✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/11/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५६ - कर्नाटक(राजमुद्रा दाखवली आहे), केरळ व आंध्र प्रदेश राज्यांची रचना 💥 जन्म :- १८८८: चित्रकार, नेपथ्यकार, रंगभूमिविषयक ग्रंथांचे  लेखक पुरुषोत्तम श्रीपत काळे १९१८ - शरद तळवलकर, मराठी चित्रपट अभिनेते १९२६: संगीत दिग्दर्शक यशवंत देव १९४५: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर १९७३ - ऐश्वर्या राय, भारतीय अभिनेत्री १९७४ - व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, भारतीय क्रिकेट खेळाडू १९८७ - इलिआना डिक्रुझ, भारतीय अभिनेत्री 💥 मृत्यू :- १७०० - कार्लोस दुसरा, स्पेनचा राजा १८९४ - अलेक्झांडर तिसरा, रशियाचा झार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - राज्य सरकारने 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून 112 तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचेही सरकारने आपल्या परिपत्रकात म्हटले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - 16 ते 26 नोव्हेंबरदरम्यान काढणार मराठा संवाद यात्रा, 26 नोव्हेंबरला अधिवेशनावर देणार धडक, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या बैठकीत निर्णय* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *जागतिक बँकेच्या २०१७ सालच्या ईझ ऑफ डुईंग बिझनेस रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक २३ अंकांनी वधारून ७७ वर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नाशिक : मराठावाड्याला अखेर आज मिळणार पाणी ; नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणातून सकाळी दहा वाजता पाण्याचा होणार विसर्ग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. हेमंत देशमुख यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *फटाके फोडण्यासाठी दक्षिण भारतातील वेळ निश्चित. सकाळी 4 ते 5 व रात्री 9 ते 10 वाजेदरम्यान फटाके फोडता येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/xZN3CdlEtR Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रतिलिपि या वेब पोर्टलवर वाचा "हाताची जादू ओळखणारा शिक्षक" दिवाळी अंकात प्रकाशित कथा https://marathi.pratilipi.com/story/ChAhzBia2opi?utm_source=android&utm_campaign=content_share आपले अभिप्राय जरूर द्यावे. अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नरेंद्र दाभोळकर* नरेंद्र अच्युत दाभोळकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधर्शद्धांच्या निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते. नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण सातार्‍यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या १९८२ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधर्शद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २00६पासून मृत्यूपर्यंत संपादक होते. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या काठी बरीच तीर्थक्षेत्रे आहेत ?*  कृष्णा *२) बेल्जियमची राजधानी कोणती ?* ब्रुसेल्स *३) केरळमध्ये अवकाशयान प्रक्षेपण केंद्र कोठे आहे ?* थुंबा *४) 'फॅमिली लाईफ' या पुस्तकाचे लेखक कोण ?* अखिल शर्मा *५) ओडिशाची उपराजधानी कोणती ?* पुरी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  संजय कांबळे, माहूर ●  प्रशांत सुरवसे ●  संतोष चाटोरीकर, उमरी ●  लक्ष्मीकांत बामणीकर ●  राजेश खरबाळे ●  सूर्यकांत राखोंडे, धर्माबाद ●  ऋषिकेश मंदेवाड ●  राहुल संत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अहंकार* रावणाला सोन्याची लंका पुरली नाही दिग्गज साम्राज्याची वीट उरली नाही वृथा अहंकार झाल्यास काहीच पुरत नसते चालता बोलता माणूस अचानक मरत असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मुंबईतच प्रवास करीत असताना रिक्षा सिग्नलला थांबली. बाजूच्या रिक्षात एक बोकड शांतपणे बसला होता. त्याच्या शेजारचा माणूस निर्विकार होता. 'विश्वासघात' हा असाच शांतपणे बसलेला असतो. समोरच्याला कल्पना नसते, आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे. बोकडाला काय माहीत? आपला कर्दनकाळच आपल्या शेजारी बसला आहे.* *आयुष्यातही अनेकदा असेच घडते. आपल्या आजूबाजूला शांतपणे वावरणारी माणसेच आपल्याला अडचणीत आणत असतात. विश्वासघात, फसवणूक, खोटे बोलणे या सगळ्या गोष्टी अनेकजण सराईतपणे करत असतात. ठेच लागल्यावर आपल्याला कळते, कुणामुळे जखम झाली आहे. राजकारणात, समाजात, व्यक्तिगत आयुष्यातही सर्रासपणे असे घडते. माणूस हतबल होतो, अनेकदा माणसे त्यातून सावरत नाहीत. "अशावेळी शांतपणे आपली मनोवृत्ती स्थिर ठेवणे गरजेचे असतं."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 49* संत ना छाडै संतई, कोटिक मिले असंत । चन्दन विष व्यापत नहीं, लिपटत रहत भुजंग । अर्थ : भला माणूस कधीही आपल्या पदाला व नावाला बट्टा लागू देत नाही. तो सरळ मार्गी असतो. त्याला भलं बुरं कळत असतं ! आपण ज्या पदावर आहोत त्या पदाचा सतत नावलौकिक वाढवण्याची त्याची धडपड असते. जो काही मान सन्मान मिळालाय व जगणंही सुकर व्हायला मदत झालीय ती विद्यमान पदानंच मदत केलीय .याचं स्मरण त्याला सदैव असतं. त्पा पदामुळेच तर आपणास सर्वजण ओळखतात . याचं नित स्मरण करीत हसत मुखानं उल्हसितपणे आपल्या कर्तव्य मार्गावर भला माणूस अग्रेसर असतो. त्याच्या संगतीत वाईट व दुष्ट माणसे आली तरी त्यांच्या सान्निध्याचा तिळमात्र प्रभाव सज्जन स्वतःवर पडू देत नाहीत. संत दुर्जनाला आपल्या संंगतीतून दूर करीत नाहीत तर 'दुर्जनातले दुर्गुण कसे कमी करता येतील ? या विचाराने ते वावरत असतात. सज्जनाचे गुण वैशिष्ट्ये सांगताना महात्मा कबीर म्हणतात की, खरे संत कितीही अडचणीत जगतील परंतु ते संत पदाला साजेसंच वागतील . त्याला कधीही बदनाम होवू देणार नाहीत. जसे चंदन वृक्षाच्पा शितल छायेमुळे व त्याच्या सुगंधित संगतीमुळं पक्षी, फुलपाखरे चंदनाच्या झाडावर बसतात तसे विषधारी सापही चंदनाला विळखा घालून बसतात. चंदन त्यांना दूर सारत नाही तर काही काळ का होईना, त्यांना आपल्या सुगंधी जगण्यानं मुग्ध करून त्यांच्यातला विषारीपणा विसरायला लावतो. संतांचही जगणं चंदणासारखंच असतं . त्यांचे ठायी कधीही आप परभाव उत्पन्न होऊ देत नाहीत. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या ठिकाणी प्रेम,आपुलकी, जिव्हाळा,मोठ्यांचा आदर, एकोपा, एकमेकांचे सुखदुःखाचे भागीदार, प्रामाणिकपणा, अतिथींचे स्वागत, घरातील स्त्रियांना दिले जाणारे प्रेम आणि तिच्या भावना ओळखून तिला दिला जाणारा आदर, शांती, समाधान, ईश्वराप्रती श्रद्धा, आरोग्यसंपन्न जीवन आणि त्याला हवी असणारी स्वच्छता ह्या सा-या गोष्टींचा जिथे समावेश आहे तिथल्या वास्तूला ख-या घराची उपमा दिली जाते.अशा ठिकाणालाच खरे घर म्हणून समजले जाते आणि अशाच घरात सदैव शांती, समाधान आणि ऐश्वर्य नांदत असते. जेथे अशा गोष्टींचा अभाव असेल, केवळ चार भिंती आहेत,वर छत आहे पण समाधान नाही, शांती नाही, सदैव कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद होत राहतात, एकमेकांमध्ये ऐक्याची भावना नाही,एकत्र असून अबोला असतो अशा विसंगत असलेल्या वातावरणाला घर म्हणता येत नाही. म्हणून खरेच घर म्हणायचे असेल किंवा बनवायचे असेल तर ह्या वरील सर्व गोष्टींना घरातल्या प्रत्येक सदस्याने प्रयत्न करायलाच हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद....९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏠🏘🏡🏠🏘🏡🏠🏘🏡🏠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अडचण - difficulty* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरी आई कि खोटी आई* एका आठ वर्षाच्‍या मुलाची आई देवाघरी जाते. मुलाच्‍या संगोपनात काही अडचण येऊ नये म्‍हणून वडील दुसरे लग्‍न करून त्‍या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात. एक महिन्‍यानंतर वडील मुलाला विचारतात,''बेटा, तुला ही नवीन आई कशी काय वाटते?तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे?'' यावर मुलगा उत्तर देतो,'' बाबा, ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती.'' हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील संभ्रमात पडतात. त्‍यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे? म्‍हणून पुन्‍हा त्‍या मुलाला विचारतात,'' अरे तुला असे का वाटते ते मला सांग? जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले, प्रसुतीवेदना सहन करून जन्‍म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते?'' मुलगा म्‍हणतो,'' बाबा, मी खूप खोडकर आहे हे तुम्‍हाला माहितीच आहे. देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असे म्‍हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे. पण ती मात्र मला जेवण देण्‍यासाठी उन्‍हातान्‍हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळप्रसंगी रागवून, मारून घरी आणत असे व मला स्‍वत:च्‍या मांडीवर बसवून खाऊपिऊ घालत असे आणि ही नवीन आईही पण '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असेच म्‍हणते आणि खरं सांगू का बाबा तुम्‍हाला? गेल्‍या तीन दिवसात खरेच तिने मला खायला दिलेले नाही. म्‍हणूनच मी तिला खरी आई असे म्‍हणत आहे.'' तात्‍पर्य :- आपली आई ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment