महीला गीत (लेक वाचवा)

भारतात आपल्या किती भारी दिवस आलेत आज,
चार ही दिशात आहे सशक्त महिलाराज ।।

तिन महिलांची जोडी लष्करात वैमानिक झाली,
पहिल्यांदाच नोटे वर महिलेची स्वाक्षरी आली।।

एकीकडे मेहबूबा आहे,
दूसरी कड़े ममता आहे,
गुजरातेत असे आनंदीबेन
जयललिता मागे जनता आहे ।।

सौंदर्यवतीत प्रियांका पुढे,
गायनात लतेला कुणाचे आव्हान आहे ?,
अन जिने महाराष्ट्र दणाणला,
येथे 'आर्ची' इतका कुणाला मान आहे ?

कल्पनाने सुनिताने अवघे अवकाश कवेत घेतले,
जमिनिवरही तीच ती,
महिलेनेच उड्डाण हवेत घेतल े।।

IAS मधे ती पहिली 10 वित व 12 वि तही
तीचाच पहिला नंबर,

शेतकरी पती करतो आत्महत्या,
तीच सांभाळते घर कसून कंबर।।

*एवढे सिद्ध करुन ही शेवटी शोकांतिक,*

*तुम्ही भ्रूणहत्या मुलींची का करावी ?*

*ती जिंकतेच् जन्मल्यावर सदा,*

*फ़क्त पोटातील लढाई तिने का हरावी ?*

*फ़क्त पोटातील लढाई तिने का हरावी ?*

No comments:

Post a Comment