✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/10/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक मानसिक आरोग्य दिन* *जागतिक लापशी दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९९८ : भारताचे २९ वे सरन्यायाधीश म्हणून आदर्श सेन आनंद यांनी कार्यभार सांभाळला २0१३ : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नवृत्त होत असल्याचे जाहीर केले. 💥 जन्म :- १९१0 : डॉ. द्वारकानाथ कोटणीस १९0६ : ख्यातनाम लेखक आर. के. नारायण १९५४ : हिंदी चित्रपट अभिनेत्री रेखा 💥 मृत्यू :- २००६ - सरस्वतीबाई राणे, भारतीय - मराठी गायिका. २००८ - रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका. २०११ - जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *हरयाणा: शेतक-यांना सावकारांपासून वाचवण्यासाठी आम्ही बँकांचे दरवाजे खुले केले पंतप्रधान नरेंद्र मोदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *तनुश्री दत्ताच्या आरोपांनंतर नाना पाटेकरांना महिला आयोगाची नोटीस* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *अहमदनगर- शिर्डीच्या साई संस्थानला सुप्रीम कोर्टाचा दणका, चुकीच्या प्रवर्गातून विश्वस्त नेमण्यावर आक्षेप, अपात्र संचालकांना काढून नवे विश्वस्त नेमा सुप्रीम कोर्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सणासुदीच्या तोंडावर राज्यात 1.5 हजार मेगावॅट विजेचा तुटवडा; नाशिक, मुंब्रासह राज्याच्या काही भागात भारनियमन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत 74.06 रुपये प्रति डॉलर.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत निक्की हॅलेंचा राजीनामा; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राजीनामा मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताने अंध क्रिकेट टी-२० तिरंगी मालिकेत इंग्लंडवर मात करीत विजयी घोडदौड राखली कायम.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक पार्श्वभूमीमध्ये प्रकाशित लेख *तंबाखूमुक्त एस. टी. होईल काय ?* त्या दिशेने महामंडळाचे एक पाऊल पडत आहे. ते उल्लेखनीय आहे. http://parshvbhumi.com/date/20181010/page/4/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कादंबरीकार आर के नारायण* प्रसिद्ध कादंबरीकार आर. के. नारायण यांचा जन्म १0 आँक्टोबर १९0६ रोजी झाला. त्यांचे पुर्ण नाव रासीपुरम अय्यर नारायणसामी होते. भारतीय लेखकांच्या तीन सर्वात महान साहित्यिकांमध्ये त्यांची गणना होते. कादंबरी आणि कथा प्रकाराच्या माध्यमातून त्यांनी विविध स्तर आणि रुपातील मानवीय विकास आणि अध:पतनाचे चित्रण केले. गाईड कादंबरीसाठी १९६0 मध्ये त्यांना साहित्य अकादमी हा सर्वोच्च सन्मान मिळाला. १९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी अँन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्या वाचताना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे. यावर अनेकांचा विश्‍वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी कथांमधून उभे केले आहे. साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत - आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा - आचार्य विनोबा भावे *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्रातील प्रमुख वेधशाळा कोठे आहे ?* पुणे *२) उत्तर व्हिएतनाममधील सोंग की नदीच्या काठावर वसलेलं महत्त्वाचं शहर कोणतं ?* हनोई *३) १९८५ हे वर्ष काय म्हणून साजरं करण्यात आलं ?* इंटरनॅशनल इयर ऑफ यूथ  *४) आंध्र प्रदेशमध्ये अवकाशयान केंद्र कोठे आहे ?* श्रीहरिकोटा *५) पृथ्वीच्या आपल्या आसाभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात ?* स्वांगपरिभ्रमण गती *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ●  विशाल अन्नमवार ●  राजेश्वर भुरे ●  सतीश बड्डेवाड ●  हरिश्चंद्र भोईर ●  पोतना पालंचेवार ●  संतोष खेडकर ●  गंगाधर पापुलवार ●  श्याम देसाई ●  राजेंद्र वाघमारे ●  संतोष चंदेवाड ●  सतीश बोधनकर ●  राज वाजीरे ●  रेखा अर्गे ●  माधव गवळे ●  विठ्ठल धुळेवार ●  गोविंद पाटील ●  वसंत पाटील कदम ●  रामा गायकवाड ●  कैलास सांगवीकर ●  विनोद लोणे ●  तुकाराम ढोले ●  शंकर बत्तीनवार ●  तानाजी पाटील ●  अरुण शंकपाळे ●  प्रमोद यादव ●  शरद घुबे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *मर्यादित* आशा केल्यास माणूस जगाचा दास होतो दास होण्याची चिंता नाही जो सदा उदास रहातो आशा किंवा उदासी एकदम टोकाची नसावी आनंदात जीवन जगण्यास दोन्ही मर्यादित असावी शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========     • • ● ‼ *विचार धन* ‼ ● • • =========ஜ۩۞۩ஜ========= *कामावरून थकून भागून आलेल्या भुकेल्या पुरुषाला बाई जेवायला वाढते. तो जेवताना समोर बसून रहाते. ज्याच्याकरीता प्रेमाने जेवन बनवलं, तो जेवनाचा आस्वाद घेतोय याचं समाधान असतंच. त्या बरोबर भुकेला माणूस जेवताना तल्लीन झालेला असतो. ती तल्लीनता बघण्यासारखी असते. ज्यांना व्यवस्थित खायला मिळतं त्यांच्यासाठी भुकेचा सोहळा असतो. पण जे आन्नालाही तरसतात त्यांच्यासाठी भूक दुश्मन असते.* *एका आत्मकथनात भुकेचा संदर्भ आहे. गरिबी किती असावी ? हगवण लागलेल्या म्हशीच्या मागं पोरं टोपलं घेऊन फिरतात. म्हशीला न पचलेले दाणे शेणात तसेच असतात. ते दाणे धुवून घ्यायचे. दाणे फार नसतात. मग आंब्याच्या कोयीमध्ये निघणारा गर दाण्यांबरोबर दळायचा. त्याची भाकरी करायची आणि भूक भागवायची. अनेकदा वाळलेल्या भाकरी पाण्यात भिजवून खाल्ल्या जातात. उंदीर भाजून खाल्ले जातात. झाडाचा पाला खाऊनही भूक भागविली जाते.* *याउलट सुबत्ता असलेली माणसं भूक लागण्याची वाट पहात नाहीत, नुसते खातच सुटतात. दिवसातून कितीदा खावं यावरही मतमतांतरे आहेत. या वादात पडण्यापेक्षा कडकडून भूक लागली की जेवावं हेच खरं. जेवताना थोडी भूक शिल्लक ठेवून आणि जगात अनेक लोक उपाशी असतात हे वास्तव डोक्यात ठेवून जेवावं, प्रत्येकाला भूक तर लागणारच आहे.* •• ●‼ *रामकृष्णहरी* ‼● •• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 36*      *जबलग भागती सकामता,* *तबलग निर्फल सेव |* *कहई कबीर वई क्यो मिलई,* *निहकामी निज देव ||* अर्थ जोवर उद्देश ठेवून भक्ती केली जाईल तोवर ती भक्तीरूपी सेवा निष्फळ ठरणार आहे. कारण विधात्याला निष्काम भक्तीची अपेक्षा आहे. त्याला सकाम सहेतुक भक्ती कशी काय आवडणार आहे? निर्गुण, निराकार असणार्‍या ईश्वराला निष्काम सेवा, निष्काम भक्ती आवडते. निर्व्याज मनाने बुद्धांनी लोकांना दुःख मुक्तीचा मार्ग दिला. चक्रधर, संत नामदेव, ज्ञानेश्वर, नाथ , रामदास, तुकोबा, जनाई , कबीर, मीराबाई, मुक्ताई, बहिणाई ,गाडगेबाबा, तुकडोजी आदिंनी निर्हेतूक भक्ती केली . लोक शिक्षणाचं सशक्त पीठंच त्यांनी उभे केले. लोक जागृती हाच उद्देश घेवून ते जगले. ज्ञानदानामागे त्यांचा कुठलाही स्वार्थी व पोटार्थी हेतु नव्हता. जन कळवळ्याचा त्यामागे ध्यास होता. स्वतःची वाताहत झाली तर झाली परंतु सर्वांचं कल्याण व्हावं . दास्य अज्ञानातून त्यांची मुक्तता व्हावी हा उद्देश होता. आजकाल भक्तीचं अवडंबर माजवून भक्तांना भावनिक बणवून त्यांची भावनिक व आर्थिक लुट करणारे महाभागही काही कमी नाहीत. ज्यांनी भौतिक संपत्ती व सुखांच्या मागे न लागता विवेकनिष्ठ चिंतन केलं. त्यांची भक्ती व साहित्य कृती अजरामर ठरली आहे. ज्ञानोबांचा पुढील भक्तीविषयक अभंग वाचला तर भक्ती कशी असावी ते कळते. 'भावेवीण भक्ती भक्तिवीण मुक्ती। बळेवीण शक्ती बोलो नये॥१॥ आपलं कार्यही निखळ व आनंददायी असेल तर ते लौकिकास पात्र ठरणारंच.. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= भूतकाळाचे स्मरण करुन वर्तमानकाळात सावध राहत आणि भविष्यकाळ समोर ठेवून जी व्यक्ती आपले जीवन चांगल्याप्रकारे जगते तीच व्यक्ती जीवनात यशस्वी होते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🛣🌄🛣🌄🛣🌄🛣🌄🛣🛣 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अनमोल - Priceless* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *अनमोल क्षण* प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग. एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'. 'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'. खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment