✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/11/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५६ - कर्नाटक(राजमुद्रा दाखवली आहे), केरळ व आंध्र प्रदेश राज्यांची रचना 💥 जन्म :- १८८८: चित्रकार, नेपथ्यकार, रंगभूमिविषयक ग्रंथांचे  लेखक पुरुषोत्तम श्रीपत काळे १९१८ - शरद तळवलकर, मराठी चित्रपट अभिनेते १९२६: संगीत दिग्दर्शक यशवंत देव १९४५: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर १९७३ - ऐश्वर्या राय, भारतीय अभिनेत्री १९७४ - व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, भारतीय क्रिकेट खेळाडू १९८७ - इलिआना डिक्रुझ, भारतीय अभिनेत्री 💥 मृत्यू :- १७०० - कार्लोस दुसरा, स्पेनचा राजा १८९४ - अलेक्झांडर तिसरा, रशियाचा झार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - राज्य सरकारने 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून 112 तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचेही सरकारने आपल्या परिपत्रकात म्हटले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - 16 ते 26 नोव्हेंबरदरम्यान काढणार मराठा संवाद यात्रा, 26 नोव्हेंबरला अधिवेशनावर देणार धडक, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या बैठकीत निर्णय* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *जागतिक बँकेच्या २०१७ सालच्या ईझ ऑफ डुईंग बिझनेस रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक २३ अंकांनी वधारून ७७ वर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नाशिक : मराठावाड्याला अखेर आज मिळणार पाणी ; नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणातून सकाळी दहा वाजता पाण्याचा होणार विसर्ग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. हेमंत देशमुख यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *फटाके फोडण्यासाठी दक्षिण भारतातील वेळ निश्चित. सकाळी 4 ते 5 व रात्री 9 ते 10 वाजेदरम्यान फटाके फोडता येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/xZN3CdlEtR Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रतिलिपि या वेब पोर्टलवर वाचा "हाताची जादू ओळखणारा शिक्षक" दिवाळी अंकात प्रकाशित कथा https://marathi.pratilipi.com/story/ChAhzBia2opi?utm_source=android&utm_campaign=content_share आपले अभिप्राय जरूर द्यावे. अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नरेंद्र दाभोळकर* नरेंद्र अच्युत दाभोळकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधर्शद्धांच्या निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते. नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण सातार्‍यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या १९८२ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधर्शद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २00६पासून मृत्यूपर्यंत संपादक होते. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या काठी बरीच तीर्थक्षेत्रे आहेत ?*  कृष्णा *२) बेल्जियमची राजधानी कोणती ?* ब्रुसेल्स *३) केरळमध्ये अवकाशयान प्रक्षेपण केंद्र कोठे आहे ?* थुंबा *४) 'फॅमिली लाईफ' या पुस्तकाचे लेखक कोण ?* अखिल शर्मा *५) ओडिशाची उपराजधानी कोणती ?* पुरी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  संजय कांबळे, माहूर ●  प्रशांत सुरवसे ●  संतोष चाटोरीकर, उमरी ●  लक्ष्मीकांत बामणीकर ●  राजेश खरबाळे ●  सूर्यकांत राखोंडे, धर्माबाद ●  ऋषिकेश मंदेवाड ●  राहुल संत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अहंकार* रावणाला सोन्याची लंका पुरली नाही दिग्गज साम्राज्याची वीट उरली नाही वृथा अहंकार झाल्यास काहीच पुरत नसते चालता बोलता माणूस अचानक मरत असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मुंबईतच प्रवास करीत असताना रिक्षा सिग्नलला थांबली. बाजूच्या रिक्षात एक बोकड शांतपणे बसला होता. त्याच्या शेजारचा माणूस निर्विकार होता. 'विश्वासघात' हा असाच शांतपणे बसलेला असतो. समोरच्याला कल्पना नसते, आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे. बोकडाला काय माहीत? आपला कर्दनकाळच आपल्या शेजारी बसला आहे.* *आयुष्यातही अनेकदा असेच घडते. आपल्या आजूबाजूला शांतपणे वावरणारी माणसेच आपल्याला अडचणीत आणत असतात. विश्वासघात, फसवणूक, खोटे बोलणे या सगळ्या गोष्टी अनेकजण सराईतपणे करत असतात. ठेच लागल्यावर आपल्याला कळते, कुणामुळे जखम झाली आहे. राजकारणात, समाजात, व्यक्तिगत आयुष्यातही सर्रासपणे असे घडते. माणूस हतबल होतो, अनेकदा माणसे त्यातून सावरत नाहीत. "अशावेळी शांतपणे आपली मनोवृत्ती स्थिर ठेवणे गरजेचे असतं."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 49* संत ना छाडै संतई, कोटिक मिले असंत । चन्दन विष व्यापत नहीं, लिपटत रहत भुजंग । अर्थ : भला माणूस कधीही आपल्या पदाला व नावाला बट्टा लागू देत नाही. तो सरळ मार्गी असतो. त्याला भलं बुरं कळत असतं ! आपण ज्या पदावर आहोत त्या पदाचा सतत नावलौकिक वाढवण्याची त्याची धडपड असते. जो काही मान सन्मान मिळालाय व जगणंही सुकर व्हायला मदत झालीय ती विद्यमान पदानंच मदत केलीय .याचं स्मरण त्याला सदैव असतं. त्पा पदामुळेच तर आपणास सर्वजण ओळखतात . याचं नित स्मरण करीत हसत मुखानं उल्हसितपणे आपल्या कर्तव्य मार्गावर भला माणूस अग्रेसर असतो. त्याच्या संगतीत वाईट व दुष्ट माणसे आली तरी त्यांच्या सान्निध्याचा तिळमात्र प्रभाव सज्जन स्वतःवर पडू देत नाहीत. संत दुर्जनाला आपल्या संंगतीतून दूर करीत नाहीत तर 'दुर्जनातले दुर्गुण कसे कमी करता येतील ? या विचाराने ते वावरत असतात. सज्जनाचे गुण वैशिष्ट्ये सांगताना महात्मा कबीर म्हणतात की, खरे संत कितीही अडचणीत जगतील परंतु ते संत पदाला साजेसंच वागतील . त्याला कधीही बदनाम होवू देणार नाहीत. जसे चंदन वृक्षाच्पा शितल छायेमुळे व त्याच्या सुगंधित संगतीमुळं पक्षी, फुलपाखरे चंदनाच्या झाडावर बसतात तसे विषधारी सापही चंदनाला विळखा घालून बसतात. चंदन त्यांना दूर सारत नाही तर काही काळ का होईना, त्यांना आपल्या सुगंधी जगण्यानं मुग्ध करून त्यांच्यातला विषारीपणा विसरायला लावतो. संतांचही जगणं चंदणासारखंच असतं . त्यांचे ठायी कधीही आप परभाव उत्पन्न होऊ देत नाहीत. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या ठिकाणी प्रेम,आपुलकी, जिव्हाळा,मोठ्यांचा आदर, एकोपा, एकमेकांचे सुखदुःखाचे भागीदार, प्रामाणिकपणा, अतिथींचे स्वागत, घरातील स्त्रियांना दिले जाणारे प्रेम आणि तिच्या भावना ओळखून तिला दिला जाणारा आदर, शांती, समाधान, ईश्वराप्रती श्रद्धा, आरोग्यसंपन्न जीवन आणि त्याला हवी असणारी स्वच्छता ह्या सा-या गोष्टींचा जिथे समावेश आहे तिथल्या वास्तूला ख-या घराची उपमा दिली जाते.अशा ठिकाणालाच खरे घर म्हणून समजले जाते आणि अशाच घरात सदैव शांती, समाधान आणि ऐश्वर्य नांदत असते. जेथे अशा गोष्टींचा अभाव असेल, केवळ चार भिंती आहेत,वर छत आहे पण समाधान नाही, शांती नाही, सदैव कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद होत राहतात, एकमेकांमध्ये ऐक्याची भावना नाही,एकत्र असून अबोला असतो अशा विसंगत असलेल्या वातावरणाला घर म्हणता येत नाही. म्हणून खरेच घर म्हणायचे असेल किंवा बनवायचे असेल तर ह्या वरील सर्व गोष्टींना घरातल्या प्रत्येक सदस्याने प्रयत्न करायलाच हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद....९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏠🏘🏡🏠🏘🏡🏠🏘🏡🏠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अडचण - difficulty* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरी आई कि खोटी आई* एका आठ वर्षाच्‍या मुलाची आई देवाघरी जाते. मुलाच्‍या संगोपनात काही अडचण येऊ नये म्‍हणून वडील दुसरे लग्‍न करून त्‍या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात. एक महिन्‍यानंतर वडील मुलाला विचारतात,''बेटा, तुला ही नवीन आई कशी काय वाटते?तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे?'' यावर मुलगा उत्तर देतो,'' बाबा, ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती.'' हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील संभ्रमात पडतात. त्‍यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे? म्‍हणून पुन्‍हा त्‍या मुलाला विचारतात,'' अरे तुला असे का वाटते ते मला सांग? जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले, प्रसुतीवेदना सहन करून जन्‍म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते?'' मुलगा म्‍हणतो,'' बाबा, मी खूप खोडकर आहे हे तुम्‍हाला माहितीच आहे. देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असे म्‍हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे. पण ती मात्र मला जेवण देण्‍यासाठी उन्‍हातान्‍हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळप्रसंगी रागवून, मारून घरी आणत असे व मला स्‍वत:च्‍या मांडीवर बसवून खाऊपिऊ घालत असे आणि ही नवीन आईही पण '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असेच म्‍हणते आणि खरं सांगू का बाबा तुम्‍हाला? गेल्‍या तीन दिवसात खरेच तिने मला खायला दिलेले नाही. म्‍हणूनच मी तिला खरी आई असे म्‍हणत आहे.'' तात्‍पर्य :- आपली आई ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/10/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *राष्ट्रीय एकता दिन*             💥 ठळक घडामोडी :- १८७६ - भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार १८८० - बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतलचा पुणे येथे पहिला प्रयोग १९२० - भारतातील सर्वांत जुनी कामगार संघटना आयटक(ऑल इंडिया ट्रेड य़ुनियन काँग्रेस)ची स्थापना १९८४ - भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीची आपल्याच अंगरक्षकांकडून हत्या 💥 जन्म :- १८७५ - सरदार वल्लभभाई पटेल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, उप-पंतप्रधान १८९५ - सी. के. नायडू, भारतीय क्रिकेट खेळाडू १९२६ - एच.आर.एफ़. कीटिंग, मुंबई शहर ही पार्श्वभूमी असलेल्या रहस्यकथा लिहिणारा इंग्रजी लेखक १९४६ - रामनाथ परकार, भारतीय क्रिकेट खेळाडू 💥 मृत्यू :- १९७५ - सचिन देव बर्मन संगीतकार १९८४ - इंदिरा गांधी, भारतीय पहिली महिला पंतप्रधान १९९९ - डॉ.भय्यासाहेब ओंकार वास्तव शैलीत चित्रे काढणारे मराठी चित्रकार २००५ - अमृता प्रीतम, ज्ञानपीठ विजेती लेखिका *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *खास भावगीतांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गुजरात: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पुतळ्याचे कडक पोलीस बंदोबस्तात आज होणार अनावरण* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *वीजमंडळाच्या कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये दिवाळी बोनस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नंदुरबार - आदिवासी कारखाण्यातर्फे यंदा उसाला 2308 रुपये एकरकमी देण्याची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नक्षली हल्ल्यात मृत्यू झालेल्या कॅमेरामनच्या कुटुंबीयांना 15 लाखांची केंद्र सरकार करणार मदत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नागपूर - सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसानभरपाई द्यावी - अजित पवार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *चौथ्या क्रमांकासाठी ११ फलंदाजांची घेतली चाचणी, अंबती रायुडू या स्थानासाठी सर्वात उपयुक्त फलंदाज असल्याचे कर्णधार कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांचे मत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. https://sharechat.com/post/Nyd4Bnr Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय एकात्मता कशी टिकेल ?* https://sharechat.com/post/d9QN6Zw आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सरदार वल्लभभाई पटेल*                   वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म लेवा पाटेल समाजामध्ये झाला त्यांच्या मामांच्या नडियाद (गुजरात) येथील घरी येथे झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर अशी लिहिली होती. पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती. बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतीत मदत करत असत. १८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२/१३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले.  वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले. इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात वल्लभभाई पटेल वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरूवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली - १९०४ मध्ये मणीबेन आणि १९०६ मध्ये डाह्याभाई. गुजरातमध्ये त्या वेळी ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती. या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले. वल्लभभाईगोधरा, बोरसद व आणंद भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही सांभाळत होते. एक भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ह्या पदवीने संबोधित केले आहे. वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले.  गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारतछोडो आंदोलनात ते आघाडीवर होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जिकडून जे घेता येईल, ज्यांच्यापासून जे शिकता येईल ते आदराने घ्यावे - साने गुरुजी *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैक किती जंगलांनी व्यापले आहे ?* ६२,२२४ चौ. कि.मी *२) 'फ्लड ऑफ फायर' या पुस्तकाचे लेखक कोण ?* अमिताभ घोष *३) अलीकडेच कोणत्या राज्यात संपूर्ण दारूबंदी जाहीर करण्यात आली ?* बिहार *४) इंटेलसॅट-४ या उपग्रहाचे प्रक्षेपण कधी करण्यात आले ?* ८ जानेवारी १९७८ *५) रणगाड्याचा शोध कोणी लावला ?* स्विन्टन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  आप्पासाहेब सुरवसे, बीड ●  जागृती सुधीर निखारे, मुंबई ●  निलांजय यडपलवार ●  देवदास कोयेवार ●  दामोदर डहाळे ●  गणेश पाटील हांडे ●  शीतल गांधी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गुलाम* सहज मिळतं त्याला किंमत रहात नाही घरच्या देवाकडे तर कोणीच पहात नाही घरच्यांना लाथा अन् दुरच्यांना सलाम असतो असे वागणारा खरंच वैचारिक गुलाम असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एखाद्या उंच डोंगरावरच्या छोट्याशा मंदिरात, जिथला देव नवसाला न पावल्यामुळे एकाकी आहे, ज्याला मिणमिणती पणती पुरते, सकाळ संध्याकाळची किणकिणत्या छोट्या घंटेची संगीतमय पूजा पुरेशी असते. अशा मंदिरात पायउतार झाल्यास तिथली शांतता सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपात ईश्वराची अनुभूती देते. तिथल्या शांततेला जो एक 'ध्वनी' असतो तो कानात आत्मशोधाची रूंजी घालतो आणि आपोआप मूक संवाद सुरू होतो. ही शांतता नेमकं काय सांगते, हे समजण्याची कुवत असल्यास आनंदाचा परमोच्च बिंदू सापडू शकतो.* *कानठळे बसवणारा गोंगाट, मस्तक फिरवणारा कर्कश आवाज, वातावरण चिरणा-या उद्विग्न किंकाळ्या, पर्यावरणाची धूळदाण करणारा भेदक हिंसात्मक आवाज हे सर्व आधुनिक काळातले शांततेचे शत्रू. माणूस एका बाजूने हे सर्व 'हवयं' म्हणून लोकांमध्ये उधळत वाटत सुटला आणि दुसरीकडे 'नको नको' म्हणत वेडापिसा होऊन शांततेचा शोध घेत बसला. मानवनिर्मित 'आवाज' ते ईश्वरनिर्मित 'शांतता' यांचे द्वंद्व सुरू आहे. माणूस शांततेचा शोध घेत पुन्हा 'हिलस्टेशन' वर पोहचला आहे. पण ख-या अर्थाने शांतता तेव्हा मिळेल जेंव्हा तो अध्यात्माच्या आधारे 'शांतता' ओळखेल. "दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती" या उक्तीप्रमाणे दया, क्षमा माणसाच्या हातात आहेत, नाही ती 'शांतता.'... ती ईश्वराने आपल्या हातात ठेवली आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 48* जिही जिवरी से जाग बँधा, तु जनी बँधे कबीर। जासी आटा लौन ज्यों, सों समान शरीर।” अर्थ : हे जग मायावी आहे. इथे मोहिनी घालणारे भ्रमाचे अनेक फसवे धागे आहेत. मोहात पडून भ्रमित होवू नये. फसवे पाश ओळखता आले पाहिजेत. मात्र इथले जीव सारसार विचार न करताच मोहात दावनीला जखडले आहेत. जीवनाचं सार्थक करायचं असेल. तर माया , मोहात गुरफटू नको. विनाकारण स्वतःच स्वतःला फरफटत नेऊ नकोस. हा मानवरूपी देह विचार व विवेकाने वागण्यासाठीच लाभलेला आहे. सर्व प्राणी मात्रांकडे नसलेले बोली व बुद्धी हे आगळेवेगळे वैशिष्ट्य केवळ मानवाठायीच आहे . तेव्हा आपल्या बुद्धीचातुर्याच्या बळावर सत्कर्म करून जीवन सफल करावयाला हवे. मीठाविना जेवन फिके वाटावे तसे सत्कर्माविना जीवन उठून दिसूच शकत नाही. माणसाच्या वागण्यातील विसंगती दाखवताना ' गेली सांगून ज्ञानेश्वरी , माणसापरीस मेंढरं बरी." वास्तवाचं बोलकं चित्र मांडून या गाण्यातून माणसातील भेदभावी वृत्तीवर फटकार मारलाय. माणसानं माणसाबरोबर माणसासारखं वागलं तरी मानवता नांदू लागेल. नाही तर मानव देह धारण करूनही मानवता विसरलेला पशू अशीच ओळख देवून कसं चालेल ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमचा धर्म कोणताही असो किंवा जात कोणतीही असो पण जी माणसे संकटात सापडली आहेत अशा माणसांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे असायला हवा हाच खरा माणुसकीचा सर्वात मोठा धर्म आहे हे कधीही विसरु नका.अशावेळी कोण श्रीमंत आहे किंवा कोण गरीब आहे हा देखील भेद पाहू नका.कारण संकटं जेव्हा येतात तेव्हा कधीच कुणामध्ये भेद करत नाही.त्यामुळे हादेखील भेद आपण माणूस म्हणून का करायचा. मदतीच्यावेळी सारेच भेद विसरुन आपले माणुसकीच्या नात्याने कर्तव्य म्हणून मदत करावी हीच आपल्याला खरी शिकवण साधूसंतानी आणि पूर्वजांनी दिली आहे.ती शिकवण नित्य स्मरणात ठेवून आपण जीवन जगायला शिकले पाहिजे कसल्याही प्रकारचा भेद न करता एकमेकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योग्यता - Qualifications* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सदाचरण* फार वर्षापूर्वी वाराणसी येथे देवमित्र नावाचे राजपुरोहित राहत होते. राजाला राजपुरोहितांच्‍या विद्वत्तेचा व योग्‍यतेचा यथायोग्‍य आदर होता म्‍हणूनच तो त्‍यांची प्रत्‍येक गोष्‍ट ऐकत असे. प्रजेमध्‍येसुद्धा राजपुरोहितांबद्दल सन्‍मानपूर्वक आदर होता. एक दिवस राजपुरोहितांना वाटले की राजा आणि इतर सर्व प्रजा आपल्‍याला इतक्‍या आदरपूर्वक का वागवतात याचे कारण जाणून घ्‍यावे. राजपुरोहितांनी हे जाणून घेण्‍यासाठी एक गुप्‍त योजना बनविली. दुस-या दिवशी त्‍यानी दरबारातून परतताना राजाच्‍या खजिन्‍यातून एक सुवर्णमुद्रा गुपचुप उचलून घेतली. हे खजिनदाराने पाहिले पण ते पाहून त्‍याने न पाहिल्‍यासारखे केले. हा प्रकार परत दुस-या दिवशीही घडला. राजपुरोहितांनी पुन्‍हा दुस-या दिवशी हळूच एक सुवर्णमुद्रा उचलली व स्‍वत:जवळ ठेवली. तिस-या दिवशी त्‍यांनी एक मुठभर सुवर्णमुद्रा उचलल्‍या व खिशात भरल्‍या. यावेळी मात्र खजिनदाराने सैनिकांना बोलावले व राजपुरोहितांना कैद करण्‍यास सांगितले. राजपुरोहितांना कैद झाली ही गोष्‍ट राजाच्‍या कानावर गेली. न्‍यायदान करताना राजाने आपला निर्णय दिला की राजपुरोहितांकडून घडलेल्‍या या चुकीबद्दल त्‍यांना तीन महिने सक्त कारावासाची सजा देण्‍यात यावी. तीनवेळेला त्‍यांनी कोषातून धन चोरले म्‍हणून तीन महिने सजा देण्‍यात आली आहे जेणेकरून ते पुन्‍हा असा अपराध करण्‍यात यशस्‍वी होणार नाही. या न्‍यायावर राजाने राजपुरोहितांची प्रतिक्रिया विचारली. राजपुरोहितांनी राजाला यामागील कारण सांगताना,'' राजन, मी काही अट्टल चोर नाही. मी फक्त जाणून घेण्‍यास इच्‍छुक होतो की लोक कशामुळे मला सन्‍मान देतात, वैयक्तिक माझा सन्‍मान करतात की मी करत असलेल्‍या सदाचरणाचा लोक सन्‍मान करतात. पण आता माझ्या लक्षात आले आले आहे की लोक हे माझ्या विद्वत्तेपेक्षा माझ्या सदाचरणाला महत्‍व देतात. गैरवर्तणूक करताच मी दंडास प्राप्‍त झालो आणि त्‍यावेळेला माझी विद्वत्ता, संपत्ती, मानमरातब हे काहीही मदतीला आले नाही. माझे सद आचरण हेच माझ्या सन्‍मानाचे कारण आहे हे मला समजून चुकले आहे. मी माझ्या गैरवर्तणुकीबद्दल आपली क्षमा मागतो.'' राजाने यावर सांगितले,''राजपुरोहित महाराज, तुम्‍ही कोणत्‍याही भावनेतून जरी हे कार्य केले असले तरी तुम्‍हाला दंड होणे क्रमप्राप्त आहे तरी तुम्‍ही शिक्षेस तयार राहा.'' राजपुरोहितांनी राजाचे म्‍हणणे ऐकले व स्‍वत:ला सैनिकांच्‍या स्‍वाधीन केले. *तात्‍पर्य :-सदाचरण हेच मनुष्‍याचे धन आहे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि.30/10/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०१३ - आंध्र प्रदेशच्या महबूबनगर जिल्ह्यातील पालेम गावाजवळील पुलाच्या कठड्याला धडकून बसगाडीला लागलेल्या आगीत ४५ ठार, ७ जखमी. 💥 जन्म :- १८८१ - नरेंद्र देव, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते १९०९ - डॉ.होमी भाभा, भारतीय शास्त्रज्ञ १९४९ - प्रमोद महाजन, भारतीय जनतापक्षाचे नेते 💥 मृत्यू :- १९२८ - लाला लजपतराय, भारतीय स्वातंत्र्यसेनानी १९७४ - बेगम अख्तर, गझल गायिका 'मलिका-ए गझल' १९९६ - प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये, मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते १९९८ - विश्वनाथ चिंतामण ऊर्फ विश्राम बेडेकर मराठी साहित्यिक आणि चित्रपट दिग्दर्शक १९९९ - वसंत हळबे, व्यंगचित्रकार २०११ - अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : दोन दिवसांच्या जपान दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जम्मू-काश्मीरमधील लडाख परिसरात सव्वा आठच्या सुमारास 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *जळगाव - दूध उत्पादकांना ५ रूपये अनुदानाला ३ महिने मुदतवाढ, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नाशिक : आजपासून सलग 3 दिवस दारणा धरणातून 15 हजार क्यूसेस तर गंगापूर धरणातून 3 हजार क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *श्रीलंका : सुरक्षा रक्षकाने आंदोलकांवर गोळीबार केल्याप्रकरणी श्रीलंकेचे माजी कर्णधार तथा पेट्रोलियममंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताने चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा २२४ धावांनी केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. https://sharechat.com/post/nkJ3P0p Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. होमी भाभा* डॉ. होमी भाभा भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते मानले जाते. भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तिमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम व्यक्ती होते. त्यांचे प्राथमिक ते पदवीपयर्ंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनीयर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रेच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनीयरिंगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रिज विद्यापीठातून इ.स. १९३0 साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करून इ.स. १९३३ साली त्यांनी डॉक्टरेट मिळवली. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली. इ.स. १९४0 साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मुलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु ऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक पर्शिमांमुळेच भारत देशात अणुभट्टीची स्थापना होऊ शकली. अणूचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणुभट्टय़ा सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. संयुक्त राष्ट्रच्या सभेला जाताना २४ जानेवारी, इ.स. १९६६ या दिवशी फ्रान्सच्या हद्दीत असताना त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर ट्रॉम्बे येथील अणू संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणू संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) तेराव्या वित्त आयोगाची स्थापना कधी झाली ?* नोव्हेंबर २00७ *२) 'गांधी : अँन इलिस्ट्रेटेड बायोग्राफी' या पुस्तकाचे लेखक कोण ?* प्रमोद कपूर *३) 'नॅसडॅक'चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?* न्यूयॉर्क *४) विश्‍वाच्या निर्मितीचा शोध घेण्यासाठीच्या महाप्रयोगाचे नाव काय ?* लॉर्ज हॅड्रॉन कोलायडर *५) महाराष्ट्रातील शेकरू खारीसाठी प्रसिध्द अभयारण्य कोणते ?* भीमाशंकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  शैलेंद्र सुरकूटवार ●  पंकज गादेवार ●  श्याम स्वामी, हिंगोली ●  संग्राम टेकाळे ●  बसवराज पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धीर* कधी धरावा लागतो आपला आपण धीर कठीण प्रसंगी रहावे फक्त काही काळ स्थीर धिराने राहिल्यावर मन स्थिर रहाते मन स्थिर असेल तर केवढेही संकट दूर पळून जाते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••● *विचारधन* ●•• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• *मडक्यासाठी लागणारी माती आणण्याला कुंभाराने गाढव पाळलेले असते. गाढव जेव्हा रिकामे असते तेव्हा ते मालकाच्या अंगणात थांबत नाही. ते सरळ उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात बसते. पालापाचोळा साली-टरफले सारे ते मटकावते. प्रत्येक प्राण्याच्या काही त-हा असतात. खाण्याच्या काही सवयी असतात. गाढवाला अगदी गूळपाण्यात भिजवलेली डाळ दिली तरी ते मनापासून खाणार नाही. उकिरड्यावर पडलेले उष्टे अन्न मनापासून खाईल.* *माणसांचेही तसेच असते, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या त-हा असतात, सवयी असतात. "विशिष्ट व्यक्तिला विशिष्ट गोष्टीच आवडतात, आणि विशिष्ट व्यक्ति विशिष्ट ठिकाणीच सापडते. त्यांना दुसरीकडे शोधायचे कारण नाही."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 48* कबीर संगी साधु का, दल आया भरपूर । इन्द्रिन को तब बाँधीया, या तन किया धर । अर्थ : खर्‍या संतांच्या संगतीने माणसाच्या वर्तनात बदल होतो. संत संगतीमुळे मानवाला कल्याणकारी मार्ग सापडतो. संत द्वेष, माया, मोह ,विकार, वासना यापासून अलिप्त राहतात. संताचे ठायी विचार , विवेक, वैराग्य, दया, क्षमा, समता , निरामयता इ सद्गुणांची खाणंच असते. त्यांच्या कृपा कटाक्षाने सुद्धा काळीज फुटेतो धावणार्‍याला शांती मिळते व तो समाधानाच्या मार्गावर येतो. विज्ञानाचा पदवीधर असणार्‍या नरेंद्राच्या मस्तकी गुरू रामकृष्ण परमहंसांचा स्यर्श झाला. मनाची चंचलता नाहीशी होवून नरेंद्र अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारा पहिला तत्ववेत्ता ठरला. अध्यात्म व विज्ञानाने एकमेकांच्या हातात हात घेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मानवतेला विकासाची जोड मिळेल व विज्ञानाच्या बुद्धि प्रामान्यतेला सहृदयता मिळेल. हे संपूर्ण जगाला सांगणारा तो विज्ञाननिष्ठ संन्यासी 'स्वामी विवेकानंद' होतो . किती मोठी अद्भूत शक्ती संचरत असते, खर्‍या साधूंच्या ठायी ! खरे साधू भौतिक सुखांच्या सान्निध्यात वावरूनही त्यांची कधीच आस धरीत नाहीत. संन्यासी वृत्तीनं जगताना इंद्रीयांच्या अधिन असणार्‍या मनालाच हे संन्यस्त जिंकून घेतात. मनाला विकारी न होवू देता विवेकपूर्ण जगत निरामयतेचा अंगीकार करून हे दिव्यत्वानं जगालाच भारून टाकतात. त्यांचं क्षणभराचं सान्निध्यही माणसाला दिव्य दृष्टी बहाल करून जातं. खर्‍या संत, सज्जनाच्या सहवासाने जीवनाला मानवतेची जोड मिळते. माणूस विकारमुक्त होऊन विवेकानं जगायला लागतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात मौल्यवान वस्तू सांभाळून त्यात वेळ वाया घालवतो, त्यामुळे मानसिक अवस्थाही चलबिचल होते, एवढे सांभाळूनही कधी कधी जीवाला ही धोका पत्करावा लागतो आणि आपली झोपही उडून जाते.हे सांभाळण्यापेक्षा जीवनात चांगली माणसं भेटली तर त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करायला हवा.कारण ती आपल्या जीवनात आलेल्या कोणत्याही संकटकाळात आपल्या मदतीला धावून येतील.तीच खरी आपली मौल्यवान संपत्ती आहे. त्यांना आपल्या जीवनात मौल्यवान दागिण्यापेक्षा अधिक जपायला हवे.त्यांच्यापासून आपल्या जीवीताचे रक्षणही होईल,मन चलबिचल होणार नाही , निवांतही झोप लागेल आणि चांगली माणसे आपल्या जीवनात आली म्हणून समाधानही वाटेल.अशा माणसांना आपल्या काळजामध्ये स्थान देऊन त्यांचे जतन केले पाहिजे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संगत - Compatible* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सखोल अभ्यास खूप वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. भारतावर इंग्रजांचे राज्‍य होते. माणसांनी खच्‍चून भरलेली एक रेल्‍वे प्रवास करत होती. प्रवाशांमध्‍ये जास्‍तीत जास्‍त भरणा हा इंग्रजांचाच होता. एका डब्‍यात एक भारतीय गंभीर चेहरा करून बसलेला होता. सावळ्या रंगाचा, मध्‍यम उंचीचा हा मनुष्‍य साधारणप्रतीचे कपडे घालून प्रवास करत होता. त्‍याच्‍या रंगाकडे आणि एकूणच अवताराकडे बघून डब्‍यातील बहुतांश इंग्रज त्‍याची चेष्‍टामस्‍करी करत होते. त्‍याला खेडूत, अडाणी समजून त्‍याच्‍या अवताराची ते टिंगल करत होते. पण त्‍यांच्‍या त्‍या चेष्‍टामस्‍करीकडे, टिंगल करण्‍याकडे त्‍या भारतीयाचे लक्ष नव्‍हते. तो त्‍याच्‍या नादात मग्‍न होता. अचानक तो भारतीय उठला आणि त्‍याने रेल्‍वेची साखळी ओढली. वेगात धावणारी ती आगगाडी तात्‍काळ थांबली. गाडीतले प्रवासी त्‍याला काहीबाही बोलू लागले. थोड्याच वेळात गार्डही तेथे आला व त्‍याने विचारले,’’ कोणी साखळी ओढून ही रेल्‍वे थांबविली’’ त्‍या सावऴया रंगाच्‍या व्‍यक्तिने उत्तर दिले,’’मी ओढली साखळी, मी थांबवली रेल्‍वे’’ गार्डने या कृतीचे कारण विचारले असता ती व्‍यक्ति उत्‍तरली,’’माझ्या अंदाजानुसार इथून काही अंतरावर रेल्‍वे पट्ट्या खराब झाल्‍या आहेत.’’ गार्डने विचारले,’’ हे तुला कसे कळले’’ ती व्‍यक्ति म्‍हणाली,’’ माझ्या अनुभवानुसार रेल्‍वेच्‍या गतीमध्‍ये काही फरक पडला आहे आणि त्‍यामुळे रेल्‍वेचा जो विशिष्‍ट आवाज येतो तो न येता आवाज न येता वेगळा आवाज येऊ लागला आहे. असा आवाज फक्त रेल्‍वे पट्ट्या खराब असतानाच येतो हे माझे गणित आहे. आपण याची खात्री करून बघू शकता.’’  गार्डने याची खातरजमा करून बघण्‍यासाठी त्‍या व्‍यक्तिला बरोबर घेतले व पुढे जाऊन पाहतात तो काय, एका ठिकाणी खरोखरीच रूळाच्‍या पट्ट्या निसटून रूळ सटकले होते. तेथील नटबोल्‍टही तेथूनच बाहेर पडलेले दिसून येत होते. हे सर्व होत असतानाच रेल्‍वेत त्‍या माणसाची टिंगल करणारे प्रवासीही तेथे येऊन पोहोचले व हे सर्व पाहून ते आश्‍चर्यचकित झाले. केवळ त्‍या माणसाच्‍या ज्ञानामुळे आज त्‍यांचे प्राण वाचले होते हे जाणवून ते सर्व आता त्‍या माणसाची प्रशंसा व स्‍तुती करू लागले. गार्डने त्‍यांचे आभार मानले व विचारले,’’ सर, मी तुमचे नाव व हुद्दा जाणू शकतो काय’’ त्‍या माणसाने शांतपणे उत्तर दिले,’’ माझे नाव डॉ.एम. विश्र्वेश्‍वरैय्या असून मी व्‍यवसायाने इंजिनियर आहे.’’ त्‍यांचे नाव ऐकताच सगळेचजण स्‍तब्‍ध झाले. कारण त्‍याकाळात विश्र्वेश्‍वरैय्या यांना संपूर्ण देश एक हुशार इंजिनिअर म्‍हणून ओळखत होता. टिंगल करणा-या लोकांनी त्‍यांची क्षमा मागितली. तात्पर्यः सखोल अभ्यास असलेल्या व्यक्ती अतिशय सयंमी शांत व वैचारिक दृष्टीने उच्च असून दूरदृष्टी ठेवून वागतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/10/2018 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक स्ट्रोक दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांना राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्या हस्ते भारतरत्‍न पुरस्कार १९९९ - ओडिशाच्या किनाऱ्यावर आलेल्या चक्रीवादळाने अतोनात नुकसान केले २००८ - डेल्टा एरलाइन्स आणि नॉर्थवेस्ट एरलाइन्स एकत्रित होऊन जगातील सगळ्यात मोठ्या विमानवाहतूक कंपनी तयार 💥 जन्म :- १९११ - रामचंद्र नारायण चव्हाण, वाईचे बहुजन समाज हितकर्ते विचारवंत व लेखक. 💥 मृत्यू :- १९६७ - डॉ. कूर्तकोटी, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व हिंदू धर्मप्रचारक १९९४ - सरदार स्वर्णसिंग, भारताचे माजी परराष्ट्रमंत्री *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *यवतमाळ येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री व लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चार दिवसांच्या कतार आणि कुवेतच्या दौऱ्यावर रवाना.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते मदनलाल खुराणा यांचे निधन, ते 82 वर्षाचे होते* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : मुंबई विमानतळावर सीआयएसएफ जवानाने हृदयविकाराचा झटका आलेल्या एका प्रवाशाचे वाचविले प्राण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झालेल्या कपातीमुळे गेल्या ११ दिवसांपासून भारतामध्ये इंधन दरवाढीत झाली कपात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली : 'बधाई हो' चित्रपटाची घौडदौड सुरूच, दुसऱ्या आठवड्यात 76 कोटींची घसघशीत कमाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : 2018 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचं केलं कौतुक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://b.sharechat.com/iSM8wVmGoR *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आधुनिक तंत्रज्ञानाचा विपरीत परिणाम* https://nasayeotikar.wordpress.com/2018/05/10/11-%e0%a4%ae%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्ट्रोक म्हणजे काय ?* बहुतेक वेळा मेंदूला रक्‍तपुरवठा करणार्‍या एखाद्या धमनीमध्‍ये अडथळा निर्माण झाल्‍यामुळे पक्षाघात होतो. यामुळे मेंदुच्या त्या भागाला हानी पोहोचते व तुमच्‍या शरीरातील मेंदुच्या त्या भागाद्वारे नियंत्रित केला जाणारा भाग निकामी होवू शकतो. उदा, तुमचा एखादा हात किंवा पाय किंवा वाचा निकामी होवू शकते. हे नुकसान तात्‍पुरते किंवा कायम स्‍वरूपाचेही ठरू शकते, आंशिक किंवा पूर्ण देखील असू शकते. लक्षणे आढळताच तुम्‍हांला पूर्णपणे औषधोपचार मिळाल्‍यास मेंदुच्या त्‍या भागाला पुन्हा रक्‍तपुरवठा चालू होवू शकतो असे डॉक्‍टरांचे म्‍हणणे आहे, ज्‍यामुळे जास्‍त नुकसान होत नाही. पक्षाघात टाळण्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी करणे आवश्‍यक आहे. ऍस्पिरिनचे लहान डोस तुमचा पक्षाघाताबाबतचा धोका कमी करू शकतात का याबाबत तुमच्‍या डॉक्‍टरला विचारा. ऍस्पिरिन तुमच्‍या रक्‍तामध्‍ये गाठी पडू देत नाही आणि यामुळे तुमच्‍या धमन्‍यांमध्ये अडथळा निर्माण होत नाही. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) हरिका द्रोणावली हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* बुध्दिबळ *२) बांगलादेशचं चलन कोणतं आहे ?* टका *३) बोरलॉग पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ?* कृषी *४) नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो ?* वैज्ञानिक ऑल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल *५) नौदलाचे प्रमुख कोण असतात ?* अँडमिरल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सचिन मोहिते ● विशाल पाटील बोडे ● शिवानंद खपाटे ● निखिल गुजराथी ● संपदा पाटील ● गणेश कट्टावाड ● शंकरराव कुंटुरकर ● दिनेश राजपुरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उजेड* अंधा पुढे दिवा कशाला हवा डोळसा पुढे उजेड ठेवा ज्याला जे हवे त्याला ते द्यावं जे दिलं ते उपयोगी यावं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.* *रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.* *महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले. "अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 47* मन राजा नायक भया, टाँडा लादा जाय । है है है है है रही, पूँजी गयी बिलाय । अर्थ मन प्रवृत्ती चंचल आहे. मनाची हीच चंचलता मानवाला सतत झुलवत असते. ते सर्वात वेगवानही आहे. क्षणात भुईवर तर क्षणात आभाळी विहार करीत असते. मनासारखा जगात दुसर्‍या खेळ्या नाही. त्याला नियंत्रणात न ठेवल्यास ते अधःपाताकडे नेते.. जवळ दमडी असो की नसो ते राजा बनतं. मोठा व्यापरी बणून विषय सुखांची खरेदी करतं. मोह, माया, लालसेच्या नादी लागून माणूस कुवतीबाहेर वागायला लागतो. त्यामुळे एक तर त्याचे दिवाळे निघते किवा तो ऊर फुटेतो धावून दमछाक करून घेतो. भोग विलास सारं उपभोगावं परंतु सारं प्रमाणात असावं. उपभोगांची अनिंयत्रित लुट केली की पक्वान्नाचं ताट पुढढ्यात असूनही मधुमेहीनं त्याच्याकडं नुसतंच बघत बसावं अशी परिस्थिती उत्तरार्धात ओढवते. म्हणून माणसाने मनाला मोकाट भटकू न देता त्याला स्वतःच्या नियंत्रणात ठेवायला हवं. निसर्ग आपणास हवा, पाणी, प्रकाश देताना कुठलाही भेदभाव करीत नाही, एकमेव मणुष्य नावाचा सर्वात बुद्धीमान प्राणी वगळता कोणतेही प्राणी आपापसात कधीही भेदभाव करीत नाहीत. सर्वजण मिळून मिसळून एकोप्याने राहतात. निसर्गातील उपलब्धतेचा मिळून-मिसळून आस्वाद घेतात. कोणी मालक नसतो कोणी नोकर नसतो . माणसानं आपल्याच बांधवाचं जळूगत शोषण करीत शोषक व शोषित असे गट तयार केले. रिकाम्या हाती जन्मा येवून रिकाम्याच हाती मातीशी एकरूप होणे आहे तर माणसाची ही मिजास आहे. चिरंजीवीतेचं वरदान मिळाल्यावर माणूस माणसाची काय अवस्था करील ही कल्पनाच न केलेली बरी ! मानवतेचं राज्य आणण्यासाठी माणसासारखं वागणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे सारं काही असणार्‍यांनी हावरटपणा व लुटारू प्रवृत्ती सोडली पाहिजे. कृत्रिमतेचा बडेजाव मिरवण्याऐवजी शाश्वत व चिरंतनाचा वेध घेतला पाहिजे. माणसाच्या विकृत प्रवृत्तीने नको तेच अज्ञानाचे गाढव ओझे मानवाच्या पाठीवर लादले. अन तेच आम्ही पुढे पुढे नेण्यात काय हशील आहे ? निरामय जीवन जगत बुरसट रिती-परंपरा, भेदाभेद सोडला नाही तर माणूस या पदाला आपण पात्र होवूच शकत नाही. माणुसकीला पारख्या झालेल्या लोकांच्या मानवतेच्या भंपक घोषणाच ऐकायला मिळत राहतील. हेच खरं... एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण एखाद्यावेळी अनवाणी पायाने पायी जाताना तळपायाला खडा रुतला तर डोळ्यांत टचकन पाणी येते आणि असह्य वेदना होतात. काही काळ आपण झालेले दु:ख खूप सहन करतो आणि पुढे चालायला लागतो पण मनात खडा टोचल्याचे शल्य राहतेच. पण तोच खडा दुस-याच्या पायाला टोचला तर त्याला आपण खाली पाहून चालू नये का असा सल्ला देतो. जो त्रास आपल्याला झाला आहे तो त्रास इतरांना होऊ नये असे ज्यांना मनापासून वाटते ते दुस-या चे कधीच वाईट चिंतीत नाहीत. अशी माणसे नेहमी आपल्या जीवनात असावीसी वाटतात. जे दुस-यांच्या चांगल्या गोष्टींचा विचार करतात ते कधी कधी स्वत:च्या जीवनात दु:ख झालेले कधीच कुणाला सांगत नाहीत. त्यांच्या मनात कधीही वाईट भावना निर्माण होत नाही. अशांचे आयुष्य हे एक दुस-यांसाठी प्रेरणादायी असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌴🌹🌴🌹🌴🌹🌴🌹🌴🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निष्क्रिय - Inactive* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वैचारिकतेचा अभावामुळे सर्वनाश* एका राज्‍यात निष्क्रिय,अविचारी राजाचे शासन होते. त्‍याचे मंत्री, सेनापती, सरदार हे सर्वच्‍या सर्व चापलुसी करणारे होते. त्‍या राजाच्‍या राज्‍यात व दरबारात विद्वानांचा अनादर केला जाई. एखादी व्‍यक्ती आपल्‍यापेक्षा हुशार आहे असे लक्षात आले त्‍याला राजाचे सहकारी अपमानित करत. या कारणाने कोणीही विद्वान, पंडीत, ज्ञानी मनुष्‍य त्‍या राज्‍यात जात नसत. त्‍यामुळे त्‍या राज्‍यात बौद्धिक चर्चांची परंपरा खंडीत झाली होती. एकदा राजाला माहिती समजली की, एक ऋषी तीर्थाटनासाठी निघाले आहे व ते आपल्‍या राज्‍यातून जाणार आहेत. मंत्र्यांनी सल्‍ला दिला की त्‍या ऋषींना आपल्‍या दरबारात बोलवावे जेणेकरून ते जर विद्वान, पंडीत असतील तर त्‍यांचा अपमान करून आनंद मिळविता येईल आणि जर ते ऋषी मूर्ख असतील तर त्‍यांचा सत्‍कार करावा म्‍हणजे जनतेचा विश्‍वास बसेल की राजा मूर्ख माणसांचाही सत्‍कार करणे जाणतो. राजा व मंत्री नगराच्‍या मुख्‍य दरवाजात जाऊन उभे राहिले. ऋषी नगरापाशी आले. नगराबाहेर काही जीर्ण झालेल्‍या झोपड्या पाहून थांबले व त्‍यांनी विचारले,’’ या कुणाच्‍या झोपड्या आहेत’’ राजाने उत्तर दिले,’’या बुद्धिमान, विद्वान लोकांच्‍या झोपड्या आहेत. बुद्धिमान लोकांना मी हाकलून दिले कारण मला बुद्धिमान लोकांशिवायही शासन चालविता येते हे दाखवून द्यायचे होते. माझ्या राज्‍यातून हाकलून दिलेले विद्वानलोक येथे काही काळ घालवित होते.’’ हे उत्तर ऐकताच ऋषी तात्‍काळ राजाला म्‍हणाले,’’ हे राजा, तर मग तुझ्या राज्‍यात एक पाऊलही न टाकता मी येथूनच मी परत जात आहे कारण जेथे विद्वानांचा आदर केला जात नाही, बुद्धिवंतांची कदर केली जात नाही, पंडीतांचे म्‍हणणे ऐकले जात नाही, बुद्धिवंतांची चर्चासत्रे घडत नाहीत अशाठिकाणी न जाणेच योग्‍य असते. जेथे हे सर्व घडत नाही त्‍याचा सर्वनाश जवळ आला आहे हे निश्र्चित समजावे.’’ हे सांगून ऋषी तेथून निघून गेले. कालांतरांनी चापलुशी केलेल्‍या उपदेशाने राजाचे राज्‍य लयाला गेले. त्‍याचे पूर्ण पतन झाले. ऋषींची वर्तवलेला अंदाज खरा ठरला. तात्‍पर्य :- बुद्धी कठीण समस्यांचे निराकरण करते. बुद्धिमानांचा आदर जर समाज करत असेल तर तो समाज पुढे जाऊन विकास करतो. विद्वान लोक जेथे वस्‍ती करतात तेथे ते विकास करतात. जेथे विद्वानांचे म्‍हणणे ऐकले जात नाही तेथे सर्वनाश अटळ आहे. खरे आहे ना !!!! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 〰〰〰〰〰〰〰 *🌺जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰 सत्यनिष्ठेसाठी निर्भयतेची गरज असते आणि निर्भयतेसाठी स्वावलंबनाची गरज असते.नम्रता म्हणजे 'मी' पणाचा आत्यंतिक क्षय. निर्भयतेने प्रगती करून घेता येते व नम्रतेने बचाव होतो.आपण स्वतःस वाचवु शकतो. नम्रतेच्या कोंदनातच अभय खुलून दिसते.आणि उदार वृत्ती वाढीस लागते."नम्रता म्हणजे लवचिकपणा. यामध्ये जिंकण्याची कला आहे आणि शौर्याची पराकाष्ठा आहे ". *नम्रतेच्या उंचीला मोजमाप नाही*. 🙏 महात्मा गांधी नी म्हटलं आहे " सत्याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्याने धुळीच्या कणापेक्षाही नम्र झाले पाहिजे. नम्रता ही अहिंसेची तेजस्वी मूर्ती आहे ". smt.pramilatai senkude. नम्र माणूस दुसऱ्याचा विचार करतो. पाणी ज्याप्रमाणे रस्त्यातला खड्डा भरून काढल्याशिवाय पुढे सरत नाही , त्याचप्रमाणे दुसऱ्याचे जीवन संपन्न केल्याशिवाय तो राहणार नाही. म्हणूनच कन्फ्यूशियसने म्हणले आहे 'फळांनी लहडलेल्या वृक्षांच्या शाखा ज्याप्रमाणे खाली वाकतात, त्याप्रमाणे महान लोक त्यांच्या महानतेने लीन बनतात.' ================== 🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼 *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा. गोजेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰💐🍀💐🍀💐🍀💐

*प्रतिबिंब* फार वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. एक राणी आपले ओले केस सुकविण्‍यासाठी राजवाड्याच्‍या छतावर गेली होती. तिने आपला मौल्‍यवान कंठा काढून बाजूला ठेवला व केस विंचरू लागली. इतक्‍यात तिकडून एक कावळा आला. कावळयाला तो कंठा(गळ्यातील हार) म्‍हणजे काहीतरी खाण्‍याची गोष्‍ट वाटली व तो कंठा घेऊन कावळा उडून गेला. एका झाडावर बसून त्‍याने कंठा खाण्‍यासाठी प्रयत्‍न केले. मौल्‍यवान अशा कंठ्यामध्‍ये हिरे जडलेले होते. कठोर अशा हि-यांवर चोच मारून मारून तो थकला व त्‍याने ते खाण्‍याचा नाद सोडून दिला. तो कंठा तसाच झाडावर लटकत ठेवून त्‍याने आकाशात भरारी मारली ते अन्नाचा शोध घेण्‍यासाठी. इकडे राणीने केस विंचरले व तिच्‍या लक्षात एक गोष्‍ट आली की आपला मौल्‍यवान कंठा गायब झाला आहे. इकडेतिकडे शोध घेऊनही तिला तो सापडेना शेवटी ती रडत रडत राजाकडे गेली व म्‍हणाली,'' महाराज माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे. तुम्‍ही त्‍याचा शोध घेण्‍याचे आदेश द्या.'' राजा म्‍हणाला,'' दुसरे इतरही दागिने आहेतच की तुला. तोच कंठा कशाला पाहिजे.'' राणीने ऐकले नाही व तोच कंठा पाहिजे म्‍हणून हट्ट धरून बसली. राजाने कंठा शोधण्‍याचे आदेश दिले. सर्वजण तो शोधू लागले पण कोणाला काही तो कंठा सापडेना. राजाने कोतवालाला बोलावून सांगितले की आजच्‍या आज तू, सर्व शिपाई, सैनिक, प्रजा सगळे मिळून त्‍या हाराचा शोध घ्‍या. जो कोणी तो हार आणून देईल त्‍याला आपण अर्धे राज्‍य बक्षीस म्‍हणून देऊ अशी घोषणाही त्‍याने त्‍यावेळी केली. अर्धे राज्‍य बक्षीस मिळेल या आशेने सर्वजणच कामाला लागले. सगळीकडे शोधयंत्रणा सुरु झाली. शोधता शोधता अचानक कुणाला तरी तो हार सापडला. एका घाणेरड्या पाण्‍याच्‍या नाल्‍यामध्‍ये त्‍याला तो हार दिसला. पाणी इतके घाणेरडे होते की जवळून जातानासुद्धा किळस यावी, दुर्गंध सर्वत्र पसरला होता. पण त्‍या पाण्‍यात तो हार पडलेला दिसून येत होता. हार दिसताक्षणी अर्धे राज्‍य बक्षीसाच्‍या आशेने एका सैनिकाने त्‍या पाण्‍यात उडी मारली. सगळीकडे शोधले त्‍याने पण हार काही मिळाला नाही. हार जणू गायबच झाला. सैनिकाने मारलेली उडी पाहून कोतवालाच्‍या मनातही लोभ निर्माण झाला. त्‍यानेही अर्धे राज्‍य मिळविण्‍यासाठी त्‍या नाल्‍यात उडी मारली. पण हार पुन्‍हा गायब झाला. त्‍या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजाजनांनाही तो हार दिसला व सगळेजण बक्षीसाच्‍या आशेने त्‍या घाण पाण्‍यात उड्या मारू लागले पण हार कुणाच्‍याच हातात येत नव्‍हता. सगळेजण उडी मारताहेत पाहून मंत्री, सरदारही, मुख्‍य प्रधानजी यांनाही अर्ध्‍या राज्‍याची हाव सुटली व तेही घाणेरड्या पाण्‍यात उड्या मारू लागले. पण हार काही सापडेना. जेव्‍हा कोणी उडी मारे तेव्‍हा हार गायब होऊन जाई. हार सापडत नाही हे लक्षात आले की तो मनुष्‍य त्‍या पाण्‍याच्‍या वास सहन न झाल्‍याने पटकन पाण्‍यातून निघून बाहेर येई व तो बाहेर पडता क्षणी हार पुन्‍हा दिसू लागे. मंत्री, सरदार, मुख्‍य प्रधान यांनी घाणेरड्या पाण्‍यात उड्या मारून हार शोधण्‍यासाठी प्रयत्‍न केले हे राजाच्‍या कानावर गेले व त्‍याला वाटले की यांनी जर हार शोधला तर मला माझे अर्धे राज्‍य गमवावे लागेल. त्‍यासाठी राजाही तेथे आला व त्‍याने आपली राजवस्‍त्रे उतरवली आणि त्‍यानेही त्‍या नाल्‍यात उडी मारली. त्‍याचवेळेस तिथून एक संत जात होते. राजाला उडी मारलेली पाहिली आणि तो मोठमोठ्याने हसू लागले. त्‍यांनी विचारले हे काय चालले आहे.? सगळेजण असे चिखलात, घाणीत का माखला आहात?. राजा असणारा माणूस असल्‍या घाणेरड्या पाण्‍यात का उडी मारतो आहे? लोकांनी उत्तर दिले, राणीचा हार पाण्‍यात पडला आहे म्‍हणून सर्वजण पाण्‍यात उड्या मारत आहेत पण उडी मारताक्षणी कसा कोण जाणे तो हार गायब होतो आहे. संत अजूनच मोठ्याने हसू लागले. लोकांनी त्‍याना विचारले काय झाले? संत त्‍यावर म्‍हणाले,'' अरे वेड्यांनो तुम्‍ही ज्‍या हाराकडे पाहून पाण्‍यात उड्या मारत आहात तो हार झाडावर आहे आणि पाण्‍यात दिसते आहे ते त्‍याचे प्रतिबिंब आहे. खरा हार हा झाडावर आहे आणि तुम्‍ही प्रतिबिंबाला हार समजून पाण्‍यात शोधत आहात.'' लोकांच्‍या लक्षात खरा प्रकार आल्‍यावर लोक शरमिंदा झाले. तात्पर्यः मानवी जीवनाची पण आज त्‍या लोकांप्रमाणेच अवस्‍था झाली आहे. जे आपल्‍याला पाहिजे आहे त्‍याच्‍या प्रतिरूपाकडे, प्रतिबिंबाकडे पाहून आपण ते मिळविण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत. खरे सुख, समाधान, शांती, मनस्‍वास्‍थ्‍य हे शोधण्‍यापेक्षा आपण त्‍याची प्रतिरूपे, प्रतिबिंबे जवळ करत आहोत. यातून काही मिळण्‍यापेक्षा आपण कितीतरी गोष्‍टी गमावित आहोत. खरंय ना ! संकलित

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/10/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९८६ - युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठवरील सर्व निर्बंध काढून टाकले 💥 जन्म :- १८७४ - कवी भा. रा. तांबे १९२० - के.आर. नारायणन, भारतीय राष्ट्रपती १९२३ - अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक. १९४७ - समाजसेवक डॉ. विकास आमटे १९५४ - पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल १९८४ - इरफान पठाण, भारताचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १६०५ - तिसरा मोगल सम्राट अकबर १७९५ - सवाई पेशवा माधवराव १९८७ - क्रिकेटपटू व समालोचक विजय मर्चंट २००१ - अभिनेता प्रदीप कुमार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्वीस आणि अरुण फरेराला अटक; पुणे पोलिसांची मुंबईत कारवाई * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *देशातील सर्वाधिक श्रीमंत महाराष्ट्रात, अब्जाधिशांच्या यादीत 4 चौथ्या स्थानावर असलेल्या गुजरातमध्ये सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांचे नाव प्रथम स्थानावर.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केली १५० उमेदवारांची यादी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाची कार्यवाही पूर्ण करण्याची मराठा क्रांति ठोक मोर्चाची मागणी. अन्यथा २५ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा. १ डिसेंबरपासून आंदोलन तीव्र केले जाईल, समन्वयकांची माहिती.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *तिरुपती बालाजी मंदिरात येत्या 1 नोव्हेंबरपासून प्लास्टिक वापरावर बंदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे : आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताच्या पूजा धांडाने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची केली कमाई, सहा वर्षांनंतर जागतिक स्पर्धेत भारताला पदक.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ Follow me on Share Chat बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे https://sharechat.com/post/JZnQpg5 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोबाईल क्रांती आणि जीवन* https://nasayeotikar.wordpress.com/2018/05/10/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कवी भा. रा. तांबे* भास्कर रामचंद्र तांबे अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी होते. हिंदी काव्य, उर्दू नज्म आणि गजल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. त्यांची समग्र कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. त्यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७३ रोजी ग्वाल्हेर संस्थानातील झाशीजवळच्या मुंगावली या गावी झाला. तांबे यांचे मूळ गाव कोकणातील खेटकुई. तांबे यांनी आपली पहिली कविता शाळेत असतानाच लिहिली. चिपळूणकर, आगरकर यांच्या लेखनाचा अभ्यास त्यांनी केला. शिवाय बायरन, शेले, किट्स, वर्डस्वर्थ, टेनिसन, ब्राऊनिंग या इंग्रजी कवींच्या कवितांचाही त्यांनी अभ्यास केला. कायद्याचा अभ्यास हे निमित्त झाले आणि त्यांनी उर्दू भाषाही शिकून घेतली. ग्वाल्हेर संस्थानच्या शिक्षणखात्यात त्यांनी अकरा वर्षे नोकरी केली. ग्वाल्हेर दरबारने त्यांना राजकवी हा किताब दिला. त्यांच्या जवळजवळ अडीचशे कविता उपलब्ध आहेत. गायनातील नोटेशन्सचा त्यांनी अभ्यास केला होता. खंडकाव्य, स्फुटकाव्य, लेखन, भाषणे, अभिप्राय, प्रस्तावना, नाटक अशी त्यांची विपुल आणि विविधांगी साहित्यसंपदा आहे.    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे ?* ल्योन, फ्रान्स *२) जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण ?* ऋषभ देव *३) र्जमनीचा हुकुमशहा हिटलरची संघटना कोणती ?* नाझी संघटना *४) इराणची राजधानी कोणती ?* तेहरान *५) चौथ्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण ?* पी. एन. सिंघल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  दगडू गारकर, लातूर ●  ओम माळवतकर ●  मोहिनी रावजीवार ●  प्रतीक बादेवाड, मुखेड ● श्रीमती छाया माळवाळ, खुलताबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बेगड* बेगडाचा रंग असा किती काळ रहातो काही दिवसातच तो पांढरा होऊन जातो चमकण्या पुरतेच ते लोकांना छान दिसते रंग गेला की बेगड खुपच घाण दिसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••●‼ *विचार धन* ‼●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कळायला लागल्यापासून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेक गोष्टी कराव्या लागतात. वयाचा काही काळ त्यांना संस्कार, संस्कृती या नावाने ओळखले जाते. तर एका विशिष्ट वयानंतर त्याला 'कर्तव्य' ही संज्ञा प्राप्त होते. मग कुटुंबात, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी केले जाणारे काम हेही कर्तव्यात मोडते. 'कामात देव शोधा' हे जीवनाचे खरे तत्वज्ञान मानले पाहिजे. "कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो।" हे ज्याला कळले, तोच पुढे जातो.* *कामाशी साधली जाणारी एकरूपता, त्यातून दिसणारी तादात्म्यता हाही 'उपासना' मार्गच आहे.* *जो करी कर्म अहेतु निरंतर,* *देव तयास मिळो न मिळो रे।* *यातून कवीला जे सांगायच आहे, त्याचे चिंतन करूया. त्यासाठी 'मोहाच्या फुलबागा' दूर सारायला हव्यात. त्यासाठी मनाची अवस्था कोती असून चालणार नाही. आकाशाएवढे मन झाले, तरच नव्या पिढीसमोर आदर्श उभे राहतील. जन्मलेल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या वेदनेला सामोरे जावे लागते. कुणीही त्यातून सुटत नाही. हे टाळून पुढे जाऊया, मनाचा विकास साधूया....* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 46* बार-बार तोसों कहा, सुन रे मनुवा नीच। बनजारे का बैल ज्यों, पैडा माही मीच। अर्थ : साधू व सज्जन मानवातील वैगुण्य नाहिसं व्हावं. म्हणून सतत उपदेश करीत असतात. परंतु बहुतांश माणसांच्या स्वभावातील मुळ वाकडेपण जाता जात नाही. कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे ते पुन्हा-पुन्हा मुळ स्वभाव धारण करीत असतं. अशा निर्लज्ज प्रवृत्तींना उद्देशून महात्मा कबीर म्हणतात , हे निर्लज्ज माणसा ! सज्जनांचे म्हनणे ऐक ! त्यात तुझी भलाई आहे. वारंवार सांगतो आहे. परंतु तुझ्या वर्तनात बदल का होत नाही ? जीवनातला निखळ आनंद घ्यायचा सोडून तू मोहांच्या मागे का धावत आहेस ? पतंगाला दिव्याचा मोह होतो. तिथं गेल्यावर आच (आग) लागून शरीराची हानी होणार आहे. हे माहित असूनही त्याने मोहांध होवून दिव्यावर धाव घेत स्वतःचे पंख जाळून घ्यावेत अन पंखहिन तडफड करीत राहावे. तशी तुझी गत झाली आहे. फिरत्या व्यापार्‍याच्या गोण्या वाहणार्‍या बैलाला खायला प्यायला चांगलं भेटत असलं तरी तरी त्याला रानवार्‍याचा मुक्त आस्वाद घेता येत नाही. डिरक्या मारून मनसोक्त चौखूर उधळण्याची आपल्या भाईबंदासोबत मजा चाखता येत नाही. कंटाळवाणं, निरस व भारवाही जगणं जगता जगता-जगता एक दिवस भटकंतीच्या मार्गावरच आपल्या जीवनाचा नकळत शेवट होऊन जातो. जन्माला आल्याच्या अन जीवन जगल्याच्या कोणत्याच पाऊलखुणा मागे न सोडता भूईला भार होऊन जगण्याची खंत मनी घेवून एक दिवस अस्तित्वहीन होवून जावं लागतं. तेव्हा आतापासून तुझ्या हाती असणार्‍या वेळेचा सदुपयोग करून जीवन सार्थक करून घ्यावंस असा संतोपदेश असतो . शेवटी रडत-रडत जगायचं का धडपडत उभं राहायचं हा सर्वस्वी तुझा तुच निर्णय घ्यायचा आहे ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपली ओळख इतरांपेक्षा वेगळी करून द्यायची असेल तर आपल्याला इतरांपेक्षा वेगळे काहीतरी चांगले करावे लागेल आणि चांगले काही नवीन करण्यासाठी आपल्यातल्या कल्पकतेला चालना दिली पाहिजे.तसेच इतरांमध्ये जे नाही ते आपल्याला वेगळे सिद्ध करून दाखवावे लागेल.आपल्यातील असलेल्या कलेकडे एकदा का आकृष्ट झाले की,मग आपली ओळख लोकांना स्वत: होऊन द्यायची गरज नाही. लोक आपोआपच आपल्याला जगापेक्षा वेगळे काहीतरी आहे म्हणून ओळखायला लागतील. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌟🌙🌟🌙🌟🌙🌟🌙🌟🌙 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नाद - sounds* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रतिबिंब* फार वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. एक राणी आपले ओले केस सुकविण्‍यासाठी राजवाड्याच्‍या छतावर गेली होती. तिने आपला मौल्‍यवान कंठा काढून बाजूला ठेवला व केस विंचरू लागली. इतक्‍यात तिकडून एक कावळा आला. कावळयाला तो कंठा(गळ्यातील हार) म्‍हणजे काहीतरी खाण्‍याची गोष्‍ट वाटली व तो कंठा घेऊन कावळा उडून गेला. एका झाडावर बसून त्‍याने कंठा खाण्‍यासाठी प्रयत्‍न केले. मौल्‍यवान अशा कंठ्यामध्‍ये हिरे जडलेले होते. कठोर अशा हि-यांवर चोच मारून मारून तो थकला व त्‍याने ते खाण्‍याचा नाद सोडून दिला. तो कंठा तसाच झाडावर लटकत ठेवून त्‍याने आकाशात भरारी मारली ते अन्नाचा शोध घेण्‍यासाठी. इकडे राणीने केस विंचरले व तिच्‍या लक्षात एक गोष्‍ट आली की आपला मौल्‍यवान कंठा गायब झाला आहे. इकडेतिकडे शोध घेऊनही तिला तो सापडेना शेवटी ती रडत रडत राजाकडे गेली व म्‍हणाली,'' महाराज माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे. तुम्‍ही त्‍याचा शोध घेण्‍याचे आदेश द्या.'' राजा म्‍हणाला,'' दुसरे इतरही दागिने आहेतच की तुला. तोच कंठा कशाला पाहिजे.'' राणीने ऐकले नाही व तोच कंठा पाहिजे म्‍हणून हट्ट धरून बसली. राजाने कंठा शोधण्‍याचे आदेश दिले. सर्वजण तो शोधू लागले पण कोणाला काही तो कंठा सापडेना. राजाने कोतवालाला बोलावून सांगितले की आजच्‍या आज तू, सर्व शिपाई, सैनिक, प्रजा सगळे मिळून त्‍या हाराचा शोध घ्‍या. जो कोणी तो हार आणून देईल त्‍याला आपण अर्धे राज्‍य बक्षीस म्‍हणून देऊ अशी घोषणाही त्‍याने त्‍यावेळी केली. अर्धे राज्‍य बक्षीस मिळेल या आशेने सर्वजणच कामाला लागले. सगळीकडे शोधयंत्रणा सुरु झाली. शोधता शोधता अचानक कुणाला तरी तो हार सापडला. एका घाणेरड्या पाण्‍याच्‍या नाल्‍यामध्‍ये त्‍याला तो हार दिसला. पाणी इतके घाणेरडे होते की जवळून जातानासुद्धा किळस यावी, दुर्गंध सर्वत्र पसरला होता. पण त्‍या पाण्‍यात तो हार पडलेला दिसून येत होता. हार दिसताक्षणी अर्धे राज्‍य बक्षीसाच्‍या आशेने एका सैनिकाने त्‍या पाण्‍यात उडी मारली. सगळीकडे शोधले त्‍याने पण हार काही मिळाला नाही. हार जणू गायबच झाला. सैनिकाने मारलेली उडी पाहून कोतवालाच्‍या मनातही लोभ निर्माण झाला. त्‍यानेही अर्धे राज्‍य मिळविण्‍यासाठी त्‍या नाल्‍यात उडी मारली. पण हार पुन्‍हा गायब झाला. त्‍या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजाजनांनाही तो हार दिसला व सगळेजण बक्षीसाच्‍या आशेने त्‍या घाण पाण्‍यात उड्या मारू लागले पण हार कुणाच्‍याच हातात येत नव्‍हता. सगळेजण उडी मारताहेत पाहून मंत्री, सरदारही, मुख्‍य प्रधानजी यांनाही अर्ध्‍या राज्‍याची हाव सुटली व तेही घाणेरड्या पाण्‍यात उड्या मारू लागले. पण हार काही सापडेना. जेव्‍हा कोणी उडी मारे तेव्‍हा हार गायब होऊन जाई. हार सापडत नाही हे लक्षात आले की तो मनुष्‍य त्‍या पाण्‍याच्‍या वास सहन न झाल्‍याने पटकन पाण्‍यातून निघून बाहेर येई व तो बाहेर पडता क्षणी हार पुन्‍हा दिसू लागे. मंत्री, सरदार, मुख्‍य प्रधान यांनी घाणेरड्या पाण्‍यात उड्या मारून हार शोधण्‍यासाठी प्रयत्‍न केले हे राजाच्‍या कानावर गेले व त्‍याला वाटले की यांनी जर हार शोधला तर मला माझे अर्धे राज्‍य गमवावे लागेल. त्‍यासाठी राजाही तेथे आला व त्‍याने आपली राजवस्‍त्रे उतरवली आणि त्‍यानेही त्‍या नाल्‍यात उडी मारली. त्‍याचवेळेस तिथून एक संत जात होते. राजाला उडी मारलेली पाहिली आणि तो मोठमोठ्याने हसू लागले. त्‍यांनी विचारले हे काय चालले आहे.? सगळेजण असे चिखलात, घाणीत का माखला आहात?. राजा असणारा माणूस असल्‍या घाणेरड्या पाण्‍यात का उडी मारतो आहे? लोकांनी उत्तर दिले, राणीचा हार पाण्‍यात पडला आहे म्‍हणून सर्वजण पाण्‍यात उड्या मारत आहेत पण उडी मारताक्षणी कसा कोण जाणे तो हार गायब होतो आहे. संत अजूनच मोठ्याने हसू लागले. लोकांनी त्‍याना विचारले काय झाले? संत त्‍यावर म्‍हणाले,'' अरे वेड्यांनो तुम्‍ही ज्‍या हाराकडे पाहून पाण्‍यात उड्या मारत आहात तो हार झाडावर आहे आणि पाण्‍यात दिसते आहे ते त्‍याचे प्रतिबिंब आहे. खरा हार हा झाडावर आहे आणि तुम्‍ही प्रतिबिंबाला हार समजून पाण्‍यात शोधत आहात.'' लोकांच्‍या लक्षात खरा प्रकार आल्‍यावर लोक शरमिंदा झाले. तात्पर्यः मानवी जीवनाची पण आज त्‍या लोकांप्रमाणेच अवस्‍था झाली आहे. जे आपल्‍याला पाहिजे आहे त्‍याच्‍या प्रतिरूपाकडे, प्रतिबिंबाकडे पाहून आपण ते मिळविण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत. खरे सुख, समाधान, शांती, मनस्‍वास्‍थ्‍य हे शोधण्‍यापेक्षा आपण त्‍याची प्रतिरूपे, प्रतिबिंबे जवळ करत आहोत. यातून काही मिळण्‍यापेक्षा आपण कितीतरी गोष्‍टी गमावित आहोत. खरंय ना ! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

समानार्थी शब्दः १. हत्ती - *गज* २. पंकज - *कमळ* ३. तोंड - *वदन* ४. पाणी- *जल* ५. नमस्कार - *नमन* ६. बाप- *जनक* ७. बाण - *शर* ८. बाग- *उपवन* ९. समस्या- *अडचण* १०.घास- *कवळ* ११.धाक - *जरब* १२.भांडण - *कलह* १३.नवरा- *वर* १४.पर्वत - *अचल* १५.कठीण - *अवघड* १६.पुरुष - *नर* १७.द्रव्य - *धन* १८.आवश्यकता - *गरज* १९.उलगडा- *उकल* २०.दूध- *पय* २१.रूची- *चव* २२.गंध - *दरवळ* २३.गृह- *घर* २४.घोडा - *पवन* २५.पाऊल- *पद* २६.डोळा - *नयन* २७.तृण - *गवत* २८.रस्ता - *सडक* २९.हात- *कर* ३०.वारा- *पवन* ३१.सुवर्ण - *कनक* ३२ अंबर - *गगन* ३३.खून - *रगद* ३४.रास - *थर* ३५.कप्पा - *खण* ३६.पक्षी - *खग* ३७.किल्ला- *गड* ३८.अवचित - *एकदम* ३९. मृत्यू - *मरण* ४०.अग्नि - *अनल* ४१.काळ - *यम* ४२.जंगल - *वन* ४३.अविरत - *सतत* ४४.आश्चर्य - *नवल* ४५.अभिनेता- *नट* ४६.ढग - *जलद* ४७.पोट- *उदर* ४८.अंधार- *तम* ४९.ध्वनि- *रव* ५०.ओझे- *वजन*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/10/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९३६ - हूव्हर धरण मधील पहीला जलविद्युत जनित्र कार्यरत झाला १९४७ - जम्मू आणि काश्मीर चे राजा हरी सिंग यांनी आपल्या राज्याची भारतीय गणराज्यात विलनीकरणास् मान्यता दिली 💥 जन्म :- १२७० - संत नामदेव महाराज १८९० - गणेश शंकर विद्यार्थी, भारतीय पत्रकार व भारतीय स्वातंत्र्यसैनिक १९३७ - संगीतकार हृदयनाथ मंगेशकर १९५० - तिरुमलै श्रीनिवासन, भारतीय क्रिकेट खेळाडू १९७० - रवीना टंडन, भारतीय अभिनेत्री १९८५ - असिन तोट्टुंकल, दक्षिण भारतीय अभिनेत्री १९९१ - अमाला पॉल, दक्षिण भारतीय अभिनेत्री 💥 मृत्यू :- १९९१ - स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक अनंत काशिनाथ भालेराव *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सूरत येथील प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकीया यांनी यंदा दिवाळी भेट म्हणून त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना दिले सहाशे कार * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *ऑपरेशन ऑलआऊट : बारामुला आणि अनंतनागमधील चकमकीत लष्कराकडून ६ दहशतवाद्यांचा खात्मा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *बोट दुर्घटनेतील दोषींवर कारवाई होणार, फास्ट ट्रॅक चौकशी केली जाणार- गृहराज्यमंत्री दीपक केसरकर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जायकवाडी धरणात 26 ते 31ऑक्टोबरदरम्यान पाणी सोडणार; कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांचे लेखी आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *निवडणुकांसाठी तिसरं मूल दत्तक दिलं तरीही 'उमेदवारी बाद अन् पद धोक्यात' ओडिशातील एका प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाचा निकाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वॅन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वेस्ट इंडिजविरुद्धच्या उर्वरित तीन वन डेसाठी भारतीय संघ जाहीर, जस्प्रीत बुमरा व भुवनेश्वर कुमार यांचे पुनरागमन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ Follow me on Share Chat बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे https://sharechat.com/post/xp8bKlX *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मजबूत मन म्हणजेच यश* https://nasayeotikar.wordpress.com/2018/05/12/%e0%a4%ae%e0%a4%a8/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *हृदयनाथ मंगेशकर* हे प्रसिद्ध मराठी संगीतकार आहेत. नामवंत पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले या त्यांच्या थोरल्या बहिणी आहेत. त्यांनी काही निवडक मराठी (उदा. चानी, जैत रे जैत, उंबरठा, निवडुंग) आणि हिंदी (उदा. धनवान, सुबह, मशाल, लेकिन, माया मेमसाब) चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले असले आणि यांतील बरीचशी गाणी गाजली असली तरी त्यांची ओळख प्रामुख्याने महाराष्ट्राचे 'भावगंधर्व' अशी करून देण्यात येते ती त्यांच्या अनेक अनवट चालींनी सजलेल्या आणि मराठी जगतात गाजलेल्या मान्यवर मराठी कवी आणि गीतकारांच्या कविता आणि गीतांमुळे. सुरेश भट, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर, ग्रेस, शांता शेळके यांच्या अनेक कविता मराठी माणसापर्यंत पोहोचल्या त्या हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या अनवट, भावपूर्ण चालींमुळेच. मराठीतले आद्यकवी आणि संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतामुळे मराठी जनसामान्यांच्या ओठी रुळल्या आहेत. मराठी भावसंगीतापलिकडे त्यांनी अमराठी जगतातही गालिबच्या गझला, संत मीराबाई, कबीर, सुरदासांच्या रचना, भगवद्‌गीतेतील काही श्लोक संगीतबद्ध करून प्रामुख्याने आपल्या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांच्याकडून गाउन घेऊन अजरामर केले आहेत. त्यांच्या चाली हिंदुस्थानी अभिजात संगीत आणि रागदारींवर आधारित असल्यातरी त्यातही ते अनेक नवनवीन प्रयोग करतात. आपले वडील आणि संगीत नाटकांच्या जमान्यातले प्रख्यात गायक-नट मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची पदेही ते आपल्या संगीतरचनांमधे वापरतात. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) पारादीप बंदर कोठे आहे ?* ओडिशा *२) राज्यसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहेत ?* उत्तर प्रदेश *३) कंबोडियाची राजधानी कोणती ?* नॉमपेन्ह *४) राष्ट्रपती कोणत्या कलमाद्वारे वटहुकूम काढतात ?* कलम १२३ *५) 'कोलाज' या पुस्तकाच्या लेखिका कोण ?* शरीष पै *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  संगीता संतोष कंदेवार - नामेवार ●  माधव लिंबाजीराव गव्हाणे ●  अविनाश थोरात ●  नवनाथ शिंदे ●  गणेश पालदेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शब्द* शब्दांना ह्रदयाच्या तराजूत तोललं पाहिजे विचार करून माणसाने कधीही बोललं पाहिजे विचार करून बोलतात ज्यांना कळते शब्दाचे मोल कायम लक्षात रहातात आपल्या माणसाचे बोल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचारधन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बायबलमध्ये एक महान बोधकथा आहे. एका अविवाहित स्त्रीच्या हातून घडलेल्या चुकीचा आपल्या सोयीचा अर्थ लावून नादान लोक तिला दगड-धोंड्यांनी ठेचून मारायला धावतात. ती जीवाच्या आकांताने पळत सुटते, खाली कोसळते तेव्हा तिच्यासमोर महाकारूणिक प्रभू येशू उभा असतो. ती त्यांचे पाय धरून आपले प्राण वाचविण्यासाठी गयावया करते. प्रभू तिला अभय देत उभं करतात आणि लोकांना विचारतात 'लोक हो., आपण हिच्या जीवावर का उठलात?' लोकातून क्रोधाने तप्त लाल झालेली वाक्य उत्तरतात 'हि पापीण आहे. हिने फार मोठे पाप केले आहे. हिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, पुन्हा घोळका ओरडतो..मारा..मारा धोंड्यांनी मारा हिला..* *तितक्यात प्रभू पुन्हा धीरगंभीर अन् शांत मुद्रेने त्यांना म्हणतात 'बाबांनो, हिने खरोखरच पाप केले असेल तर तुम्ही मानता त्या कायद्याप्रमाणे ती दोषी आहे आणि दोषीला तुम्हीच शिक्षा देणारे असाल तर पहिला दगड फक्त त्यानेच उचलावा, ज्याने आयुष्यात चुकूनसुद्धा एकही पाप केले नाही. असा प्रस्ताव मांडताच सर्वजण परस्परांच्या नजरा चुकवत एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या हातातील दगडांची पकड सैल झाली. सर्वांच्या हातातले दगड धरतीवर लोळत येशूला शरण गेले. कारण त्या लोंढ्यात एकही निष्पाप नव्हता. प्रत्येकाचे हातून लहान-मोठी पापे झालेलीच होती. ते सर्व माना खाली घालून पराभूतागत पाठमोरे झाले. त्या स्त्रीचे प्राण वाचले. तिने तिची चूक मान्य केली, ती प्रभुभक्त झाली...* *"लोकांच्या हातुन गळून पडलेले दगड आजही पूर्ण निष्कलंक माणसाच्या हाताच्या स्पर्शाची वाट पहात तिथेच पडून आहेत..पण निष्पाप हात त्यांना स्पर्शायला पुढे धजले नाहीत."* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 45* धर्म किये धन ना घटे, नदी न घट्ट नीर । अपनी आखों देखिले, यों कथि कहहिं कबीर । अर्थ धर्मार्थ दान केल्याने संपत्ती घटत नाही. मात्र ते दान डोळसपणाने केलेले असावे. धर्म मानवता व सहिष्णूवृत्ती जपणारा असावा. न्याय, निती विवेकाचं अधिष्ठाण असणारा असावा. त्यात सर्वांप्रति कैवल्यभाव असावा. अंधश्रद्धा व वाईट रूढी-परंपरांना तेथे वाव असता कामा नये, अशावेळी परोपकारार्थ सांपत्तिक, वैचाचारिक, श्रमिक दान व सेवा व्हायलाच हवी. त्यातून समाजाला चालना, प्रेरणा निळते, नदीकडे पहा ना ! ती सदैव वाहत राहाते. तहानलेल्या जीवांना तृप्त करते. आजूबाजूच्या परीसराला सिंचित करून सृष्टी सौंदर्य खुलवित असते. वसुंधरेच रूपही बदलत असते. पशू पक्षी सार्‍यांचं जीवन खुलवित असते.त्यामुळे काय तिचे जल नाहिसे होत असते का ? उलट ती नदीमाय, जीवनदियिनी, कामिनी, अशी संबोधनं त्या त्या भागात धारण करीत असते. त्यात नदीच्या जीवनाची सार्थकता व साफल्य सामावलेलं असतं. मानसानंही नदीसारखंच सत्पात्री दान करावयाला शिकायला हवे. खर्‍या धर्मानं वागून तर बघा. कसा जीवनाचा परिमल सर्वत्र दरवळायळा लागतो. लोकादर करणारा राम, न्यायाची बाजू घेणारा कृष्ण ही अजरामर झालेली पात्रं. बुद्धांनी कारूण्याचं दान केलं ते महाकारूणी ठरले. राजा अशोकानं व हर्षानं संपत्तीचा जनतेच्या भल्यासाठी डोळसपणे वापर केला. ती साम्राज्यं सुवर्णकाळ म्हणून ओळखली जातात. ज्ञानदेवांनी संस्कृतातलं बंदिस्त ज्ञान प्राकृतात आणलं. तुकोबांच्या जीवनविषयक सुलभ तत्वज्ञानानं पाचव्या वेदाची जागा घेतली. शिवबांनी युक्तीला कर्तृत्वाचं दान देत अन्यायी राज सत्तांना नामशेष करीत सामाजिक बुरसट रुढी-परंंपरांना छेद देत रयतेचं शिवराज्य निर्माण केलं. ह्या सर्व जीवनदानाच्याच सुंदर अभिव्यक्तीची फलश्रुतीच नव्हे काय ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याला हुशारीचा, ज्ञानाचा आणि मीपणाचा अहंकार आहे त्याला पशूपातळीच्याच अवस्थेतला आहे असे समजावे.कारण तो ज्ञान असून चांगल्यासाठी उपयोगात आणत नाही, ज्ञान आहे, हुशारी आहे पण तो जर फक्त मी पणाचा टेंभा मिरवत असेल तर हा मुर्खपणाचा कळसच म्हणावा लागेल. जर हे सर्वकाही स्वत:च्या जीवनात मिळवलेल्या ज्ञानाच्याआधारे चांगला बदल घडवून आणत असेल आणि जे काही ज्ञान लोकांपर्यंत लोकांच्या जीवनात बदल घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो खरा निगर्वी व परोपकारी माणूस समजावे. अशी माणसे बोटावर मोजण्याइतकी कमी प्रमाणात पहायला मिळतात. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महती - Great* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महती आईची* एकदा एका व्‍यक्तीने स्‍वामी विवेकानंदांना प्रश्‍न विचारला,'' स्‍वामीजी, संसारामध्‍ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्‍याला का दिले जात नाही?मातेइतकाच पितासुद्धा महत्‍वाचा असूनसुद्धा पित्‍याला फारसे का महत्‍व दिले जात नाही याचा कृपया उलगडा करावा.'' स्‍वामीजी यावर काहीच बोलले नाही. ते त्‍या व्‍यक्तिपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्‍यांनी उचलला व त्‍या व्‍यक्तिच्‍या हाती देत ते म्‍हणाले,'' बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्‍यनेमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळून जाईल.'' दुस-या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्‍वामी विवेकानंदांकडे आला,'' स्‍वामीजी माझी कंबर, पोट दोन्‍हीही खूप दुखत आहे. एक प्रश्‍न काय विचारला मी, तुम्‍ही असे काय विचित्र उत्तर दिले त्‍याचे. माझी कंबर, पोट अगदी दुखून मी हैराण झालो आहे.'' स्‍वामी मंद स्मित करत म्‍हणाले,'' बंधू, तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळाले नाही काय? अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही. त्‍या मातेची महती ही तिन्‍ही लोकांत सर्वश्रेष्‍ठच आहे. '' तात्‍पर्य :- आईसारखे दैवत सा-या जगतामध्‍ये नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*माझी शाळा माझे उपक्रम* 📚📚📚📚📚📚 आज दि.२५-१०-२०१८ रोजी वर्ग पहिली व दुसरी चा विद्यार्थ्यांचा रिंगणखेळ हा उपक्रम घेतला. साहित्य ➖रिंगण, सागरगोटे दशक साठी आणि लहान खडे एकक म्हणून वापरले. कृतीः गोलातील प्रत्येक मुलास रिंग टाकण्याची संधी देणे व रिंगणात किती एकक दशक आहेत ते मोजून सांगणे बाकी विद्यार्थी तितकी संख्या लिहतील. उद्दिष्टः 🌸 एकक व दशक संकल्पना समजणे, दृढ होणे. 🌸 मोजणे आणि लिहिणे, सांगणे 🌸 संख्यालेखन सराव. 〰〰〰〰〰〰〰 ✍ वर्गशिक्षिका श्रीमती सेनकुडे जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. ➖➖➖➖➖➖➖

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/10/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५१ - स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीला सुरुवात २००१ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज एक्स.पी. ही संगणकप्रणाली प्रकाशित केली २००७ - एरबस ए-३८०चे प्रथम प्रवासी उड्डाण. 💥 जन्म :- १९३७ - संगीत समीक्षक अशोक रानडे १९४५ - अभिनेत्री, चित्रपट निर्माती अपर्णा सेन 💥 मृत्यू :- १९५५ - शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू उर्फ बापूराव पलूसकर १९८० - शायर व गीतकार साहिर लुधीयानवी २००३ - स्वाध्यायचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले २००९ : अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन. २०१२ - विनोदी अभिनेते जसपाल भट्टी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमास निघालेल्या स्पीडबोटीला अपघात, एकाचा मृत्यू; राज्य शासनातर्फे मृताच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *केंद्रीय दक्षता आयोग सीबीआयच्या अधिकाऱ्यांवरील आरोपांची करणार चौकशी - अर्थमंत्री अरुण जेटली* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी जस्टीस नरेश एच. पाटील यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये 4 टक्क्यांची घसरण, येत्या काळात पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *एम. नागेश्वर राव यांनी स्वीकारला सीबीआयच्या अंतरिम संचालकपदाचा कार्यभार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारत स्टेज - IV (BS-IV) वाहनांच्या विक्री आणि नोंदणीवर 1 एप्रिल, 2020 पासून बंदी : सर्वोच्च न्यायालय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विशाखापट्टणम : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दहा हजार धावांचा टप्पा 205 सामन्यांमध्ये ओलांडत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला टाकले पिछाडीवर.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://sharechat.com/post/7d6dMGQ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरज तेथे मदत करा* https://nasayeotikar.wordpress.com/2018/05/14/%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%a4/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर* हे मराठी नाट्य-अभिनेते, चित्रपट अभिनेते होते. सुमारे सहा दशके त्यांनी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्र गाजवले. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी महाराष्ट्रात अमरावती येथे झाला. त्यांचे वडील चिंतामणराव कोल्हटकर हेसुद्धा नाटकांतून अभिनय करत असत. भावबंधन नाटकातील मोरेश्‍वर या भूमिकेतून १९४४ मध्ये कोल्हटकरांचे नाट्यक्षेत्रात पदार्पण झाले. तत्पूर्वी १९४७ मध्येच भालजी पेंढारकरांच्या गरिबांचे राज्य या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला. १९५0 साली कुंकवाचा धनी चित्रपटात त्यांनी नायकाची व्यक्तिरेखा केली. यानंतर पेडगांवचे शहाणे, शेवग्याच्या शेंगा, मोहित्याची मंजुळा, हिरवा चुडा, थांब लक्ष्मी कुंकू लावते, जावई माझा भला, तू तिथे मी आदी ८0पेक्षा जास्त चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. अभिनयाशिवाय कोल्हटकरांनी नाटकांचे दिग्दर्शनही केले. १९६४ सालातले मोहिनी हे त्यांनी दिग्दर्शिलेले पहिले नाटक होते. १९४९ साली जेव्हा त्यांनी पहिल्यांदा भावबंधन केले, तेव्हा लता मंगेशकरही त्या नाटकात होत्या.आगर्‍याहून सुटका, बेबंदशाही, पद्मिनी, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट आदी प्रसिद्ध मराठी नाटकांतून त्यांनी अजरामर भूमिका केल्या. चित्तरंजन कोल्हटकरांच्या ऐतिहासिक नाटकातील भूमिका अतिशय गाजल्या. भावबंधनप्रमाणेच एकच प्याला, स्वामिनी, दुरिताचे तिमिर जावो, गारंबीचा बापू, पंडितराज जगन्नाथ, अर्शूंची झाली फुले इ. नाटकांमधील त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा एक गोष्ट प्रत्यक्षात आणणारा श्रेष्ठ होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) म्यूज ही नदी कोणत्या देशात आहे ?* बेल्जियम *२) गदर पार्टीची स्थापना कधी झाली ?* १९१३ *३) भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला कधी हलवण्यात आली ?* १९१२ *४) लोकसभेच्या अध्यक्षांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?* पाच वर्षांचा *५) एडीबी हे कशाचे संक्षिप्त रूप आहे ?* एशियन डेव्हलपमेंट बँक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  नितीन गुजराथी, धर्माबाद ●  श्रीनिवास नक्का, लातूर ●  गोविंद येळगे, धर्माबाद ●  प्रथमेश मच्छरलावार ●  जय सिंग चौहान ●  कौशल्या कारवेडकर ●  व्यंकी रॉय *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वाभिमान* बड्या घरच्या श्वानाला सर्रास मान असतो काहींचा स्वाभिमान कुठेही गहान असतो स्वाभिमान गहाण ठेवलास माणूस नको तिथे झुकतो गरज नाही त्या ठिकाणीही तो करंकरं वाकतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.* *राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 45* इष्ट मिले अरु मन मिले, मिले सकल रस रीति । कहैं कबीर तहँ जाइये, यह सन्तन की प्रीति ।” अर्थ – संताचे वर्तन कसे असावे? यावर महात्मा कबीर प्रकाश टाकतात. दैवत, उपासना पद्धती , संपूर्ण रीती-रिवाज आणि आपलं स्वतःचं मन जिथ रमतं, आपल्या साधनेला जिथं अनुकूलता लाभेल. अशी ठिकाणं साधूला प्रिय असली पाहिजेत. मनः शांती लाभली की सर्व समस्यांवरचे उपाय सापडत असतात. खरं तर समस्याच मनःशांतीच्या मार्गातल्या गतिरोधक असतात. म्हणून मनाची शांती ढळणार नाही अशा कृती हाती घेतल्या तर समस्यांना थाराच मिळत नाही. मनाच्या एकाग्रतेसाठी तप , चिंतन, मनन आदि साधना सांगितल्या गेल्या आहेत. या साधनांच्या साध्यतेसाठी काहींनी सर्व भौतिक सोयी सुविधा त्यागून निरव एकांतात स्वतःला गुंतवलं. मानवी वसाहती पासूनही स्वतःला अलिप्त करीत संन्यस्त जीवनाचा अंगीकार केला. ही उपासना असो की संन्यास मानवाच्या कल्याणासाठीच अंगीकारले गेले. जगद्गुरू तुकोबाराय संसारी साधू होते. त्यांच्या व इत्तर काही दार्शनिकांच्या दृष्टीने संसार त्यागून जंगलात जावून बसणे म्हणजे संन्यास नव्हे, तर संसारी व भौतिक सुविधांमध्ये वावरूनही, त्यांच्यापासून अलिप्त राहता येणं. मनाच्या ठायी त्यांच्याप्रति मोह न येऊ देणे .म्हणजे संन्यास ! संसारा मध्पे मन व इंद्रिये पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात नाहीत अशांना जंगलातला एकांत हवा असतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वत:चे दु:खही पचवून दुस-यांच्या दु:खात सहभागी होऊन इतरांसोबत आनंदी राहणारे लोक खूप सुखी होतात.दु:ख कुणाचेही कुणी वाटून घेत नाही परंतु दु:खात सहभागी होऊन काही प्रमाणात सुख देता येते अशी विचार करणारी माणसेही या जगात काही कमी नाहीत.संत,सज्जन असणा-याच्या जीवनात थोडे झोकून पाहिले तर त्यांचे जीवनही सर्वसामान्य माणसांच्याहीपेक्षा अधिक अवघड असते पण ते लोकांसमोर कधीही येऊ देत नाहीत.त्यांना असे वाटते की,आपणच जर आपले दुःख लोकांसमोर मांडले तर त्यांना झालेल्या दु:खातून कशी सुटका होईल हा विचार अशी माणसे करतात.इतरांच्या भावनांशी खेळून त्रास देण्यापेक्षा त्यांना त्यातून सुटका करुन आनंद कसा देता येईल याकडे अधिक लक्ष देतात.अशा वृत्तीची माणसे एक समाजासाठी आदर्श मानले जातात.त्यांचे अनुकरण आपणही करावे व इतरांना आनंद देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कसे फुलवता येईल याकडे अधिक लक्ष द्यायला शिकले पाहिजे,ही देखील एक मानवतेची सेवाच होऊ शकेल.यासाठी कसल्याही प्रकारचा भेद न करता मनमोकळेपणाने संवाद साधून सा-यांचे जीवन सुखी व समृद्ध कसे करता येईल यासाठी दु:खीतासमोर जायला शिकले पाहिजे.ही देखील एक आपली सामाजिक बांधिलकी म्हणून कर्तव्य करायला हवे.यातच आपले खरे समाधान आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌷🍂🌷🍂🌷🍂🌷🍂🌷🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मशगुल - Gossip* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवता* जगाच्‍या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्‍या कुटीत ईश्‍वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्‍यांच्‍याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्‍यांच्‍यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्‍यूनंतर ते जेव्‍हा स्‍वर्गात पोहोचले तेव्‍हा त्‍यांना सोन्‍याचा मुकुट घालण्‍यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्‍यांच्‍या डोक्‍यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्‍याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्‍यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्‍वात कोणत्‍याच दृष्‍टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्‍याचा मुकुट व त्‍या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्‍वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्‍यांचे बोलून झाल्‍यावर देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍ही पृथ्‍वीवर हिरे माणके दिलेली नव्‍हती तेव्‍हा तुम्‍हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्‍या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्‍हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्‍हणजे अश्रू होते. जे त्‍यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्‍येक वाईट गोष्‍टीबद्दल त्‍यांना वाईट वाटले व त्‍याबद्दल त्‍यांच्‍या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्‍ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्‍हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्‍वरभक्ती आणि स्‍नेह यातच खूप आनंदी होतो म्‍हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍हाला ईश्‍वराचा स्‍नेह मिळाला म्‍हणूनच तुम्‍हाला ईश्‍वराचा सोन्‍याचा मुकुट देण्‍यात आला आहे.’’संताना स्‍वत:ची चुक समजली. ते स्‍वत:मध्‍येच मशगुल राहिले. त्‍यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही. तात्‍पर्य:-ईश्‍वरभक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच मानवता होय. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

👏 *आकस्मिक भेट*👏 📚📚📚📚📚📚 आज दि.२४-१०-२०१८ रोजी मा. दिग्रसकर साहेब , शिक्षणाधिकारी (प्रा. ) जि.प. नांदेड , व श्री.मा. बनसोडे साहेब (मनपा.) शिक्षणाधिकारी यांची *जि.प.प्रा.शा.गोजेगाव* केंद्र (भानेगाव) 💐👏💐👏💐👏 👉यांनी परिपाठदरम्यान आकस्मिक भेट दिली. भेटी दरम्यान साहेबांनी विद्यार्थ्याशी शैक्षणिक संवाद साधला. तसेच ज्ञानरचनावाद व तंत्रज्ञान,नवोदय शिष्यवृत्ती वर्ग ह्या विषयी माहिती जाणून घेऊन समाधान व्यक्त केले.तद्वतच मा.कें प्र.श्री जामगडे साहेब यांच्याशीही संवाद साधून त्यांना व आम्हा सर्व शिक्षकांना मार्गदर्शनपर सूचनाही दिल्या.तसेच सर्व विदयार्थ्याना बिस्कीट खाऊ वाटप मा. साहेबामार्फत करण्यात आले . *👉शालेय पोषण* *आहाराबाबतची चौकशी,तसेच दोन्ही डीजीटल रुम बघुन व गुणवत्ता बघुन साहेबांनी समाधान व्यक्त केले.* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 👇👇👇👇 क्षणाचिञे 〰〰〰〰〰〰 *✍शब्दांकन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शि.) जि.प.प्रा.शा.गोजेगाव 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/10/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- 1945 - संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना 1984 - भुयारी रेल्वे कोलकता येथे सुरू 💥 जन्म :- 1910 : मराठी आणि हिंदी चित्रसृष्टीतील अभिनेत्री लीला पेंढारकर 1914 - आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल 1921 - व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण 💥 मृत्यू :- 1992 - मराठी नावकथेचे जनक अरविंद गोखले 2013 - तब्बल पाच दशके आपल्या जादुई, आवाजाने हिंदी चित्रपट संगीतात ठसा उमटवणारे पार्श्वगायक मन्ना डे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १८0 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती केली जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सुप्रीम कोर्टाने देशभरात सरसकट फटाके विक्रीच्या बंदीला नकार दिला असला तरी कमी प्रदूषण करणार्‍या फटाक्यांचीच विक्री केली जावी, असे आपल्या आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर फटाक्यांची ऑनलाईन विक्री करण्यावरही कोर्टाने घातली बंदी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये दिवाळी भेट राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची १२८ कोटींची मालमत्ता लवकरच जप्त होण्याची चिन्हं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : मुंबई शहराच्या डायल-100 प्रकल्पासह शहर सीसीटीव्ही प्रकल्प व्यापक करणार.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विशाखापट्टणम : फॉर्मात असलेल्या आघाडीच्या फलंदाजांच्या जोरावर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध आज होणाऱ्या दुस-या एकदिवसीय लढतीत विजयाची लय कायम राखण्यास उत्सुक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://b.sharechat.com/4Vj4TpwngR *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जाहिरात : एक चिंतन* https://b.sharechat.com/36eeXGAIbR आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पार्श्वगायक मन्ना डे* ख्यातनाम गायक मन्ना डे यांचा जन्म १ मे १९१९ रोजी झाला. त्यांचे मुळ नाव प्रबोधचंद्र डे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोलकाता येथे झाले. त्यांना कुस्ती व बॉक्सिंग खुप आवडत होते. सोबतच ते फुटबॉलप्रेमीसुद्धा होते. महाविद्यालयीन काळात ते अशा स्पर्धांमध्ये भाग घेत असत. त्यांच्या वडिलांची त्यांना वकील बनवण्याची इच्छा होती. वकील बनायचे की गायक अशा द्विधा मनस्थितीत ते होते. मात्र काका कृष्णचंद्र डे यांच्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी गायक बनण्याचे ठरविले.एक दिवस काकांसोबत रियाज करीत असताना बादल खान यांनी त्यांचा आवाज ऐकला आणि विचारणा केली असता आपण असेच गात असतो, असे उत्तर त्यांनी दिले. बादल खान यांनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखली. पुढे त्यांनी काकांसोबत संगीत क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी मुंबई गाठले आणि बॉलिवूडमध्ये गायक म्हणून प्रस्थापित झाले.त्यांनी १९४२ मध्ये तमन्ना चित्रपटापासून आपले करिअर सुरू केले. २०१३ पर्यंत त्यांनी सुमारे तीन हजार पेक्षा अधिक गाणे गायले. हिंदी व बंगाली चित्रपटांमध्ये आणि इतरही भाषांमध्ये त्यांच्या आवाजाला मोठा चाहतावर्ग लाभला. केंद्र सरकारने त्यांना चित्रसृष्टीतील योगदानासाठी १९७१ मध्ये पद्मश्री सन्मान तर २००५ मध्ये पद्मभूषण तर २००७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'पंचतंत्र' या ग्रंथाचे लेखक कोण?* विष्णू शर्मा *२) देशात सोन्याच्या खाणी कोठे आहेत?* कर्नाटक (कोलार) *३) सिमेंटचे कारखाने कोणत्या राज्यात आहेत?* मध्य प्रदेश *४) दक्षिण कोरियाची राजधानी कोणती?* सेऊल *५) भारतात रणगाडा तयार करण्याचा मोठा कारखाना कोठे आहे?* आवडी (तामिळनाडू) *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  गजानन क्यादलवार ●  कृष्णा प्रकाशराव मोरे ●  राज धनकवार ●  माधव कौठवाड ●  सतीश बावणे ●  लक्ष्मीकांत बेंकट ●  पागोजी डुकरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कारलं* कडू कारल्यालाही गोड म्हणून खाता आलं पाहिजे वाईटालाही चांगल्या नजरेने पहाता आलं पाहिजे कारलं कडू म्हणाल तर ते खाता येत नाही वाईट म्हणाल तर त्याला चांगलं म्हणून पहाता येत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोबाइल, फेसबुकच्या आभासी जगाने एक नवी संस्कृती जन्माला घातली आहे. 'मे-फ्लाय संस्कृती' तिचं नाव ! मे-फ्लाय ही उडत्या किड्यांची प्रजाती. मे-फ्लाय प्रवर्गातील एक किडा अल्पकालिक असतो म्हणे. त्याला तोंड वा पोट नसते. असते फक्त विलासी इंद्रिय अन् तसलेच मनही ! तो रक्तहीन असला तरी रतिप्रविण असतो म्हणे. त्याचे आयुष्य चोवीस तासांचेही असत नाही. तीन तासांचे तारूण्य घेऊन जन्माला येणारा तो किडा फक्त पुनरूत्पादनासाठीच जन्मतो. संभोग झाला की मरतो. एकदम 'सर्जिकल स्ट्राइक'च म्हणाना. त्यात शृंगारक्रिया असत नाही. जीवनास्वाद नसतो. असते ओरबाडणे, भोगणे,मरणे नि मारणे..जगणे नसतेच.* *माणूस 'मे-फ्लाय' होणे हे आभासी, चंगळवादी, भोगवादी जीवनशैलीचे अपत्य होय. तुम्ही ठरवायचे की, तुम्हाला ATM जन्माला घालायचे आहे की माणूस! माणूस जन्माला घालायचा असेल, घडवायचा असेल तर जरा हवा येऊ द्या. घरी माणसे, पै-पाहुणे आले पाहिजेत. तुम्हींही इतरांच्या घरी जात येत रहा. गतीमान जीवनात उसंत शोधा. उसंत स्वत:साठी वापरू नका. निवांत म्हणजे स्मशान! आयुष्यात पाण्याचा खळखळाट ऐका. नुसते आभासी संदेशन, प्रक्रिया, प्रतिसादांनी मिळणारे सुख, समाधान, शांती हीसुद्धा आभासी असते. स्वत:पलीकडचे जग उघड्या डोळ्यांनी पहा. मुलांचे एकारलेपण उन्हाळी शिबिरांसाठी केवळ पैसे भरून निघणार नाही. त्यासाठी त्यांना वेळ द्या. दिले की संपले, असे पालकपण कारखान्याच्या मालकासारखे असते. आव्हानांना सामोरे जाणारे जीवन प्रत्यक्ष जगा नि पाल्यांना जगू द्या...* •• ●‼ *रामकृष्णहरी*‼● •• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 44*      बहते को मत बहन दो, कर गहि एचहु ठौर। कह्यो सुन्यो मानै नहीं, शब्द कहो दुइ और।” अर्थ सत्कर्म अथक असले पाहिजे , असे महात्मा कबीर म्हणतात . पोहायला न येता गंटागळ्या खावून बुडत असेल किवा वाहून जात असेल तर त्याला बुडू देऊ नका. वाहूनही जाऊ देऊ नका. त्याचा हात धरून मानवतेच्या दृष्टीकोनातून त्याला बाहेर काढा. तो सांगितलेल्या गोष्टीकडे काना डोळा करीत असेल तरी त्याला उपदेश करणे सोडू नका. त्याच्या भल्याचे दोन शब्द सांगतच राहा. सज्जन दयावंत असतात. त्यांची कळवळ्याची जाती असते. 'बुडती हे जण । न देखवे डोळा । म्हणोणीया कळवळा । येत असे ।।' तुकोबांच्या या उक्तीप्रमाणे ते जगाच्या कल्याणासाठी धडपडत असतात. वाईट संगती किवा विचाराच्या प्रभावाखाली येवून ज्ञान मार्गापासून माणूस भरकटलेला असेल तर त्याला ज्ञानामृताचे डोस पाजून सत्य व विवेकी मार्गावर आणण्याचं पवित्र काम साधू व विचारवंताचं आहे. खरा व मानवतावादी धर्म बुरसट विचार अंधश्रद्धेची शिकवण देत नाही. काही संधीसाधू ढोंगी बुवा, बाबा चमत्काराच्या नावाखाली लोकांची प्रचंड लूट व पिळवणूक करीत आपलं इप्सित साधत असतात. अशा अंधभक्तीपासून दूर करून लोकांना डोळस मार्ग दाखवणे हे संताचे खरे कार्य आहे. अशा वेळी उपदेश देवूनही समोरची व्यक्ती मानत नसली तरी सतत त्याला अज्ञानाची जाणीव करून देत राहिले पाहिजे. एक ना एक दिवस तो विचार प्रवृत्त होवून खर्‍या भक्ती मार्गाकडे वळेल. त्याच्या ठायी खर्‍या ज्ञानाची जाणीव होईल व तो अज्ञानापासून दूर होऊन सत्य व विवेकशील मार्गाची कास धरेल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जिथे तुमची श्रद्धा आहे तिथे तुमचा आत्मविश्वास आहे हे लक्षात असू द्या.लोक तुम्हाला काही म्हणतील त्यावर विश्वास ठेवू नका.कारण तुमच्या श्रध्देपासून तुम्हाला परावृत्त करुन तुमच्यातल्या आत्मविश्वासाला तडा निर्माण करण्याचे काम करतात आणि मानसिकता विचलित करण्याचे. मग तुमचे त्यामुळे कोणत्याही कामात मन लागत नाही.अशामुळे त्यांना आनंद वाटतो.लोकांनी असे म्हटले म्हणून तुम्ही तसे करु नका.तुम्हाला ज्यातून आनंद आणि समाधान मिळत असेल तर जरुर एखाद्या तुमच्या असलेल्या श्रध्देवर विश्वास ठेवूनच काम करायला हरकत नाही.तुमची प्रगती हीच तुमच्या श्रध्देतून मिळणारी प्रेरणा आहे हे कधीही विसरू नका.शेवटी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हेच खरे आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भांडण - Brawl* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सोन्याची कुदळ* एका माणसाला दोन मुले होती जेव्‍हा तो म्‍हातारा झाला. तेव्‍हा त्‍याने आपल्‍या दोन्‍ही मुलांना बोलावले आणि म्‍हटले,' आता माझे वय झाले आहे, देवाचे कधी मला बोलावणे येईल आणि मरण्‍यापूर्वी मी तुम्‍हाला काही सांगू इच्छितो. पैसा हा भांडणाचे मूळ आहे. त्‍यामुळे मी माझ्यासमोरच पैशाची विभागणी करू इच्छितो, माझ्याकडे एक करामती कुदळ आहे. तिला जितके चालवाल तितके सोने ती उकरते. एकीकडे ही कुदळ आहे आणि दुसरीकडे सारे धन-संपत्ती, तुम्‍ही सांगा की कोण काय घेणार? मोठ्या मुलाने विचार केली की कुदळीला कोणी चोरले तर आपल्‍याकडे काहीच राहणार नाही. त्‍यामुळे धन-संपत्ती घ्‍यायला पाहिजे. लहान मुलाने विचार केला की नेहमीच सोने उकरणारी कुदळ घ्‍यायला पाहिजे. अशाप्रकारे मोठ्या मुलाने धनसंपत्ती आणि छोट्या मुलाने कुदळ घेतली. वडील हरिद्वारला निघून गेले. त्‍यांचे नियंत्रण सरकताच मोठ्या मुलाने पैसा पाण्‍यासारखा पैसा खर्च करायला सुरुवात केली आणि काही काळानंतरच तो गरीब झाला. इकडे लहानमुलाने शेतात जाऊन कुदळ चालवणे सुरु केले परंतू त्‍यातून मातीच निघाली. सोने नाही, तो हैराण झाला की वडिलांनी आपल्‍याला खोटे का सांगितले?मग त्‍याच्‍या आत्‍म्याने म्‍हटले,'' नाही, वडील खोटे बोलू शकत नाहीत. एक दिवस कुदळ सोने अवश्‍य देईल आणि आपण श्रीमंत होऊ.'' असा विचार करून तो दररोज शेतात कुदळ चालवायचा. त्‍याने शेतात पिकाची पेरणी केली आणि भरघोस पीक आले. गावात सर्वात जास्‍त पीक त्‍याच्‍या शेतात आले होते. अशा प्रकारे कुदळीने वास्‍तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला. तात्‍पर्य :- संपन्नतेची खरी चावी परिश्रमात आहे. जो परिश्रम करीत असतो त्‍याच्‍या घरी समृद्धी, सुख अवश्‍य येते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

