✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/10/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८७१ : ब्रिटिश सरकारने भारतात क्रिमिनल ट्राइब्स अँक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती आणि जमातींना गुन्हेगारी जमाती ठरवलं. हा कायदा १९४९ मध्ये रद्द केला गेला. २0१३ : ओडिशाच्या किनारपट्टीला 'फायलिन' चक्रीवादळाचा तडाखा. सात जणांचा बळी 💥 जन्म :- १९०९ - विनायक कृष्ण (व्ही.के.) गोकाक, कानडीभाषेतील लेखक 💥 मृत्यू :- १९६७ : थोर नेते राम मनोहर लोहिया *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आंतरजिल्हा बदलीमुळे राज्यभरातील त्रस्त शिक्षकाना नव्या निर्णयाचा दिलासा; आवडीच्या जिल्ह्यात राहण्याची संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गाड्यांचा इन्शुरन्स महागला, कार खरेदी करणाऱ्यांना मोजावे लागणार आता दुप्पट पैसे  तर दुचाकी नवीन घेणा-यांना मोटारसायकलच्या किमतीच्या 10 टक्के विम्याचे पैसे भरावे लागणार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *श्रीनगर - ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. करण सिंह यांचे पुत्र आणि पीडीपीचे नेते विक्रमादित्य सिंह यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांची माहिती.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ब्राह्मोसची माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या निशांत अग्रवालला 7 दिवसांची पोलीस कोठडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *हरिद्वार- पर्यावरणवादी गंगाप्रसाद जी अग्रवाल यांचं निधन, गंगा प्रदूषणाविरोधात 111 दिवस बसले होते उपोषणाला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *रोहित शर्माकडून कर्णधारपदाची धुरा आता पुन्हा विराट कोहलीकडे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~*~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. https://sharechat.com/post/zWj7G4M Follow me on Share Chat ~~~~~~~~~~*~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राम मनोहर लोहिया* समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांचा जन्म २३ मार्च १९१0 रोजी उत्तरप्रदेशातील अकबरपूर येथे झाला. अडीच वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचे वडील महात्मा गांधींचे अनुयायी होते. मुंबईच्या मारवाई शाळेत त्यांचे शिक्षण झाले. १९२0 मध्ये त्यांनी लोकमान्य टिळकांच्या निधनाच्या दिवशी विद्यार्थ्यांसोबत पहिल्यांदा आंदोलन केले. गांधींच्या आवाहनानुसार त्यांनी दहा वर्षांचे असताना शाळा सोडून दिली. १९२१ मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांची भेट जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत झाली. १९२४ मध्ये ते प्रतिनिधी म्हणून काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झालेत. १९२५ मध्ये त्यांनी दहावीची परीक्षा दिली यात त्यांनी ६१ टक्के गुण मिळवले. यानंतर वाराणशीच्या काशी विद्यापीठात शिकायला गेले. पुढे कोलकाता येथे शिक्षण घेतले. अखिल बंग विद्यार्थी संमेलनात नेताजी सुभाषचंद्र बोस न पोहोचल्यामुळे त्यांच्याकडे संमेलनाचे अध्यक्षपद देण्यात आले. १९२८ मध्ये ते काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झाले. नंतर ते विद्यार्थी संघटनेत सक्रीय झाले. सायमन कमिशन विरोधातील आंदोलनात त्यांनी भाग घेतला. पुढे १९३0मध्ये अग्रवाल समाजाच्या मदतीने शिक्षणासाठी इंग्लंडला व बर्लिनला गेले. भगत सिंग यांना फाशी देण्याचा त्यांनी लीग आँफ नेशन्सच्या बैठकीत निषेध केला.१७ मे१९३४ रोजी त्यांनी समाजवादी पार्टीच्या स्थापनेचा निर्णय घेतला. २२ आँक्टोबर १९३४ रोजी मुंबईत काँग्रेस सोशलिस्ट पक्षाची स्थापना केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माणसे जन्मतात आणि मरतात, पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) सिंगापूरच्या विमान वाहतुकीचे नाव काय ?* सिंगापूर एअरलाईन्स *२) राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्य नेमू शकतात ?* १२ *३) इराणमधील सर्वात मोठे सरोवर कोणते ?* उर्मिया *४) कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हजर होते ?* दुसऱ्या *५) कोणत्या देशात भारतीयांची लोकसंख्या अधिक आहे ?* मॉरिशस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अमित शिंदे ●  संपन्न कुलकर्णी ●  जगन कुलवंत ●  सायारेड्डी जरावाड ●  अशोक हाके ●  बालाजी सातपुते ●  संतोष शाटलवार ● माधवराव धुप्पे ●  दीपक वाघमारे ● प्रभू पाटील कदम *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोकं* सांगायला गेल की लोकं टांगायला जातात एकत्र करायला गेल की ते पांगायला जातात खरं खोटं काय ते विचार करून ऐकाव खरा विचार करतात त्यांनी कशाला भैकाव शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   ••• ●‼ *विचार धन* ‼● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घटस्थापना होऊन नवरात्रौत्सवाला काल प्रारंभ झाला. नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा केली जाईल. घटामध्ये माती घालून त्यात बी रूजत घातलं जातं. देवीसमोर अखंड दीप लावला जातो. देवीपुढे क्रमाक्रमाने वाढत जाणा-या फुलांच्या माळा बांधल्या जातात, आरत्या म्हटल्या जातात. दिवसभर देवी भागवत, श्रीदुर्गासप्तशतीची पारायणं केली जातात. 'जय आंबे माता' असा मोठ्या आवाजात पुकारा केला जातो. रात्री रस्त्यावर मंडप घालून जागोजागी दांडिया खेळला जातो. देवीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात रोषणाई केली जाते.* *नवरात्रीचे नऊ दिवस संपून जातील. मंदिरातल्या किंवा देवघरातल्या देवीचा उत्सव वर्षानुवर्षे साजरे केले जातात, पण मनात प्रश्न येतो तो घराघरात वावरणा-या देवीचं काय? माता, भगिनी, कन्या, सून, नात या रूपात वावरणा-या देवीचा प्रश्न कधी सुटणार? मंदिरात पूजा आरती करणारे देवीभक्त घरातील देवीकडे कधी लक्ष देणार? प्रत्यक्ष देवाने स्त्री-पुरूष असा भेदभाव कधीही केला नव्हता. प्राचीन काळी पुरूषांनी प्रथम देवीचीच मंदिरं उभारली, मग मध्यंतरीच्या काळात असं काय घडलं ?* *मध्यंतरी वाचलेली एक गोष्ट मला आठवते. एकदा प्रत्यक्ष देव आणि पृथ्वीवरचा माणूस यांची अकस्मात भेट झाली. गंमत म्हणजे लगेचच दोघांनीही एकमेकांशी बोलताना पहिलं वाक्य उच्चारलं, 'माझी निर्मिती केल्याबद्दल तुझे मन:पूर्वक आभार !' "खरोखरच प्रथम कोणी कोणाची निर्मिती केली? देवाने माणसाची की माणसाने देवाची ?"* • • ● ‼ *रामकृष्णहरी* ‼● • • 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 37* *आंखि ना देखे बापरा,* *शब्द सुनै नहि कान* *सिर के केश उजल भये,* *आबहु निपत अजान।* अर्थ विधात्याने डोळे दिलेले असले तरी कोणत्याही बाबीला लक्षपूर्वक पाहात नाही. कान दिलेले असून सुनबहिरेपणा करीत असतो. आपूलकीने दिलेला कोणताही उपदेश किवा सल्ला लक्षपूर्वक ऐकत नाही. डोईचे केस काळ्याचे पांढरे होऊन पिकून गेले आहेत. तरी विचारपूर्वक कोणतीही गोष्ट केलेली नाही. त्यामुळे विवेकीपणा त्याच्या अंगी असण्याची सुतराम शक्यता नाही. केवळ वयाने नुसतेच ताड-माड वाढून चालत नाही. तर अनुभवाने अंगी समृद्धपणा व परिपूर्णता यायला हवी. निसर्गाविष्कार खूपच मजेदार असतात. त्यामागील कार्यकारणभाव समजून घ्यायला हवे आहेत. बरेच जण या बाबी समजूनच घेत नाहीत. कानोकानी व सांगासांगीवरच विश्वास करून सत्य काय ते जाणूनच घेत नाहीत. अशी मुर्ख माणसेच धूर्त , स्वार्थी व लुटारूंचे कळसुत्री बाहुले बणतात. अंधश्रद्धा व अंधरूढींचे गाढव ओझे ते बिन तक्रार वाहून नेत असतात. अशा माणसांमुळेच समाजातल्या अंधश्रद्धा व वाईट रिवाज विज्ञानयुगातही अबाधित जपल्या जात आहेत. आजही अज्ञानामुळे किंबहुना अर्धशिक्षीतपणामुळेच माणसाची फसगत होत असते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात कोणताही जीव जन्माला आला की, त्याचा जीवनप्रवास ख-या अर्थाने सुरू होतो. त्याला त्याचे जीवन कसे जगायचे यासाठी परमेश्वराने त्यांच्यासोबत मन आणि बुद्धी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याला म्हणजे विशेष करुन मानवाला आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी भेट म्हणून बहाल केली आहे. ह्याचा आधार घेऊनच जीवन कसे जगायचे याचे तंत्र तो शिकतो. त्यानंतर तो आपल्या मनाचा आणि बुध्दीचा चांगला सदुपयोग केला तर नक्कीच जीवनाचा प्रवास सुखावह करतो आणि जर का दुरुपयोग करायला लागला तर जीवनप्रवास दु:खमय व्हायला लागतो. ह्या दोन गोष्टी मन आणि बुद्धी यावरच अवलंबून आहेत. मग मानवरुपी जीवाने आपले जीवन कसे जगायचे आणि आपले जीवन जगण्यासोबत इतर जीवांना आपण न दुखवता कसे जगवायचे हे जरी कौशल्य मनाच्या आणि बुध्दीच्या सृजनशील कौशल्याने हाताळायला आले तरी परमेश्वराने दिलेल्या जन्माचे नक्कीच सार्थक झाल्याचे समाधान वाटेल. हा जन्म परत येणार नाही हे तर माहीत आहेच. यानंतर आपले शरीररुपी अस्तित्व संपणार आहे पण आपण आपल्या जीवनात केलेले चांगले कार्य येणा-या जीवांच्या जीवनासाठी प्रेरणा ठेवून जाणार आहे अर्थात तुम्ही तुमच्या कार्याने अमर राहणार आहेत हे लक्षात असू द्यावे *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विश्वास - Believe* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समजून घेऊन वागणे* एक शिकारी एकदा शिकार करण्यासाठी रानात गेला. त्याने बरेच कुत्रे स्वतःबरोबर घेतले होते. परंतु ते आपल्या मर्जीप्रमाणे इकडेतिकडे पळू नयेत म्हणून त्याने दोन दोन कुत्रे जोडीने एका साखळीने बांधले. त्यांपैकी वाघ्या व पाग्या या नावाच्या दोन कुत्र्यांची एक जोडी होती. ते एकमेकांवर प्रेम करीत असत. ते नेहमी बरोबर खात-पित, नेहमी एकत्र खेळत असत. तेव्हा ते चांगले काम करतील असे त्या शिकार्‍याला वाटले. पण थोड्या वेळाने पाहतो तर वाघ्या पुढे ओढ घेत असता पाग्या मागे राहू लागला व पाग्याने एका दिशेने ओढ घेतली की वाघ्याने उलट दिशेने घ्यावी असे होऊ लागले. शेवटी दोघेही एकमेकांचे लचके तोडण्याच्या बेतात आले. ते पाहून एक म्हातारा कुत्रा त्यांना म्हणाला, 'मूर्खांनो, तुम्ही दोघांनी थोडी पड घेतली तर भांडणाची वेळ का येईल ? मी आणि माझा सोबती नेहमी एकमेकांच्या मर्जीप्रमाणे वागत असूं, त्यामुळे आमच्यावर कधीही भांडण्याचा प्रसंग आला नाही.' तात्पर्य - एकत्र राहावयाचे असेल तर सर्वांनी एकमेकांना समजून घ्यावे लागते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment