✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 31/03/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *हनुमान जन्मोत्सव* 💥 ठळक घडामोडी :-  १८६७ - प्रार्थना समाजची स्थापना. १९२७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला. १९९७ - भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान. २००१ - भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या. 💥 जन्म :- १८६५: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी  💥 मृत्यू :-  २०००: भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग २००२: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी मोतुरू उदायम संकलक- संतोष रहांगडाले गोंदिया 9404277208 *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - सहा महिन्यांत मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा उपोषणाला बसणार - अण्णा हजारे* ----------------------------------------------------- 2⃣ *मध्यप्रदेश : राज्य कर्मचा-यांचे निवृत्तीचे वय 60 हून 62 करण्यात आले आहे.* ----------------------------------------------------- 3⃣ *बेंगळुरूः जातीय आणि बनावट बातम्या दिल्याप्रकरणी 'पोस्टकार्ड न्यूज'चे संस्थापक महेश हेगडे यांना अटक* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - देशातील आरटीई कायद्यातील शाळांकडून ७ एप्रिलला एकदिवसीय बंदची घोषणा* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक - गोदावरीच्या दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत, आरोग्याचा प्रश्न गंभीर* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : शोभा यात्रेत डीजेचा वापर केल्या प्रकरणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. डीजेचे वाहन जप्त* ----------------------------------------------------- 7⃣ *राज्यसभेतील खासदार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जम्मू-काश्मीरमधील शाळेसाठी 40 लाख रुपयांची केली मदत* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *सैनिक : देशाचा संरक्षक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य  भाषा  मराठी  आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे.  पंचगंगा  इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास  पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर हे प्रसिद्ध आहे. कोल्हापूर हे शहर व इथली माणसं ही मन जिंकून घेतात. कोल्हापूर हे तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ या खाद्यपदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे तसेच कोल्हापुरी चपल ही खूप प्रसिद्ध आहे .आपुलकीची भावना ही इथल्या माणसांच्याकडे आहे. येथे मिसळपाव हे प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. तसेच खाऊ गल्लीत राजाभाऊची भेळ प्रसिद्ध आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते आणि  अश्विन  शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. श्री करवीर निवासिनी चे मंदिर खूप सुंदर आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  नोटा व पोस्टाची तिकिटे छापण्याचा कारखाना कोठे आहे ?* 👉    नाशिक *२)  भारतातील दुसरी महिला मुख्यमंत्री कोण होते ?* 👉    जयललिता *३)  हुतात्मा दिन कोणत्या दिवशी येतो ?* 👉    30 जानेवारी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 वंदना गुरुपवार, नांदेड 👤 गंगाधर बेलूरवाड 👤 एस. जे. पल्लेवाड 👤 विश्वनाथ आडेराव 👤 शंकर गंगुलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *सोस* नको त्या गोष्टींचा काहींना सोस असतो आपण काय करतो याचाही होश नसतो नको त्या गोष्टींचा सोस नसला पाहिजे काय करतो याचा होश असला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.* *ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर फिरणा-या चक्राच्या मध्यभागी........* *जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !* *एक कवी लिहून जातो.....* *......सदियाॅ बित गयी टूटी* *हुई डोर को थामे* *शायद कोई वजह मिल* *जाए जिने की....!* ‼ *॥ रामकृष्णहरी ॥* ‼ 🔶🔶🔶🔶🔶🔶 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो. जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत,त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत.अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात.त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही.अशावृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. 📲 9421839590 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *दुभत्या गाईच्या लाथा गोड* - फायदा करून देणार्‍याने दिलेला त्रासही सहन करावा लागतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= कुरुक्षेत्रात युध्दभूमीवर जेव्हा कर्ण व अर्जुन समोरा-समोर आले तेव्हा,कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या! दिशेने सोडले. प्रत्येकाला वाटले की, आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार...तितक्यात, श्रीकृष्णाने आपल्या पायाचा भार रथावर दिला. रथ थोडा खाली खचला व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेले. नंतर, सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा, युध्द विराम होत असे. तेव्हा, पहिल्यांदा श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरत असे व नंतर अर्जुनाला खाली उतरण्यास हात देत असे. जेव्हा पूर्ण युध्द संपले व पांडवांचा विजय झाला तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, "पार्थ, आधी तू रथाच्या खाली उतर." त्यानुसार अर्जुन रथाच्या खाली उतरला. त्यानंतर श्रीकृष्णाने घोड्यांचे लगाम घोड्यांच्या अंगावर टाकले घोडे बाजूला काढले व नंतरच स्वतः रथाच्या खाली उतरला. दोघेही थोडे पावले चालून गेली तोच, रथाने धड धड करत प्रचंड पेट घेतला. जमलेले सर्व जण आश्चर्याने ते दृश्य पाहत होते. तेव्हा अर्जुन म्हणाला, आपण रथातून उतरल्या उतरल्या रथ आपोआप कसा काय पेटला "अरे श्रीकृष्णा हा काय प्रकार आहे? " तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, "युध्दात जितके शस्त्र-अस्त्र तुझ्या दिशेने सोडण्यात आले होते, ते माझ्या मुळे तुला स्पर्श ही करू शकले नाहीत. ते सर्व अस्त्र अदृश्य रूपाने रथाच्या भोवती फिरत राहिले व आता जेव्हा मी तुझ्या रथाची धुरा सोडून दिली तेव्हा ह्या अस्त्रांचा परिणाम आता तु पाहत आहेस." त्याच प्रमाणे मानवी देह आहे. जोपर्यन्त परमेश्वरानेआपले जीवनरुपी लगाम पकडले आहेत तो पर्यंत आपल्या देहात प्राण, आनंद ,सुख ,ऐश्वर्य नांदत आहे. पण जेव्हा तो आपणास सोडतो.. तेव्हा आपलीही अवस्था त्या रथासारखीच होते 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/03/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९२ - भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे. आर. डी. टाटा यांना भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १९९८ - सी-डॅक ने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला. 💥 जन्म :- १८९२ - कार्नेली हेमन्स, फ्रेंच-बेल्जियन शरीरशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेता. १९१० - इंग्रीड, डेन्मार्कची राणी. 💥 मृत्यू :-  १९९२ - आचार्य आनंद ऋषीजी, स्थानकवासी जैन धर्मगुरू. १९९७ - श्रीमती पुपुल जयकर, सामाजिक कार्यकर्ता, भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या २००० - शांताराम द्वारकानाथ देशमुख उर्फ राम द्वारकानाथ देशमुख, नामवंत अर्थतज्ञ आणि लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये 12 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम,व्हीव्हीपॅटचा वापर करणार - निवडणूक आयोग* ----------------------------------------------------- 2⃣ *अॅट्रॉसिटीच्या निर्णयातील बदलांविरोधात केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात जाणार* ----------------------------------------------------- 3⃣ *रायगडमधील भिरा येथे उच्चांकी तापमानाची नोंद. भिराचं तापमान 45 अंश सेल्सिअस.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - बँकांना फक्त दोन दिवस सुट्टी, नवीन परिपत्रकानुसार फक्त गुरुवार आणि शुक्रवारी बँकांना सुट्टी* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई - मुंबईतील कमाल तापमानात घट, उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा* ----------------------------------------------------- 6⃣ *औरंगाबाद - पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ गंगाधर विठोबाजी पाणतावणे यांचे आज दुःखद निधन* ----------------------------------------------------- 7⃣ *स्मिथच्या प्रकरणामुळे राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी : एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी 2 लाख भाविक दाखल.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जुनी पेंशन योजना* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/10/blog-post_21.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. गंगाधर पानतावणे* गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचा जन्म 28 जून 1937 रोजी नागपुरात झाला. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नागपुरातच झालं. 1956 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी बी ए आणि एमएची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी तत्कालिन मराठवाडा विद्यापीठातून पीएचडीही प्राप्त केली. महत्त्वाचं म्हणजे त्याच विद्यापीठात म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम पाहिलं. खरं तर पानतावणे यांनी मॅट्रिकनंतर लिखानाला सुरुवात केली होती. दलित साहित्य हा त्यांचा जवळचा विषय होता. यामध्ये त्यांचा भरपूर अभ्यास होता, त्यामुळेच त्यांनी विपुल लेखन केलं. त्यांनी लिहिलेले `धम्मचर्चा` `मूल्यवेध` , मूकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, प्रकृती आणि प्रवृत्ती,  शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे. अस्मितादर्श नावाचे नियतकालिक देखील त्यांनी चालविले. गंगाधर पानतावणे यांनी 2009 मध्ये अमेरिकेत झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *आपले।दैनंदिन कर्तव्य रोजच्या रोज आणि वेळेवर पूर्ण करा त्यामुळे कामात सुसूत्रता येते.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  मन:स्ताप हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?* 👉      विसर्ग संधी *२)  लोकसभा सभापतीची निवड कोण करते?* 👉      लोकसभा सदस्य *३)    सजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचा जनक कोण?* 👉     कार्ल लिनिअस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 जयश्री पाटील, वसमत सहशिक्षिका तथा लेखिका 👤 स्वानंद बेदरकर, नाशिक 👤 प्रल्हाद धडे 👤दीपक कैवारे 👤 रमेश राजफोडे 👤विपुल पाटील जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *मन* आपण जसे असतो तसे प्रत्येकजण असत नाही कोणाच्या मनात काय आहे कोणालाच दिसत नाही कोणाच्या मनाचा कोणाला ठाव घेता येत नसतो अनुभवल्या शिवाय कोणाला भाव देता येत नसतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.* *ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर फिरणा-या चक्राच्या मध्यभागी........* *जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !* *एक कवी लिहून जातो.....* *......सदियाॅ बित गयी टूटी* *हुई डोर को थामे* *शायद कोई वजह मिल* *जाए जिने की....!* ‼ *॥ रामकृष्णहरी ॥* ‼ 🔶🔶🔶🔶🔶🔶 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= शेतकरी शेतात बियाणे टाकून येणा-या किंवा उगवणा-या धान्याची वाट पाहणे हे सत्य आशा आहे. कारण त्याला त्याच्या केलेल्या कामावर, मेहनतीवर विश्वास आहे. तो कधीही राशीचक्रावरील राशीनुसार लिहिलेल्या भाकितावर विश्वास ठेवत नाही किंवा त्यानुसार चालतही नाही. जे राशीनुसार चालतात ते मात्र त्यावर विसंबून राहून आपल्याच जीवनात चांगल्याप्रकारे चाललेल्या संसारगाड्याला खीळ बसवतात. त्यामुळे व्हायची ती प्रगती होत नाही आणि करता येत नाही. म्हणून माणसाने कोणत्याही भाकितावर विश्वास न ठेवता आपण आपले काम प्रामाणिकपणे आणि सातत्याने जीव ओतून केले तर नक्कीच जीवनात यश मिळते तसेच जीवन सुखी व समृद्ध होते यात संशय नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *पाच ही बोटे सारखे नसतात* - सर्व माणसे सारख्या स्वभावाची नसतात. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आयुष्याची दिशा* भूदान चळवळीच्‍या काळातील ही गोष्‍ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्‍यांची पदयात्रा सुरु होती. आपल्‍या काही शिष्‍यांसह विनोबाजी मीराजींच्‍या आश्रमात थांबले होते. अल्‍पशा विश्रांतीनंतर त्‍यांची पदयात्रा पुन्‍हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्‍हती. त्‍यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्‍यामुळे त्‍यांना खुर्चीत बसवून नेण्‍यात येत होते. मध्‍ये मध्‍ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्‍हा एक शिष्‍य त्‍यांच्‍याजवळ येऊन म्‍हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्‍हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्‍ही काय करत होता असे त्‍या व्‍यक्तीने विचारले. विनोबाजी म्‍हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्‍ट आली. जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध एखादी गोष्‍ट आली जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध गोष्‍ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्‍हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्‍यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.'' *तात्‍पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्‍याला योग्‍य दिशा देते.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🌹जीवन विचार🌹* 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰 मानवी जीवनाला उन्नत करणाऱ्या श्रद्धा , भावना ह्या जीवनाचा आधार आहे.जीवनात श्रद्धेला अतिशय महत्त्व आहे.एखाद्या व्यक्तीवर किंवा तत्वावर जेव्हा आपला विश्वास असतो, तेव्हा त्याला विश्वासाची श्रद्धा संबोधली जाते. आपले जीवन जगत असताना आपल्या जीवनाला दातृत्वाचं अंग असाव, सेवेचं भान ,ज्ञानाच ककंण, सामर्थ्याचा कवच, त्यागाच बळ, सौजन्याच अधिष्ठान आणि *सत्याचा आधार असावा.* आपल्या जीवनातला *मी पण जेव्हा नाहीसा* होईल, आपला अहंकार जेव्हा नष्ट होईल, आपल्यातील लोभ आणि मोहाचा डोंगर कोसळून पडेल, अज्ञानाचा अंधार निघून जाईल तेव्हा आपले जीवन खरे सार्थकी लागले म्हणावे लागेल. मनुष्याच्या श्रद्धेला पुराव्याची गरज नाही.चांगल्या कर्माची, भलेपणाची , मांगल्याची विश्वास ठेवण्याची वृत्ती त्याने जोपासली पाहिजे.नव्हे ती वृत्ती त्याच्याकडे असतेच परंतु त्याची जोपासना करणे गरजेचे आहे. 🌻🌻🌻🌻🌻🌻 *〰〰〰〰〰〰* *✍शब्दांकन/ संकलन* प्रमिलाताई सेनकुडे 🙏🏻🙏🏻 ता.हदगाव जि.नांदेड 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 27/03/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १८९३ - केशवसुत यांनी तुतारी, ही कविता लिहिली १९९२ - ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान. २००० - चित्रपट निर्माता-चित्रपट दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर. २००१ - लेफ्टनंट जनरल हरिप्रसाद यांनी फॉरवर्ड कॉर्प्सच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. 💥 जन्म :- १९४१ - इव्हान गास्पारोविच, स्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष. १९६३ - क्वेंटिन टारान्टिनो, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक. १९७० - मरायाह केरी, अमेरिकन गायिका. 💥 मृत्यू :-  १९८१ - माओ दुन, चिनी भाषेमधील कादंबरीकार, पत्रकार. १९९२ - प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, मराठी साहित्यिक, प्राचार्य, गरवारे वाणिज्य महाविद्यालय. १९९७ - भार्गवराम आचरेकर, मराठी रंगभूमीवरील गायक-अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- कृषिमूल्य आयोगाची नेमणूक करा, कृषिमूल्य आयोगाला घटनात्मक दर्जा द्या- अण्णा हजारे* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई - संभाजी भिडेला अटक झाली नाही, तर विधानसभेला घेराव घातल्याशिवाय जाणार नाही, प्रकाश आंबेडकरांचा इशारा* ----------------------------------------------------- 3⃣ *रशियातील शॉपिंग मॉलमध्ये अग्नितांडव, 37 जणांचा होरपळून मृत्यू* ----------------------------------------------------- 4⃣ *यवतमाळ - यवतमाळ जिल्हा परिषदेचा २९ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर, स्वउत्पन्नात १४ कोटींची वाढ* ----------------------------------------------------- 5⃣ *चंद्रपूर - वरोरा येथील स्टेट बँक एटीएमचे लॉक हायजॅक करून 23 लाख रुपये उडविले, 9 मार्चची घटना आज बँकेच्या निदर्शनास आली* ----------------------------------------------------- 6⃣ *पुणे : ज्येष्ठ समीक्षक आणि कुसुमाग्रज यांचे बंधू डॉ. के. रं. शिरवाडकर (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन.* ----------------------------------------------------- 7⃣ *सुनीत जाधवचे भारत श्रीच्या हॅटट्रिकचे स्वप्न उदध्वस्त करीत राम निवासने अकराव्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान पटकावला.  * ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी : मागील तीन दिवसांपासून कमाल तपमान वाढत असून काल पारा थेट ३८ अंशापर्यंत सरकल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली झाली. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवला.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========     *लिहिते व्हा......!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_15.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= महाराज श्रीमंत  सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव  गोपाळराव काशीराव गायकवाड, (जन्म : कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा, मार्च १०, इ.स. १८६३ - मृत्यू : मुंबई, फेब्रुवारी ६, इ.