बालगीत




➖➖➖➖➖➖➖➖➖➖
           🎀  *बालगीत*🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰 🌴उंच उंच झाड तुला नाक डोळं हाय
शेंडीवाल्या फळा तुझं नाव सांग रं काय ||धृ||
      🌴आकार तुझा चेंडूवानी
          चटया दो-या विणती कोणी
पाय पुसण्यावरी तुझ्या देतील कुणी रे पाय ||१||
      🌴लग्न मुंज सणावारी
          दिसशी तु घरोघरी
मंदी मंदी काम तुझं काय रं सांग रं हाय ||२||
      🌴बर्फीची ती चव न्यारी
          काप ज्याची त्याच्यावरी
चिवड्यामंदी काप तुझा लाल लाल हाय ||३||
      🌴मंदी रंग चुन्यावाणी
          आत गोड गोड पाणी
तुला बघुनी समदी पोरं करता खाय खाय ||४||
     🌴नाव तु जरी न सांगशी
          शेंडी धरूनी आपटीन
फजीती होईल देवापुढं रडशील धाय धाय
शेंडीवाल्या फळा तुझं नाव सांग रं काय ||५||

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    

वेतन आयोगाची स्थापना ः

⛳वेतन आयोग कशासाठी.
वाढती महागाई, कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी,निव्रुत्तीनंतरचे लाभ आणि  अन्य लाभांचा विचार करण्यासाठी वेतन आयोगाची स्थापना करण्यात येते.⛳
👉पहिला वेतन आयोग ;-जानेवारी १९४६.
अहवाल :-मे १९४७.
👉दुसरा वेतन आयोग :-आँगस्ट १९५७.
अहवाल:-१९५९ मध्ये अहवाल.
👉तिसरा वेतन आयोग :-एप्रिल १९७०.
अहवाल :-मार्च १९७३.
👉चौथा वेतन आयोग :-जून१९८३
अहवाल :-सन १९८७.
👉पाचवा वेतन आयोग :-९ एप्रिल १९९४.
अहवाल :-१९९७.
👉सहावा वेतन आयोग :-आँक्टोबर २००६.
अहवाल :- मार्च २००८.
👉सातवा वेतन आयोग :-जुलै २०१६.
अहवाल :- सन २०१४.
👉ही आजवरच्या वेतन आयोगाने गेल्या ७० वर्षात सुचविलेली सर्वात कमी वेतनवाढ.
👉पाचवा वेतन आयोग :-४०% वाढ.
👉सहावा वेतन आयोग :-५२ % वाढ.
👉सातवा वेतन आयोग :-२३% वाढ.

देव

देव..!
------
तू 'राम' म्हण, 'अल्ला' म्हण
'येशू' म्हण, 'साई' म्हण
'देव' म्हण, 'Devi ' म्हण
'अवतार' म्हण, 'काही' म्हण

मी हरकत घेण्याचंही
कारण नाही काही..
पण माणूस म्हणून एक गोष्ट
खरंच पटत नाही !

तू हवी त्याची पूजा कर
हवी त्याची आरती गा
मॅगी, पिझ्झा, चिकन, मटन
प्रसाद म्हणून काही खा !

चोविस तास देव देव कर
वाटल्यास विसर घर
पण माझ्यासाठी दोस्ता फक्त
एवढा विचार कर !

देव म्हणजे सुपर पाॅवर
ब्रम्हांडावर ताबा
मग त्याचं ऑफिस गल्लीबोळात
कशाला रे बाबा ?

ऐकलं होतं.. देव असतो
उभा सत्त्यापाठी !
तरी त्याच्या अवती भवती
दलालांची दाटी ?

चोर, डाकू, बलात्कारी
सारेच त्याचे भक्त
देव काय नुसते चेहरे
बघत बसतो फक्त ?

असा कसा चिडत नाही
त्याला नाही भान ?
वरून तुझ्यासारखे मूर्ख
तिथंच देतात दान !

देवळा भवती भिकारी
लुळे पांगळे जीव
ज्याला असेल काळीज त्याला
पाहून येते कीव !

प्रश्न त्यांचे सुटत नाहीत
दुःख सरत नाही
तरी तुझा सुपर देव
काहीच करत नाही !

म्हणून म्हणतो डोकं वापर
गहाण नको ठेऊ
भुकेल्याला, तहानल्याला
घाल कधी  !

अनाथ, कोवळ्या हातामधे
पाटी-पुस्तक ठेव
आई शप्पथ तुला सांगतो
तूच होशील देव !

-------
कविता माझी नाही पण विचार करायला लावणारी आहे.

महीला गीत (लेक वाचवा)

भारतात आपल्या किती भारी दिवस आलेत आज,
चार ही दिशात आहे सशक्त महिलाराज ।।

तिन महिलांची जोडी लष्करात वैमानिक झाली,
पहिल्यांदाच नोटे वर महिलेची स्वाक्षरी आली।।

एकीकडे मेहबूबा आहे,
दूसरी कड़े ममता आहे,
गुजरातेत असे आनंदीबेन
जयललिता मागे जनता आहे ।।

सौंदर्यवतीत प्रियांका पुढे,
गायनात लतेला कुणाचे आव्हान आहे ?,
अन जिने महाराष्ट्र दणाणला,
येथे 'आर्ची' इतका कुणाला मान आहे ?

कल्पनाने सुनिताने अवघे अवकाश कवेत घेतले,
जमिनिवरही तीच ती,
महिलेनेच उड्डाण हवेत घेतल े।।

IAS मधे ती पहिली 10 वित व 12 वि तही
तीचाच पहिला नंबर,

शेतकरी पती करतो आत्महत्या,
तीच सांभाळते घर कसून कंबर।।

*एवढे सिद्ध करुन ही शेवटी शोकांतिक,*

*तुम्ही भ्रूणहत्या मुलींची का करावी ?*

*ती जिंकतेच् जन्मल्यावर सदा,*

*फ़क्त पोटातील लढाई तिने का हरावी ?*

*फ़क्त पोटातील लढाई तिने का हरावी ?*

फुलं काय म्हणतात

🌸सदाफुली सांगते रुसुन रुसुन रहायच नसतं.... हसून हसून जगायच असत. 🍁रातराणी सांगते अंधाराला घाबरायच नसतं... काळोखात ही फुलायच असत. 🌹गुलाब सांगतो येता जाता रडायच नसतं.... काट्यात सुद्धा हसायच असत. 🌼बकुळि म्हणते सावळ्या रंगाने हिरमुसायच नसतं.... गुणाच्या गंधाने जिंकायच असत.
🌷कमळ म्हणते संकटाच्या चिखलात बुडायच नसतं.... संकटाना बुडवून फुलायच असत. 🌾🍃🍂🌾🍃🍂🌾
... शुभ दिवस…
आपला दिवस आनंदात जावो. आणि मन प्रसन्न राहो

औषध वनस्पती ( कढीपत्ता)

कढीपत्ता : भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्ता हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून ते एक सुंदर आणि साधे औषध आहे ...पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले त्यांच्या अज्ञानाची भयंकर कीव येते ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याचे झाड बर्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते .. जंगलातला कढीपत्ता जास्त गडद रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो ...त्याला बर्याचदा बिया लागलेल्या सापडतात या बिया गोळा करून अंगणात लावल्या कि फार चांगल्या पद्धतीने रुजतात ....आणि झाड मोठे झाले कि त्याच्या बिया आजूबाजूला पडून नित्यनेमाने कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात .....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याचे आहार आणि औषध अशा अनुषंगाने उपयोग पाहूया :🐚🐋🌾
१) कढीपत्ता आपण आहारात एक विशिष्ट सुंगंधी चव यावी यासाठी वापरतो ... प्रत्यक्षात कढीपत्त्या मध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते ... त्यामुळे जेवण रुचकर लागते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
२) जुलाब लागले असता कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप पिला कि पोटातल्या वेदना आणि जुलाबाचे वेग वेगाने नियंत्रणात येतात ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
३) कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो ज्यांना अजीरणाचा सारखा त्रास होतो , जेवल्यावर अस्वस्थ वाटते , पोटात ग्यास पकडतो ....त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे .... नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
५) मधुमेही रुग्णांनी कढी पत्त्याची दहा बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहायला फार मदत होते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
७) कोलेस्टेरॉल वाढले असेल कढीपत्त्याची अनशापोटी वीस पाने चावून खावीत ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत ...केस पांढरे होत नाहीत ...शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
९) कर्करोगाने पिडीत रुग्ण केमो आणि रेडियो थेरपी घेत असताना त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवर सुद्धा फार घातक परीणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते .... अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखर सोबत चावून खायला लावावीत ... रुग्णाला बराच आराम मिळतो
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१०) सर्दी खोकल्या सारखे आजार सारखे होत असतील तर अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे अमृत आहे ... कोणत्याही प्रकारच्या काविळीत कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर कढीपत्त्याची पोटातून कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर मिरी, आले आणि सैंधव मिसळून कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावे याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर डोळ्यांचे विकार कमी होतात ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे ... असा हा बहुगुणी आणि आरोग्यसंपन्न कढीपत्ता आहारात नियमित ठेवा ... कच्चा चावून खा .... आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही.


हसत खेळत गणितीय शिक्षण

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


💝 गणित रोमन अंक 💘
Roman Numerals
Roman numerals List
Number Roman numeral
0 not defined
1 I
2 II
3 III
4 IV
5 V
6 VI
7 VII
8 VIII
9 IX
10 X
11 XI
12 XII
13 XIII
14 XIV
15 XV
16 XVI
17 XVII
18 XVIII
19 XIX
20 XX
21 XXI
22 XXII
23 XXIII
24 XXIV
25 XXV
26 XXVI
27 XXVII
28 XXVIII
29 XXIX
30 XXX
31 XXXI
32 XXXII
33 XXXIII
34 XXXIV
35 XXXV
36 XXXVI
37 XXXVII
38 XXXVIII
39 XXXIX
40 XL
41 XLI
42 XLII
43 XLIII
44 XLIV
45 XLV
46 XLVI
47 XLVII
48 XLVIII
49 XLIX
50 L
51 LI
52 LII
53 LIII
54 LIV
55 LV
56 LVI
57 LVII
58 LVIII
59 LIX
60 LX
61 LXI
62 LXII
63 LXIII
64 LXIV
65 LXV
66 LXVI
67 LXVII
68 LXVIII
69 LXIX
70 LXX
71 LXXI
72 LXXII
73 LXXIII
74 LXXIV
75 LXXV
76 LXXVI
77 LXXVII
78 LXXVIII
79 LXXIX
80 LXXX
81 LXXXI
82 LXXXII
83 LXXXIII
84 LXXXIV
85 LXXXV
86 LXXXVI
87 LXXXVII
88 LXXXVIII
89 LXXXIX
90 XC
91 XCI
92 XCII
93 XCIII
94 XCIV
95 XCV
96 XCVI
97 XCVII
98 XCVIII
99 XCIX
100 C
200 CC
300 CCC
400 CD
500 D
600 DC
700 DCC
800 DCCC
900 CM
1000 M
5000 V
10000 X
50000 L
100000 C
500000 D
1000000 M
Years in roman numerals
Year Roman numeral
1000 M
1100 MC
1200 MCC
1300 MCCC
1400 MCD
1500 MD
1600 MDC
1700 MDCC
1800 MDCCC
1900 MCM
1990 MCMXC
1991 MCMXCI
1992 MCMXCII
1993 MCMXCIII
1994 MCMXCIV
1995 MCMXCV
1996 MCMXCVI
1997 MCMXCVII
1998 MCMXCVIII
1999 MCMXCIX
2000 MM
2001 MMI
2002 MMII
2003 MMIII
2004 MMIV
2005 MMV
2006 MMVI
2007 MMVII
2008 MMVIII
2009 MMIX
2010 MMX
2011 MMXI
2012 MMXII
2013 MMXIII
2014 MMXIV
2015 MMXV
2016 MMXVI
2017 MMXVII
2018 MMXVIII
2019 MMXIX
2020 MMXX

🎯 हसत खेळत गणितीय शिक्षण            
      💎💎💎💎💎💎💎      
                   
(१)    १  मिनिट = ६० सेकंद .
(२)    १  तास = ६० मिनिटे .
(३)    २४ तास  = १ दिवस .
(४)    पाव तास =१५ मिनिटे.
(५)    अर्धा तास =३० मिनिटे.
(६)     पाऊण तास= ४५ मिनिटे .
(७)     ७ दिवस = १ आठवडा.
(८)     ३० दिवस = १ महिना.
(९)     ३६५ दिवस =१ वर्ष .
(१०)   १० वर्ष = १ दशक .
(११)   अर्धा वर्ष = ६ महिने .
(१२)   पाव वर्षे = ३ महिने .
(१३)    १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात.
(१४)    २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात .
(१५)    एकशे =१००
(१६)    अर्धाशे =५०
(१७)    पावशे =२५
(१८)    पाऊणशे =७५
(१९)    सव्वाशे =१२५
(२०)    दीडशे = १५०
(२१)    अडीचशे =२५०
(२२)    साडेतीनशे =३५०
(२३)    १डझन=  १२ वस्तू
(२४)    अर्धा डझन =६ वस्तू  .
(२५)    पाव डझन=३ वस्तू
(२६)    पाऊण डझन=९ वस्तू
(२७)    २४ कागद = १ दस्ता
(२८)    २० दस्ते=१ रीम
(२९)    ४८० कागद = १  रीम
(३०)   १ गुंठे=  १०८९ चौ .मी
(३१)    १ हेक्टर =१०० आर
३२ )    १एकर= ४००० चौ .मी
(३३)   १मीटर= १०० सेंटिमीटर
(३४)    अर्धा  मीटर= ५० सेंटिमीटर
(३५)    पाव मीटर = २५ सेंटिमीटर
(३६)    पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर
(३७)   १ लीटर = १००० मिलिलीटर
(३८)   अर्धा  लीटर= ५०० मिलिलीटर
(३९)    पाव लीटर = २५० मिलिलीटर
(४०)    पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
(४१)    १ किलोग्रॅम = १०००  ग्रॅम
(४२)    अर्धा  किलोग्रॅम=५०० ग्रँम
(४३)    पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम
(४४)    पाऊण किलोग्रॅम = 750 ग्रँम
(४५)    १ किलोमीटर = १००० मीटर
(४६)    अर्धा  किलोमीटर  =५०० मीटर
(४७)    पाव  किलोमीटर =२५० मीटर
(४८)    पाऊण किलोमीटर =७५० मीटर
(४९)   १हजार=१०००
(५०)   अर्धा  हजार =५००
(५१)   पाव हजार =२५०
(५२)   पाऊण हजार  =७५०
(५३)   १२ इंच =१ फूट
(५४)   ३ फूट =१ यार्ड
(५५)   १ मैल =५२८० फूट
(५६)   १ क्विंटल =१००किलोग्रॅम
(५७)   अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम
(५८)   पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम
(५९)   पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम
(६0)   १ टन= १० क्विंटल
शिक्षक मित्र समूह ✒

🎯वर्तुळ -

त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.

वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्‍या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात.

वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो.

जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.

व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.

वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो.

वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो.

वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D

अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7

अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36

वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)

वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22  

वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30

अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2

अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36

दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर.

दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते.

वर्तुळाचे क्षेत्रफळ व परीघ -


घनफळ -

इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)

काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची

गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)

गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2    

घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3

घनचितीची बाजू = ∛घनफळ

घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते.

घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2

वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h

वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2

वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h

इतर भौमितिक सूत्रे -

समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची

समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार

सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2

वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2

वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr

घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2

दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh

अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2

अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3

त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )

शंकूचे घनफळ = 1/3 πr3h

समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2

दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h)

अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2

(S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)

वक्रपृष्ठ = πrl

शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी

बहुभुजाकृती -

n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज (2n-4) काटकोन असते, म्हणजेच 180(n-2)0 किंवा [90×(2n-4)]0 असते.

सुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात.

बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची 3600 म्हणजेच 4 काटकोन असते.

n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बहयकोनाचे माप हे 3600/n असते.

सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = 3600/बाहयकोनाचे माप

बहुभुजाकृतीच्या कर्णाची एकूण संख्या = n(n-3)/2

उदा. सुसम षटकोनाचे एकूण कर्ण = 6(6-3)/2 = 6×3/2 = 9

तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर -

1 तास = 60 मिनिटे    

0.1 तास = 6 मिनिटे  

0.01 तास = 0.6 मिनिटे

1 तास = 3600 सेकंद    

0.01 तास = 36 सेकंद  

1 मिनिट = 60 सेकंद    

0.1 मिनिट = 6 सेकंद

1 दिवस = 24 तास

              = 24 × 60

              =1440 मिनिटे

              = 1440 × 60

              = 86400 सेकंद

घडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर -

घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते.

दर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो.

दर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो.

तास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेच मिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात.

 दशमान परिमाणे -

विविध परिमाणांत एकमेकांचे रूपांतर करताना खालील तक्ता लक्षात ठेवा.

100 कि.ग्रॅ. = 1 क्विंटल

10 क्विंटल = 1 टन
   1 टन = 1000 कि.ग्रॅ.

1000 घनसेंमी = 1 लिटर

1 क्युसेक=1000घन लि.  

12 वस्तू = 1 डझन
   12 डझन = 1 ग्रोस  
     24 कागद = 1 दस्ता

20 दस्ते = 1 रीम  
 1 रीम = 480 कागद.

विविध परिमाणे व त्यांचा परस्पर संबंध -

अ) अंतर –

1 इंच = 25.4 मि.मि. = 2.54 से.मी.

1 से.मी. = 0.394 इंच

1 फुट = 30.5 सेमी.

1 मी = 3.25 फुट

1 यार्ड = 0.194 मी.
           1 मी = 1.09 यार्ड

ब) क्षेत्रफळ -  

1 स्व्के. इंच = 6.45 सेमी 2

1 सेमी 2 = 0.155 इंच 2

1 एकर = 0.405 हेक्टर

1 हेक्टर = 2.47 एकर = 100 आर/गुंठे

1 स्व्के. मैल = 2.59 कि.मी. 2

1 एकर फुट = 1230 मी. 3 = 1.23 मैल

1 कि.मी. 2 = 0.386 स्व्के.मैल1 गॅलन = 4.55 लिटर

क) शक्ती -  

1 एच.पी. = 0.746 किलो वॅट

1 किलो वॅट = 1.34 एच.पी.

ड) घनफळ -    1(इंच) 3 = 16.4 सेमी. 2

1 (सेमी) 3 = 0.610 (इंच) 3

क्युबिक फुट (1 फुट) 3 = 0.283 मी. 3

1 मी 3 = 35 फुट 3

1 यार्ड 3 = 0.765 मी. 3

इ) वजन -  

1 ग्रॅम = 0.0353 औंस (Oz) 0

1 पौंड (lb) = 454 ग्रॅम

1 कि.ग्रॅ. = 2.0 पौंड (lb)

वय व संख्या -

दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + दोन संख्यातील फरक) ÷ 2

लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2

वय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो.

दिनदर्शिका –

एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस

महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात.

टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात.



नाणी -

एकूण नाणी = एकूण रक्कम × 100 / दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज

एकूण नोटा = पुडक्यातील शेवटच्या नोटचा क्रमांक – पहिल्या नोटेचा क्रमांक + 1

पदावली -

पदावली सोडविताना कंस, चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी (÷, ×, +, -)
💐💐💐💐💐💐💐💐💐

वृक्ष प्रतिज्ञा

.
            *वृक्ष प्रतिज्ञा*

        भारत माझा देश आहे.
        वृक्ष माझे बांधव आहेत.
त्या कोटी कोटी वृक्षांवर माझे प्रेम आहे.

      या सृष्टीतील विविध वृक्षांचा मला अभिमान आहे. 🌿🌱🌴🌳🌲🎄🌾या वृक्षांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून...

           *"१जुलै,२०१६रोजी"*

*मी* माझ्या अंगणात, मोकळ्या जागेत, शाळेच्या आवारात, रस्त्याच्या कडेला, गायरानात, गावठाणात...
*वृक्ष लागवड* 🌳करील आणि त्या प्रत्येक वृक्षाचे *संरक्षण* करील.

   मी व माझे वृक्षप्रेमी बांधव यांच्या सहकार्याने राज्यामध्ये *२कोटी वृक्ष लागवड* कार्यक्रम यशस्वी करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.

    वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन यातच माझे *हित* सामावले आहे.


☝ *एकच लक्ष-२ कोटी वृक्ष*

ज्ञानदाता शिक्षक

।।ज्ञानदाता शिक्षक।।

घराघरात ज्याचा संपर्क असतो
त्याला शिक्षक म्हणतात,
काळ ज्याला थांबवू शकत नाही त्याला ज्ञानदाता म्हणतात.||१||

रस्त्यावर ज्याचा विद्यार्थी चरणस्पर्श करतात तो शिक्षक,
देऊन आयुष्याची शिदोरी बनतो पिढयांच्या भविष्याचा रक्षक.||२||

'पगारात भागवा' अभियान त्याच्यासाठी राबवावे लागत नाही,
आयुष्यात रंग भरताना मुलांच्या  कडे दुसर काही कधी मागत नाही||३||

पगार सोडून इतर काहीच त्याला कधी मिळत नाही ,
काम करताना शाळेत कधी चिरीमिरी लागत नाही||४||

आयुष्य घडवताना कोणत्या शिक्षकाने करोडोचा घोटाळा केला नाही,
पाहून वाहता झरा 'हपापाचा माल गपापा'कधीच केला नाही||५||

कोणत्याही कार्यालयात गेल्यावर शिपायाला 'साहेब' म्हणणारा शिक्षक असतो,
काेणाचीही गुरगुर गुमान ऐकून घेणारा शिक्षक असतो||६||

शिपाई,क्लार्क,आचारी,गवंडी आणि  बरीच कामे करणारा शिक्षक ऑल- इन- वन,
एवढ करून सुध्दा ज्याचे वाटेल त्याचे सोसतो नाही दुखत त्याचे मन||७||

आयुष्याला आकार देणारे हात कुणावर कधी उठत नाही,
आरोपांना देताना उत्तर त्याचा तोल कधीच सुटत नाही||८||

स्वभाव त्याचा परोपकारी कधीच कुणावर उगवत नाही सूड,
पिढया घडवतो मान खाली घालून शेवटपर्यंत राखतो मुलांचा मूड||९||

ज्याने घडवले समाजाला त्याला कुणीही येऊण अक्कल  शिकवते,
अशावेळी सुध्दा शांत राहण्याचे शहाणपण त्याच्या अंगी कुठून येते?।।१०।।.

नका देऊ काहीच,नाही काहीच अपेक्षा मात्र करू नका अपमान,
ज्यांनी घडविले तुम्हाला त्यांना दया
फक्त आणि फक्त सन्मान।।११।।
Have a nice day💐💐

तिन गोष्टी

👉*तीन गोष्टींच कधीच विस्मरण होऊ देऊ नये
👉

1 कर्तव्य ,
2 कर्ज ,
3 उपकार ,

👉* तीन गोष्टीपासुन नेहमी दुर रहावे,
👉

1 व्यसन,
2 जुगार ,
3 चोरी,

👉* तीन गोष्टीँचा नेहमी आदर करावा,
👉

1 आई ,
2 वडील ,
3 गुरु,

👉* तीन गोष्टी इतरांना देत चला,
👉

1 दान ,
2 ज्ञान ,
3 मान,

👉* तीन गोष्टी भावा भावात शऋत्व निर्माण करतात ,
👉

1 संपत्ती, 2 पत्नी, 3 जमिन,

👉* तीन गोष्टी कधीही चोरी होत नाहीत,
👉

1 ज्ञान, 2 चारिऋय् ,3 जिद्द,

👉* तीन गोष्टी आयुष्यात एकदाच मिळतात,
👉

1 आई, 2 वडिल, 3 तारुण्य,

👉* तीन गोष्टी अंगी असु द्याव्यात,
👉

1 नम्रता, 2 सौजन्य, 3 सुस्वभाव

👉 * तीन गोष्टी सांगुन येत नाहीत,
👉

1 मूत्यु, 2 आजार, 3 वेळ


🙏 हा स्वाभिमान  प्रत्येकाला असावा  🙏

दुनियादारी

.🌎 दुनियादारी 🌍
   
     " अच्छे दिन "
 
पावसामुळे शेतकरी,
आयोगामुळे कर्मचारी..
थोडे थोडे, सुखावले आहेत ||

   निसर्गाने शेतक-याला,
   शासनाने कर्मचा-याला..
   अच्छे दिन, दाखवले आहेत ||


वेतनवाढीमुळे कुणाला
आवळा.. तर कुणाच्या
हाताला कोहाळे लागले आहे ||

   केंद्रात जन्मले
   आयोगाचे बाळ..आता
   राज्याला डोहाळे लागले आहे||

पर्यावरण गीत, घोषवाक्य

वृक्षारोपण घोषवाक्य      🌳🌳🌳🌳🌳🌳      1⃣वृक्ष लावा दारोदारी, आरोग्य येईल घरी.           2⃣वृक्ष लावा, जिवन वाचवा.                         3⃣झाडं म्हणत या रे या   फळं, फुलं, सावली घ्या.    4⃣झाडे लावु भारंभार, शिवार होईल हिरवेगार.     5⃣भाव तोची देव जरी, प्रेम असावे वृक्षा वरी.       6⃣सुंदर नक्षी, आकाशात पक्षी, मानव विकासास पर्यावरण साक्षी.              7⃣वसुंधरेचे हिरवे लेणे, लावा वने वाचवा वने.       8⃣हवी असेल उभी रहायला सावली, तर झाडे लावा पावलोपावली.         9⃣परिसर हे स्वछ ठेवू, सुंदरतेचे गीत गावु.            1⃣0⃣ स्वछ ठेवा शाळा, गावाची बदलेल कळा.         🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
 *१जुलै वृक्षारोपण*
     
*उपयुक्त घोष वाक्ये*



*पर्यावरण जागवा*,
 *वसुंधरा वाचवा*

*वृक्ष लावा दारोदारी*
*आरोग्य येईल घरोघरी*

*दारी वृक्षाचा पहारा,*
 *देऊ पक्ष्यला आसरा*



*तुला हवी असेल उभी रहायला सावली…*

*तर झाडे लाव पावलोपावली..*

*वृक्ष लावा, जीवन वाचवा*

*झाडेच झाडे लावूया*
*फळे फुले वेचूया*

*नको वृक्षाशी कृतघ्न*
*राहू सदा कृतज्ञ*

*झाड म्हणतं या रे या*
*फळं, फुलं, सावली घ्या*

*एक एक कागद वाचवू. .*
*खूप खूप झाडे जगवू.*

*कावळा करतो कावकाव,*
*म्हणतो माणसा ,झाड लाव*

*झाडे लावू भारंभार,*
*शिवार होईल हिरवेगार*

*भाव तोची देव  जरी*
*प्रेम असावे तरूवरी.*

*सुंदर नक्षी, आकाशात पक्षी*
*मानव विकासास पर्यावरण साक्षी*

*पुढील पिढीसाठी ठेवू वारसा*
*तरूवेली दाखवतील आरसा*

*सावली ,ऑक्सिजन, फूल ,फळ पान*
*वृक्षांचा ठेवू दिलो जानसे मान.*

*काळ्या मातीत बीज पेरले*
*ओंजळ भर पाणी घातले*
*मातीच्या कुशीत बीज हासले*
*जो बाळा जो रे जो.*

*वसुंधरेचे हिरवे लेणे*
*लावा वने वाचवा वने*

*वसुंधरा आमची छान*
*राखू तिचा मान*

*हवी असेल शुद्ध हवा ,तर* *झाडे लावा ,झाडे जगवा.*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

विचारपुष्प ७५

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
आशा ही आपल्या जीवनप्रवाहाची प्रेरक शक्ती असते.आपल्या कामास आशेचा परिसस्पर्श झाला की, आपल्या कामाला सुवर्णकांती लाभत असते. आशावादी दृष्टीने केलेलं काम फुलतं. बळजबरीनं केलेल्या कामात रसवत्ता आणि गुणवत्ता राहत नाही. उत्तुंग कल्पनातून आणि श्रेष्ठ आदर्शातून आशेचा जन्म होत असतो.

या संदर्भात  डाँ.जगदीशचंद्र बसू म्हणतात - ' आशेचं साफल्य उन्नत आशांना जन्म देत असतं.'

खरं तर महापुरुषाच्या आशावादातच समाजविकास लपलेला असतो.आशा हीच आपल्या उच्चतम जीवनाची खरीखुरी प्रभात आहे. '
आपले जीवन चैतन्यमय ठेवण्यासाठी मनाच्या मंदिरात आशेचा नंदादीप तेवत ठेवला पाहिजे.
========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

कथा क्रमांक ३२

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग ३२📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ बौध्दिक विश्रांती  ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
          एका गावात एक ज्ञानी विद्वान पंडीत होते. देशातील अनेक हुशार व व्‍यासंगी पंडीतांमध्‍ये त्‍यांच्‍या ज्ञानाची चर्चा होत असे. शास्‍त्रार्थामध्‍ये हुशार असणारे हे पंडीत महाशय एके दिवशी आपल्‍या घराजवळ राहणा-या लहान मुलांसमवेत खेळत होते.
         हे पाहून तेथून जाणा-या एका सदगृहस्‍थाने त्‍यांना थांबवून विचारले,’’ अहो देशात ज्‍यांच्‍या ज्ञानाची चर्चा होते असे तुम्‍ही पंडीत असूनसुद्धा तुम्‍ही चक्क लहान काय खेळता आहात?’’
          गृहस्‍थांचे हे बोलणे ऐकून पंडीतजींनी आपला खेळ बंद केला व गृहस्‍थांना घेऊन ते जवळच्‍याच एका घरात गेले. त्‍या घरात एका खुंटीला एक धनुष्‍य अडकविले होते. त्‍या धनुष्‍याकडे बोट दाखवून पंडीतजी म्‍हणाले,
         "महोदय, त्‍या धनुष्‍याच्‍या प्रत्‍यंचेची दोरी सध्‍या का सोडून ठेवली आहे, याचे कारण तुम्‍हाला माहित आहे काय? कामाव्‍यतिरिक्तच्‍या वेळेसही जर धनुष्‍याच्‍या कांबीची दोन्‍ही टोके जर वाकवून त्‍या दोरीला बांधून ठेवली तर काही दिवसांनी ती कांबी मोडेल आणि धनुष्‍याची दोरी खेचायची बंद होईल. परिणामी ते धनुष्‍य निकामी होईल. त्‍याचप्रमाणे अखंड लेखन, वाचन व चिंतन करत राहिल्‍याने बुद्धीवरही प्रचंड ताण येऊन लवकरच बुद्धि थकून ती काम देईनाशी होते. ती तशी होऊ नये म्‍हणून अधूनमधून मला लहान मुलांमध्‍ये माझे वय, हुद्दा, बुद्धी विसरून खेळावे लागते."
गृहस्‍थांचे या उत्‍तराने समाधान झाले.

*तात्‍पर्य :- बुद्धीवर येणा-या प्रचंड ताणापासून सुटका करून घेण्‍यासाठी थोडावेळ तरी आपल्‍या छंदाला किंवा परिवाराला वेळ द्यावा ज्‍याने आपल्‍या मेंदूला थोडी विश्रांती मिळेल व पुन्‍हा परिश्रम करण्‍यास मेंदू तयार होईल.*

〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प ७४

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
माणूस वर्तमानकाळात वावरताना मनात उद्याच्या भविष्याची उज्वल स्वप्नं रंगवीत असतो ! तसं त्यात गैर असं काहीच नसतं ! मात्र , फक्त स्वप्नांच्या दुनियेतच दंग होत राहिला तर ती पुर्ण होण्यासाठी आवश्यक कर्तव्य कधी करणार हा प्रश्न असतो .

 कारण कोणतही स्वप्न नवसाने पुर्ण होत नसतं . त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो.

 कोणत्याही क्षेत्रात जा , उद्याचा भविष्यकाळ वर्तमानातील मेहनत व त्यागातूनच घडत असतो.
========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन /संकलन🙏🏼
✒ *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

RTE ची कलमे

✏RTE- 2009 चे कलमे- सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे
शीर्षक,
कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.
कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
कलम क्रमांक २ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
कलम क्रमांक ५ = दाखला  हस्तांतरण.
कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.
कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.
कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.
कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.
कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास
प्रतिबंध .
कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक
त्रास प्रतिबंध.
कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .
कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .
कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार .
कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती .
कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .
कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी
शर्ती.
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.
कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.
कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची
स्थापना.
कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची
स्थापना.
कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.
कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.
कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा
अधिकार.

कथा क्रमांक ३१.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग ३१. 📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻सिंह व बुद्धीमान माणूस  ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एका जंगलात एके दिवशी एक पारधी शिकारीसाठी आला. त्याला पाहून जंगलातील प्राणी घाबरून सैरावैरा पळू लागले. एका सिंहाने ते पाहिले, तो पळणाऱ्या प्राण्यांना म्हणाला, "अरे माझ्यासारखा शक्तिमान प्राणी तुमचा राजा असताना तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही."सिंह असे बोलतो न बोलतो तोच सूं सूं करत एक बाण आला व सिंहाच्या पंजात घुसला. सिंह तसाच विव्हळला. तीन पायावर पळत सुटला, एका कोल्ह्याने पाहिले व म्हणाला, "वनराज आताच तर आपण शौर्याच्या, शक्तीच्या गप्पा मारत होता, मग आता का घाबरून पळता आहात.' यावर सिंह कोल्ह्याला म्हणाला, अरे बाबा, मी शक्तीने सर्व प्राण्यांत श्रेष्ठ असलो तरी माणूस हा प्राणी बुध्दीने सामर्थ्यशाली आहे त्याची बरोबरी करणारा दुसरा प्राणी नाही.'

तात्पर्यः
👉बुध्दिच्या सामर्थ्यापूढे शारिरीक सामर्थ्य कमी पडते.

〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

बोधपर कथा

🌸  बोधपर कथा 🌸
 🐕 कुत्र्या कडून मैनेजमेंट लेसन :

एक दिवस एक 🐕 कुत्रा जंगलात रस्ता  चुकला.
त्याने पाहिले एक वाघ 🐅
त्याच्या दिशेने येत होता.
🐕 कुत्रा घाबरला.
आता आपली धडगत नाही.
हा आपल्याला खाणार.
समोर काही हाडे पडली होती.
🐅 वाघाकडे पाठ करुन
त्यातले एक हाड उचलून कुत्रा
🍖 🐕चोखू लागला.
आणि जोराने म्हणू लागला

"वा !👌👌 वाघाला खाण्याची
मजा काही औरच.
अजुन एखादा वाघ 🐅 मिळाला
तर खुप छान होईल !"
असे म्हणून एक जोराचा ढेकर दिला.
वाघ हे ऐकून घाबरला.
हा तर वाघाचा शिकारी आहे.
आपले काही खरे नाही.
आणि तो तिथून निघुन गेला.
हे सर्व झाडावर बसलेल्या
🐒माकडाने पाहिले होते.
 त्याने विचार केला की 🐅 वाघाशी मैत्री करण्याची ही चांगली संधी आहे. त्याला खरे खरे सगळे सांगितले तर आयुष्य भर कधीच वाघ आपल्याला त्रास देणार नाही.
ते माकड 🐒🐅 वाघाच्या पाठोपाठ लगेच निघाले.
🐕 कुत्र्याने वाघाच्या 🐅 मागे 🐒 माकडाला जाताना पाहिले
आणि कुत्रे मनात म्हणाले
"काही तरी गडबड आहे"

तिकडे वाघाला भेटून माकडाने
सर्व हकीकत सांगितली
आणि कुत्र्याने तुला कसे फसवले
ते दाखवुन दिले.
वाघाला 🐅 आता कुत्र्याचा 🐕
खुप राग आला.
तो माकडाला म्हणाला
"चल माझ्या सोबत आज
 कुत्र्याचा खेळ कसा संपवतो ते बघ"

असे म्हणून माकडाला
पाठीवर घेवून कुत्र्याच्या
दिशेने निघाला.
वाघाला माकडा 🐅🐒सहित येताना पाहुन  🐕 कुत्रा
परत त्या दिशेला पाठ करुन बसला. आणि जोराने वाघाला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला
 "या माकडाला पाठवून
तास होऊन गेला
एका वाघाला फसवुन
इथे घेवून येवू शकत नाही हा!"
हे वाक्य ऐकताच वाघाने
पहिले काय केले असेल
याची कल्पना आली असेलच

👉 तात्पर्य :
आपल्या आजुबाजुला अशीच
अनेक माकडे 🐒 🐒असतात,
त्यांना ओळखायला हवे.
हुशार राहून संकटांचा सामना करायला हवा.

माझी छकुली

बाबा बाबा शाळा उघडली
पेन नाही नाही वही
लेकरा मागच्या वर्षाच बघ काही
माझ्या खिशात रूपया नाही

बाबा वह्या भरल्या
दफ्तरही लय जुन झाल
बूटाच तळ निसटल
कापड थिगळ लावून जोडल

बाबांच्या डोळ्यात पाणी
बोलताना हादरली वाणी
कशी सांगू बाळा कहाणी
दुष्काळान सार नशीब फाटल

बाळा तू शिक माणूस व्हय मोठा
शेतात राबून जिंदगीचा तोटा
लय कष्ट करीन मी पुरवीन नोटा
पण बाळा तू शिक माणूस व्हय मोठा

बाबांच्या डोळ्यात आसू दाटल
पोराला सार समजल
फाटक दप्तर भरल
मोठा माणूस होण्यासाठी शाळेला निघाल


#शेतकऱ्याची_पोरं
#शिक्षण
#दुष्काळ

मुख्यमंत्री व राज्यपाल

MPSC-यशोमार्ग
👉मुख्यमंत्री व राज्यपाल👈
👉राज्य : उत्तरप्रदेश
राजधानी : लखनौ
मुख्यमंत्री : अखिलेश यादव
राज्यपाल : राम नाईक
👉राज्य : पंजाब
राजधानी : चंदिगड
मुख्यमंत्री : प्रकाश सिंग बादल
राज्यपाल : कप्तानसिंग सोलंकी (प्र.)
👉राज्य : गोवा
राजधानी : पणजी
मुख्यमंत्री : लक्ष्मीकांत पार्सेकर
राज्यपाल : मृदुला सिन्हा
👉राज्य : उत्तराखंड
राजधानी : डेहराडून
मुख्यमंत्री : हरिष रावत
राज्यपाल : के.के. पॉल
👉राज्य : अरुणाचल प्रदेश
राजधानी : इटानगर
मुख्यमंत्री : नाबामा तुकी
राज्यपाल : ज्योतीप्रसाद राजखोवा
👉राज्य : हिमाचल प्रदेश
राजधानी : शिमला
मुख्यमंत्री : वीरभद्रसिंग
राज्यपाल : आचार्य देवव्रत
👉राज्य : जम्मु काश्मिर
राजधानी : जम्मू, श्रीनगर
राज्यपाल : एन.एन. व्होरा
👉राज्य : पदूच्चेरी (कें.प्र.)
राजधानी : पद्दूचेरी
मुख्यमंत्री : एन.रंगास्वामी
राज्यपाल : इक्बालसिंग
👉राज्य : राजस्थान
राजधानी : जयपूर
मुख्यमंत्री : वसुंधरा राजे शिंदे
राज्यपाल : कल्याण सिंग
👉राज्य : नागालँड
राजधानी : कोहिमा
मुख्यमंत्री : टी.आर. झेलियांग
राज्यपाल : पद्मनाथ आचार्य
👉राज्य : छत्तीसगड
राजधानी : रायपूर
मुख्यमंत्री : डॉ. रमण सिंग
राज्यपाल : बलराम दास टंडन
👉राज्य : आंध्रप्रदेश
राजधानी : हैद्राबाद
मुख्यमंत्री : एन. चंद्राबाबू नायडू
राज्यपाल : ई.एल. नरसिंहम
👉राज्य : केरळ
राजधानी : तिरूअनंतपुरम
मुख्यमंत्री : ओमान चंडी
राज्यपाल : पी. सदाशिवम
👉राज्य : तामिळनाडू
राजधानी : चेन्नई
मुख्यमंत्री : जे. जयललिता
राज्यपाल : के. रोसैय्या
👉राज्य : ओडिशा
राजधानी : भूवनेश्वर
मुख्यमंत्री : नविन पटनाईक
राज्यपाल : एस.सी. जमीर
👉राज्य : गुजरात
राजधानी : गांधीनगर
मुख्यमंत्री : आनंदी बेन पटेल
राज्यपाल : ओ.पी. कोहली
👉राज्य : पश्चिम बंगाल
राजधानी : कोलकता
मुख्यमंत्री : ममता बॅनर्जी
राज्यपाल : केसरीनाथ त्रिपाटी
👉राज्य : बिहार
राजधानी : पाटणा
राज्यपाल : रामनाथ कोविंद
👉राज्य : त्रिपुरा
राजधानी : आगरताळा
मुख्यमंत्री : माणिक सरकार
राज्यपाल : तथागत रॉय
👉राज्य : आसाम
राजधानी : दिसपूर
मुख्यमंत्री : तरुण गोगोई
राज्यपाल : पी.बी. आचार्य
👉राज्य : दिल्ली (कें.प्र.)
राजधानी : दिल्ली
मुख्यमंत्री : अरविंद केजरीवाल
राज्यपाल : नजिब जंग
👉राज्य : सिक्किम
राजधानी : गंगटोक
मुख्यमंत्री : पवनकुमार चामलिंग
राज्यपाल : श्रीनिवास पाटील
👉राज्य : झारखंड
राजधानी : रांची
मुख्यमंत्री : रघुवर दास
राज्यपाल : श्रीमती द्रोपदी मुर्मू
👉राज्य : हरियाणा
राजधानी : चंदिगड
मुख्यमंत्री : मनोहरलाल खट्टर
राज्यपाल : कप्तानसिंग सोलंकी
👉राज्य : कर्नाटक
राजधानी : बंगलुरू
मुख्यमंत्री : सिद्धरम्मैया
राज्यपाल : वजुभाई वाला
👉राज्य : मेघालय
राजधानी : शिलाँग
मुख्यमंत्री : मुकुल संगमा
राज्यपाल : षणमुगानाथम

कथा क्रमांक ३०

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग ३० 📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ उपयोगी जीवन  ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एके वेळी काही मजुर दगडाच्या खाणीत काम करीत असता त्यांनी खडकाचा अर्धा भाग फोडला, इतक्यात त्या दगडाच्या पोटातून चटकन एक मोठा बेडूक उडी मारून बाहेर आला. हे पाहून त्या मजुरांना फार नवल वाटले व ते त्याच्याकडे कौतुकाने पहात उभे राहिले. तो बेडूक त्या दगडाच्या आत कसा जन्मला, कसा जगला याविषयी आपापसात बोलू लागले. त्यांचे बोलणे कानावर पडताच त्या बेडकाला स्वतःविषयी धन्यता व गर्व वाटून तो म्हणाला, 'अरे बाबांनो, मागचा प्रलय होऊन गेल्यावर जेव्हा भगवंताने पिंपळाच्या पानावर जन्म घेतला तेव्हाच मी जन्मलो. माझ्या बरोबरीचा असा आज एकही प्राणी या जगात नाही. भगवंताचं आणि माझं कूळ एकच. अन मीही त्याच्या सारखाच पुढच्या प्रलयापर्यंत जगणार !' तो असे बोलत आहे, इतक्यात एक मधमाशी तेथे येऊन म्हणाली, 'बेडका तू फार काळ जगलास आणि तुझा जन्म मोठ्या कुळात झाला असला तरी तुला यात गर्व वाटण्यासारखं काय आहे ? एवढ्या मोठ्या आयुष्याचा तुला काय फायदा ? त्यापेक्षा माझं पहा ? तसं माझं आयुष्य मोठं नाही तरी मी सतत उद्योग करते नि लोकांच्या उपयोगी पडते. नाना प्रकारच्या सुंदर फुलझाडांचा मला उपभोग घेता येतो. सर्वांनी आदर्श बाळगावा असं माझं वर्तन आहे. मोठ्या कुळात जन्मून अन् हजारो वर्षे जगून, सारं आयुष्य आळसात आणि अज्ञानात घालवलं तर त्याचा उपयोग काय ?'

तात्पर्य

- खरा मोठेपणा अंगच्या गुणांवर अवलंबून असतो. जीवन जगत असतांना माणसाने सतत दुसऱ्याच्या उपयोगी यावे.यातच खरा आनंद आहे.आयुष्याच सोन होईल.
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचार पुष्प ७३

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰
दु:ख तर प्रत्येकाच्याच नशिबात लिहलेले असते. पण प्रत्येकाची त्या दुःखाला सामोरे जाण्याची व  ते दुःख पचवून घेण्याची पध्दत वेगवेगळी असते. जो व्यक्ती दुःखाचा जास्त विचार करतो अन् सतत त्या दुःखाला बिलगून राहतो त्याला त्या दुःखाचा खूप ञास होतो.

 म्हणून णून दुःख कीती मोठे आहे आणि त्याची मर्यादा ठरवणे हे ही आपल्याच हातात असते. म्हणून सर्व दुःख विसरुन हे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.

 कारण हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते  आयुष्य खुप सुंदर आहे., फक्त तुम्ही ते जगायला शिका.
========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ७२.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 विचारपुष्प  🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
जीवनकलेचा उपासक आपल्या हृदयाशी काही निष्ठा बाळगत असतो.पहिली निष्ठा आहे *सत्यनिष्ठा.*कला ही कशाची नक्कल नसते, ती अस्सल असते. ती प्रतिकृती वा अनुकृती नाही , स्वतंत्र निर्मिती आहे.

दुसऱ्यांच्या सांगण्यावरून निर्णय घेणे त्याला शब्दनिष्ठा म्हणतात, स्वतःच्या अनुभवाने निष्कर्षाप्रत येणे याला *सत्यनिष्ठा* म्हणतात.

*सत्यनिष्ठ* माणूस जीवनात सारखे प्रयोग करीत असतो. प्रयोगातून चिंतन , चिंतनातून प्रयोग अशी त्याची साधना चालू असते.
प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र विभूती आहे, हे लक्षात  घेऊन  माणसाने दुसऱ्यांचे अनुकरण करु नये तर आपले स्वतःचे स्वत्व ओळखून ते विकसित करण्याचा प्रयत्न करावा.
*We must learn to be ourselves*.

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

महत्त्वाचे दिनविशेष

महत्वाचे दिनविशेष...
============
सर्वांना पाठवा....

0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
12जानेवारी==युवादिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
———————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
———————                           ०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14==डाँ बाबासाहेब आबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
—————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
21==बुद्धपोर्णिमा
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
—————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन
Please forward...

विचारपुष्प ७१.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 विचारपुष्प  🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
जीवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे तेवढीच जीवन जगताना *स्पर्धक आणि विरोधक* यांची गरज आहे ..*स्पर्धक* आपल्याला सतत *गतीशील आणि क्रियाशील* बनवितात ..*विरोधक* कायम आपल्याला * सतर्क आणि सावधान* बनवितात. आणि हे दोघे मिळून आपल्या *प्रगतीला* कायम * पोषक वातावरण* तयार करतात ..या दोघांना *निर्माण* करायला तुम्हाला *कष्ट* करावे लागत नाही...."समाज" *फुकटात* यांना तुम्हाला देवून टाकतो .. त्यांच्यावर *चीडू* नका त्यांचे कायम *स्वागत* करा कारण* त्यांच्या शिवाय तुमचे जगणे अधूरे आहे .

   आईनस्टाईन
========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
*✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

इयत्ता ४थी. विषय ःभाषा

इयत्ता ४ थी विषय-भाषा
::🍭:घटक १ ला :- धरतीची आम्ही लेकरे:::
:::समानार्थी शब्द:::
धरती = जमीन, लेकरं = मुले
नशीबवान= भाग्यवान, शेट = रान
पाखरं =पक्षी, मेहनत = कष्ट
वरीस = एक वर्ष, फळ = प्राप्ती
डूलने= हलणे, शिवार = रानं
शाळू = ज्वारी, साल = वर्ष
समानता = सारखेपणा, ऐक्यता = एकता
धनी = मालक, चाकर = नोकर
:::विरुद्धार्थी शब्द:::
आम्ही X तुम्ही, भाग्यवान X दुर्भागी
मेहनत X कामचुकार, समानता X असमानता
ऐक्य X विभक्त, येथे X तेथे
धनी X चाकर, समानार्थी X विरुद्धार्थी
🍭पाठ २ रा :- बोलणारी नदी
:::समानार्थी शब्द:::
नदी = सरिता, भारी = खूप
खोडकर = खट्याळ, लोक= जनता
त्रास = कटकट, हौस = नाद
इच्छा = आवड, युक्ती = उपाय
घर= सदन, वावर = शेत
दिवस = दिन, दीन = गरीब
आई = माता, दुखणे = त्रास होणे
गळा = कंठ, पाणी = जल
नक= नासिका, परत =पुन्हा
पळत = धावत, खूप = भरपूर
परवानगी = मान्यता, कंटाळा = थकवा
सुखी = समाधानी, चिडणे = रागावणे
बिनधास्त = न घाबरता, गंमत = मज्जा
आनंद = हर्ष, उशीर = विलंब
डोळा = नयन, शिंकाळे = शिंके
बुट्टी= टोपली, नवल = आश्चर्य
पारस = घरामागील जागा, रिकामा =मोकळा
:::विरुद्धार्थी शब्द:::
बोलणारी X मुकी, एक X अनेक
स्वत:चे X दुस-याच,े मागे X पुढे
पटकन X सावकाश, मोठी X लहान
बरोबर X चूक, आवड X नावड
कंटाळा X उत्साह, सुखी X दुखी
बिनधास्त X घाबरट, परवानगी X विनापरवानगी
नेहमी X कधीतरी, खुश X नाखूष
उघड X बंदिस्त, रिकामा X भरलेला
🍭 :पाठ ३ रा आम्हालाही हवाय मोबाईल:::
:::समानार्थी शब्द:::
आई = माता, छान = सुंदर
मोबाईल = भ्रमणध्वनी, गरज = निकड
धमाल = मज्जा, लाडकी= आवडती
दोडकी = नावडती, राग= क्रोध
:::विरुद्धार्थी शब्द:::
मोठी X छोटी, पुढे X मागे
लवकर X घाईत, उद्या X आज
:🍭::पाठ ४ था या भारतात ......:::
:::समानार्थी शब्द:::
बंधू = भाऊ, नित्य= दररोज
वसणे = राहणे, वर = आशीर्वाद
मतभेद = फरक, नांदणे = राहणे
अमीर = श्रीमंत, सकल= सगळे
मानवता = चांगलेपणा, समुदाय= सर्व समाज
शिल = चारित्र्य, समूळ = संपूर्ण
नष्ट = संपणे , जग= विश्व
सत्य = खरे, रमो = राहणे
विपत्ती= संकट, सदा = नेहमी
सेवेत = कामात, तुकड्या= तुकडोजी महाराज
:::विरुद्धार्थी शब्द:::
नित्य X अनियमित, एक X अनेक
मतभेद X सारख,े सुख X दुख
गरीब X श्रीमंत, एकमत X बहुमत
स्वातंत्र्य X परतंत्र्य, शीलवान X शिलहीन
सत्य X असत्य, न्याय X अन्याय
सावरग X नरक, एकमत X बहुमत
🍭 :पाठ ५ वा मला शिकायचं:::
:::समानार्थी शब्द:::
पत्नी = बायको, दिवस= दिन
मजुरी = काम, मुलगी= कन्या
कष्ट= काम, परगाव = दुसरे गाव
नेहमी = सतत, डोळे= नयन
चिंता = काळजी, राग= क्रोध
नवरा = पती, अवघड= कठीण
निर्णय= विचार, अचंबा = नवल
कौतुक= नवल, अडचण =समस्या
स्वावलंब = स्वत:च्या, जीवावर भेद= फरक
महिला = स्त्री ,धाकले= लहान
:::विरुद्धार्थी शब्द:::
एक X अनेक, दिवसभर X रात्रभर
कष्टाळू X कामचुकार, छोटा X मोठा
पुढचा X मागचा, कोपरा X मध्यभागी
धाकले X थोरल,े राग X प्रेम
गरीब X श्रीमंत, पक्का X कच्चा
नेहमी X कधीतरी, हुशार X मंद
स्वावलंबी X परावलंबी, आधी X नंतर
आर्धा X पूर्ण, भेद X समानता
आनंद X दु:ख, चिंता X निश्चिंत
::🍭:पाठ ६ वा मायेची पाखरं:::
:::समानार्थी शब्द:::
माया = प्रेम, पाखरू = पक्षी
आदर = मान, वाट = रस्ता
समाधान = छान, वाटणे रात्र = रजनी
आग्रह = हट्ट, झाड =तरू
गर्द = दाट, खोटे= असत्य
टाळणे =दुर्लक्ष, पोट = उदर
झोप= निद्रा, आज्ञा = आदेश
शिल्लक = बाकी, आधाशा= भुकेला
रुचकर = चविष्ट, चाहूल = जाणीव
उब= गरमी, कांबळ = पांघरून
गाढ = निवांत, आई = माता
पिता = जनक, मुख= तोंड
उदंड = महान, आयुष्य = जीवन
झटणे = प्रयत्न, उत्तुंग= महान
कार्य= काम, उजेड= प्रकाश
:::विरुद्धार्थी शब्द:::
जाताना X येताना, समाधान X निराश
अंधार X उजेड, रात्र X दिवस
खोटे X खरे, रुचकर X बेचव
थंडी X गरमी, उघडे X बंद
कळत X नकळत, आधाशी = समाधानी
:🍭 कविता ७ वी धूळपेरणी:::
:::समानार्थी शब्द:::
बरकत = भरभराट, मती = मृदा
जीव = प्राण, धूळपेरणी = पावसापुर्वीची पेरणी
ध्यास = ओढ, आस = इच्छा
जाचक = त्रास, कासावीस= व्याकूळ
चातक= एक, पक्षी आभूट= ढगाळ
मेघुट =ढग, दाटणे धुमारे = नवी पालवी फुटणे
:::विरुद्धार्थी शब्द:::
बरकत X दुष्काळ, दिवस X रात्र
जाचक X चांगल,े कोरडे X ओले
दूर X जवळ, आस X अनिच्छा
::🍭:पाठ ८ वा गुणग्राहक राजा:::
:::समानार्थी शब्द:::
गुणग्राहक = गुण, घेणारा राजा = नृप
फेरफटका =फिरण्यास, जाणे आवाज = ध्वनी
पाठलाग = मागे, जाणे देहभान = लक्ष
विसरणे = न आठवणे, बालपण = लहानपण
चपळ = वेगवान, नजर = दृष्टी
प्रसंग = हकीकत, शोधणे= हुडकणे
गल्ली = आळी, वार्ता = बातमी
उत्सुकता = कुतुहूल, काळजी = चिंता
शिस्त = नियम, छान = सुंदर
पाय = पद, दूर = लांब
जीत = जिंकणे , हार = पराभव
बक्षीस = इनाम, आनंद = हर्ष
समारंभ = उत्सव, हुकुम = आज्ञा
:::विरुधार्थी शब्द:::
गुण X अवगुण, पहिला X शेवटचा
चढणे X उतरणे , चपळ X मंद
इच्छा X अनिच्छा, खुश X नाखूष
उद्या X आज, काळजी X बेफिकीर
शिस्त X बेशिस्त, दूर X जवळ
मागे X पुढे, बाद X नाबाद
बक्षीस X दंड, आनंद X दु: ख
🍭 :पाठ ९ वा इदगाह:::
:::समानार्थी शब्द:::
महिना = मास, दिवस = दिन
रम्य = मनमोहक, इदगाह = प्रार्थनास्थळ
समृद्धी = भरभराट, सूर्य = दिनकर
सुरेख = सुंदर, जग= विश्व
गडबड= घाई, आनंद= हर्ष
दुपार= मध्यान्ह, बळी = मृत्यू
विश्वास = खात्री, रोज= उपवास
जोडे = बूट, खुशीत = आनंदात
ह्रदय= मन, गर्दी = जमाव
आदी = प्रथम, परत= माघारी
सवंगडी = सोबती, लोक= जनता
सावली = छाया, रांगा = ओळी
पैसा= संपत्ती, प्रतिष्ठा = मान
दृश्य= चित्र, चक्र= चाक
मज्जा = गंमत, आशिर्वाद= वर
थाबकने = थांबणे ,भाव = किमंत
धाडस = न घाबरता, ताबा = नियंत्रण
कडा = खांदा, लाड= प्रेम
दु: खी =नाखूष, अपराध= गुन्हा
रग= क्रोध, गायब= नाहीसे होणे
काळजी = निगा, डोळा = चक्षु
लालूच = स्वार्थ, विक्री= विकणे
:::विरुद्धार्थी शब्द:::
आज X उद्या, सुंदर X कुरूप
सकाळ X संध्याकाळ, समृध्द X दुष्काळ
शांत X अशांत, स-या X थोड्या
सुरु X बंद, खूप X कमी
आनंद X दु: ख, उगवणे X मावळणे
घाई X सावकाश, प्रश्न X उत्तर
गरीब X श्रीमंत, विश्वास X अविश्वास
जुनी X नवी, घाबरट X धीट
अचानक Xसावकाश, लांब X जवळ
दृश्य X अदृष्य, जमीन X आकाश
महागडी X स्वस्त, आशीर्वाद X शाप
उपयोग X निरोपयोग, दररोज X कधीतरी
विक्री X खरेदी, योग्य X अयोग्य
धाडस X भित,्रा ताबा X अनियंत्रण
दु:खी X सुखी, राग X प्रेम
काळजी X निष्काळजी, रडणे X हसणे
स्वार्थी X निस्वार्थी ,मित्र X शत्रू
:🍭::पाठ १० वा धाडसी हाली:::
:::समानार्थी शब्द:::
धाडसी = पराक्रमी, भीती = घबराट
अंधार = काळोख, गायब =नाहीसा
हिमत = धैर्य, गौरव = सत्कार
पाडा = वस्ती, जीवन = आयुष्य
जंगल= वन, सतत =नेहमी
वावर = माग, खडानखडा = संपूर्ण माहिती
निर्भय= न घाबरता, संवर्धन = जपणूक
झुंज= लढा, लचका =मांस तोडणे  = प्राणी ,पक्षी राखीव जागा., मदत = साह्य
धावत =पळत, शौर्य= पराक्रम
पुरस्कार =बक्षीस, कौतुक= नवल
आभार = धन्यवाद, विविध = वेगळे
:::विरुधार्थी शब्द:::
भित्रा X धीट, जवळ X दूर
अंधार X उजेड, उलट X सुलट
वाचवणे X मारणे, गौरव X आपमान
विविध X एकसारखे ,निर्भय X भीति
संवर्धन X नाश , मागून X पुढून
बरे X वाईट, गरीब X श्रीमंत

कथा क्रमांक २९.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग २९.📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ अतुट प्रेम ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

एका  जंगलात एक फुलपाखरू व एक भुंगा राहत होते

🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝
ते दोघे मिळून या फुलावरून🌹 त्या फूलावर🌹🌹🐝 आनंदाने बागड़त  असत.
एक दिवस अचानक दोघेही भयानक भांडू लागले.
फुलपाखरू म्हणाले मी तुझ्या पेक्षा जास्त फुलावंर🌹 प्रेम💗 करतो.
भुंगा म्हणाला मीच फूलावंर जास्त प्रेम करतो.                
या विषयावरून वाद वाढत गेला संध्याकाळ झाली.
वाद संपता संपत  नव्हता.
तेव्हा फुलपाखरू म्हणाले की जो कोणी सकाळी लवकर उठून या समोरच्या फूलावर येऊन बसेल तो फूलावंर जास्त प्रेम करतो  असे सर्वांना मान्य करावे लागेल.

भुंग्याला हि युक्ती  पटली
दोघेही  आपल्या   आपल्या  घरी जाऊन झोपले.
सकाळ सकाळी फुलपाखरू लवकर  उठून फुलावर जाऊन बसले.
अजून  भुंगा आला नव्हता,
आपन जिंकलो या आनंदात  फुलपाखरू वेडेपिसे झाले.
ते  आतुरतेने भुंग्याची वाट बघत बसले.
सूर्योदय झाला पन भुंगा आला नव्हता.
सूर्याची सोनेरी किरणे पडली
फुलाला जाग आली.
 त्याने  आपल्या पाकळ्या  उमलवण्यास सुरूवात केली.      
 फुल सम्पूर्ण उमलले तेव्हा फुलपाखराला त्यात भुंगा मरून पडलेला दिसला.
भुंगा 🐝फुलावरील🌹 प्रेम💗 दाखविण्यासाठी रात्रीच जाऊन फूलावर 🐝🌹बसला होता.
राञी फुलाने पाकळ्या मिटून घेतल्या भुंगा त्यात अडकून पडला.
बांबूच्या लाकडाला फोडणारा भुंगा नाजूक पाकळ्या तोडू शकला नाही
स्वतः जगण्यासाठी त्याने आपल्या प्रेमाचे तुकडे  केले नाही.
मरणाला हसत  हसत मिठी मारली
फुलपाखराला खुप वाईट वाटले
हट्टापायी त्याने एक सुंदर मिञ गमावून बसला होता.

तात्पर्यः हट्टीपणा , राग , लोभ, व्देष , हे माणसाला अपायकारक घडणाऱ्या बाबी आहेत.

〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प ७०

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰
दु:ख तर प्रत्येकाच्याच नशिबात लिहलेले असते. पण प्रत्येकाची त्या दुःखाला सामोरे जाण्याची व  ते दुःख पचवून घेण्याची पध्दत वेगवेगळी असते. जो व्यक्ती दुःखाचा जास्त विचार करतो अन् सतत त्या दुःखाला बिलगून राहतो त्याला त्या दुःखाचा खूप ञास होतो.

 म्हणून  दुःख कीती मोठे आहे आणि त्याची मर्यादा ठरवणे हे ही आपल्याच हातात असते. म्हणून सर्व दुःख विसरुन हे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.

 कारण हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते  आयुष्य खुप सुंदर आहे., फक्त तुम्ही ते जगायला शिका.
========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ६९

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 विचारपुष्प  🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰

आपण आपल्या सकारात्मक विचारातूनच यशाची 👍 शिखर काबीज करु शकतो. नकारात्मक विचारातून आपल्या मस्तकावर संकटांचे डोंगर कोसळत असतात.
संकटे आली की ती एकटीच येत नाहीत . चारी बाजूने संकटे येतात. अशा संकटांना तोंड देण्यात आपले श्रम, संपत्ती , वेळ खर्च होत असतो.
शेवटी वाटतं की , आपण जगायचं तरी कशासाठी? आपण आनंदासाठी जगायचं आहे  या गोष्टीचा विसर पडला की, आपली शोकांतीका होत असते.

अखेर जीवन म्हणजे आहे तरी काय ?
 जीवन ही एक  संधी आहे. तसेच ' जीवन हा एक संघर्ष आहे '.
संधी म्हटलं की आपणास काहीतरी मिळण्याची आशा असते.
संघर्ष म्हटलं की लढत-झगडत काही मिळेल किंवा नाही याची शंका असते.

जीवनाची वाट चालताना यश आणि यशातून आनंद मिळवायचा असेल तर आपण आपल्या सर्व जबाबदाऱ्या वेळेवर , योग्य प्रकारानं पार पाडल्या पाहिजेत. माणसं नकारात्मक विचारानं जगू लागली की दुःखी होतात.
आपल्याजवळ काय आहे यापेक्षा आपल्याजवळ काय नाही याकडं माणसाचं अधीक लक्ष असतं. त्यामुळं दुःख करण्यातच काळ निघून जातो.
आत्मविश्वास आणि धाडस असेल तर माणूस शून्यातून शिखराकड जाऊन पोहचतो.
आशा आणि श्रध्दा नावाचे चक्षू 👀 ज्यांना लाभले आहेत त्यांना आपल्या जीवनाची उंच शिखरं गाठता येतात.

काळ्याकुट्ट ढगाला रुपेरी किनारा असते. या विचारांची शिदोरीच आपणास ध्येय गाठण्यासाठी मदत करेल !

========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

कथा क्रमांक २८.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग २८📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ निस्वार्थी  जगणे ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
सांयकाळी समुद्रकाठी फिरताना एक वृद्धानं ,,,
एका लहानग्याला किना-यावर काहीतरी उचलून
समुद्रात फेकताना पाहिलं
आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर
तो समुद्राकाठचे
तडफडणारे तारामासे एक-एक करुन
पुन्हा समुद्राच्या पाण्यात फेकत होता.

न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं,
"समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत,
तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस ??..
मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फरक
पडणार आहे?

"त्या मुलाने आणखी एक मासासमुद्रात फेकत
निरागसपणे उत्तर दिलं,
"यानं जगाला काय फरक पडेल ते माहीत नाही.
पण या माशाला विचारा, "त्याला काय फरक
पडला ?"
ज्याचा मी नुकताच जीव वाचवला....
तात्पर्यः
आयुष्य असचं जगायचं असतं
कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं
असतं,
स्वत च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे
असतं.....!!
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

पाउल आणि पाय ( कविता )

पाउल आणि पाय
दिसायला एकच वाटतात
पण त्यांचे संदर्भ
खूप वेगळे असतात.

पाउल नाजूक आणि
मुलायम असते
तर पाय मजबूत आणि
भक्कमपणा दाखवतो.

पाउल आपल्या खुणा उमटवतो
तर पायाचे ठसे असतात.

पावलावर पाउल ठेवणे
गरजेचे असते
तर पायावर पाय ठेवणे
सर्वमान्य नसते.

पावलांचा मागोवा घेतात
तर पायाचा माग काढणे
तसे अवघडच.

पाउलखुणा एका तरल
प्रवासाची सुरवात करतात
व त्यातून बनते पाउलवाट,
तर पायांनी सुरु होते पायवाट
जी मुख्य रस्त्यावर नेउन सोडते.

पाउलवाट अस्पष्ट असते
तर पायवाट सहजी गवसते.

पाउलवाटेवर कोणाची
साथ मिळेलच
याची खात्री नसते
तर पायवाट अनेकांच्या
चालण्याने बनते.

पाउलवाट वैयक्तिक असल्याने कधीही संपू शकते तर पायवाट वापरून जास्त सक्षम बनत जाते.

पाउल एक मानसिकता
असते व्यक्तीची
तर पाय मानसिकता
असते अनेकांची.

पाउल जपून टाकायचे असते
तर पाय रोवायचा असतो.

पाउल घसरते
तर पाय अडकल्याने
लवकर निघत नाही.

पाउल वाकडे पडले तर
पायांचा मार्ग व दिशा चुकू शकते आणि एकदा उचललेले पाउल
मागे घेता येत नाही.

कमकुवत मनाला आपल्याच पावलाच्या आवाजाने दचकायला होते तर अनेक पायांचा दमदार आवाज खूप धीर देणारा असतो.

जीवनात टाकलेले पहिले
पाउल कौतुकाचा भाग असतो
तर जीवनभर केलेली पायपिट
एक अटळ गरज असते,
कधी स्वत:साठी तर
अनेकदा इतरांसाठी.

जन्माला येताना स्वत:च्या
पावलांनी न येणारे आपण
जातानाही आपल्या पायांनी
जात नाही एवढेच काय ते साम्य
या दोघात असते.

एका पावलाने सुरु झालेले
जीवन दोन पायांच्या सहाय्याने बिनातक्रार पूर्ण करणे यालाच जीवनयात्रा म्हणतात.....

👣👣👣👣👣👣👣👣👣

विचारपुष्प ६८

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 विचारपुष्प  🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
पूर्वीच्या काळी ज्ञानी लोक पर्वताच्या गुफांमध्ये किंवा नद्यांच्या सानिध्यात राहून आपली बुद्धी ध्यान , चिंतन  यात एकाग्र करीत असत.

त्यामुळे पर्वत आणि नद्या यांच्यातील औदार्याचा गुण त्यांच्यात येई ते उदारबुध्दीचे होत.
   पर्वत आपल्याला मिळालेले पावसाचे पाणी दूरपर्यंत पोचवतात. त्याचा लाभ अनेक जीवमाञांना होतो.  या त्यांच्या उदारतेमुळे पर्वत जितके देतात ,  तितके ते पुन्हा मिळवतात. जितके द्याल, तितके मिळेल , हा सृष्टीचा नियम आहे.

    😊 मनुष्याच्या ह्दयात 💗 जर उदारता येईल , तर त्याचे जीवनही संपन्न होईल.
स्कंद पुराणातील एक सुंदर 👌 वचन आले आहे , " दान केल्याने कीर्ती वाढते , !धनाचा संचय केल्याने नव्हे.  पाणी💦 देणारा मेघ 🌧 वर असतो व पाण्याचा संचय करणारा सागर खाली 🌎 असतो ".

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ६७.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

जीवनाचा जाळ मोठ्या विपरीत तान्या-बान्यानी विनला गेला आहे.जे दृष्टीगत होते ते वास्तविक नाही आणि जे आम्हाला दिसत नाही ज्याच्याशी आमचा संबंध नाही ते वास्तविक आहे.                            
     सत्य आहे दोन विपरीत किनाऱ्यांच्या मध्ये वाहनार्या नदीचे नाव जीवन सरीता आहे पूर्वेने पश्चिमेकडील याञेवर निघणाऱ्या सूर्याचे नाव🌞जीवन आहे .        

लोक उगवत्या 🌞सूर्याला तर🙏प्रणाम करतात.परंतु डुबत्या सूर्याला कोणी प्रणाम करत नाही.हीच जीवनाची भूल आहे.जन्म आणि मरणाच्या मध्ये जीवनाचे नीर वाहते,या दोन तटांमध्ये जीवनाची धारा वाहते.      

  जसे जन्माच्या सोबत मृत्यू आणि मृत्यूच्या सोबत जन्माची छाया चालते.

   🌳 सावलीला कोणी पण कधीही वेगळे करू शकत नाही.कोणाच्या सावलीवर पाय ठेवून उभे राहून जा सावली पायाच्या वरती येवून जाईल डोक्याच्या वरती येऊन जाईल परंतु नष्ट होणार नाही.मृत्यूची पण हीच स्थिती आहे.

आपण जेव्हापर्यंत संसारामध्ये कर्माच्या सूर्याच्या 🌞खाली चालत आहात.तेव्हापर्यंत जन्म मरणाच्या छायेचा अंत करू शकत नाही.
   म्हणून आपले चांगले कर्मच आपल्या कामी येतात.
"मनुष्याच्या रुपामुळे किंवा कुळामुळे त्याचा गौरव वाढत नाही.माणसाच्या कार्यामुळे,त्याच्या कर्तूत्वामुळेच त्याचा गौरव वाढत असतो."

शेवटी 🙏'कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो'.

🙏'कर्मे ईशू भजावा'.🙏
========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
हदगाव, नांदेड
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

कथा क्रमांक २७.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग २७. 📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ कलियुग  ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
कलियुग काय आहे?

एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?"

या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो." असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली. सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले.

जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे. या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले.

भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या.
एका विहरीभोवती चार विहीरी होत्या. चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती.हे पाहून भीम चक्रावून गेला.

नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे. जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली. पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते. खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले. तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते. हे पाहून नकूल गोंधळून गेला.

सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली. ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली. यावेळी सहदेवही चकीत झाला.

या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला.
श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला.
"कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती.

कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील.
श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही.

कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले.

कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण
करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले."

कलियुगातील मुद्दे-

१) धर्मगुरू ज्ञानी असतील पण ते साधकाचे शोषण करतील.
२. श्रीमंत लोक गरीबांना मदत करणार नाहीत.
३) पालक आपल्या मुलांवर खूप प्रेम करतील, त्याने मुलांचे आयुष्य उध्वस्त होईल.
४) लोकांच्या चारित्र्याचे अधःपतन होईल फक्त देवाचे नावचं त्यातून त्यांचे संरक्षण करील.

या कथेतून श्रीकृष्णाला आपल्याला फक्त कलियुग कसे असेल एवढेच सांगाचे नाही तर या कलियुगात आपण कसे राहिले पाहिजे हेही सांगितले आहे. आपण कसे वागले पाहिजे हे पाहू.

१) आपली आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी आपण आपला आध्यात्मिक गुरू निवडताना डोळसपणे, विचारपूर्वक निवड केली पाहिजे, म्हणजे शोषणाचा प्रश्नच उद्भवणार नाही.
२) आपण आपल्यापरीने गरीबांना मदत केली पाहिजे.
३) आपण आपल्या मुलांवर, पालकांवर, नातेवाईकांवर इतर कोणावरही प्रेम केल पाहिजे, पण आपले प्रेम समोरच्याला त्रासदायक ठरणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे.
४) आपले चारित्र्य आपण प्राणपणाने जपायला पाहिजे
त्यासाठी आपण परमेश्वराच्या नामस्मरणाचा आधार घ्यायला पाहिजे. आपला हात आपण त्याच्या हातात दिला तर आपले चारित्र्यसंवर्धन करण्याची जबाबदारी तोच घेईल.
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड

http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

Full form words.

*Do we know actual full form of some words???*
*🔗News paper =*
_North East West South past and present events report._
*🔗Chess =*
_Chariot, Horse, Elephant, Soldiers._
*🔗Cold =*
_Chronic Obstructive Lung Disease._
*🔗Joke =*
_Joy of Kids Entertainment._
*🔗Aim =*
_Ambition in Mind._
🔗Date =
_Day and Time Evolution._
*🔗Eat =*
_Energy and Taste._
*🔗Tea =*
_Taste and Energy Admitted._
*🔗Pen =*
_Power Enriched in Nib._
*🔗Smile =*
_Sweet Memories in Lips Expression._

*🔗SIM =*
_Subscriber Identity Module_

*🔗etc. =*
_End of Thinking Capacity_
*🔗OK =*
_Objection Killed_

*🔗Or =*
_Orl Korec (Greek Word)_

*🔗Bye =*
_Be with you Everytime._

*share these meanings as majority of us don't know -*

विचारपुष्प ६६

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 विचारपुष्प  🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळं अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आवाहन करा त्या सूर्याला!!!!!
 मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन ध्येयापर्यंत पोहचण्याची म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा......
========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

कथा क्रमांक २६

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग २६.📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ रागावरील उपाय ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
बंकेई नावाच्या एका गुरूकडे एकजण गेला आणि म्हणाला, मला फार
राग येतो, त्यावर काहीतरी उपाय सांगा.

बंकेई म्हणाले, एकदम सोपी गोष्ट आहे. राग आला की धावत
माझ्याकडे यायचं.

एकदा तो धावत आला बंकेईकडे.
बंकेई म्हणाले, हां, आता दाखव तुझा राग कुठे आहे तो?
तो म्हणाला, इकडे धावत येईपर्यंत तो गेला.
बंकेई म्हणाले, अर्रर्र, घोटाळा झाला. रागावर उपाय करायचा, तर तो
असला पाहिजे ना. हरकत नाही. पुढच्या वेळेला राग आला की ये.

असं दोनचार वेळा झालं.
राग आला की तो धावत यायचा.
बंकेईंना भेटेपर्यंत राग निघून जायचा.

मग बंकेईंनी एक दिवस त्याला समोर बसवून सांगितलं, आतापर्यंतच्या
आपल्या सगळ्या उपक्रमातून आपल्याला काय कळलं? राग हा काही
तुझ्या आत नाहीये, तो बाहेरून येतो आणि बाहेर निघून जातो, बरोबर?

तो माणूस म्हणाला, बरोबर.

बंकेई म्हणाले, शिवाय तो आल्यावर त्याला काही करायला गेलं की
तो त्याआत गायब होतो, बरोबर?

तो माणूस म्हणाला, बरोबर.

बंकेई म्हणाले, जेव्हा तो येतो, तेव्हा तो तुझ्या शरीराचा ताबा घेतो.
तुझ्याकडून मारहाण, आरडाओरडा असे अनेक प्रकार करून घेतो. बरोबर?

तो माणूस म्हणाला, बरोबर.

बंकेई म्हणाले, मग आता एकच उपाय आहे. एक काठी घ्यायची. आपल्याला
राग आला रे आला की स्वत:ला काठीने झोडपून काढायचं. बघ, त्या
रागावर तुझ्या रागाची अशी दहशत बसेल की पुन्हा तुला
कधीही राग यायचा नाही.

तात्पर्यः
राग हा क्षणीक असतो.त्याने माणसाचे नुकसानच होते.म्हणून राग आल्यावर शांत बसून मौन पाळणे हे सर्वांच्याच हिताचे राहील.
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

कविता .गुरुजी

खरच सांगा गुरुजी
===========================
खरच सांगा गुरुजी.कोण कुठं चुकलं
शाळेमध्ये पोरगं नेमकं काय शिकलं
काॅप्या पुरवुन शाळेचं
   काम तुम्ही खास केलं ,
      दहावीचं पोर माझं
       झटक्यात पास केलं !
       पोरासगट माझा
      सत्कार जाहिर झाला.
      सत्काराचा माझ्या गाजावाजा
      गावभर झाला !
माझ्यासह संस्थेचं, नाव त्यानं राखलं
खरच सांगा गुरुजी,कोण कुठं चुकलं
       टक्केवारी वाढवुन
       पगार तुमची वाढली,
      पगाराची नशा
       दारुसारखी चढली !
       अाता पोरगं अाकरावीत
      भुगोल गणित पचेना .
       इंग्रजीतर सोडाच
       मराठीही वाचेना !
परिक्षेच्या भट्टीत ,कच्चं अांम्बं पिकलं
खरच सांगा गुरुजी,कोण कुठं चुकलं
        अाकरावीतुन बारावीत
        तसच तुम्ही रेटलं,
        फॅशनचे कपडे घालुन
        नटावणी नटलं !
        बारावीच्या नखर्‍याला
        खुदकन हसलं,
       चार विषयात पोरगं
       गळ्याइतकं फसलं !
मायेनं पदराखाली,अाम्ही त्याला झाकलं
खरच सांगा गुरुजी कोण कुठं चुकलं
       शाळंसाठी पोराच्या
       नवं साल धरलं.
       विकु म्हणते अाई त्याची
       गळ्यातिल डोरलं !
       शाळा शिकुन पोरगं
      लय लय मोठं होईल,
      अाईच्या सपनाला
      सुखाचं फुल येईल !
सुखाचं सपान , डोळ्यातच सुकलं
खरच सांगा गुरुजी,कोण कुठं चुकलं
       शाळंला पोरानं
       राम राम ठोकला,
       पुस्तकाचा डिगारा
       किलोवर विकला !
      अाता पोरगं हॅाटेलात
      काम करु लागलं,
      खंगलेल्या संसाराला
      धिर देवु लागलं !
अायुष्याच्या प्रवासात कोण काय शिकलं
खरच सांगा गुरुजी,कोण कुठं चुकलं
शाळेमध्ये पोरगं नेमकं काय शिकलं

विचारपुष्प ६६.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
फळे देणारे झाड आणि गुणवान
व्यक्तिच फक्त झुकतात.....

सुकलेल झाड आणि मुर्ख
व्यक्ति कधीच झुकत नाही.....

प्रशंसा ही कर्तुत्वाचीहोत असते.
नाहीतर सावली सुद्धा माणसा पेक्षा मोठी असते.
========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 शब्दांकन/संकलन  🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ६५.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.
कारण मोत्यांच्या हारांनी फक्त त्याचं सौंदर्य दिसतं,
आणि घामाच्या धारांनी त्याचं कर्तुत्व सिद्ध होत....!!!

मन तर देवाने प्रत्येकाला दिले
आहे पण दुसरयाचे मन जिंकता
 येणारे "मन" काही ठराविक
लोकानांच दिले आहे !!                            
========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 शब्दांकन/संकलन 🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

घोषवाक्य

प्रभातफेरीसाठी घोषवाक्ये

: एक दोन तीन चार
मुला-मुलींना शिकवू छान
[
: मुलगा मुलगी एकसमान
दोघांनाही शिकवू छान
[
: एक दोन तीन चार
 जि.प.शाळा छान छान
[
‬: चला चला शाळा झाली सुरू,
नका नका घरी आता राहू.
[
 सुंदर छान माझी शाळा.             गावाचा अभिमान माझी शाळा.🙏🏻🙏🏻
[
‬: चला जाऊ शाळेला
नव्या गोष्टी ऐकायला
[
 जि.प.शाळेची मुले न्यारी
गुणवत्तापूर्ण शिक्षण घेई
[
छान छान छान किती छान
नव्या पिढीचा मी अभिमान
[
 लहान मुले देवाघरची फुले अशीच माझ्या शाळेतील बाळे
[
‬: मला जायचंय शाळेला
नवं काहीतरी शोधायला
[
 लहान मुलांना लावी लळा
जि.प.ची मराठी शाळा  ।।
[
‬: एक दोन तिन चार
मराठी शाळेची मुले हुशार।।
[
 सब पढ़े सब बढे
अज्ञान से हम लडे
[
शाळा माझी सजली रे सजली रे,                                   मुले खेळ गाण्यात रमली रे रमली रे.
[
: करु नका लेकरांच्या जीवनाचा घाटा.     मुलगा असो की मुलगी  शाळेत नाव टाका.
[
: जिप शाळेची मुले लय भारी,
ज्ञानरचनावादाने शिकतात सारी ।
[
: आई आई मला आता शिकू दे,    सावित्री ताराराणीचा वसा मला चालवू दे.
[
चला शिकू या,पुढे जावू या
जिल्हा परिषद शाळेत,प्रवेश घेऊ या.

अर्थ बाराखडीचा

बाराखडीचाअर्थ इतका समर्पक असू शकतो, क, ख, ग काय सांगतं, जरा विचार करून बघा.
क - क्लेश करू नका.
ख - खंत करू नका.
ग - गर्व करू नका.
घ - घाण करू नका.
च - चिंता करू नका.
छ - छळ करू नका.
ज - जबाबदारी स्वीकारा.
झ - झाडे लावा.
ट - टिप्पणी करु नका.
ठ - ठगु नका.
ड - डाग लागु देऊ नका.
ढ - ढ राहु नका.
त - तत्पर राहा.
थं - थूंकु नका.
द- दिलदार बना.
ध - धोका देऊ नका.
न - नम्र बना.
प - पाप करु नका.
फ - फ़ालतू काम करू नका.
ब - बिघडु नका.
भ - भावुक बना.
म - मधुर बना.
य - यशस्वी बना
र - रडू नका.
ल - लोभ करू नका.
व - वैर करू नका.
श - शत्रुत्व करू नका.
ष - षटकोनासारख स्थिर राहा.
स - सेवा करा.
ह - हसतमुख राहा.
क्ष - क्षमा करा.
त्र - त्रास देऊ नका.
ज्ञ - ज्ञानी बना.

श्यामची आई - थोर अश्रू

*श्यामची आई — सानेगुरूजी*
             *थोर अश्रू*


लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे.' श्यामने सुरूवात केली.

'संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छाप्पोपाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्षुंबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापवून ठेवीत असे. आई घंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई. दोन्ही वेळा स्नान करण्याची पध्दत फार चांगली. रात्री निजण्याचे आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते. निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो, हे मनाचे स्नान, शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते.

एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो. आंघोळीची एक मोठी धोंड होती. आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलास जात होते. संध्याकाळची आंघोळ; तिला फारसे पाणी लागत नसे. आईने खसखसा अंग चोळून दिले. उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो. पाणी संपले व मी हाका मारू लागलो.

'आई! अंग पूस माझे; पाणी सारे संपले. थंडी लागते मला. लवकर अंग पूस.' मी ओरडू लागलो. माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते. वडील पुरुषमंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत. एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे. संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुशी.

आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, 'देवाची फुले काढ.'

मी म्हटले, 'माझे तळवे ओले आहेत; त्यांना माती लागेल. माझे खालचे तळवे पूस.'

'तळवे रे ओले असले म्हणून काय झाले? कशाने पुसू ते?' आई म्हणाली.

'तुझे ओचे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन. पाय टिपून घेईन व मग उडी मारीन. मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली. पसर तुझा ओचा.' मी घट्ट धरून म्हटले.

हट्टी आहेस हो श्याम अगदी. एकेक खूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक! हं ठेवा पाय.' आईने आपले ओचे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेविले, नीट टिपून घेतले व उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले, त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडेच ते त्या वेळेस बदलता येणार होते? परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये, त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही?

मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो. आई निरांजन घेऊन आली व म्हणाली, 'श्याम! पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस! तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुध्द बुध्दी दे म्हणून.'

गडयांनो ! किती गोड शब्द! आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत. बूट स्वच्छ रहावे म्हणून बूटपुश्ये आहेत, अंगाला लावायला चंदनी साबण आहेत. शरीरास व कपडयास मळ लागू नये म्हणून सा-यांचे प्रयत्न आहेत; परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो? देवळाला रंग देतो; परंतु देवाची वास्तपुस्तही घेत नाही. मन मळले तर रडतो का कधी? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा. ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत. कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले, तर येऊन सारे रडतात. या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळयाजवळ भरलेले आहेत; परंतु मी अजून शुध्द, निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का? अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे, असे मनात येऊन कितीकांस वाईट वाटते? मीराबाईने म्हटले आहे.

'असुवन जल सींच प्रेमवेलि बोई ।'

अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची, ईश्वरी भक्तीची वेल मी वाढविली आहे. हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो. अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो!'

कवीता.

सध्यस्थितीवरील कविता - Sharing.

लोकशाही…२०१६

ना ’शरदा’चे चांदणे
ना ’सोनिया’चा दिस
’घड्याळा’चे ओझे ’हाता’ला
म्हणून ’आय्‌’ कासावीस!

’कमळा’च्या पाकळ्यांची
’यादवी’ छ्ळते मनाला
’धनुष्य’ आलयं मोडकळीस
पण जाणीव नाही ’बाणा’ला!

’विळा, हातोडा’ आणि ’कंदीला’ला
आजच्या युगात स्थान नाही
डब्यांना ओढू शकेल एवढी
’इंजिना’त जान नाही!

’मन’ आहे ’मुलायम’
पण ’माया’ कुठेच दिसत नाही
’हत्ती’वरून फिरणारा
’सायकल’वर बसत नाही!

कितीही उघडी ठेवा ’कवाडे’
’प्रकाश’ आत जाणार नाही
विसरलेले ’आठवले’ तरीही
’गवई’ गीत गाणार नाही!

’बंडखोर पक्षां’चा थवा
’पार्टी’साठी आतूर
कुंपणच खातय शेताला
आणि बुजगावणंही फितूर!
...🌿👽💫

दहा सर्वश्रेष्ठ प्रश्न ?

दहा सर्वश्रेष्ठ प्रश्न .....
*1*- विश्वातली सर्वात सुंदर निर्मिति कोणती ?
उत्तर- *माता*..

*2*- सर्वश्रेष्ठ फूल कोणते आहे ?
उत्तर- *"कापसाचे फूल"*

*3*- सर्वश्र॓ष्ठ सुगंध कोणता आहे ?
उत्तर- *पावसाने भिजलेल्या भूमिचा सुगंध*..

*4*-सर्वश्र॓ष्ठ गोडवा कोणता ?
उत्तर- *"वाणीचा"*

*5*- सर्वश्रेष्ठ दूध-
उत्तर- *मातेचे*..

*6*- सर्वात काळे काय आहे ?
उत्तर- *"कलंक"*

*7*- सर्वात वजनदार काय आहे ?
उत्तर- *"पाप"*

*8*- सर्वात स्वस्त काय आहे ?
उत्तर- *सल्ला*..

*9*- सर्वात महाग काय आहे ?
उत्तर- *"सहयोग"*

*10*-सर्वात कडू काय आहे ?
उत्तर- *"सत्य"*...

*खुप सुंदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर...*

प्रश्न : आयुष्य म्हणजे काय ????
उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला " *नाव* '' नसतं पण " *श्वास*'' असतो आणि ...
ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त *"नांव''* असतं पण *"श्वास"* नसतो.
*" नाव ''* आणि *" श्वास "* यांच्या मधिल अंतर म्हणजेच *"आयुष्य"*...
🌹🌷🌹🌷🌹🌷

विचारपुष्प ६४.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰                  
आत्मविश्वास फार मोठी शक्ती आहे.तिच्या जोरावर असामान्य यश मिळविता येते.

केवळ बंदुका लढत नसतात तर त्यांच्या पाठीमागचे मन व मनगट लढत असते.आत्मविश्वास नसेल तर सर्व शारीरिक व मानसिक शक्ती निष्फल ठरतात.

'आत्मविश्वास हे कर्तृत्वाचे तत्त्व आहे'.
========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

कथा क्रमांक २५.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग  २५.📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻  जीवनवाट ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
अब्राहम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा संसदेत भाषण करण्यासाठी गेले.
सर्व सिनेट सदस्यांनी भरलेल्या सभागृहात त्यांना आपलं अध्यक्ष म्हणून पहिलं भाषण करायचं होतं.
त्या भरलेल्या सभागृहात लिंकन पोहोचले आणि भाषण सुरु करण्यापूर्वी एक जेष्ठ सदस्य,जे अत्यंत श्रीमंत उद्योगपती उठून उभे राहिले आणि लिंकन ला उद्देशून म्हणाले,
" मि. लिंकन, तुम्ही हे विसरू नका कि तुमचे वडील माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी बूट बनवत होते "
सगळे उपस्थित जोरात हसले आणि त्यांना वाटलं कि याने लिंकन यांना एक जोरदार चपराक लावली आहे आणि त्यांची लायकी दाखवली आहे.
मात्र काही व्यक्ती कशाच्या बनलेल्या असतात कोणास ठाऊक?
ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाचं संतुलन ढळू देत नाहीत आणि आपल्या हजरजबाबी विद्वत्तेने समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करून आपला मोठे पणा सिद्ध करतात,
ते हि अगदी शांतपणे !! लिंकन हि असेच !!
सभागृह काय होणार याकडे जीव कान आणि डोळ्यात आणून पहात होतं.
प्रेसिडेंट लिंकन यांनी सरळ सरळ त्या व्यक्तीवर नजर रोखून धरली ,आणि त्याला म्हणाले ,
"सर , मला माहित आहे हे , कि माझे वडील आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी बूट बनवत होते तसेच इथे अनेक इतरही सदस्य आहेत कि ज्यांच्या कुटुंबासाठी माझे वडील बूट आणि पादत्राणे बनवत होते कारण त्यांच्या सारखी पादत्राणे इतर कोणीच बनवू शकत नव्हतं "
" ते एक कलाकार होते, ते एक निर्माते होते , त्यांच्या हातात जादू आणि कला होती , त्यांनी बनवलेल्या चप्पल -बूट फक्त ह्या फक्त चपला आणि बूट नव्हते , आपलं संपूर्ण मन आणि कसब ते त्यात ओतून अत्यंत काळजीपूर्वक हे काम ते करत होते,
मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे,तुम्हाला या पादत्राणाविषयी काही तक्रार आहे काय?
कारण हे कसब मलाही अवगत आहे कि हे बूट कसे बनवायचे.आपली काही तक्रार असेल तर नक्की सांगा मी आपल्याला एक नवीन बुटांचा जोड बनवून देईन.
पण माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत माझ्या पिताजींनी बनवलेल्या बुटांविषयी अजून तरी कोणाची काहीच तक्रार आलेली नाही.
ते एक अत्यंत हुशार आणि मनस्वी कलाकार आणि कारागीर होते आणि माझ्या वडिलांचा मला आजही सार्थ अभिमान आहे !!!"

सर्व सभागृह बधिर झाल होतं ,कोणाला काय बोलाव हे सुचत नव्हतं,
अब्राहम लिंकन हि काय व्यक्ती आहे याची एक छोटीशी झलक आणि चुणूक या प्रसंगातून सगळ्यांना दिसली होती.आणि त्यांना त्यांच्या वडिलांचा अभिमान असल्याचा आता त्यांनाही अभिमान वाटू लागला होता.

तात्पर्यः
 प्रसंग कसाही असो आपला तोल जावू देवू नका,
कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या
" आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही " हे वाक्य मनावर कोरून ठेवा आणि कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनशांती ढळू देवू नका
" काय घडलंय यामुळे आपण दुखावले जात नसतो तर घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते!!
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड

http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

श्यामची आई.

*श्यामची आई — सानेगुरुजी*
 
 *रात्र पहिली — सावित्री व्रत*

आश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो. अंधारात एक किरणही आशा देतो. सध्याच्या निष्प्रेम काळात 'मला काय त्याचे' अशा काळात, असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय. त्या भ्रातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडले असते. तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला- साचीव जीवनाला- स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय.

गावात सर्वत्र शांतता होती. आकाशात शांतता होती. काही बैलांच्या गळयांतील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता. वारा मात्र स्वस्थ नव्हता. तो त्रिभुवनमंदिराला सारखा प्रदक्षिणा घालीत होता. आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता. श्यामने सुरूवात केली:

"माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते, तरी सुखी होते. माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती. माझ्या आईचे माहेर गावातच होते. माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते. माझी आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत. आवडी! खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे. बयो ! खरेच ती जगाची बयो होती; आई होती. माहेरची गडीमाणसे कांडपिणी, पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला 'बयो' म्हणून हाक मारीत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ! ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे !

"माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती. माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती. तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत. माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते. सासर श्रीमंत होते. सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात. निदान ते तरी स्वत:ला तसे समजत. आईच्या अंगावर सोन्यामोत्याचे दागिने होते. पोत, पेटया, सरीवाकी, गोटतोडे, सारे काही होते. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते. सासरी ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगले ल्यायला, चांगले खायला होते. एकत्र घरात कामही भरपूर असे. उत्साही परिस्थितीत, सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही. उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो.

"मित्रांनो ! माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा-अठरा वर्षांचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती. कारण आजोबा थकले होते. वडीलच सारा कारभार पाहू लागले. देवघेव तेच पाहात. आम्ही आमच्या वडिलांस भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत. आजूबाजूच्या खेडयांतील लोक आम्हांला खोत म्हणून संबोधीत.'

"खोत म्हणजे काय ?' भिकाने प्रश्न विचारला.

श्याम म्हणाला, 'खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल.'

"त्याला काही मिळत नाही का?' रामने विचारले.

"हो, मिळते तर ! सरकारी शेतसा-याच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो. खोत गावातील पिकांची आभावणी करतो. पिकांचा अंदाज करतो. 'याला पीक धरणे' असे म्हणतात. एखाद्या शेतात पीक चांगले नसले, तरी चांगले लावतात! लोकांनी वसूल दिला नाही, तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात. ठरल्या वेळी खोताने शेतसा-याचे हप्ते- वसूल आला नसला, तरी पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजेत!'

"आमच्या व-हाड - नागपुराकडे मालगुजार असतात, तसाच प्रकार दिसतो.' भिका म्हणाला.

गोविंदा उत्कंठेने म्हणाला, 'पुरे रे आता तुमचे ! तुम्ही पुढे सांगा.'

श्यामने पुन्हा गोष्टीला सुरूवात केली.

"आम्ही वडवली गावचे खोत होतो. त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती. धो धो पाणी वाहत असे. दांड बांधून दुरून पाणी आणले होते. ते उंचावरून पडत असे. बागेत केळी, पोफळी, अननस लावलेले होते. निरनिराळया जातीची फणसाची झाडे होती. कापे, बरके, अर्धकापे; तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हांस मी दाखवीन. ती बाग म्हणजे आमचे वैभव, आमचे भाग्य असे म्हणत; परंतु गडयांनो! ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते ! पाप क्षणभर हसते व कायमचे रडत बसते. पाप थोडा वेळ डोके वर करते; परंतु कायमचे धुळीत मिळते. पापाला तात्पुरता मान, तात्पुरते स्थान. जगात सद्गुणच शुक्राच्या ता-याप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपत राहतात.

"खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे. बोलावले तर गेले पाहिजे; नाहीतर खोताचा रोष व्हावयाचा. गावातील कष्टाळू बायकामाणसांनी वांगी लावावी, मिरच्या कराव्या; कणगरे, करिंदे, रताळी लावावी; भोपळे, कलिंगडे यांचे वेल लावावे. परंतु या सर्वांवर खोताची नजर असावयाची. खरोखर या जगात दुस-याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही. दुस-याला राबवून, रात्रंदिवस श्रमवून, त्यांना तुच्छ मानून आपण गाद्यागिर्द्यांवर लोळावे, यासारखा अक्षम्य अपराध नाही. माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले? पाणीदार मोत्यांची नथ ! खेडयातील गरीब बायकांच्या डोळयांतील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती. त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोटतोडे करण्यात आले होते. परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यावयाचे होते. तो माझ्या आईला जागे करणार होता.

"माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही; परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे. कोणी ऐकली नाही की, तर त्यांना वाटे हे कुणबट माजले ! कुणब्याला कुणबट म्हणावयाचे व महाराला म्हारडा म्हणावयाचे, अशी ही पध्दत ठरलेली ! असे म्हणताना आपणच माजलो आहोत, सत्तान्ध झालो आहोत, हे ह्यांच्या लक्षातही येत नसते.

"वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला; तथापि, त्यांना फारसा अनुभव आला नव्हता. खोतपणाच्या तो-यात एखादे वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखविली जात. पूर्वजांचीही पापे होतीच. पाप किंवा पुण्य काही मरत नाही. जगात काही फुकट जात नाही. जे पेराल ते पिकेल; जे लावाल ते फोफावेल, फळेल.

"एकदा काय झाले, ती अवसेची रात्र होती. भाऊ वडवलीस गेले होते. सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते. आज गावाला जाऊ नका, आज अवस आहे, वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले; परंतु भाऊ म्हणाले, 'कसली अवस नि कसला शनिवार! जे व्हावयाचे ते होणार. प्रत्येक दिवस पवित्रच आहे. प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो.' ते वडवलीस गेले. दिवसभर राहिले. तिन्हीसांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले.

घरोब्याच्या एका म्हातारबाईने सांगितले, 'भाऊदा! तिन्हीसांजा म्हणजे दैत्याची वेळ. या वेळेस जाऊ नका. त्यातून अवसेची काळरात. बाहेर अंधार पडेल. तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल. येथेच वस्तीला रहा. कोंबडयाला उठून थंड वेळेस जा.' भाऊंनी ते ऐकले नाही. ते म्हणाले, 'म्हाता-ये ! अग, पायाखालची वाट, झाली रात्र म्हणून काय झाले? मी झपाझप जाईन. दूध काढतात, तो घरी पोचेन.'

भाऊ निघाले. बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द 'जाऊ नका' सांगत होता. फळणारी पापे 'चल, राहू नको', म्हणत होती. गावातील लोकांनी निरोप दिला. एक जण भेसूर हसला. काहींनी एकमेकांकडे पाहिले. भाऊ व गडी निघाले. अंधार पडू लागला. परमेश्वराचे, संताचे व सतीचे अश्रू चमकू लागले.

वडवली गावापासून दीड कोसावर एक प-ह्या होता. पावसाळयात त्याला उतार होत नसे. तो प-ह्या खोल दरीतून वहात होता. त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती. त्या झाडीत वाघसुध्दा असे. तेथून दिवसाढवळयाही जावयास नवशिक्यास भय वाटे ! परंतु भाऊ निर्भयपणे जात होते. त्यांना भीती माहीत नव्हती. भुतेखेते, जीवजीवाणू, कसलेच भय त्यांना वाटत नसे.

भाऊ दरीजवळ आले. एकदम शीळ वाजली. भाऊ जरा चपापले. पाप हे भित्रे असते. झुडुपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले. भाऊरावांच्या पाठीत सोटया बसला व त्यासरशी ते मटकन खाली बसले. झटकन् गडी पळत गेला. भाऊंना खाली पाडण्यात आले. मांगांच्या हातातील सुरे चमकत होते. भाऊंच्या छातीवर मांग बसला. चरचर मान चिरायची ती वेळ. करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते. शेजारच्या भवनातून एक भुजंग फूत्कार करीत सणकन निघून गेला. मांगाचे तिकडे लक्ष नव्हते. इतक्यात एका म्हातारीने ओरड केली, 'अरे, बामणाला मारले, खोताला मारले, रे, धावा !' ते मांगही जरा भ्यायले.

भाऊ त्या मांगांना म्हणाले, 'नका रे मला मारू ! मी तुमचे काय केले? सोडा मला. ही आंगठी, ही सल्लेजोडी, हे शंभर रुपये घ्या. सोडा मला!' दीनवाणेपणाने त्या मांगांना ते विनवीत होते.

म्हातारीच्या ओरडण्याने कोणी तरी येत आहे, असे दिसले. कोणाची तरी चाहूल लागली. मांगांनी त्या आंगठया, ती सल्लेजोडी, ते शंभर रूपये घेतले व त्यांनी पोबारा केला. ते मांग काही खरे खुनी नव्हते. या कामात मुरलेले नव्हते. पण दारिद्रयामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते. त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती, प्रेम होते. स्वत:च्या मुलाबाळांच्या प्रेमाने, त्यांची खा खा दूर व्हावी म्हणून, ते मांग तो खून करू पहात होते. कोणी म्हणतात की, जगात कलह, स्पर्धा हेच सत्य आहे. परंतु त्या कलहाच्या मुळाशी, या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे. ते प्रेम संकुचित आहे एवढेच. सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे, युध्द नाही. सहकार्य आहे, द्वेष वा मत्सर नाही. असो. भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला. त्याने घाब-या घाब-या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली. आमच्या घरातील व गावातील पुरूष मंडळी लगेच चालून गेली. पालगडला पोलिस ठाणे होते. तेथे वर्दी देण्यात आली.

घरात बातमी येताच आकान्त झाला. सा-यांच्या तोंडचे पाणी पळाले! घरात दिवे लागले होते; परंतु सा-यांची तोंडे काळवंडली होती. कसचे खाणे नि कसचे पिणे! तेथे तर प्राणाशी प्रसंग होता. त्या वेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो. आईला समजू लागले होते. बायकांना लवकर समजू लागते. माझी आई ती सारा कथा आम्हाला सांगे. आई देवाजवळ गेली. निर्वाणीचा तोच एक सखा. देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला. ती म्हणाली, 'देवा नारायणा ! तुला माझी चिंता, तुला सारी काळजी. आई जगदंबे ! तुझी मी मुलगी. मला पदरात घे. माझे कुंकू राख. माझे चुडे अभंग ठेव. माझे सौभाग्य-नको, आई आई! त्यावर कु-हाड नको पडू देऊ ! मी काय करू? कोणते व्रत घेऊ? देवा! माझी करूणा येऊ दे तुला, तू करूणेचा सागर. येऊ दे हो घरी सुखरूप. पाहीन त्यांना डोळे भरुन; नांदू तुझ्या आशीर्वादे सुखाने जन्मभर. मला दुसरे काही नको. नकोत हे दागिने! नकोत ती मोठी वस्त्रे! कशाला मेली ती खोती! नको मला, काही नको. पती हाच माझा दागिना. तेवढा दे देवा.' असे म्हणून आई विनवू लागली. रडू लागली.

आईने देवाला आळविले, प्रार्थिले; परंतु नुसती प्रार्थना काय कामाची? प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे, व्रत पाहिजे. माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले. मित्रांनो, जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री-पुरूष रत्ने आहेत! राम आहे, हरिश्चंद्र आहे, सीता आहे, सावित्री आहे. तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका. सावित्री अमर आहे. स्त्रियांना सदैव ती धीर देईल. मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल. मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो.

माझ्या आईचे सौभाग्य आले. भाऊ घरी आले. त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी. दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवासास सुरूवात करी. घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही. या व्रतात वटपूजा करावयाची असते. आकाशाला कवटाळू पाहाणा-या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवावयाचे. वटवृक्षाप्रमाणे कूळ वाढो, ते जगाला छाया देवो. आधार देवो, वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो. त्या प्रमाणे कुळालाही वर जाण्याची, उन्नत होण्याची सदैव इच्छा असो. वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात, त्याप्रमाणेच कुळविस्तार होवो व कुळाला बळकटी येवो. या व अशाच शेकडो भावना या वटपूजेने कळत वा नकळत बायकांच्या जीवनात येत असतील.

सावित्रीव्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे. मी त्यासंबंधीचीच एक आठवण सांगणार आहे. आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती. त्या वेळेस मी आठ-नऊ वर्षांचा असेन. सावित्रीव्रताला आरंभ होणार होता. माझी आई हिवतापाने आजारी होती. हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. या व्रतात तीन दिवस वडाला १०८ प्रदक्षिणा घालावयाच्या असतात. आईला जरा चालले तर घेरी येत होती.

आईने 'श्याम' अशी हाक मारली. मी आईजवळ गेलो व विचारले, 'काय आई? काय होते? पाय का चेपू?

आई म्हणाली, 'पाय नको रे चेपायला. मेले रोज चेपायचे तरी किती? तू सुध्दा कंटाळला असशील हो. पण मी तरी काय करू?'

आईचे ते करूण शब्द ऐकून मला वाईट वाटले. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, 'श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो. पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे, करशील ना तू बाळ?'

"कोणते काम? आई मी कधी तरी नाही म्हटले आहे का? मी म्हटले.

आई गहिवरून म्हणाली, 'नाही. तू कधीसुध्दा नाही म्हणत नाहीस, हे बघ, उद्यापासून वट-सावित्रीचे व्रत सुरू होईल. मला वडाला १०८ प्रदक्षिणा घालता येणार नाहीत. मला भोवळ येईल. कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन. पूजा करीन. तीन प्रदक्षिणा घालीन, बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ.'

असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ व करूण अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले.

"आई! माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील?' मी विचारले. 'चालतील हो बाळ, देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही. त्याला सारे समजते, कळते. तू म्हणजे मीच नाही का? अरे तू माझ्या पोटचा गोळा. माझाच जणू भाग! माझेच तू रूप! तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी, आजारी आहे हे देवाला माहिती आहे.' आई म्हणाली.

"पण मला बायका हसतील. मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत ' अहाऽ रे बायको! असे म्हणून माझी फजिती करतील. मला लाज वाटते, मी नाही जाणार! शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील.' अशा अनेक सबबी मी सांगू लागलो.

आईची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली 'श्याम आईचे काम करावयास कसली रे लाज? हे देवाचे काम. ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील. देवाचे काम करावयास लाजू नये, पाप करावयास माणसाने लाजावे. श्याम! त्या दिवशी चुलीमागचा खोब-याचा तुकडा तू घेऊन खाल्लास. मी बघितले. पण बोलल्ये नाही. जाऊ दे. मुलाची जात आहे. परंतु त्या वेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे? मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस? तो पांडवप्रताप कशाला वाचतोस? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी, धर्माघरची उष्टी काढी. काम करावयास, प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का? नसलास जाणार तर मी जाईन हो. येऊन-जाऊन काय होईल, मी भोवळ येऊन पडेन. मरेन तर सुटेन एकदाची. देवाजवळ तरी जाईन. परंतु श्याम! तुमच्यासाठीच जगत्ये रे-' असे म्हणून आईने डोळयांना पदर लावला.

आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले. 'देवाचे काम करावयास लाजू नको; पाप करण्याची लाज धर-' थोर शब्द! आजही ते शब्द मला आठवत आहेत. आजकाल ह्या शब्दांची किती जरूरी आहे? देवाच्या कामाची देशाच्या कामाची, भारतमातेच्या कामाची, आम्हास लाज वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी-सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही. पुण्यकर्म, सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट आहे ही स्थिती.

मी आईच्या पाया पडलो व म्हटले, 'आई! जाईन हो मी. कोणी मला हसो, कोणी काही म्हणो. मी जाईन. पुंडलीक आईबापाची सेवा करून मोठा झाला. देवाला बांधून आणता झाला. तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. शाळेत मास्तर रागावले, त्यांनी मारले तरी चालेल. आई! तुला माझा राग आला होय. तुला वाईट वाटले?' असे केविलवाणे मी विचारले.

"नाही हो बाळ. मी तुझ्यावर कशी रागवेन? मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम!' आई म्हणाली. गडयांनो ! मी घरी असलो व वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे. माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही. 'पाप करताना लाज वाटू दे चांगले करताना लाज नको!'