कविता शोध पाण्याचा

शोध घेत पाण्याचा
सारेच चाललेत खोल खोल
भूगर्भातून आवाज येतोय
संपली बाबा ओल

वारेमाप उपसा करतोस
अडवत नाहीस पाणी
किती वर्षे वागणार आहेस
असाच वेड्यावाणी

पाण्यावाचून सजीव सृष्टी
सारीच येईल धोक्यात
बघ राज्या शिरतंय का
काही तरी डोक्यात

निसर्गानं दिल्या शिवाय
भांड भरता येत नाही,
विना कारण सांडू नका,
पाणी तयार करता येत नाही

🌧 पाणी आडवा, पाणी जिरवा ...
जल है ...तो कल है !

No comments:

Post a Comment