*माझी शाळा माझे उपक्रम* *🌹उपक्रम🌹* उपक्रमाचे नावः *📚माझा शब्दसंग्रह*📚 विषयः मराठी 〰〰〰〰〰〰〰 आज दि.०५/१०/२०१७ रोजी माझा तिसरीचा वर्गातील विद्यार्थ्यांना 'माझा शब्दसंग्रह' ह्या उपक्रमांतर्गत बाराखडीप्रमाणे बालभारती या पुस्तकातील शब्द प्रत्येकाने शोधून लिहा त्यानंतर जोडाक्षर/जोडशब्द प्रत्येकी एकएक लिहावयास लावले.मूलांनी शब्द मन लावून शोधून काढले आणि लेखन केले. 〰〰〰〰〰〰〰 उद्दिष्टः 👉शोधून शब्द काढल्यामुळे बाराखडीचा नियमाने लेखन व वाचन झाले. 👉 शब्दसंपत्तीत वाढ 〰〰〰〰〰〰〰 *संदेशः 📚"शिक्षणाच्या उदात्त हेतूत केवळ ज्ञान अपेक्षित नसून कृतीदेखील अपेक्षित असते."* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 ➖➖➖➖➖➖➖ ✍ संकल्पना लेखन वर्गशिक्षिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰*🌷🌷जीवन विचार*🌷🌷〰〰〰〰〰〰〰*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)**〰〰〰〰〰〰〰*मनुष्याच्या संग्रही वृत्तीला मर्यादा नाही.माणसाचा भयंकर शञू जर कोणी असेल तर तो आहे लोभ.लोभ हा सर्व सद्गूणांचा नाश करतो.गीतेत माणसाच्या नरकाची व्दारेच काम, क्रोध ,लोभ ही सांगितलेली आहेत. माणसाच्या लोभाची बरोबरी दुसरे कोणी करु शकत नाही.सर्व जिवात्म्यांमध्ये मनुष्यच असा प्राणी आहे की तो संग्रहवृत्तीने जगतो.मनुष्य कितीही क्रोधीही झाला तरी तो वाघाइतका क्रोधी होऊ शकत नाही आणि कितीही कामी झाला तरी तो चक्रवाक पक्ष्याइतका कामी होऊ शकत नाही असे म्हणतात.पशूंना द्रव्याची इच्छा नसते,परंतु तीच इच्छा माणसाला पशू बनविते.मानवाच्या अंगी जी लोभी प्रवृत्ती आहे त्याची बरोबरी कोणी करु शकत नाही.म्हणूनच धनाचा संचयाच्या मागे लागलेल्या लोभी प्रवृत्तीचा मनुष्यास साध्या व्यवहाराची शिकवण दिली...*संत कबीर सांगून गेले "पानी वाढो नाव में, घरमें बाढो दाम l दोनों हात उलीचिये , यही सयानो काम ll"*माणसाला धनाची गरज आहे पण घरात नाही समाजात पाहिजे.नावेतील पाण्याने जसा धोका होतो तसा घरातील धन वाढल्याने धोका होतो.〰〰〰〰〰〰〰*'आपल्या श्रमाचे फळ, हीच जगातील सर्वोत्तम संपत्ती आहे.'*〰〰〰〰〰〰〰🌺🌸🌺🌸🌺🌸🌺*🙏शब्दांकन/संकलन*🙏*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*जि.प.प्रा.शा.वाटेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in


*आईवडिलच जीवनाचा आधारस्तंभ* "पंखे, लाईट बंद न करता बाहेर का निघून जाता?" "टीव्ही चालू आहे आणि त्याच्यासमोर कुणीच नाही. तो पाहिला बंद करा" "पेन स्टँड वर ठेवा, नाहीतर खाली पडेल" मुलाला वडिलांच्या किरकोळ कारणासाठी अशा सूचना अजिबात आवडत नसतात. त्यामुळे त्याला घरात अजिबात राहायला आवडत नसे. प्रत्येक मध्यमवर्गीय घरात थोड्या फार फरकाने हीच गोष्ट असते. काल जोपर्यंत तो वडिलांबरोबर या घरात रहात होता तोपर्यंत तरी त्यानं हे सर्व सहन केलं. पण आज त्याला नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जायचं होतं. "मला जर ही नोकरी मिळाली तर मी हे शहर नक्की सोडणार". वडिलांची बोलणी असह्य झालीत. असं त्याला वाटत होतं. तो मुलाखतीसाठी निघाला. "कुठलंही दडपण न ठेवता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं बेधडक दे, आणि उत्तर आलं जरी नाही तरी ठोकून दे" असं सांगून वडिलांनी त्याला लागणार होते त्यापेक्षा जास्त पैसे दिले. मुलगा मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचला. तिथे प्रवेशद्वारावर कुणीच सुरक्षा कर्मचारी नव्हता. दरवाजा पण उघडाच होता. दरवाजाचं ल्याच व्यवस्थित बसवलं नव्हतं. त्यामुळे दरवाजा सारखा आपटत होता. त्याने ते दरवाजा आपटायचा बंद केला आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला. आत गेल्यावर दोन्ही बाजूला सुंदर फुलझाडं लावली होती. बागकाम करणाऱ्या माणसानं बागेतील नळ उघडाच ठेवला होता. पाणी वाहत होतं आणि तो कर्मचारी कुठं दिसत नव्हता. याने वाहणारा नळ बंद केला आणि पाईप व्यवस्थित करून ठेवली. स्वागत कक्षात पण कुणीच दिसत नव्हतं. "पहिल्या मजल्यावर मुलाखती होतील" असं सूचना फलकावर लिहिलं होतं. तो हळूच जिना चढू लागला. काल रात्री लावलेले जिन्यातले दिवे सकाळी १० वाजून गेले तरी तसेच होते. त्याला वडिलांचे शब्द आठवले "पंखे, लाईट बंद न करता घरातून का निघून जाता?" आणि त्याला वडिलांच्या त्या वाक्याचा त्रास झाला. त्या विचारातच त्याने दिवे बंद केले. वर गेल्यावर त्याला अनेक उमेदवार मुलाखतीची वाट पहात बसलेले दिसले. बसलेल्या उमेदवारांची संख्या पाहून आपल्याला ही नोकरी मिळेल का याचा तो विचार करू लागला. त्याने भीतीयुक्त उत्सुकतेने हॉलमध्ये प्रवेश केला. दरवाजाजवळ "सुस्वागतम" लिहिलेली चटई होती. त्याच्या लक्षात आले की ती चटई दुमडली होती. कुणाच्या तरी पायात अडकायची शक्यता होती. त्याने चिडूनच ती चटई सरळ केली. त्याने पाहिले की समोरच्या काही खुर्च्यांच्या ओळींमध्ये त्यांच्या बोलावण्याच्या प्रतीक्षेत अनेक लोक बसले होते, तर मागील काही ओळी रिक्त होत्या, परंतु त्या ओळींवरचे अनेक पंखे विनाकारण चालू होते. त्याने पुन्हा आपल्या वडिलांची वाणी ऐकली, "पंखे, लाईट बंद न करता घरातून का निघून जाता?" त्या तिडिकी सरशी त्यांने गरज नसलेले पंखे बंद केले आणि रिकाम्या खुर्च्या एकावर एक ठेवल्या. अनेक उमेदवार मुलाखत खोलीत प्रवेश करून लगेच दुसर्ऱ्या दरवाजातून बाहेर पडतांना दिसत होते. त्यामुळे मुलाखतीत काय प्रश्न विचारतात याचा अंदाज कुणाकडूनही मिळत नव्हता. तो आत गेला आणि न घाबरता मुलाखती साठी उभा राहिला. मुलाखत घेणाऱ्या ऑफिसरने त्याच्याकडून प्रमाणपत्रे घेतली आणि त्याला कुठलाही प्रश्न न विचारता विचारले, "तुम्ही कामावर कधी हजर होऊ शकता?" त्यांला समजेना की, "हा मुलाखतीत विचारायचा एक ट्रिकी प्रश्न आहे, किंवा हा एक संकेत आहे की मला नोकरीची ऑफर दिली गेली?" तो गोंधळून गेला. "आपण काय विचार करीत आहात?" बॉसने विचारले. "आम्ही येथे कोणालाही प्रश्न विचारत नाही. काही प्रश्न विचारून आम्ही कोणाच्याहीच्या कौशल्यांचे मूल्यांकन करू शकणार नाही. म्हणून आम्ही चाचणी घेऊन व्यक्तीच्या वृत्तीचे मूल्यांकन करत आहोत. आम्ही उमेदवारांच्या वर्तणुकीवर आधारित काही चाचण्या ठेवल्या आणि आम्ही सर्वांवर