चारोळी पुनवेचा चंद्राची चकाकी भारी असते फुललेल्या चांदण्यांना पाहून गालातही हसते. 〰〰〰〰〰〰〰 ✍© प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 23/10/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०१३ : भारत आणि चीनदरम्यान सीमा संरक्षण सहकार्यविषयक करारावर स्वाक्षर्‍या 💥 जन्म :- १७७८: कित्तूरची राणी चेन्नम्मा १९२४ : संगीतकार, गायक, नट पं. राम मराठे १९४० : ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले १९४५ : अभिनेता, दिग्दर्शक देवेन वर्मा १९४५: अभिनेते व नाट्यनिर्माते शफी इनामदार १९७८ : इंग्लिश क्रिकेटपटू स्टीव हार्मसन 💥 मृत्यू :- १९१५ : इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नाशिक : अहिंसेचा अर्थ खूप व्यापक असून तो समजून घेण्याची गरज विश्वाला आहे - मांगीतुंगी येथील विश्व शांती संमेलनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह आज राज्याच्या दौऱ्यावर* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा तिढा सुटला असून यावर्षी कर्मचाऱ्यांना 15 हजार 100 बोनस जाहीर - रवी राव, म्युनिसिपल लेबरचे कार्याध्यक्ष यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५००० रुपये मिळणार दिवाळी भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी मुंबई : शासनाने 15 नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास 26 नोव्हेंबरपासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल - मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समितीचा निर्णय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *महेंद्रसिंग धोनी, गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवागला भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *फरिदाबाद: येथे झालेल्या दृष्टिहीन क्रिकेटपटूंच्या ५ सामन्यांच्या ट्वेन्टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० विकेट्स राखून केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ Follow me on Share Chat बातम्यांची audio clip खालील ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/X6MvpAv *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अपघात - जीवनाला एक वेगळेच वळण देऊन जातो.* https://nasayeotikar.wordpress.com/2018/10/20/%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a4/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *देवेन वर्मा* देवेन वर्मा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९३७ रोजी कच्छ गुजरात येथे झाला. मात्र त्यांचे शिक्षण आणि बालपण पुण्यात झाले. पुणे विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र तसेच समाजशास्त्रात पदवी घेतली. अभिनयात आवड असल्याने त्यांनी करिअर म्हणून हे क्षेत्र निवडले आणि यात ते हास्य कलाकार म्हणून बर्‍यापैकी नावारूपासही आले. बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट विनोदवीरांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांनी अनेक चित्रपट केलेत त्यापैकी चोरी मेरा काम, चोर के घर चोरी आणि अंगूर या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअरचा उत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. गुलजार, हृषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी या दिग्गज दिग्दर्शकांचे ते आवडते कलाकार होते. देवेन वर्मा यांचा विवाह अशोक कुमार यांची कन्या रूपा गांगुली यांच्याशी झाला. अनेक हिंदी चित्रपटांसह त्यांनी मराठी आणि भोजपुरी चित्रपटातही काम केले. अनेक टीव्ही मालिकांमध्येही ते झळकले होते. देवेन वर्मा २ डिसेंबर २०१४ रोजी हृदयविकार आणि किडनी निकामी झाल्याने इहलोक सोडून गेले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) राजस्थानात अणुशक्ती केंद्र कोठे आहे ?* कोटा *२) महंमद गझनीने कनौजवर कधी चढाई केली ?* इ. स. १०११ *३) मेक्सिकोची राजधानी कोणती ?* मेक्सिको सिटी *४) 'मुद्राराक्षस' हा ग्रंथ कोणी लिहिला ?* विशाखादत्त *५) 'मुस्लिम लीग'ची स्थापना कधी झाली ?* १९०६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  प्रवीण राखेवार, नांदेड ●  एकनाथ आव्हाड, मुंबई ●  स्वरदा खेडेकर गावडे ●  पंकज बदाने ●  प्रिया टेकाळे, माहूर ●  अभिषेक नागूल, नांदेड ●  नरेंद्ररेड्डी चाकरोड ●  शिवकुमार बुट्टे ●  ईश्वर डहाळे ●  व्यंकटेश यमेवार ●  श्याम जाधव ●  साई पाटील शहादत्त *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *छेद* ज्या ताटात खायचं त्यात छेद करतात रोज सोबत राहून दोघात भेद धरतात ज्या ताटात खाता त्यात छेद करायचा नसतो चार घास खातो त्याचा उपकार स्मरायचा असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पावसाळा म्हणजे सृष्टीत चौफेर कसे चैतन्य भरलेलं असतं. नानाप्रकारचे चैतन्यकिडे, हिरव्या हिरव्या झुडपांमध्ये, नाजुक नक्षीदार वेलींवरती कसे मस्त रमलेले दिसतात. पानांआड लपून एकसारखा झीणझणझण आवाज हा ऐकायला येतो. पण एक दृष्टीभेट मात्र अलभ्य. एका वेलीच्या पानावर बघा कशी अंडी घातली होती. त्या अंड्यातल्या जीवाला मायेची ऊब देत एक मादी बसली होती. पण तेवढ्यात एका पक्षानं अचूक नेम धरला...बघता बघता किटक मादी बिचारी आकस्मिकपणे आपल्या न जन्मलेल्या जीवांना सोडून गेली. जीव बिचारे अनाथ पोरके झाले. पण त्यांना आधार होता तो हिरव्यागार पानांचा.* *मानवेतर प्राण्यांमध्ये जन्ममृत्यूचा हा खेळ असा आकस्मिक घडत असतो. हिरव्या पानांच्या उबदार पाळण्यात अंडी सुरक्षित होती. त्या अंड्यांतून जीव जन्माला येईल. जगण्याची एकाकी धडपड त्या जीवाची सुरू होईल. अल्पकाळ का होईना आईच्या प्रेमाची उब त्या अंड्यातल्या जीवाला मिळाली. कदाचित हीच निसर्गाची शिकवण असावी. एकटंच यायचं या जगात. जगायचा संघर्षही एकट्यानेच करायचा. त्या जगण्याचा भरभरून आनंदही घ्यायचा आणि एकट्यानेच परतायचं. हेच खरं जीवनाचं सूत्र.* *कवीने म्हटल्यानुसार या बिनभिंतीच्या शाळेत, अर्थात निसर्गात जशी वैविध्यपूर्ण समृद्ध उधळण असते, तशी मैत्रीची भावना देणारी ऊबही मिळते आणि गुरूसारखी शिकवणसुद्धा. त्यामुळे हेच खरं जगण्याचं सूत्र, असं म्हणणं संयुक्तिक नाही का ?* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 43* देह खेह होय जायगी, कौन कहेगा देह । निश्चय कर उपकार ही, जीवन का फन येह।” अर्थ – परोपकार व सद्वर्तन विषयक मार्गदर्शन करताना महात्मा कबीर म्हणतात की, जीवंत असेतो सर्व प्राण्यांना किंमत आहे. एकदा का शरीरातलं चैतन्प नाहीसं झालं की देहाचं मूल्य संपलं. मग तो मानव प्राणी जरी असला तरी देह मातीलाच अर्पण होणार आहे. रांत्रदिन संपत्तीत लोळणारी व्यक्ती असो की हलाखीत जीवन जगणारा गरीब असो. सर्वांच्या जीवनाचं अंतीम सत्य मृत्यू आहे. आईच्या उदरी वाढणार्‍या गर्भाचा जन्म कधी होणार? हे सांगता येतं. मृत्यू कधी होणार? हे सांगणारी यंत्रणा अद्याप तरी अस्तित्वात आलेली नाही. तो कोणत्याक्षणी ओढवेल हे अनिश्चित आहे. त्यामुळे जीवन फुलवणं , जीवनाची सार्थकता वाढवणं हे जीविताचं लक्षण आहे. जीवंत असूनही जर जगणं आनंदी व समाधानी जगता येत नसेल तर जीवंतपणी मरण अनुभवणे होय. जे काही चांगलं करावयाचं आहे ते जीवंतपणीच करावयायासं हवं. दान देणं असो. आनंद वाटणं असो की इतरांची दुःखं वाटून घेणं असो. हे सारं जीवंत असे तो करता येतं. एकदा का देहाने अचेतन अवस्था धारण केली की तुमच्याकडं कोण काय मागणार आहे ? त्यावेळेला चैतन्य गमावलेल्या अचेतन देहाची विल्हेवाट लावण्यासाठी इत्तरांचं सहकार्य घ्यावं लागणार आहे. त्यावेळी कोणीही काही दे , म्हणून मागणी करणार नाही. तेव्हा काही परोपकाराचं पुण्य फळ गाठीला राहावसं वाटत असेल तर प्रयत्न पूर्वक सत्कर्म करावे लागतील. गरजवंतांना दान-धर्म, मदत करावी लागेल. मृत्यू समयी जवळ कितीही संपत्ती असली . तरी सोबत काहीही देत नाहीत. मातीचा अंश असणारा हा देह मातीशीच एकरूप होवून जातो. म्हणून माय, माती आणि माणसांशी गद्दारी करू नये. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांचे मन शुद्ध आणि दृष्टी निकोप आहे ते आपल्या जीवनात पूर्ण समाधानी असतात.त्यांना कोणत्याही गोष्टीची हाव नसते,तसेच ते जेव्हा दुस-या कडे पाहतात तेव्हा त्यांच्या मनात आणि दृष्टीत कसल्याही प्रकारचे वाईट विचार आणत नाहीत किंवा येत नाहीत.ते कधीही दुस-या चे वाईट व्हावे आणि माझे चांगले व्हावे असे कधीच चिंतीत नाहीत. त्यांना आपल्या जीवनात कुठलीही अपेक्षा नसते तसेच ते निरपेक्षवृत्तीने जीवन जगत असतात. अशी माणसे आपल्या जीवनात आनंदी राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून सदैव माणसाने मन शुद्ध ठेवावे आणि दृष्टी निकोप असू द्यावी. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🥙🌸🥙🌸🥙🌸🥙🌸🥙🌸🥙 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कलुषित - Impure* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चिंचेचे झाड* एके दिवशी एक कावळा चिंचेच्या झाडाच्या फांदीवर बसला. त्याने टाकलेल्या विष्टेतून बाभळीच्या बिया चिंचेच्या झाडाखाली पडल्या. त्यातील एक बी उगवून बाभळीचे एक झाड हळूहळू वाढू लागले.  त्याने त्या चिंचेच्या झाडाशी दोस्ती केली. त्या दोस्तीचा गैरफायदा घेवून ते चिंचेच्या झाडाचे मन इतरांच्या विषयी कलुषित करू लागले. ते म्हणायचे, ' अरे काय तू, कोणीही येते आणि तुझ्या सावलीत विसावा घेते. तुझ्या चिंचा तुला न विचारता घेवून जाते. त्या माणसांची पोरे तर तुला दगडे मारतात.' 'मग काय बिघडले?' चिंचेचे झाड म्हणाले, 'माझ्या सावलीत जे विसावा घेतात, बसतात, त्यामुळे त्यांच्यापेक्षा मला जास्त आनंद होतो. माझ्या चिंचा लोकांसाठीच असतात. त्यातील चिंचोके कुठे तरी उगवतात आणि माझा वंश वाढतो. आता माणसांची पोरे मला दगडे मारतात, पण त्यांचा हेतू मला दगडे मारणे हा नसून चिंचा पाडणे हा असतो. त्यांनी चिंचा नेल्या तर पुढे माझाच वंश वाढणार असतो. शिवाय त्यांनी मारलेली दगडे मला फुलासारखी वाटतात'. हे ऐकून बाभळीच्या झाडाला चिंचेच्या झाडाची कीव करावीशी वाटली. ते रागाने म्हणाले, 'तू प्रतिगामी आहेस. तुझे माणसीकरण झाले आहे. तू असा आहेस. तू तसा आहेस'. चिंचेच्या झाडाने त्याचे म्हणणे कांही मनावर घेतले नाही. पण बाभळीच्या झाडाचे पालुपद रोजच चालू असे. ते रोज कांहीतरी नवीन मुद्दा मांडून चिंचेच्या झाडाचे ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करत असे. एके दिवशी ते म्हणाले, 'या माणूस नावाच्या प्राण्याने जगभर झाडांची कत्तल चालवली आहे. या माणसांच्याकडे बघून घ्यायला पाहिजे.' झाडांच्या कत्तलींचा मुद्दा ऐकून चिंचेचे झाड थोडे हबकले. आणखी कांही दिवसांनी बाभळीचे झाड खोटेच म्हणाले, ' अरे तुला कळले का, आता माणसे चिंचेच्या झाडांची कत्तल करायला लागले आहेत'. आता मात्र चिंचेचे  झाड निराश झाले. त्याला माणसांचा राग यायला लागला. या माणूस नावाच्या प्राण्याला धडा शिकवायचाच असे त्याने ठरवले. काय करावे बरे? त्याला एक आयडीया सुचली. तो आपले मूळ विचार, मूळ गुण विसरून गेला. त्याने ठरवले,  आपल्या अंगाला चिंचा लागतात, म्हणून माणसे ती खायला येतात. आपली थंडगार सावली पडते म्हणून माणसे आपल्या सावलीत विसावा घेतात. आता आपण आपल्या अंगाला चिंचाच  लावून घ्यायच्या नाहीत. आपली सगळी पाने गाळून टाकायची, म्हणजे सावलीच पडणार नाही. असे केले तर ती माणसे आपल्याकडे कशाला फिरकतील? हे विचार त्याने लगेच अमलात आणले. त्या झाडाची सगळी पाने कांही झाडून गेली. त्या झाडाला आता चिंचा लागेनात. कांही महिन्यातच ते झाड खंगून गेले. वाळले, मेले. आत्तापर्यंत चिंचेच्या सावलीमुळे नीट वाढ होत नसलेले ते बाभळीचे झाड मात्र चांगलेच फोफावू लागले. तात्पर्य : ऐकावे जनाचे करावे मनाचे *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/10/2018 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन* * 💥 ठळक घडामोडी :- २००८ - भारताच्या चांद्रयान १ या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार्‍या उपग्रहाचे प्रक्षेपण. 💥 जन्म :- १९०० - अशफाक उल्ला खान, भारतीय क्रांतीकारी 💥 मृत्यू :- १७७९ - रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे, पेशवाईतील न्यायाधीश. १९७८ - प्रा. ना.सी. फडके, मराठी लेखक. १९९१ - ग.म. सोहोनी, देहदान साहाय्यक मंडळाचे संस्थापक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दिल्ली : आझाद हिंद सरकारच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण, लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या सुंदरबन सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोर आणि सुरक्षा जवानांची चकमक, तीन सुरक्षा जवान शहीद झाले असून 1 गंभीर जखमी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *31 ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करणार : चंद्रकांत पाटील यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जाहीर केली 77 उमेदवारांची यादी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 87.21 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 78.82 रुपये.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *डेन्मार्क : सहा वर्षांनंतर डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या  सायना नेहवालला  जेतेपदाने दिली हुलकावणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांच्या शतकाच्या बळावर भारताने हा सामना 8 विकेटनी जिंकला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://b.sharechat.com/WjQD6TKpcR *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• गावाकडच्या आठवणी .....! https://b.sharechat.com/gYLkILcR8Q जरूर वाचावे आणि आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ना सी फडके* नारायण सीताराम फडके (ऑगस्ट ४, १८९४ - ऑक्टोबर २२, १९७८) हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. इ.स. १९४९मध्ये ते येथून निवृत्त झाले. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते. फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणार्‍या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत. असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदुमधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथांचे विशेष होते. अल्ला हो अकबर! (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरी लेखिकेच्या ’टेंपरल पॉवर’ ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे. लेखिका कमला फडके (माहेरच्या कमल दीक्षित) या ना.सी. फडके यांच्या विद्यार्थिनी आणि द्वितीय पत्‍नी. त्यांच्या एका मुलीचे नाव अंजली. फडके यांनी अंजली प्रकाशन नावाची संस्था काढली होती. या प्रकाशन संस्थेद्वारा ते दरवर्षी ’अंजली’ नावाचा वासंतिक आणि दिवाळी अंक प्रसिद्ध करीत असत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले ?* इ. स. १५५६ *२) कोणत्या शहराला दक्षिण महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात ?* सोलापूर *३) लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात लहान राज्य कोणते ?* सिक्कीम *४) 'जोक्स फॉर आवर मिलियन्स' या पुस्तकाचे लेखक कोण ?* व्ही. व्ही. गिरी *५) ओडिशाची उपराजधानी कोणती ?* पुरी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● ● ● अमोल शिंदे पाटील ● पस्कॉल डीसुजा ● पांडुरंग कुलकर्णी ● राम गुड्डे ● रमेश शंडकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एक करायला गेलं की दुसरंच उभं रहातं कळत नाही तेंव्हा कसं डोक्याहून पाणी वहातं करायचे ते लवकर करताच येत नाही योग्य वेळ आल्या शिवाय कोणत काम होत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.* *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही, त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."* •• ●‼ *रामकृष्णहरी* ‼● •• 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 42* पानी केरा बुदबुदा, अस मानस की जात। देखत ही छिप जायेगा, ज्यों सारा परभात।। अर्थ महात्मा कबीर जीवनाची नश्वरता पटवून देताना सांगतात की, मानवी जीवन पाण्यावरील बुडबुड्यासारखे आहे. त्याचा क्षणिकही भरवसा देता येत नाही. कोणत्याही क्षणी त्याचा शेवट होवू शकतो. जसे की सकाळ होऊ लागताच आकाशातल्या मिनमिनत्या तारका लपून बसायला लागतात. माणसाच्या जीवनाचा खरा अर्थ त्याच्या जीवन जगण्यातून कळत असतो. तो किती जगला यापेक्षा कसा जगला याला महत्व आहे. उगाच कण्हत कण्हत जगण्यापेक्षा जीवनाचे गाणे म्हणत जगता आले तर जीवनाचे नंदनवन होते. त्यासाठी निखळ आनंदी जगायचा प्रयत्न केला पाहिजे. काही जणांना आपण जन्माला आलो आहोत. आपल्याला सुंदर जगायचे आहे. याची जाणीवच नसते. काही जण जगणं ओझं समजून जगत असतात. त्यांच्या जगण्याचंच इत्तरांना ओझं वाटायला लागतं. खरं तर अशी माणसं जीवंत असूनही वारंवार मरत असतात. खरंच जीवन आनंदाने भरता येतं . हेच विसरतात. खरंचते जीवनाला ,'तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे । तिन्ही लोक आनंदाने भरून वाहू दे रे । हेच सांगायला विसरतात. सर्व क्षमता असूनही सुंदर जगण्याची सुरूवात करण्याआधीच आपल्यातील क्षमता सिद्ध करण्यापूर्वीच जीवनाला रामराम ठोकू लागतात. ती घटिका केव्हा येईल हे निश्चित माहित नसतं. आपल्या हाती असलेल्या क्षणांचा सदुपयोग केला पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्याजवळ थोडाबहुत पैसाअडका, थोडीबहुत संपत्ती आहे अशा लोकांना या जगात माझ्यासारखे कोणीच नाही असे वाटायला लागते आणि त्याचा अभिमान तो इतरांना वेगळ्या पद्धतीने सांगत सुटतो. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व परिस्थितीने गांजलेल्या लोकांना अगदी गुलामासारखे वागवतो आणि सर्वसाधारण माणसे आपली परिस्थिती बिकट आहे म्हणून ते निमूटपणे सहन करत त्यांच्या हाताखाली जीवन संपवतात.अशी केवळ स्वार्थी, आपमतलबी, गर्विष्ठ, दुस-यांना हीनतेची वागणूक देणारी व दुस-याचे कधीतरी भले करावे अशी अपेक्षा नसलेले निर्दयी असतात.अशा माणसांना चारचौघात किंवा जनमाणसात कुठेही प्रतिष्ठा, मानसन्मान मिळत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रतिष्ठा - Reputation* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बिरबलाची युक्ती* एकदा बादशहा आणि बिरबल मध्ये खूप कडाक्याचे भांडण झाले रागाच्या भरात बादशहा बिरबलाला म्हणाला तू राजधानी सोडून चालता हो तुझी मला मुळीच गरज नाही .बिरबल अतिशय स्वाभिमानी होता .तो ताबडतोब राजधानी सोडून निघून गेला .आणि एका गावात वेश बदलून राहू लागला बरेच दिवस उलटून गेले तरी बिरबल राजधानी मध्ये परतला नाही .बादशाहाला मात्र सारखी त्याची उणीव भासे त्याची कामे अडून राहू लागली आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे बादशाहाला त्याच्या शिवाय करमत नव्हते .अन्न गोड लागत नव्हते .त्याने अनेक प्रकारे बिरबलाचा शोध घेतला परंतु बिरबल सापडत नव्हता बिरबलाला कसे शोधून काढावे यावर बादशाहने खूप विचार केला .बादशाहने हि बिरबलाच्या सहवासात बरेच दिवस घालवले होते .त्यामुळे बादशाहालाही त्याला शोधून काढण्याची युक्ती सुचली त्याने प्रत्येक गावात दवंडी पिटली .राजवाड्यातील विहिरीचे लग्न करावयाचे आहे. लग्न समारंभ थाटात होणार आहे .तरी प्रत्येक गावाच्या लोकांनी आपआपल्या विहिरी सह उपस्थित रहावे .जे उपस्थित राहणार नाही त्यांना जबरदस्त दंड केला जाईल सर्व लोक चिंतेत पडले कुणालाच काही सुचेना .बिरबल ज्या गावात राहत होता त्या गावातले लोक हि चिंतेत पडले होते गावाच्या पुढारी ना या समस्येला कसे तोंड ध्यावे समजत नव्हते ठिकठिकाणी चर्चा सुरु झाल्या लोकांची मते घेतली जाऊ लागली .अशाच एका सभेला शेतकऱ्याचा वेश घेतलेला बिरबल हजर होता त्याने गावकरी ना जाण्याची युक्ती सांगितली .गावकरी खुश झाले .एक दिवस गावातील पाच सहा प्रमुख पुढारी उंची वस्त्रे घालून दिल्ली ला गेले दरबारात बादशहा पुढे हात जोडून ते म्हणाले खाविंद आपल्या आज्ञेप्रमाणे आणि निमंत्रण स्वीकारून आपल्या राजवाड्यातील विहिरीच्या लग्नाला आमच्या गावाच्या झाडून सर्व विहिरींना घेवून आम्ही हजर झालो आहोत .बादशहा जोरात हसला आणि तुम्हाला ही युक्ती कोणी दिली असे विचारले तर त्यांनी गावातील एका शेतकऱ्याने दिली असे सांगितले.बादशाहाने लगेच आज्ञा दिली जा आणि बिरबलाला सन्मानपूर्वक घेऊन या. बादशहाने आणि बिरबलाने आनंदाने मिठी मारली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/10/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- 1969 - अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना 💥 जन्म :- 1916 - लोकशाहीर अमर शेख 1963 - नवज्योतसिंग सिद्धू 1978 - वीरेंद्र सेहवाग 💥 मृत्यू :- 1974 - प्रतिभावान गायक मास्टर कृष्णराव  1999 - समाजवादी नेते, पत्रकार माधवराव लिमये *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळं दुष्काळाचं सावट आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतून मदत करू, शिर्डी साई समाधीच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शब्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *ओडिशा - तितली वादळात नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली १ हजार कोटींची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *देशाचे संविधान जगात सर्वोत्तम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन दीक्षाभूमीच्या विकासासाठी ४0 कोटींचा धनादेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पंजाब : अमृतसरमध्ये रावणदहनासाठी जमलेल्यांना भरधाव ट्रेनने उडवले, 50 हून अधिक जणांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *चीनने ब्रम्हपुत्रेचे पाणी अडवले, अरुणाचलमध्ये दुष्काळाचे सावट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *क्रिकेट विश्वामध्ये भारतीय करतात सर्वात जास्त सट्टेबाजी; आयसीसीचा मोठा खुलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://b.sharechat.com/RsYQB4kJ9Q *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गावाकडच्या आठवणी ...* https://b.sharechat.com/gYLkILcR8Q आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोकशाहीर अमर शेख*      ख्यातनाम मराठी लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. आईचे नाव मुनेरबी. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टरविनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०—३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला(१९४७).स्वतः एकश्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याला काय लिहावं यापेक्षा काय लिहू नये हे कळतं तोच खरा लेखक ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) सहय़ाद्री पर्वत राज्याच्या कोणत्या दिशेने पसरला आहे ?* दक्षिण-उत्तर *२) न्यूझिलंडची राजधानी कोणती ?* वेलींग्टन *३) वॉल स्ट्रीट हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ कोठे आहे ?* न्यूयॉर्क *४) तामिळनाडूतील थंड हवेचं ठिकाण कोणतं ?* कोडाईकॅनॉल *५) इंडियन मिलिटरी अकादमी कोठे आहे ?* डेहराडून *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  गजानन वडजे ●  राजेश्वर वावधाने, मुखेड ●  संदीप भंडारे, येवती ●  आनंद बलकेवाड, येवती ●  लक्ष्मण आगलावे, धर्माबाद ●  ओम धूळशेट्टे ●  अरुण निलावार ●  दत्ता सूर्यवंशी ●  बंडू अमृतवार ●  शिवाजी पाटील ●  अतुल जाधव ●  इम्तियाज शेख *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *असे जगा* जीवन असे जगा जे इतरांच्या कामी येईल तुमची ओळख फक्त तुमच्या नामी होईल इतरांसाठी जगलात तर तुमची ओळख राहील कोल्ह्या कुत्र्या सारखी नस्ता आपली गत होईल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण मित्राला बोलतो, 'उद्या मला सकाळी फोन कर, मग आपण ठरवू या.' असं म्हणताना आजची रात्र सुखरूप पार करून उद्याची सकाळ आपण अनुभवणार आहोत यावर आपला ठाम विश्वास असतो. असे छोटे छोटे विश्वास ठेवल्याशिवाय गाडा पुढे हाकता येत नाही.* *एक बस स्टँडच्या फलाटाला लागते. आपण गावाच्या नावाची पाटी वाचून खात्री करून घेतो आणि बसमध्ये चढतो. तिकीट काढतो. सोबतचा घडी केलेला पेपर उघडून वाचायला लागतो किंवा डोळे बंद करून डुलक्या घेतो. हलणा-या बसमध्ये निवांतपणे खिडकीतून बाहेर बघत बसतो. काही वेळा चिल्लर पैशांवरून कंडक्टरशी वाद होतात. वळण घाटाचा रस्ता पार करून आपल्या थांब्यावर बस आणून सोडते. या सगळ्या प्रवासात बस चालवणा-या ड्रायव्हरचा चेहराही आपण पाहिलेला नसतो. त्या ड्रायव्हरच्या भरोशावर आपण बसमध्ये निवांतपणे बसलेलो असतो. कंडक्टरशी रुपया आठाण्यावरून वाद करणारा प्रवासी स्वत:चा जीव, चेहराही न पाहिलेल्या ड्रायव्हरच्या हवाली करतो. किती विश्वास ठेवतो आपण अनोळखी माणसावर.. 'विश्वास' फार महत्वाचा असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 41* *हीरा परखै जौहरी* *शब्दहि परखै साध ।* *कबीर परखै साध को* *ताका मता अगाध ॥* अर्थ: हिरा म्हणजे काय असतो बरं ! अज्ञानी माणसाच्या दृष्टीनं तो कोळशाचाच प्रकार. परंतु कोळशाआड दडलेला हिरा ओळखण्याची दृष्टी एखाद दुसर्‍याकडे म्हणजेच जवाहिर्‍याकडे असते. अन इत्तरांंच्या दृष्टीत कोळसा असणार्‍या हिर्‍यांचं मोल जवाहिर्‍याचं जाणतो. त्याप्रमाणे शब्दांचं मोल जाणण्याचं सामर्थ्य विवेकी साधू सज्जनांच्या विचारवंताच्याच्या ठायी असतं. महात्मा कबीर सांगतात की जो सज्जन व दुर्जनांना पारखून घेतो. त्याचे मत अधिक गहन गंभीर असते. ज्याच्या उक्ती अन कृतीमध्ये फरक नसतो. तिच व्यक्ती खर्‍या अर्थाने वंदनीय असते. त्याच्या ठायी लोक कल्याणाची सद्भावना दडलेली असते. ती माणसंच लोकनायक म्हणून अजरामर झाली आहेत. अशा नायकांना पारखून त्यांचे समर्थन करणारेही कौतुकास पात्र ठरले आहेत. याउलट ज्यांनी सत्तेचा व पदांचा दुरूपयोग केला. लोक कळवळा दाखवत लोकांना कळा सोसायला लावल्या असे राजे व त्यांच खरं रूप कळूनही त्यांचा उदो उदो करणारे भाट पात्रे सदैव तिरस्कार व अवहेलनेचेच धनी बनले आहेत किंबहुना ती खलनायक व दुष्टपात्रे म्हणूनंच दुष्किर्ती पावली आहेत. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे पाण्याचे महत्त्व तहान लागल्यावर कळते आणि ते आपल्या जवळ नसते तेव्हा अधिक कळायला लागते. जेव्हा आपल्याजवळ खूप असते तेव्हा त्याची किंमतही आपण करत नाही. अशाचप्रकारे काही सज्जन माणसांच्या बाबतीत असते.जेव्हा सज्जन आणि मोठ्यांच्या उपदेश करणा-यांच्या सहवासात राहतो तेव्हा आपल्याला त्यांनी केलेल्या उपदेशाची किंमत कळत नाही पण ती माणसे आपल्या पासून निघून जातात आणि मग कुठेतरी आपले चुकत आहे असे कळायला लागते तेव्हा त्यांची गरज आहे असे वाटायला लागते. अशावेळी मग त्यांना शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो तेंव्हा ती माणसे भेटत नाहीत. मग अशावेळी आपल्या जीवनात जीवन जगण्यासाठी जसे पाणी महत्त्वाचे आहे तसे आपल्या जीवनाला चांगला मार्ग दाखवणा-या सज्जन आणि मोठ्या उपदेशी करणा-या माणसांची गरज आहे. या दोघांनाही आपल्या जपायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मौल्यवान - Valuable* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वस्तूची किंमत* खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक कामगार आपल्या गाढवासोबत जंगलातून चालला होता. इतक्यात रस्त्याच्या बाजूला त्याला काही चमकताना दिसलं. त्यानं जवळ जाऊन पाहिलं तर तिथे एक चमकणारा दगड पडलेला होता. त्यानं तो उचलून आपल्या गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि पुढे चालू लागला. समोरून येणाऱ्या एका हिरे व्यापाऱ्यानं गाढवाच्या गळ्यात अडकवलेला तो मौल्यवान दगड बघितला. मग त्यानं गाढवाच्या मालकाला विचारलं, ‘भाऊ मला हा दगड विकत घ्यायचा आहे. तुम्ही याचे किती पैसे घेणार?’. कामगाराला दगडाच्या किंमतीबाबत काहीच कल्पना नव्हती. फक्त शंभर रूपये घेईन, असं त्यानं सांगितलं. त्यावर हिरे-व्यापारी म्हणाला ‘शंभर रूपये तर खूप जास्त आहेत. मी फक्त पन्नास रूपयापेक्षा अधिक रक्कम नाही देणार.’ कामगारानं थोडा विचार केला आणि शंभर पेक्षा कमी रुपये घेणार नाही, असं सांगितलं. व्यापाऱ्याला वाटलं की या मौल्यवान दगडासाठी त्याला कोणी गिऱ्हाइक मिळणार नाही. मग हा कामगार ५० रुपयात हा दगड विकण्यासाठी आपल्या मागं येईल. थोडावेळ जाऊनही कामगार त्या व्यापाऱ्याजवळ आला नाही. अखेर व्यापारीच त्याच्या शोधात निघाला. त्याला दिसलं की दुसरा एक व्यापारी त्याच्याकडून तो मौल्यवान दगड विकत घेत आहे. तो व्यापारी पळत कामगाराजवळ पोहोचला. तोपर्यंत व्यवहार पूर्ण करून समोरचा व्यापारी निघून गेला. त्या व्यापाऱ्यानं कामगाराला विचारलं की, ‘तो दगड तू किती रुपयांना विकला?’. कामगार म्हणाला, ‘२०० रुपये’. व्यापाऱ्यानं त्याला म्हणाला, ‘अरे मुर्खा तो दगड अत्यंत मौल्यवान होता आणि तू अवघ्या २०० रुपयांना विकलास!’ त्यावर कामगार उत्तरला, ‘मूर्ख मी नाही, तुम्ही ठरलात. कारण मला तर तो दगड रस्त्याच्या बाजूला पडलेला मिळाला होता आणि त्याची किंमत माहित नव्हती. पण तुम्हाला त्याची किंमत माहित असून देखील तुम्ही अवघ्या ५० रुपयांच्या हव्यासापोटी तो दगड विकत घेतला नाही. १०० रुपयात तो दगड विकत घेतला असता तर भविष्यात तुम्हाला मोठा फायदा मिळाला असता.’ *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/10/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनुष्य गौरव दिन* 💥 ठळक घडामोडी :- 💥 जन्म :- १९०२ - दिवाकर कृष्ण तथा दिवाकर कृष्ण केळकर, मराठी कथाकार. १९१० - चंद्रशेखर सुब्रमण्यम - नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. १९२० - पांडुरंगशास्त्री आठवले, स्वाध्याय परिवाराचे संस्थापक. १९२५ - डॉ. वा.द. वर्तक, वनस्पतिशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक. १९५४ - प्राची चिकटे, बाल साहित्यिक. १९५९ - प्रिया तेंडुलकर. अभिनेत्री आणि मराठी कथालेखिका. 💥 मृत्यू :- १९३४ - विश्वनाथ कार, उडिया लेखक व समाजसुधारक. १८९६ मध्ये त्यांनी एक छापखाना काढून उत्कल साहित्य नावाचे नियतकालिक काढले. १९९५- बेबी नाझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री. २००६- श्रीविद्या, दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यात प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नागपूर - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांची गर्दी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एम. जे. अकबर यांचा राजीनामा स्वीकारला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबाद : शिवसेनेला लक्ष्य करत आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *उत्तर आर्यलडच्या ५६ वर्षीय लेखिका अँना बर्न्‍स यांना यंदाचा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://sharechat.com/post/GElarZQ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा* https://www.deshdoot.com/dussehra-vijayadashami-special-article-nagorao-yevatikar-breaking-news/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *श्रीपांडूरंगशास्री आठवले (दादाजी)* आज स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम वंदनीय स्व.पांडुरंगशास्त्रीजी आठवले तथा प.पु.दादाजी यांचा जन्मदिन . . . other is not other ,other is my devine brother all the brotherhood under the fatherhood of god देवाचे प्रेम शाश्वत भाषेत समजावले.त्रिकाल संध्या मधुन देवाविषयीची कृतज्ञता . . .सकाळी झोपेतुन उठवतो सकल मानवाला स्मृतिदान(आठवण) देतो.कोणतेही अन्न खा त्यांचे रक्त बनवतो व त्यातून माणसाला शक्ती देतो म्हणून भगवंताचे दुसरे मोठे देणे म्हणजे शक्ती दान.रात्री झोपल्यानंतर माणसाच्या डोक्यातले सर्व टेन्शन्स काढून त्यांना शांती प्रदान करतो आणि म्हणून भगवंताचे तिसरे मोठे देणे म्हणजे शांतीदान . . निदान या तिनही कारणासाठी तरी देवाचे मनापासुन आभार माना समजावले.कोळी बांधवांमध्ये अस्मिता निर्माण करून आगरि वागरी सागरी या सर्व बांधवांना भावाप्रमाणे प्रेम दिले आणि त्यांच्यामधले व्यसन दुर केली . जागतिक धर्मपरिषदेमध्ये यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर प्रत्येक माणसाला श्रीमद भगवत गीता हा धर्मग्रंथ नसून तो जीवनग्रंथ कसा आहे तो unto the last man पर्यंत पोहचवला.शरीरातील रक्ताचा थेंब न थेंब श्वासाचा प्रत्येक श्वास हा अखंड मानवजातीच्या विकासाकरता ज्यांनी खर्च केला . तू अमृतस्य पुत्र आहेस तू भगवंताचा पुत्र आहे तू दीन नाही तु लाचार नाही तुझ्या मध्ये सुद्धा तेजस्विता तत्परता आणि तन्मयता आहे .तू नचिकेता चा वारस आहे .तू आदर्श ऋषींची संतान आहेस. म्हणून दिन दुबळा समजू नको .लाचार समजून नको .अशी खुमारि माणसा मध्ये भरली .माणसाला माणसाचे नाते समजावले. एकमेकाद्वितीय दुसऱ्याला दुसऱ्याची गरज का हा आदरभाव उभा केला. परकेपणा काढुन माणसांमध्ये आपलेपणा भरला . म्हणूनच अरब अमिरातितिल मुस्लिम धर्मगुरू असो. .वा ख्रिश्चन धर्मगुरू पोप ज्यांच्या जाण्याने दुःखि झाले . . अशा महामानवाला माझे वंदन. तुमच्या मुळेच दादा आनंद जीवनात सारे जीवांच्या चिंता या लोपती क्षणात. असे म्हणत लाखो स्वाध्यायी आज दादांचा वाढदिवस मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करत आहेत. दादाजी तुम्हाला कृतज्ञतापूर्वक वंदन 🏻संकलन : राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जो वेळ वाया घालवतो त्याच्याजवळ गमवायलाही काही उरत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) स्टेथोस्कोपचा शोध कोणी लावला ?* डॉ. रेने लिनेक *२) भूकंपाची तीव्रता मोजणार्‍या उपकरणाला काय म्हणतात ?* भूकंपमापी *३) जगातील पहिले तिकट कोठे छापले गेले ?* इंग्लंड *४) 'बहुरूपी' या पुस्तकाचे लेखक कोण ?* चिंतामणराव कोल्हटकर  *५) महाराष्ट्रातील प्रमुख लाकूड व्यापार केंद्र कोठे आहे ?* परतवाडा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● निलेश अतकूरकर ● योगेश्वर कंदकूरते ● श्रीनिवास बेंकट ● विशाल शेपाळकर ● अनिरुद्ध कोल्हाटकर ● लतिका चौधरी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••• *भावना* दरवर्षी रावण जाळतो ती वृत्ती जळाली नाही प्रतिकृती पेक्षा वृत्ती जळावी ही गोष्ट कळाली नाही रावणाच्या प्रतिकृती पेक्षा ती वृत्ती जळाली पाहिजे सण समारंभा मागची भावना कळाली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाने माणसांशी, सर्व प्राणीमात्रांशी आणि निसर्गाशी माणसासारखं वागावं ही आपल्या धर्माची शिकवण आहे. सृष्टीतलं चैतन्य म्हणजे ईश्वर ! सर्वसामान्य माणसाला देवाची उपासना करणं सोपं जाईल म्हणून सगुण साकार म्हणजेच मूर्तीची पूजा सुरू झाली. मंदिरातल्या मुर्तीचं पावित्र्य जपायचं असेल तर स्त्री-पुरूष कोणालाच गाभा-यात प्रवेश द्यायचा नाही, मुर्तीला स्पर्श करू द्यायचा नाही हे समजण्यासारखे आहे. मंदिरातल्या वातावरणाचं पावित्र्य राखलं जावं, कुठले कपडे घालून देवदर्शनाला मंदिरात जावं हे भान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. कालबाह्य रूढी-परंपरा सोडून दिल्या तरच पुढच्या पिढीला हा धर्म, ही संस्कृती आपली वाटेल.* *माणिक वर्मा यांनी गायलेलं, ' क्षणभर उघड नयन देवा !' हे गीत आठवतं. या रचनेत कवी देवाला डोळे उघडायला सांगत नाही, तर देवदर्शनासाठी आलेल्या एका अंध व्यक्तिसाठी ही प्रार्थना करीत आहे. त्या अंध व्यक्तिचे क्षणभर तरी डोळे उघडून त्याला तुझं दर्शन दे, अशी प्रार्थना कविराज करत आहे. स्त्रियांवर होणारे आत्याचार, अन्याय थांबव.. ते करणारांचे डोळे क्षणभर तरी उघड, अशी प्रार्थना नवरात्राच्या निमित्ताने दुर्गादेवीपाशी करावीशी वाटते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 41* *यह जग कोठी काठ की,* *चहुं दिश लागी आग* *भीतर रहै सो जलि मुअै,* *साधू उबरै भाग।* अर्थ हे मायावी जग यह (मोह) लाकडापासून बनवलेल्या महालासारखे आहे. ज्याच्या चारही दिशांनी षड्विकारांच्या ज्वाला उठत आहेत. त्या इतक्या प्रबळ आहेत की, त्या महालात वावरणारे प्राणी न दिसणार्‍या आगीत व सतत धुमसणार्‍या धुरात कोंडी होवूनच मरत असतो. मात्र साधू (सज्जन) अशा विकारी ज्वालांपासून अलिप्त असतात.सामान्यजण विकारांना आहारी जातात तर असामान्य माणसं विकारारांपासून अलिप्त म्हणजे अविकारी असतात. विकार क्रोध उत्पन्न करतो. क्रोधाचं कामंच असतं मधल्या मध्ये जाळून मारणं. क्रोध आगीचं प्रतिक तर स्थिरवृत्ती शांतीचे निदर्शक असते. साधूस सर्व क्रोध-विकारांपासून कोसो दूर असतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काल तुम्ही दिवसभरात केलेल्या कामाची थोडी उजळणी करा आणि तुमच्या मनाला थोडं विचारा की,अरे मना माझ्याकडून जे काही घडले त्यात माझ्या कृतीपेक्षा तुझाच जास्त सहभाग आहे.कारण तुझ्या स्थिरतेमुळेच मी एवढे काम चांगले करु शकलो.तू जर चलबिचल झाला असता तर माझ्याकडून ब-याच चूका झाल्या असत्या,पण मला तू माझ्या बुद्धीला आणि हाताला दुसरीकडे कुठेच जाऊ दिले नाही.माझ्या कामात एकाग्रता आणि सातत्य ठेवल्यामुळे मला इतरत्र भटकण्याची संधी दिली नाही.म्हणून तुझे पहिल्यांदा आभार मानले पाहिजे. म्हणजेच काल जी आपल्या चांगल्या दृष्टीकोनातून कामाची तयारी आणि पूर्णत्वाकडे नेण्याची सर्वस्वी जबाबदारी मनाचीच होती.मनाचीच तयारी नसती तर कोणतेही काम पूर्णत्वाकडे गेले नसते. सदैव आपल्या मनाला कसल्याही प्रकारची मरगळ येऊ न देता प्रसन्न ठेवले पाहिजे आणि आजचे ही काम तितकेच जोमाने पार पडावे यासाठी तूच सर्वस्वी जबाबदार आहे आणि राहणार.थोडक्यात सांगायचे झाले तर कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा आपले मन आपल्या ताब्यात असायला हवे. त्यासाठी आपण सदैव तयार असायला हवे मग ते कोणतेही काम करणे सोपे जाईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उजळणी - Revision* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरा संन्यासी कोण ?* एकदा एक तरुण, संन्यासीकडे गेला आणि म्हणाला, ‘मी सर्व काही सोडून आलो आहे, माझे मन आता संसारात रमत नाही. मला हा संसार नकोसा झाला आहे. काही तरी उपाय सांगा.’ सन्यासी त्या तरुणाला म्हणाले, ‘तू काही दिवस राजाकडे जा; त्याच्यासोबत राजवाड्यात राहा. तिथे तुला नक्कीच आत्मज्ञान मिळेल.’ साधूमहाराजांच्या या उपायावर तो तरुण संभ्रमात पडला, राजाकडे राहून आपला समस्या कशी दूर होईल असा प्रश्न त्याला पडला. तरुणाची संभ्रमावस्था पाहून साधूमहाराज म्हणाले, ‘तू राजमहालात जाण्याआधीच राजाला तुझ्याबद्दल सर्व माहिती मिळाली असेल.’ संन्यासी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तरुण राजवाड्यात गेला. सगळीकडे सुख समृद्धी असूनही त्या तरुणाचे मन तेथे रमले नाही. पण साधूमहाराजांनी त्याला दिलेल्या सुचनेमुळे त्याला तेथे जबरदस्तीने राहवे लागत होते. एकेदिवशी राजा जवळच असलेल्या नदीत स्नानासाठी उतरला. या तरुणाने देखील स्नान करण्यासाठी जायचे म्हणून आपला अंगरखा काठावर काढून ठेवला होता. तेवढ्यात राजमहालातून आवाज आला, आग लागली… आग लागली… काही क्षणात साऱ्या परिसरात धूर पसरू लागाला. तरुण लगेच पाण्यातून बाहेर आला आणि आपला अंगरखा उचलून जीव वाचवण्यासाठी पळणार, इतक्यात त्याला राजा अगदी निश्चिंत उभा असल्याचे लक्षात आले. काही झालेच नसल्यासारखे भाव राजाच्या चेहऱ्यावर दिसत होते. यावर तरुणाने राजला विचारले, ‘राजमहालात आग लागलेली असूनही तुम्ही शांत उभे आहात. असे का बरे?’ याप्रश्नावर राजा म्हणाला, ‘मी या राजमहालाला कधी माझा समजलोच नाही. मी जन्माला आलो नव्हतो तेव्हाही हा राजमहाल होता आणि माझ्या मृत्यूनंतरही तो असेल. पण तू कपड्यांसाठी धावलास. याचा अर्थ तुला तुझे मन अजूनही संसरात आहे. तुला एवढा मोह आहे, तर मग संसारात मन नाही असे का म्हणतोस.’ हे ऐकून तो तरुण राजाच्या पाया पडला आणि म्हणाला, ‘मला समजले की संन्यासी महाराजांनी मला तुमच्याकडे का पाठवले. तुमच्याकडे सर्व काही असूनही त्यावर आपला हक्क तुम्ही मानत नाही, मोहावर विजय मिळवला आहे. आणि मी सर्व काही सोडून आल्याचा दावाकरून संसार त्याग करण्याची भाषा बोलत होतो, पण माझं मन अद्यापही संसारातल्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये अडकलेले आहे, मोह सुटलेला नाही. संसार करताना देखील मोह न ठेवता संन्यासी सारखे जीवन जगता येते आणि संकटातही स्थिर राहता येते, हे मला आज कळले *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/10/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५६ - जगातील पहिले अणुउर्जा केंद्र एलिझाबेथ दुसरीने  इंग्लंडच्या  कुंब्रिया प्रांतातील सेलाफील्ड येथे सुरू केले. २००३ - भारतात तृतीयपंथी व्यक्तींनी जिती जितायी पॉलिटिक्स हा आपला स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला 💥 जन्म :- १८१७ - सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक १८६९ - भास्करबुवा बखले, हिंदुस्तानी गायक-संगीतकार, बालगंधर्व व मास्टर कृष्णराव यांचे गुरू १८९२ - नारायणराव बोरावके, पहिले मराठी साखर कारखानदार १९७० - अनिल कुंबळे, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १८८२ - दादोबा पांडुरंग तर्खडकर, इंग्रजी-मराठी व्याकरणकार आणि धर्मसुधारक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग. शिवसेनेसोबत जागावाटप, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली : देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचं जनरल प्रॉव्हिडंट फंड (जीपीएफ) आणि अन्य बचत योजनांवरील व्याजाचा दरात वाढ ७.६ टक्के वरून ८ टक्के, केंद्रीय वित्त विभागानं या संदर्भातील परिपत्रक काढलं.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *ठाणे - कल्याण-डोंबिवली मनपाचे 400 कंत्राटी कामगार आजपासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सिऐटल : जगातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी 'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ * UEFA Nations League मध्ये इंग्लंडने चुरशीच्या सामन्यात माजी विश्वविजेत्या स्पेनला त्यांच्याच घरच्या मैदानावर ३-२ ने केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *स्वयंघोषित संत रामपालला दोन प्रकरणांमध्ये आजन्म तुरुंगवासाची शिक्षा; हिसार कोर्टाचा निकाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ऑस्ट्रेलियातील महिला क्रिकेटपटूंनी स्थानिक क्रिकेट सामन्यांत 50 षटकांत तब्बल 3 बाद 596 धावा कुटल्या* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 99603583007 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://sharechat.com/post/AbXdmOZ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कथा - संशय* एक।छोटा संशय जीवन कसे उध्वस्त करते हे सांगणारी कथा https://b.sharechat.com/gYbH19ZJ4Q आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दादोबा पांडुरंग तर्खडकर (तथा दादोबा पांडुरंग )* हे मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. तसेच ते मानवधर्मसभा, परमहंससभा आणि प्रार्थना समाज ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्‍न करणार्‍या संस्थांचे संस्थापक सदस्य होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे घराणे ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील तरखड ह्या गावातील असून त्यांचे आजोबा मुंबईत स्थायिक झाले होते. दादोबांचा जन्म मुंबईत शेतवळी अर्थात खेतवाडी येथे झाला. त्यांच्या इतर भावंडांपैकी भास्कर पांडुरंग तर्खडकर आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर हेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत होते.१८३३मध्ये शाळेत असताना आपणही मराठीचे व्याकरण लिहावे अशी दादोबांना इच्छा झाली. त्यांनी तसे एक व्याकरण प्रश्नोत्तर-स्वरूपात लिहूनही काढले. परंतु त्यांना स्वतःलाच ते न आवडल्याने लिंडली मर्फी ह्याच्या इंग्लिश व्याकरणाच्या धर्तीवर त्यांनी आपले व्याकरण नव्याने लिहून काढले. ह्या व्याकरणाची पहिली आवृत्ती १८३६ साली गणपत कृष्णाजीच्या छापखान्यात छापून महाराष्ट्र भाषेचे व्याकरण ह्या नावाने स्वतः दादोबांनीच प्रकाशित केली.  *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) मुर्शिदाबाद हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे ?* रेशमी आणि हातमाग कापडासाठी *२) कालमापक यंत्राचा शोध कोणी लावला ?* जॉन हॅरिसन *३) सूर्याची उंची तसेच इतर ग्रहगोलांची उंची मोजणारे उपकरण कोणते ?* सेक्सटंन्ट *४) हॉकी स्टीकचे वजन किती असते ?* २00 ते ७९४ ग्रॅम *५) भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत ?* सात *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  चेतन भैराम ●  श्रीनिवास कोलोड ●  धनराज पाटील भुमरे ●  दीपक टेकाळे ●  केशव सटाले ●  गीतेश पाटील ●  अनिकेत पाटील ●  गिरीश तांबोळे ●  निंबा पाटील ●  गजानन बापूराव भोसकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नीतिमत्ता* माणसातली नीतिमत्ता कुठे पळून गेली आहे इथे सा-या लबाडांचीच गर्दी गोळा झाली आहे लबाडांच्या गर्दी मध्ये नीतिमान कसा सापडेल चिखलात जाईल त्यास सहजच घाण चोपडेल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *देव नक्की कशात आहे ? मुर्तीत आहे का ? नाही, पण तो आहे असे समजून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. 'यथा देहे तथा देवे' हे सुत्र पाळून यथासांग मंत्रोच्चाराने त्यास आमंत्रित केले जाते. अशा मुर्तीला वर्षानुवर्ष एकाग्रपणे समरसून त्यात देवाचे स्वरूप पाहिल्याने व निष्ठा वाहिल्याने एक दिव्य तेज प्राप्त होते. त्याची उदाहरणे म्हणजे कित्येक प्राचीन मंदिरात प्रतिष्ठापित झालेल्या श्री काशी विश्वेश्वर, श्री विठ्ठल, श्री बालाजी, श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक या व अशा अनेक मूर्तींमध्ये कालांतराने दिव्यत्व प्राप्त झालेले दिसते, ते त्यातील 'यथा देहे तथा देवे' या सुत्राचे पालन केल्यामुळे.* *या मूर्तींच्या दर्शनाने जो आनंद मिळतो, त्याला कारण तिथल्या उपासना, त्रिकाळ आरत्या, तिथले प्रसन्न वातावरण, धुपाचा सुवास, फुलांची आनंददायी सजावट, समईच्या मंद तेवणा-या शुभ्र कळ्या, चंदनाचे गंध, पितांबर आणि पांढरे उपरणे, मस्तकावर सुवर्ण मुकुट वगैरेंनी नटलेली मुर्ती व तिचे निमूटपणे आपल्याकडे पाहत शांत उभे राहणे. अशा ठिकाणी देव पाहण्याचे भाग्यच लागते. तो हाडामांसाचाच दिसावा असा भक्ताचा हट्ट तिथे अजिबात नसतो. त्याच्या निराकार अस्तित्वावर त्या भक्ताचा विश्वास असतो. त्या आधारावर तो त्या मुर्तीत देव पाहतो.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 40* *जब गुण को गाहक मिले,* *तब गुण लाख बिकाई.* *जब गुण को गाहक नहीं,* *तब कौड़ी बदले जाई.* अर्थ : महात्मा कबीर म्हणतात कि, जेव्हा गुणाची पारख असणारे गुणपारखी गाहक मिळतात तेव्हा गुणाची किमत होत असते. परंतु जेव्हा गुणाची पारख नसणारे ग्राहक भेटतात, तेव्हा गुणाची परिपूर्णता असूनही ती वस्तू कवड़ी मोलाने के भावाने विकावी लागते. एका व्यक्तीला रस्त्याने जात असताना दोन खडे चमकताना दिसले. त्याने कुतूहलापोटी ते उचलून सोबत घेतले. आणि तो पुढे निघाला. वाटेने जाताना तो थकून एका हाॅटेलात थोडा वेळ थांबला. हातातले दोन्ही खडे त्याने सहज टेबलावर ठेवलेले. इतक्यात हाॅटेल मालकाची दृप्टी त्या खड्यांवर पडली. त्याच्याकडे पाहून निरखून पाहात तो त्या खडेवाल्याला म्हणाला. 'कुठे भेटले हे दगडी कोळसे?' 'अहो मी त्या माळावरून येत होतो तर हे खडे इत्तर खड्यांपेक्षा वेगळे दिसले म्हणून मी सोबत घेतलेत. तुम्हाला हवा तर घेवून टाका यातला एक.' त्यावर तो दुसरा गृहस्थ म्हणाला, 'मी काय करू याला घेवून . नको तो तुमच्याकडेच राहू देत.' यांचे संभाषण चालू असताना एक जवाहिर्‍या तेथे आला. त्याची नजर त्या खड्यावर गेली. तो त्या खड्यांना पारखून म्हणाला. 'अरे भाऊ , तू हे खडे मला दिलेस तर मी तुला दोन लाख देईन.' हां ना करीत त्याने ते चार लाखाला घेतले. तो जवाहिर्‍या आला नसता तर त्या गृहस्थाने कवडीमोल भावाने कुणाला तरी देवून टाकले असते. गुणांची पारख नसली की किमती वस्तूचं मूल्यचं कळत नाही हेच खरं..! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काल तुम्ही दिवसभरात केलेल्या कामाची थोडी उजळणी करा आणि तुमच्या मनाला थोडं विचारा की,अरे मना माझ्याकडून जे काही घडले त्यात माझ्या कृतीपेक्षा तुझाच जास्त सहभाग आहे.कारण तुझ्या स्थिरतेमुळेच मी एवढे काम चांगले करु शकलो.तू जर चलबिचल झाला असता तर माझ्याकडून ब-याच चूका झाल्या असत्या,पण मला तू माझ्या बुद्धीला आणि हाताला दुसरीकडे कुठेच जाऊ दिले नाही.माझ्या कामात एकाग्रता आणि सातत्य ठेवल्यामुळे मला इतरत्र भटकण्याची संधी दिली नाही.म्हणून तुझे पहिल्यांदा आभार मानले पाहिजे. म्हणजेच काल जी आपल्या चांगल्या दृष्टीकोनातून कामाची तयारी आणि पूर्णत्वाकडे नेण्याची सर्वस्वी जबाबदारी मनाचीच होती.मनाचीच तयारी नसती तर कोणतेही काम पूर्णत्वाकडे गेले नसते. सदैव आपल्या मनाला कसल्याही प्रकारची मरगळ येऊ न देता प्रसन्न ठेवले पाहिजे आणि आजचे ही काम तितकेच जोमाने पार पडावे यासाठी तूच सर्वस्वी जबाबदार आहे आणि राहणार.थोडक्यात सांगायचे झाले तर कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा आपले मन आपल्या ताब्यात असायला हवे. त्यासाठी आपण सदैव तयार असायला हवे मग ते कोणतेही काम करणे सोपे जाईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सदैव - Always* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणुसकीचे फळ* एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे. कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद झाला. लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जीव जाणे, निश्चित होते. त्या माणसाला काही सुचेनासं झालं, पण तासाभरात एक चमत्कार झाला आणि कोणी तरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता. त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले, “तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय.” सुरक्षा रक्षक म्हणाला, “या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो.” त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे, एक दिवस त्याचा जीव वाचवेल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मानपूर्वक बोलून मग पुढे जा. माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल… म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/10/2018 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वाचन प्रेरणा दिन* *हात धुणे दिन* *जागतिक विद्यार्थी दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९३२ - टाटा एरलाइन्सच्या (नंतरचे एर इंडिया) विमानाचे पहिले उड्डाण. १९९७ - गॅलिलियो अंतराळयान गुरूच्या उपग्रह आयोपासून ११२ मैलांवरुन पुढे गेले. 💥 जन्म :- १९३१ : मिसाईल मॅन, थोर वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम 💥 मृत्यू :- १९१८: शिर्डीचे साईबाबा यांनी समाधी घेतली. १९६१ - सूर्यकांत त्रिपाठी, निराला,४४ ग्रंथ लिहिणारे हिंदी साहित्यिक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *चांगला वाचक हा चांगला लेखक होऊ शकतो असे प्रख्यात साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिकांनीही विकासाच्या प्रक्रियेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत हळूहळू होत आहे सुधारणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *उत्तर प्रदेशातील अलाहाबादचं नाव आता ‘प्रयागराज’, बादशाह अकबरानं बदललं होतं ‘प्रयाग’चं नाव, योगी आदित्यानाथ सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकार काढून घेत शासनाने स्वत:कडे घेतले आहेत. तर काही विभाग अन्य खात्याकडे वर्ग करण्याचा सपाटा लावला आहे. त्यातून पंचायतराज संस्थांच्या अस्तित्वालाच धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची होतंय चर्चा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *महिलांच्या फ्री-स्टाईल विभागातील ४३ किलो वजनी गटामध्ये सिमरनने हे रौप्यपदक पटकावले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *हैदराबाद : भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर दहा विकेट्स राखून मिळविला दणदणीत विजय मिळवून भारताने कसोटी मालिका २-० अशी खिशात टाकली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://b.sharechat.com/ljoUetKq1Q *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वाचन प्रेरणा दिनानिमित डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती *मिसाईल मॅन ते राष्ट्रपती* https://sharechat.com/post/ZQJyEmR आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. अब्दुल कलाम* डॉ. अवूल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. ते भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. बी.एस.सी. झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वत:चे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील अग्नी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार असताना त्यांनी प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. - डॉ. ए पी जे अब्दुल कलाम *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) स्ट्रेप्टोमायसीनचा शोध कोणी लावला ?* वेक्सिमन *२) पेरू या देशाची राजधानी कोणती ?* लिमा *३) राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोठे आहे ?* कोल्हापूर *४) भारतातील कोणत्या राज्यात बॉक्साईट सापडते ?* महाराष्ट्र *५) इंडियन इंडपेन्डन्स अँक्ट कधी पास करण्यात आला ?* १८ जुलै १९४७ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● फारुख शेख ● मंगेश फड ● मोहन भुसेवार ● संतोष दौडे ● पृथ्वीराज राहेरकर ● शिवराज काठेवाडे ● सुभाष मेंटेवाड ● संजय पा. कदम *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चिंता* आज प्रत्येकाला चिंता आहे रूपाची पण चिंता करावी ती खरी स्वरूपाची वरवर दिसते ते नश्वर रूप असते माणसाच्या मनात खरे स्वरूप असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण व्यक्ति म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतुन ढुसण्या देत असते. त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते, कारण व्यक्ति जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो.* *एक साधा दृष्टांत असा आहे की, कोणतेही नितीशास्त्र पुस्तकामधून शिकविल्यानंतर ते जेवढे रूजते त्यापेक्षा ते आधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते. त्यामळेच संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'मार्गाधारे वर्तावे' संत तुकाराम म्हणतात, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' याचाच अर्थ व्यक्ति जीवनात वर्तनाला महत्व आहे. समाजातले प्रतिष्ठित, थोर लोक जे आचरण करतात, त्यांच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 39* *कामी अमि नॅ ब्वेयी,* *विष ही कौ लई सोढी |* *कुबुद्धि ना जाई जीव की,* *भावै स्वमभ रहौ प्रमोधि ||* अर्थ दारुच्या व्यसनात गुरफटलेल्या माणसाला दारूंच आवडते. त्याच्या समोर अनमोल असा अमृताचा कुंभ ठेवला तरी त्याला त्याची काहीच किंमत वाटणार नाही. कारण तो व्यसनाधीनतेमुळे सदैव विषाचाच शोध घेत फिरत असतो. मुर्ख माणसाला समजावायला साक्षात ईश्वर जरी आला तरी मुर्खाच्या मुर्खपणासमोर बिचार्‍या ईश्वराचं काय खरंच नाही ठेवणार तो ! व्यसनाधीनतेत बुडालेला माणूस बुद्धी प्रामाण्य वागत नाही. तो त्याने जी नशा केलेली असते. त्या नशेच्या पूर्णपणे अमलाखाली जावून त्या क्षणी सुचेल त्याप्रमाणे इष्ट-अनिष्ट वर्तन करून बाजुला होत असतो. जसे : गंजेटी झोपडीत गप्पागोष्टी करत चिलीम फुकत बसलेले असतात. एकाने धुंदीत चिलीम सिलगावून जळती काडी भिरकावलेली.हे महाशय झुरक्यात गुंग. झोपडी पेट घेते. तिथे बर्‍याच जीवनपूरक वस्तू आहेत. अरे जाळ लागलाय पळा . म्हणत ते केवळ चिलीमच घेवून पळतात. त्यांना तीच हवी असते. "गंजेटी बैठे गांजा पिने झोंपडी मे लागी आग, चल रे निकल जोगी अपनी चिलम ले भाग । असं असतं व्यसनी माणसांचं वर्तन ! विचारानं मनावर घेतलं असतं तर बर्‍याच वस्तू वाचविता आल्या असत्या. परंतु नशेत बुद्धी साबुत राहातेच कुठं ! नको त्या मर्कट लिला करून तो बघणार्‍यांच्या विनोदाचा किवा दयेचा भाग बणून व्यसनी माणसं जगत असतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अहंकाररुपी माणूस सुरवातीला दुस-यावर आपला प्रभाव टाकायला जातो, परंतु सुरुवातीला लोकांना माहीत नसते म्हणून त्याच्यातील वर्तनाकडे पाहून थोडे दुर्लक्ष करतात.पुन्हा पुन्हा जर असे वर्तन करत असेल तर त्याची प्रतीष्ठा काय आहे हे चांगलेच ओळखायला लागतात आणि त्याच्याशी कोणतेही संबंध ठेवत नाहीत.जर स्वत:चेच तुणतुणे वाजवत असेल तर काही काळात त्यांच्या अहंकाराचे डफडेच वाजवून टाकतात.त्याची कोणतीच प्रतिष्ठा समाजामध्ये ठेवत नाहीत.मग तो जीवनात एकटा पडतो.इतरही लोक त्याला दूर करतात.त्याच्या अहंकाराने त्याचे सगळे संपवलेले असते. माणसाने कधीही अहंकाराची भाषा करु नये.अहंकाररुपी राक्षस एकदा का अंगात आणि मनात शिरला तर त्याचे सर्वस्व संपलेच म्हणून समजावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिकवण - Teachings* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भेटवस्तू न स्वीकारणे* अब्दुल कलाम यांचा वडिलांची शिकवण स्वातंत्र्यानंतर अब्दुल कलाम यांच्या वडिलांना ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यांनतर एके दिवशी एक व्यक्ती त्यांना भेटायला आले. त्यावेळी कलामांचे वडील घरी नव्हते आणि कलाम अभ्यास करत होते. कलामांचे वडील घरी नसल्याचे पाहून तो इसम म्हणाला, ‘मी तुझ्या बाबांसाठी भेटवस्तू आणली आहे. ते जेव्हा येतील तेव्हा ही भेटवस्तू त्यांना दे.’ काही वेळाने कलामांचे वडील घरी आल्यावर त्यांना ती भेटवस्तू दिसली. चांदीच्या ताटात ठेवलेल्या त्या भेटवस्तू पाहून त्यांनी कलामांना विचारले, ‘बेटा या भेट वस्तू कुठून आल्या.’ तेव्हा कलाम म्हणाले, ‘तुम्ही घरी नसताना एक व्यक्ती घरी आला होता, त्यानेच हे दिले.’ त्यांच्या वडिलांनी त्या भेटवस्तू उघडून पाहिल्या तर त्यात, महागडे कपडे, चांदीचे पेले आणि मिठाई होती. हे पाहिल्यावर ते रागवले. कलाम घरी असूनही त्या व्यक्तीने या भेटवस्तू घरी ठेवल्या आणि कलामांनी त्याला नाकारले नाही, या गोष्टींचा त्यांना राग आला. रागावर अनावर झाल्याने त्यांनी कलामानां जोरात चापट दिली आणि घरात येर-झऱ्या घालू लागले. थोड्यावेळाने कलामांच्या वडिलांना लक्षात आले की आपण रागाच्याभरात कलामवर जास्त ओरडलो आणि उदास झालेल्या कलामांना जवळ बोलवून त्यांच्या डोक्यावर हात फिरवत समजावले. ते म्हणाले, ‘बाळ इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय कोणतीही भेटवस्तू स्वीकारु नकोस. देव जेव्हा एखाद्याला पद देतो तेव्हा त्यासोबत येणाऱ्या गरजाही पूर्ण करतो. देवाने दिलेल्या गोष्टींपेक्षा जास्त घेणे चुकीचे असते.’ अगदी प्रेमाने समजवत कलामांचे वडील त्यांना म्हणाले, भेटवस्तू स्वीकारणे चांगले लक्षण नाही. भेटवस्तू देण्याच्या मागे देणाऱ्याचा काही हेतू नक्कीच असतो. भेटवस्तू स्वीकारताना काळजी घेतली पाहिजे, अन्यथा त्यावरुन विषाची परीक्षा देण्याची वेळ येऊ शकते. वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट कलामांच्या डोक्यात पक्की बसली आणि त्यानंतर ते भेटवस्तूच्या मोहात पडले नाहीत *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

🌹🌹🌹🌹🌹🌹 *✍जिंदगी खेलती भी उसी के साथ है, जो खिलाड़ी, बेहतरीन होता है.!* *दर्द सबके एक से है, मगर हौंसले सबके अलग अलग है. कोई हताश हो के बिखर जाता है, तो कोई संघर्ष करके निखर जाता है.* 🙏🙏🙏🙏🙏

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/10/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८७१ : ब्रिटिश सरकारने भारतात क्रिमिनल ट्राइब्स अँक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती आणि जमातींना गुन्हेगारी जमाती ठरवलं. हा कायदा १९४९ मध्ये रद्द केला गेला. २0१३ : ओडिशाच्या किनारपट्टीला 'फायलिन' चक्रीवादळाचा तडाखा. सात जणांचा बळी 💥 जन्म :- १९०९ - विनायक कृष्ण (व्ही.के.) गोकाक, कानडीभाषेतील लेखक 💥 मृत्यू :- १९६७ : थोर नेते राम मनोहर लोहिया *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आंतरजिल्हा बदलीमुळे राज्यभरातील त्रस्त शिक्षकाना नव्या निर्णयाचा दिलासा; आवडीच्या जिल्ह्यात राहण्याची संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गाड्यांचा इन्शुरन्स महागला, कार खरेदी करणाऱ्यांना मोजावे लागणार आता दुप्पट पैसे  तर दुचाकी नवीन घेणा-यांना मोटारसायकलच्या किमतीच्या 10 टक्के विम्याचे पैसे भरावे लागणार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *श्रीनगर - ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. करण सिंह यांचे पुत्र आणि पीडीपीचे नेते विक्रमादित्य सिंह यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांची माहिती.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ब्राह्मोसची माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या निशांत अग्रवालला 7 दिवसांची पोलीस कोठडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *हरिद्वार- पर्यावरणवादी गंगाप्रसाद जी अग्रवाल यांचं निधन, गंगा प्रदूषणाविरोधात 111 दिवस बसले होते उपोषणाला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *रोहित शर्माकडून कर्णधारपदाची धुरा आता पुन्हा विराट कोहलीकडे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~*~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. https://sharechat.com/post/zWj7G4M Follow me on Share Chat ~~~~~~~~~~*~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राम मनोहर लोहिया* समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांचा जन्म २३ मार्च १९१0 रोजी उत्तरप्रदेशातील अकबरपूर येथे झाला. अडीच वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचे वडील महात्मा गांधींचे अनुयायी होते. मुंबईच्या मारवाई शाळेत त्यांचे शिक्षण झाले. १९२0 मध्ये त्यांनी लोकमान्य टिळकांच्या निधनाच्या दिवशी विद्यार्थ्यांसोबत पहिल्यांदा आंदोलन केले. गांधींच्या आवाहनानुसार त्यांनी दहा वर्षांचे असताना शाळा सोडून दिली. १९२१ मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांची भेट जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत झाली. १९२४ मध्ये ते प्रतिनिधी म्हणून काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झालेत. १९२५ मध्ये त्यांनी दहावीची परीक्षा दिली यात त्यांनी ६१ टक्के गुण मिळवले. यानंतर वाराणशीच्या काशी विद्यापीठात शिकायला गेले. पुढे कोलकाता येथे शिक्षण घेतले. अखिल बंग विद्यार्थी संमेलनात नेताजी सुभाषचंद्र बोस न पोहोचल्यामुळे त्यांच्याकडे संमेलनाचे अध्यक्षपद देण्यात आले. १९२८ मध्ये ते काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झाले. नंतर ते विद्यार्थी संघटनेत सक्रीय झाले. सायमन कमिशन विरोधातील आंदोलनात त्यांनी भाग घेतला. पुढे १९३0मध्ये अग्रवाल समाजाच्या मदतीने शिक्षणासाठी इंग्लंडला व बर्लिनला गेले. भगत सिंग यांना फाशी देण्याचा त्यांनी लीग आँफ नेशन्सच्या बैठकीत निषेध केला.१७ मे१९३४ रोजी त्यांनी समाजवादी पार्टीच्या स्थापनेचा निर्णय घेतला. २२ आँक्टोबर १९३४ रोजी मुंबईत काँग्रेस सोशलिस्ट पक्षाची स्थापना केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माणसे जन्मतात आणि मरतात, पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) सिंगापूरच्या विमान वाहतुकीचे नाव काय ?* सिंगापूर एअरलाईन्स *२) राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्य नेमू शकतात ?* १२ *३) इराणमधील सर्वात मोठे सरोवर कोणते ?* उर्मिया *४) कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हजर होते ?* दुसऱ्या *५) कोणत्या देशात भारतीयांची लोकसंख्या अधिक आहे ?* मॉरिशस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अमित शिंदे ●  संपन्न कुलकर्णी ●  जगन कुलवंत ●  सायारेड्डी जरावाड ●  अशोक हाके ●  बालाजी सातपुते ●  संतोष शाटलवार ● माधवराव धुप्पे ●  दीपक वाघमारे ● प्रभू पाटील कदम *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोकं* सांगायला गेल की लोकं टांगायला जातात एकत्र करायला गेल की ते पांगायला जातात खरं खोटं काय ते विचार करून ऐकाव खरा विचार करतात त्यांनी कशाला भैकाव शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   ••• ●‼ *विचार धन* ‼● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घटस्थापना होऊन नवरात्रौत्सवाला काल प्रारंभ झाला. नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा केली जाईल. घटामध्ये माती घालून त्यात बी रूजत घातलं जातं. देवीसमोर अखंड दीप लावला जातो. देवीपुढे क्रमाक्रमाने वाढत जाणा-या फुलांच्या माळा बांधल्या जातात, आरत्या म्हटल्या जातात. दिवसभर देवी भागवत, श्रीदुर्गासप्तशतीची पारायणं केली जातात. 'जय आंबे माता' असा मोठ्या आवाजात पुकारा केला जातो. रात्री रस्त्यावर मंडप घालून जागोजागी दांडिया खेळला जातो. देवीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात रोषणाई केली जाते.* *नवरात्रीचे नऊ दिवस संपून जातील. मंदिरातल्या किंवा देवघरातल्या देवीचा उत्सव वर्षानुवर्षे साजरे केले जातात, पण मनात प्रश्न येतो तो घराघरात वावरणा-या देवीचं काय? माता, भगिनी, कन्या, सून, नात या रूपात वावरणा-या देवीचा प्रश्न कधी सुटणार? मंदिरात पूजा आरती करणारे देवीभक्त घरातील देवीकडे कधी लक्ष देणार? प्रत्यक्ष देवाने स्त्री-पुरूष असा भेदभाव कधीही केला नव्हता. प्राचीन काळी पुरूषांनी प्रथम देवीचीच मंदिरं उभारली, मग मध्यंतरीच्या काळात असं काय घडलं ?* *मध्यंतरी वाचलेली एक गोष्ट मला आठवते. एकदा प्रत्यक्ष देव आणि पृथ्वीवरचा माणूस यांची अकस्मात भेट झाली. गंमत म्हणजे लगेचच दोघांनीही एकमेकांशी बोलताना पहिलं वाक्य उच्चारलं, 'माझी निर्मिती केल्याबद्दल तुझे मन:पूर्वक आभार !' "खरोखरच प्रथम कोणी कोणाची निर्मिती केली? देवाने माणसाची की माणसाने देवाची ?"* • • ● ‼ *रामकृष्णहरी* ‼● • • 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 37* *आंखि ना देखे बापरा,* *शब्द सुनै नहि कान* *सिर के केश उजल भये,* *आबहु निपत अजान।* अर्थ विधात्याने डोळे दिलेले असले तरी कोणत्याही बाबीला लक्षपूर्वक पाहात नाही. कान दिलेले असून सुनबहिरेपणा करीत असतो. आपूलकीने दिलेला कोणताही उपदेश किवा सल्ला लक्षपूर्वक ऐकत नाही. डोईचे केस काळ्याचे पांढरे होऊन पिकून गेले आहेत. तरी विचारपूर्वक कोणतीही गोष्ट केलेली नाही. त्यामुळे विवेकीपणा त्याच्या अंगी असण्याची सुतराम शक्यता नाही. केवळ वयाने नुसतेच ताड-माड वाढून चालत नाही. तर अनुभवाने अंगी समृद्धपणा व परिपूर्णता यायला हवी. निसर्गाविष्कार खूपच मजेदार असतात. त्यामागील कार्यकारणभाव समजून घ्यायला हवे आहेत. बरेच जण या बाबी समजूनच घेत नाहीत. कानोकानी व सांगासांगीवरच विश्वास करून सत्य काय ते जाणूनच घेत नाहीत. अशी मुर्ख माणसेच धूर्त , स्वार्थी व लुटारूंचे कळसुत्री बाहुले बणतात. अंधश्रद्धा व अंधरूढींचे गाढव ओझे ते बिन तक्रार वाहून नेत असतात. अशा माणसांमुळेच समाजातल्या अंधश्रद्धा व वाईट रिवाज विज्ञानयुगातही अबाधित जपल्या जात आहेत. आजही अज्ञानामुळे किंबहुना अर्धशिक्षीतपणामुळेच माणसाची फसगत होत असते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात कोणताही जीव जन्माला आला की, त्याचा जीवनप्रवास ख-या अर्थाने सुरू होतो. त्याला त्याचे जीवन कसे जगायचे यासाठी परमेश्वराने त्यांच्यासोबत मन आणि बुद्धी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याला म्हणजे विशेष करुन मानवाला आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी भेट म्हणून बहाल केली आहे. ह्याचा आधार घेऊनच जीवन कसे जगायचे याचे तंत्र तो शिकतो. त्यानंतर तो आपल्या मनाचा आणि बुध्दीचा चांगला सदुपयोग केला तर नक्कीच जीवनाचा प्रवास सुखावह करतो आणि जर का दुरुपयोग करायला लागला तर जीवनप्रवास दु:खमय व्हायला लागतो. ह्या दोन गोष्टी मन आणि बुद्धी यावरच अवलंबून आहेत. मग मानवरुपी जीवाने आपले जीवन कसे जगायचे आणि आपले जीवन जगण्यासोबत इतर जीवांना आपण न दुखवता कसे जगवायचे हे जरी कौशल्य मनाच्या आणि बुध्दीच्या सृजनशील कौशल्याने हाताळायला आले तरी परमेश्वराने दिलेल्या जन्माचे नक्कीच सार्थक झाल्याचे समाधान वाटेल. हा जन्म परत येणार नाही हे तर माहीत आहेच. यानंतर आपले शरीररुपी अस्तित्व संपणार आहे पण आपण आपल्या जीवनात केलेले चांगले कार्य येणा-या जीवांच्या जीवनासाठी प्रेरणा ठेवून जाणार आहे अर्थात तुम्ही तुमच्या कार्याने अमर राहणार आहेत हे लक्षात असू द्यावे *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विश्वास - Believe* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समजून घेऊन वागणे* एक शिकारी एकदा शिकार करण्यासाठी रानात गेला. त्याने बरेच कुत्रे स्वतःबरोबर घेतले होते. परंतु ते आपल्या मर्जीप्रमाणे इकडेतिकडे पळू नयेत म्हणून त्याने दोन दोन कुत्रे जोडीने एका साखळीने बांधले. त्यांपैकी वाघ्या व पाग्या या नावाच्या दोन कुत्र्यांची एक जोडी होती. ते एकमेकांवर प्रेम करीत असत. ते नेहमी बरोबर खात-पित, नेहमी एकत्र खेळत असत. तेव्हा ते चांगले काम करतील असे त्या शिकार्‍याला वाटले. पण थोड्या वेळाने पाहतो तर वाघ्या पुढे ओढ घेत असता पाग्या मागे राहू लागला व पाग्याने एका दिशेने ओढ घेतली की वाघ्याने उलट दिशेने घ्यावी असे होऊ लागले. शेवटी दोघेही एकमेकांचे लचके तोडण्याच्या बेतात आले. ते पाहून एक म्हातारा कुत्रा त्यांना म्हणाला, 'मूर्खांनो, तुम्ही दोघांनी थोडी पड घेतली तर भांडणाची वेळ का येईल ? मी आणि माझा सोबती नेहमी एकमेकांच्या मर्जीप्रमाणे वागत असूं, त्यामुळे आमच्यावर कधीही भांडण्याचा प्रसंग आला नाही.' तात्पर्य - एकत्र राहावयाचे असेल तर सर्वांनी एकमेकांना समजून घ्यावे लागते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/10/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *आंतरराष्ट्रीय मुलगी दिन.* 💥 ठळक घडामोडी :- १७२७: दुसरा जॉर्ज व कॅरोलीन, अॅन्सबॅक यांचा राज्यअभिषेक १८५२: युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी चे उद्घाटन १८९०: डॉटर्स ऑफ द अमेरिकन रिव्होल्यूशन संस्थेची वॉशिंग्टन डी.सी. येथे स्थापना 💥 जन्म :- १९०२: जयप्रकाश नारायण - भारतीय राजकारणी  १९०५: फ्रेड ट्रम्प - अमेरिकन उद्योगपती १९१६: नानाजी देशमुख - भारतीय सामाजिक कार्यकर्ते  १९४२: अमिताभ बच्चन - भारतीय अभिनेता १९६५: रोनित रॉय - भारतीय अभिनेता 💥 मृत्यू :- १९६८ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दर आठवड्याला दुष्काळग्रस्त भागाची करणार पाहणी ; मंत्रीदेखील घेणार परिस्थितीचा आढावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस मिळणार, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठी घोषणा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *तितली चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर उद्या ओडिशातील शाळा, महाविद्यालयं, अंगणवाड्या राहणार बंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जेष्ठ विधिज्ञ तुषार मेहता यांची भारताचे नवे महाधिवक्ता म्हणून करण्यात आली नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सौदी अरेबिया भारताच्या मदतीला ; अतिरिक्त खनिज तेलाचा पुरवठा करणार, अमेरिकेच्या इराणवरील निर्बंधांमुळे चिंतेत असलेल्या भारताला दिलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारोत्तोलक जेरेमी लालरिनुंगाने युथ आॅलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला मिळवून दिले पहिले सुवर्णपदक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक रामप्रहरमध्ये प्रकाशित लेख *" जीवन सुंदर आहे "* http://ramprahar.com/wp-content/uploads/2018/10/Ram-Prahar-11-October-2018-Page-4.jpg लेख वाचून आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज* तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली. त्यांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. ते आधुनिक काळातील महान संत होते. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्‍वबंधुत्वाचा संदेश दिला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. आते है नाथ हमारे हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्न होता. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'सनी डेज' या पुस्तकाचे लेखक कोण ?* सुनिल गावसकर *२) १९९0 मध्ये आशियाई क्रिडा स्पर्धा कोठे पार पडल्या ?* बीजिंग *३) पश्‍चिम बंगालमधील प्रमुख बंदर कोणते ?* कोलकाता *४) भारताची उत्तर-दक्षिण लांबी किती आहे ?* ३,२१४ कि.मी. *५) एक्स रे चा (क्ष किरणांचा) शोध कोणी लावला ?* विल्यम व्हॉन रॉन्टेजन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ●  प्रवीण वाघमारे ●  बाबाराव पाटील कदम ●  रवी सितावार ●  अजय वाघमारे ●  सुमित बोधने ●  दिनेश करपे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *माणसं* माणसंच माणसाला जेव्हा पाण्यात पहातील अशा माणसाकडून काय अपेक्षा रहातील माणसाने माणसाची किंमत केली पाहिजे माणसानेच माणसाला हिंमत दिली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========        ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवाचं मन... अनेक प्रकारचे सुखदु:खात्म प्रसंग, विवंचना, काळजा, आसूया, स्पर्धा, द्वेष, मत्सर, उत्सुकता आणि कुतूहल...यांनी सदैव त्याचे मन 'पिसाट' झालेले. अप्राप्याचा ध्यास म्हणजे आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याचा अथक प्रयत्न आपण सारे करीत असतो; पण 'मन:शांती' चा शोध घ्यायला नेमके विसरतो. 'मन:शांती' हे महत्वाचे जीवनसूत्र आहे, हेच आपण या सा-या धबडक्यात हरवून जातो. 'निरंजनी आम्ही बांधियेले घर' असे संतवचन आहे. ही निरांजनावस्था महत्वाची. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला सतत काही ना काही करावे लागते. यातून त्याची सुटका नाही. मनाची सर्वार्थाने मुक्तता तशी कठीणच. कारण वैयक्तिक भावभावना, विकार-विचार आणि अहंकार यापासून स्वत:ला अलग करणे जवळजवळ अशक्यप्राय.* *पाण्यात पडले म्हटले की कोणीही ओलाचिंब होणारच. मात्र एखादा खडक त्या जलाशयात असेल तर तो पाण्यात राहून अलिप्तच की ! अशी अलगता संसारात राहून साधायची, म्हणजे शरीरक्रिया चालू आहे पण मन मात्र अलिप्त आहे. त्याच्या पृष्ठभागावर कोणत्याच लहरी नाहीत, तरंग नाहीत. मनाच्या समधात अवस्थेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी 'नुरोनिया ठेला' असे केले आहे. म्हणजे बाह्यस्वरूपी तो इतका निश्चल की जिवंत आहे का, हा इतरांना प्रश्न पडावा, आणि तो जिवंत असला तरी जणूकाही जिवंत नाही, असे वाटावे असा... त्याच्या मनाच्या या अवस्थेला 'सहजस्थिती किंवा 'निजस्थिती' असेही त्यांनी म्हटले आहे. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...' नामापरते सुख नाही रे सर्वथा !' हाच तो सद्रगुरूपदेश...* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩‼🚩‼🚩‼🚩‼🚩 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 37*      *कबीर कूता राम का,* *मुटिया मेरा नाऊ |* *गले राम की जेवड़ी,* *जित खींचे तित जाऊं ||* अर्थ महात्मा कबीर म्हणतात की, मी राम नामाचा सतत जप करतो म्हणून काही जण सततच्या उच्चारामुळे रामाचा कुत्रा म्हणून हिणवतात खाजवतात.. होय मी रामाचा कुत्रा आहे. राम नामाच्या मोत्यांची माला माझ्या गळ्यात मी धारण केलेली आहे, त्यामुळे माझा गळा कसा शोभिवंत दिसतो आहे. मी तिकडे जात असतो. मला गळ्यात घातलेली ही साखळी जिकडे ओढून नेईल. अशा या राम बंधनाच्या प्रेमात जगताना खूप मजा येते. रामाचा अंगीकार केवळ बोलण्यापुरताच नाही तर राम जगण्याचा भाग बनलेला आहे. रामाचा अंगीकार करताना सत्य मार्ग , एकवचनीपणा थोरा मोठ्यांचा सन्मान या बाबी जगताना आपोआपच प्रवृत्तीचा भाग बणून जात आहेत . त्यामुळे जगण्याला एकप्रकारची खुमारी चढते आहे. ती मला हवीहवीशी आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= मनुष्याने जीवनात कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपल्या मनाचा तोल जाऊ देऊ नये.परिस्थिती ही आपल्याला परीक्षा घेण्यासाठीच आपल्यासमोर उभी राहते आणि ती आपल्याला द्यावी लागते.तेव्हा आपण शांतवृत्तीने, संयमाने, विचारपूर्वकदृष्टीने परिस्थिती कशी आहे त्यास अनुसरून ती परीक्षा द्यायला सामोरे गेले पाहिजे तरच आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो.जर आपण माघार घेतली तर आपल्या जीवनाला परिपूर्णता ही प्राप्त होऊ शकत नाही.परिस्थिती कोणतीही असो ती एक आपली खरी परीक्षाच आहे. ती दिल्याशिवाय आपल्याला कसे समजेल ?समजण्याआधी आपण तत्पर राहायला शिकले तरच यशस्वी होता येते. अन्यथा परिस्थितीसमोर हार मानून दुःखमय, यातनामय जीवन जगण्यासाठी तयार राहावे लागेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🥙🍃🥙🍃🥙🍃🥙🍃🥙🍃🥙 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *परिस्थिती - situation* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चढ आणि उतार* आपल्या छानदार खोगिराची एका घोडयाला घमेंड वाटत होती. हमरस्त्याने एक ओझे लादलेला गाढव चालला होता. तो त्या घोडयाला वाट करून द्यायला जरा बाजूला झाला. पण आपल्याच तो-यात घोडा उतावीळपणे त्याला म्हणाला, 'ए, जा रे, हट्. चल लवकर हो बाजूला. नाहीतर एखादी लाथच खाशील.' बिचारे गाढव गप्पच राहीले. पण घोडयाचे ते उध्दटासारखे वागणे त्याच्या मनात राहीले. काही दिवसांनी तो घोडा म्हातारा व निकामी झालेला पाहून त्याच्या मालकाने तो एका शेतकऱ्याला विकला. आता त्या शेतक-याच्या शेतखणाची गाडी ओढून नेण्याचे काम त्याला करावे लागत होते. थकला भागला तो घोडा असाच एकदा रस्त्यावरून जात असताना पूर्वीचे ते गाढव त्याला भेटले. त्याला पाहताच खोचकपणे गाढवाने त्याला विचारले, 'ओऽहो, कुठे निघाली स्वारी? नि हे काय? तुमचं ते पूर्वीचं छानदार खोगिर नाही दिसत कुठे? काय हो अश्वराज, त्या वेळच्या त्या घमेंडीत कधी अशी पाळी येईल, असं वाटलं होतं का तुम्हाला?...' *तात्पर्य - जीवनात चढ-उतार दोन्ही असतात, हे सदैव ध्यानी बाळगावे.* * *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/10/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक मानसिक आरोग्य दिन* *जागतिक लापशी दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९९८ : भारताचे २९ वे सरन्यायाधीश म्हणून आदर्श सेन आनंद यांनी कार्यभार सांभाळला २0१३ : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नवृत्त होत असल्याचे जाहीर केले. 💥 जन्म :- १९१0 : डॉ. द्वारकानाथ कोटणीस १९0६ : ख्यातनाम लेखक आर. के. नारायण १९५४ : हिंदी चित्रपट अभिनेत्री रेखा 💥 मृत्यू :- २००६ - सरस्वतीबाई राणे, भारतीय - मराठी गायिका. २००८ - रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका. २०११ - जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *हरयाणा: शेतक-यांना सावकारांपासून वाचवण्यासाठी आम्ही बँकांचे दरवाजे खुले केले पंतप्रधान नरेंद्र मोदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *तनुश्री दत्ताच्या आरोपांनंतर नाना पाटेकरांना महिला आयोगाची नोटीस* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *अहमदनगर- शिर्डीच्या साई संस्थानला सुप्रीम कोर्टाचा दणका, चुकीच्या प्रवर्गातून विश्वस्त नेमण्यावर आक्षेप, अपात्र संचालकांना काढून नवे विश्वस्त नेमा सुप्रीम कोर्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सणासुदीच्या तोंडावर राज्यात 1.5 हजार मेगावॅट विजेचा तुटवडा; नाशिक, मुंब्रासह राज्याच्या काही भागात भारनियमन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत 74.06 रुपये प्रति डॉलर.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत निक्की हॅलेंचा राजीनामा; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राजीनामा मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताने अंध क्रिकेट टी-२० तिरंगी मालिकेत इंग्लंडवर मात करीत विजयी घोडदौड राखली कायम.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक पार्श्वभूमीमध्ये प्रकाशित लेख *तंबाखूमुक्त एस. टी. होईल काय ?* त्या दिशेने महामंडळाचे एक पाऊल पडत आहे. ते उल्लेखनीय आहे. http://parshvbhumi.com/date/20181010/page/4/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कादंबरीकार आर के नारायण* प्रसिद्ध कादंबरीकार आर. के. नारायण यांचा जन्म १0 आँक्टोबर १९0६ रोजी झाला. त्यांचे पुर्ण नाव रासीपुरम अय्यर नारायणसामी होते. भारतीय लेखकांच्या तीन सर्वात महान साहित्यिकांमध्ये त्यांची गणना होते. कादंबरी आणि कथा प्रकाराच्या माध्यमातून त्यांनी विविध स्तर आणि रुपातील मानवीय विकास आणि अध:पतनाचे चित्रण केले. गाईड कादंबरीसाठी १९६0 मध्ये त्यांना साहित्य अकादमी हा सर्वोच्च सन्मान मिळाला. १९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी अँन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्या वाचताना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे. यावर अनेकांचा विश्‍वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी कथांमधून उभे केले आहे. साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत - आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा - आचार्य विनोबा भावे *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्रातील प्रमुख वेधशाळा कोठे आहे ?* पुणे *२) उत्तर व्हिएतनाममधील सोंग की नदीच्या काठावर वसलेलं महत्त्वाचं शहर कोणतं ?* हनोई *३) १९८५ हे वर्ष काय म्हणून साजरं करण्यात आलं ?* इंटरनॅशनल इयर ऑफ यूथ  *४) आंध्र प्रदेशमध्ये अवकाशयान केंद्र कोठे आहे ?* श्रीहरिकोटा *५) पृथ्वीच्या आपल्या आसाभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात ?* स्वांगपरिभ्रमण गती *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ●  विशाल अन्नमवार ●  राजेश्वर भुरे ●  सतीश बड्डेवाड ●  हरिश्चंद्र भोईर ●  पोतना पालंचेवार ●  संतोष खेडकर ●  गंगाधर पापुलवार ●  श्याम देसाई ●  राजेंद्र वाघमारे ●  संतोष चंदेवाड ●  सतीश बोधनकर ●  राज वाजीरे ●  रेखा अर्गे ●  माधव गवळे ●  विठ्ठल धुळेवार ●  गोविंद पाटील ●  वसंत पाटील कदम ●  रामा गायकवाड ●  कैलास सांगवीकर ●  विनोद लोणे ●  तुकाराम ढोले ●  शंकर बत्तीनवार ●  तानाजी पाटील ●  अरुण शंकपाळे ●  प्रमोद यादव ●  शरद घुबे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *मर्यादित* आशा केल्यास माणूस जगाचा दास होतो दास होण्याची चिंता नाही जो सदा उदास रहातो आशा किंवा उदासी एकदम टोकाची नसावी आनंदात जीवन जगण्यास दोन्ही मर्यादित असावी शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========     • • ● ‼ *विचार धन* ‼ ● • • =========ஜ۩۞۩ஜ========= *कामावरून थकून भागून आलेल्या भुकेल्या पुरुषाला बाई जेवायला वाढते. तो जेवताना समोर बसून रहाते. ज्याच्याकरीता प्रेमाने जेवन बनवलं, तो जेवनाचा आस्वाद घेतोय याचं समाधान असतंच. त्या बरोबर भुकेला माणूस जेवताना तल्लीन झालेला असतो. ती तल्लीनता बघण्यासारखी असते. ज्यांना व्यवस्थित खायला मिळतं त्यांच्यासाठी भुकेचा सोहळा असतो. पण जे आन्नालाही तरसतात त्यांच्यासाठी भूक दुश्मन असते.* *एका आत्मकथनात भुकेचा संदर्भ आहे. गरिबी किती असावी ? हगवण लागलेल्या म्हशीच्या मागं पोरं टोपलं घेऊन फिरतात. म्हशीला न पचलेले दाणे शेणात तसेच असतात. ते दाणे धुवून घ्यायचे. दाणे फार नसतात. मग आंब्याच्या कोयीमध्ये निघणारा गर दाण्यांबरोबर दळायचा. त्याची भाकरी करायची आणि भूक भागवायची. अनेकदा वाळलेल्या भाकरी पाण्यात भिजवून खाल्ल्या जातात. उंदीर भाजून खाल्ले जातात. झाडाचा पाला खाऊनही भूक भागविली जाते.* *याउलट सुबत्ता असलेली माणसं भूक लागण्याची वाट पहात नाहीत, नुसते खातच सुटतात. दिवसातून कितीदा खावं यावरही मतमतांतरे आहेत. या वादात पडण्यापेक्षा कडकडून भूक लागली की जेवावं हेच खरं. जेवताना थोडी भूक शिल्लक ठेवून आणि जगात अनेक लोक उपाशी असतात हे वास्तव डोक्यात ठेवून जेवावं, प्रत्येकाला भूक तर लागणारच आहे.* •• ●‼ *रामकृष्णहरी* ‼● •• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 36*      *जबलग भागती सकामता,* *तबलग निर्फल सेव |* *कहई कबीर वई क्यो मिलई,* *निहकामी निज देव ||* अर्थ जोवर उद्देश ठेवून भक्ती केली जाईल तोवर ती भक्तीरूपी सेवा निष्फळ ठरणार आहे. कारण विधात्याला निष्काम भक्तीची अपेक्षा आहे. त्याला सकाम सहेतुक भक्ती कशी काय आवडणार आहे? निर्गुण, निराकार असणार्‍या ईश्वराला निष्काम सेवा, निष्काम भक्ती आवडते. निर्व्याज मनाने बुद्धांनी लोकांना दुःख मुक्तीचा मार्ग दिला. चक्रधर, संत नामदेव, ज्ञानेश्वर, नाथ , रामदास, तुकोबा, जनाई , कबीर, मीराबाई, मुक्ताई, बहिणाई ,गाडगेबाबा, तुकडोजी आदिंनी निर्हेतूक भक्ती केली . लोक शिक्षणाचं सशक्त पीठंच त्यांनी उभे केले. लोक जागृती हाच उद्देश घेवून ते जगले. ज्ञानदानामागे त्यांचा कुठलाही स्वार्थी व पोटार्थी हेतु नव्हता. जन कळवळ्याचा त्यामागे ध्यास होता. स्वतःची वाताहत झाली तर झाली परंतु सर्वांचं कल्याण व्हावं . दास्य अज्ञानातून त्यांची मुक्तता व्हावी हा उद्देश होता. आजकाल भक्तीचं अवडंबर माजवून भक्तांना भावनिक बणवून त्यांची भावनिक व आर्थिक लुट करणारे महाभागही काही कमी नाहीत. ज्यांनी भौतिक संपत्ती व सुखांच्या मागे न लागता विवेकनिष्ठ चिंतन केलं. त्यांची भक्ती व साहित्य कृती अजरामर ठरली आहे. ज्ञानोबांचा पुढील भक्तीविषयक अभंग वाचला तर भक्ती कशी असावी ते कळते. 'भावेवीण भक्ती भक्तिवीण मुक्ती। बळेवीण शक्ती बोलो नये॥१॥ आपलं कार्यही निखळ व आनंददायी असेल तर ते लौकिकास पात्र ठरणारंच.. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= भूतकाळाचे स्मरण करुन वर्तमानकाळात सावध राहत आणि भविष्यकाळ समोर ठेवून जी व्यक्ती आपले जीवन चांगल्याप्रकारे जगते तीच व्यक्ती जीवनात यशस्वी होते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🛣🌄🛣🌄🛣🌄🛣🌄🛣🛣 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अनमोल - Priceless* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *अनमोल क्षण* प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग. एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'. 'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'. खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/10/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- *१९८१-फ्रान्समध्ये मृत्यू दंडाची शिक्षा रद्द करण्यात आली २००१ - ट्रेंटन, न्यू जर्सी या शहरातून अँथ्रॅक्सचे जंतू असलेली पाकिटे टपालाने पाठवली. 💥 जन्म :- १९५३ - टोनी शालूब, अमेरिकन अभिनेता 💥 मृत्यू :- १९८७ - गुरू गोपीनाथ, भारतीय नर्तक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली ताजिकिस्तानचे अध्यक्ष इमोमली राहमोन यांची भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जळगाव : Dbt मार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा फी शिक्षण फी ची रक्कम विद्यार्थ्यांच्या खाती लवकरात लवकर जमा करावी. यातील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पुणे : शहरातील स्वाईन फ्लुचा ताप वाढतच चालला असून आणखी २१ जणांचा झाला मृत्यू, त्यामुळे शहरातील एकुण मृतांचा आकडा पोहोचला ४१ वर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *95 वर्षीय दिलीप कुमार यांना न्युमोनिया, पुन्हा रुग्णालयात दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - बेस्ट उपक्रमाचा सन 2019-20 या आर्थिक वर्षातील 720.54 कोटी तुटीचा अर्थसंकल्प, कसलीही भाडेवाढ न करता बेस्ट समितीच्या बैठकीत सादर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *यवतमाळ - बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तब्बल 6 लाखांच्या बनावट नोटा जप्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताच्या सुयश जाधवने आपली वैयक्तिक कामगिरी उंचावताना आशियाई पॅरा स्पर्धेत भारताला जिंकून दिले दुसरे सुवर्णपदक.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक जनशक्तीमध्ये आज प्रकाशित लेख *" मतदार जागृती आवश्यक "* http://epaper.ejanshakti.com/m5/1848089/Pune-Janshakti/09-10-2018#page/6/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रेणुका देवीचे माहूर* माहूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर वसले आहे. (धार्मिक महत्त्व असणाऱ्या ठिकाणांना हिंदू धर्मातील परंपरेत 'श्रीक्षेत्र' पूर्वजोडित केले जाते). ते नांदेड शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर आहे. माहूर चहूबाजूंनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढले आहे. देवीचे मंदिर, तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांची मंदिरे माहूरगड या नावेने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीच्या माथ्यावर आहेत आणि पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या गावाशी जोडली गेली आहेत. माहूर, नांदेड जिल्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. श्रीरेणुकादेवीमंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत. पण त्याचबरोबर ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.  *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= खरे आहे तेच बोला, उदात्त आहे तेच लिहा, उपयोगाचे आहे तेच शिका आणि देशहिताचे आहे तेच करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) कुतुबमिनार कोठे आहे ?* नवी दिल्ली *०२) चारमिनार कोठे आहे ?* हैद्राबाद *०३) ताजमहल कोठे आहे ?* आग्रा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ●  नागनाथ बळीराम शिंदे, धर्माबाद ● स्नेहल श्यामसुंदर ढगे, चिरली ● पल्लवी मदन ढगे, चिरली ● रोहित भोळे ● हणमंत सावंत ●  आर जे राठोड ● पिंटू कटलम ●  नागेश अशोक धावडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *पारख* हिरा अन् गारगोटी पृथ्वी मधून मिळते पारख करणाराला खरा फरक कळते एका खाणीत सारं सारखं असत नाही कोळशाच्या खाणीत हिरे असतात काही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========       • • • ● ‼ *विचार धन*‼ ● • • • =========ஜ۩۞۩ஜ========= *दोन पायांवर उभं राहून काटेरी बाभळीची छोटी छोटी पानं लुसूलुसू खाणारी बकरी पाहिलीत का तुम्ही? समोरचे दोन पाय बाभळीच्या झाडाला लावून मागच्या दोन पायांवर अवघड आसनात उभी असते. पोटातल्या भुकेमुळं त्या आसनावरची पकड मजबूत असते. त्यामुळं तोल जात नाही. उलट एक आकर्षक डौल तयार होतो. शिवाय काटे टाळून छोटी छोटी पानं खाण्याचं कसब खासच. एखाद्या योग्याला ध्यान लागावं तसं बकरीने या आसनात मन एकाग्र केलेलं असतं. डोंगराच्या अवघड कपारीत बरेचदा बकरी दिसते. त्या अवघड कपारीत बकरी जाते कशी? हा गहन प्रश्न आहे. त्या कपारीतून पाय घसरला तर खाली खोल दरी असते. म्हणजे त्या बकरीची शेवटची ब्या-ब्या ही कुणाला ऐकू येणार नाही. पण त्या जीवघेण्या कपारीत बकरी जाते, यामागे असते फक्त भूक !* *भक्ष्यावर झेप मारणारा पक्षी किंवा वाळक्या पानांवर पायाचा आवाज न करता दबक्या पावलांनी चालणारा चित्ता डिस्कव्हरी चॅनलवर हमखास दिसतो. आभाळातून नेमकेपणानं भक्ष्य हेरून त्यावर झाप मारून भक्ष्याला अलगद उचललं जातं, यातलं वेळेचं नियोजन कमाल असतं. एक क्षण जरी इकडचा तिकडं झाला तरी शिकार निसटू शकते. पाण्यावर झाप मारून पाण्यातला मासा अलगद उचलणारा पक्षी तर अद्भूत असतो. जेंव्हा पोपट राघू गाभूळ्या कैरीवर उलटा होऊन कैरी टोकरतो..उलटं टांगून घेणा-या राघूची झेंड्यासारखी हलणारी शेपूट भुकेची पताका होऊन फडकत असते.* *"जेंव्हा जेंव्हा कोणी भुकेविरूद्ध संघर्ष करायला पाय रोवून उभा राहतो..तेंव्हा तेंव्हा तो सुंदर दिसू लागतो."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🦆🦆🦆🦆🦆संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 35* *मेरा मुझमे कुछ नही,* *जो कुछ है सो तोर |* *तेरा तुझको सउपता,* *क्या लागई है मोर ||* अर्थ माणसाचा हावरटपणा पाहून महात्मा कबीर उपदेश करताना म्हणतात. हे मानवा ! तुझा हा हावरटपणा म्हणजे, 'माझं माझं अन गाढव ओझं' असा हा प्रकार आहे. माझं जे काही रूप दिसतं ना ते माझं असं स्वतःचं काहीच नाही. जे काही मिळालंय ना ते सारं निसर्गाकडून मिळालेलं आहे. सौंदर्य वगैरे सारं काही विधात्याचंच वरदान. मला मिळालेली शक्तीसुद्धा निसर्गाचीच कृपा. मी तो फक्त भार वाही. जाताना मला संपत्तीसह हा देहही निसर्गालाच द्यायचा आहे. मी येताना काही आणलेलं नाही जातानाही काही नेणार नाही. सारं इथलंच उपभोगलं अन इथचं सोडायचं आहे. निसर्गाचं निसर्गाला द्यायचं आहे. अनेक बलवंतांनी बळाच्या जोरावर जगाला झुलविले. सर्वांना आपले अंकित बनवून ठेवले . सारं भौतिक वैभवं त्याच्या पायी लोळण घेत होतं. असाही एक दिवस उजाडला की सारं वैभव जिथून घेतलं तिथंच ते सोडावं लागलं होतं. वैभव संपत्ती काही जन्मतःच सोबत आणालेली नव्हती. ती जिथून घेतली तिथंच सोडावी लागली होती. जन्मताना आत्म्यासोबत शरीर मिळाल होतं. त्या शरीराला सजवून, शृंगारून खूप जपण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हट्टापायी नको त्या बाबींच्या मागे धावावं लागलं. ते शरीरही साथ सोडून ज्याच्या आधारानं रजाचं गज झालं होतं त्याच निसर्गाला ते अर्पण करावे लागणार आहे. याची जाणीव होताच आपल्या सहकार्‍यांना 'माझ्या मृत्यूनंतर माझे हात खुलेच ठेवा. जगाला कळू द्या की माणूस कितीही संपत्ती जमा केला तरी जाताना रित्या हातीच जावं लागतं.' हे बोल आहेत जग्गजेत्या ग्रीक सम्राट आलेक्झांडर अर्थात सिकंदराचे. यातून तरी माणसानं बोध घेवून समाधानी व्हायला हवं ! जीवनातल्या परमानंदाची निखळ अनुभूती घेत समाधानी व्हायला हवं ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= दुस-यांना आनंद देण्यात जेवढे समाधान आहे तेवढा आनंद दुस-याचा हिरावून घेण्यात नाही. दुसऱ्याला आनंद देण्यासाठी आपल्याला कोणतेही साधन लागत नाही केवळ तुमचे निर्मळ मन आणि तुमची निकोप दृष्टी असायला हवी. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *त्रास - Trouble* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *हुबेहूब कला अवगत असणे.* एक मूर्तिकार मूर्ती व पुतळे अगदी हुबेहूब बनवी. ज्याची मूर्ती वा पुतळा तो तयार करी, ती व्यक्ती वा देव प्रत्यक्षच त्याच्या चित्रशाळेत अवतरल्याचा भास होई. त्याने खुर्चीवर बसलेल्या व एका हातात काठी घेतलेल्या रखवालदाराचा पुतळा तयार केला होता. त्या पुतळय़ाला तो दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घराच्या पुढच्या फाटकापाशी नेऊन ठेवी. तो इतका हुबेहूब होता की, खराखुराच रखवालदार पहार्‍यावर बसला असल्याचा चोर-दरोडेखोरांचा समज होऊन ते त्या मूर्तिकाराच्या घराच्या आसपास फिरकण्याचा विचार सोडून देत. नामवंत कलावंत म्हणून त्याच्या पन्नाशीच्या, साठीच्या व पंचाहत्तरीच्या वेळी त्याचे अनेक शहरांतून सत्कार झाले होते. आता 'आपला शंभरीनिमित्त जंगी सत्कार व्हावा' एवढी एकच इच्छा त्याच्या मनात उरली होती, म्हणून तो प्रकृतीची फार काळजी घेत होता. यमदूताला हुलकावणी देण्यासाठी त्याने स्वत:चे नऊ पुतळे केले होते. अगदी हुबेहूब स्वत:सारखे. एकदा त्याला आपल्याला न्यायला आपल्या घराकडे काही यमदूत येत असल्याची चाहूल लागली. तो पटकन आपल्या चित्रशाळेत गेला व तिथे ठेवलेल्या आपल्या नऊ पुतळय़ांत दहावा पुतळा म्हणून निश्‍चलपणे बसून राहिला. यमदूत त्या चित्रशाळेत शिरले. पाहतात, तो तिथे एकासारखे एक असे दहा मूर्तिकार! काही म्हणजे काही फरक नाही! यातल्या कुणाला घेऊ जावे? हा त्यांच्यापुढे पेच पडला. तेवढय़ात त्यांच्यापैकी एक डोकेबाज यमदूत आपल्या सहकार्‍यांना मुद्दाम म्हणाला, 'बाबांनो, असे गोंधळून जाण्यासारखे काय आहे? कारण खर्‍या मूर्तिकारात जे एक व्यंग आहे, ते त्याच्या बाकीच्या नऊ पुतळय़ांत दाखवायचे राहून गेले आहे. त्या बुद्धिवान यमदुताच्या या विधानाने अपमानित झालेला तो मूर्तिकार पटकन उठून म्हणाला, 'उगाच जीभ आहे म्हणून काही तरी बडबडू नकोस. माझ्यात असलेला कोणता दोष तुम्हाला दिसला. हे मुर्तीकार आम्हांला माहिती होते तु बोलणार जर तुझ्याबद्दल मी काही बोललो नसतो तर आम्हाला चिञकार कोण ते ओळखायला आले नसते. चल आता आमच्याबरोबर तु. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*चारोळी* अमावसेच्या रजनी अंधार पसरलेला तारकांचा सोबतीने चंद्र आकाशी लपलेला. 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे

*दैनंदिन 70 "इंग्रजी सुविचार " मराठी अर्थासहीत.* *1. Knowledge is power.* (ज्ञान ही खरी शक्ती आहे.) *2. Work is worship.* (कर्म हीच पूजा आहे.) *3. Health is wealth.* (चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.) *4. Time is money.* (वेळ मूल्यवान आहे,त्याचा योग्य वापर करा.) *5. Haste makes waste.* (घाईने कामात चुका होतात.) *6. Character is destiny.* (माणसाचे भवितव्य त्याच्या चारित्र्यावर अवलंबून असते.) *7. Exuberance is Beauty.* (चेहऱ्यावरील उत्साह/प्रसन्नता ही खरी सुंदरता होय.) *8. Practice makes man perfect.* (सरावाने मनुष्यास कुशलता प्राप्त होते.) *9. Confidence is a key to success.* (आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे.) *10. Sound mind in sound body.* (निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते.) *11. Experience is the best teacher.* (अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे.) *12. Never have a resistance to change.* (चांगल्या बदलाला कधीही नाकारू नये.) *13. No pains, no gains.* (त्रास सहन केल्याशिवाय काहीही मिळत नाही.) *14. Hope is walking dream.* (आशा हे जागेपणीचे स्वप्न आहे.) *15. Charity begins at home.* (सेवाभाव/परोपकाराची सुरुवात घरापासून होते.) *16. Fortune favours the brave.* (धाडसी लोकांना नशीबही साथ देते./चालणाऱ्याचे नशीबही चालते.) *17. Well beginning is the half done.* (चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे.) *18. Positive attitude creates positive peoples.* (सकारात्मक विचार सकारात्मक लोकांची/समाजाची निर्मिती करते.) *19. Good things happens to good peoples.* (चागल्या लोकांसोबत चांगल्याच गोष्टी घडतात.) *20. To teach is to learn twice.* (दुसऱ्याला एखादी गोष्ट समजून सांगणे हे ती गोष्ट दोनदा शिकण्यासारखे आहे.) *21. No wisdoms like silence.* (शांत राहण्यासारखे दुसरे शहाणपण कोणतेही नाही.) *22. Difficulty is a severe instructor.* (आलेली समस्या खूप चांगली प्रशिक्षक असते./आलेली समस्या खूप सारे शिकवून जाते.) *23. Good luck never comes late.* (चांगले नशीब कधीच उशीरा येत नाही.) *24. Delay in justice is injustice.* (उशीरा दिलेला न्याय हा अन्यायासारखाच असतो.) *25. Actions speaks louder than words.* (कृती ही शब्दांपेक्षा/गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते.) *26. Progress is the law of life.* (पुढे चालत राहणे हाच जीवनाचा नियम आहे./चलना जीनेका नाम है।) *27. A good deed is never lost.* (चांगले कार्य कधीच वाया/विसरले जात नाही.) *28. Failure is the first step of success.* (अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.) *29. More you struggle, more you become strong.* (तुम्ही जेवढा अधीक संघर्ष करता, तेवढे तुम्ही अधीक मजबूत/कनखर बनता.) *30. Every man is the creature of his own fortune.* (प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या भाग्याचा निर्माता आहे.) *31. Good handwriting is the mirror of good learning.* (चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे.) *32. Slow but steady can win the race.* (हळूवार पण सातत्याने तुम्ही प्रगती केली तर तुम्ही जिंकू शकता.) *33. A friend in neef is a friend indeed.* (गरजेच्या वेळी जो उपयोगी पडतो तोच खरा मित्र.) *34. Where there is will there is way.* (ईच्छा असेल तिथे मार्ग असतो.) *35. Change your thought and you will change your world.* (तुमचे विचार बदलवा आणि तुमचे जग आपोआप बदलेल.) *36. A journey of thousand miles begins with a first step.* (हजारो मैलांचा प्रवास पहीले पाऊल पुढे टाकल्यानेच सुरू होतो.) *37. He that burns most, shines most.* (जो जास्त जळतो, तोच जास्त चमकतो.) *38. Patience is a plaster for all sores.* (संयम/सबुरी हा सर्व दुःखावरील इलाज आहे.) *39. He who makes no mistakes makes nothing.* (जे कधीच चुकत नाही ते सहसा काहीच करत नाही.) *40. The pen is mightier than sword.* (लेखनी ही तलवारी पेक्षा श्रेष्ठ आहे.) *41. He who moves not forward goes backward.* (जे पुढे जात नाही ते मागे ढकलले जातात.) *42. If you act to be happy, you will be happy.* (जर तुम्ही आनंदी असण्याचा देखावा केला तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.) *43. A positive attitude can overcome a negative situation.* (सकारात्मक दृष्टीकोनाने नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकते.) *44. The roots of education are bitter but the fruit is sweet.* (शिक्षणाची मुळे कडू असली तरी फळ गोड असते.) *45. Hard times are the moments of reflection.* (कठीण परिस्थिती ही तुमच्यातील धैर्य/चिकाटी दाखवण्याची खरी वेळ आहे.) *46. Your best teacher is your last mistake.* (तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक आहे.) *47. I listened and I forgot, I watched and I remembered, I do and I understand.* (मी ऐकलो आणि विसरलो, मी पाहीले आणि माझ्या लक्षात राहले, मी करून पाहले आणी मला समजले.) *48. Every success has a trails of failure behind it.* (प्रत्येक यशामागे अपयशाची मोठी शृंखला असते.) *49. Be concern with action only not with its result.* (आपले कार्य करत रहा त्याच्या फळाचा विचार करू नका.) *50. Every day may not be good but there is something in every day.* (प्रत्येक दिवस चांगला असेलच असे नाही परंतु प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असतेच.) *51. The only time you fail is when you fall down and stay there.* (तुम्ही फक्त त्याच वेळी हरता जेव्हा तुम्ही खाली पडता आणि तिथेच थाबता.) *52. Hope is the affirmation of positive thought.* (आशावाद हा सकारात्मक विचाराचे प्रतिक आहे.) *53. The life without goal is life without meaning.* (ध्येयाविणा जीवन निरर्थक आहे.) *54. It's not how long, but how well, we live.* (किती काळ जगला यापेक्षा किती चांगले जगलात याला महत्त्व आहे.) *55. The darkest hour is before the dawn.* (कुट्ट अंधाराची वेळ सुर्योदया पुर्विची असते./अपयशाच्या कुट्ट अंधारानंतर यशाची पहाट होते.) *56. The brave die once, cowards many times.* (शूर लोक एकदाच मरतात, भ्याड लोक प्रत्येक क्षणी मरत जगतात.) *57. The great artist is simplifier.* (महान कारागीर हा काम सोपे करणारा असतो.) *58. It is not work that kills but worry.* (कामापेक्षा कामाच्या चिंतेनेच माणूस जास्त मरतो.) *59. None but the brave deserves the fair.* (शूर लोकच न्याय मिळवण्यास पात्र ठरतात.) *60. Desire is the very essence of man.* (अभिलाषा/ईच्छा हाच मनुष्य जीवनाचा सार/तत्वगुण आहे.) *61. Hearing brings wisdom, speaking repentance.* (ऐकल्यामुळे ज्ञान/बुद्धीमत्ता मिळते, बोलण्यामुळे पश्चाताप.) *62. Prayer is the voice of faith.* (प्रार्थना ही श्रद्धेचा आवाज आहे./प्रार्थना म्हणजे आत्म्याचा आवाज.) *63. Whatever you cannot understand, you cannot possess.* (जो आप समझ नहीं सकते, वो आप कभी हासिल नहीं कर सकते.) *64. United we stand, divided we fall.* (एकत्र असल्यास आपण प्रतिकार करू शकतो, वेगळे झाल्यास आपण नमविले जातो.) *65. Character is simply a habit long continued.* (तुमच्या दीर्घ/चालत आलेल्या सवयींतून तुमचे चारित्र्य घडते.) *66. True wealth is celebrating the present moment.* (आत्ताची वेळ साजरी करता येणे ही खरी संपत्ती आहे./आनंदी मन हा माणसाचा खरा खजिना आहे.) *67. Imperfect action is better than perfect inaction.* (परिपक्व निष्क्रियतेपेक्षा, अपरिपक्व कृती कधीही चांगली./मणभर चर्चेपेक्षा कणभर आचरण चांगले.) *68. Instead of cursing the darkness, be the one to light a candle.* (परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्या.) *69. Happines is found in your heart, not in your circumstances.* (आनंद हा तुमच्या मनात असतो, तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टीत/सभोवतालच्या परिस्थितीत नसतो.) *70. You only lose when you give up.* (तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही सोडून देता.) संकलित

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/10/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९३२: भारतीय वायुसेनेची स्थापना. २00५:पाकव्याप्त काश्मीरमध्ये तीव्र भूकंप. २0१३:ज्येष्ठ पत्रकार ज्योतर्मय डे यांच्या हत्येचा आरोप असलेल्या पॉलसन जोसेफला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला 💥 जन्म :- १९२६ हिंदी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित उर्फ राजकुमार १९३५ फ्लाईंग सिख मिल्खा सिंग 💥 मृत्यू :- १९८२: कॅनडाचे नोबेल शांतता पुरस्कार विजेते फिलिप नोएल-बेकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राष्ट्रपती रामनाथ कोविंद ताजिकिस्तानला पोहोचले; तीन दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नागरी संरक्षण संचालनालयातील १०९ पदांना मुदतवाढ; पाच महिन्यांसाठी गृहविभागाचे आदेश* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *महाराष्ट्रात हुक्का पार्लरवर बंदी घालणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींची संमती, राज्याच्या गृहविभागाने तातडीने तशी अधिसूचना केली जारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यातील पोलिओ लस १०० टक्के सुरक्षित! ; आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *इंडोनेशियातील त्सुनामी आणि भूकंपात पाच हजार लोक बेपत्ता ; मदतकार्य मंदगतीने सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत विविध आजारावरील उपचारांसाठी राज्यातील ९0 टक्के नागरिकांना आरोग्य कवच उपलब्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणाविस यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताच्या युवा खेळाडूंनीही जिंकला युवा आशिया चषक, अंतिम सामन्यावर भारताचं निर्विवाद वर्चस्व; श्रीलंकेचा 144 धावांनी धुव्वा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक जनशक्तीमध्ये प्रकाशित *आपली माणसं* विषयी गीता देव्हारे यांचा लेख जरूर वाचावे http://epaper.ejanshakti.com/m5/1846778/Pune-Janshakti/08-10-2018#page/6/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ संकलन  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *अभिनेता राजकुमार* डॉयलॉगचे बेताज बादशहा अभिनेते राजकुमार यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९२६ रोजी बलुचिस्तानात झाला. त्यांचे मुळ नाव कुलभूषण पंडीत होते. इन्स्पेक्टरच्या नोकरीचा राजीनामा देऊन कुलभूषण यांनी चित्रपटसृष्टीत जाण्याचा निर्णय घेतला. दोन चित्रपटानंतर त्यांनी अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी और कृष्ण सुदामा या चित्रपटातून कामे केली, पण यापैकी एकही चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही. महबूब खान यांच्या १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या मदर इंडिया या चित्रपटात राजकुमार गावातील एका छोट्या शेतकर्‍याच्या भूमिकेत दिसले. या छोट्याशा भूमिकेतील दमदार अभिनयाने राजकुमार यांना केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनेता म्हणून ख्याती मिळवून दिली. यानंतर त्यांची यशस्वी कारकिर्द सुरू झाली. दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांच्या यशाने तर राजकुमार यांना अभिनयसम्राटाच्या पदावर पोहचवले. काजल चित्रपटापासून राजकुमार एक सुपरस्टार अभिनेता ठरले. वक्त चित्रपटातील ह्यचिनायसेठ जिनके घर शीशेके बने होते है, वो दुसरों पे पत्थर नही फेका करते तसेच ह्यचिनायसेठ ये छुपी बच्चों के खेलने की चीज नही. हाथ कट जाये तो खून निकल आता है हे संवाद लोकप्रिय होण्यासोबत त्यांना डॉयलॉगकिंग ही पदवी प्रेक्षकांनी बहाल केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) थर्मास फ्लाक्सचा शोध कोणी लावला ?* जेम्स देवार *२) व्हिएतनाममध्ये कोणती खनिजे सापडतात ?* लोह, कोळसा *३) ग्रनीचवरून जाणार्‍या काल्पनिक रेखावृत्ताला काय म्हणतात ?* मूळ रेखावृत्त *४) थायलंडमधील नद्या कोणत्या ?* मेकाज, चाओ, प्याहा, मेनाम मुन *५) डमी, नो ट्रम्प, ग्रँड स्लॅम, रिव्होक, रफ या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?* ब्रिज *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● साईनाथ पोतलोड, धर्माबाद ● जगदीश पाटील कळसकर ● कैलास बगाले ● गणेश पेंडकर, येवती ● अमोल सिंगनवाड ● बळीराम शिवाजी खांडरे ● शांतीलाल कुमावत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *नाद* हल्ली आपलीच आपण पाठ थोपटून घेतात थोपटून घेण्याच्या नादात स्वतःच चेपटून घेतात आपली आपण थोपटताना चेपटली तर जाणार शेवटी व्हायचा तो उलट परिणाम होणार शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• =========ஜ۩۞۩ஜ========= *सत्याला 'सत्य' म्हणून ओळखा आणि असत्याला 'असत्य' म्हणून, असा संदेश गौतम बुद्धांनी दिला. सत्य या शाश्वत मूल्याचा वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील आचारासाठी माणसाचं विवेकी मन हाच मूलाधार असतो. वस्तुत: माणसाला सत्य सहज कळतं. सत्य पाहण्याची, बोलण्याची वा कृती करण्याची रूची स्वाभाविक असते. माणूस आसक्तीत अडकला की खोट्या, असत्य, अप्रामाणिकपणाची पुटं मनावर चढतात. विवेक हरपतो. तोंडानं सत्याचा पुरस्कार परंतु आचरण मात्र असत्य. उच्चार-आचार यात पूर्णत: विसंगती. लग्नातील सातवी प्रतीज्ञा आहे, "सखा सप्तपदी भव" म्हणजे विवाहानंतर स्त्री व पुरूष यांच्यात मालक आणि नोकर असा भाव असता कामा नये. पती व पत्नी यांच्यात सख्याची -मैत्रिची भावना हवी. समानतेचा, कधीही न तुटणारा ऐक्याचा सख्य संबंध हवा. परंतु सत्यपालनाचे आचरण किती घडतं.* *सत्यनिष्ठेनं, सत्य आचरणानं खरंतर माणसाचं ह्रदय व्यापक होतं. अंत:करणात प्रेमभाव वाढतो. वैरभावनेचा लोप होतो. आत्म्याचा विकास होतो. सत्य हे सर्व समर्थ असल्यानं जगण्यातील विश्वास बळावत जातो. व्यापक अर्थानं सत्याचं पालन करण्याने स्वत:चं, कुटुंबाचं जगणं अर्थपूर्ण ठरतं, आनंददायी होतं.* *दुष्ट कर्म तुम्ही, अजिबात टाळा !* *पुढे नाही धोका, मुलांबाळा ॥* *सद्यस्थितीत देशात सत्य आचरणाच्या बाबतीत सर्वत्र अंधार दिसतो. सत्याचं पालन करणं हीच सर्वोत्तम समाजसेवा हा विचार रूझला तरच असत्याचा अंधार मिटून सत्याचा सूर्योदय नक्कीच होईल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 34*      पहुचेंगे तब कहेंगे, उमडेंगे उस ट्ठाई | अझू बेरा समंड मे, बोली बिगूचे काई || अर्थ अर्धवट ज्ञान असणार्‍यांनी पांडित्य करू नये. नावेतून प्रवास करीत असताना जेव्हा पैलतीरी जाईन तेव्हाच प्रवास व प्रवास मार्गाविषयी बोलावे. समुद्राच्या लाटामधून नौका दोलायमान अवस्थेत मार्गक्रमण करित असताना समुद्रप्रवासाचा थरार अनुवयाला येतोय . प्रवासही पूर्ण झालेला नाही अशा वेळी त्याबद्दल निश्चित काय सांगता येणार आहे ! पूर्ण अनुभूतीशिवाय कसं बोलायचं. विना अनुभवाची ती निरर्थक बडबड असणार आहे. अशा प्रसंगी तोंडघशी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे महात्मा कबीर पटवून देतात. बरेच जण वासरात लंगडी गाय शहाणी म्हटल्या प्रमाणे समोरच्यांचा अंदाज नसताना नको तीच चुकीची माहिती पुरवून जातात. ऐकणारे सर्वजण अज्ञानी किवा अर्धकच्चे असतातच असे नाही. श्रोत्यातील खूप जण चिंतन मनन करणारे असतात. चला आपल्याला संबंधित विषयावर आणखी काही नवीन ऐकता येईल या हेतूनेही आलेले असतात. अशावेळी जर वक्त्याने चुकीचे संदर्भ किवा माहिती पुरवली तर... उदभवणार्‍या प्रसंगाची कल्पनाच करायला नको. मध्येच श्रोत्याने चुकीचा संदर्भ खोडला तर वक्त्याची त्रेधातिरपीट उडून हसे होते. म्हणून परिपूर्ण माहिती व आत्मविश्वासाशिवाय गंंभीर व संवेदनशील विषयावर बोलू नये. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात आनंदाने आणि समाधानाने जगायचे असेल तर जीवनातल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाऊन तोंड दिलेच पाहिजे, जिद्दीने लढायला शिकलेच पाहिजे, समोर कोणतेही असलेले आव्हान स्वीकारण्याची तयारी ठेवायला शिकले पाहिजे, अपयश आले तरी स्वत:तला आत्मविश्वास ढळू न देता तितक्याच ताकदीने उभे राहायला शिकले पाहिजे. कोण काय म्हणतीय याचा विचार करण्यापेक्षा आपण किती प्रामाणिक प्रयत्न करुन यश मिळवता येईल याकडे लक्ष केंद्रित करायला शिकले पाहिजे. तरच आपण आपल्या जीवनात नवे चैतन्य, नवा जोश अधिक कार्यक्षम होऊन आत्मसन्मानाने जगण्याची दिशा आपोआपच मिळेल. जर का आपणच जगण्यातला विश्वास कमी केला तर मग आपणच आपल्या जीवनात हार खाल्ली आहे असे समजावे. आपल्यापेक्षा इतरांच्या जगण्याकडे पहा आणि ठरवा. त्यांच्या जगण्यामध्ये किती यश अपयशाला तोंड देत संघर्ष करत असतात तरीही त्यात समाधान मानून पुढे पुढे जात असतात मग आपण तर त्यांच्यापेक्षा किती सक्षम आहोत हा विचार सदैव जागृत ठेवावा आणि चांगले जीवन जगण्यासाठी सतत क्रियाशील रहावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कार्यक्षम - Efficient* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मदतीचा हात* *जंगलात आग लागलेली असताना एक चिमणी स्वतःच्या चोचीने पाणी वाहून आग विझवण्यासाठी धडपडत असते.* *ते पाहून एक कावळा तिला सांगतो की,"तू कितीही प्रयत्न केलेस तरी ही आग विझणार नाहीये."* *त्यावर चिमणी सुंदर उत्तर देते की,"या जळालेल्या जंगलाचा जेव्हा इतिहास लिहीला जाईल, तेव्हा माझे नाव 'आग* *लावणाऱ्यां'त नव्हे, तर 'आग विझणाऱ्यां'त येईल.".* *माणसे जोडणे हाच आमचा धर्म,काम छोटे असो वा मोठे कामाचा हेतु ,मर्म चांगले असणे महत्त्वाचे आहे.* * *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🌹जीवन विचार🌹* 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰 मानवी जीवनाला उन्नत करणाऱ्या श्रद्धा , भावना ह्या जीवनाचा आधार आहे.जीवनात श्रद्धेला अतिशय महत्त्व आहे.एखाद्या व्यक्तीवर किंवा तत्वावर जेव्हा आपला विश्वास असतो, तेव्हा त्याला विश्वासाची श्रद्धा संबोधली जाते. आपले जीवन जगत असताना आपल्या जीवनाला दातृत्वाचं अंग असाव, सेवेचं भान ,ज्ञानाच ककंण, सामर्थ्याचा कवच, त्यागाच बळ, सौजन्याच अधिष्ठान आणि *सत्याचा आधार असावा.* आपल्या जीवनातला *मी पण जेव्हा नाहीसा* होईल, आपला अहंकार जेव्हा नष्ट होईल, आपल्यातील लोभ आणि मोहाचा डोंगर कोसळून पडेल, अज्ञानाचा अंधार निघून जाईल तेव्हा आपले जीवन खरे सार्थकी लागले म्हणावे लागेल. मनुष्याच्या श्रद्धेला पुराव्याची गरज नाही.चांगल्या कर्माची, भलेपणाची , मांगल्याची विश्वास ठेवण्याची वृत्ती त्याने जोपासली पाहिजे.नव्हे ती वृत्ती त्याच्याकडे असतेच परंतु त्याची जोपासना करणे गरजेचे आहे. 🌻🌻🌻🌻🌻🌻 *〰〰〰〰〰〰* *✍शब्दांकन/ संकलन* प्रमिलाताई सेनकुडे 🙏🏻🙏🏻 ता.हदगाव जि.नांदेड 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/10/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८६४ - कोलकात्यावर आलेल्या चक्रीवादळात ६०,००० मृत्युमुखी १९१० - पोर्तुगाल प्रजासत्ताक झाले 💥 जन्म :- १८९० - किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला, हिंदी पत्रकार, संपादक १९३२ - माधव आपटे, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९९१ - रामनाथ गोएंका, भारतीय वृत्तपत्रसंचालक. १९९२ - परशुराम भवानराव पंत, भारतीय राजनैतिक मुत्सद्दी. २०११ - स्टीव्ह जॉब्स, अमेरिकन उद्योगपती, ॲपल कम्प्युटर्स चे सहसंस्थापक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - रोहिंग्याना माघारी धाडण्याविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्य न्यायालयाने फेटाळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *महाराष्ट्र सरकारने पेट्रोलचे दर अडीच रुपयांनी कमी करण्याचा घेतला निर्णय मात्र, डिझेलचे दर जैसे थे* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई - आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा बँक व्यवस्थापनाने स्वीकारला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली : राफेल प्रकरणी चौकशी करा; माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी, यशवंत सिन्हांसह वकील प्रशांत भूषण यांची CBI कडे मागणी, तिघांनी सीबीआयचे संचालक अलोक वर्मांची घेतली भेट.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *4 ते 8 ऑक्टोबरदरम्यान तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि केरळच्या काही भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याचा हवामान खात्याचा अंदाज* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *संयुक्त राष्ट्राचे जनरल सेक्रेटरी भारत दौऱ्यावर; अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. वेस्ट इंडीजच्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉच्या शतकीय खेळाच्या जोरावर भारत ४ बाद ३६४* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *खरंच, महिलांना न्याय मिळाला का ?* https://www.deshdoot.com/blog-on-shabarimala-temple-supreme-court-issue/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========    *स्टीव्ह जॉब्स*                 स्टीव्ह जॉब्स हा एक अमेरिकन व्यवसायिक होता आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचा सहसंस्थापक व मुख्याधिकारी होता. जॉब्स हा काही काळ पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज‎चा मुख्य व्यवस्थापक होता आणि नंतर तो वॉल्ट डिस्ने कंपनीचासंचालक सदस्य होता. इ.स. १९७० मध्ये जॉब्स याने स्टीव्ह वॉझनियाक, माइक मारक्कुला आणि इतर (ॲपल कंपनीचे सर्व सदस्य) यांच्या समवेत व्यक्तिगत संगणक तयार केला. ॲपल-२ या मलिकेअंतर्गत मॅकिंटॉश नावाची प्रचालन यंत्रणा तयार केली. इ.स. १९८५ मध्ये कंपनीच्या सदस्यांसमावेत झालेल्या वादामुळे त्याने राजीनामा दिला आणि नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा (संगणकाचा वापर) किंवा प्रणाली तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. १९९७ साली 'नेक्स्ट'चे 'ॲपल'मध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा 'ॲपल'मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते. त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड असून याच कामासाठी त्याने वाहून घेतले आहे. त्याने प्रकृतिअस्वास्थ्य व अन्य वैयक्तिक कारणांसाठी २९ जून, इ.स. २००९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला. आयफोन, 'आयपॉड', 'आयपॅड' हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले. स्टीव जॉब्सला उपभोक्ता संगणकक्षेत्रातील नवीनतेचा व अविष्कारचा जनक म्हणून संबोधले जाते. स्टिव जॉब्सचा कर्क रोगामुळे मृत्यू झाला. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) सुप्रसिद्ध अजिंक्यताराकिल्ला कोठे आहे ?* सातारा *०२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे ?* लोणार जि. रायगड *०३) जगातील सर्वात लांब नदी कोणती ?* नाईल नदी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ●  श्रद्धानंद यरमलवाड, येवती ●  विष्णू वाघमारे ●  बालाजी घोणशेट्टे ●  योगेश बोड्डोला, येवती ●  काशीनाथ साखरे, वसमत ● भार्गव साईनाथ मुदलोड, येवती ●  विशाल फाळके ●  किशन पचलिंग, बरबडा ●  दीपक रामराव कुलकर्णी ● दिनेश वाडवनकर ●  प्रदीप सोमोसे ●  साईनाथ पवार ●  सुभाष लोखंडे, पांगरी ●  रविकांत ढोले ● पाशा शेख ● आकाश जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *काम क्रोध मोह* काम क्रोध मोह हे  विनाशाचे द्वार आहेत  जेवढे वाढतील तेवढे  डोक्यावर भार आहेत  काम क्रोध लोभाने  डोक्यावर भार होतो  अती झाले म्हणजे  केवढाही गार होतो     शरद ठाकर   सेलू जि परभणी   8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========   •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण मित्राला बोलतो, 'उद्या मला सकाळी फोन कर, मग आपण ठरवू या.' असं म्हणताना आजची रात्र सुखरूप पार करून उद्याची सकाळ आपण अनुभवणार आहोत यावर आपला ठाम विश्वास असतो. असे छोटे छोटे विश्वास ठेवल्याशिवाय गाडा पुढे हाकता येत नाही.* *एक बस स्टँडच्या फलाटाला लागते. आपण गावाच्या नावाची पाटी वाचून खात्री करून घेतो आणि बसमध्ये चढतो. तिकीट काढतो. सोबतचा घडी केलेला पेपर उघडून वाचायला लागतो किंवा डोळे बंद करून डुलक्या घेतो. हलणा-या बसमध्ये निवांतपणे खिडकीतून बाहेर बघत बसतो. काही वेळा चिल्लर पैशांवरून कंडक्टरशी वाद होतात. वळण घाटाचा रस्ता पार करून आपल्या थांब्यावर बस आणून सोडते. या सगळ्या प्रवासात बस चालवणा-या ड्रायव्हरचा चेहराही आपण पाहिलेला नसतो. त्या ड्रायव्हरच्या भरोशावर आपण बसमध्ये निवांतपणे बसलेलो असतो. कंडक्टरशी रुपया आठाण्यावरून वाद करणारा प्रवासी स्वत:चा जीव, चेहराही न पाहिलेल्या ड्रायव्हरच्या हवाली करतो. किती विश्वास ठेवतो आपण अनोळखी माणसावर.. 'विश्वास' फार महत्वाचा असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 32* *जा कारनी मे ढूँढती* *सन्मुख मिलिया आई |* *धन मैली पीव ऊजला* *लागी ना सकौ पाई ||* अर्थ माणूस सुखाच्या शोधात असतो. प्रत्येकाच्या सुखाच्या धारणा वेगळ्या आहेत. धन, संपत्ती श्रीमंतीत सुख शोधणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. गरजेपुरती धन संपत्ती कमावलीच पाहिजे. चरितार्थ व्यवस्थित झाला तरच मानसाला सांस्कृतिक भूक लागते. मात्र संपत्ती संंपत्तीचा साठा संचय करून ठेवण्यात स्वतःचंच बाहुलं करून घेवून नये. महात्मा कबीर म्हणतात , 'साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय । मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥' माणूस धन संपत्तीच्या शोधात श्रीमंत होण्याच्या वेडात भटकताना हाती असणारे आनंदाचे क्षणही गमावून बसतो. शाश्वत सत्य व विवेकी विचारानं वागून खर्‍या ईश्वराचा व गुरूचा शोध घेता येतो. त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनानं मन तृप्त होत. मिळणारा आनंद चिरकाल टिकणारा असतो. तो निखळ आनंद देत असतो. मात्र माणूस उगाच संभ्रमात सापडून चाचपडत राहातो. स्वतःला दुःख व उदासीन बनवत असतो. मात्र अशा निखळ आनंददायी क्षणांचा शोध घेत. जीवनातले भ्रम नाहीसे करणार्‍या संत सज्जनाचे चरणी नतमस्तक व्हायला हवं . मात्र निरर्थक ताठरपणा मुळं ते अवघड होतं. म्हणून तो दूर सारला पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जेव्हा रोज सकाळ ही नवीन सकाळ होऊन या जगात प्रवेश करते तेव्हा प्रत्येक सजीवांसाठी नवीन आशा पल्लवित करण्यासाठी. ती म्हणते काल जे काही चांगले-वाईट झाले त्यातील चांगले लक्षात ठेऊन त्याला सोबत घेऊन पुढे अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा आणि जे काही तुमच्या जीवनात वाईट घडून गेले त्याला विसरुन जा.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या आणि आनंदाने जीवन जगा.ती म्हणते मी कधीच भूतकाळाला धरुन वर्तमानात जगत नाही आणि वर्तमानात जे काही जगते ते भविष्यकाळातही त्याचा विचार करत नाही.त्यामुळेच मी रोजच्यारोज टवटवीत, प्रसन्न आणि प्रफुल्लीत असते.असा जर मी तुमच्यासारखा विचार करायला लागले असते तर सगळ्या जीवसृष्टीला आवडले असते का ? नाही. म्हणून झाले गेले विसरा नि रोज तेवढ्याच प्रसन्न मनाने,प्रसन्न मुद्रेने माझ्यासारखं आनंदी रहायला शिका मग माझ्याप्रमाणेच रोज तुमचंही स्वागत करतील, तुमच्याबद्दल इतरांना आवड निर्माण होऊन तुमच्यावर प्रेम करायला लागतील. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *डौलदार - Graceful* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *निळूचा नाच* 'मिआव मिआव' निळूने जोरात हाक मारली. नदीपलिकडील झाडीतून आवाज आला 'मिआव मिआव!' मग निळूने पंख पसरून कसेबसे उडत पलिकडील तीर गाठले. काठावर बसून थोडावेळ विसावा घेतला. नदीत वाकून पाणी पिता पिता आपला सुंदर पिसारा पाहून तो खूष झाला. निळा, हिरवा, पिवळा, सोनेरी. कुणीतरी रंगांची जणूकाही उधळणच केली होती. मग डौलदार पावले टाकत तो गवतातून पुढे निघाला. वाटेत बिळांतून डोके वर काढत ससू बोलला, 'वा निळू! आज खूप खूप छान दिसतोस हं तू! किती लांबलचक सुरेख पिसारा आहे रे तुझा!' हे ऐकून निळूला खूप बरे वाटले. आणखी थोडा वेळ पुढे जातो न जातो तोच पिलू हरीण भेटले. एक उंचच उंच उडी घेऊन ते निळूपुढे येऊन उभे राहिले. दचकून निळू दोन पावले मागे सरकला. 'अरे निळू ! आज मी तुला ओळखलेच नाही. किती सुंदर पिसारा आहे रे तुझा. जरा फुलवून दाखवतोस कां?' निळूने हळूच पिसारा हलवून बघितला पण तो गोलाकार कसा करायचा हेच मुळी त्याला कळेना. मग लगबगीने पुढे जात निळू बोलला, 'उद्या दाखवीन हं तुला छानसा पंखा करून!' आता हिरवळ संपून झाडेच झाडे दिसू लागली. वर पक्षांचा किलबिलाट चालला होता. एक राघूंचा थवा आरामात फळे खात होता. निळूकडे लक्ष जाताच सगळीजण कौतुक करू लागली. 'काय सुंदर रंगीबेरंगी पिसारा आहे नाही निळूचा' एकजण बोलला, 'निळू जरा थुई थुई नाचून दाखव ना!' निळूने परत एकदा पिसे हालवून बघितली. पण एक पीस जागचे हलेल तर शपथ! इकडे पोपटांचा थवा कलकलत उडाला. अहा रे गंमत! एका पक्षाला मुळी नाचताच येत नाही.' मग निळू पटकन एका फांदीवर चढून बसला. काय केले असता सुंदर नाचता येईल बरे?.... तो मनाशी विचार करू लागला. हळूच एक एक पाऊल उचलून तुरा हलवत तो इकडे तिकडे डुलला. पण अजूनही मनासारखा नाच काही जमेना. मग निळूला भारी वाईट वाटले. कितीतरी वेळ तो उदास बसून राहिला. हा पिसारा नसता तरी बरे झाले असते असाही विचार मनात डोकावला.अचानक ढग दाटून आले आणि रिमझीम पाऊसाची सुरूवात झाली. निळु आनंदाने फांदीवरून खाली उतरला. आपले पंख पसरून नाचू लागला. सगळे पाहू लागले पण निळूचे कुठं लक्ष होते.तो तर आनंदाने भारावून नाचू लागला होता. *तात्पर्यः आपला आनंद आपणच निर्माण करावा.मग आपल्या आनंदात कोणी सहभागी होऊन प्रेरणा देऊ अथवा नाही हा विचार करायचा नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 🌺 *जीवन विचार* 🌺 ➖➖➖➖➖➖➖ *आपल जीवन अनेकदा युध्दक्षेञ बनत असतं.त्यावेळी मनात मोठा संघर्ष चालू असतो.मनात विसंवादाच वादळ सुरू असतं तेव्हा आपल्या मनात सुसंवाद स्थापन करण्याचा प्रवृत्तीस विवेक असं म्हणावं !* smt.senkude pramila *विवेक आपल्या मनाचं सुकाणू आहे तर विचार आपल्या मनाचं शीड आहे.सुकाणू आणि शीड नीट जागेवर राहून काम करत असतील तर समुद्रात इकडं - तिकडं सुरक्षितपणे फिरता येईल नाहीतर क्षणार्धात जलसमाधी मिळेल.विवेक ही मर्यादशील शक्ती आहे.समुद्राला मर्यादा असते.* *मर्यादा ही मनाच्या कुंपणासारखी असते. संयमाचा लगाम हाती असल्यानंतर जीवन अश्व इकडं - तिकडं कसा उधळेल?* *ज्याप्रमाणे फळावरुन झाडाला ओळखतात, सोन्याला कस लावून सोन्याची पारख करतात, आवाजावरुन घंटेची किंमत ठरवतात; त्याप्रमाणे मनुष्याच्या मनुष्यत्वाची पारख त्याच्या विवेकावरुन करतात.माणसाने कधीही चांगल्या विवेकी लोकांची परिक्षा घेण्याचा प्रयत्न करु नये.कारण ते पाऱ्यासारखे असतात.ते मोडत तर नाहीत परंतु ते त्यांचे चांगले काम सोडत नाही.* 〰〰〰〰〰〰〰 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏* ✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा. गोजेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ••••••••••••••••••••••••••••••••••••• 📅 दि. 04/10/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय एकता दिन* *जागतिक प्राणी दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९५७ - सोवियेत संघाने स्पुतनिक या पहिल्या मानवनिर्मित उपग्रहाचे प्रक्षेपण केले १९५८ - फ्रांसच्या पाचव्या प्रजासत्ताकची स्थापना 💥 जन्म :- १९१४ - म. वा. धोंड, मराठी समीक्षक 💥 मृत्यू :- १९२१ - केशवराव भोसले, मराठी गायक. १९८२ - सोपानदेव चौधरी, मराठी कवी. १९९३ - जॉन कावस, भारतीय-हिंदी चित्रपटअभिनेता. २००२ - भाई भगत, भारतीय वृत्तपट निवेदक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई - अटल सौर कृषीपंप योजनेंतर्गत 7 हजार पंपांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली- रंजन गोगोई सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई - सलग दुसऱ्या दिवशी हजारो शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी आझाद मैदानात धडकले आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : राज्यात नागपूरला राज्यस्तरीय तर औरंगाबाद, अकोला, धुळे आणि सोलापूर येथे महाविद्यालयस्तरीय विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेची स्थापना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *रबी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ; केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बँक ऑफ महाराष्ट्र 50 शाखा बंद करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील 40 टक्के ते 79 टक्के दिव्यांगांना 800 रुपये तर 80 टक्के व त्यापेक्षा अधिक दिव्यांगांना एक हजार रुपये प्रतिमाह अर्थसहाय्य देण्याचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आधारकार्डचा इतिहास* https://www.deshdoot.com/nashik-news-29-september-adhar-card-day/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *केशवराव भोसले* केशवराव भोसले हे मराठी संगीत नाट्यरंगभूमीवरील एक अतिशय गुणी नट आणि उत्तम गायक होते. केशवरावांचा जन्म ९ ऑगस्ट १८९0 रोजी कोल्हापूरमध्ये झाला. वयाच्या अवघ्या चवथ्या वर्षी त्यांनी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत प्रवेश घेतला. संगीत शारदा ह्या नाटकातील मूर्तिमंत भीती उभी ह्या पदाने त्यांना प्रसिद्धी दिली. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी सिद्धारूढ स्वामींच्या आशीवार्दाने हुबळीमध्ये ललितकलादर्श नाटक मंडळी स्थापन केली. ह्या नाटक मंडळींचे पहिले नाटक संगीत सौभद्र १९0८ मध्ये गणेशपीठ, हुबळी येथे सदर केले गेले. त्यानंतर हे नाटक महाराष्ट्रातही सदर केले गेले. केशवराव महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्यामुळे प्रेक्षकांना हे नाटक विशेष आवडले. केशवरावांनी संस्कृत नाटक शाकुंतलमध्ये सुद्धा काम केले. त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथे झाला. वेल्वेट कापडाचा पडदा प्रथमच मराठी रंगभूमीवर वापरण्यात आला होता. केशवराव हे कलाप्रेमी आणि चतुर होते. त्यांनी १९२१ साली संयुक्त मानापमान नाटकात बालगंधर्व यांच्याबरोबर काम केले. मामा वारेरकर यांच्या संगीत संन्याशाचा संसार या नाटकातील केशवरावांची डेविडची भूमिका अविस्मरणीय आहे. संगीत नाटकांमधील त्यांच्या अथक योगदानामुळे त्यांना संगीतसूर्य म्हणून नावाजले गेले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= चंद्र आणि चंदनापेक्षाही सज्जनांचा सहवास अधिक शीतल असतो. - कवी कालिदास *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'वेलिंग वॉल' कोठे आहे ?* जेरुसलेम *२) 'एशियन ड्रामा'चे लेखक कोण ?* गुन्नार र्मदाल *३) स्वतंत्र दर्जा असणारे सर्वांत कमी क्षेत्रफळाचे राष्ट्र कोणते ?* व्हॅटकिन *४) क्युबाची राजधानी कोणती ?* हवाना *५) फिलीपाईन्समधील प्रमुख नद्या कोणत्या ?* कागायान, पंपांगा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● संगीता भांडवले, उस्मानाबाद ● सुरेंद्र गादेकर, मुखेड ●  विजय पळशीकर, नांदेड ● ओमप्रकाश येवतीवाड, धर्माबाद ● लक्ष्मण पंदोरे, कोपरगाव ● साईनाथ पोरडवार, कुंडलवाडी ● नितेश पांचाळ, नांदेड ● बालाजी इप्तेकार, धर्माबाद ●  धनराज एच. शेट्टीगर, मुलकी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *सुगंध* चंदनाचा सुगंध लपवल्याने लपत नाही कोण काय करणार ज्याला तो खपत नाही कितीही लपवला तरी सुगंध बाहेर येणारच चांगल्याचा कधी तरी गाजा वाजा होणारच शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========      〰 ‼ *विचार धन* ‼ 〰 =========ஜ۩۞۩ஜ========= *एक छोटी कथा सांगितली जाते. एका दुष्काळी प्रदेशातील एक दुष्काळी गाव. नद्या, विहिरी आटलेल्या, पाण्यासाठी दशदिशा, आम्हा फिरविशी जगदीशा...अशी अवस्था. पावसाळा सुरू होतो. पाऊस काही येईना. शेवटी सगळा गाव एकत्र येतो. गंभीर परिस्थितीवर गंभीर चर्चा होते. उपाय सुचविले जातात. शेवटचा प्रयत्न म्हणून गावालगतच्या डोंगरावर जाऊन पावसासाठी देवाची प्रार्थना करायचे ठरते. सारा गाव ठरल्याप्रमाणे एकत्र येतो. थकलेली, तहानलेली पावलं नव्या उमेदीनं डोंगराकडे चालायला लागतात.* *या सर्व मोठ्या माणसांमध्ये एक मुलगा हातात छत्री घेऊन चालत असतो. या मुलाकडे बघून सर्वांना आश्चर्य वाटते. पावसाचा टिपूस नाही. येण्याची शक्यताही नाही आणि हा चिमुरडा सोबत छत्री घेऊन आलाय. शेवटी एकजण त्या चिमुरड्याला विचारतो..'बाळा, तू ही छत्री सोबत आणलीस?' छोटा मुलगा उत्तरतो. 'पावसासाठी प्रार्थना करायला आपण डोंगरावर जात आहोत आणि मी प्रार्थना केल्यावर पाऊस येणारच आहे. म्हणून मी छत्री सोबत घेतलीय.' हा स्वत:च्या प्रार्थनेवरचा ठाम विश्वास! एकूण दुसरं पाऊल पडणार आहे. या विश्वासावरच पहिलं पाऊल उचलावं लागतं.* 〰 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 32* *पूत पियारौ पिता कू,* *गोहनी लागो धाई |* *लोभ मिथाई हाथि दे,* *अपन गयो भुलाई ||* अर्थ विधात्याला विसरून चालणार नाही. विश्वाचा हा कल्पनेबाहेरचा अनाकलनीय खटाटोप त्याच्पाकडून चालूच असतो. ठरल्या वेळी. ठरल्या काळी, त्या त्या क्रिया घडवून आणतो. दिवस-रात्र, ऋतू , उष्णता, प्रकाश, हवा आदि बाबीमुळे चराचराचं अस्तित्व आहे. म्हणून आपण आनंदानं जगत असतो. वरील सर्व बाबीप्रति कृतज्ञता म्हणून त्या ( विधाता) निसर्ग चालक शक्तिला आपण वंदन केले पाहिजे. वरील बाब महात्मा कबीर पुढील दृष्टांताद्वारे लक्षात आणून देतात. लहाण मुलाला वडिल प्रिय असतात, तो वडीलांकडे सतत धाव घेत असतो. वडिलांना आजूबाजुला जावू देत नाही. तेव्हा वडिल त्याला मिठाई आदि खावू देवून समजूत काढत असतात. मुलाला आनंदी ठेवतात. बाहेर गेले तरी बाहेरूनही त्याची काळजी घेत असतात. म्हणून माणसानंही केवळ गरजेच्यावेळीच , कठीण समयी विधात्याला न आठवता आनंदाच्या, सुखा-समाधानाच्या काळात निसर्गाला ओरबाडताना त्याला सजवलंही पाहिजे. हे विसरता कामा नये. केवळ नाम जप नाही तर कृती केली पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या अंगी असलेली कोणतीही कला पहिल्यांदा आपल्याला विकसित करावी लागेल आणि ती विकसित केल्याशिवाय जगासमोर सादर करता येत नाही.कारण ज्या कलेमुळे तुम्ही जगातील लोकांचे एक तर मनोरंजन करणार आहात, तुम्ही लोकांना नवे काहीतरी ज्ञान देणार आहात, त्यांच्यातील दडलेल्या सुप्त कलागुणांना जागे करणार आहात, तुम्ही सादर करणा-या कलेमुळे त्यांना प्रोत्साहित करणार आहात. त्यामुळे तुम्ही तुमच्या तील अंगभूत असणा-या कलाप्रतिभामुळे त्यांच्यावर इतरांपेक्षा वेगळी छाप पाडून आपली वेगळी ओळख निर्माण करुन देणार असल्यामुळे तुम्ही चांगल्या दृष्टीने लोकांच्या चर्चेत अथवा प्रसिध्दीस येणार आहात.याचे सारे श्रेय तुमच्यातील असणा-या कलेमुळेच ना ! तुमच्या अंगी असणारी कोणतीही कलाप्रतिभा असेल तर तिला प्रोत्साहित करा म्हणजे तुम्ही जगासमोर नेहमी आदर्श म्हणून नावलौकिकास पात्र व्हाल आणि ज्यामुळे तुमच्या कलेचे अनुकरण करून तेही चांगल्या समाजनिर्मितीचे कार्य करतील.नाही तर आपल्या अंगी असलेल्या कला प्रतिभेला प्रोत्साहित केले नाही तर आपल्या हातून कोणतेच कार्य होणार नाही याची खंत नेहमीसाठी लागून राहिल.यापेक्षा आपले कोणते दुर्भाग्य असेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🛣🌅🛣🌅🛣🌅🛣🌅🛣🌅 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रगट - Revealed* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= समाधानी वृत्तीने जगावे एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले. भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’ भिका-याने अट मान्य केली. देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले. झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या. *तात्पर्यः समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला.थोडे मिळाले तरी त्यात समाधान मानले पाहिजे.अती हाव कामाची नसते* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  •••••••••••••••••••••••••••••••••••••

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट •••••••••••••••••••*••••••••••••••••••  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ••••••••••••••••••••*••••••••••••••••• *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 •••••••••••••••••••*•••••••••••••••••• 📅 दि. 03/10/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १६७०- शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली १८६३ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकननेदरवर्षीच्या नोव्हेंबरमधील चौथा गुरुवार हा थँक्सगिविंग दिन म्हणून पाळण्याचा आदेश दिला 💥 जन्म :- १९०३- समाजसुधारक व शिक्षण तज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ. १९११ - सरोबिंदू नाथ बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १५९६ - फ्लोरें क्रेस्टियें, फ्रेंच लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *इराकच्या राष्ट्रपतीपदी कुर्दीश मॉडरेट 'बार्हम सालीह' यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दिल्ली- पंतप्रधान मोदींकडून विज्ञान भवनात आंतरराष्ट्रीय सौर परिषदेचं उद्घाटन* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *335 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला बाल्टिक समुद्रात भीषण आग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दिल्ली- किसान क्रांती पदयात्रेतील शेतकऱ्यांचा दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर ठिय्या; शीघ्र कृती दलाचे जवान तैनात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *भाजपाचे काटोल येथील आमदार आशिष देशमुख यांनी दिला राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : वस्त्रहरण नाटकात तात्या सरपंच ह्यांची भूमिका साकारणारा हरहुन्नरी अभिनेता संतोष मयेकरचं तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून होणार सुरूवात, वेस्ट इंडीज 35 वर्षांचा मालिका विजयाचा दुष्काळ संपवणार का ?* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= नाशिक येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक देशदूतच्या blog वर प्रकाशित लेख *महात्मा गांधीजी म्हणजे स्फूर्ती* https://www.deshdoot.com/mahatma-gandhi-birth-anniversary-special-blog-nagorao-yevatikar/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *हद्दपार* जुन्या काळातले शिक्षक म्हटलं की बाणेदार पोरांना घडवणारे होते. प्रसंगी त्यासाठी विद्यार्थ्यांना मारझोड करावी लागली तरी त्याला विद्यार्थ्यांचे आईबाप आणि मास्तर दोघांचीही हरकत नसे. याचे उल्लेख साने गुरुजींच्या 'श्यामची आई' मध्ये सुद्धा आलेत. श्री ना पेंडसेंची ' हद्दपार' सुद्धा अशीच एका बाणेदारपणे आयुष्य जगणाऱ्या शिक्षकाची जिवीतकथा असणारी कादंबरी आहे. कोकणातल्या दापोलिजवळच्या दुर्गेश्वर नावाच्या एका छोट्या गावात शिकवणाऱ्या राजे मास्तरांची. स्वातंत्र्य पूर्वकालीन १९३०-४० च्या काळात घडणारी ही कथा सुरू होते ती मोगल काळापासून राजेंचा मुळपुरुष नुसत्या कोयतिनिशी वाघाशी झुंज देतो आणि घराण्याचा उत्कर्ष सुरू होतो तो राजे मास्तरांच्या वडिलांपर्यन्त भाई पाशी येवून थांबतो. मग पुढे मास्तरांचा जन्म झाल्यावर केलेलं भविष्य त्याला झुगारून जगणारे मास्तर, विद्यार्थी घडवण्यासाठी घेतलेले कष्ट, कोकणतल्या परंपरा, गावात विशेषतः पालखीच्या मानावरून होणारी आणि आयुष्य भर पुरणारी भांडणं यांचं सुरेख वर्णन श्री नां नि 'हद्दपार' मध्ये केलंय. 'हद्दपार' ही त्यांच्या सुरवातीच्या कादंबर्यापैकी एक होती त्यामुळे यात कोकणच्या निसर्गाचं वर्णन मुक्तहस्ते चितारले आहे. कादंबरीची पार्श्वभूमी जरी कोकणची असली, तरी त्यातल्या पात्रांच्या रोजच्या जगण्यात येणारे शब्द बोलण्याची पद्धत मात्र कोकणी न रहाता मराठी आहेत. त्यामुळे थोडंस चुकल्यासारखे वाटते एवढंच काय या कादंबरीत खुसपट काढता येईल. अन्यथा वाचणाऱ्याला बांधून ठेवणारी अत्यंत कसदार अशी कादंबरी म्हणून 'हद्दपार' चा उल्लेख निःसंशय पणे करता येईल. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर कोण होते?* 👉      वर्धमान महावीर *२)  वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला?* 👉      कुंडलपूर *३)  वर्धमान महावीर यांचा जन्म कधी झाला?* 👉      इ. स. पू. ५९९ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● रुपेश बालाजी सुंकेवार, देगलूर ● पूर्वा श्यामसुंदर माडेवार, नांदेड ●  नागेश क्यातमवार, परभणी ●  विश्वनाथ आरगुलवार, धर्माबाद ●  संदीप कडलग, अहमदनगर ●  साईनाथ राचेवाड, बिलोली ●  पांडुरंग यलमलवाड, उमरी ●  नागनाथ लाड, कुंडलवाडी ●  शिवाजी पांडुरंग मुटकुले ●  दत्तप्रसाद ढगे, धर्माबाद ●  शंकर पाटील डांगे, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *बापू* सत्य अहिंसेचा आम्हाला तुम्ही दाखवला मार्ग तुमच्या मार्गाने चालल्यास इथेच निर्माण होईल स्वर्ग तुम्ही सांगितलेले सत्य लोक फक्त बोलतात तुमच्या मार्गाने आज खरोखर किती चालतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 31* *साधु शब्द समुद्र है,* *जामे रत्न भराय |* *मंद भाग मुट्ठी भरे,* *कंकर हाथ लगाये ||* अर्थ सज्जन समुद्रासारखे अथांग असतात. समुद्राच्या घोंगावणार्‍या लाटा , पाणी खारट असलं तरी त्याची खोली अथांग असते. त्याचा तळ काढणे इतके का सोपे असते ! लोकोपयोगी असंख्य बाबी समुद्रातून मिळत असतात. संत वचन कडवट असलं तरी ते सत्य व वास्तवाचं भान करून देणारं असतं. समाजाला दिशादर्शन करून योग्य मार्गानं जाण्याची ते शिकवण देत असतात. संत कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा संयम ढळू देत नाहीत. विपरित समयी माणसानं विचार व विवेकापासून दूर न जाण्याचा सल्ला ते देत असतात. त्यांच्या ठायी दयाभाव व करूणा ओतप्रोत भरलेली असते. याउलट सामान्य व्यक्तीच्या ठायी चंचल प्रवृत्ती असते. जगण्याचा निखळ आनंद देणार्‍या गोष्टीपेक्षा लालचावणार्‍या बाबींच त्याला अधिक आकर्षक वाटू लागतात. तो विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सर्वच गोष्टींच्या मागं ऊर फुटेस्तोवर धावत राहतो. समुद्रकिनार्‍यावर पांढर्‍या शुभ्र दिसणार्‍या कणांनाच मोती समजून उचलावे तर ते सर्व रेतीचेच फसवे कण हाती यावेत. असा हा प्रकार आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जर तुम्ही खोटे बोलून जग जिंकत असाल तर ते चुकीचे आहे.तुम्हाला असेही वाटत असेल की, लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपली वाहवा करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.पण काहीजण करतीलही ते त्यांना माहित नसेल तिथपर्यंत जर का त्यांना जेव्हा समजेल की, तुम्ही खोटे बोलून स्वत:ची स्तुती करुन घेत आहात तेव्हा मात्र सारे लोक तुमच्यापासून दूर पळायला लागतील. सांगण्याचा तात्पर्य असा की, खोटं बोलून जग जिंकता येत नाही तर खरे बोलून जिंकता येते आणि तेही त्यांच्या हृदयावर आपले शेवटच्या क्षणापर्यंत राज्य करता येईल.म्हणून माणसाने सदैव खरेच बोलावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. ☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘🌸 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *निसर्ग - Nature* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *निसर्गाचे देणे* मिता कोकणातल्या छोटया खेड्यात रहायची. तिचे गाव शांत, सुंदर आणि समुद्राकाठी वसलेले होते. तिचे बाबा मासळी विकायचे आणि आई घरी पापड, लोणची करुन विकायची. ह्यावर त्यांच्या कुटूंबाचा उदर निर्वाह चालत असे. रोज सकाळी पहाटे उठून मिताही त्यांच्या बरोबर समुद्र किनारी जात असे. तिला सकाळच्या उन्हात चमकणारी समुद्राची वाळू खूप आवडत असे. वाळूत ती अनेक प्रकारची नक्षी काढत असे. समुद्रातले अनेक रंगी मासेही तिला खूप आवडत असत. तिचे बाबा मासे पकडत तेंव्हा जाळ्यात अडकलेल्या माश्यांची तडफड तिला अस्वस्थ करुन जात असे. तिने एक दिवस तिच्या बाबांना विचारले," बाबा, आपल्या सारखेच सगळ्यांनी रोजच मासे पकडले तर समुद्रातले मासे एक दिवस संपून जातील? मग सगळ्यांनी बाजारात जाऊन विकायचे काय आणि खायचे काय?" मिताच्या ह्या प्रश्नावर आई-बाबा दोघांनाही हसू आले. त्या दिवशी रात्री मिताच्या आईला अस्वस्थ करणारे स्वप्न पडले. तिने स्वप्नात पाहिले की समुद्रातले सगळे मासेच संपून गेले आहेत. त्यामुळे त्यांना पैसे मिळणेच कठीण झाले आहे. आईने मिताच्या बाबांनाही हे स्वप्न सांगितले. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे समुद्रावर जाण्याची तयारी झाली. मिताने बघितले की तिच्या आईने मासे ठेवण्याच्या नेहमीच्या टोपलीपेक्षा आकाराने लहान टोपली घेतली होती. तिला काही कळले नाही पण न विचारताच ती शाळेत गेली. आल्यावर मिताने बघितले तर तिचे बाबा नारळाच्या झावळ्या करत होते. आई पापड करण्यात गुंग होती. आज दोघेही जण मासळी बाजारातून लवकर घरी आले होते. मिताने त्याबद्दल विचारताच आई म्हणाली," मिता तुझ्या प्रश्नाने आम्हाला विचार करायला भाग पाडले आहे. आजपासून आम्ही ठरवले आहे की आवश्यकते नुसारच आपल्याला जितके मासे हवेत तितके मासे घ्यायचे. अधिक घेण्याचा हव्यास करायचा नाही. त्यामुळे आपला खर्च भागविण्यासाठी आम्ही इतरही उद्योग करायचे ठरविले आहे.निसर्गाची हानी अजिबात होऊ देणार नाही ."आईचे बोलणे ऐकून मिताला अत्यानंद झाला तिने आईला आनंदाने मिठी मारली." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  •••••••••••••••••••••••••••••••••••••

स्पर्धेसाठी रंग जीवनाचे तिमिरातुनी तेजाकडे असावे रंग जीवनाचे नकोत नाती नावाचे असावे त्यातील रंग प्रेमाचे ,आपुलकीचे. 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ••••••••••••••••••*•••••••••••••••••••  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ••••••••••••••••••••*••••••••••••••••• *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 •••••••••••••••••••••*•••••••••••••••• 📅 दि. 02/10/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती* 💥 ठळक घडामोडी :- २००६ - निकेल माइन्स, पेनसिल्व्हेनियामध्ये चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली. 💥 जन्म :- १८६९ - महात्मा गांधी. १९०४ - लाल बहादूर शास्त्री, भारतीय पंतप्रधान. १९३० - जयसिंगराव घोरपडे, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९३९ - बुधि कुंदरन, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५० - पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री. १९७१ - कौशल इनामदार, भारतीय संगीतकार 💥 मृत्यू :- १९७५ - कुमारस्वामी कामराज, तमिळनाडूचे मुख्यमंत्री *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ * शिर्डी-दिल्ली विमानसेवेला सुरुवात, मुंबई, हैदराबाद पाठोपाठ स्पाईसजेटकडून दिल्ली विमानसेवा सुरु* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *यंदाचे मानसशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रासाठीचे नोबेल पारितोषिक जेम्स पी अलीसन आणि तासुकू होन्जो यांना जाहीर, कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी गौरव* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *चंद्रपूर : प्रदुषणाच्या कारणावरून चंद्रपूर एमआयडीसीतील तीन उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली उत्पादन बंदची नोटीस.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *लोकांच्या भूतकाळावरुन नव्हे, तर कृतीवरुन त्यांची पारख करतो- मावळते सरन्यायाधीश दीपक मिश्रा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *SBI च्या एटीएममधून रोकड काढण्यावर मर्यादा, आता दिवसाला फक्त 20 हजार रुपयेच काढता येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मोहम्मद मुश्ताक अहमद हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई - दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= महात्मा गांधीजी यांची जयंती त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख *महात्मा गांधी म्हणजे स्फूर्ती* http://epaper.ejanshakti.com/m5/1838811/Pune-Janshakti/02-10-2018#page/6/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *लालबहादूर शास्त्री* २ ऑक्टोबर १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी लालबहादूर शास्त्री यांचा जन्म झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे महत्त्व त्यांना समजाविले. वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोनशिला बसविण्यासाठी आलेले महात्मा गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अ‍ॅक्ट, जालियनवाला बाग हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे ते 'शास्त्री' झाले.( त्यांचे मूळ आडनाव 'श्रीवास्तव' असे होते.) 'सर्व्हंटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. इ.स. १९२८ साली लाला लजपतराय गेले व पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकर्त्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय आणि मैत्री झाली. पंडीत नेहरू, आणि शास्त्रीना काँग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. इ.स. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण इ.स. १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविंदवल्लभ पंतांचे सेेक्रेटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. इ.स. १९५१ साली पं. नेहरूनी त्यांना काँग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेसला निवडणूका जिंकून दिल्या. २७ मे १९६४ ला पंडीत नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर शास्त्री हे एकमताने भारताचे दुसरे पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. युनोने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १० जानेवारी १९६६ रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी आहे. - महात्मा गांधीजी* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते ?* लालबहादूर शास्त्री *०२) लालबहादूर शास्त्री यांना बालपणी कोणत्या नावाने हाक मारीत ?* नन्हे *०३)लालबहादूर शास्त्री यांनी जनतेला कोणता नारा दिला ?* जय जवान, जय किसान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ●  कनिष्क सोनाळे, नांदेड ●  राजू म्याकलवार, वसमत ●  मधुकर उन्हाळे, शिक्षक नेते, नांदेड ●  सुधाकर पाटील आवरे, लातूर ● प्रल्हाद पिटलेवाड, भोकर ● गंगाधर रामटक्के, बिलोली ● गजानन काशेटवार, देगलूर ● दत्ता यडपलवार, जारीकोट *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *सामर्थ्य* सहकार्यामुळे चांगले काम करता येते सहकार्याने मोठे काम हाती धरता येते सहकार्याने कोणतेही कठीण काम सोपे होते मदतीच्या सामर्थाने कठीण काम तडीस जाते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 30* *तेरा बैरी कोइ नहीं,* *जो मन शीतल होय ।* *तु आपा को डारि दे,* *दया करै सब कोय ।।* महात्मा कबीर सांगतात की मित्र व शत्रू मानवी मनाच्या भावनेतून निर्माण होत असतात. जर मनाला शांत , शितल व पवित्र ठेवले तर आपले शत्रू निर्माण होणार नाहीत. मनाच्या ठायी षड् विकार उत्पन्न होत असतात. ध्यान मनन व चिंतनाद्वारे या विकारांना दूर सारता येते. संवेदनशीलता व दयाभाव ज्याच्या ठायी असतो त्याला इत्तरांच्या वेदनेवर सहज फुंकर घालता येते. दुसर्‍यांच्या वेदनेला संवेदनेची जोड देता आली तर सर्वांना आपलेसे करून घेता येते. सर्वजण वैरभाव सोडून आपले मित्र बणून जातात. तथागतांनी जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून दिला. वैर्‍याला प्रेमानं जिंकून युद्धातून होणारा विध्वंस व विनाश टाळता येतो. हे पटवून दिले. हा कल्याणकारी मार्ग ज्यांनी अवलंबिला. ती राज्ये लोक कल्याणकारी ठरली. इतिहासाच्या पानावर त्यांची नोंद भरभराटीचा सुवर्णकाळ म्हणून केली गेली आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा न ठेवा,कुणाचे ऐका किंवा ऐकूही नका,कुणी काहीतरी म्हटलं म्हणून तुम्ही करु नका.त्यांच्या बोलण्यावर तुम्ही काही अंशी खरेही माना परंतु तुमचा खरा विश्वास तुमच्या कर्तृत्वावर आहे ना ? याचा थोडा एकटेपणामध्ये विचार करा म्हणजे तुम्हाला खरे कळेल.पण त्याहीपेक्षा जर तुमच्या कर्तृत्वावर ठाम विश्वास असेल तर बाकीच्यांच्या गोष्टी मनावर कधीच घ्यायच्या नाहीत.पण तुमचाच तुमच्या कर्तृत्वावरचा विश्वास थोडाजरी ढळला गेला तरी,तुमच्या जीवनातले सारे जगण्याचे चित्रच बदलून जाते आणि आपण दुस-याच्या हातातले बाहुले बनतो.त्यापेक्षा आपण आपले कर्तृत्व प्रामाणिकपणे करावे आणि तेही आत्मविश्वासाने करावे.असे जर तत्व आपल्या जीवनात अंगीकारले तर आपले जीवन अधिक सुखी व समृद्ध होऊ शकेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कर्तृत्व - Credentials* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *बेचारा_अतृप्त_आत्मा* * एक बार गुरु रामानंद ने कबीर से कहा कि हे कबीर! आज श्राद्ध का दिन है और पितरो के लिये खीर बनानी है. आप जाइये, पितरो की खीर के लिये दूध ले आइये.... कबीर उस समय 9 वर्ष के ही थे.. कबीर दूध का बरतन लेकर चल पडे.....चलते चलते आगे एक गाय मरी हुई पडी मिली....कबीर ने आस पास से घास को उखाड कर, गाय के पास डाल दिया और वही पर बैठ गये...!!! दूध का बरतन भी पास ही रख लिया..... काफी देर हो गयी, कबीर लौटे नहीं, तो गुरु रामानंद ने सोचा.... पितरो को छिकाने का टाइम हो गया है...कबीर अभी तक नही आया....तो रामानंद जी खुद चल पडे दूध लेने. चले जा रहे थे तो आगे देखा कि कबीर एक मरी हुई गाय के पास बरतन रखे बैठे है...!!! गुरु रामानंद बोले, अरे कबीर तू दूध लेने नही गया.? कबीर बोले: स्वामीजी, ये गाय पहले घास खायेगी तभी तो दुध देगी...!!! रामानंद बोले: अरे ये गाय तो मरी हुई है, ये घास कैसे खायेगी?? कबीर बोले: स्वामी जी, ये गाय तो आज मरी है....जब आज मरी गाय घास नही खा सकती...!!! ...तो आपके 100 साल पहले मरे हुए पितर खीर कैसे खायेगे...?? यह सुनते ही रामानन्दजी मौन हो गये..!! उन्हें अपनी भूल का ऐहसास हुआ.! *जिंदा बाप कोई न पुजे* *मरे बाद पुजवाया* *मुठ्ठीभर चावल ले के* *कौवे को बाप बनाया* *----संत कबीर* *भावार्थ:-* *जो जीवित माँ बाप है* *उनकी सेवा करो..!!* *वही सच्चा श्राद्ध है.!!* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. •••••••••••••••••••••••••••••••••••••