विचारपुष्प ६९

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 विचारपुष्प  🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰

आपण आपल्या सकारात्मक विचारातूनच यशाची 👍 शिखर काबीज करु शकतो. नकारात्मक विचारातून आपल्या मस्तकावर संकटांचे डोंगर कोसळत असतात.
संकटे आली की ती एकटीच येत नाहीत . चारी बाजूने संकटे येतात. अशा संकटांना तोंड देण्यात आपले श्रम, संपत्ती , वेळ खर्च होत असतो.
शेवटी वाटतं की , आपण जगायचं तरी कशासाठी? आपण आनंदासाठी जगायचं आहे  या गोष्टीचा विसर पडला की, आपली शोकांतीका होत असते.

अखेर जीवन म्हणजे आहे तरी काय ?
 जीवन ही एक  संधी आहे. तसेच ' जीवन हा एक संघर्ष आहे '.
संधी म्हटलं की आपणास काहीतरी मिळण्याची आशा असते.
संघर्ष म्हटलं की लढत-झगडत काही मिळेल किंवा नाही याची शंका असते.

जीवनाची वाट चालताना यश आणि यशातून आनंद मिळवायचा असेल तर आपण आपल्या सर्व जबाबदाऱ्या वेळेवर , योग्य प्रकारानं पार पाडल्या पाहिजेत. माणसं नकारात्मक विचारानं जगू लागली की दुःखी होतात.
आपल्याजवळ काय आहे यापेक्षा आपल्याजवळ काय नाही याकडं माणसाचं अधीक लक्ष असतं. त्यामुळं दुःख करण्यातच काळ निघून जातो.
आत्मविश्वास आणि धाडस असेल तर माणूस शून्यातून शिखराकड जाऊन पोहचतो.
आशा आणि श्रध्दा नावाचे चक्षू 👀 ज्यांना लाभले आहेत त्यांना आपल्या जीवनाची उंच शिखरं गाठता येतात.

काळ्याकुट्ट ढगाला रुपेरी किनारा असते. या विचारांची शिदोरीच आपणास ध्येय गाठण्यासाठी मदत करेल !

========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment