✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/10/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८६४ - कोलकात्यावर आलेल्या चक्रीवादळात ६०,००० मृत्युमुखी १९१० - पोर्तुगाल प्रजासत्ताक झाले 💥 जन्म :- १८९० - किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला, हिंदी पत्रकार, संपादक १९३२ - माधव आपटे, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९९१ - रामनाथ गोएंका, भारतीय वृत्तपत्रसंचालक. १९९२ - परशुराम भवानराव पंत, भारतीय राजनैतिक मुत्सद्दी. २०११ - स्टीव्ह जॉब्स, अमेरिकन उद्योगपती, ॲपल कम्प्युटर्स चे सहसंस्थापक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - रोहिंग्याना माघारी धाडण्याविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्य न्यायालयाने फेटाळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *महाराष्ट्र सरकारने पेट्रोलचे दर अडीच रुपयांनी कमी करण्याचा घेतला निर्णय मात्र, डिझेलचे दर जैसे थे* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई - आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा बँक व्यवस्थापनाने स्वीकारला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली : राफेल प्रकरणी चौकशी करा; माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी, यशवंत सिन्हांसह वकील प्रशांत भूषण यांची CBI कडे मागणी, तिघांनी सीबीआयचे संचालक अलोक वर्मांची घेतली भेट.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *4 ते 8 ऑक्टोबरदरम्यान तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि केरळच्या काही भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याचा हवामान खात्याचा अंदाज* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *संयुक्त राष्ट्राचे जनरल सेक्रेटरी भारत दौऱ्यावर; अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. वेस्ट इंडीजच्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉच्या शतकीय खेळाच्या जोरावर भारत ४ बाद ३६४* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *खरंच, महिलांना न्याय मिळाला का ?* https://www.deshdoot.com/blog-on-shabarimala-temple-supreme-court-issue/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========    *स्टीव्ह जॉब्स*                 स्टीव्ह जॉब्स हा एक अमेरिकन व्यवसायिक होता आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचा सहसंस्थापक व मुख्याधिकारी होता. जॉब्स हा काही काळ पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज‎चा मुख्य व्यवस्थापक होता आणि नंतर तो वॉल्ट डिस्ने कंपनीचासंचालक सदस्य होता. इ.स. १९७० मध्ये जॉब्स याने स्टीव्ह वॉझनियाक, माइक मारक्कुला आणि इतर (ॲपल कंपनीचे सर्व सदस्य) यांच्या समवेत व्यक्तिगत संगणक तयार केला. ॲपल-२ या मलिकेअंतर्गत मॅकिंटॉश नावाची प्रचालन यंत्रणा तयार केली. इ.स. १९८५ मध्ये कंपनीच्या सदस्यांसमावेत झालेल्या वादामुळे त्याने राजीनामा दिला आणि नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा (संगणकाचा वापर) किंवा प्रणाली तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. १९९७ साली 'नेक्स्ट'चे 'ॲपल'मध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा 'ॲपल'मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते. त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड असून याच कामासाठी त्याने वाहून घेतले आहे. त्याने प्रकृतिअस्वास्थ्य व अन्य वैयक्तिक कारणांसाठी २९ जून, इ.स. २००९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला. आयफोन, 'आयपॉड', 'आयपॅड' हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले. स्टीव जॉब्सला उपभोक्ता संगणकक्षेत्रातील नवीनतेचा व अविष्कारचा जनक म्हणून संबोधले जाते. स्टिव जॉब्सचा कर्क रोगामुळे मृत्यू झाला. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) सुप्रसिद्ध अजिंक्यताराकिल्ला कोठे आहे ?* सातारा *०२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे ?* लोणार जि. रायगड *०३) जगातील सर्वात लांब नदी कोणती ?* नाईल नदी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ●  श्रद्धानंद यरमलवाड, येवती ●  विष्णू वाघमारे ●  बालाजी घोणशेट्टे ●  योगेश बोड्डोला, येवती ●  काशीनाथ साखरे, वसमत ● भार्गव साईनाथ मुदलोड, येवती ●  विशाल फाळके ●  किशन पचलिंग, बरबडा ●  दीपक रामराव कुलकर्णी ● दिनेश वाडवनकर ●  प्रदीप सोमोसे ●  साईनाथ पवार ●  सुभाष लोखंडे, पांगरी ●  रविकांत ढोले ● पाशा शेख ● आकाश जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *काम क्रोध मोह* काम क्रोध मोह हे  विनाशाचे द्वार आहेत  जेवढे वाढतील तेवढे  डोक्यावर भार आहेत  काम क्रोध लोभाने  डोक्यावर भार होतो  अती झाले म्हणजे  केवढाही गार होतो     शरद ठाकर   सेलू जि परभणी   8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========   •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण मित्राला बोलतो, 'उद्या मला सकाळी फोन कर, मग आपण ठरवू या.' असं म्हणताना आजची रात्र सुखरूप पार करून उद्याची सकाळ आपण अनुभवणार आहोत यावर आपला ठाम विश्वास असतो. असे छोटे छोटे विश्वास ठेवल्याशिवाय गाडा पुढे हाकता येत नाही.* *एक बस स्टँडच्या फलाटाला लागते. आपण गावाच्या नावाची पाटी वाचून खात्री करून घेतो आणि बसमध्ये चढतो. तिकीट काढतो. सोबतचा घडी केलेला पेपर उघडून वाचायला लागतो किंवा डोळे बंद करून डुलक्या घेतो. हलणा-या बसमध्ये निवांतपणे खिडकीतून बाहेर बघत बसतो. काही वेळा चिल्लर पैशांवरून कंडक्टरशी वाद होतात. वळण घाटाचा रस्ता पार करून आपल्या थांब्यावर बस आणून सोडते. या सगळ्या प्रवासात बस चालवणा-या ड्रायव्हरचा चेहराही आपण पाहिलेला नसतो. त्या ड्रायव्हरच्या भरोशावर आपण बसमध्ये निवांतपणे बसलेलो असतो. कंडक्टरशी रुपया आठाण्यावरून वाद करणारा प्रवासी स्वत:चा जीव, चेहराही न पाहिलेल्या ड्रायव्हरच्या हवाली करतो. किती विश्वास ठेवतो आपण अनोळखी माणसावर.. 'विश्वास' फार महत्वाचा असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 32* *जा कारनी मे ढूँढती* *सन्मुख मिलिया आई |* *धन मैली पीव ऊजला* *लागी ना सकौ पाई ||* अर्थ माणूस सुखाच्या शोधात असतो. प्रत्येकाच्या सुखाच्या धारणा वेगळ्या आहेत. धन, संपत्ती श्रीमंतीत सुख शोधणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. गरजेपुरती धन संपत्ती कमावलीच पाहिजे. चरितार्थ व्यवस्थित झाला तरच मानसाला सांस्कृतिक भूक लागते. मात्र संपत्ती संंपत्तीचा साठा संचय करून ठेवण्यात स्वतःचंच बाहुलं करून घेवून नये. महात्मा कबीर म्हणतात , 'साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय । मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥' माणूस धन संपत्तीच्या शोधात श्रीमंत होण्याच्या वेडात भटकताना हाती असणारे आनंदाचे क्षणही गमावून बसतो. शाश्वत सत्य व विवेकी विचारानं वागून खर्‍या ईश्वराचा व गुरूचा शोध घेता येतो. त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनानं मन तृप्त होत. मिळणारा आनंद चिरकाल टिकणारा असतो. तो निखळ आनंद देत असतो. मात्र माणूस उगाच संभ्रमात सापडून चाचपडत राहातो. स्वतःला दुःख व उदासीन बनवत असतो. मात्र अशा निखळ आनंददायी क्षणांचा शोध घेत. जीवनातले भ्रम नाहीसे करणार्‍या संत सज्जनाचे चरणी नतमस्तक व्हायला हवं . मात्र निरर्थक ताठरपणा मुळं ते अवघड होतं. म्हणून तो दूर सारला पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जेव्हा रोज सकाळ ही नवीन सकाळ होऊन या जगात प्रवेश करते तेव्हा प्रत्येक सजीवांसाठी नवीन आशा पल्लवित करण्यासाठी. ती म्हणते काल जे काही चांगले-वाईट झाले त्यातील चांगले लक्षात ठेऊन त्याला सोबत घेऊन पुढे अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा आणि जे काही तुमच्या जीवनात वाईट घडून गेले त्याला विसरुन जा.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या आणि आनंदाने जीवन जगा.ती म्हणते मी कधीच भूतकाळाला धरुन वर्तमानात जगत नाही आणि वर्तमानात जे काही जगते ते भविष्यकाळातही त्याचा विचार करत नाही.त्यामुळेच मी रोजच्यारोज टवटवीत, प्रसन्न आणि प्रफुल्लीत असते.असा जर मी तुमच्यासारखा विचार करायला लागले असते तर सगळ्या जीवसृष्टीला आवडले असते का ? नाही. म्हणून झाले गेले विसरा नि रोज तेवढ्याच प्रसन्न मनाने,प्रसन्न मुद्रेने माझ्यासारखं आनंदी रहायला शिका मग माझ्याप्रमाणेच रोज तुमचंही स्वागत करतील, तुमच्याबद्दल इतरांना आवड निर्माण होऊन तुमच्यावर प्रेम करायला लागतील. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *डौलदार - Graceful* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *निळूचा नाच* 'मिआव मिआव' निळूने जोरात हाक मारली. नदीपलिकडील झाडीतून आवाज आला 'मिआव मिआव!' मग निळूने पंख पसरून कसेबसे उडत पलिकडील तीर गाठले. काठावर बसून थोडावेळ विसावा घेतला. नदीत वाकून पाणी पिता पिता आपला सुंदर पिसारा पाहून तो खूष झाला. निळा, हिरवा, पिवळा, सोनेरी. कुणीतरी रंगांची जणूकाही उधळणच केली होती. मग डौलदार पावले टाकत तो गवतातून पुढे निघाला. वाटेत बिळांतून डोके वर काढत ससू बोलला, 'वा निळू! आज खूप खूप छान दिसतोस हं तू! किती लांबलचक सुरेख पिसारा आहे रे तुझा!' हे ऐकून निळूला खूप बरे वाटले. आणखी थोडा वेळ पुढे जातो न जातो तोच पिलू हरीण भेटले. एक उंचच उंच उडी घेऊन ते निळूपुढे येऊन उभे राहिले. दचकून निळू दोन पावले मागे सरकला. 'अरे निळू ! आज मी तुला ओळखलेच नाही. किती सुंदर पिसारा आहे रे तुझा. जरा फुलवून दाखवतोस कां?' निळूने हळूच पिसारा हलवून बघितला पण तो गोलाकार कसा करायचा हेच मुळी त्याला कळेना. मग लगबगीने पुढे जात निळू बोलला, 'उद्या दाखवीन हं तुला छानसा पंखा करून!' आता हिरवळ संपून झाडेच झाडे दिसू लागली. वर पक्षांचा किलबिलाट चालला होता. एक राघूंचा थवा आरामात फळे खात होता. निळूकडे लक्ष जाताच सगळीजण कौतुक करू लागली. 'काय सुंदर रंगीबेरंगी पिसारा आहे नाही निळूचा' एकजण बोलला, 'निळू जरा थुई थुई नाचून दाखव ना!' निळूने परत एकदा पिसे हालवून बघितली. पण एक पीस जागचे हलेल तर शपथ! इकडे पोपटांचा थवा कलकलत उडाला. अहा रे गंमत! एका पक्षाला मुळी नाचताच येत नाही.' मग निळू पटकन एका फांदीवर चढून बसला. काय केले असता सुंदर नाचता येईल बरे?.... तो मनाशी विचार करू लागला. हळूच एक एक पाऊल उचलून तुरा हलवत तो इकडे तिकडे डुलला. पण अजूनही मनासारखा नाच काही जमेना. मग निळूला भारी वाईट वाटले. कितीतरी वेळ तो उदास बसून राहिला. हा पिसारा नसता तरी बरे झाले असते असाही विचार मनात डोकावला.अचानक ढग दाटून आले आणि रिमझीम पाऊसाची सुरूवात झाली. निळु आनंदाने फांदीवरून खाली उतरला. आपले पंख पसरून नाचू लागला. सगळे पाहू लागले पण निळूचे कुठं लक्ष होते.तो तर आनंदाने भारावून नाचू लागला होता. *तात्पर्यः आपला आनंद आपणच निर्माण करावा.मग आपल्या आनंदात कोणी सहभागी होऊन प्रेरणा देऊ अथवा नाही हा विचार करायचा नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

1 comment: