|| शाळा ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो अन पाटी-दप्तराचं ओझं ,
पाठीवरती वाह्याचो....... || धृ ||
घर माझं शाळेपासून ,
होत लई दूर.....!
प्रार्थनेला उशीर झाला की ,
गुरुजी करायचे कुरकुर.....!
मग हिवाळा असो कि उन्हाळा ,
मी अनवाणीच पळायचो ...... || १ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
माय माझी मजुरीच्या ,
कामावरती जायाची.....!
शाळेमधी चटणी-भाकर ,
बांधून फडक्यामधी द्यायची.....!
मग दुपारच्या सुट्टीत मी ,
ती आवडीन खायाचो ....... || २ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
नाही विचारलं कधी कुणी मला ,
तुला शाळेत काय येत......!
तरी जवळ घेऊन माय म्हणायची ,
लेकरू माझ शाळेमधी जातं......!
लाड -लाड मग मी तीला ,
चार -आठ आणे मागायचो...... || ३ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
आठवड्याच्या बाजारातून आईन मला ,
एक सदरा अन चड्डी घेतली होती.......!
रोज -रोज तीच-तीच घालून ,
ती नको तिथ फाटली होती......!
तरी मी तीला मोठ्या ,
आवडीने घालायचो..... || ४ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
गुरुजी माझे लई कडक ,
त्यांची शिस्त होती भारी.......!
नजरेच्या धाकानेच नुसती ,
मुले गप्प बसायची सारी.......!
तरी नजर चुकवून त्यांची ,
मुला -मुलिंची खोडी काढायचो....... || ५ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
खेळ खेळतांना अशी ,
ताकद अंगात यायची.....!
आट्या -पाट्या नि विटी-दांडूची ,
रंगत वाढत जायची......!
कधी व्हायचा रडीचा डाव ,
मग एकामेकासंगे भांडायचो...... || ६ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
रविवारची सुट्टी तर ,
भारीच मला आवडायची.....!
गाई -म्हशी चारतांना ,
चिंचा नि बोरे खायाची......!
नदी मधल्या खोल डोहात ,
मनसोक्त पोहायचो...... || ७ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
गण्या , सुक्या , मोहन्या शाम्या ,
माझे मित्र होते कोळ्याचे.....!
मासे धरतांना ओले कपडे ,
नेहमी अंगावरच वाळायचे.....!
माशासंग खेकड्याच्या नांग्या ,
नदीलाच भाजून खायाचो...... || ८ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
पाचवीत गेल्यावर मला ,
नवीन भाषा इंग्रजी आली......!
तेव्हा पाढ्यासारखी घोकून-घोकून ,
ए -बी-सी-डी पाठ केली......!
कधी -कधी यू नंतर व्ही एवजी व्ह्यू म्हणायचो ,
अन छडीचा मार खायाचो...... || ९ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
परीक्षा जवळ आली की ,
माझ्या पोटात यायचा गोळा......!
गुरुजी म्हणायचे नेहमी ,
मुलांनो अभ्यास करून खेळा......!
समजून अस सांगतांना ,
त्यांच्यात मी माझी माय पाहायचो...... || १० ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
पूर्वी सारखे नाही राहिले आता ,
शिक्षण आणि शाळा......!
नवनविन धोरणांनीच घोटलाय ,
आज विद्यार्थ्यांचा गळा......!
इतक हसत खेळत शिकलो तरी ,
चांगल्या मार्कांनी पास व्हायाचो.... || ११ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
अन पाटी-दप्तराच ओझं ,
पाठीवरती वाह्याचो....... || धृ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो अन पाटी-दप्तराचं ओझं ,
पाठीवरती वाह्याचो....... || धृ ||
घर माझं शाळेपासून ,
होत लई दूर.....!
प्रार्थनेला उशीर झाला की ,
गुरुजी करायचे कुरकुर.....!
मग हिवाळा असो कि उन्हाळा ,
मी अनवाणीच पळायचो ...... || १ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
माय माझी मजुरीच्या ,
कामावरती जायाची.....!
शाळेमधी चटणी-भाकर ,
बांधून फडक्यामधी द्यायची.....!
मग दुपारच्या सुट्टीत मी ,
ती आवडीन खायाचो ....... || २ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
नाही विचारलं कधी कुणी मला ,
तुला शाळेत काय येत......!
तरी जवळ घेऊन माय म्हणायची ,
लेकरू माझ शाळेमधी जातं......!
लाड -लाड मग मी तीला ,
चार -आठ आणे मागायचो...... || ३ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
आठवड्याच्या बाजारातून आईन मला ,
एक सदरा अन चड्डी घेतली होती.......!
रोज -रोज तीच-तीच घालून ,
ती नको तिथ फाटली होती......!
तरी मी तीला मोठ्या ,
आवडीने घालायचो..... || ४ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
गुरुजी माझे लई कडक ,
त्यांची शिस्त होती भारी.......!
नजरेच्या धाकानेच नुसती ,
मुले गप्प बसायची सारी.......!
तरी नजर चुकवून त्यांची ,
मुला -मुलिंची खोडी काढायचो....... || ५ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
खेळ खेळतांना अशी ,
ताकद अंगात यायची.....!
आट्या -पाट्या नि विटी-दांडूची ,
रंगत वाढत जायची......!
कधी व्हायचा रडीचा डाव ,
मग एकामेकासंगे भांडायचो...... || ६ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
रविवारची सुट्टी तर ,
भारीच मला आवडायची.....!
गाई -म्हशी चारतांना ,
चिंचा नि बोरे खायाची......!
नदी मधल्या खोल डोहात ,
मनसोक्त पोहायचो...... || ७ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
गण्या , सुक्या , मोहन्या शाम्या ,
माझे मित्र होते कोळ्याचे.....!
मासे धरतांना ओले कपडे ,
नेहमी अंगावरच वाळायचे.....!
माशासंग खेकड्याच्या नांग्या ,
नदीलाच भाजून खायाचो...... || ८ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
पाचवीत गेल्यावर मला ,
नवीन भाषा इंग्रजी आली......!
तेव्हा पाढ्यासारखी घोकून-घोकून ,
ए -बी-सी-डी पाठ केली......!
कधी -कधी यू नंतर व्ही एवजी व्ह्यू म्हणायचो ,
अन छडीचा मार खायाचो...... || ९ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
परीक्षा जवळ आली की ,
माझ्या पोटात यायचा गोळा......!
गुरुजी म्हणायचे नेहमी ,
मुलांनो अभ्यास करून खेळा......!
समजून अस सांगतांना ,
त्यांच्यात मी माझी माय पाहायचो...... || १० ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
पूर्वी सारखे नाही राहिले आता ,
शिक्षण आणि शाळा......!
नवनविन धोरणांनीच घोटलाय ,
आज विद्यार्थ्यांचा गळा......!
इतक हसत खेळत शिकलो तरी ,
चांगल्या मार्कांनी पास व्हायाचो.... || ११ ||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो ,
शाळेमधी जायाचो......!!
अन पाटी-दप्तराच ओझं ,
पाठीवरती वाह्याचो....... || धृ ||
No comments:
Post a Comment