गीतः काळे ढग

काळ्या ढगांवर देवा
क्लिक कर ना माउस
आमच्या पृथ्वीवर आता
पाड ना  धो धो पाऊस

पृथ्वीच्या स्क्रीनवर देवा
सिमेंटच्या जंगलांचा कहर
बदलून दे ना आता
हिरवागार स्क्रीन सेव्हर

ऋतू चक्राचे सॉफ्टवेअर    
देवा करून घे अपडेट
नाहीतर उन्हाळ्यात गारा
अन पावसाळ्यात उन थेट

जास्त पाणी साठवण्या
हार्ड डिस्क ची वाढवून घे जागा
पावसासाठी आम्हाला का
करावा लागतो त्रागा

समुद्री वादळांचा धोका
मान्सूनला नेतो पळवून
त्यांचा बंदोबस्त कर तू  
ANTI वायरस चालवून

पाऊस झटपट पाडण्या
देवा वाढवून घे RAM
नाहीतर म्हणावे लागेल
आम्हाला हे राम

देवा इंजिनिअर बोलावून
सिस्टम अपग्रेड करण्यास सांग
नाहीतर पावसावाचून आमचे
जगणे व्हायचे HANG....
----

No comments:

Post a Comment