गवतात कोळियाने,
विणले सुरेख जाळे ।
सावज तयात यावे,
आशा मनात पाळे ॥
थंडीत पहाटेच्या दव,
साखळून आले ।
सावज बनून थेंबही,
जाळ्यात कैद झाले ॥
अडकून बिंदू शतशः,
झुंबर तयार झाले ।
कोवळ्या उन्हात तेजे
चमकून रत्न झाले ॥
ते रत्नहार सारे,
जाळ्यास भार झाले ।
चिंतीत कोळी झाला,
सावज फरार झाले ॥
मग रत्न-पारखाया,
एक “सर्वसाक्षी” आला ।
दृश्यास जोखणारा,
एक जवाहीरा मिळाला ॥
उकलून एक एक,
पृथक पदर पदर केला ।
दवबिंदू एक एक,
जणू सुट्टा हिराच केला
जरी रत्नहार भासे,
धागा गहाळ झाला ।
त्या “ईश्वरी” कलेचा,
चित्रात कळस झाला
विणले सुरेख जाळे ।
सावज तयात यावे,
आशा मनात पाळे ॥
थंडीत पहाटेच्या दव,
साखळून आले ।
सावज बनून थेंबही,
जाळ्यात कैद झाले ॥
अडकून बिंदू शतशः,
झुंबर तयार झाले ।
कोवळ्या उन्हात तेजे
चमकून रत्न झाले ॥
ते रत्नहार सारे,
जाळ्यास भार झाले ।
चिंतीत कोळी झाला,
सावज फरार झाले ॥
मग रत्न-पारखाया,
एक “सर्वसाक्षी” आला ।
दृश्यास जोखणारा,
एक जवाहीरा मिळाला ॥
उकलून एक एक,
पृथक पदर पदर केला ।
दवबिंदू एक एक,
जणू सुट्टा हिराच केला
जरी रत्नहार भासे,
धागा गहाळ झाला ।
त्या “ईश्वरी” कलेचा,
चित्रात कळस झाला
No comments:
Post a Comment