कथा क्रमांक २१.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग २१.📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ पैशाचा विनियोग ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
द.अफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर अर्थिक मंदिची लाट आली होती.
प्रत्येक व्यवसायीकाचा धंदा जेम तेम चालत होता.
आशाच एका लाॅजिंग with बोर्डिंग असलेल्या हाँटेल मध्ये बाहेर देशाचा एक व्यापारी आला....
त्याने हाॅटेल मॅनेजरकडे १०००डाॅलरची नोट दिली व सांगितले की मला मुक्कामाला एक छान खोली पाहिजे....
हाॅटेल मॅनेजरने वेटरला सांगितले की साहेबांना रुम दाखवून आण पसंत पडली तर साहीत्य घेवून जा....
परदेशी पाहूणा रुम बघायला गेला.....
मधल्या वेळेत मॅनेजरने १००० डाॅलरची नोट घेतली व बेकरी वाल्याचे पैसे चूकते केले....
बेकरीवाल्याचा धंदा जेमतेमच चालत होता .
तो खूश झाला. त्याने त्या १०००डाॅलर्सची नोट घेतली व किराणा दुकानदाराची उधारी चूकती केली.....
किराणा दुकानदाराला आनंद झाला.
फार दिवसापासून कामवाल्या बाईचे पैसे देता न आल्यामुळे ती कामावर येत नव्हती....
तो लगेच तिच्याकडे गेला .१००० डाॅलर्सची नोट कामवाल्या बाईला दिली व सांगितले की आजपासून रोज कामावर येत जा...
बिचारीचा आनंद गगनात मावेना.फार दिवसापासून तिला काम नव्हते .जवळ पैसे  नव्हते...
ती उधार उसनवार करुन कसा तरी संसाराचा गाडा चालवत होती....
१००० डाॅलर्स मिळाल्यामुळे तिला आनंद झाला....
ती तात्काळ ते पैसे घेवून हाॅटेल मालकाकडे गेली....
जो खूपच चांगला ,दयाळू व मदतगार होता. तिला पैशांची गरज होती तेव्हा त्याने तिला १००० डाॅलर्स उसनवार दिले होते...
त्या बाईने हाॅटेल मालकाचे पैसे परत केले. व आभार मानून निघून गेली.....
तितक्यात त्या परदेशी पाहूण्याला खोली पसंद न पडल्यामुळे तो मॅनेजरकडे आला व १००० डाॅलर्सची नोट घेवून निघून गेला....
अर्ध्या एक तासा साठी १००० डाॅलर्स बाजारात चलन रुपाने फिरले.
प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिक पार पाडली...
त्यामुळे हाॅटेल मालक, बेकरीवाला,किराणा दुकानदार,कामवाली बाई प्रत्येकाचे देणे घेणे फिटले व पुन्हा ते व्यवसाय करु लागले...
आपल्याजवळ जी संपत्ती असते त्या संपत्तीचे आपण मालक नसून विश्वस्त असतो....

तात्पर्यः
नेहमी पैसा फिरता ठेवा.
त्यावर अनेक जनांचे संसार चालतात. जीवन जगण्यासाठी त्याचा वापर करा,
फक्त त्याच्यासाठी जगू नका.....
 〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in

©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:

Post a Comment