✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ••••••••••••••••••*•••••••••••••••••••  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ••••••••••••••••••••*••••••••••••••••• *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 •••••••••••••••••••••*•••••••••••••••• 📅 दि. 02/10/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती* 💥 ठळक घडामोडी :- २००६ - निकेल माइन्स, पेनसिल्व्हेनियामध्ये चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली. 💥 जन्म :- १८६९ - महात्मा गांधी. १९०४ - लाल बहादूर शास्त्री, भारतीय पंतप्रधान. १९३० - जयसिंगराव घोरपडे, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९३९ - बुधि कुंदरन, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५० - पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री. १९७१ - कौशल इनामदार, भारतीय संगीतकार 💥 मृत्यू :- १९७५ - कुमारस्वामी कामराज, तमिळनाडूचे मुख्यमंत्री *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ * शिर्डी-दिल्ली विमानसेवेला सुरुवात, मुंबई, हैदराबाद पाठोपाठ स्पाईसजेटकडून दिल्ली विमानसेवा सुरु* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *यंदाचे मानसशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रासाठीचे नोबेल पारितोषिक जेम्स पी अलीसन आणि तासुकू होन्जो यांना जाहीर, कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी गौरव* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *चंद्रपूर : प्रदुषणाच्या कारणावरून चंद्रपूर एमआयडीसीतील तीन उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली उत्पादन बंदची नोटीस.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *लोकांच्या भूतकाळावरुन नव्हे, तर कृतीवरुन त्यांची पारख करतो- मावळते सरन्यायाधीश दीपक मिश्रा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *SBI च्या एटीएममधून रोकड काढण्यावर मर्यादा, आता दिवसाला फक्त 20 हजार रुपयेच काढता येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मोहम्मद मुश्ताक अहमद हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई - दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= महात्मा गांधीजी यांची जयंती त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख *महात्मा गांधी म्हणजे स्फूर्ती* http://epaper.ejanshakti.com/m5/1838811/Pune-Janshakti/02-10-2018#page/6/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *लालबहादूर शास्त्री* २ ऑक्टोबर १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी लालबहादूर शास्त्री यांचा जन्म झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे महत्त्व त्यांना समजाविले. वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोनशिला बसविण्यासाठी आलेले महात्मा गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अ‍ॅक्ट, जालियनवाला बाग हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे ते 'शास्त्री' झाले.( त्यांचे मूळ आडनाव 'श्रीवास्तव' असे होते.) 'सर्व्हंटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. इ.स. १९२८ साली लाला लजपतराय गेले व पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकर्त्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय आणि मैत्री झाली. पंडीत नेहरू, आणि शास्त्रीना काँग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. इ.स. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण इ.स. १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविंदवल्लभ पंतांचे सेेक्रेटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. इ.स. १९५१ साली पं. नेहरूनी त्यांना काँग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेसला निवडणूका जिंकून दिल्या. २७ मे १९६४ ला पंडीत नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर शास्त्री हे एकमताने भारताचे दुसरे पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. युनोने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १० जानेवारी १९६६ रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी आहे. - महात्मा गांधीजी* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते ?* लालबहादूर शास्त्री *०२) लालबहादूर शास्त्री यांना बालपणी कोणत्या नावाने हाक मारीत ?* नन्हे *०३)लालबहादूर शास्त्री यांनी जनतेला कोणता नारा दिला ?* जय जवान, जय किसान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ●  कनिष्क सोनाळे, नांदेड ●  राजू म्याकलवार, वसमत ●  मधुकर उन्हाळे, शिक्षक नेते, नांदेड ●  सुधाकर पाटील आवरे, लातूर ● प्रल्हाद पिटलेवाड, भोकर ● गंगाधर रामटक्के, बिलोली ● गजानन काशेटवार, देगलूर ● दत्ता यडपलवार, जारीकोट *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *सामर्थ्य* सहकार्यामुळे चांगले काम करता येते सहकार्याने मोठे काम हाती धरता येते सहकार्याने कोणतेही कठीण काम सोपे होते मदतीच्या सामर्थाने कठीण काम तडीस जाते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 30* *तेरा बैरी कोइ नहीं,* *जो मन शीतल होय ।* *तु आपा को डारि दे,* *दया करै सब कोय ।।* महात्मा कबीर सांगतात की मित्र व शत्रू मानवी मनाच्या भावनेतून निर्माण होत असतात. जर मनाला शांत , शितल व पवित्र ठेवले तर आपले शत्रू निर्माण होणार नाहीत. मनाच्या ठायी षड् विकार उत्पन्न होत असतात. ध्यान मनन व चिंतनाद्वारे या विकारांना दूर सारता येते. संवेदनशीलता व दयाभाव ज्याच्या ठायी असतो त्याला इत्तरांच्या वेदनेवर सहज फुंकर घालता येते. दुसर्‍यांच्या वेदनेला संवेदनेची जोड देता आली तर सर्वांना आपलेसे करून घेता येते. सर्वजण वैरभाव सोडून आपले मित्र बणून जातात. तथागतांनी जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून दिला. वैर्‍याला प्रेमानं जिंकून युद्धातून होणारा विध्वंस व विनाश टाळता येतो. हे पटवून दिले. हा कल्याणकारी मार्ग ज्यांनी अवलंबिला. ती राज्ये लोक कल्याणकारी ठरली. इतिहासाच्या पानावर त्यांची नोंद भरभराटीचा सुवर्णकाळ म्हणून केली गेली आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा न ठेवा,कुणाचे ऐका किंवा ऐकूही नका,कुणी काहीतरी म्हटलं म्हणून तुम्ही करु नका.त्यांच्या बोलण्यावर तुम्ही काही अंशी खरेही माना परंतु तुमचा खरा विश्वास तुमच्या कर्तृत्वावर आहे ना ? याचा थोडा एकटेपणामध्ये विचार करा म्हणजे तुम्हाला खरे कळेल.पण त्याहीपेक्षा जर तुमच्या कर्तृत्वावर ठाम विश्वास असेल तर बाकीच्यांच्या गोष्टी मनावर कधीच घ्यायच्या नाहीत.पण तुमचाच तुमच्या कर्तृत्वावरचा विश्वास थोडाजरी ढळला गेला तरी,तुमच्या जीवनातले सारे जगण्याचे चित्रच बदलून जाते आणि आपण दुस-याच्या हातातले बाहुले बनतो.त्यापेक्षा आपण आपले कर्तृत्व प्रामाणिकपणे करावे आणि तेही आत्मविश्वासाने करावे.असे जर तत्व आपल्या जीवनात अंगीकारले तर आपले जीवन अधिक सुखी व समृद्ध होऊ शकेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कर्तृत्व - Credentials* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *बेचारा_अतृप्त_आत्मा* * एक बार गुरु रामानंद ने कबीर से कहा कि हे कबीर! आज श्राद्ध का दिन है और पितरो के लिये खीर बनानी है. आप जाइये, पितरो की खीर के लिये दूध ले आइये.... कबीर उस समय 9 वर्ष के ही थे.. कबीर दूध का बरतन लेकर चल पडे.....चलते चलते आगे एक गाय मरी हुई पडी मिली....कबीर ने आस पास से घास को उखाड कर, गाय के पास डाल दिया और वही पर बैठ गये...!!! दूध का बरतन भी पास ही रख लिया..... काफी देर हो गयी, कबीर लौटे नहीं, तो गुरु रामानंद ने सोचा.... पितरो को छिकाने का टाइम हो गया है...कबीर अभी तक नही आया....तो रामानंद जी खुद चल पडे दूध लेने. चले जा रहे थे तो आगे देखा कि कबीर एक मरी हुई गाय के पास बरतन रखे बैठे है...!!! गुरु रामानंद बोले, अरे कबीर तू दूध लेने नही गया.? कबीर बोले: स्वामीजी, ये गाय पहले घास खायेगी तभी तो दुध देगी...!!! रामानंद बोले: अरे ये गाय तो मरी हुई है, ये घास कैसे खायेगी?? कबीर बोले: स्वामी जी, ये गाय तो आज मरी है....जब आज मरी गाय घास नही खा सकती...!!! ...तो आपके 100 साल पहले मरे हुए पितर खीर कैसे खायेगे...?? यह सुनते ही रामानन्दजी मौन हो गये..!! उन्हें अपनी भूल का ऐहसास हुआ.! *जिंदा बाप कोई न पुजे* *मरे बाद पुजवाया* *मुठ्ठीभर चावल ले के* *कौवे को बाप बनाया* *----संत कबीर* *भावार्थ:-* *जो जीवित माँ बाप है* *उनकी सेवा करो..!!* *वही सच्चा श्राद्ध है.!!* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ••••••••••••••••••••••••••••••••••••• *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. •••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments:

Post a Comment