ती स्थिर, शांत, आणि समधात अवस्था. म्हणजे आपण जिवंत आहोत आणि आपले मन स्वच्छ, नितळ, पारदर्शी, भाव-विकाररहित झाले आहे. लिंग-देह-सुख-दु:ख यांच्या पलिकडील ही अवस्था. यावेळी आपल्याला येणारी आनंदाची अनुभूती केवळ शब्दातीत - ती चिदानंद स्वरूपाची. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास सर्व संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...* *'नामापरते सुख नाही रे सर्वथा !'* *--हाच तो सदगुरूपदेश...* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जाति न पुछो साधु की पुछ लिजिए ग्यान । मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान । अर्थ महात्मा कबीर ज्ञानविषयक विवेचनात सांगतात की, विद्वान जाती धर्म किवा कुळावरून ठरवू नये किवा त्याची जात, धर्म, कुळ विचारू नये. असे सांगतात. तलवारीचं श्रेष्ठत्त्व तिच्या धारेवरून ठरत असतं. तलवार ठेवण्यासाठी कोणतं म्यान वापरलं जातं. ते फार किमती आहे का? हे फार महत्वाचं नसतं. तलवारीला चमकण्यासाठी म्यानाबाहेरंच काढावं लागतं. म्यान रिकामंच पडून राहातं. लोकबोलीत एक म्हण आहे. नदीचं मुळ आन ऋषीचं कुळ विचारू नये. किती विचारपूर्वक ही म्हण जपलीय बरं आपल्या पुर्वजांनी ! रामायणाचा रचिता पूर्वायुष्यात वाटमारी करणारा लुटारू म्हणून हिणवल्या जायचा. एकादा प्रसंग जीवनात घडून जातो अन सुरू होतं जीवनाचं आरपार चिंतन. पार धुवून जातो लुटारूपणाचा कलंक. प्रकटतो जीवन अन नात्यांच्या आदर्शत्वाची अनुभूती देत तत्वचिंतक वाल्मिकी . वेळेचा सदुपयोग करीत स्वतःला सदैव वाचन चिंतनात गुंतवून वर्षानुवर्ष गुलामीत खितपत पडलेल्या माणसांना स्वाभिमानाची जाणीव करून देणारा मानव मुक्तीचा एल्गार ही एक क्रांतीच आहे. जीवनोद्धाराचा शिक्षण हाच महामार्ग सांगणारे प्रज्ञासूर्य डाॅ.भीमराव आंबेडकर जगाच्या औत्सुक्याचा विषय ठरणे ही जाती ,धर्म किवा कुळाची किमया नव्हती. ती विद्वतेची किमया होती. तलवारीला पाहाताना म्यानाला काढून टाकावंच लागतं तसं विद्वानाची उंची त्याच्या विद्वत्तेवरून पहावी लागते, जातीवरून नव्हे ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण सर्वसाधारणपणे ज्यांच्याजवळ धनसंपत्ती,पैसा अडका,गर्विष्ठपणा आहे अशा माणसांना श्रीमंत असे म्हणतो.तर ज्यांच्याजवळ ह्या गोष्टी नाहीत अशी माणसे गरीब आहेत असे म्हणतो.परंतु श्रीमंत माणसाजवळ सगळ्या गोष्टी उपलब्ध असूनही त्यांच्याजवळ माणुसकीचा थोडाही लवलेश नसेल तर तो श्रीमंत कसला ? त्याला श्रीमंत म्हणण्यापेक्षा तो रंकही म्हणण्याच्या लायकीचा नाही. उलट जो माणूस परिश्रम करतो,आहे त्या परिस्थितीत समाधान मानतो, इतरांबद्दल आपुलकीने,प्रेमाने वागतो, कठीण प्रसंगी इतरांच्या वेळेला धाऊन जातो, इतरांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे अशी भावना मनात बाळगतो,ज्याचे मन शुद्ध आणि पवित्र आहे,मनामध्ये कोणतीही स्वार्थी भावना नाही,कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही अशी माणसे श्रीमंतापेक्षाही अधिक श्रीमंत असतात हे लक्षात असू द्यावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लायक - Worth it* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *इतरांचीही दुःख पाहणे* एकदा एका झाडाखाली सशांनी आपली एक तातडीची सभा बोलावली. सर्वच ससे दु:खी आणि घाबरलेले होते. एक ससा उभा राहून म्हणाला, ''मित्रहो, आपलं जीवन फारच दु:खी आहे आणि या दु:खातून आपली सुटका होणे कधीही शक्य नाही. आपल्याला मनुष्य, कुत्रा, गरूड आणि इतरही अनेक लहान मोठ्या प्राण्यांपासून धोका आहे. तेव्हा आपण सर्वचजण एखाद्या तलावात जाऊन जीवन देऊया.  जिवंतपणी या अनंत यातना भोगण्यापेक्षा मरण परवडले. शिवाय आपण एकत्र मरू. म्हणजे दुसर्‍याच्या मरणाचे दु:खही करायला नको.'' त्या सशाचे बोलणे सर्व सशांना पटले. त्या सर्वांनी एकाच वेळी प्राणत्याग करण्याचे ठरवले. प्राणत्याग करण्याचा दिवसही ठरविला गेला. ठरलेल्या दिवशी सर्व ससे आपल्या कुटंबातील लहानथोरांसह एकत्र जमले. थोड्याच वेळात सशांचा एक मोठा समूह तळ्याकाठी आला. त्या तळ्याकाठच्या चिखलात बरेच लहानमोठे बेडूक खेळत होते. सशांना पाहून ते घाबरले आणि त्यांनी भराभर तळ्यात उड्या टाकल्या. ते पाहून एक हुशार ससा म्हणाला,  ''मित्रांनो, थांबा. घाई करू नका. आता तुम्ही पाहिलंत ना. आपल्याला घाबरणारे प्राणीही या जगात आहेत. त्यांचं दु:ख आपल्यापेक्षाही मोठं आहे. तरीही ते हिंमत बाळगून जगताहेत ना मग आपण कशाला दु:खी आणि निराश व्हायचं! या प्राण्यांपेक्षा आपण सुखी आहोत.  तेव्हा आपल्यापेक्षा सुखी प्राण्यांकडे न पहाता दु:खी प्राण्यांकडे पाहून आपण जगायला हवे. म्हणजे आपले दु:ख आपल्याला जाणवणार नाही. तेव्हा चला आता आपआपल्या घरी आणि आनंदाने जगा.'' त्या सशाचे बोलणे सर्वांनाच पटले. आनंदाने उड्या मारीत ते आपापल्या घरी परतले. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/12/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. पंजाबराव देशमुख जयंती* 💥 ठळक घडामोडी : १७०३ - पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. १८३१ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला. १९४५ - २८ देशांनी जागतिक बँकेची स्थापना केली. १९४५ - कोरियाची फाळणी. १९४९ - इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य. 💥 जन्म :- १७९८ - पंजाबराव देशमुख, विदर्भातील सामाजिक नेता, शिक्षण प्रसारक, केंद्रीय कृषिमंत्री. १९६५ - सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९६५ - देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय. १९९७ - मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका. २००२ - प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दिल्ली : आंध्र प्रदेशमधील नव्या उच्च न्यायालयाला राष्ट्रपतींकडून मंजुरी.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नाशिक : आमदार बच्चू कडू यांचे प्रांत कार्यालयातील आंदोलन मागे, 14 पैकी 10 मागण्या मान्य, उर्वरित 4 मागण्यांवर 4 जानेवारीला बैठक* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नंदुरबार : सारंगखेडा येथील पर्यटन महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चेतक फेस्टिव्हलचे या दोन वर्षांत आमच्या सरकारने आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्रँडिंग केले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची घेतली भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राजस्थानः लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे प्रभारी म्हणून प्रकाश जावडेकर यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमा सापडला वादाच्या कचाट्यात, या सिनेमातील दोन संवाद आणि तीन दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने घेतला आक्षेप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दोन बाद 215 धावांपर्यंत मारली मजल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/k6K1bvq Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नामकरण ते अंत्यविधीचा प्रवास* https://prajawani.in/news_page.php?nid=511 दैनिक प्रजावणीमध्ये प्रकाशित लेख. वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *✍🏻 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पंजाबराव देशमुख* पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. १९३६ च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.त्यांनी उच्च शिक्षण हे एडिनबर्ग व आक्सफर्ड विद्यापीठ येथून पूर्ण केले. तसेच त्यांनी डॉक्टरेट ब्रिटेन येथून केले. त्यांनी अमरावती येथे परत येवून कायदा शिक्षणाची तयारी सुरु केली. १९३0 मध्ये ते प्रांतीय लॉ बोर्डाचे सदस्य म्हणून निवड होऊन ते शिक्षण मंत्री, कृषी व सहकारी विभागाचे मंत्री बनले होते. त स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या विकास समितीचे सदस्यि झाले. १९५२, १९५७ आणि १९६२ रोजी त्यांची खासदार म्हनणून नियुक्तीच झाली. तसेच ते १९५२ ते १९६२ पयर्ंत कृषिमंत्री होते. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी र्शद्धानंद वसतिगृह सुरू केले. त्यांनी प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहे यांचा समावेश आहे. शेतकरी स्थिती सुधारणा करण्यासाठी त्यांनी भारत कृषक समाज स्थापन केले आणि त्यांनी अधिवक्ता धोरण कायम ठेवण्यातसाठी एक वृत्तपत्र म्हणजे महाराष्ट्र केसरी सुरू केली. स्वतंत्र भारतात कृषिमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्‍चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,000 च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी , तसेच पदविका तंत्रनिकेतन , कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक महाविद्यालये सुरू करून आज शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) आशिया खंडातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?* सिंद्री (झारखंड) *२) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे ?* वॉशिंग्टन *३) कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?* जिराफ *४) भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?* हिराकुंड *५) केळीचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते ?* तामिळनाडू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  पूजा शिंपी बागुल ● विठ्ठलभाई श्रीगांधी ●  शिवाजी अंबुलगेकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वेळ* आयुष्यात जेव्हा आपल्या कठीण वेळ येत असते आपल्या क्षमतेची तेव्हा खरी ओळख होत असते कठीण काळ माणसाला खुप काही शिकवत असतो जीवन जगण्यासाठी तोच आपल्याला टिकवत असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाने माणसांशी, सर्व प्राणीमात्रांशी आणि निसर्गाशी माणसासारखं वागावं ही आपल्या धर्माची शिकवण आहे. सृष्टीतलं चैतन्य म्हणजे ईश्वर ! सर्वसामान्य माणसाला देवाची उपासना करणं सोपं जाईल म्हणून सगुण साकार म्हणजेच मूर्तीची पूजा सुरू झाली. मंदिरातल्या मुर्तीचं पावित्र्य जपायचं असेल तर स्त्री-पुरूष कोणालाच गाभा-यात प्रवेश द्यायचा नाही, मुर्तीला स्पर्श करू द्यायचा नाही हे समजण्या सारखे आहे. मंदिरातल्या वातावरणाचं पावित्र्य राखलं जावं, कुठले कपडे घालून देवदर्शनाला मंदिरात जावं हे भान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. कालबाह्य रूढी-परंपरा सोडून दिल्या तरच पुढच्या पिढीला हा धर्म, ही संस्कृती आपली वाटेल.* *माणिक वर्मा यांनी गायलेलं, ' क्षणभर उघड नयन देवा !' हे गीत आठवतं. या रचनेत कवी देवाला डोळे उघडायला सांगत नाही, तर देवदर्शनासाठी आलेल्या एका अंध व्यक्तिसाठी ही प्रार्थना करीत आहे. त्या अंध व्यक्तिचे क्षणभर तरी डोळे उघडून त्याला तुझं दर्शन दे, अशी प्रार्थना कविराज करत आहे. स्त्रियांवर होणारे आत्याचार, अन्याय थांबव.. ते करणारांचे डोळे क्षणभर तरी उघड, अशी प्रार्थना नवरात्राच्या निमित्ताने दुर्गादेवीपाशी करावीशी वाटते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• भारी कहौ तो बहु दरौ, हलका कहु टू झूत | माई का जानू राम कू, नैनू कभू ना दीथ || अर्थ महात्मा कबीर निर्गुणाचे उपासक होते. कोणतेही तत्त्व भारी (जड) आहे असे म्हटले तर त्याबद्दल भिती निर्माण होते . जर ते हलके (सहज ) आहे म्हणावे तर ते बावळट पणाचे ठरेल. ज्या तत्त्वाची आपण अनुभूतीच घेतली नाही . केवळ ऐकून त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करणे हे अततायीपणाचे ठरेल ! राम म्हणजे कर्तव्य निष्ठा व कर्तव्य पालन. राम म्हणजे मर्यादा पुरूषोत्तम . राम तत्त्व विचार आधी आमच्या वर्तनात उतरला पाहिजे. दृढनिश्चयी वृत्तीचा अंगीकार केला पाहिजे. न्यायवृत्ती , लोकादर भावना व बंधुत्व आमच्या ठायी रूजले तरच रामाबद्दल बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो. केवळ रामाचे नाव घेतले आणि वर्तनात राम उतरवलाच नाही. तर आम्ही राम अनुसरतो म्हणणे योग्य ठरेल का ? राम ही समृद्ध जगण्याची संकल्पना आहे. राम सोशिकतेचा महान विचार आहे. राम विवेक आणि विचाराचा जागर आहे. राम जीवनाचा महन्मंगल आधार आहे. जगताना सर्वव्यापकता नसेल तर जगण्यात राम राहात नाही. संकुचित व स्वार्थीपणे जगण्याने जीवनात राम येत नाही. माणसाने आपापल्या क्षेत्रात कार्य करीत असताना ते ओझे म्हणून रडत अडखळत काम करण्याऐवजी समर्पण भावानं ते हसत हसत पूर्ण केलं तर कार्याला आणि त्या क्षेत्राला एक वेगळीच खुमारी चढते. अन जीवनात राम भरायचा म्हणजे तरी दुसरं काय असतं बरं.... ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम एकाकी जीवन व एकांतात राहणे सोडून द्यावे.कारण एकाकी जीवनात नको ते विचार मनात येतात आणि त्रस्त करतात.त्याचा परिणाम स्वत:च्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीवर होतो आणि त्यामुळे सुखासमाधानाने असलेले जीवन दु:खात जगत असल्याचे वाटते.त्यापेक्षा इतरांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आनंदी जीवनात आपणही राहावे.असे केल्याने आपल्या मनात आणि मनावर असलेले दडपण थोड्याप्रमाणात कमी होण्यास मदत होते.इतर लोक कसे जगतात याचेही अवलोकन करता येते.आपण दु:खी कशामुळे आहोत याचेही कारण शोधता येईल आणि शेवटी जीवन आनंदी जीवन कसे जगता येईल याचेही आपल्याला कौशल्य प्राप्त करता येईल.खरे जीवन जगण्याचा मंत्र आपल्या एकटेपणात मिळणार नाही तर इतरांच्या सानिध्यात राहिल्याने मिळतो हे आपल्याला नक्कीच मिळेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निर्णय - Decision* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *💥 खरे अपयश :-* एकदा एक रीपोर्टर एका मोठ्या यशस्वी उद्योजकाची मुलाखत घेत होता. त्याने विचारले, "सर, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे?" यावर तो साठीकडे झुकलेला उद्योजक बोलला, "माझ्या यशाचं रहस्य मी वेळोवेळी घेतलेल्या योग्य निर्णयांत आहे" रीपोर्टर ने ते उत्तर लिहून घेतले आणि आणखीन एक प्रश्न विचारला, "मग मला सांगा सर, योग्य निर्णय घ्यायला तुम्ही कसे शिकलात?" यावर एका क्षणाचाही विलंब न करता त्या व्यावसायिकाने उत्तर दिले, * "अनुभव ( Experience )* . मला आयुष्यात अनुभवाने बरंच काही शिकवलं !" हे ही उत्तर रीपोर्टर ने लिहून घेतलं आणि लगेचच उस्फुर्तपणे पुढचा विचारला, " तुम्ही हे सर्व अनुभव कसे मिळवले ?" यावर उद्योजक मिष्कील हसला, आणि थोडा पुढे झुकत रीपोर्टरच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, "माझ्या आयुष्यात मी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे !!" *🔸 तात्पर्य - * *आयुष्यात काही निर्णय चुकतात, काही बरोबर ठरतात. कधी यश येतं तर कधी अपयश, पण जर अपयशातून आपण काहीच शिकलो नाही तर ते खरं अपयश असतं !* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/12/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी. 💥 जन्म :- १९१४ - बाबा आमटे कुष्ठरोग्यांसाठी कार्यरत समाजसेवक. १९१७ - प्रभाकर माचवे मराठी व हिंदी साहित्यिक. १९३५ - डॉ. मेबल आरोळे मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.(रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी). 💥 मृत्यू :- १९७२ - हॅरी ट्रुमन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष. १९९९ - शंकर दयाळ शर्मा, भारताचे राष्ट्रपती. २०११ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी नवीन 28 मंत्र्याना दिली पद आणि गोपनीयतेची शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इंडोनेशिया : त्सुनामीमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 373 वर पोहोचला* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *अंदमान-निकोबार समूहातील बेटाला देण्यात येणार सुभाषचंद्र बोस यांचं नाव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आंध्रप्रदेश : भाजपा आमदार पी. एम. राव यांचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पालघर नगरपरिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. श्वेता मकरंद पाटील-पिंपळे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुलागिट्टी नरसम्मा यांचं वयाच्या 98 व्या वर्षी निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बॉक्सिंग डे' कसोटीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आपले संघ केले जाहीर, यजमान ऑस्ट्रेलियाने संघात एकच बदल केला, तर भारताने आपल्या संघात केले दोन बदल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/xpz1vPX Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *भाग सातवा* वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_20.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बाबा आमटे* थोर समाजसेवक मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सुश्रुषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बाबा आमटे यांना हे आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते. गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वत:ला झोकून दिले. १९४३ मध्ये वंदेमातरमची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्‍वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी १९८५ मध्ये भारत जोडो अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.” *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारतीय बॉक्सर कोण ?* शिवा थापा *२) कोपनहेगन देशाची राजधानी कोणती ?* डेन्मार्क *३) भारतात दूरदर्शनचे प्रथम प्रसारण कधी झाले ?* १५ डिसेंबर १९५९ *४) ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य कोण ?* दादाभाई नौरोजी *५) अभिनव भारत संघटनेचे संस्थापक कोण ?* स्वातंत्र्यवीर सावरकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  आकाश सरकलवाड ●  नरसिंग जिड्डेवार ●  शेख शादूल ●  कपिल जोंधळे ●  अशोक लांघे ●  नागराज डोमशेर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुंदर मन* सुंदर विचार येतात जिथे सुंदर मन आहे सुंदर विचाराला थोडच महत्त्वाच धन आहे सुंदर मन असले की सुंदरच विचार येतात मनाच्या सौंदर्यानेच सारे विकार जातात शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दारुच्या व्यसनात गुरफटलेल्या माणसाला दारूच आवडते. त्याच्या समोर अनमोल असा अमृताचा कुंभ ठेवला तरी त्याला त्याची काहीच किंमत वाटणार नाही. कारण तो व्यसनाधीनतेमुळे सदैव विषाचाच शोध घेत फिरत असतो. मुर्ख माणसाला समजावायला साक्षात ईश्वर जरी आला तरी मुर्खाच्या मुर्खपणासमोर बिचार्‍या ईश्वराचं काय खरं ठरणार नाही. व्यसनाधीनतेत बुडालेला माणूस बुद्धी प्रामाण्य वागत नाही. तो त्याने जी नशा केलेली असते. त्या नशेच्या पूर्णपणे अमलाखाली जावून त्या क्षणी सुचेल त्याप्रमाणे इष्ट-अनिष्ट वर्तन करून बाजुला होत असतो.* *गांजाडू झोपडीत गप्पागोष्टी करत चिलीम फुकत बसलेले असतात. एकाने धुंदीत चिलीम शिलगावून जळती काडी भिरकावलेली. हे महाशय झुरक्यात गुंग. झोपडी पेट घेते. तिथे बर्‍याच जीवनपूरक वस्तू आहेत. अरे जाळ लागलाय पळा, म्हणत ते केवळ चिलीमच घेवून पळतात. त्यांना तीच हवी असते.* *"गंजेटी बैठे गांजा पिने* *झोंपडी मे लागी आग,* *चल रे निकल जोगी* *अपनी चिलम ले भाग।* *असं असतं व्यसनी माणसांचं वर्तन ! मनात घेतलं असतं तर बर्‍याच मौल्यवान वस्तू वाचविता आल्या असत्या. परंतु नशेत बुद्धी शाबूत राहातेच कुठं ! नको त्या मर्कट लिला करून बघणार्‍यांच्या विनोदाचा किवा दयेचा भाग बनून ही व्यसनी माणसं जगत असतात.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर जीवन कुछ नहीं, खिन खारा खिन मीठ कलहि अलहजा मारिया, आज मसाना ठीठ। सारांश जीवन क्षणभंगूर आहे. क्षणापूर्वी ते होते अन क्षणानंतर ते असेल अशी कोणीही खात्री देवू शकत नाही. जीवनाची नश्वरता पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात, जीवन म्हणजे काहीही नाही. या क्षणाला ते खारट अनुभव देत असेल तर दुसर्‍या क्षणी ते कडवटपणाला गोडीमध्ये बदलू शकते. जीवनाचा मधूर अनुभव देवु शकतं. जो वीरयोद्भा काल युद्धामध्वे आपलं नैपुण्य पणाला लावून बाजी प्राणपणाने लढून आपल्या बाजूने ओढून आणण्यामध्ये यशस्वी झाला म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक सोहळे साजरे झाले. सर्वांनी जयमाला गळ्यात घालून त्याचा जय जयकार केला गेला. ज्याने काल मैदान मारले तो स्वतःच आज चितेवर स्मशानी निपचित अचेतन पडला आहे. मृत्यूने भल्याभल्यांना सोडलेले नाही. तिथे सामान्य जीवांचं काय खरं आहे. घारीने भक्ष्यावर झडप घालावी तशी काळ कोणत्याही क्षणी झडप घालू शकतो, म्हणून माणसानं आपल्या हाती जे काही आयुष्य शिल्तक राहिले आहे. त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा व जीवन सत्कारणी लावायला हवे , म्हणजे सत्कर्माच्या किर्तीने मृत्यू पश्चातही जीवनाचा परिमल दरवळत राहातो. मृत्यू साक्षात पुढ्यात उभा राहिला तरी त्याचे भय राहात नाही एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काळजी केल्याने कोणतेच प्रश्न मिटत नसतात तर अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे टाकतात.त्या काळजीमध्ये तुमच्या आजच्या कामावर लक्ष नसल्यामुळे तुमचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ शकेल.त्यामुळे तुम्ही अधिक काळजी करायला लागाल.त्यापेक्षा काळजी न करणे सर्वात मोठा शहाणपणा आहे.ज्याची तुम्हाला काळजी वाटते त्याकडे लक्ष न घालणे सगळ्यात चांगले.आजच्या कामात अधिक लक्ष घातले आणि मन लावून काम केले तर त्या कामात गढून जाल.चांगले काम झाल्याचे समाधान तर वाटेलच आणि काळजी पण दूर होईल.काळजी कोणतीही असो.आजची असो की उद्याची.तो काळ तुमच्या काळजीमुळे थांबणार का ? नाही ना.मग आपले मन प्रसन्न ठेवा.येणा-या आणि हाती असलेल्या कामात अधिक लक्ष घाला मग तुम्हाला तुमचे समाधान मिळेल.समाधान हे काळजीला उत्तम पर्याय आहे हे कधीही विसरु नका. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 💠🌹💠🌹💠🌹💠🌹💠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡.... मूल घडवताना........... 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• .मुले तुमच्याशी कोणत्याही विषयावर मनमोकळेपणाने बोलू शकतात हे त्यांना कळू द्या. त्यांना बोलायचे असते तेव्हा तुम्ही ऐकण्यास तयार असता असे त्यांना वाटले पाहिजे. कोणताही संकोच न बाळगता मुलांना मनातले बोलता यावे असे खेळीमेळीचे, निवांत वातावरण तयार करा. आई-वडिलांना मनातले सांगितल्यास ते रागावतील किंवा आपल्यालाच दोष देतील असे जर मुलांना वाटले, तर ते कदाचित मनातले बोलणार नाहीत. तेव्हा, मुलांशी धीराने वागा आणि तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे याचे त्यांना वेळोवेळी आश्वासन द्या. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संकटातून शोधामार्ग* *एके दिवशी एका शेतकऱ्याचा घोडा शेतातल्या कोरड्या विहिरीत पडला, जखमी झाल्यामुळे तो मोठ्याने ओरडत होता.लोकं जमा झाले शेतकरी धावत आला त्याने बराच विचार केला फार प्रयत्न केले.* *त्या घोड्याला त्या विहीरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले,पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत नव्हते.दिवस मावळायला आला होता.शेतकरीही आता थकला होता आणि कंटाळला होता त्याने विचार केला.आता हा घोडातर तसाही म्हातारा झाला आहे असेही निरुपयोगी आहे.आणि ती विहिरही कोरडीचं आहे ...* *त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून द्यावे... विहीरीत माती लोटावी...घोड्याचा प्रश्न ही सुटेल आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल......."* *मग काय जमलेल्या सर्व लोकांकडून त्याने मदत मागीतली.आणि सगळे कामाला लागले,कुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात झाली.....मध्ये* *पडलेल्या त्या जखमी घोड्याला काही कळेनासे झाले ...विहीरीत पडल्याने शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात भर म्हणजे आयुष्यभर ज्या मालकाची चाकरी केली.त्याची ओझी वाहीली आज तोचं मालक जिवावर उठला...ते दुखा:ने अजून मोठयाने ओरडू लागला* *वरुन माती पडतचं* *होती...काही वेळाने घोड्याचा ओरडण्याचा आवाज थांबला.....सागळ्यांना वाटले घोडा मेला बहुतेक शेतकर्याने सहज विहीरीत डोकावून* *पाहीले,तर तो पहातचं राहीला...अंगावरची माती झटकत घोडा उभा राहीला होता.* *लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु केले...परत पाहीले तर घोडा त्याचा तोच मग्न होता तो वरुन माती पडली की, झटकायचा आणि त्या पडलेल्या मातीच्या थरावर उभा रहायचा.....* *असं करता करता कोरडी विहीर बरीचं भरली आणि कठडा जवळ येताचं तो घोडा तो कठडा ओलांडून बाहेर आला....* *आयुष्यात वेगळे तरी काय होतं ???* *आपण खड्यात पडलो तर, आपणास काढायला कोणीतरी एकचं येते पण आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात पडल्यावर माती लोटणारे आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेचं भेटतात.* *म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा ....आपले डोके नेहमी शांत ठेवा समस्या कीतीही मोठी असो....शांत मनाने ती हाताळा.... खड्ड्यात,पडलो आणि कोणी पाडलं ह्या बद्द्ल दुखः करण्यापेक्षा,त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा.....* *झटका ती माती आणि त्या मातीची एक एक पायरी करत... हळूहळू यश प्राप्ती करीता वर या.* *मस्त रहा,आनंदी जगा....हेच जीवनाचे सार आहे.*.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/12/2018 वार - वार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वर्षातील सर्वात मोठी रात्र* 💥 ठळक घडामोडी :- १९५८ - चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुर ला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत. १९६८ - अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रँक बॉर्मन, जेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात. १९८७ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार. 💥 जन्म :- १९०३ - भालचंद्र दिगंबर गरवारे उद्योगपती. १९२१ - पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश 💥 मृत्यू :- १८२४ - कंपवाताचा मानवी मेंदुशी संबंध आहे हे सिद्ध करणारे जेम्स पार्किन्स १९४५ - जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोलापुरातील नऊ उद्योगांना उत्पादन बंदीचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गडचिरोली : कडाक्याच्या थंडीने एटापल्ली तालुक्यात दोन दिवसात 44 जनावरांचा मृत्यू.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल अनुदान; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्रात भाजपा व शिवसेनेची युती,144-144 जागा लढवण्याचा निर्णय- अधिकृत सूत्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे कामदेखील सुरू झालेलं नाही. खर्चात तब्बल 1 हजार कोटींची वाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारताचे माजी सलामीवीर डब्ल्यू व्ही. रमण यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी करण्यात आली निवड.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसीची क्रमवारी जाहीर ; विराट कोहलीचं अग्रस्थान कायम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर भाग सातवा वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_20.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *के. श्रीकांत* भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट फलंदाज आणि कर्णधार म्हणून ख्यात असणारे कृष्णमाचारी श्रीकांत यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांचा जन्म मद्रास येथे झाला. त्यांच्या मित्रमंडळात ते चिका आणि क्रिश या टोपण नावाने ओळखले जातात. दक्षिण विभागातून त्यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामना १९८१ मध्ये अहमदाबाद येथे इंग्लंडच्या विरुद्घ खेळला. त्याच्या दोनच दिवसांनी पहिला कसोटी सामनाही इंग्लंडच्याच विरुद्घ मुंबईत खेळला. त्यावेळी त्यांचे वय अवघे २१ वर्षे होते. सलामीचा फलंदाज म्हणून त्यांनी सुनील गावस्कर यांच्यासोबत खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचा खेळ अतिशय आक्रमक राहिला. त्यामुळे आगामी काळात ते सलामीच्या फलंदाजांसाठी आदर्श ठरले. काळानुरूप त्यांच्या फलंदाजीमध्ये एक लय आली. १९८३ मध्ये ज्या भारतीय चमूने विश्‍वचषक जिंकला त्याचा ते महत्त्वाचा घटक होते. त्यात अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरोधात सर्वाधिक धावा करणारे श्रीकांतच होते. १९८९ मध्ये त्यांना कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली. क्रिकेटमधून नवृत्तीनंतर त्यांनी टीमचे प्रशिक्षकपद स्वीकारले. एवढेच नाही तर २0१३ मध्ये 'झलक दिखला जा' या नृत्याच्या स्पर्धेवर आधारित शोमध्ये स्पर्धक म्हणून झळकले होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) नागरिकांना मतदानाचा नकाराधिकार बहाल करणारा पहिला देश कोणता ?* बेल्जियम *२) तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण ?* के. चंद्रशेखर राव *३) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्हय़ात आहे ?* चंद्रपूर *४) महाराष्ट्रातील काळवीटासाठी प्रसिध्द अभयारण्य कोणते ?* रेहेकुरी *५) लिबियाची राजधानी कोणती ?* त्रिपोली *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● मन्मथ खंकरे ● श्रीमती माणिक नागावे ● गजानन गायकवाड ● संभाजी तोटेवाड ● जयश्री सोनटक्के *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपलेपणा* आपलेपणा म्हणजे मैत्रीतला धागा असतो विश्वासाने व्यक्त होण्याची हक्काची जागा असतो जिथे आपलेपणा तिथे पक्का विश्वास असतो लक्षात ठेवा मैत्री म्हणजे जगण्यातला श्वास असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••8 *परिस्थिती कितीही कठीण असली तरी तोंड लपवून, मस्तक झुकवून जगू नका. दु:खांचे युग आले तरी हसतमुख राहून जगा. प्रसंग कितीही वाईट असला तरी हिंमतीने सामोरं जाता आलं पाहिजे....* *न मुंह छुपाके जियो* *और न सर झुकाके जियो...* *गमोंका दौर भी आये* *तो मुस्कुरा के जियो...* *ढगांनी झाकले गेले तरी तारे नष्ट होत नाहीत. संकटांच्या अंधाररात्री ह्रदयाचे दिप उजळून जगा. जीवनातील कुठला क्षण मृत्यूची ठेव म्हणून आरक्षित झाला आहे हे कोणीही जाणू शकत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. मानवी जीवन अखंड प्रवाही असून ते कोणत्याही टप्प्यावर कायमचे थांबू शकत नाही. म्हणून प्रत्येक मुक्कामानंतर पुढे पुढे जातच जीवन जगलं पाहिजे....!* *ये जिंदगी किसी मंजिल पे* *रूक नही सकती.....* *हर एक मकाम के आगे* *कदम बढा के जियो...*. ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      कबीर गाफील क्यों फिरय, क्या सोता घनघोर तेरे सिराने जाम खड़ा, ज्यों अंधियारे चोर । सारांश महात्मा कबीर मृत्यूची आठवण करून देतात. हे मानवा तुला असा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळालेला असताना तू असा गाफिलासारखा का फिरत आहेस ? कोणत्या घणघोर अंधार्‍या काळ कोठडीत तू स्वतःला जखडून घेत आहेस ? कुठल्याही संपत्तीच मोल देवूनही हा जन्म परत मिळणारा नाही . तुला मिळालेले ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये तुझ्या मुक्तीसाठीच विधात्याने दिलेली सर्वात महान भेट आहे. इत्तर प्राण्यांपेक्षा तू विधात्याला अधिक प्रिय म्हणून बुद्धी व बोलीचं अधिकचं वरदान तुला दिलं तर तू त्या वैभवाचा वापर करून या सृष्टीचा स्वर्ग करण्यासाठी धडपडायला पाहिजेस ! स्वर्ग निर्माणाचं जाऊ दे , किमाण या सृष्टीला तरी विद्रुप करण्याचं कुकर्म करू नकोस ! हे वैविध्पाने भरलेले जग तुझ्याचसाठी आहे .याच्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिलेस. त्याच्या रचनेला धक्क् न देता त्याचा मानव कल्याणासाठी वापर करून घेतलंस तर भविष्य सुंदर नाही तर निसर्ग प्रकोप ठरलेलाच. तू कितीही सावध वागण्याचा प्रयत्न करीत असलास तरी हा मृत्यू रूपी चोर तुझ्यावर सारखी पाळत ठेवून आहे. तू भौतिक सुखसोयींचा कितीही इधार घेतलास तरी काचाच्या बंदिस्त महालातूनही तुझ्यातल्या चैतन्यरूपी आत्म्याला तो कोणत्याही क्षणी उचलल्याशिवाय राहाणार नाही. तेव्हा तू ज्या शरीर व रूपाला मोहवून हुरळून जातोस त्यापेक्षा सृष्टीकडं पाहाण्याची दिव्य दृष्टी देणार्‍या आत्मदृष्टीची जडणघडण चांगली होण्यासाठी मनाचा निकोप विकास होणे गरजेचे आहे. सुंदर मनेच सुंदर सुष्टी देवू शकतात. तेव्हा अज्ञानाचा अंधःकार दूर करून सत्यरूपी ज्ञान जाणून घे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नैराश्य - Depression* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दानाचे मोल*💐 राज्यात ओला दुष्काळ पडला होता. राजा प्रतापरावांनी सार्‍या शेतकर्‍यांचा सारा माफ केल्याचे जाहीर केले. अन्नही मोफत दिले जाईल, अशी दवंडी दिली. त्यांना वाटले की, आता सगळे खूश होऊन जातील, आपली स्तुती करतील. ती स्तुती ऐकावी म्हणून धान्य घेण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांच्या रांगेत जाऊन ते उभे राहिले. त्यांच्या पाठीमागे दोन शेतकरी येऊन उभे राहिले. ते शेतकरी आपापसांत कुजबुजत होते. आपले महाराज शूर आहेत. दानशूरसुद्धा आहेत पण त्यांना व्यवहार समजत नाही. दुसरा शेतकरी दबल्या आवाजात म्हणाला, का रे ? फुकटचं धान्य खाऊन वर मस्तीला आलास का ? राजांना नावं ठेवतोस ? पहिला शेतकरी म्हणाला, अगदी बरोबर बोललास. गेले महिनाभर मला काही काम न करता असं फुकटंच खाण्याची सवय लागली आहे. मस्ती आल्याशिवाय कशी राहील ? यापेक्षा महाराजांनी आपल्याकडून श्रमदानाची कामे करुन घ्यायला हवी होती. काम मगच दाम हे धोरण त्यांनी राबवायला हवं होतं. राजा प्रतापरावांनी हा सल्ला मानला. त्यामुळे दानाचा दुरुपयोग टळला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🌹जीवन विचार🌹* 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰 *संपूर्ण ऐहिक व अध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान ,अंधश्रद्धा,अस्वच्छता यांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे ईश्वर कशात आहे ह्याची नेमकी जाणीव असलेले गोरगरिबांचे,दिनदलितांचे आधुनिक सत्पुरुष संत गाडगे महाराज यांना* *💐विनम्र अभिवादन*💐 🙏🙏🙏🙏🙏🙏 *जीवनात स्वच्छता, आचार-विचारात स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे.* ज्या भांड्यात पाणी ठेवायचे आहे ते भांडे स्वच्छ असावे लागते.त्याप्रमाणे जीवनाची उभारणी जिच्यावर करायची ती श्रद्धा निर्मळ असली पाहिजे.म्हणजे आपल्याकडून कोणाचेही वाईट होणार नाही चांगलीच कर्म घडतील. आपली बुद्धी स्वच्छ आणि स्पष्ट असेल तरच आपण नेमका निर्णय घेऊ शकतो. माणसाने भोगलालसा आणि सत्ताभिलाषा यांचे आवरण काढून आपली बुद्धी स्वच्छ व सात्त्विक ठेवली पाहिजे. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *〰〰〰〰〰〰〰* *✍शब्दांकन/ संकलन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा.गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 20/12/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १९७१: झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले. १९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान. १९९९: पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले. २०१०: भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १८६८: फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक हार्वे फायरस्टोन १८९०: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की १९०१: अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ  १९०९: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद १९४०: पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका यामिनी कृष्णमूर्ती १९४२: पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश राणा भगवानदास  १९४५: भारतीय वकील शिवकांत तिवारी 💥 मृत्यू :-  १९३३: संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट १९५६: डेबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज १९७१: द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक रॉय ओ. डिस्ने १९९३: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट १९९६: बलुतं कार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - राज्यपाल राजवटीचा कालावधी संपल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन लागू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवीन ब्रिटनमधील पपुआ न्यू जेनिया येथे भूकंपाचा धक्का, 5.7 रिश्टल स्केलची नोंद, पालघरमध्ये ही भूकंपाचा धक्का* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई - मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी मुंबई उच्च न्याालयाने २३ जानेवारीपर्यंत केली स्थगित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *श्रीहरीकोटा: इस्रोकडून 'जीसॅट ७ ए' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई- मेगा भरतीबाबत राज्य सरकारचं न्यायालयात प्रतिज्ञापत्र, '23 जानेवारीपर्यंत मेगा भरतीद्वारे नेमणूक नाही'* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कालपासून सुरू झाली हेल्मेट सक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *धुळ्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, धुळ्यात तापमानाचा पारा 5 अंशांवर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा           *लहानपण देगा देवा* वीस-पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात कोणाच्या घरी लाइट नव्हते तर टीव्ही दुरची गोष्ट. रेडियो नावाची चालती बोलती वस्तू मात्र घरोघरी दिसून यायची. आकाशवाणी केंद्रचे अनेक चाहते होते. मात्र टीव्हीचे दिवाने अगणित होते. पण बघायला कुठे मिळायचे. ते दिवस आजही जशास तसे आठवते. टीव्ही वर दर रविवारी *रामायण* मालिका चालू झाली होती. गावात कुणाकडे ही टीव्ही नव्हती तेंव्हा तीन ........ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/lahanpan •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍🏽 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========                *संत गाडगेबाबा* गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६ - २० डिसेंबरइ.स. १९५६) हे ईश्वर कशात आहे नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. त्यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवाकरणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाङमयाचे कार्य आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* ========ஜ۩۞۩ஜ========= *१) जैव दहशतवादाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार कोणत्या प्रयोगशाळांचे जाळे वाढवणार आहे ?* विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा *२) दक्षिण चीनमध्ये ६२ सें.मी. लांबीचा जगातील सर्वात मोठा कीटक सापडला. त्याचे नाव काय ?* फ्रिगानिस्ट्रिया चायनेनसीस झाओ *३) नंद राजघराण्यातील शेवटचा राजा कोण ?* धनानंद *४) नकाशावरील अंतर कशाने मोजतात ?* ओपीसोमीटर *५) स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय ?* नरेंद्रनाथ दत्त *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 शंकर हासगुळे, सहशिक्षक, बिलोली 👤 पल्लवी टेकाळे, कुपटी, माहूर 👤 परमेश्वर नन्नवरे, सहशिक्षक, उस्मानाबाद 👤 विठ्ठल नरवाडे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 गजानन मुडेले, देगलूर 👤 सोपान हेळंबे, उमरी 👤 डॉ. माधव कुद्रे, कंधार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *आश्वासन* आश्वासन म्हणजे पाण्यावरची रेघ आहे दुष्काळात पडलेली काळजाला भेग आहे काळजाची भेग मिटता मिटत नाही आश्वासन पूर्ण होईल मनाला पटत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मोबाइल, फेसबुकच्या आभासी जगाने एक नवी संस्कृती जन्माला घातली आहे.*   *'मे-फ्लाय संस्कृती' तिचं नाव ! मे-फ्लाय ही उडत्या किड्यांची प्रजाती. मे-फ्लाय प्रवर्गातील एक किडा अल्पकालिक असतो म्हणे. त्याला तोंड वा पोट नसते. असते फक्त विलासी इंद्रिय अन् तसलेच मनही !  तो रक्तहीन असला तरी रतिप्रविण असतो म्हणे. त्याचे आयुष्य चोवीस तासांचेही असत नाही. तीन तासांचे तारूण्य घेऊन जन्माला येणारा तो किडा फक्त पुनरूत्पादनासाठीच जन्मतो. संभोग झाला की मरतो. एकदम 'सर्जिकल स्ट्राइक'च म्हणाना. त्यात शृंगारक्रिया असत नाही. जीवनास्वाद नसतो. असते ओरबाडणे, भोगणे,मरणे नि मारणे..जगणे नसतेच.* *माणूस 'मे-फ्लाय' होणे हे आभासी, चंगळवादी, भोगवादी जीवनशैलीचे अपत्य होय. तुम्ही ठरवायचे की, तुम्हाला ATM जन्माला घालायचे आहे की माणूस! माणूस जन्माला घालायचा असेल, घडवायचा असेल तर जरा हवा येऊ द्या. घरी माणसे, पै-पाहुणे आले पाहिजेत. तुम्हींही इतरांच्या घरी जात येत रहा. गतीमान जीवनात उसंत शोधा. उसंत स्वत:साठी वापरू नका. निवांत म्हणजे स्मशान! आयुष्यात पाण्याचा खळखळाट ऐका. नुसते आभासी संदेशन, प्रक्रिया, प्रतिसादांनी मिळणारे सुख, समाधान, शांती हीसुद्धा आभासी असते. स्वत:पलीकडचे जग उघड्या डोळ्यांनी पहा. मुलांचे एकारलेपण उन्हाळी शिबिरांसाठी केवळ पैसे भरून निघणार नाही. त्यासाठी त्यांना वेळ द्या. दिले की संपले, असे पालकपण कारखान्याच्या मालकासारखे असते. आव्हानांना सामोरे जाणारे जीवन प्रत्यक्ष जगा नि पाल्यांना जगू द्या...*        ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••      🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्यावेळी माणसाच्या हातून झालेली एखादी चूक कळत नकळत झाली असे समजावे.ती चूक जर दुस-यावेळी झाली तर समजावे की, दुर्लक्ष केल्यामुळे झाली आहे . तिस-यावेळी तीच चूक झाली तर असे समजावे की,तुमचे त्या कामात लक्ष नसल्यामुळे झाली आहे आणि पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर असे समजावे की,आपण इतरांपेक्षा जास्त चूका करण्याचा जणू संकल्प केला आहे आणि त्यातही तुम्ही महामूर्ख आहात हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्हीच विचार करा. तुम्हाला तुमच्या जीवनात चूका करायच्या की चूका टाळायच्या ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 कबीराचे बोल 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= ताको लक्षण को कहै, जाको अनुभव ज्ञान साध असाध ना देखिये, क्यों करि करुन बखान। सारांश ज्याच्याकडे अनुभवातून प्राप्त झालेलं ज्ञान आहे. त्याच्या लक्षणांच्या बाबतीत काही सांगावयाची आवश्यकता नसते. तो सज्जन दुर्जन असा भेद करीत नाही. सर्वांकडे समदृष्टीने पाहात असतो. अनुभवाच्या बळावर त्याने स्थितप्रज्ञता धारण केलेली असते. विश्वातल्या प्रत्येक घटनेकडे अनुभवी तटस्थपणे पाहात असतो. त्याच्या स्थिर वृत्ती ठामपणे वास्तवाकडे नेतात. वेळ ही वेळंच असते. ती बरी वाईट असण्याचं काही कारणंच नाही. मात्र अस्थिर वृत्ती शुभाशुभ असा वेळेबाबतीतही भेद करतात. सकाळ होणं हा नैसर्गिक घटनाक्रम आहे. ती बरी वाईट असणे ह्या अस्थिर मनाच्या धारणा असतात. सुप्रभात , मंगल प्रभात, शुभ सकाळ, शिव सकाळ, भिम सकाळ हे तर मनाचे खेळ असतात. मन वास्तवाबाबत तटस्थ नसतं, मात्र सकाळ ही सकाळंच असते, हे फक्त अनुभवीच सांगतो. चंद्र आपल्या शितल चांदण्याचा वर्षाव सर्वांवर करीत असतो. सद्गृहस्थ रस्त्याने चाललाय म्हणून त्याच्यावर प्रखर प्रकाश टाकणे आणि चोर चाललाय म्हणून कमी प्रकाश टाकणे असा चंद्राजवळही भेदभाव नसतो. झाडाकडेही समदृष्टी असते. झाडही त्याला खतपाणी पुरवणार्‍याला जशी शितल छाया देत तशीच छाया त्याच्यावर कुर्‍हाड चालवायला येणार्‍यावरही धहतं. त्याप्रमाणे खर्‍या संताकडे आप-पर असा भेदभाव नसतोच. हे संत प्रभावात कळतं. -एकनाथ डुमणे मुखेड =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वरचिन्ह परिचय* पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे. स्वरचिन्हे खुणा आहेत उकार न शिकवता उ आणि ऊ उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे. मुलांना येणार्‍या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करण्याचा सराव घेणे. अक्षर परिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                  *सावधगिरी* पूर्वी एकदा लांडगे व बोकड यांची फार दिवस लढाई चालली होती. वास्तविक पाहता लांडग्यांनी पहिल्याच दिवशी पराभव करून त्यांचा फन्ना उडविला असता, परंतु बोकडांच्या बाजूस जे कुत्रे होते त्यांच्यापुढे त्यांचे काही चालेना. शेवटी तहाची वाटाघाट होऊन उभयपक्षी असे ठरले की, लांडग्यांनी आपली पोरे बोकडांच्या स्वाधीन करावी व बोकडांनी आपले कुत्रे लांडग्यांच्य ताब्यात द्यावे. मग या अटी अमलात येताच बोकडांकडे गेलेल्या लांडग्यांच्या पोरांनी आपल्या आयांसाठी आरडाओरडा केला. तो ऐकताच लांडगे धावून आले आणि बोकडांस म्हणाले, 'दुष्टांनो, आमच्या पोरांना मारून तुम्ही तह मोडला, तेव्हा लढाईला तयार व्हा.' इतके बोलून ते बोकडांवर तुटून पडले व बोकडांजवळ कुत्रे नसल्यामुळे ते सगळे सहज मारले गेले. तात्पर्य :- शत्रूशी सख्य करताना ज्या वस्तूवर आपली सुरक्षितता अवलंबून असेल अशा वस्तू त्यांना कधीही देऊ नयेत.  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/12/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०१२ - पुण्यात इमारतीचे बांधका करीत असताना छत कोसळून १३ कामगार ठार 💥 जन्म :- १८८७ - भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’ १९३० - साहित्यिक व समीक्षक रमेश तेंडुलकर १९३१ - समीक्षक स. शि. भावे १९४६ - स्टीवन स्पीलबर्ग, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक. १९४६ - रे लियोटा, अमेरिकन चित्रपट अभिनेता. १९६३ - ब्रॅड पिट, अमेरिकन चित्रपट अभिनेता. १९७१ - बरखा दत्त, भारतीय पत्रकार 💥 मृत्यू :- १९९३ - राजा बारगीर, मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक. १९९५ - कमलाकरबुवा औरंगाबादकर, कीर्तनकार. २००० - मुरलीधर गोपाळ तथा मु.गो. गुळवणी, भारतीय इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक. २००४ - विजय हजारे, भारतीय क्रिकेट खेळाडू *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळ्यानंतर अवघ्या तासाभरात कमलनाथ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *भूपेश बघेल यांनी घेतली छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *माधवी दिवाण यांची केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक हमीद अन्सारी यांची आज होणार सुटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नाशिक : हंगामातील नीचांकी 8.5 इतक्या किमान तपमानाची नोंद. नाशिककर गारठले, थंडीचा वाढता कडाका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *परिमल राय गोव्याचे नवे मुख्य सचिव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया- दुसऱ्या कसोटीत भारतासमोर विजयासाठी 287 धावांचं आव्हान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/935eEbv Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अनुभव लेख *कोल्हापूरचा भरत रिक्षावाला* https://www.facebook.com/100003503492582/posts/1806474019479364/ वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वर्धा वर्धा हे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील वर्धा जिल्ह्याचेमुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर वर्धा ह्याच नावाच्या नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे. १८६६ साली स्थापित झालेले हे शहर कापूसव्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. २०११ साली शहराची लोकसंख्या सुमारे १.०६ लाख होती. सेवाग्राम हे वर्धा शहराजवळील एक गाव येथील सेवाग्राम आश्रमासाठी प्रसिद्ध आहे. १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधींचे निवासस्थान होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणीही पाहत नसताना आपले काम इमानदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *०१) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?* प्रशांत महासागर *०२) अमरनाथ हे स्थळ कोणत्या राज्यात आहे ?* जम्मू काश्मीर *०३) मध्यप्रदेश ची राजधानी कोणती ?* भोपाळ *०४) वाळवंटातील जहाज कोणास म्हटले जाते ?* उंट *०५) शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत ?* गुरू नानक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  रवी यमेवार ● नितीन वंजे ● उदयराज कोकरे ● विजयकुमार भंडारे ● जनार्दन नेउंगरे ● महेश जोगदंड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मतलबी* जो तो इथे मतलबी आहे वरवर निरागस छबी आहे खोटा बुरखा लगेच फाटतो खरा प्रकाशा सारखा स्पष्ट वाटतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवावा, असा अनमोल ठेवा असतो 'घर.' परस्परांशी लळा लागला की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. मग घरच मंदिर होऊन जातं. एकमेकांच्या स्वप्नांसाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवीहवीशी वाटतात. काही घरांची दारं मात्र सदैव बंद असतात. मनाची कवाडं जिथं बंद असतील, तिथं घराची कवाडं कशी उघडतील? अशा घरांच्या उंचीवरून घरातल्या रास्त आनंदाची मोजदाद होत नसते. तर आनंद हाच घरांचा, तिथल्या माणसांच्या उंचीचा मापदंड असतो. ज्या घरात कटुतेच्या भारानं मनं गुदमरलेली असतात, त्या घरातला प्रपंच सुखाचा कसा होईल?* *कृत्रिम वस्तूंच्या, बेगडी जगण्याच्या मायावी जाळ्यात अडकत चाललो आहोत का आपण? हे जाळं भल्याभल्यांना मोहवतं. घर जर आपुलकीवर, माया-ममतेच्या भिंतींवर उभं असेल तर येत्या जात्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. जिथं तृप्तीची वीणा झंकारत असते. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत ही भावनाच सा-यांना जोडून ठेवते. अशा मनस्वी माणसांच्या अस्तित्वाचं सर्वांना आकर्षण असतं, चुंबकासारखं. सुखी संसार त्याचीच परिणती असते. ही अथांग तृप्तीची गोळाबेरीज संपत्तीच्या पलिकडची असते.* *"साधे गवत फुलण्याला सुख म्हटले मी, सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी, अवती-भवती झगमगती नक्षत्रे होती, पण वातीच्या जळण्याला सुख म्हटले मी."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कहा सिखापना देत हो, समुझि देख मन माहि सबै हरफ है द्वात मह, द्वात ना हरफन माहि। सारांश महात्मा कबीर ज्ञानानुभव देताना म्हणतात , मी जितका काही उपदेश करतो तो केवळ आपल्या हृदयांतरी साठवून ठेवा. सगळी अक्षरे दौतीत साठलेली आहेत. परंतु दौत अक्षरात थोडीच असणार आहे ! तद्वत हे विश्व परमात्म्यात सामावलेलं आहे. तो परमात्मा या विश्वाच्या बाहेरही सामावलेला आहे. मनुष्य स्वभावाची एक खाशीयत आहे . तो देखल्या देवा दंडवत घालून प्रतिकात्मक मुर्ती, दगड, धोंडे पूजून मोकळा होतो. अशा पूजनानं खरंच देवाचं स्वरूप कळणार आहे का ? ईश्वरी निसर्ग शक्तींच्या कूतुहलातून निर्मित भयापोटी मानवी हतबलतेतून निसर्गशक्तीपुढील शरणागतीच्या अभिव्यक्तीसाठी मानलेल्या प्रतिकात्मक रूपांचं पूजन करून ईश्वराचं आकलन झाल्याचं फसवं समाधान देत भोळ्या भाबड्यांची भौतिक लुट करून त्यांची ईश्वर ही कल्पनाच सीमित करून टाकली गेलीय. चार धाम यात्रा केलेला असो की काबा करून आलेला असो. उगाच का म्हणतो 'अजूनही मला देव पूर्ण कळलाच नाही हो !' विश्व संचललन शक्तीचं स्थुल जरी निरीक्षण केला तरी ती शक्ती अनाकलनीय आहे. भौतिकदृष्ट्या कितीही सुखसंपन्न असला तरी मानवी विचार कक्षेच्या बाहेर हे विश्व संचालन शक्तीचं रूप आहे. ते अनादि अथांग आहे. त्याचा शोध घेता घेता अनेकांनी आपली अनुमानं निरीक्षणं नोंदवलीत. प्रत्येकाचं मत स्शयंसापेक्ष आहे. ईश्वर आत्मचिंतनाशिवाय कसा भेटणार ? त्यासाठी आत्मदृष्टी हवी. त्यातून ईश्वरी साक्षात्कार व्हायला लागतो. ईश्वरीय रूप अर्थात निसर्ग शक्ती दृष्टी-सृष्टीच्याही पलिकडची बाब आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी व्यक्ती स्वत:च्या आणि इतरांच्या जीवनशैलीचा फरक जाणते तेव्हा ती व्यक्ती नक्कीच चिंतनशील आहे असे समजावे.इतरांच्या जीवन जगण्यामध्ये काही उणीवा असतील त्या आपल्या जीवनात तर नाही ना याचा वेध घेऊन त्या सुधारणा करता येतात असाही विचार करण्यास प्रवृत्त होते तर काही चांगल्या गोष्टी असतील तर अनुकरण करायला काहीच हरकत नाही असाही विचार करून चांगले जीवन जगण्यासाठी तयार होते.म्हणजेच चांगले विचार सुधारण्याची संधी देतात तर वाईट विचार मनातून काढून टाकण्याची इच्छा प्रकट करतात.ह्या दोन्ही बाजूंनी विचार करणारीच व्यक्ती आपले सुंदर जीवन जगू शकते.उलट विचार न करणारी किंवा अविचारी व्यक्ती जीवनात कधीही आपल्या चुकांना सुधारण्याची संधी देऊ शकत नाहीत आणि जीवनात कधीही सुधारु शकत नाहीत हे मात्र खरे आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 मुल घडवताना.......... 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संस्कार म्हणजे नेमकं काय असत? संस्कार संस्कृतीनेच उत्पन्न होतात. तसेच संस्कृती पण संस्कारांवर निर्भर असते. दोन्ही एकमेकावर आधारित असतात. संस्कार म्हणजे मानवाच्या व मानव समाजाच्या चांगल्या सवयी. असे सद्गुण हे मानवात असले पाहिजे. अशा गुणांचा फक्त व्यक्तिगत लाभ नसतो तर सर्व समाज त्यापासून लाभान्वित होतो. निरोगी समाजजीनाकरिता उत्तम संस्कारित मानव आवश्यक आहे. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कोंबडी आणि कोल्हा* एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’ तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्‍याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/12/2018 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय सेवानिवृत्ती दिन* 💥 ठळक घडामोडी :- १३९८ - तैमूर लंगने दिल्लीजवळ सुलतान नसिरुद्दीन मेहमूदच्या सैन्याचा पाडाव केला. १९२६ - लिथुएनियातील उठावात अंतानास स्मेतोनाने सत्ता बळकावली. १९६१ - गोवा मुक्तिसंग्राम - भारतीय सैन्याने गोव्याला पोर्तुगालपासून मुक्त केले. १९६७ - ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान हॅरोल्ड होल्ट पोर्टसी, व्हिक्टोरियाजवळ समुद्रात पोहत असताना गायब. १९७० - पोलंडमध्ये ग्डिनिया शहरात सैनिकांनी कामगारांवर गोळ्या झाडल्या. सुमारे २५ ठार. 💥 जन्म :- १९०८ - विल्लर्ड लिब्बी,कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीचा शोध लावणारा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. १९७२ - जॉन अब्राहम, हिंदी चित्रपट अभिनेता. १९७८ - रितेश देशमुख, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९२९ - मनुएल गोम्स दा कॉस्टा, पोर्तुगालचा ९६वा पंतप्रधान आणि १०वा राष्ट्राध्यक्ष. १९६४ - व्हिक्टर फ्रांझ हेस, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. १९६७ - हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांच्या पुतळ्याचे डीएमके मुख्यालयात काँग्रेसच्या सोनिया गांधींनी केले अनावरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *टोकियो - जपानमधील सपोरो शहरातील एका पबमध्ये भीषण स्फोट, 42 जण गंभीर जखमी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई म्हाडा लॉटरीला सुरुवात, पुढच्या वर्षी मुंबई लॉटरीमध्ये असणार दुप्पट घरं, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *भुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आस शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेकडून राज्यस्तरीय उकृष्ट अध्यापक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न, सलग पाचव्या वर्षी हा पुरस्कार सोहळा संपन्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *हॉकी वर्ल्डकपवर बेल्जिअमची मोहोर; नेदरलँडला 3-2 गोलफरकाने हरवले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पी. व्ही. सिंधूने रचला इतिहास, स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय, BWF World Tour Finals स्पर्धेतील महिला गटाचे जेतेपद पटकावले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/VKzVqwy Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धार्मिक स्थळी मोबाईल बंदी का ?* https://prajawani.in/news_page.php?nid=268 वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लक्ष्मीकांत बेर्डे* मराठी चित्रसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सहकलाकार तसेच नाट्य अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यानेआपल्या कारकिर्दीत त्याने मुख्यत: विनोदी भूमिका साकारल्या. सहज विनोदी अभिनयामुळे ते विनोदी अभिनेते म्हणून नावारूपाला आला. मराठी चित्रपटातील सुपरस्टारपद त्यांना चाहत्यांनी बहाल केले होते. लक्ष्मीकांत बेर्डेंचा अभिनय आधीपासूनच चित्तवेधक होता. सार्वजनिक गणेशोत्सवामधील सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असे. त्यांनी आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन अभिनय स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होते. शिक्षण संपल्यावर लक्ष्मीकांतने मुंबई मराठी साहित्य संघाकडून सोबत व्यावसायिक नाट्यसृष्टीत पदार्पण केले. लेक चालली सासरला या चित्रपटाद्वारे प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत त्याने १९८५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले धुमधडाका (इ.स. १९८५), अशी ही बनवाबनवी (इ.स. १९८८) व थरथराट (इ.स. १९८९) हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले. सूरज बडजात्या-दिग्दर्शित मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे सलमान खानच्या साथीत त्याने इ.स. १९८९ साली हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्याने विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले साजन (इ.स. १९९१), बेटा (इ.स. १९९२) व हम आपके है कौन (इ.स. १९९४) इत्यादी हिंदी चित्रपटही खूप गाजले. त्याकाळी लक्ष्मिकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांचे चित्रपटात असणे म्हणजे चित्रपट हमखास यशस्वी होण्याचे गमक झाले होते.अंशी आणि नव्वदचे दशक या अभिनेत्याने गाजवले. विनोदी चित्रपटांचा काळ होता. लक्ष्मीकांत बेर्डेने अनेक हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आणि विनोदी अभिनेता म्हणून आपले अस्तित्त्व निर्माण केले होते. मात्र त्यांची कारकीर्द ऐन बहरात असताना अकाली निधनाने त्यांची एक्झिट झाली *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबत माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) एन.एन.ओ.पी. चे विस्तारित रूप काय ?* नागा नॅशनल डेमॉक्रॅटिक कॉर्पोरेशन *२) सर्वोदय या संस्थेचे स्थापना वर्ष कोणते ?* १९०६ *३) भारताचा पहिला व्हॉइसराय कोण ?* लॉर्ड किनिंग *४) नेपाळची राजधानी कोणती ?* काठमांडू *५) अरुवी, महावेली या नद्या कोणत्या देशात वाहतात ?* श्रीलंका *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  सुधीर येलमे ●  विक्रम पतंगे ●  दिगंबर बेतीवार ●  प्रतापसिंह मोहिते ●  डॉ. उषा रामवानी गायकवाड ●  श्रीनिवास नरडेवाड ●  नारायण मुळे ●  केशव कदम ● काशिनाथ बाभळीकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हार अन् जीत* हार आणि जीत जगण्याची रीत आहे आपल्यांसाठी हारणं म्हणजे प्रित आहे नात्यात जिंकण्या पेक्षा हारणं मोठं असतं आपल्यांना हरवून जिंकण खोटं असतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुटुंब संस्थेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू म्हणजे घर. घराचे आकर्षण फक्त मानवालाच असते असे नाही, तर पहाटेपूर्वी आकाशात भरारी घेतलेले पक्षी, माळरानावर चरण्यासाठी गेलेली जनावरे सायंकाळी आपल्या घराकडे वळतात. घर हे माणसांइतकेच पशुपक्षी, जनावरांना हक्काचा निवारा वाटते. पूर्वीची घरे एकत्र कुटुंबपद्धतीला सामावून घेणारी होती. दोन-तीन पिढ्यांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र रहायचे. लहान मुला-मुलींच्या किलबिलाटाने घराचे गोकुळ होऊन जात असे. घराच्या भिंती फक्त दगड मातीच्या नव्हत्या, तर त्या प्रेम, जिव्हाळ्याने रसरसलेल्या होत्या. नातेसंबंध नुसते नातेसंबंध नव्हते, तर नात्यात मायेची ऊब होती.* *आज वृद्धांच्या समस्या 'आ' वासून उभ्या आहेत. मुलं परमुलखात गेल्यामुळे एकाकी पडलेली वृद्ध मंडळी एका बाजूला दिसतात, तर दुसरीकडे घरात मुलं, सुना, नातवंडे असूनही अवहेलनेने भरलेले एकाकीपण जगणारी वृद्ध मंडळी दिसत आहेत. समृद्ध संसारातील एक अडगळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. मुला-लेकरांच्या सुखासाठी तुफान होऊन झगडलेल्या माता पित्यांना 'थकलेल्या तुफानाला कुणी घर देता का घर...?' असं म्हणत भटकायची वेळ येते. अशी अनेक झुंजलेली तुफानवादळे रस्त्याकडेला, पुलाखाली, किंवा वृध्दाश्रमात नशिबाला दोष देत कण्हत पडलेली दिसतात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   कागत लिखै सो कागदी, को व्यहाारि जीव आतम द्रिष्टि कहां लिखै , जित देखो तित पीव। सारांश महात्मा कबीर आत्मानुभवावर अधिक विश्वास ठेवायला सांगतात. सर्वजण ऐकीव व लिखित गोष्टीच प्रमाण माणून हट्टवादी मनोवृत्ती तयार करून घेतात. कागदोपत्री शास्त्रात लिहलेले दस्तऐवज आहेत. त्याला आपण सत्याच्या कसोटीवर कुठ जाणून घेतलेलं असतं. केवळ ऐकून अथवा वाचून त्या गोष्टीवर हुकूम वागण्याचा किवा जगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आंधळी भक्ती करणे होय. त्या भक्तीला व्यावहारिकता कशी कळणार ? अशा भक्तीचा मार्ग जर आपण अनुसरणार असू तर मानवानेच मानवावर लादलेल्या दांभिकता थोतांडातून माणूसाची मुक्तता कशी होणार ? माणसाला मिळालेल्या बुद्धीचा वापर तथ्य जाणून घेण्यासाठी विचार व विवेकासाठी नाही केला तर आत्मसाक्षात्कार तरी कसा होणार ? बाह्य जग डोळे उघडे ठेवून पाहता आलं पाहिजे. ध्यान मनन करताना डोळे मिटून चिंतन करता आलं पाहिजे. खर्‍या साधूची संगती आत्मबोधाकडे नेत असते. मनाची संभ्रमावस्था पार निघून जाते. प्रकटणारं सत्य हे अंतिम व शाश्वत सत्य असतं. त्याला कुठलीही कसोटी देण्याची गरज भासत नाही. इथं फसवेगिरी किवा भामटेगिरिचा धोका नसतो. स्वानुभव हे दाखवता येत नाहीत ते अनुभवता येतात. निजरूपाचं खरं दर्शन स्वतःत डोकावल्याशिवाय कसं होणार ? डोळे दृष्टी देतात. दृष्टीकोन स्वतःलाच तयार करावा लागतो. विकार विरहित जगताना निसर्गाची दिव्यता ध्यानात येवू लागते. सर्वत्र आपल्याला ईश्वराचं अस्तित्व दिसू लागतं. खर्‍या परमात्म्याचं दर्शन होतं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखादा कुंभार जेव्हा चाकावर मडके घडवण्यापूर्वी मातीमध्ये पाणी आणि जीव ओतून मुलायम मातीचा गोळा बनवून चाकाच्या मध्यभागी ठेवून चाकाला फिरवतो आणि फिरणा-या चाकावरच आपल्या चिखलाने भरलेल्या हाताने प्राथमिक स्वरुपात मडक्याचा आकार करतो.आणि निराकार असलेल्या मडक्याला चाकावरुन काढून बाजूला घेऊन मडक्याच्या आत एक हात घालून व दुस-या हातात थापटी घेऊन जसा पाहिजे तसा आकार देऊन आकर्षक आणि सुंदर आकाराचे मडके बनवतो.मडके बनवण्याचे सारे श्रेय मडके बनवणा-या कुंभाराकडेच जाते.कारण तो आपल्या एकाग्र मनाने,परिश्रमाने आणि सातत्याने प्रयत्न करुन निराकार मातीचे रुपांतर एका सुंदर आणि आकर्षक मडक्यामध्ये करतो.त्याचप्रमाणे प्रत्येक पालकाची आपल्या पाल्याविषयी भूमिका एका कुंभारासारखीच असते.आपला पाल्य हा एका निराकार मातीसारखाच असतो.त्याला त्याच्यावर प्रेम,माया,आपुलकी देऊन त्यावर योग्य संस्कार करुन तो सुजान, सुसंस्कृत, आदर्श नागरिक बनवून तो आपल्या पायावर सक्षमपणे बनवण्याचे प्रयत्न करतात आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी हातभार लावतात.आई-वडील हेच आपल्या पाल्याचे खरे शिल्पकार असतात.म्हणून पालकांनीही तेवढेच जागृत राहून आपल्या पाल्यांच्या काही कमतरता असतील तर त्या शक्यतो जाणून घेऊन त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे आणि सुंदर आणि आकर्षक पाल्यांचे व्यक्तिमत्व घडवावे असे केले तर अधिक पालकांनाही आपण आपल्या पाल्यासाठी केल्याचे समाधान वाटेल.कुंभारासारखीच पाल्यांच्या बाबतीत पालकांची भूमिका आहे हे निश्चित.पाल्यांचे भवितव्य घडवण्यात कसल्याही प्रकारचा कमीपणा मानू नये.आपणही कुंभारासारखे सदैव पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाठीशी खंबीरपणे उभे टाकायलाच हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड भ्रमणध्वनी..९४२१८३९५९०. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 मुल घडवताना.... 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मुलांवर चांगले संस्कार करणे ही आजच्या काळाची मुख्य गरज आहे. नव्या पिढीला चांगले ज्ञान दिले गेले पाहिजे. चांगले संस्कार केले पाहिजेत. त्यामुळे समाजाचाही स्तर उंचावेल. जगातील सर्वाधिक संत आपल्या देशात होऊन गेले. आपली भारतीय संस्कृती महान आहे आणि ती जगभरात पोहोचावी यासाठी प्रयत्न केले जावेत. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ संपर्क _9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणुसकी* इसाप हा एक गुलाम होता, पण आपल्‍या विद्वत्तेच्‍या जोरावर त्‍याने समाजात अत्‍युच्‍च स्‍थान निर्माण केले होते, ज्‍या धनाढ्याने इसापला विकत घेतले होते त्‍याचे नाव होते क्‍झेनथस, इसाप आपल्‍या आचरणातून क्‍झेनथसला सतत शिकवण देत असे. ज्‍या काळी रोममध्‍ये सार्वजनिक स्‍नानगृहे असत, सज्‍जन लोक सार्वजनिक स्‍नानगृहात जाऊन आंघोळ करत असत. एकदा क्‍झेनथसने इसापला स्‍नानगृहात गर्दी आहे की रिकामे आहे हे पाहून येण्‍यास सांगितले. इसापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवढयात त्‍याचे लक्ष स्‍नानगृहाच्‍या दारासमोर पडलेल्‍या एका मोठ्या दगडाकडे गेले. अनेक लोक त्‍या दगडाला अडखळून पडत होते, दगड रस्‍त्‍यात कसा म्‍हणून शिव्‍या देत होते. तेवढ्यात एक माणूस आला तोही त्‍या दगडाला अडखळून पडला, त्‍यानेही शिवी हासडली पण तो दगड त्‍याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्‍नानगृहात गेला.हे सर्व पाहून इसाप घरी गेला व मालकाला सांगितले की, स्‍नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे. आंघोळीच्‍या पूर्ण तयारीनिशी क्‍झेनथस स्‍नानगृहात पोहोचला आणि पाहतो तर काय, तेथे तर प्रचंड गर्दी आहे. क्‍झेनथसने इसापला विचारले तू तर म्‍हणाला इथे फक्त एक माणूस आहे पण इथे तर प्रचंड गर्दी दिसते. इसाप उत्तरला,'' इथे रस्‍त्यात एक दगड पडला होता, येथे येणारा प्रत्‍येकजण दगडाला अडखळून पडत होता, शिव्‍या देत होता पण दगड उचलून टाकण्‍याचे शहाणपण फक्त एकानेच दाखविले. त्‍यामुळे फक्त एकच माणूस असल्‍याचे मी आपणास सांगितले.'' क्‍झेनथस निरूत्तर झाला. *तात्‍पर्य- फक्त जीवंत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोगच तुम्‍हाला स्‍वतंत्र ओळख देऊ शकते. आपल्‍या जीवनाचा इतरांनाही उपयोग व्‍हावा हेच खरे.* ============== वर्तमानपत्रातून संग्रहित  ============== *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/12/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय चहा दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९९४ - नेटस्केप नॅव्हिगेटरची १.० आवृत्ति प्रकाशित. 💥 जन्म :- १९७६ - बैचुंग भुतिया, भारतीय फुटबॉलपटू. 💥 मृत्यू :- १०२५ - बेसिल दुसरा, बायझेन्टाईन सम्राट. १०७२ - आल्प अर्स्लान, तुर्कीचा राजा, पर्शिया (ईराण) मध्ये. १२६३ - हाकोन चौथा, नॉर्वेचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राफेलमध्ये घोटाळा नसल्याची सुप्रीम कोर्टाची 'क्लीन चिट', मोदी सरकारला मोठा दिलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली- राफेल करारावरून सभागृहात गोंधळ झाल्यानं लोकसभा 17 डिसेंबरपर्यंत तहकूब* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *भोपाळ- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ 17 डिसेंबरला लाल परेड मैदानावर घेणार शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यातील सर्वात कमी तापमान जळगावमध्ये (१० अंश सेल्सिअस) नोंदविण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताभ घोष यांना  जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गेहलोत तर उपमुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची निवड.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्यात, ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकली, पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/acZsiGYGES Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *भाग चौथा* वाचन करता येईल. https://www.blogger.com/blogger.g?blogID=5645795248580674337#editor/target=post;postID=52510233279047699;onPublishedMenu=overviewstats;onClosedMenu=overviewstats;postNum=0;src=postname वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अमिताभ घोष* अमिताभ घोष यांची इंग्रजी साहित्यातील नामवंत लेखकांमध्ये गणना होते. ११ जुलै १९५६ मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या घोष यांचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झाले. दिल्ली विश्‍वविद्यालयाचे सेंट स्टीफन कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्चशिक्षण घेतल्यानंतर 'द सर्कल ऑफ रीजन' ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. या कादंबरीला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर बघता बघता घोष यांनी साहित्यक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. घोष यांच्या 'शॅडो लाइन्स' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताभ घोष यांना  जाहीर झाला आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ट करा व स्वत:चे भविष्य घडवा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) हैद्राबाद स्टेट काँग्रेसचे स्थापना वर्ष कोणत ?* १९३८ *२) भारताचे राष्ट्रपती म्हणून डॉ. झाकीर हुसेन यांचा कार्यकाल कोणता ?* १३ मे १९६७ ते ३ मे १९६९ *३) भारतातील सर्वात जुना, जास्त कालमानाचा पर्वत कोणता ?* अरवली *४) हेल्मंड, अबू, दर्या, काबूल या नद्या कोणत्या देशात वाहतात ?* अफगाणिस्तान *५) कोस्टारीका या देशात कोणती शासन पद्धती अनुसरली जाते ?* अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धती *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● साईनाथ सायबलू ● बालाजी सुंकेवार ●  श्रीधर काटेगर ● सुशील केकान ● रामकृष्ण लोखंडे ● शिवाजी रामदिनवार ● शुभ मलिक ● गुरुदास भागानगरे ● अनिल जाधव शिरपूरकर ● दीपक चावरे ● योगेश पाटील ● ऋषीकेश गरड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *झाडं* झाडं व्हायला बी ला गाडून घ्यावं लागतं प्रेम मिळवायचं तर मग प्रेम द्यावं लागतं गाडून घेतल्या शिवाय बीचं झाडं होत नसतं आपण दिल्याशिवाय कोणी प्रेम देत नसतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुटुंब संस्थेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू म्हणजे घर. घराचे आकर्षण फक्त मानवालाच असते असे नाही, तर पहाटेपूर्वी आकाशात भरारी घेतलेले पक्षी, माळरानावर चरण्यासाठी गेलेली जनावरे सायंकाळी आपल्या घराकडे वळतात. घर हे माणसांइतकेच पशुपक्षी, जनावरांना हक्काचा निवारा वाटते. पूर्वीची घरे एकत्र कुटुंबपद्धतीला सामावून घेणारी होती. दोन-तीन पिढ्यांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र रहायचे. लहान मुला-मुलींच्या किलबिलाटाने घराचे गोकुळ होऊन जात असे. घराच्या भिंती फक्त दगड मातीच्या नव्हत्या, तर त्या प्रेम, जिव्हाळ्याने रसरसलेल्या होत्या. नातेसंबंध नुसते नातेसंबंध नव्हते, तर नात्यात मायेची ऊब होती.* *आज वृद्धांच्या समस्या 'आ' वासून उभ्या आहेत. मुलं परमुलखात गेल्यामुळे एकाकी पडलेली वृद्ध मंडळी एका बाजूला दिसतात, तर दुसरीकडे घरात मुलं, सुना, नातवंडे असूनही अवहेलनेने भरलेले एकाकीपण जगणारी वृद्ध मंडळी दिसत आहेत. समृद्ध संसारातील एक अडगळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. मुला-लेकरांच्या सुखासाठी तुफान होऊन झगडलेल्या माता पित्यांना 'थकलेल्या तुफानाला कुणी घर देता का घर...?' असं म्हणत भटकायची वेळ येते. अशी अनेक झुंजलेली तुफानवादळे रस्त्याकडेला, पुलाखाली, किंवा वृध्दाश्रमात नशिबाला दोष देत कण्हत पडलेली दिसतात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जहाँ न जाको गुन लहै, तहाँ न ताको ठाँव । धोबी बसके क्या करे, दीगम्बर के गाँव ॥ अर्थ : जिथे आपल्याला पात्रता व योग्यतेनुसार गुण व कौशल्य दाखवण्यासाठी कार्य कर्तृत्त्व करण्यास वावच नसेल तिथे राहून काय हशील होणार आहे ? तिथे राहाणे व्यर्थच आहे. ही बाब पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात की, ज्या गावात सर्व दिगंबरच (कपडे विरहित लोक) राहातात तिथे राहून धोब्याला काय उपयोग होणार आहे ? कला ही जीवनाची सावली मानली जाते. 'कलेनेच माणसाची ओळख । एरव्ही कोण पुसतो आणिक ? तुम्ही आहात राव की रंक । आता कोणी पुसेना ।' असे राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामगीतेत म्हणतात. कलावंतानं आपली कला जीवनाचा आधार केली व कलेचा अहंकार अंगी न बाळगता तिला विनयशीलतेची जोड दिली की सर्व जग आपलंस होवून जातं. आपलं कसब व कौशल्य अशा ठिकाणी दाखवायला हवं की ते आपल्या जीवनाला स्वावलंबनाकडे नेईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात. परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 मूल घडवताना.......... 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मुलांचा व्यक्तीमत्त्व विकास करणे म्हणजे त्यांचे अंतरंग विकसित करणे होय. विकासासाठी मुलांमध्ये प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, नम्रता यांसारख्या नैतिक मूल्यांची ओळख होणे, एवढा एकच उद्देश नसून त्याचे संवर्धन होणेही महत्त्वाचे आहे. खरेतर आपली संस्कृती एवढी महान आहे की, त्यातील विविध गोष्टी, राष्ट्रपुरुषांची उदाहरणे, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे केले जाणारे आचरण यांप्रमाणे कृती केली आणि ते गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला, तरी खऱ्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकसीत होईल. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बाल कथा *अनमोल क्षण* प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग. एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'. 'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'. खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/12/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १२८७ - सेंट लुशियाचा पूर - नेदरलँड्समधील झुइडर झी समुद्री भिंत कोसळली. ५०,००० ठार. १९६२ - नासाचे मरिनर २ शुक्राच्या जवळून जाणारे पहिले मानवनिर्मित यान. १९८९ - पॅट्रिशियो एल्विन चिली च्या राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- १८९५ - जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा. १९१८ - बी. के. एस.आय्यंगार, भारतीय योगतज्ञ 💥 मृत्यू :- १९७७ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : रवींद्र साठे यांना जनकवी पी.सावळाराम पुरस्कार जाहीर* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई : मनपात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे : ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी. आजपासून स्वीकारली पदाची सूत्रे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *हैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी घेतली शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ओझर (नाशिक)-यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात येथील प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ. भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *दुखापतीमुळे भारतीय संघातून रोहित शर्मा, अश्विनला विश्रांती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/JZdD67V Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रदूषण एक समस्या* https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• गजानन दिगंबर माडगूळकर विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक. जन्म शेटेफळ ह्या गावचा. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात. लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी (१९४२) आणि पहिला पाळणा (१९४२) ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन (१९६२) ह्या नावाने संगृहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या आहेत (तीन चित्रकथा, १९६३). युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी काही अशी : कविता–जोगिया (१९५६), चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७), गीत सौभद्र (१९६८). कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७). कादंबरी–आकाशाची फळे (१९६०). आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२) आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१). *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) सी.पी.आय.चे विस्तारित रूप काय ?* कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया *२) 'आर्य समाज' चे स्थापना वर्ष कोणते ?* १८७५ *३) जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक भारतात राहतात ?* १६ % *४) सिक्किमची राजधानी कोणती ?* गंगटोक *५) गुजरातमध्ये किती जिल्हे आहेत ?* गंगटोक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  नंदकिशोर पाटील आगळे ● सारंग भंडारे ● पवन धावनी ● विजय सातपुते *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कावेबाजी* लबाडांचा गोड बोलून विघातक कावा असतो आम्ही खुपच चांगले असा त्यांचा दावा असतो लबाडांची कावेबाजी उघड होत असते कितीही लपवा ती लपल्या जात नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खलील जिब्रान म्हणतात,'शिल्पकार व चित्रकार यांच्या कामापेक्षा एखाद्या शेतक-याचे, सामान्य कामगाराचे काम श्रेष्ठ दर्जाचे असते.' जीवन म्हणजे खरोखर अंधार. भर उन्हांत काम करणारा शेतकरी, धडधडत्या यंत्राबरोबर काम करणारा कामगार, धगधगत्या भट्टीजवळ काम करणारा मजूर आणि सीमेवर जीव धोक्यात घालणारा सैनिक ही कामातून केल्या जाणा-या अत्युच्च त्यागाची उदाहरणे. तुम्ही काम करता तेव्हा स्वत:ला स्वत:शी, इतरांशी आणि देवाशी जोडत असता. एखाद्या हमालाच्या अंगातून वाहणा-या घामाच्या धारा पाहिल्या की रक्ताचे पाणी करणे काय असते हे संवेदनशिल मनाला सहज कळते. पण कष्टाच्या भाकरीवर फार थोड्यांची श्रद्धा आहे.* *शेक्सपिअरच्या एका नाटकात काॅरिन नावाचा साधाभोळा मेंढपाळ भेटतो. तो म्हणतो.. मी खरा श्रमकर्ता, कष्टकरी आहे. माझी भाकरी मी मिळवतो. माझे कपडेही मीच बनवतो. मी कुणाची निंदा करत नाही. कुणाच्या आनंदाचा हेवा करत नाही. इतर लोकांच्या चांगल्या गोष्टी पाहून मला आनंद होतो. माझे दु:ख मी माझ्याशी ठेवतो. माझ्या जीवनात सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या शेळ्यामेंढ्या चरताना पाहणं आणि त्या कोकरांना दूध पिताना पाहणं. काॅरिनच्या जीवनाची साधीसुधी संकल्पना पाहून माणसं जगू लागली तर आपल्या जीवनात कित्येक प्रश्न निर्माण होणार नाहीत. एक साधा मेंढपाळ एवढ्या नैतिक उंचीवरून बोलू शकतो तर शिकल्या सवरलेल्यांनी कोणत्या उंचीवरून बोलले, वागले पाहिजे हे सांगितलेच पाहिजे असे नाही.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चाह मिटी चिंता मिटी मनवा बेपरवाह । जिसको कुछ नही चाहिए वह शहनशाह । अर्थ महात्मा कबीरांनी मानवाच्या कधीही न संपणार्‍या अपेक्षांवर मार्मिकपणे प्रकाश टाकला आहे. कितीही घाव बसले तरी मानवी मनाची हाव काही संपणारी नाही. जो गरीब आहे. त्याला श्रीमंचीचं वेड लागतं . ज्या वस्तू त्याच्याकडे नाहीत. त्या मिळविण्यासाठी त्याची जमेल त्या मार्गानं श्रीमंत होण्याची धडपड चालूच असते. जर ती श्रीमंती चुकीच्य मार्गाने मिळवीलेली असेल तर ती लाभेल का ? टिकेल का ? मनात शंकांचं मोहाळ भुणभुणायला लागतं. मिळालेल्यापेक्षा आणखी जास्तीचं वाढं-दिडं करण्याची धडपड. आहे ते टिकविण्यासाठीची चिंता. असा मजेदार जीवनसंघर्ष करताना माणूस स्वतःलाच हरवून बसतो. सर्व वैभव जवळ असूनही त्याचा उपभोग त्याला घेताच येत नाही. केवळ भारवाहकाचं काम निमुटपणे तो करीत राहातो.अगोदर उपाशीपोटी राहून सारं कमावलं. आता ते पचत नाही म्हणून मन मारून पोटाला उपाशी ठेवावं लागतं ! असा विचित्र जगणारा पृथ्वी तलावर माणूस हाच एकमेव प्राणी असावा. बर एवढं गाढव ओझं ओढून शेवटी रिकामंच निर्वाण ! जमव जमव जमवण्याच्या नादात जगणं जगायचं राहूनंच गेलं ! अशी खंत घेवून जगण्यात काय हशील बरे ! ज्याच्याकडे काहीही नाही तोच माणूस खरा खूश आहे. त्याला कोणती चिंता सतावत नाही. नाहीच तर हरवायची भीती नाही. मनाला विरक्त करता आलं की समाधानाशी मस्त मितृत्व होतं. मनानं श्रीमंत असणाराच खरा राजा असतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्याजवळ जे आहे ते इतराजवळ नाही किंवा इतरांजवळ जे आहे ते तुमच्याजवळ नाही.असे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला कदाचित वाटेलही आपल्या जीवनात असं का बरं होतं आणि त्याबाबतीत नसल्याचीही मनाला खंत वाटते.खंत वाटून घ्यायचेही कारण नाही.पहिल्यांदा तुम्ही थोडा विचार करा असे जर सगळ्यांना सारखेच मिळाले असते तर आपण काहीच प्रयत्नही केले नसते.इतरांच्यासोबतही आपण तुलना करु नये.ज्याच्या त्याच्या कर्माचा आणि ज्याला आपण कधी कधी नशिब म्हणतो कदाचित नशिबाचाही भाग असू शकते.पण एक लक्षात असू द्यावे पहिल्यांदा आपण इतरांची बरोबरी करु नये आणि जर करायचीच असेल तर आपण आपल्या कामात आणि प्रयत्नात कसूर करायची नाही.इतर जर पुढे जात असतील तर आपण त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि आपणही आपल्या प्रयत्नाने कसल्याही प्रकारचे मन खचून जाऊ न देता समोरच्या परिस्थितीला सामोरे जाऊन यशस्वी होण्याचा संकल्प करायचा.अशा कृतीमुळे आपलेही जीवन इतरांपेक्षा सुखी व समाधानी होऊ शकेल.इतरांबरोबर स्पर्धा करायची काही गरज नाही किंवा इतरांसोबत तुलनाही करायची गरज नाही.आपल्यालाही आपल्या कर्माने आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यामुळे आपणही आपल्या जीवनात खूप पुढे जाऊ शकतो हे निश्चित. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 मुल घडवताना.... 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• खरच संस्कार म्हणजे नक्की काय? योग्य आचार-विचार, गुण-अवगुण हे ओळखण्याची क्षमता म्हणजे संस्कार? की जीवनात मनाला कधीही अहंकाराची बाधा होऊ न देता विनम्र असणे म्हणजे संस्कार? आपली कथा त्या कस्तुरी मृगासारखी तर झाली नाही ना? म्हणजे स्वतःकडे कस्तुरी असूनही त्याची जाणीव मात्र आपल्याला नाही. संस्कार शोधायला गेल्यावर, हाती नक्की काय लागतं हे मोठ प्रश्नचिन्ह आहे गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ संपर्क _9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिष्याची परीक्षा रामानुजाचार्य शठकोप स्वामींचे शिष्य होते. स्वामींनी रामानुजांना ईश्वरप्राप्तीचे रहस्य सांगितले होते. मात्र ते कुणालाही सांगू नको, असे बजावले होते; पण रामानुजांनी आपल्या गुरूंची ही आज्ञा मानली नाही. गुरूंनी जे ज्ञान दिले, ईश्वरप्राप्तीचा जो मार्ग सांगितला होता, ते सारे ज्ञान त्यांनी लोकांना देण्यास प्रारंभ केला. शठकोप स्वामींना हे जेव्हा कळले, तेव्हा ते फार संतापले. रामानुजांना बोलावून घेऊन ते म्हणाले, ‘‘माझी आज्ञा मोडून तू साधनेचे रहस्य प्रगट करत आहेस. हा अधर्म आहे. पाप आहे. याचा परिणाम काय होईल तुला ठाऊक आहे का ?’’ रामानुज नम्रपणे म्हणाले, ‘‘गुरुदेव, गुरूंची आज्ञा मोडल्यास शिष्याला नरकात जावे लागते.’’ शठकोप स्वामींनी विचारले, ‘‘हे तुला ठाऊक असतांना सुद्धा तू जाणूनबुजून असे का केलेस ?’’ यावर रामानुज म्हणाले, ‘‘वृक्ष आपले सारे काही लोकांना देतो. त्याला कधी स्वार्थ आठवतो का ? मी जे काही केले, त्यामागचा उद्देश लोकांचे कल्याण व्हावे, लोकांनासुद्धा ईश्वरप्राप्तीचा आनंद मिळावा, असाच आहे. यासाठी मला नरकात जावे लागले, तर मला त्याचे मुळीच दुःख होणार नाही.’’ ईश्वरप्राप्तीची साधना इतरांना सांगण्याची रामानुजांची तळमळ पाहून स्वामी प्रसन्न झाले. त्यांनी रामानुजांना पोटाशी धरले. त्याला उत्तमोत्तम आशीर्वाद दिले आणि लोकांत खर्‍या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रेमाने पाठवले. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/12/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २००१ - पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचार्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार. २००२ - ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. २००२ - सायप्रस, चेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, हंगेरी, लात्व्हिया, लिथुएनिया, माल्टा, पोलंड, स्लोव्हेकिया व स्लोव्हेनिया या देशांना युरोपीय संघात मे १, २००५ ला प्रवेश देण्याचा ठराव मंजूर. २००३ - इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला तिक्रीतजवळ पकडले. २००३ - प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर 💥 जन्म :- १८९९ - पांडुरंग सातू नाईक, मराठी सिनेमॅटोग्राफर. १९१३ - आर्ची मूर, मुष्टियोद्धा. १९२४ - विद्याधर पुंडलिक, साहित्यिक. १९२८ - सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका. १९५५ - मनोहर पर्रीकर, गोव्याचे मुख्यमंत्री 💥 मृत्यू :- १९८६ - स्मिता पाटील, हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री. १९९४ - विश्‍वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक. १९९६ - श्रीधर पुरुषोत्तम ऊर्फ शिरुभाऊ लिमये , भारतीय स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भोपाळ : काँग्रेस पक्षाच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाने राज्यपाल आनंदीबेन पटेलांची भेट घेऊन मध्य प्रदेशात सत्ता स्थापनेचा दावा केला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इंग्लंडच्या पंतप्रधानपदी थेरेसा मे कायम राहणार; अविश्वास ठरावाविरोधात 63 टक्के मतं* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *हज यात्रेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ, 19 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *संग्रामपूर : धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप करत धनगर समाज बांधवांकडून घरावर काळे झेंडे उभारून करण्यात आला निषेध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला महाराष्ट दौऱ्यावर; मेट्रोसह विविध विकासकामांचे करणार भूमीपूजन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ * दिल्ली- कालपासून हिवाळी अधिवेशनाला झाली सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *तेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव आज घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दैनिक प्रजावाणीच्या ई पेपर मध्ये प्रकाशित लेख " डॉक्टर देव की दानव " https://prajawani.in/news_page.php?nid=212 वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625768 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनोहर पर्रिकर* गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री असणारे मनोहर पर्रिकर हे भारताचे संरक्षणमंत्री राहिले आहेत. ते उत्तरप्रदेशातून राज्यसभेचे खासदारही राहिलेले आहेत. त्यांनी १९७८ मध्ये आयआयटी मुंबई येथून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. आयआयटी झालेले ते पहिलेच मुख्यमंत्री म्हणविले जातात. या कामगिरीसाठी त्यांना आयआयटीतर्फेही २00१मध्ये विशिष्ट माजी विद्यार्थी ही उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले. एवढेच नाही तर गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे ते भाजपाचे पहिले नेतेआहेत. २४ ऑक्टोबर २000 रोजी ते गोव्याचे मुख्यमंत्री बनले पण, त्यांचे सरकार २७ फेब्रुवारी २00२ पर्यंतच चालू शकले. जून २00२ मध्ये ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. २0१७ मध्ये ते चौथ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावर आसीन झाले. राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गोव्यात भाजपाची सत्ता आणण्याचे संपूर्ण श्रेय पर्रिकर यांनाच जाते. अत्यंत तडफदार अशा या नेत्याला कर्करोगाने ग्रासले असून नुकतेच ते विदेशातून उपचार घेऊन परतले आहेत. याही स्थितीत ते गोव्याचा कारभार पाहतात, हे विशेष *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमची भीती तुमच्या समोर उभी ठाकेल तिच्यावर आक्रमण करा आणि तिला संपवुन टाका - चाणक्य *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'एन बी सी सी'चे विस्तारित रूप काय ?* नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन *२) भारताचे पंतप्रधान म्हणून एच.डी.देवेगौडा यांचा कार्यकाल कोणता ?* १ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७ *३) भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागाचे व्यवस्थापन केंद्र कोठे आहे ?* दिल्ली *४) अमेरिकेमध्ये कोणती शासन पद्धती अस्तित्वात आहे ?* अध्यक्षीय प्रजासत्ताक *५) कुन्नूर हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?* तामिळनाडू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  राजेश वाघ ● अनिल गायकवाड ● शरद नवले ● रोहन कुरमुडे ● उज्वल मस्के ● राजेश पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षण* शिक्षणाने माणसाचे जीवन फुलत असते अंधकारमय मार्ग त्यानेच टळत असते शिक्षण घेऊन जीवन फुलवता आले पाहिजे घेतलेल्या शिक्षणाचे सार्थक झाले पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी जीवन अनमोल आहे. पण ते फुकट मिळालेलं आहे. न मागता आणि फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत कुठे असते ! आपण केवळ श्वास घेत राहतो सवयीनं. दिवस येतात, जातात. जीवन मात्र अडगळीत असतं. खरंतर माणूस जगतो कशासाठी? तर जगण्यासाठीच ! जीवन जटील नाहीच. पण व्यवस्थेच्या बाजारात हे जगणंच का हरवून बसतो आपण? का आयुष्यभर इतरांशी तुलना करत... त्याचं वैभव, त्याची प्रतिष्ठा बघत स्वत:ला ठेंगणं करून घेतो. माणूस वयानं जसजसा वाढू लागतो, तसतसा एक मुखवटा चढत राहतो त्याच्या चेह-यावर. साध्यासुध्या आयुष्यात किती भटकतो आपण जगरहाटीच्या वाळवंटात ! एवढं सुंदर जीवन हातात असताना झूटया भविष्याची झूल पांघरून चालतो. ही झूल कधी पद-प्रतिष्ठेची तर कधी धनदौलतीची असते.* *माणूस धावत राहतो अखेरच्या श्वासापर्यंत. सारी शक्ती पणाला लावून आयुष्य गमावत रहायचं. मन कधी तृप्त होत नाही. समृद्धही होत नाही. या धापाधापीत जीवन वजा होतं आणि माणूस खंगतो. जीव गुदमरून टाकणा-या या चढाओढीत सिकंदर होता येईल माणसाला, डोक्यावर सम्राटाचा मुकुट असलेला. पण जगण्याचे सोनेरी क्षण कुठे हातात असतात ! काळ मोठा कठोर असतो. मृत्यूच्या उंबरठ्यावर सम्राटाचा मुकुट उतरवून ठेवावा लागतो आणि सोबत रिकाम्या हातांचे प्रायश्चित्त असते. सारा अहंकार गळून पडतो. या शेवटच्या प्रवासात एकाही पावलापुरता सुखशांतीचा सिकंदर नाही होता येत माणसाला.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• उदर समाता अन्न ले, तन ही समाता चीर अधिक ही संग्रह ना करें, तिस्का नाम फकीर। सारांश संन्याशी कसा असावा ? याबद्दल महात्मा कबीर सांगतात की जो पोट भर अन्न घेतो आणि काया झाकण्यापुरती वस्त्र मिळाली की संतुष्ट व समाधानी धारण करतो. यापेक्षा अधिकचे द्रव्य,कपडेलत्ते जमा करीत नाहीं किवा त्यांचा संग्रह ही करीत नाही तोच खरा फकीर किवा संन्यासी असतो . अध्यात्म सांगण्याच्या नावाखाली लोकांना लुटण्याचे प्रकार केले जातात. पूर्वी सामान्य माणसाला अध्यात्म किवा वेद पुराण कळायचं नाही. ते समजून घेण्यासाठी एखाद्या ज्ञानी पंडिताकडं जावं लगायचं. तो पंडितही भलता भाव खायचा .समोरच्याला माहिती सांगणे किवा मजकूर वाचण्याच्या मोबदल्यात त्या गरजू व्यक्तीकडून अंगमेहनतीची कामे फुकट करून घेणे. द्रव्यादी उकळणे असा प्रकार सर्रास चालायचा. आजही थोतांडी कर्मकांडाची भिती दाखवून लुबाडणूक होताना दिसते. भोळे भाबडे भक्तगण जादू छू मंतर हात चालाखीला भुलून बुवाबाजी व ढोगाला आहारी पडतात. ढोगी नाटकी सन्याशांचे आश्रम जागोजागी थाटले जातात. धर्म व पंथांच्या नावाखाली साध्या भोळ्या भक्तांना लुटून संन्यस्तपणाच्या बुरख्याआडून अधर्म करणार्‍यांना वेळीच ओळखून दूर राहावं. ऐसे कैसे झाले भोंदू| कर्म करूनी म्हणती साधू॥ अंगी लावुनिया राख| डोळे झाकुनिया करती पाप॥ दाखवुनिया वैराग्याची कळा| भोगी विषयाचा सोहळा॥ तुका म्हणे सांगो किती| जळो तयाची संगती॥ जगद्गुरू तुकोबांचा वरील अभंग ध्यानात घेतला तरी अशा ढोंगी सन्याशांपासून अलिप्त होता येईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्या विचारात आणि तुमच्या विरोधकांच्या विचारात खूप फरक आहे.तुमचा विचार हा सर्वसाधारण पणे त्रास होऊ नये,आपल्या बोलण्यामुळे मन दुखवू नये,तो जरी आपल्याकडे काकदृष्टीने पाहत असला तरी आपण त्याच्याकडे चांगल्या दृष्टीनेच पाहणे.आपले एखादेवेळी नुकसान झाले तरी चालेल पण त्याचे नुकसान होऊ नये अशी आपली धारणा असते आणि यामुळेच समोरच्यापेक्षा आपले जीवन सुखावह जगण्याचे मंत्र्यांनी शिकवते.हाच जगण्याचा मंत्र समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत नसतो आणि त्यामुळे त्यांच्या जगण्याचे चित्रच बदलून जाते.शेवटी त्यांच्या जगण्यात आणि जीवनात तुमच्यासारखा अर्थच नसतो.म्हणून तुमची जगण्याची जीवनशैली ही खरोखरच सर्वसमावेशक आणि आदर्श आहे हे विसरु नका.आज नाही उद्या तरी तुमच्या जीवनशैलीचा नक्कीच स्वीकार करतील. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 मुल घडवताना.......... 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्यास शिकवणे मोठ्यांच्या कृतींतूनच लहान मुले शिकतात; म्हणून मोठ्यांनीच आपले वागणे, बोलणे, इतरांना मान देणे, हे सर्व केले पाहिजे. तसेच प्रत्येक गोष्ट वेळेवर करावी. ‘मग करू’ म्हटले की, पुन्हा ती गोष्ट केली जात नाही. त्यासाठी शरीराला म्हणण्यापेक्षा मनालाच शिस्त लावायला पाहिजे. पुष्कळांच्या घरी कपाटात, रॅकमध्ये कपडे कोंबलेले किंवा अस्ताव्यस्त लटकलेले असतात. तसेच घरही अव्यवस्थित असते. मग घरात कोणी अचानक आले, तर धांदल उडते. एकदा हाताला वळण लावले की, मनाला ते नीट केल्याशिवाय स्वस्थता लाभत नाही. घर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यामध्ये आळस नको. आळस हा आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवावे गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ संपर्क _9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या माणसाकडून मिळालेले दुःख* एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो." *तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.*  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/12/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९० - पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला. २००१ - भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी. २००० - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- १८७२ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक. १९४० - शरद पवार, भारतीय राजकारणी. १९४९ - गोपीनाथ मुंडे, भाजपा नेते १९५० - रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, भारतीय अभिनेता. १९८१ - युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना. १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक. १९९२ - जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू. २००४ - निरंजन उजगरे, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्यानंतर पक्षाच्या दिल्ली मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *शक्तिकांता दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *Telangana Assembly Election Results : के.चंद्रशेखर राव यांचा 50,000 मतांनी विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नाशिक : नाशिककर गारठले, हंगामात सर्वाधिक नीचांकी 9.4 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ, पुजारा अव्वल पाचमध्ये; बुमराहचीही चमक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *तिसरा भाग* वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_11.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• गोपीनाथ पांडुरंग मुंडे  गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म (१२ डिसेंबर १९४९ रोजी झाला. ते मराठी, भारतीय राजकारणी होते. ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य होते, त्यांनी इ.स. २००९ पासून भारताच्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे(भाजप) लोकसभेतील उपनेते होते (इ.स. २०१२). १४ मार्च इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  तसेच गृहमंत्री होते. गोपीनाथ मुंडे हे मूळचे मराठवाड्यातील होते. त्यांचे घराणे राजकीय नसल्याने त्यांना घरून कुठलाही राजकारणाचा वारसा नव्हता. . संघर्ष करीत ते लोकसभेचे सदस्य झाले. तथाकथित उच्चवर्गीयांपुरत्या मर्यादित असलेल्या भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले, असे समजले जाते. १२ डिसेंबर, इ.स. २०१० रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा गौरव लोकनेता (लोकनायक) असा केला होता *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रश्न 01 कोणत्या भारतीय नेत्याला को “भारताचे लोहपुरुष” या नावाने ओळखले जाते ?* उत्तर : श्री सरदार वल्लभ भाई पटेल  *प्रश्न 02. कन्याकुमारी मध्ये रॉक मेमोरियल (शैल स्मारक) कोणाच्या स्मरणार्थ बांधण्यात आले ?* उत्तर : स्वामी विवेकानन्द *प्रश्न 03. जालीयनवाला बाग कोणत्या शहरात आहे ?* उत्तर : अमृतसर *प्रश्न 04. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?* उत्तर : मोर *प्रश्न 05. “जय जवान, जय किसान” हा नारा कोणी दिला ?* उत्तर : लालबहादुर शास्त्री *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  गजानन हुस्सेकर ● रमेश वाघ ● समीर मुल्ला ● पवनकुमार वतनदार ● आकाश पाटील ● मधू पाटील ● नागनाथ परसुरे ● शुभानन गांगल ● माधव सोनटक्के ● अशोक पाटील कदम ● विजय केंद्रे ● महेश शिवशेट्टी ● रामकृष्ण पाटील ● पवन खरबाळे ● विलास पाटील आवरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विचार* सूर्य उगवला की अंधार जळत असतो विचार स्पष्ट झाला की संशय ढळत असतो विचार स्पष्ट झाला की संशयाचा प्रश्न उरत नाही सूर्यासारखी स्पष्टता तिथे संशय ठरत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपलं जग सुंदर आहे. झाडं-झुडं, नदी-नाले, डोंगरद-या, पशू-पक्षी, चंद्र-तारे.. सारंच अनोखं ! त्यात आपला जन्म म्हणजे निसर्गानं दिलेली अनुपम भेट. हे जीवन आधिक सुंदर व्हावं म्हणून माणूस शिकतो, ज्ञानसंपन्न होतो. शिक्षणाच्या चरकातून पिळून निघालेल्या माणसाला नोकरी, पद-प्रतिष्ठा मिळते. प्रमाणपत्र त्याचे मापदंड असतात. यातून समृद्ध समाज घडविणारा व मानव्याची पूजा करणारा माणूस अभिप्रेत असतो. दुसरीकडे मातीत राबणारे, कलांसाठी आयुष्य वाहिलेले आणि जगाला मानवतेचा संदेश देणारे लोक जगण्यासाठी संघर्ष करतात, वणवण भटकतात कारण शैक्षणिक दाखल्यांचे गाठोडे त्यांच्याजवळ नसते.* *खरंतर जीवनाच्या विविध रंगाना, कलागुणांना आपल्यात मिसळून घेतलेला इंद्रधनू असतो माणूस ! माणूस बहुआयामी असतो. अनेकांनी शिक्षणात 'ढ' असूनही नोबेल पुरस्कार मिळवून इतिहास घडविला. आपल्या वाटा आपणच शोधल्या. माणसाचे प्रश्न केवळ गणितानं सुटत नाहीत. पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडे काही उत्तरं असतात. दु:खाच्या काहिलीतही आपल्या संवेदना जपणारे काही लोक असतात. जगासाठी जळता येत नसलं तरी प्रामाणिक जगणं हातात असतं माणसाच्या. ही माणसं जगाच्या लेखी मोठी नसतात. पण 'माणूस' म्हणून लायक असतात. तीर्थक्षेत्रांच्या पाय-या झिजवणा-यांपेक्षा कुणाच्या वेदनेची फुलं करणारी माणसं महान असतात. ही जीवनमूल्यंच माणसाचा मापदंड असावा.* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर पशु पैसा ना गहै, ना पहिरै पैजार ना कछु राखै सुबह को, मिलय ना सिरजनहार। सारांश माणसाला मायेने आपल्या मोहात असे जखडून ठेवले आहे की माणूस स्वार्थापासून दूर जायलाच तयार नाही. जेव्हा पाहावे तेव्हा मी व मला हीच त्याची हाव हाव चालू असते. कितीही जरी धन संपत्ती मिळाली तरी त्याचंं समाधान होतच नाही. पायी चालणार्‍याला सायकल हवीशी वाटते. सायकल स्वार मोटार सायकल वाल्याकडे बघून दुःखी होतो. मोटार सायकल वाल्याला कार वाल्याचा हेवा वाटतो. असा हा हावहावीचा न संपणारा दुःखी करणारा मार्ग. या उलट पायी पालणार्‍यानं रस्त्यानं काठीच्या आधारावर चालणार्‍या एक पायच नसलेल्या जिद्दी अपंगाकडं पाहिलं, मोटारसायकल वाल्यानं कारऐवजी सायकलवाल्याकडं पाहिलं की आपणाकडं इतरापेक्षा बरं आहे याची जाणीव होते. मनात मत्सराची भावना जागृत होत नाही. इतराकडं निखळ व दयाभावाने पाहाण्याची दृष्टी वाढीस लागते. हीच वृत्ती माणसासाला जगाकडं सकारात्मकतेनं पाहायला शिकविते. महात्मा कबीर जीवन सहज व नैसर्गिकपणे जगण्याचा सल्ला देतात. पशू-पक्षी जीवन जगण्यासाठी गाठीला पैसा बांधून ठेवत नाहीत किवा पायाला पायतन वापरत नाहीत. उद्याच्या दिवसासाठी आजचा दिवस संपताना काही संचितही करून ठेवत नाहीत. म्हणून त्यांना देव काही चोचीत दाना देत नाही किवा जवळ काहीच नाही म्हणून ते काही उपाशी मरत नाहीत. उलट संचय करणार्‍याला सांभाळणं व हरवण्याची भिती आहे. पशू पक्ष्यांपाशी उद्याची चिंता नाही. पुढच्या पिंढ्यांसाठी संपतीची काळजी नाही म्हणून त्यांच्या पिलांच्या पंखात बळ येतं. ते दूर पर्यंत उड्डान घेत आकाशालाही गवसणी घालतात. माणसानं थोडा विवेक जागा केला तर बर्‍याच काही गरज नसता सलणार्‍या ठणका आपोआपच कमी होतील, व धुसर वाटणारा जीवनमार्ग धोपट होईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 मुल घडवताना.......🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संस्कारांनी मनावर योग्य परिणाम होतात. आयुष्य समृद्ध आणि यशस्वी होण्यासाठी मदत होते. जसं एखाद्या रत्नाला पैलू पाडल्यानंतर ते रत्न पूर्वीपेक्षा तेजस्वी होतं किंवा एखाद्या चित्रात रंग भरत गेल्यावर ते जसं उठावदार आणि सुंदर दिसतं, तसं संस्कारांचा मनावर असामान्य परिणाम होउन दिव्य तेजाचा उदय होतो. शेवटी निरोगी, सात्विक, धर्मशील आणि सामर्थ्यवान पीढी घडवणे हेच तर असते संस्कारांचे ध्येय, नाही का गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वैचारिक निर्मळता* गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झर्यातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये." *तात्पर्य- भावनेच्‍या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्‍वच्‍छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे.कारण विचार खुंटलेकी विकार भडकतात.आणि अविचाराने घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरतात.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/12/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८१६ - इंडियाना अमेरिकेचे १९वे राज्य झाले. 💥 जन्म :- १९६९ - विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर. १९०९ - नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ. १९२२ - दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९८७ - जी.ए. तथा गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, मराठी लेखक. १९९८ - राष्ट्रकवी प्रदीप, हिंदी कवी. २००४ - एम.एस. सुब्बुलक्ष्मी, गायिका आणि भारतरत्न, रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या. १९६३ - कोवलम माधव पणिक्कर, राजकारणी, इतिहासकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पाच राज्यात झालेल्या निवडणुकांचे आज लागणार निकाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *कोल्हापूर - शिक्षणाच्या वारीला कोल्हापूरच्या तपोवन भूमीत सुरुवात, शिक्षणमंत्र्यांनी साधला ऑनलाईन शिक्षकाशी संवाद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *गुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई - राज्य सरकारने मेगाभरतीबाबत पुनर्विचार करावा, मराठा आरक्षण प्रश्नावरून हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ऍडलेड- भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिल्या मालिकेत भारतानं ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रदूषण एक समस्या* https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9523625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कवी प्रदीप* कवी प्रदीप यांचे खरे नाव रामचंद्र द्विवेदीं. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९१५ रोजी झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बाँबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. प्रदीप यांचे दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा है हे किस्मत चित्रपटातले गीत तुफान गाजले. प्रदीप याच्या रचनांत देशभक्ती आणि देशवासीयांमधे जागृती निर्माण करण्याची तळमळ होती. त्यांच्या स्वदेशावरील प्रेमापोटी त्यांनी असंख्य देशभक्तिपर गीते आणि कविता रचल्या. त्या कविता वाचून अनेकजणांचे रक्त उसळत असे. कवी प्रदीप यांनी कबीर आणि गालिब यांचे साहित्य वाचले होते. तसेच शैलेंद्र आणि साहिर लुधियानवी यांच्या काव्याशी ते चांगले परिचित होते. भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल’ ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिन्दोस्तान की’ असे प्रसिद्ध गाणे त्यांच्या नावावर आहेत. १७०० गाणी लिहिणाऱ्या कवी प्रदीप यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार गौरव केला. कवी प्रदीप यांचे ११ डिसेंबर १९९८ रोजी निधन झाले *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) हंगेरीमध्ये कोणती शासनपद्धती अस्तित्वात आहे ?* प्रजासत्ताक शासन पद्धती *२) 'बिटवीन द लाइन्स'चे लेखक कोण ?* कुलदीप नय्यर *३) संयुक्त संस्थानातील आकाराने मोठे आणि उष्ण पाण्याचे झरे असणारे राष्ट्रीय उद्यान कोणते ?* येलोस्टोन पार्क *४) बेरजेच्या मशिनचा शोध कोणी लावला ?* ब्लेस पास्कल *५) इस्टर्न टाईम्स हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित होते ?* इंग्रजी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  इलियास शेख ● प्रिया बुडे ●  प्रा. नितीन दारमोड ●  दस्तगीर सय्यद ●  लल्लू खान ● दीपक पाठक ● आदर्श मडावी ● आकाश सोनटक्के ● विशाल स्वामी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तत्त्व* क्षणिक सुखासाठी माणूस स्वतः ला विसरत आहे शुल्लक बाबींसाठी तोल घसरत आहे क्षणिक सुखा पेक्षा नैतिकतेला महत्त्व असते नैतिकता ढळू नये हे खरे तत्त्व असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शांतता खूप बोलते. आधी कानांचा ताबा घेते, मग मनाचा. सर्व काही 'शांत' असते तेव्हा खूप काही 'आवाज' मूकपणे आपल्याभोवती फिरतात. शांततेत समुद्राची गाज हितगुज करते, माडामाडातून फोफावणारा वारा संवाद साधतो. शांततेत कधी आत्ममग्नतेची समाधी लागते तर कधी उत्तुंग विचारांच्या लाटांची भरती येते. दुपारच्या शांततेत घामाचे नितळ थेंब ओथंबलेले असतात तर संध्याकाळच्या कातरवेळच्या शांततेत एकाकीपणाची हुरहुर आठवणींचा कानोसा घेते. मध्यरात्रीच्या शांततेतून कधी असंख्य दुष्ट-सुष्ट विचारांची संगत पंगतीने बसते, तर कधी आयुष्याच्या उजळणीचे पाढे अंधारातून संततधारेसारखे प्रकटतात.* *शांतता सर्वत्र व्यापून आहे, तरीही तिचा शोध घ्यावा लागतो. शहरातली दुर्मिळ शांतता एखाद्या खेड्यात मुबलक सापडेल. शहरात गर्दीचा आवाजच कधी कधी शांततेची हौस पुरवतो. शांततेची ओळखही कान विसरतात. गर्दीतला आवाज सहज होता येते, मात्र शांततेत मूकपणे सहभागी व्हावं लागते. पण माणूस शांततेत सहभागी होण्याऐवजी तो ती भंग करण्यात धन्यता मानतो. एखाद्या शांत देवळात प्रथम घंटा वाजते. आपले अस्तित्व तो असे जाणवून देतो. क्वचित काही मंदिरात शांतता उदबत्तीच्या अस्तित्वात धीराने उभी असते. तिथे जिज्ञासू भक्तांचा मेळावा शांततेचा विलक्षण शोध घेत असतो. हीच शांतता काही चर्च व मशीदीतही सापडते, तेव्हा तिथे 'ईश्वरचा' अंश मुक्तपणे वावरत असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हरिजन गांठ ना बान्धिये उदर समाना लेय आगे पीछे हरि खरे जो मांगे सो देय । सारांश महात्मा कबीर ईश्वरीय अंशाचे खरे गुण वैशिष्ट्ये सांगतांमा म्हणतात की,'ईश्वरीय अंश असणारे किवा ईश्वराची लेकरं हा विशाल निसर्ग. त्याची विलोभणीय सुंदर रुपं याना ओरबाडत नाहीत. विकास किवा भरभराटीच्या नावाखाली निसर्गाचे , पर्यावरणाचे विद्रुपीकरण करीत नाहीत. जुन्यातलं पूर्वीचं जे पर्यावरण पूरक आहे ते नाहीसं करून नव्हे तर त्याला राखून नाविन्य स्वीकार कसा करता येईल ? याकडे लक्ष देतात. भक्कम अशी शेकडो वर्षापूर्वीची झाडे निसर्गातले डोंगर टेकड्या ही रूप नष्ट करीत विकासाच्या आडून स्वतःलाच तर फसवित नाहीत ना ! गावातले रस्ते बांधताना दर पाच दहा वर्षाला फुटाफुटाने उंची वाढवून रस्त्यावरचे पाणी घराघरात सोडले तर याला विकास म्हणायचा का? रस्ते चकचकीत करताना गावकर्‍यांनी घर कशी उंच करायची. या विचारानं मुळ घर सोडून दुसरीकडंच वस्ती करावी लागू नये! मानवामात्रा व वन्यजीवांना ही जमीन व मोकळ आकाश कायम सुरक्षित लाभेल याची हमी देणारा विकासक लाभला पाहिजे. महागड्या उंची वस्तू वापरध्याचा मोह भाईबंधाना लुबाडून पूर्ण होता कामा नये? एकमेव मानव प्राणी वगळता कोणताही प्राणी आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी संचय करून ठेवत नाही. निसर्गातून फक्त पोटापुरतंच ते घेत असतात. निसर्गाचं संतुलन बिघडू देत नाहीत. इकडं पाच दहा वर्ष नेतेगिरी, ठेकेदारी करणारा गचकतो. त्याच्या जाण्यानंतर मागचे आक्रोश करताना 'पुढच्या दहा पिढ्या बसून खाल्ल्या तरी सरणार नाही इतकंं साहेबानं कमावलं हो '! म्हणून दुःख करतात की जणतेला लुबाडल्याचं अभिमानानं सांगतात ! देव जाणे. मतदानावेळी आमिशाला बळी पडायचे अन असेच नेते आणि विकासक आपल्यावर लादून घ्यायचे की लोकाभिमूख, धडपड्या, चळवळीतला लोकांशी नाळ असणारा नेता निवडायचा हे किमान नशेपासून दूर राहून मतदारानं ठरविलंं पाहिजे. हा निसर्गच माझा आहे. मला उद्याच्या भूकेची चिंता करण्याची गरजच काय आहे? ही पशू-पक्षांची खरी विचार सरणीअसते. कारण त्यांचं जगणं वास्तव नैसर्गिक आहे. याउलट मांणूस वर्तन करतो व विषाद करीत बसतो. हे बदललं पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात. परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शांती - Peace* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनःशांती* अनेक महापुरुषांनी सांगितलेले उपाय करुन थकलेला एक तरुण विवेकानंदांजवळ आला नि म्हणाला, '' स्वामीजी तासन् तास बंद खोलीत बसून मी ध्यानधारणा करतो, परंतु मनाला शांती लाभत नाही.'' त्यावर स्वामीजी म्हणाले, '' सर्वात प्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव. आपल्या जवळपास राहणार्‍या दुःखी, रोगी व भुकेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर.'' यावर त्या तरुणाने त्यांना, '' एखाद्या रोग्यासी सेवा करताना मीज आजारी पडलो तर ?'' असा प्रश्न विचारला. विवेकानंद म्हणाले, '' तुझ्या या शंकेमुळे मला असे वाटते की, प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसते. म्हणूनच तुला शांती लाभत नाही. शुभकार्याला उशीर लावू नये तसेच त्यातील उणिवाही शोधू नयेत. हाच मनःशांती मिळविण्याचा जवळचा मार्ग आहे.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*।। सारा आसमंत ज्ञान, विद्या, विचार, विवेक आणि प्रज्ञा देण्यासाठी उत्सुक असतो , फक्त आमचे ज्ञानेंद्रिये आम्ही ज्ञानाला अर्जित करण्यासाठी अनुकूल ठेवणे हीच प्रज्ञावंत होण्याच्या प्रक्रियेची पूर्व अट आहे ।।* *ज्ञान प्रभात*💐💐

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/12/2018 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- *मानवी हक्क दिन* 💥 जन्म :- १८७० - सर जदुनाथ सरकार, इतिहासकार. १८७८ - चक्रवर्ती राजगोपालाचारी, स्वतंत्र पक्षाचे संस्थापक. १८८० - श्रीपाद कृष्ण बेलवलकर, प्राच्यविद्यापंडित. १८९२ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक. १९०८ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते. 💥 मृत्यू :- १९४२ - डॉ. द्वारकानाथ कोटणीस. २००१ - अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी, हिंदी चित्रपट अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भोपाळः स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षिततेवरून काँग्रेसची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *महानगरपालिका निवडणूक : धुळ्यात 60, तर अहमदनगरमध्ये 67 टक्के मतदान* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *विजय मल्ल्ल्याच्या प्रत्यार्पण खटल्यासाठी सीबीआय आणि इडीचे पथक संचालक साई मनोहर यांच्या नेतृत्वात ब्रिटनला रवाना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे : राज्यात पडलेल्या दुष्काळाचा मोठा फटका यंदा आवळा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. दुष्काळामुळे उत्पादन तब्बल ७० टक्क्यांनी घटले असल्याचे आवळ्याचे व्यापाºयांनी स्पष्ट केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यभरातील दुष्काळी भागातील रुग्णांना इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र या संस्थेच्या सर्व सदस्य असलेल्या डॉक्टरांकडून सवलतीच्या दरात उपचार दिले जाणार आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *महाराष्ट्राने मिळवले खेलो इंडिया युवा स्पर्धेचे यजमानपद, पुण्यात रंगणार स्पर्धा; देशभरातील ९ हजार खेळाडूंची नोंदणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मलेशियाचा ५-३ ने पराभव करत जर्मनीने निश्चित केला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *दुसरा भाग* वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_9.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जदुनाथ सरकार* जदुनाथ सरकार देशातील प्रसिद्ध इतिहासकार हाते. त्यांनी भारताच्या मोघलकालीन इतिहासाचे लेखन करून मोठे योगदान दिले आहे. त्यांचा जन्म १0 डिसेंबर १८७0 रोजी बांगला प्रांतात झाला. त्यांचे शिक्षण कलकत्ता येथे झाले. १८९८ मध्ये प्रांतीय शिक्षण सेवेसाठी त्यांची निवड झाली. त्यांनी कलकत्ता, पाटणा व उत्क लमध्ये इंग्रजी व इतिहास शास्त्राचे विभागप्रमुख म्हणून काम केले. १९१७ मध्ये त्यांनी निवड काशीच्या हिंदू विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख म्हणून झाली. मात्र पुढच्या वर्षी त्यांनी काही कारणामुळे हे पद सोडून रेवेंशा काँलेज उत्कल जॉईन केले. ब्रिटिश सरकारने त्यांची प्रतिभा ओळखून त्यांना शिक्षणसेवेत संधी दिली. यानंतर ते कलकत्ता विद्यापीठात उपकुलपती म्हणून नियुक्त झाले. १९२३ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना आय.ई. तर १९२९ मध्ये सर पदवी बहाल केली. यदुनाथ सरकार यांचे पहिले पुस्तक इंडिया आँफ औरंगजेब, टोपोग्राफी, स्टेटिस्टिक्स अँड रोड १९0१ मध्ये प्रकाशित झाली. औरंगजेब का इतिहास दोन खंडात प्रकाशित झाले. त्यांचेच पुस्तक शिवाजी अँड हिज टाईम्स १९१९ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकांचे फारसी, मराठी, राजस्थानी व युरोपीयन भाषांमधील उपलब्ध सामुग्रीचा सावधपणे उपयोग करून सरकारने ऐतिहासिक संशोधनाचे कार्य केले. सोबतच मुलभूत आधारावर संशोधनाची सुदृढ परंपराही यामुळे सुरू झाली. यासाठी यदुनाथ सरकार यांनी दिलेले योगदान अमूल्य व अतुलनीय आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) केंद्रीय मंत्रिमंडळाने मध्यंतरी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला ?* मल्याळम *२) २0१३ चा मॅन बुकर पुरस्कार कोणाला मिळाला ?* लिडिया डेव्हिस *३) एम. चिन्नास्वामी स्टेडियम कोठे आहे ?* बेंगळुरू *४) कोणत्या भारतीय शहराला 'उगवत्या सूर्याचा प्रदेश' असं म्हणतात ?* इटानगर *५) 'तेज कदम' हे भारताने कोणत्या देशासोबत संयुक्तपणे जारी केलेले निवेदन आहे ?* कझाकस्तान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  संदीप मस्के ●  दशरथ शिंदे ●  विठ्ठल जांभळे ●  शिवानंद हिंदोळे ●  दत्ताहरी भीमरतवार ●  अमोल पाटील सलगर ●  अनिल यादव ●  श्रीकांत मॅकेवार ●  संभाजी धानोरे ●  प्रवीण वाघमारे ●  लक्ष्मण पद्मावार ●  दिनेश वाढवणकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *कृती* विचाराला कृतीची जोड बसावी लागते कृती होईल एवढी ओढ असावी लागते मनात ओढ असल्यास सहज कृती होते कार्य करण्याची त्यातून तर मनोवृत्ती होते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'जन्म आणि मृत्यू' या माणसाच्या आयुष्यातील गुंतागुंतीच्या संकल्पना. जन्म म्हणजे काय. मृत्यू म्हणजे काय. ते कसे घडतात किंवा त्यांचेमागे कोण आहे ? त्या दोन संकल्पनांच्या आधी किंवा नंतर म्हणजे त्याच्या आगे-मागे काय असते ? याविषयी काहीसे धुसर धुसर व्यक्त होत असते. परंतु ठामपणे कोणीच काही म्हणत नाही. उमर खय्याम म्हणतात.. 'जन्म आणि मृत्यू' ही माणसाच्या जीवनातील न उलगडणारी कोडी आहेत.* *ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू अटळ आहे, हे मात्र सत्य ! जन्म आणि मृत्यू या दोन टोकांत असणा-या एका मोठ्या व्हरांड्यात माणसाचे येरझारा घालणे म्हणजे जीवन. ही दोन टोके, दोन ध्रुव ठरलेले आहेत. त्यात चालत राहणे एवढे मात्र खात्रीपूर्वक आपल्या हातात आहे, असे मानले तर या चालण्याचा प्रवास, इथला आपला मुक्काम मन:पुर्वक व्हायला हवा; पण तो तसा होत नाही. या दोन टोकांच्यामध्ये येरझारा घालता घालता आपण बरेचदा ठेचकाळतो, भरकटतो, चुकतो, गांगरतो, गोंधळतो, हरतो आणि जिंकतोदेखील ! जेव्हा या चालण्यात काही प्रमाणात यशस्वी होतो तेव्हा त्याचे श्रेय आपल्याकडेच घेतो. पण जेव्हा हरतो तेव्हा मात्र त्याची अनेक कारणे आपल्या तल्लख बुद्धीतून झराझरा बाहेर पडतात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जब घटि मोह समाईया, सबै भया अंधियार निरमोह ज्ञान बिचारि के, साधू उतरै पार। सारांश जोपर्यंत मनाला मोह चिटकलेला आहे. तो पर्यंत षडविकारांची उत्पत्ती होतच राहाणार. मनाच्या अधिन राहून अज्ञानांधःकाराचा नाश करता येणे अशक्य आहे. कर्मेंद्रिये जर बुद्धि सापेक्ष राहिली व मनाची अवस्था निर्मोही तयार झाली तरच सत्कर्मे संभव आहेत. मोहातून मुक्त व्हायचं असेल मनाला जडलेली आसक्ती दूर सारावी लागेल. मनावर दाटलेलं मोहाचं मळभ फक्त संतंच दूर करू शकतात. संत संगतीत राहून सांसारिक आसक्तीचे पाश दूर सारता येतात. निखळ, निर्मळाची ओळख करून देण्याची किमया संतांठायी असते. ते कधीच माया मोहात गुरफटून पडत नाहीत. संसारी माणसांची अवस्था पतंगासारखी झालेली आहे. दिव्यापासून प्रकाशाची निर्मिती होते. त्याच्यापासून निर्माण होणार्‍या उजेडातून खरं तर दूरवरचा शोध घ्यायचा असतो. परंतु पतंग दिव्यावरंच झेप घेत असतात. आपल्या अस्तित्वाचा त्यांना विसर पडतो. अग्निशी टकरून स्वतःचे इवले इवले पंख जाळून घेवून ते जायबंदी होवून जातात. व तडफडत आयुष्य संपवून घेतात. दिव्याचा क्षणिक मोह पतंगांची ती अवस्था करीत असेल तर मानवात आसक्ती मुळे निर्माण होणारा मोह काय अवस्थेला नेईल याची ओळख संत करून देतात. षडविकारापासून दूर राहिले तर मानवाला जीवनानंद घेता येईल व जीवनात भव सागर तरून जाईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 मुल घडवताना..........✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मुलांचा व्यक्तीमत्त्व विकास करणे म्हणजे त्यांचे अंतरंग विकसित करणे होय. विकासासाठी मुलांमध्ये प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, नम्रता यांसारख्या नैतिक मूल्यांची ओळख होणे, एवढा एकच उद्देश नसून त्याचे संवर्धन होणेही महत्त्वाचे आहे. खरेतर आपली संस्कृती एवढी महान आहे की, त्यातील विविध गोष्टी, राष्ट्रपुरुषांची उदाहरणे, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे केले जाणारे आचरण यांप्रमाणे कृती केली आणि ते गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला, तरी खऱ्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकसीत होईल गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ संपर्क _9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संवर्धन - Promotion* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माकड , कोल्हा व जंगल* (प्राणी) एकदा एक वानर व कोल्हा यांची जंगलात भेट झाली तेव्हा माकड कोल्ह्याला म्हणाला, 'अरे, तुझ्या झुपकेदार शेपटाचा काही भाग तू मला देतोसका तर तो मी लावून वार्‍यापासून माझं रक्षण करीन. मला त्याचा उपयोग होईल.तुझे शेपूट खूप झुबकेदार आहे.तुला पुरून उरण्यासारख आहे. नाही तरी तू ते धुळीत मळवतोस. तर त्यातलं थोडं मला दिलस तर तुझी फारशी अडचण होणार नाही अन् माझंही काम होईल. हे ऐकून कोल्हा म्हणाला, 'अरे माकडा तू म्हणतोस त्याप्रमाणे माझं शेपूट कदाचित मोठं असलं, तरी ते मी जन्मभर असंच धुळीत मळवीन पण त्यातला एक केसही तुला देणार नाही.' तात्पर्यः काही स्वार्थी प्रवृत्तीचा माणसांजवळ सर्व असून पण ते दुसऱ्याचा उपयोगी येत नाही.खर तर माणसाने इतरांच्या मदतीला कसे जाता येईल हा विचार नेहमी ध्यानीमनी ठेवून जगावे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🌹जीवन विचार*🌹 〰〰〰〰〰〰〰 http://www. pramilasenkude.blogspot.in ➖➖➖➖➖➖➖ *जो मनन करु शकतो त्याला मनुष्य म्हणतात.आपल्याला मननामुळेच सर्व ज्ञान प्राप्त होते.मनन हा जसा मनाचा गुण आहे.त्याप्रमाणेच माणसाच्या जीवनात प्रसन्नता ही मानवाला मिळालेली दैवी देणगी आहे.ज्या मानवात प्रसन्न वृत्ती आहे अशा प्रसन्न असणाऱ्या व्यक्तीची बुद्धी लवकर स्थिर होत असते.प्रसन्नतेमुळे आत्म्याला शक्ती मिळते.म्हणूनच कोणतेही कार्य हाती घेतले असता त्यात प्रसन्नता असले की ते कार्य हलके वाटते.* *प्रसन्नता ही माणसाच्या मनातून निर्माण होणारी क्रिया आहे.जसा दिव्यान दिवा लावता येतो तशी एका माणसाच्या मनातील प्रसन्नता अनेकांना हर्षउल्हासित करते.* smt.pramila senkude *यशस्वी जीवनासाठी प्रथमतः आपले मन आनंदी व प्रसन्न असायला हवे.ज्याप्रमाणे पारिजातक आपल्या फुलांच्या पडलेल्या सडा सुगंधाने सुगंधीत करून दुसऱ्याला आनंदी करतो त्याप्रमाणे माणसाच्या चेहऱ्यावरील झळकणार निर्मळ हास्य हे मन जिंकून घेत.* *म्हणूनच आपल्या जीवनातील जीवन जगण्यासाठीच ध्येयवाक्य असाव.' प्रसन्नतेचा एक एक क्षण पुरेसा,जोपासावा '.* *〰〰〰〰〰〰〰* ✍ शब्दांकन / संकलन 🙏श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे🙏 हदगाव (नांदेड) 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/12/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी : १९४१ - दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला उत्तर देण्यास अमेरिकन काँग्रेसने जपानविरूद्ध युद्ध पुकारले. १९४१ - दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेस पाठिंबा देण्यास चीनने जपानविरूद्ध युद्ध पुकारले. १९४१ - दुसरे महायुद्ध-हाँगकाँगचे युद्ध - आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला आठ तास होतात तो जपानने ब्रिटीश वसाहत असलेल्या हाँग काँगवर आक्रमण केले. १९४१ - ज्यूंचे शिरकाण - लॉद्झ जवळील चेल्म्नो काँसेंट्रेशन कॅम्पमध्ये कैद्यांना मारण्यासाठी विषारी वायुवाहनांचा उपयोग प्रथमच केला गेला. १९६६ - समुद्रातील वादळात ग्रीसची फेरी बोट हेराक्लियोन बुडाली. २०० ठार. 💥 जन्म :- १९४२ - हेमंत कानिटकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४६ - वॉरेन स्टॉट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९६३ - सरित धनरजता, थायलंडचा पंतप्रधान. १९७८ - गोल्डा मायर, इस्रायेलची पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभात स्टेजवरच आली भोवळ, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *भारतात होणाऱ्या दर आठ मृत्यूंपैकी एक मृत्यू हा हवा प्रदूषणामुळे होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका अहवालामधून समोर आला आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *इंडिअन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक असलेल्या डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी केंद्र सरकारने केली नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगण या पाच राज्यांसाठी निवडणुका पार पडल्या असून निवडणुकांचे निकाल ११ डिसेंबरला लागणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यातील विविध भागात गंभीर झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता राज्याने ७ हजार ९६२ कोटी ६३ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अँडलेड येथे होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *गोलंदाजांनी केलेल्या अचूक मार्‍याच्या जोरावर न्यूझीलंडने तिसर्‍या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी पाकिस्तानला १२३ धावांनी मात देत तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/r1Exkxb Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काही बाही असेच काही* * खालील ब्लॉगवर पहिला भाग वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/06/blog-post_22.html?m=1 वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी ठिकाणे आहेत. छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर हे तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ या खाद्यपदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे तसेच कोल्हापुरी चपल ही खूप प्रसिद्ध आहे.आपुलकीची भावना ही इथल्या माणसांच्याकडे आहे.येथे मिसळपाव हे प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे.तसेच खाऊ गल्लीत राजाभाऊची भेळ प्रसिद्ध आहे. फडतरे मिसळपाव प्रसिद्ध आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्य जगून समजते ; केवळ ऎकून, वाचून, बघून समजत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *०१) महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?* ३६ *०२) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केंव्हा झाली ?* ०१ मे १९६० *०३) महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत ?* ०६ *०४) अमरावती विभाग कोणत्या नावाने ओळखले जाते ?* विदर्भ *०५) मराठवाडा नावाने कोणता विभाग ओळखला जातो ?* औरंगाबाद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अनिल सूत्रावे ● अनिरुद्ध खांडरे ● फारुख अली ● राजेश जळकोटे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मार्गदर्शक* मार्गदर्शनाच्या अभावाने कोणी भरकटत असतो सुंदर आयुष्यातून कोणी कायमचाच उठत असतो योग्य वेळी प्रत्येकाला मार्गदर्शक मिळाला पाहिजे आयुष्यातील टर्निंग पाॅईंट वेळीच कळाला पाहिजे शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवनात आपल्याला जे काही यश मिळते ते फक्त आपल्या स्वत:च्या प्रयत्नांचे फळ आहे, असे आपण कधीही प्रामाणिकपणे म्हणू शकत नाही. आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या कष्टाला, पतीच्या किंवा पत्नीच्या मदतीला, मित्रांच्या व* *सहका-यांच्या योगदानाला आपण दिले नाही, तर तो स्वार्थ ठरेल. पण आपल्या यशप्राप्तीत एक अदृश्य हितचिंतक नेहमीच आपली साथ देत असतो आणि तो असतो सर्वसाक्षी परमेश्वर. गरजेच्या वेळी आपल्याला त्याची आठवण येते, पण गरज भागल्यावर त्याचे आभार मानायचे आपण बहुतेकदा विसरून जातो.* *परमेश्वराचे आभार आपण का आणि कशासाठी मानायचे? आपल्याला त्याने जीवन दिले म्हणून. जीवनात आपली सतत प्रगती होत राहिली म्हणून, आपण सुरक्षित, निरोगी राहिलो म्हणून नाही, तर आपल्यासाठी हे सगळे करत असताना परमेश्वर मात्र अदृश्य राहतो आणि तो कशासाठीच स्वत:ला श्रेय घेत नाही म्हणून त्याचे आभार मानले पाहिजेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ♥♥♥♥♥♥♥♥♥ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• यह जग कोठी काठ की, चहुं दिश लागी आाग भीतर रहै सो जलि मुअै, साधू उबरै भाग । सारांश महात्मा कबीर क्रोधाचे दुष्परिणाम लक्षात आणून देतात. हा संसार म्हणजे लाकडी महालासारखा आहे. कोणत्याही क्षणी हा महाल आगीचे भक्ष होवू शकतो. मानवाच्य्या ठायी षड्विकार उत्पन्न होत असतात, त्या सर्व विकारांमध्ये क्रोध हा फारच घातक असतो. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की रागाची निर्मिती होते. रागाचं प्रकटीकरण क्रोधाद्वारे होत असतं. मनाची एकाग्र अवस्था साधली नाही की चिडचिड करणं , रागे भरणं अशा क्रिया सहज प्रकट होतात. त्यामुळे पुढचा कार्यभाग बिघडतो. राग ही क्षणिक स्वरूपात व्यक्त होणारी आणि नकारात्मक विचाराकडे नेणारी सहज भाव क्रिया होय. ती अचानक प्रकटत असली तरी ती माणसाचा जीवन विषयक सकारात्मक दृष्टीकोनच बिघडवून टाकते. क्रोधामुळे मानसिक संतुलन बिघडतं, रागाच्या भरात माणूस अविचाराने वागतो. स्वभावात चिडखोरपणा वाढायला लागतो. माणून आतल्या आत गुदमरून स्वतःचे नुकसान करून घ्यायला लागतो. शक्तीक्षय होवून शारीरिक दुर्बलता ओढवून घेतो. क्रोधामुळे मित्र नातलग दुरावतात. साधू, सज्जन मात्र आपल्या चित्त प्रवृत्ती स्थिर ठेवतात. क्रोधाचा वाराही अंगाला लागू देत नाहीत. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद, समाधान कधीही कमी होत नाही. म्हणून माणसानं क्षमाशिलता, समंजसपणा व धैर्य अंगी धारण करून क्रोधाला दूर पिटाळायला शिकलं पाहिजे, एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 मुल घडवताना..........✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काही पालकांचा अपसमज असतो की, मी माझ्या मुलांना उच्चशिक्षित केले, म्हणजे मी माझ्या आयुष्यातील सर्व कर्तव्ये पार पाडली. मुले उच्चशिक्षित झाली आणि सुसंस्कारित झाली नाहीत, तर त्या उच्च शिक्षणाचा काय उपयोग ? हे शिक्षण घेऊन पदवीधर मुलांनाही आज स्वतःच्या उपजीविकेसाठी दारोदार भटकावे लागत आहे, तर असे शिक्षण हवे कशाला ? पण हे पालकांना कोण सांगणार ? मुलांनी शिक्षण घेऊन इतर सर्व करावे; परंतु 'साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करावे', असे पालकांना वाटत नाही. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ संपर्क _9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उपजीविका - Occupation* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरी सेवा* गंगेच्या काठी गुरु अभेंद्र यांचा आश्रम होता. एकदा देशात भीषण दुष्काळ पडला, गुरु अभेंद्र यांनी संकटग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या तीन शिष्यांना बोलावून घेतले. व सांगितले," अशा संकटाच्या वेळी आपण पीडितांची सेवा करायला पाहिजे. तुम्ही तिघे वेगवेगळे जावून उपाशी लोकांना अन्नदान करावे." यावर शिष्य म्हणाले,"गुरुजी! आपण इतक्या लोकांना भोजन कसे काय देवू शकतो? आपल्याजवळ न अन्नाचा साठा आहे ना अन्न खरेदी करण्यासाठी धन." तेंव्हा गुरु अभेंद्र यांनी त्या तिघांना एक थाळी देत म्हणाले," हि दिव्य थाळी आहे. या थाळीजवळ तुम्ही जितके अन्न मागाल तितके ती देईल. तिन्ही शिष्य ती थाळी घेवून निघाले. दोन शिष्य एका ठिकाणी बसले, तिथून जो कोणी जाईल त्याला भोजन देत असत. परंतु तिसरा शिष्य मात्र गप्प बसला नाही तर उपाशी लोकांना शोधून शोधून भोजन नेवून देत राहिला. काही दिवसांनी तिघेही जेंव्हा आश्रमात परतले तेव्हा गुरुनी तिसऱ्या शिष्याची खूप स्तुती केली. पहिल्या दोघांना याचे आश्चर्य वाटले. ते म्हणाले,"गुरुजी! दुष्काळपीडितांची सेवा तर आम्हीपण केली आहे. मग तुम्ही तिसऱ्या शिष्याची विशेष स्तुती का करता आहात?" गुरु म्हणाले," तुम्ही दोघेहि एका जागी बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अन्नदान करीत होता. असे केल्याने जे लोक तुमच्यापर्यंत पोहोचण्यास असमर्थ होते त्यांना तुमची सेवा मिळाली नाही. मात्र तिसऱ्याने लोकांना जागेवर जावून भोजन दिले त्याची सेवा किंवा मदत हि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे त्याची सेवा हि स्तुतीलायक आहे." *तात्पर्य- खरी सेवा तीच असते जी पुढे होवून केली जाते व सर्व लोकांपर्यंत पोहोचते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/12/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिवस* *ध्वज दिन* 💥 ठळक घडामोडी : १९८३ - स्पेनची राजधानी माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमाने एकमेकांवर आदळली. ९३ ठार. १९८८ - आर्मेनियात स्पिताक प्रांतात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. २५,००० ठार, १५,००० जखमी, ४,००,००० बेघर. 💥 जन्म :- १९०२ - जनार्दन नवले, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५७ - रोहन जयसेकरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९५९ - सलीम युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १२५४ - पोप इनोसंट चौथा. १२७९ - बॉलेस्लॉ पाचवा, पोलंडचा राजा. १६३२ - सिसिनॉस, इथियोपियाचा सम्राट. २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. २०१३ - विनय आपटे, मराठी कलाकार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *केंद्राच्या मानव संसाधन मंत्रालयाने देशभरातील शाळांना २२ भाषांचा भाषासंगम कार्यक्रम दिला आहे. जो २२ दिवस चालणार आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *उत्तरखंड- उत्तरकाशीमधील हार्सिल खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *निळवंडे धरणासाठी ५०० कोटी बिनव्याजी घेतल्यानंतर आता सीएम फंडासाठी साईबाबा संस्थाकडून ५० कोटी घेण्यास विधी विभागाची मान्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कोलकाता - भाजपाच्या रथ यात्रेला कोलकाता उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई हायकोर्टाचा केदारनाथ सिनेमाला हिरवा कंदिल; सिनेमाच्या रिलिजला स्थगिती देण्यास नकार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नाशिक : मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला पदभार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या पहिल्या मालिकेत भारताच्या ०९ बाद २५० धावा, चेतेश्वर पुजाराचे शतक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/3Nzbkey Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* * खालील ब्लॉगवर पहिला भाग वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विनय आपटे* विनय आपटे हे मराठी अभिनेते, नाट्यनिर्माते व दिग्दर्शक होते. मराठी नाटके, चित्रपट, दूरचित्रवाहिनी मालिका तसेच हिंदी चित्रपट व मालिकांमधून यांनी अभिनय केला. यांनी दिग्दर्शित केलेले मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक विषयावरून उठलेल्या वादंगांमुळे लक्षणीय ठरले. विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. नाटक, गजरा, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते.अनेक नवोदित कलावंतांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती. मी नथुराम बोलतोय या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या मित्राची गोष्ट अँन्टीगनी या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. मराठी वाहिनीवरून प्रसारित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट व दुर्वा मालिकेत त्यांनी काम केले होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) युगोस्लाव्हियात कोणते चलन वापरात आहे ?* दिनार *२) 'दास कॅपिटल' चे लेखक कोण ?* कार्ल मार्क्‍स *३) इंडोनेशियामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर कोणते ?* बांडुंग *४) 'प्रताप' हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत आहे ?* हिंदी *५) देशातील सर्वात उंचीवरील विमानतळ कोठे आहे ?* लेह *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● भीमाशंकर बच्चेवार ● धनंजय शंकर पाटील ● सुदीप दहिफळे ● साईनाथ जायेवाड ● मनोज मनूरकर ● साईनाथ बुडावार ● बाळासाहेब तांबे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ध्येय* ठेवायचं तर उच्च ध्येय ठेवा ध्येय प्राप्त होतं ते मनात रोवा मनात जे काही सुप्त रहातं एक दिवस नक्की ध्येय प्राप्त होतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समाजजीवनात गतिमानता वाढली. उद्योग, व्यवसाय, शिक्षण यानिमित्ताने कुटुंबातील अनेक सदस्य शहराकडे वळले. तसे कुटुंबाचे विभाजन अटळ ठरले. विभाजन फक्त कुटुंबाचे झाले नाही, तर ते घराचेही झाले. घराच्या घरपणाला घरघर लागली. शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी बाहेर पडलेली मुले नंतर घराकडे परतेनाशी झालीत. मुलं परत येतील, घरात पुन्हा आनंदाला उधाण येईल, या वेड्या आशेवर घराची दारे नेहमी उघडी ठेवून मुलांची वाट पाहिली जाऊ लागली. आई-वडिलांच्या या व्याकूळ भावनेची आंदोलनं टिपताना कवयित्री इंदिरा संत लिहितात..* *'सांज टळली तरीही* *दार लावावे वाटेना* *वळेल का कुणी मागे?* *डोळा वाटुली संपेना..'* *मुलांची वाट बघून थकलेल्या वयोवृद्ध आई-वडिलांना जाणीव होते की, मुलं आता परत येणार नाहीत. आता एकाकी जीवन जगणं भाग आहे. अशी मनाची समजूत घालून वृद्ध माता-पिता पुन्हा संसाराचा गाडा एकाकीपणे हाकण्यास तयार होतात. त्यांची ही एकाकी धडपड व्यक्त करताना कवयित्री पुढे म्हणतात..* *'संपावया हवी वाट* *लावायला हवा दिवा* *पोटासाटी मुकाट्याने* *हवा टाकायला तवा '* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कर्म फंद जग फांदिया, जप तप पूजा ध्यान जाहि शब्द ते मुक्ति होये, सो ना परा पहिचान। सारांश सारे जग शाश्वताचे पूजन , संवर्धन करावयाचे सोडून मिथ्या फसव्या गोष्टींच्या नादी लागते. हे जग सुंदर करणं. सत्कर्माच्या माध्यमातून सुंदर जग स्वर्ग तयार करायचा? का दुष्कर्म करून अंधःकार अज्ञानाच्या खाईत नरकातच खितपत पडायचं याचा विचार व्हायला हवा. विश्वात मृत्यू पश्चात स्वर्ग नरकाच्या कल्पना करणं, हे सारं थोतांड आहे. तरीही हे अज्ञानी जीव विश्वातल्या सत्य, सुंदर आणि शिवस्वरूप निसर्गाविष्काराला विसरून नको त्याच अस्तित्वातच नसलेल्या गोष्टीसाठी जप, तप, पूजा, अर्चा , ध्यानादि कर्मकांडे करीत राहातात. वागणं बोलणंच चांगलं नसेल तर जीवनात काय साध्य होणार आहे? धर्माच्या पांघरणाखाली कर्मठ आणि लादलेल्या वचन हट्टासाठी उर्मट वागून स्वर्ग प्राप्ती किवा निर्मिती होत नाही .त्यासाठी सहानुभूतीची कळवळ्याची गरज असते. क्षमावृत्ती अंगी असावी लागते. वाणीतून आपुलकीचे पाझर वाहताना दिसावे लागतात. कर्मामागील वर्मच कळलं नाही तर कसं चालणार बरं ! ज्या शब्दांच्यामुळे बुरसुटलेल्या चाली! रीती, रूढी, रिवाज, व परंपरापासून मुक्ती देण्याचं व मानव कल्याणचं सामर्थ्य ज्या शब्दात आहे. त्या शब्दांचा मंत्रोच्चार केला की नसलेली भीती व भय पार पळून जाईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी व्यक्ती आपल्या जीवनात सदैव आपापल्या कामात मग्न असते ती व्यक्ती कधीही आणि कसल्याही सुखाची अपेक्षा करीत नाही.आपल्या कामात जेव्हा मग्न असते तेव्हा ते काम करत असताना आपोआपच दु:ख विसरुन जाते आणि कामातच सुख मानते.परंतु जी व्यक्ती काहीच काम न करता केवळ सुखाची अपेक्षा करते ती व्यक्ती आपल्या जीवनात सुखी तर होऊच शकत नाही उलट दु:खात आपले जीवन टाकून चिंतेत पडते.काम करीत नसल्यामुळे फुकटची चिंता आणि काम करीत नसल्यामुळे जीवनात असमाधान यामुळे तो कधीही सुखी होणारच नाही. म्हणून सदैव माणसाने रिकामे न राहता सदैव आपल्या कामात मग्न राहावे आणि कामातच खरे सुख मानावे.हा सुखी जीवनाचा मूलमंत्र सदैव आचरणात आणावा. ©व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🌸🍃🌹🌸🍃🌹🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अपेक्षा - Expect* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सत्कर्माची गोड फळे.* एका गावात राम नि श्याम असे दोन कुबडे मित्र राहत होते. राम गरीब तर श्याम श्रीमंत होता. परंतु दोघात चांगली मैत्री होती. एके दिवशी राम श्यामला म्हणाला," मी कुठवर तुझ्यावर ओझे बनून राहू?" हे ऐकून श्याम म्हणाला," तू मला माझ्या कामात मदत कर, म्हणजे तुझ्या मनाला दोषी वाटणार नाही." दुसऱ्या दिवसापासून राम श्यामला कामात मदत करू लागला. काही दिवसांपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालले परंतु श्याम हळूहळू रामकडून जास्त काम करून घेवू लागला आणि त्याचा अपमानही करू लागला. त्याच्या ह्या वर्तनाने राम दु:खी झाला. रामने श्यामचे घर सोडले आणि जंगलात गेला. तेथे त्याची भेट एका साधुशी झाली. त्याची दु:खमय कथा ऐकून त्या साधूला त्याची दया आली, त्याने त्याच्या कुबदावरून मायेचा हात फिरविला आणि काय आश्चर्य ! रामचे कुबड नाहीसे झाले. त्याबरोबरच साधूने रामच्या हातात एक पिशवी दिली व सांगितले," हि पिशवी सत्कर्माची पिशवी आहे, ह्यात सोन्याचा मोहोरा आहेत. तू सत्कर्माने वागला आणि सत्कर्मासाठी जर यातील धन खर्च केले तर ह्या पिशवीतील धन कधीच नष्ट होणार नाही." राम गावी परत आला. त्याने सत्कर्मासाठी म्हणजे लोंकाच्या भल्यासाठी अनेक उत्तम कामे केली. त्यासाठी त्याने जितका पैसा खर्च केला तितका आजवर कोणीच केला नव्हता. हे पाहून श्यामच्या मनात असूया निर्माण झाली. त्याने राम ला हे सर्व कसे झाले हे विचारले. तेंव्हा रामने खरे ते सांगितले. श्याम जंगलात गेला व साधू महाराजांना आपले कुबड दाखवीत म्हणाला माझ्या मित्रासारखे मला नीट करून द्या व मलाही पैश्याची पिशवी द्या. श्यामचा हा स्वार्थी स्वभाव पाहून साधू महाराजांनी त्याला बरे तर केले नाहीच पण त्याला तेथून हाकलून दिले व सांगितले कि सत्कर्म करणाऱ्याला देव सहकार्य करतो.  *तात्पर्य - लोभ, मत्सर बाजूला ठेवून मन सत्कर्मात गुंतविले तर आपला भविष्यकाळ हा अतिशय चांगला असतो. सत्कर्माच्या वाटेने नेहमी चालले पाहिजे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/12/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महापरिनिर्वाण दिवस* 💥 ठळक घडामोडी : १९९२ - अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी बाबरी मशीद पाडली. 💥 जन्म :- १९१४ - सिरिल वॉशब्रूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९४६ - फ्रँक हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९५२ - रिक चार्ल्सवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू, राजकारणी, हॉकीपटू व मार्गदर्शक. १९७७ - फ्रेड फ्लिन्टॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ११८५ - आल्फोन्से पहिला, पोर्तुगाल, पोर्तुगालचा राजा. १९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानकार, कायदेमंत्री व अर्थतज्ज्ञ २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *हैदराबाद - तेलंगणामध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या, विधानसभेच्या 119 जागांसाठी उद्या शुक्रवार 7 डिसेंबर रोजी होणार मतदान.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नाशिक- महापालिका अग्निशमन दलाच्या सात जवानांना राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा शौर्यपदक राजभवनमध्ये समारंभपूर्वक प्रदान* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *रामजन्मभूमी सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी, सिनेमाचा ट्रेलर युट्युबवरुन हटविण्याचे आदेश, सेन्सॉरची परवानगी घेऊनच प्रदर्शित करा - कोर्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; जेडी(एस)च्या दोन, काँग्रेसच्या सहा आमदारांना मिळणार मंत्रिपद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांना पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *औरंगाबाद : पथकाद्वारे दुष्काळ परिस्थितीचे मुल्यमापन करून अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात येईल - केंद्रीय सहसचिव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अ‍ॅडिलेड : आजपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/9aHepSbKpS Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रासंगिक लेख *डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही* दैनिक लोकशाही वार्ता मध्ये प्रकाशित लेख http://epaper.lokshahivarta.in/epapermain.aspx आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. १९०७ साली तरूण भीमरावांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. १९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही बौद्ध धर्मातील उपाधी प्रदान केली. १९९० साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतीत उभी राहिली आहेत. जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ नेते, महापुरुषांमध्ये डॉ. आंबेडकरांचा उल्लेख होतो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) एनआयडीसीचे विस्तारित रूप काय ?* नॅशनल इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन *२) डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे स्थापन वर्ष कोणते ?* १८८० *३) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून श्री. राजेंद्रबाबू यांचा कार्यकाल कोणता ?* २ मे २००४ ते ३१ मे २००४ *४) तिसर्‍या पंचवार्षिक योजनेच्या काळात भारताच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान होते ?* इंदिरा गांधी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● डी आर भोसके ● राजेश पाटील उमरेकर ● माधव हलकुडे ● बाबासाहेब घागळे ● प्रा. मंगल सांगळे ● कैलास सोनकांबळे ● शंकर बोंबले ● अशोक हिंगणे ● दिलीप।विश्वांभर ● बालाजी गैनवार ● राजेश अम्पलवाड ● नरेश पांचाळ ● देवानंद मुरमुरे ● गोविंद चौरे पाटील ● विवेक क्षीरसागर ● दत्ता कासेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुख की दु:ख* सुख किंवा दुःखाची काळजी आपल्यावर असते काय भेटेल याची चिंता आपण जपल्यावर नसते सुखाची किंवा दुःखाची निवड आपणच करतो सारी सुखं सोडून आपण त्या दुःखालाच धरतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी जीवनात 'प्रेम' या भावनेला अनन्यसाधारण महत्व आहे. एखाद्याच्या वागण्या-बोलण्यात प्रेम नसेल, तर 'कोरडा रे कोरडा' असे म्हणून त्याला दुय्यम ठरविले जाते. प्रेम ही जीवनातील सर्वोच्च अवस्था असून त्याद्वारे जग जिंकता येते. शत्रूलाही मित्र बनवता येते. याच प्रेमाचे एक रूप भक्ती हे असून त्यामध्ये आपल्याला भारतातील सर्वच संतांचा समावेश करावा लागेल. या प्रेमाचाच उत्कट आणि उच्च अविष्कार जर भक्ती असेल, तर प्रेमदेखील आपल्याला शांती आणि मोक्ष मिळवून देण्याची पहिली पायरी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.* *या भक्तप्रेमाचे स्वरूप इतरांपेक्षा वेगळे असते. तो मागत नाही; पण काही लपवतही नाही. तो जे आहे ते स्वत:सहित उधळून टाकतो. म्हणजेच स्वत:ला तो पूर्णपणे भगवंताच्या ताब्यात देतो. मी अपात्र आहे, अशीच कायम भावना ठेवणे हे त्या प्रेमाचे खरे लक्षण असते. योग्यता नसताना मला आयुष्यात खूप काही मिळाले, अशी ज्याला जाणीव असते, तो भक्त भगवंताच्या कृपेचा खरा पाईक असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• यह तो घर है प्रेम का, उंचा अधिक ऐकांत सीस काटि पग तर धरै, तब पैठे कोई संत । सारांश : आत्मा जागृत असेल तर चैतन्याचा साक्षात्कार होतो. जीवंत शरीर म्हणजे आत्मालय होय. हे आत्मालय म्हणजे प्रेमालयच नव्हे का ! जिथे सर्वांप्रतीच्या जाणीवा दडलेल्या असतात . सर्वांसाठी प्रेमरसाची निर्मिती होवून ची हळूहळू कृतीतून वाहू लागते. जगातील सर्व घरांपेक्षा हे किमती घर आहे. स्वतःत डोकावून पाहाता याच्याठायी चिंतन व मननासाठी एकांतही आहे. या एकांताचा सदुपयोग करणार्‍याला सर्वांप्रति आपुलकी व प्रेम वाटू लागते. तसेच भव्यता व दिव्यता जिथेजिथे असेल तिथेतिथे नतमस्तक होण्याची वृत्ती अंगी बाणायला लागते. अशा वेळी संयम, शांती, कळवळा, सहानुभाव इ, विविध सद्गुणांच्या आविष्कारानं ते घर सर्वांना आवडू लागतं. त्या घरात वास्तव्य करणार्‍या जीवाचं वर्तनंच साक्षात्कारी ईश्वररूपी वाटू लागतं. तेव्हा कुण्या संतरूपाचा या घरामध्ये प्रवेश झालेला असतो. मनाच्या सर्व भावाभिव्यक्तीत प्रेमभावनेचा आविष्कार सर्वश्रेष्ठ आहे. प्रेमभावनेच्या ठायी वैषयिक विकाराची उत्पत्ती होता कामा नये. विकार वाढले की नैतिक अधःतनाकडे प्रवास सुरू होतो. धडपडताना पडलेल्याला सहज उभं राहाता येतं, परंतु सर्वांच्या नजरेतून पडलेल्याला उभं राहाणं कसं जमणार बरं ! म्हणून पडण्यापेक्षा घडण्यावर लक्ष केंद्रित झालं पाहिजे. प्रेम निखळ व निरपेक्ष असलं की त्यात शारदी पुनवेच्या चांदण्याचा भास होवू लागतो. निरामय प्रेमभावनेसाठी सर्वाधिक त्यागाची आवश्यकता असते. हे कायम जपलं पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 मुल घडवताना..........✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्यावर प्रेम केलं जातंय, आपण एका कुटुंबाचा भाग आहोत, आपणही काहीतरी अर्थपूर्ण करू शकतो आणि आपल्या जिज्ञासेला मोठ्यांकडून प्रोत्साहन दिलं जातं असं तुमच्या मुलाला वाटण्याजोगं वातावरण तयार करण्यात जर तुम्हाला यश आलं, तर मुलांच्या मेंदूचा योग्य विकास आपोआप होईल,” असे हार्वर्ड वैद्यकीय महाविद्यालयाचे पीटर गोर्स्की म्हणतात. “पालक म्हणून आपली भूमिका ही मेंदूतील जटिल प्रकिया घडवून आणण्याची नव्हे तर सुदृढ, समंजस व संवेदनशील मानवांचा विकास घडवून आणण्याकरता पोषक वातावरण निर्माण करण्याची आहे. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विश्वासघात - Betrayal* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विश्वासघातकी स्वभाव*   जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील." चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केले. तेंव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरु केली. शेतकरी म्हणाला मी तुला मुक्त केले हाच का सहकार्याचा मोबदला का?. चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, " हा एवढा मोठा चित्ता! वाऱ्याच्या वेगाने पळणारा! आणि हा एवढ्याश्या जाळीत कसा अडकून पडेल. तू खोटे बोलतो आहेस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवला हे खोटे आहे, हा संकटात फसू शकत नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव मग तू खरा का चित्ता ? हे पाहू." हे ऐकून चित्ताही घमेंडीत गेला तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला. त्याच क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, " अरे मित्रा आता तरी पळ! नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल ! *तात्पर्य - जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही. ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाहीत.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/12/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा* *जागतिक माती दिन* * 💥 ठळक घडामोडी : १९४५ - फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब. १९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला. 💥 जन्म :- १३७७ - ज्यान्वेन, चीनी सम्राट. १४४३ - पोप ज्युलियस दुसरा. 💥 मृत्यू :- १५६० - फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा. १७९१ - वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार. १९२६ - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार. २०१३ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मराठा आरक्षणासाठी स्थगित करण्यात आलेली मेगा भरती आता पुन्हा सुरू होणार, ७२ हजार पदांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात बोलतांना दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *स्टेट बँकेच्या एटीएममधून हवे तेवढे पैसे काढण्याची दिली मुभा मात्र त्यासाठी खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची अट.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *सरकारकडून शाळांमध्ये राबवल्या जाणार्‍या मध्यान्ह भोजन योजनेच्या देखरेखीत चालढकल करणार्‍या सहा राज्यांवर सुप्रीम कोर्टाने दिले दंडात्मक कारवाईचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण द्या, ओरिसाचे मुख्यमंत्री पटनाईक यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *10 डिसेंबरला दुपारी 11 वाजता सरकारनं बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक; पंतप्रधान नरेंद्र मोदीही राहणार उपस्थित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय संघातील सलामीचा फलंदाज गौतम गंभीरने घेतला क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/Lxhf0ZN5nS Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉक्टर देव की दानव* https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योगी अरविंद घोष* अरबिंदो ऊर्फ ( अरविंद) योगी अरविंद घोष हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि महायोगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्ज्ञ, आणि महाकवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता होते. केंब्रिजला शिकत असताना त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. अल्पावधीतच ते एक जहाल देशभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. ते स्वातंत्र्य चळवळीकडे ओढले गेले. त्यांनी वर्तमानपत्रात लेख लिहून आपली राजकीय मतेही मांडली. अल्पावधीतच ते हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्याच वर्षी त्यांनी मातरम् हे वृत्तपत्र सुरू केले. बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना,इंग्रज सरकारने त्यांना एका खटल्यात गोवले. त्यांना १९0७ मध्ये एका वर्षाची कैद झाली. त्यांना अलिपूर येथे कारावासात ठेवण्यात आले होते. मानवाची प्रगती आणि आध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसिद्ध झाले. त्यांनी कर्म, ज्ञान, आणि भक्ती यांच्या समन्वयावर आधारित ह्यपूर्णयोगाची मांडणी त्यांनी केली. माणूस हा उत्क्रांतीतील शेवटचा टप्पा नाही, त्यानंतर अतिमानसाचा उदय व्हायचा आहे; यासंबधीची तार्किक आणि तात्त्विक मांडणी त्यांनी केली आहे *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा, कृतघ्न होऊ नका *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) भारतात कोळशाचे किती टन सुप्त साठे उत्पादनक्षम आहेत ?* ६०००० दशलक्ष टन *२) ओडिशात औष्णिक वद्युत केंद्र कोठे आहे ?* तालचेर *३) दुसर्‍या पंचवार्षिक योजनेत वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रावर केलेला खर्च एकूण खर्चाच्या किती टक्के होता ?* २८ *४) कंबोडियात कोणतं चलन वापरात आहे ?* रियाल *५) संपूर्ण आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?* धारावी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्रीहरी अंभोरे, पत्रकार ● राजेश गटलावार ● साईनाथ कल्याणकर ● संतोष रामराव शिंदे ● अशोक चिंचलोड ● सूर्यकांत स्वामी ● राज डाकोरे ● प्रल्हाद गड्डपवार ● अविनाश सुभेदार ● योगेश पडोळे ● राजू अलमोड ● सुनील पांचाळ ● शंकर भंडारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कामापुरता मामा* कामापुरता मामा अन् ताकापुरती आजी असते काम होईपर्यंत ती कशात ही राजी असते काम झालं की लगेच राजीची नाराजी होते बोलकी आजी एकदम मुकी बहिरी आजी होते शरद ठाकर सेलू जि परभणी •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *मूल घडवताना....*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आर्थिक विचार, आर्थिक मूल्य, आर्थिक वर्तन आणि आर्थिक दृष्टिकोन ह्या साऱ्या बाबी पाल्य बहुतांशी पालकांकडे बघूनच शिकतात. त्यामुळे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पाल्याला अनुभव  मिळेल अशी संधी आणि वातावरण उपलब्ध करून देणे हे पालकाचे काम आहे. एक अनुभव हा शंभर उपदेशांपेक्षा श्रेष्ठ असतो. कोणत्याही गोष्टींचा आत्मविश्वास हा अनुभवातूनच येत असतो. म्हणून मुलांना प्रत्येक बाबीचे अनुभव द्यायला हवे. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   कबीर मन मिरतक भया, इंद्री अपने हाथ तो भी कबहु ना किजिये, कनक कामिनि साथ। सारांश महात्मा कबीर सांगतात की तुम्ही इच्छा व आसक्तिवर विजय मिळविलेला असेल. तुमचं मन निर्विकार असेल. विषयभोगी इंद्रियावर पूर्णपणे विजय मिळविला असेल. भौतिक बाबींचा प्रभाव पडून मनाचं विचलन होत नाही . अशी अवस्था जरी तुम्ही धारण केलेली असेल तरी तुम्ही धन आणि नारी संग टाळला पाहिजे. मनाची स्थिर अवस्था किती काळ राहिलं हे निश्चितपणे कोणी सांगू शकत नाही. जो पर्यंत मनावर संस्कार व सत्संगतीचा प्रभाव आहे. तो पर्यंत मनाचा तोल ढळणार नाही. धनाच्या ठायी चंचलता असते. ते भौतिक सुख व श्रीमंतीची स्वप्न दाखवायला लागतं. नारीच्या संगतीतही विषय विकार उत्पन्न होवू शकतात. मनाचं संतुलन राहील की नाही ? याची खात्री कशी देणार बरं ! म्हणून कबीर धनासोबत स्त्रीसंगही टाळण्याचा सल्ला देतात. संत तुकारामांनीही अभंगातून उपदेश करताना 'स्त्रीयांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणमृत्तिकेच्या । नाठवे हा देव न घडे भजन । लांचावले मन आवरेना ।।' असे म्हटले आहे. महान तपस्व्यांची दीर्घकालीन तपस्या नारी सहवासामुळे क्षणार्धात भंग पावल्याचे दाखले असताना सज्जनानं अशा बाबींची परीक्षा द्यायचा यत्न करण्यात सुद्धा जोखीम आहे. चारित्र्य निर्माण करण्यासाठी जीवनातली कित्येक वर्षे गेलेली असतात. एकदा का चारित्र्यावर शिंतोडे उडाले की ते धुण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते संशयाच्या भोवर्‍यातून आणि अफवांच्या लाटेतून सावरू म्हणता सावरता येत नाही. जवळचे, दुरचे सर्व जण उगीच संशयाने बघायला लागतात. म्हणून कनक आणि कामिनीपासून अंतर ठेवून राहिले तर बिघडतं कुठं ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा जरी अवगुण असेल तर तोच एखादा गुण त्याच्या जीवनाच्या अधोगतीकडे वाटचाल सुरु झाली आहे असे समजावे. पण त्याच व्यक्तीला त्या  अवगुणाला थांबवता आले तर नक्कीच समजावे की, त्याची हळूहळू यशस्वी जीवनाकडे वाटचाल सुरु आहे. जीवनात अवगुणाला शून्य महत्त्व देऊन त्याला जीवनातून हद्दपार करुन त्या ठिकाणी चांगल्या संस्कारक्षम गुणांची भरती करावी तरच जीवन समृद्ध बनेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धडपड - Trick* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नदी, मासा आणि युक्ती* एका नदीच्या तिरावर एक कोळी मासे पकडायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. त्याच्या मनात एक विचार आला आणि त्याने एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळी बराच वेळ विचारात पडला.त्यानंतर त्याला सूचले की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. कोळ्याची ही युक्ती कामी आली. तात्पर्य :- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते.काही बाबीसाठी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.आणि कमी वेळेत कार्य सार्थकी लागते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/12/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *भारतीय नौसेना दिन* 💥 ठळक घडामोडी : १८२९ - भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्‍यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला. १९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध) - भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली. १९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध)-ऑपरेशन ट्रायडेंट - भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला. 💥 जन्म :- १९१९ - इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान. १९४३ - फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक. 💥 मृत्यू :- १९७५ - हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका. १९८१ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज दोन दिवसांच्या अबूधाबी दौऱ्यासाठी रवाना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी अटक राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पैशांसाठी खासगी रुग्णालयांकडून सिझेरियन डिलेव्हरी- सर्व्हे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई - मराठा आरक्षणाविरुद्ध हायकोर्टात याचिका, अॅड. गुणवंत सदावर्तेंच्यावतीने याचिका दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *रिलायन्सच्या टीना अंबानी, वित्त मंत्री मुनगंटीवार, पंकजा मुंडे, डॉ. रणजित पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते कॅन्सर केअर हॉस्पिटलचे करण्यात आले उद्घाटन.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *चंद्रपूर : सर्वाधिक पासपोर्ट असलेला भारत देश जगात तिसरा. लवकरच पहिल्या क्रमांकावर येईल- हंसराज अहिर. चंद्रपूर येथे पासपोर्टचे 238 वे पासपोर्ट केंद्र सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विश्वचषक हॉकी स्पर्धा : स्पेनने फ्रान्सविरुद्ध पुरुष विश्वचषक हॉकीच्या अ गटातील सामना १-१ असा ड्रॉ केला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/jRy75Aw Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बालविवाह* https://nasayeotikar.blogspot.com/2017/05/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आर व्यंकटरमण* रामास्वामी व्यंकटरमण हे भारताचे आठवे राष्ट्रपती होते. ते १९८७ ते ९२ दरम्यान या सर्वोच्च पदावर राहिले. व्यंकटरमण यांचा जन्म तामिळनाडूमधील तंजौरनजीकच्या पट्टकोट्ट या गावात झाला. त्यांचे बहुतांश शिक्षण मद्रास येथे झाले. मद्रास विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी घेतली. नंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वकिली केली. वकिली करत असतानाच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढय़ातही सहभाग घेतला हेाता. भारत छोडो आंदोलनात ते सक्रिय होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांची योग्यता पाहून भारत सरकारने त्यांना देशाच्या सर्वोत्कृष्ट वकिलांमध्ये स्थान दिले. विद्यार्थी राजकारणात सक्रिय असल्याने ते लवकरच राजकारणात आले. १९५२ ते ५७ दरम्यान ते देशाच्या पहिल्या संसदेचे सदस्य राहिले. १९५३ ते ५४ दरम्यान त्यांनी काँग्रेसचे सचिव म्हणूनही काम पाहिले. खासदार असूनही त्यांनी लोकसभेचा राजीनामा देऊन तामिळनाडू सरकारमध्ये मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. १९६७ मध्ये ते योजना आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले. लोकसभेत तर त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणूनही काम पाहिले. इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केले. नंतर त्यांना संरक्षण खाते सोपविण्यात आले. ऑगस्ट १९८४ मध्ये ते देशाचे उपराष्ट्रपती झाले आणि २५ जुलै १९८७ रोजी त्यांनी देशाचे आठवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *१) पेट्रोलियम तेलाचे सुप्त साठे कोणत्या खडकात आढळतात ?* स्तरित खडकात *२) दामोदर खोरे योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात हाती घेण्यात आली ?*  पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात *३) रोहा ते मंगलोर दरम्यान रेल्वे कधी सुरू झाली ?* २६ जानेवारी १९९८ *४) ग्रीसमध्ये कोणती शासनपद्धती अस्तित्वात आहे ?* अध्यक्षीय शासन पद्धती *५) 'तफसीर-ए-गालिब' चे लेखक कोण ?* ग्यानचंद जैन. *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● नागनाथ चेटलूरे, कुंडलवाडी ●  उमाकांत शिंदे ●  वैशाली बाळासाहेब भामरे ●  शेख आलीम ●  प्रभू अण्णा *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दु:ख* अबोल माणूस जेव्हा कुठं बोलकं होतं व्यक्त झालं म्हणजे दुःख हलकं होतं व्यक्त व्हायला हक्काची जागा असावी लागते दुःखी माणसाला यापेक्षा आणखी काय लागते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••a *खरंच, काही 'उपकार' असे असतात, की त्यांची परतफेड होऊ शकत नाही. काही 'उपकार' सदैव स्मरणात ठेवायचे असतात व कोणतेच 'उपकार' विसरायचे नसतात. अलिकडे कृतज्ञतेची जाणिव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे ? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देऊन बाजूला केलं जातं. यालाच जगरहाटी म्हणण्याची हिणकसता ब-याचवेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.* *माझ्यावर झालेले माझ्या माता-पित्यांचे, गुरूंचे, व्यक्तिगत वाटचाल करीत असताना सभोवतीच्या असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांचे 'उपकार' हे माझ्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले 'माणूसपण' जिवंत ठेवणे होय. या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. 'उपकार' फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल ?* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      शीलवंत सबसे बड़ा, सब रत्नन की खान । तीन लोक की संपदा, रही शील में आन।। सारांश- महात्मा कबीर म्हणतात "शीलवान किवा संतुष्ट व्यक्ती जगात सर्वात श्रेष्ठ आहे. शीलवान माणसे रत्ना-मानकांच्या तुलनेत चांगली मानली जातात. ज्या व्यक्तिंच्या अंतरात शालीनता वास्तव्य करते ती व्यक्ती विश्वात श्रेष्ठत्वाला पात्र ठरते . चंद्राची शितलता ,सुर्याची तेजस्वीता सागराची विशालता सज्जनाने अंगी धारण केलेली असते. सर्वावर ते कैवल्याचं चांदणं शिंपित असतात. प्रसंगी प्रखरपणे शिष्य व सोबत्याला परिणामांची जाणीव करून देत असतात. खळ कितीही वाकडा वागला तरी त्याचं वाकडेपण निघुन जावं . अशीच प्रार्थना विशाल हृदयानं ते विधात्याकडं करीत असतात. शीलवंत सज्जन खरं तर रत्नांच्या म्हणजेच सद्गुणांच्या खाणीच असतात . शील म्हणजे विशुध्दीचामार्ग आत्मशुद्धीकरणाचा मार्ग. या विशुधीमार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे आहेत, ज्याला पंचशील म्हणतात. १) कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे, २) चोरी न करणे, ३) व्यभिचार न करणे, ४) खोटे न बोलणे व ५) मादक पदार्थाचे सेवन न करणे. अश प्रकारच्या श्रेष्ठ आचरणापुढे कोणतीही भौतिक वस्तू कितीही मोलाची असौ. ती फिकीच वाटायला लागते ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपल्या दैनंदिन जीवनात काय केले आहे हे आपण जिथे नोंद करुन ठेवलेली असते.त्यात काल,आज आणि उद्या या तिन्ही काळाचा उलगडा केलेला असतो.आपण आपल्या जीवनात कसे वागलो आहोत त्याचीही नोंद केलेली असते.कधी आपल्याला विस्मरण झालेले असेल तर ते स्मरण करुन देण्याचे काम ती करते.आपण किती खरेखोटे जीवनात इतरांशी बोललो किंवा वागलो त्याचाही हिशोब ती आपणच नोंदवलेल्या शब्दांत आपल्यासमोर आरशासारखे काम करते.ती एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली असते.तिला आपण कधीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरु शकत नाही.एवढे प्रेम ती आपल्यावर करते आणि आपण तिच्यावर करतो.ती आपल्याला आपल्या जीवनात सतत प्रेरणा देते आणि आपल्या जीवनाला तिला पाहून, वाचून सावरतो अशी प्राणप्रिय वस्तू म्हणजे डायरी अर्थात आपली रोजनिशी.जी माणसे जीवनात खरे यशस्वी होतात ती आपल्या जीवनात घडलेल्या, घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या घटनांची सत्यतेची नोंद करतात आणि त्यासाठी ती डायरी अत्यंत मोलाचे काम करते.तीच आपल्यासाठी कोणत्याही काळात न बदलणारी,सत्य उलगडून आपल्यातील दोष दूर करण्यासाठी जाणीव करून देणारी खरी मैत्रीण असते ती आपल्या जीवनात असायलाच हवी नाहीतर आपल्या जीवनातले दुसरे कोणीही एवढे काम करणार नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 📚📝📚📝📚📝📚📝📚📝📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धूर्त - Sly* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धूर्त कोल्हा* एका शेतकर्‍याच्या शेतावर एक कुत्रा व एक कोंबडा राहत होते. एके दिवशी कुत्रा कोंबड्याला म्हणाला, ''एकाच ठिकाणी राहून फार कंटाळा आला आहे. आपण सहलीला जाऊन येऊ या का?'' कोंबड्याने होकारार्थी मान हलवली. दुसर्‍या दिवशी मालकाचा डोळा चुकवून ते दोघे सहलीला निघाले. त्यांनी सोबत काही मांसल हाडे व कुरकुरीत बिया खाण्यासाठी नेल्या. जंगलात दिवसभर सहलीचा आनंद लुटल्यावर रात्र पडल्यानंतर त्यांनी एका डेरेदार वृक्षाचा आसरा घेतला. वृक्षाच्या ढोलीत कुत्रा झोपला तर कोंबडा उंच फांदीवर आराम करू लागला. जेव्हा पहाट झाली तेव्हा कोंबड्याने सवयीप्रमाणे बांग दिली. कोंबड्याच्या बांगेने जवळ राहणार्‍या कोल्हय़ाला जाग आली. मजेदार मेजवानीच्या आशेने त्याच्या तोंडातून लाळ टपकू लागली. तो त्या वृक्षाजवळ आला व कोंबड्याला म्हणाला, ''नमस्कार महाशय, जंगलात तुमचे हार्दिक स्वागत आहे. येथे एकटा राहून मलाही कंटाळा आला होता. बरे झाले तुमची सोबत मिळाली.'' चतुर कोंबड्याने कोल्हय़ाच्या या खोट्या प्रशंसेमागील कावा ओळखला व तो म्हणाला,  '' तुम्हाला भेटून मलाही आनंद झाला, तुम्ही या वृक्षाच्या ढोलीकडे जा. तेथे माझा दारवान तुमचे स्वागत करायला तयार आहे.'' कोल्हय़ाला काही संशय आला नाही. तो ढोलीकडे गेला. तेथे स्वागत करायला उभा असलेला कुत्रा पाहून कोल्हय़ाला घाम फुटला व तो तडक तेथून पसार झाला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/12/2018 सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक दिव्यांग दिन* 💥 ठळक घडामोडी : १९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. २००९ - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार. 💥 जन्म :- १८८४ - डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती. १९६३ - ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ११५४ - पोप अनास्तासियस चौथा. १७६५ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९१२ - प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *देशातील दहशतवादाशी संबंधित घटनांचे धागेदोरे हैदराबादपर्यंत पोहोचतात - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नाशिक : समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *शिर्डी : निळवंडे कालव्यासाठी शिर्डी संस्थांनकडून राज्य सरकारला ५०० कोटी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पालघरमध्ये पुन्हा एकदा जाणवले भूकंपाचे धक्के. वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *काँग्रेस मध्य प्रदेशात 126 ते 132 जागा जिंकेल- काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे मत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे मॅरेथॉनच्या मुख्य शर्यतीत इथियोपियाचा एटलाओ डेबिड विजेता, गतविजेता इथिओपियाच्याच गुजशू बेशा याचे उपविजेतेपदावर समाधान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताने रविवारी पुरुष हॉकी विश्वचषकात पूल सीच्या लढतीत शानदार खेळ करताना आॅलिम्पिक रौप्यपदकविजेत्या बेल्जियमला २-२ असे बरोबरीत रोखले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/ZQ9GXWR Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धार्मिक स्थळी मोबाईल बंदी का ?* https://nasayeotikar.blogspot.com/2018/11/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. राजेंद्र प्रसाद* डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतात (आजचा बिहार) जेरादेई येथे झाला. त्यांचे वडील महादेव हे एक कायस्थ हिंदू होते. ते संस्कृत आणि पर्शियन भाषेचे विद्वान होते. कॉंग्रेसशी प्रसाद यांचा पहिला संपर्क १९0६ मध्ये कोलकाता येथे आयोजित अधिवेशनात आला होता. औपचारिकरित्या, त्यांनी १९११ मध्ये जेव्हा कोलकाता येथे वार्षिक अधिवेशन पुन्हा झाले तेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९१६ साली काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनात ते महात्मा गांधी यांना भेटले. चंपारण येथील एका शोधनिबंध कार्यादरम्यान, महात्मा गांधींनी प्रसाद यांना आपल्या स्वयंसेवकांसोबत येण्यास सांगितले. प्रसाद गांधीजींचे सर्मपण, धैर्य व दृढ विश्‍वास बघून एवढे भारावून गेले की त्यांनी असहकार आंदोलन जाहीर होताच आपल्या वकिलीला रामराम ठोकला व स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले. राजेंद्रप्रसाद यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५0 रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. १९५0 ते १९६२ या काळात त्यांनी राष्ट्रपतीपद भूषविले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) योजना आयोगाची स्थापना कधी झाली ?* १९५० *२) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी पार पडली ?* ९ डिसेंबर १९४६ *३) नगदी पिकांच्या किमान आधारभूत किमतीच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची असते ?* नाफेड *४) गंगोत्री नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ?* उत्तराखंड *५) हैदराबादमध्ये चारमिनार कोणी बांधले ?* कुली कुतुबशाह *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  अनुराधा श्यामसुंदर माडेवार ●  शिवाजी कल्याणकर ●  विलास रोंटे ●  साईप्रसाद पुलकंठवार ●  जयदीप केराई किशन ●  ए समद शेख ●  निहार रेड्डी ●  रघुनाथ टेकुलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *देव* संकटात वाटते प्रत्येकाला भेव संकट आले की आठवतो देव अडचणीत आठवतो देवाचाच मुद्दा काम झालं की कोणी विचारत नाही सुध्दा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.* *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही, त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."* •• ●‼ *रामकृष्णहरी* ‼● •• 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नागिन के तो दोये फन, नारी के फन बीस जाका डसा ना फिर जीये, मरि है बिसबा बीस। सारांश महात्मा कबीर व्यभिचारी व दुराचारी स्त्री-लंपटाना वरील दोह्यातून सचेत करतात. सापिनीला तर केवळ दोनच दात असतात. तिचा दंश झाला तर वैद्याकडून विष उतरवून टाकता येईल. परंतु स्त्रिला वीस दात असतात. तिचा दंश ज्याला झाला त्यातला कोणीही जीवित सुरक्षित राहू शकत नाही. तिचा दंश जर वीस लोकांना झाला तर वीसचे वीस मरून जातील. काम भावना सीमित असली पाहिजे. तिचं संतुलन राखता आलं पाहिजे. काम भावनेचं संतुलन बिघडलं की ती माणसाच्या आवाक्यात राहात नाही. ती त्याला मन मानेल तशी नाचवते. परिणाम स्वरूप माणूस अधःपतित होतो. लोक लज्जेचा , हेटाळणीचा विषय होतो. मग ती ईश्वरांची रूप मानलेली पात्र असोत की सामान्य जण साबुत राहात नाहीत. शंकर , इंद्र, चंद्र, रावणाचे चारित्र्य या माया मोहिणीने डागाळून टाकले. तिथं सामान्यांची काय बात घेऊन बसला आहात. यावर चांगदेवांच्या पुढील ओळी फारच बोलक्या आहेत. वासनेच्या मागे नको धावू मना पहा त्या रावणा काय झाले चंद्रा पडली भगे इंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा अगदी अलीकडे समाजानं ज्यांना डोक्यावर घेतलं होतं अशा संत म्हणवून घेणार्‍यांनी स्व-संतुलन हरवून वासनेच्या आहारी जावून आज ते गजाआड दुर्दशेचे भोग भोगत आहेत. भल्या भल्यांची मायेनं अशी वासलात लावून टाकलीय. मात्र ज्यांनी स्वतः वरील नियंत्रण ढळू दिलं नाही. अशी पात्रंही कमी नाहीत की जी अनुकरणास पात्र ठरलीत. शुक, भीष्म हे निश्चयाचे महामेरूच होते. जगद्गुरू तुकोबारायही माया मोहात गुरफटलेल्या जीवांना पाहून हताश होवून म्हणतात बुडती हे जण न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणोनिया । तेव्हा माणसानं आपण अवहेलनेचे धनी होणार नाहीत . याची जाणीव ठेवून वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. तुकोबांनी सांगितलेलं 'पराविया नारी माऊली समान...' हे सुत्र कायम जपलं जपायला हवं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे विद्यार्थीजीवनात विद्यार्थी मन लावून जिद्दीने आणि अभ्यासात सातत्य ठेवून परीक्षेत यश मिळवतो.त्याचप्रमाणे माणसाने जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगावर विजय मिळवायचा असेल तर आपल्या मनाची तयारी,त्यासाठी लागणारी मनातून जिद्द आणि यश मिळेपर्यंत सातत्य ठेवायला हवे.समजा पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी झाले तर तिथेच माघार न घेता आपण त्यात कुठे कमी पडलो याचा शोध घेऊन त्यात सुधारणा करण्याची तयारी करावी आणि आपले मन खचू न देता तेवढ्याच जोमाने तोंड देण्यासाठी सज्ज रहावे मग तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मग तुमच्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असला तरी तुम्ही माघार घेणार नाहीत. ©व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काळजी - Care* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कक्षीवानाचे कोडे* एकदा कक्षीवान ऋषी प्रियमेध नावाच्या ऋषीकडे गेला व म्हणाला, ''प्रियमेधा, माझे एक कोडे सोडव पाहू. अशी कोणती वस्तू आहे, की जी पेटविली तरी तिचा प्रकाश पडत नाही ?'' प्रियमेधाने खूप डोके खाजवले पण ह्याचा त्याला उलगडा होईना. कोणतीही वस्तू पेटली, की तिचा थोडा तरी प्रकाश पडणारच. तेव्हा तो म्हणाला, ''हय़ाचे उत्तर मला देत येत नाही. पण माझ्या वंशात पुढे कोणीतरी विद्वान निपजेल आणि तो तुला ह्याचे उत्तर देईल.'' कक्षीवान ऋषीजवळ एक मुंगसाच्या कातड्याची भली मोठी पिशवी होती. त्या पिशवीत प्रियंगू (पिंपळी), तांदूळ आणि अधिकता नावाचे धान्य भरले होते. तीतून एक एक दाणा काढून तो दरवर्षी फेकून देत असे. ते सर्व दाणे संपेपर्यंत त्याला आयुष्य दिलेले होते. पण प्रियमेधाला काही इतके आयुष्य नव्हते. तो मेल्यावर त्याचा मुलगा त्याच्या जागी आला व तोही पुढे म्हातारा होऊन मरण पावला. अशा रीतीने प्रियमेधानंतर नवव्या पिढीत साकमश्‍व जन्मला. पण कक्षीवान मात्र अजूनही आपली पिशवी घेऊन बसलाच होता. तो जवळजवळ ९00 वर्षांचा म्हातारा झाला होता. अजून त्याचे कोडे कोणाला सुटले नव्हते. साकमश्‍वाला ह्या कोड्याचे वेडच लागले. त्याने निश्‍चय केला, की मी हे कोडे जिंकीनच. त्यावेळी त्याला एक 'साम' सुचले. त्याने ते गाणे म्हटल्याबरोबर त्याला ते कोडे सुटले.  तेव्हा मोठय़ा आनंदाने तो तडक कक्षीवानाकडे धावत गेला. कक्षीवानाने त्याला दुरून धावत येताना पाहिले तेव्हा त्याच्या येण्याचे कारण त्याने ताडले. तो म्हणाला, ''अरे, माझी ही पिशवी नदीत बुडून टाका. माझे कोडे सोडवून मला खाली पाहावयास लावणारा माणूस हा पाहा मला दिसतो आहे. आता काय कारायचे मला जगून?'' साकमश्‍व कक्षीवानाजवळ आला व म्हणाला, जो मनुष्य नुसती ऋचा म्हणतो आणि 'साम' म्हणत नाही तो कवी अग्नीसारखा चेततो पण त्याचा प्रकाश पडत नाही. पण जो 'ऋचा' म्हणतो आणि लगेच 'साम' ही गातो तो कवी अग्नीसारखा चेततो आणि त्याचा प्रकाश पडतो. साकमश्‍वाला जेव्हा 'साम' स्फुरले व त्याने ते म्हटले तेव्हा त्याला 'सामा'चे तेज कळून चुकले. संगीताची जोड दिल्याखेरीज नुसते मंत्र पाठ करण्यात अर्थ नाही हे त्याने शोधून काढले. साकमश्‍व पुढे म्हणाला, ''हे तुला माझे उत्तर आहे. माझ्या बापाचेही हेच उत्तर आहे.'' असे म्हणून थेट प्रियमेधापर्यंत सर्व पूर्वजांची त्याने नावे घेतली आणि आपल्या पूर्वजांचा कलंक धुऊन टाकला. तेव्हापासून यज्ञात ऋग्वेदातील ऋचांबरोबर सामवेदांतील सामेही म्हटली जाऊ लागली आणि काव्याला संगीताची जोड मिळाली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

! 🌈 *भाषा संगम* 🌈 """""""""""""""""""""""""""""""""""""""""" *भाषा संगम दिनांक 30/11/2018 उपक्रम कन्नड भाषा* *संवाद* नमस्कारा ! निम्म हेसरु एनु ? नन्न हेसरू लक्ष्मी । नीवु हेगिद्दीरि ? नानु चेन्नागिद्देने । परिपाठामध्ये संवाद घेऊन एक मिनिटाचे video. 〰〰〰〰〰〰〰 प्रमिला सेनकुडे (स.शि.) 🙏🙏🙏🙏🙏