सीसीटीव्ही द्वारे नजर ठेवली. "आज आलेल्या कोणत्याही व्यक्तीने रबरी नळी, स्वागत चटई, निरुपयोगी चालणारे पंखे किंवा दिवे नीट केले नाहीत. आपण असे फक्त एकच उमेदवार होता ज्यांनी ते केले. म्हणूनच आम्ही तुम्हाला नोकरीसाठी निवडण्याचा निर्णय घेतला आहे", बॉस म्हणाले. आपल्या वडिलांच्या शिस्त व सुचनांवरून त्याची नेहमीच चिडचिड होत असे. आता त्याला असे जाणवले की त्याला फक्त त्याच शिस्तीमुळे काम मिळाले आहे. या प्रसंगामुळे त्याच्या वडिलांवरची त्याची चिडचिड आणि संताप पूर्णपणे विसर्जित झाला. त्याने रोज आपल्या वडिलांच्या सूचना आणि मूल्ये कामाच्या ठिकाणी पाळायचे ठरवले आणि सुखाने परत आपल्या घरी जायला निघाला. आपले वडील जे काही सांगतात ते केवळ आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे! दगड आपोआप एक सुंदर शिल्पकला बनू शकत नाही तर त्याला झालेल्या छन्नीच्या घावांच्या वेदना त्याला शिल्प बनवतात. आपण एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चांगला मनुष्य बनण्यासाठी आपल्याला स्वतःच्या वाईट सवयी सोडून देणे आणि वागणुकीत चांगला बदल घडवण्याची आवश्यकता आहे. तेच आपले वडील करतात जेव्हा ते आम्हाला शिस्त लावतात. आई बाळाला भरवण्यासाठी तिच्या मांडीवर बाळाला उचलून घेते आणि खाऊ पिऊ झाल्यावर तिला झोपवते. पण वडीलांचं तसं नसतं. ते बाळाला आपल्या खांद्यावर घेऊन ते जग दाखवतात जे ते पाहु शकत नाहीत. आपण आईचे दुःख तिच्याकडून ऐकून समजू शकतो; परंतु इतरांनी याबद्दल आपल्याला सांगितलं तरच पित्याची वेदना समजते. आई जेंव्हा म्हातारी होते, तेंव्हा ती आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या घरी जाऊ शकते; परंतु पित्याला ते करता येत नाही. तो नेहमी स्वतंत्र आणि एकटा असतो. म्हणून आई वडील जेव्हा जिवंत असतात तेव्हा त्यांना दुखवू नका. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मरण करून आणि दुःख करून काहीही उपयोग नाही. 〰〰〰〰〰〰〰〰

आज परत एकदा *नकळत* *मुंगी* तळ्यात पडली स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं *पान* आणि *कबुतराची* वाट पाहू लागली. मीच का सतत हिला वाचवावे ..? हा कबुतराचा *अहंकार* आड आला. झाडावरच बसून *असहाय्* मुंगीला मरताना पाहू लागले... कबुतराने *मदत* करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली...तरी कबुतर आपल्याच विचारात मश्गुल होते. मुंगी असहाय्तेमुळे *गतप्राण* झाली... कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं... *पारधी* येणार हेच विसरून गेलं... पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाणा साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणि निशाणा चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला....! कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. *झाड* मात्र त्या दिवशी खूप रडले. मुंगी,कबुतर मेल्याचं दुःख होतंच ..... पण त्याहूनही *परोपकाराची भावना मेल्याचं होतं !* *अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते !

आत्मसात केलेले ज्ञान एका महात्म्याचे दोन शिष्य होते. दोघेही शिकलेले कथाकार होते. जेव्हा महात्म्याचा मृत्यूजवळ आला, तेव्हा ‘वारस कोणाला करावे ? कुणाला गादी द्यावी’, हा विचार महात्म्याला पडला. मग त्याने दोन फळे घेतली. त्या शिष्यांना एक-एक फळ दिले आणि सांगितले, ‘‘ही फळे अशा जागी जाऊन खा की, तिथे तुम्हाला पहाणारा कुणीच नसेल.’’ एका शिष्याने खोली बंद केली आणि फळ खाल्ले. दुसरा शिष्य फळ घेऊन अनेक ठिकाणी गेला; पण कुणी नाही, असे स्थानच त्याला सापडले नाही; कारण देव सर्वत्र आहे. त्या शिष्याने केवळ शब्दज्ञान न घेता ज्ञान आत्मसात केले होते. अर्थातच गुरूंनी त्याला उत्तराधिकारी केले. 〰 संकलित

मो-:मोहून टाकले जगाला तुम्ही अहिंसेच्या तत्त्वाने ह-:हक्क मिळवून दिले सत्याने न-:न जातपात मानली तुम्ही खरा मानवधर्म जगाला दिला दा-:दाही दिशात उभी केली चळवळी स-:सत्त्याचा आग्रह धरला कायम तुम्ही क-:कधी कधी तुम्ही तुरूंगवासही भोगला र-:रणरणत्या उन्हातही काढली दांडीयात्रा म-:महानता किती सांगू तुमची शब्द अपूरे पडे चं-: चंपारण्य असो वा असहकार असो पुढाकार नेहमी घेतला द-:दरवळले गोरगरीबात तुम्ही पुन्हा परतून याल का गां-:गांधी हे सत्त्याचे खरे उपासक सत्य हे ईश्वर आणि ईश्वर हेच सत्य धी-:धीटपणा वाढला जगामध्ये तुमच्या त्या आचार विचाराने सांगा पुन्हा परतून तूम्ही याल का? जागतिक अहिंसा दिन संकलित

खुपच सुरेख रचना आहे *मन*... *मन*...एक अवयव.... ....डोळ्यांना न दिसणारा..! *मन*...एक विचार.... ....आपले आचार ठरवणारा..! *मन*...एक भावना.... ....सर्वांना जाणवणारी..! *मन*...एक व्याख्या.... ....लिहिता न येणारी..! *मन*...एक फुल.... ....आनंदात डूलणारं..! *मन*...एक वज्र.... ....संकटांशी लढणारं..! *मन*...एक अस्तित्व.... ....नाकारता न येणारं..! *मन*...एक फुलपाखरू.... ....हाती न येता नुसतच रंगवून जाणारं..! *मन*...एक वाहन.... ....क्षणात विश्वाची सफर करणारं..! *मन*...एक यंत्र.... ....कधी भूतकाळ तर कधी भविष्यात नेणारं..! *मन*...एक पुस्तक.... ....सहज वाचनात येणारं..! *मन*...एक व्यक्तिमत्व.... ....माणूस घडवणारं..!

*हे विश्वची माझे घर, प्रेमातील व्यापकता* ‘संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस उसांची एक मोळी दिली. दोरखंडाने बांधलेली ती मोळी खांद्यावर घेऊन संत तुकाराम महाराज घराकडे चालले असता वाटेत खेळणारी मुले त्यांना विचारू लागली, ‘‘तुकोबा, एवढे ऊस तुम्ही कोणासाठी घेतले हो ?’’ ते म्हणाले, ‘‘बाळांनो, अरे तुमच्यासाठीच. बंडू हा ऊस घे तुला, गुंडू हा तुला, धोंडू हा घे, तू पण.. हा, तू घे… हा, तू घे.’’ असे म्हणत तुकोबा ज्या वेळी त्यांच्या घरी पोहोचले, त्या वेळी त्यांच्या खांद्यावर एकच ऊस आणि त्याच्या भोवतीचे दोरखंडाचे भले मोठे वेटोळे एवढेच काय ते शिल्लक राहिले होते. तो प्रकार पाहून तुकाराम महाराजांची पत्नी आवळी भरपूर रागावली. आपल्याला मिळालेला सर्व ऊस लोकांच्या मुलांना देऊन आपल्या मुलांना काही आणले नाही; म्हणून ती तुकाराम महाराजांना नको नको, ते बोलली आणि रागाच्या झपाट्यात तिने तो उसाचा तुकडा त्यांच्या पाठीवर मारला. त्या वेळी त्याचे तीन तुकडे होऊन एक तुकडा तिच्या हातात राहिला आणि दोन तुकडे जमिनीवर पडले. तेव्हा संत तुकाराम महाराज शांतपणे तिला म्हणाले, ‘‘आवळे, किती ग धोरणी तू ? आता तू सारखे वाटे केलेस. जो तुकडा तुझ्या हातात राहिला, तो तुझा आणि खाली जे पडले त्यांतील एक माझा अन् दुसरा मुलांचा !’’ ही त्यांची शांत वृत्ती पाहून बायकोला फार पश्चात्ताप झाला. तात्पर्य :- ‘हे विश्वची माझे घर’, असे वाटत असल्यामुळे संत तुकाराम महाराजांनी आपली आणि लोकांची मुले असा भेदभाव केला नाही.’