✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/10/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५१ - स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीला सुरुवात २००१ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज एक्स.पी. ही संगणकप्रणाली प्रकाशित केली २००७ - एरबस ए-३८०चे प्रथम प्रवासी उड्डाण. 💥 जन्म :- १९३७ - संगीत समीक्षक अशोक रानडे १९४५ - अभिनेत्री, चित्रपट निर्माती अपर्णा सेन 💥 मृत्यू :- १९५५ - शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू उर्फ बापूराव पलूसकर १९८० - शायर व गीतकार साहिर लुधीयानवी २००३ - स्वाध्यायचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले २००९ : अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन. २०१२ - विनोदी अभिनेते जसपाल भट्टी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमास निघालेल्या स्पीडबोटीला अपघात, एकाचा मृत्यू; राज्य शासनातर्फे मृताच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *केंद्रीय दक्षता आयोग सीबीआयच्या अधिकाऱ्यांवरील आरोपांची करणार चौकशी - अर्थमंत्री अरुण जेटली* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी जस्टीस नरेश एच. पाटील यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये 4 टक्क्यांची घसरण, येत्या काळात पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *एम. नागेश्वर राव यांनी स्वीकारला सीबीआयच्या अंतरिम संचालकपदाचा कार्यभार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारत स्टेज - IV (BS-IV) वाहनांच्या विक्री आणि नोंदणीवर 1 एप्रिल, 2020 पासून बंदी : सर्वोच्च न्यायालय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विशाखापट्टणम : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दहा हजार धावांचा टप्पा 205 सामन्यांमध्ये ओलांडत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला टाकले पिछाडीवर.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://sharechat.com/post/7d6dMGQ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरज तेथे मदत करा* https://nasayeotikar.wordpress.com/2018/05/14/%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%a4/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर* हे मराठी नाट्य-अभिनेते, चित्रपट अभिनेते होते. सुमारे सहा दशके त्यांनी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्र गाजवले. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी महाराष्ट्रात अमरावती येथे झाला. त्यांचे वडील चिंतामणराव कोल्हटकर हेसुद्धा नाटकांतून अभिनय करत असत. भावबंधन नाटकातील मोरेश्‍वर या भूमिकेतून १९४४ मध्ये कोल्हटकरांचे नाट्यक्षेत्रात पदार्पण झाले. तत्पूर्वी १९४७ मध्येच भालजी पेंढारकरांच्या गरिबांचे राज्य या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला. १९५0 साली कुंकवाचा धनी चित्रपटात त्यांनी नायकाची व्यक्तिरेखा केली. यानंतर पेडगांवचे शहाणे, शेवग्याच्या शेंगा, मोहित्याची मंजुळा, हिरवा चुडा, थांब लक्ष्मी कुंकू लावते, जावई माझा भला, तू तिथे मी आदी ८0पेक्षा जास्त चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. अभिनयाशिवाय कोल्हटकरांनी नाटकांचे दिग्दर्शनही केले. १९६४ सालातले मोहिनी हे त्यांनी दिग्दर्शिलेले पहिले नाटक होते. १९४९ साली जेव्हा त्यांनी पहिल्यांदा भावबंधन केले, तेव्हा लता मंगेशकरही त्या नाटकात होत्या.आगर्‍याहून सुटका, बेबंदशाही, पद्मिनी, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट आदी प्रसिद्ध मराठी नाटकांतून त्यांनी अजरामर भूमिका केल्या. चित्तरंजन कोल्हटकरांच्या ऐतिहासिक नाटकातील भूमिका अतिशय गाजल्या. भावबंधनप्रमाणेच एकच प्याला, स्वामिनी, दुरिताचे तिमिर जावो, गारंबीचा बापू, पंडितराज जगन्नाथ, अर्शूंची झाली फुले इ. नाटकांमधील त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा एक गोष्ट प्रत्यक्षात आणणारा श्रेष्ठ होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) म्यूज ही नदी कोणत्या देशात आहे ?* बेल्जियम *२) गदर पार्टीची स्थापना कधी झाली ?* १९१३ *३) भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला कधी हलवण्यात आली ?* १९१२ *४) लोकसभेच्या अध्यक्षांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?* पाच वर्षांचा *५) एडीबी हे कशाचे संक्षिप्त रूप आहे ?* एशियन डेव्हलपमेंट बँक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  नितीन गुजराथी, धर्माबाद ●  श्रीनिवास नक्का, लातूर ●  गोविंद येळगे, धर्माबाद ●  प्रथमेश मच्छरलावार ●  जय सिंग चौहान ●  कौशल्या कारवेडकर ●  व्यंकी रॉय *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वाभिमान* बड्या घरच्या श्वानाला सर्रास मान असतो काहींचा स्वाभिमान कुठेही गहान असतो स्वाभिमान गहाण ठेवलास माणूस नको तिथे झुकतो गरज नाही त्या ठिकाणीही तो करंकरं वाकतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.* *राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 45* इष्ट मिले अरु मन मिले, मिले सकल रस रीति । कहैं कबीर तहँ जाइये, यह सन्तन की प्रीति ।” अर्थ – संताचे वर्तन कसे असावे? यावर महात्मा कबीर प्रकाश टाकतात. दैवत, उपासना पद्धती , संपूर्ण रीती-रिवाज आणि आपलं स्वतःचं मन जिथ रमतं, आपल्या साधनेला जिथं अनुकूलता लाभेल. अशी ठिकाणं साधूला प्रिय असली पाहिजेत. मनः शांती लाभली की सर्व समस्यांवरचे उपाय सापडत असतात. खरं तर समस्याच मनःशांतीच्या मार्गातल्या गतिरोधक असतात. म्हणून मनाची शांती ढळणार नाही अशा कृती हाती घेतल्या तर समस्यांना थाराच मिळत नाही. मनाच्या एकाग्रतेसाठी तप , चिंतन, मनन आदि साधना सांगितल्या गेल्या आहेत. या साधनांच्या साध्यतेसाठी काहींनी सर्व भौतिक सोयी सुविधा त्यागून निरव एकांतात स्वतःला गुंतवलं. मानवी वसाहती पासूनही स्वतःला अलिप्त करीत संन्यस्त जीवनाचा अंगीकार केला. ही उपासना असो की संन्यास मानवाच्या कल्याणासाठीच अंगीकारले गेले. जगद्गुरू तुकोबाराय संसारी साधू होते. त्यांच्या व इत्तर काही दार्शनिकांच्या दृष्टीने संसार त्यागून जंगलात जावून बसणे म्हणजे संन्यास नव्हे, तर संसारी व भौतिक सुविधांमध्ये वावरूनही, त्यांच्यापासून अलिप्त राहता येणं. मनाच्या ठायी त्यांच्याप्रति मोह न येऊ देणे .म्हणजे संन्यास ! संसारा मध्पे मन व इंद्रिये पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात नाहीत अशांना जंगलातला एकांत हवा असतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वत:चे दु:खही पचवून दुस-यांच्या दु:खात सहभागी होऊन इतरांसोबत आनंदी राहणारे लोक खूप सुखी होतात.दु:ख कुणाचेही कुणी वाटून घेत नाही परंतु दु:खात सहभागी होऊन काही प्रमाणात सुख देता येते अशी विचार करणारी माणसेही या जगात काही कमी नाहीत.संत,सज्जन असणा-याच्या जीवनात थोडे झोकून पाहिले तर त्यांचे जीवनही सर्वसामान्य माणसांच्याहीपेक्षा अधिक अवघड असते पण ते लोकांसमोर कधीही येऊ देत नाहीत.त्यांना असे वाटते की,आपणच जर आपले दुःख लोकांसमोर मांडले तर त्यांना झालेल्या दु:खातून कशी सुटका होईल हा विचार अशी माणसे करतात.इतरांच्या भावनांशी खेळून त्रास देण्यापेक्षा त्यांना त्यातून सुटका करुन आनंद कसा देता येईल याकडे अधिक लक्ष देतात.अशा वृत्तीची माणसे एक समाजासाठी आदर्श मानले जातात.त्यांचे अनुकरण आपणही करावे व इतरांना आनंद देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कसे फुलवता येईल याकडे अधिक लक्ष द्यायला शिकले पाहिजे,ही देखील एक मानवतेची सेवाच होऊ शकेल.यासाठी कसल्याही प्रकारचा भेद न करता मनमोकळेपणाने संवाद साधून सा-यांचे जीवन सुखी व समृद्ध कसे करता येईल यासाठी दु:खीतासमोर जायला शिकले पाहिजे.ही देखील एक आपली सामाजिक बांधिलकी म्हणून कर्तव्य करायला हवे.यातच आपले खरे समाधान आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌷🍂🌷🍂🌷🍂🌷🍂🌷🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मशगुल - Gossip* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवता* जगाच्‍या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्‍या कुटीत ईश्‍वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्‍यांच्‍याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्‍यांच्‍यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्‍यूनंतर ते जेव्‍हा स्‍वर्गात पोहोचले तेव्‍हा त्‍यांना सोन्‍याचा मुकुट घालण्‍यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्‍यांच्‍या डोक्‍यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्‍याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्‍यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्‍वात कोणत्‍याच दृष्‍टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्‍याचा मुकुट व त्‍या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्‍वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्‍यांचे बोलून झाल्‍यावर देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍ही पृथ्‍वीवर हिरे माणके दिलेली नव्‍हती तेव्‍हा तुम्‍हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्‍या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्‍हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्‍हणजे अश्रू होते. जे त्‍यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्‍येक वाईट गोष्‍टीबद्दल त्‍यांना वाईट वाटले व त्‍याबद्दल त्‍यांच्‍या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्‍ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्‍हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्‍वरभक्ती आणि स्‍नेह यातच खूप आनंदी होतो म्‍हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍हाला ईश्‍वराचा स्‍नेह मिळाला म्‍हणूनच तुम्‍हाला ईश्‍वराचा सोन्‍याचा मुकुट देण्‍यात आला आहे.’’संताना स्‍वत:ची चुक समजली. ते स्‍वत:मध्‍येच मशगुल राहिले. त्‍यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही. तात्‍पर्य:-ईश्‍वरभक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच मानवता होय. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment