विचारपुष्प ७५

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
आशा ही आपल्या जीवनप्रवाहाची प्रेरक शक्ती असते.आपल्या कामास आशेचा परिसस्पर्श झाला की, आपल्या कामाला सुवर्णकांती लाभत असते. आशावादी दृष्टीने केलेलं काम फुलतं. बळजबरीनं केलेल्या कामात रसवत्ता आणि गुणवत्ता राहत नाही. उत्तुंग कल्पनातून आणि श्रेष्ठ आदर्शातून आशेचा जन्म होत असतो.

या संदर्भात  डाँ.जगदीशचंद्र बसू म्हणतात - ' आशेचं साफल्य उन्नत आशांना जन्म देत असतं.'

खरं तर महापुरुषाच्या आशावादातच समाजविकास लपलेला असतो.आशा हीच आपल्या उच्चतम जीवनाची खरीखुरी प्रभात आहे. '
आपले जीवन चैतन्यमय ठेवण्यासाठी मनाच्या मंदिरात आशेचा नंदादीप तेवत ठेवला पाहिजे.
========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment