हाक

हाक  ( स्त्री भृणाची  )                        

गर्भ तुझा शिंपला ग माते ,बन तू रक्षिणी
चमकू दे मोत्याला जगू दे ,खेळू दे अंगणी
भृणहत्तेचे पातक करुनी ,बनु नको वैरिणी।।

गर्भजलाच्या परिक्षणाने ,झालीस तू खिन्न
सल्ला ऐकृन आप्त जनांचा मस्तक झाले सुन्न
लाड पुरविले ज्यांनी त्यांची आज का कडवट वाणी ?।भृण

ताताश्रींच्या मातोश्रींची , शिजवू नको तू डाळ
कुर्हाडीचा दांडाच बनला ,आपल्या गोतास काळ
गर्भावरती घाव घालण्या  ,महिला डॉक्टरणी ।।भृण

द्याल जेधवा पुत्राहस्ती , प्रपंचाचा कासरा
लाचारीने व्यथित व्हाल तर, देईन मी आसरा
शिक्षण घेवून गुरगुरणारी , बनेन मी वाघीणी ।।भृण

राजा रंका जरुरी आहे , वंशा करीता वारस
लोहाचेही कनक करेन ग , बनेन मी पारस
इंदिरा ,बेदी ,मदर तेरेसा , जैसी लक्ष्मी राणी ।।भृण

बल अन् वाणीने दिनवाणी , कैसा विरोध करू ?
मशाल दोघी धरून उलथू  ,अन्यायाचा मेरू
गगनझेप घेईन बळकट ,  पंखाने पक्षीणी ।।भृण
                               
    संकलित.

No comments:

Post a Comment