स. १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालां दरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. ते भूतपूर्व बडोदे संस्थानाचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरीही मोठी आहे. पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४). *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमच्या जीवनाला वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे ध्येयवेडा प्रवास *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  यंदाचा महाराष्ट्र केसरी कोणाला मिळाला?* 👉      अभिजीत कटके  *२)  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण आहेत?* 👉      शरद पवार  *३)  हिमाचल प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत?* 👉     जयराम ठाकूर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 कु. समिक्षा सत्यजित टिप्रेसवार, नांदेड 👤 प्रमोद मोहिते 👤 साईनाथ कल्याणकर, येवती 👤वैदेही चिल्का, ठाणे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *लबाड* स्वतःची बिडी पेटवायला दुस-याच माडी जाळतात अशांना स्पष्ट बोलायचं लोक का?बरं टाळतात स्पष्ट न बोलल्यामूळे अशा लबाडांचे फावते लबाड स्वहिता पुढे लोकाला काडी लावते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========    *एका साधूला पितळेच्‍या धातूचे सोन्‍यात रूपांतर करण्‍याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना मदत करण्‍यासाठीच करत असे. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्‍याच्‍याकडे आला. त्‍याला मुलीच्‍या लग्‍नासाठी पैशांची आवश्‍यकता होती. साधूने त्‍याची अडचण ओळखून त्‍याला एका पितळेच्‍या भांड्याचे रूपांतर सोन्‍यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्‍याच्‍याकडे सोन्‍याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्‍याची चौकशी केली तेव्‍हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली.* *राजाच्‍या मनात लोभाची भावना उत्‍पन्न झाली. त्‍याने साधूला ती विद्या शिकविण्‍याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15‍ दिवसांची मुदत दिली अन्‍यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्‍याच्‍याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे, पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्‍या येथे राहून त्‍याची सेवा करू लागला. साधूने राजाच्‍या सेवेवर प्रसन्न होऊन त्‍याला पितळापासून सोने तयार करण्‍याची विद्या शिकविली. राजा महालात परतला...व साधूला बोलावून घेतले आणि विचारले तुला विद्या शिकविण्‍याची आज्ञा केली, तर तू नकार दिला. पण मी तुझ्याजवळ राहून ही कला शिकलो आहे.* *साधू म्‍हणाला,’’महाराज तुम्‍ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. *ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते. ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नव्हे.* ••●💡‼ *रामकृष्णहरी* ‼💡●•• 💡💡💡💡💡💡 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात एखादे चांगले ध्येय आपल्या मनात नाश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी अनेक बिकट प्रसंगाशी सामना करावा लागतो.त्याच्याशिवाय ध्येयाचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही.केवळ ध्येय मनात ठेवले आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही तर आपण आपल्या जीवनात अपयशी ठरलो आहोत हे निश्चित समजावे.म्हणून ध्येय प्राप्तीसाठी कोणताही खडतर प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उथळ पाण्याला खळखळाट फार* - केवळ बडबड करणार्‍यां कडून काम होत नाही. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्मनियंत्रणाणाचे महत्त्व* एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्‍ट शिकण्‍यास तयार होत असे. त्‍याने धनुष्‍यबाण तयार करण्‍यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्‍याच्‍यात अहंकार आला, तो आपल्‍या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्‍य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्‍यांनी जेव्‍हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्‍हा त्‍यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्‍यावी जी आतापर्यंतच्‍या कलांमध्‍ये श्रेष्‍ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्‍याच्‍याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्‍ही कोण आहात. बुद्ध म्‍हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्‍यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्‍हणाले,''जो धनुष्‍यबाण वापरतो त्‍याला त्‍याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्‍याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्‍वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्‍हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्‍यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्‍य तर स्‍वत:ला नियंत्रणात ठेवण्‍याचे असते. *तात्‍पर्य :- ज्‍यांना स्‍वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्‍याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परि‍स्थितीत आपल्‍याला आनंदी ठेवतो.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*आत्मभरारी* आत्मभरारीने पाऊले टाकावी पुढे यशाची शिखरे गाठावी गडे प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 26/03/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९०२ - नेमस्त पक्षाचे अध्वर्यू आणि नेते नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले, ज्यामुळे त्यांचे कर्तृत्त्व आणि नेतृत्त्व देशमान्य झाले. १९१० - लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला. पुढे या परिसराला किर्लोस्करवाडी असे नाव रूढ झाले. 💥 जन्म :- १९६९ - विक्रम राठोड, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९९७ - नवकमल फिरोदिया, ज्येष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती. १९९८ - डॉ. शांतिनाथ देसाई, कन्नड साहित्यिक. १९९९ - आनंद शंकर, संगीतकार. २००१ - जनार्दन हरी पटवर्धन, स्वातंत्र्यसैनिक आणि सनदी अधिकारी. २००३ - हरेन पंड्या, गुजरातचे माजी मंत्री(हत्या). २००३ - देविदास सडेकर, मराठी पत्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 14 एप्रिल ते 5 मे दरम्यान संपूर्ण देशभरात ग्रामस्वराज अभियान राबवणार मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - गिरीश महाजन आज सकाळी रामलीला मैदानावर जाणार, अण्णा हजारे यांच्याकडे सरकारचा प्रस्ताव मांडणार* ----------------------------------------------------- 3⃣ *कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आज सकाळी १० वाजल्यापासून आझाद मैदानावर बसणार उपोषणाला, विद्यार्थी हितासाठी संघटनेने पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन ५ मार्च रोजी मागे घेतले होते.* ----------------------------------------------------- 4⃣ *पुणे : आजपासून पुणे ते रायपूर थेट नवीन विमानसेवा सुरू होणार* ----------------------------------------------------- 5⃣ *विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी  मुंबई शिक्षक मतदार संघातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे अनिल बोरनारे यांना उमेदवारी जाहीर* ----------------------------------------------------- 6⃣ *दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी आयसीसीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला एका सामन्यासाठी केले निलंबित* ----------------------------------------------------- 7⃣ *मोहम्मद शमी कार अपघातात जखमी, ट्रकने कारला धडक दिल्याने झाला अपघात* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी : श्रीरामनवमी संपूर्ण भारतात उत्साहात साजरी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========     *कथा - गुरुदक्षिणा* वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.  http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= कर्करोग वा कॅन्सर हा शरीरातील  पेशींच्या  अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा  रोग आहे. प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशीँची आवशकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजे अर्बुद किंवा ट्यूमर. अर्बुदाचे दोन प्रकार आहेत. बिनाइन ट्यूमर म्हणजे कर्करोगाची गाठ. ही गाठ सहज काढून टाकता येते. अशा बिनाइन ट्यूमरच्या पेशी बाहेर पडून नव्या अवयवामध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करीत नाहीत. बहुतेक बिनाइन ट्यूमर प्राणघातक नाहीत.मारक गाठी (मॅलिग्नंट) कर्करोग. कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणार्‍या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवामध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्यापेशी लसिका संस्थेमार्फत किंवा रक्तवाहिन्यामधून इतर अवयवांमध्ये प्रवेशतात. त्यामुळे मूळ ज्या अवयवामध्ये मारक गाठी झालेल्या असतात त्याहून वेगळ्या अवयवामध्ये कर्करोग पसरतो. या प्रकारास कर्कप्रक्षेप म्हणतात. जेव्हा कर्करोग मूळ अवयवामधून दुसर्‍या अवयवामध्ये प्रक्षेपित होतो त्यावेळी दुसर्‍या अवयवामधील कर्करोग पेशी मूळ अवयवामधील कर्कपेशीप्रमाणेच असतात. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूमध्ये स्थालांतरित झाल्यास मेंदूमधील कर्कपेशी या फुफ्फुस कर्कपेशीच असतात. अशा आजारास प्रक्षेपित फुफ्फु्स-कर्करोग म्हणतात. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जो व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते, तीच व्यक्ती तुमच्या जीवनाला अर्थ देऊ शकते -,स्वामी विवेकानंद *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) दर्पण पेपर कोणी सुरू केले ?* आचार्य बाळशास्त्री जांभेकर *2) मराठा व केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?* लोकमान्य टिळक *3) साधना हे साप्ताहिक कोणी सुरू केले ?* साने गुरुजी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 राजेश जेठेवाड, बरबडा 👤 महेश मुतूकले 👤 अविनाश कामटकर 👤 श्रेयस पेंडकर, धर्माबाद 👤 श्रीकांत सारकलवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वास* गमावलेला विश्वास पुन्हा मिळत नसतो मेलेला घोडा कोणाचा पुन्हा पळत नसतो एकदा विश्वास उडाला की पुन्हा विश्वास रहात नसतो कितीही विश्वास आहे म्हणा मनात अविश्वास जात असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.* *आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्-भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे पाण्याचे महत्त्व तहान लागल्यावर कळते आणि ते आपल्या जवळ नसते तेव्हा अधिक कळायला लागते.जेव्हा आपल्याजवळ खूप असते तेव्हा त्याची किंमतही आपण करत नाही. अशाचप्रकारे काही सज्जन माणसांच्या बाबतीत असते.जेव्हा सज्जन आणि मोठ्यांच्या उपदेश करणा-यांच्या सहवासात राहतो तेव्हा आपल्याला त्यांनी केलेल्या उपदेशाची किंमत कळत नाही पण ती माणसे आपल्या पासून निघून जातात आणि मग कुठेतरी आपले चुकत आहे असे कळायला लागते तेव्हा त्यांची गरज आहे असे वाटायला लागते.अशावेळी मग त्यांना शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो तेंव्हा ती माणसे भेटत नाहीत. मग अशावेळी आपल्या जीवनात जीवन जगण्यासाठी जसे पाणी महत्त्वाचे आहे तसे आपल्या जीवनाला चांगला मार्ग दाखवणा-या सज्जन आणि मोठ्या उपदेशी करणा-या माणसांची गरज आहे .या दोघांनाही आपल्या जपायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *डोळ्यात केर नि कानात फुंकर* - रोग एक प्रकारचा व त्यावर उपाय भलतेच. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मुंगी आणि झाडाचे पान* एक धनाढ्य, श्रीमंत व्यापारी होता. त्याचा भला मोठा बंगला होता. त्याच्या बंगल्याला एक सुरेख टेरेस होता. त्या टेरेसवर एक झोपाळा होता, बरीच फुलझाडे लावलेली होती. विश्रांती घेण्याची ही जागा त्याची अत्यंत आवडती जागा होती. एके दिवशी तो व्यापारी झोपाळ्यावर विश्रांती घेण्यासाठी पहुडला होता. तेव्हा त्याचे लक्ष एका मुंगीकडे गेले. ती मुंगी झाडाचे एक वाळलेले पान घेऊन तुरु तुरु चालली होती. त्या पानाचा आकार मुंगीच्या शरीराच्या आकाराच्या मानाने बराच मोठा होता. तरी सुद्धा मुंगी ते पान घेऊन तुरु तुरु चालली होती. त्या व्यापार्या ला मजा वाटली व त्याने त्या मुंगीचे निरिक्षण करायला सुरवात केली. ती मुंगी तिच्या कामामध्ये ‘फुल्ली कॉन्सन्ट्रेडेड’ होती. ती इकडे बघत नव्हती की तिकडे बघत नव्हती. तिला तिचा मार्ग अचुक ठाऊक होता. ती उगीचच इकडे तिकडे भरकटत नव्हती किंवा आपला मार्ग चुकत नव्हती. तिच्या मार्गात अनेक अडथळे येत होते. पण ते सर्व अडथळे पार करून ती मुंगी ते पान घेऊन चालली होती. हे बघून त्या व्यापार्याला त्या मुंगीचे कौतूक वाटू लागले होते. पण तिच्या मार्गात एक भला थोरला अडथळा आलाच. ती मुंगी ज्या कॉन्क्रीटच्या स्लॅबवरून चालली होती त्या स्लॅबला मोठी क्रॅक गेली होती. या क्रॅकच्या दोन्ही टोकांमधील अंतर बरेच जास्त होते. मुंगीला पानासकट ते अंतर पार करणे अशक्य होते. फक्त एकटी मुंगीच काय ती जाऊ शकणार होती. आता मुंगी काय करते या विषयी त्या व्यापार्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. त्या मुंगीने ते झाडाचे पान खाली ठेवले. थोडावेळ इकडे तिकडे भटकली. परिस्थितीचे निरिक्षण केले. मग ते पान एका टोकाकडून उचलले व त्या कॉक्रिटच्या फटीवर अशा रितीने टाकले की त्या पानाचा पुल तयार होईल. मग मुंगी त्या पानाच्या पुलावरून पलीकडे गेली आणि पलीकडच्या भागात पानाचे जे टोक आले होते त्याला धरून ते पान उचलून चालू लागली. मुंगीची ही कल्पकता बघून तो त्यापारी थक्क झाला. मुंगी ती केवढीशी तर तिचा मेंदू तर किती छोटा- बघायला मायक्रोस्कोपच हवा. पण मुंगीच्या या छोट्या मेंदुमध्ये सुद्धा परिस्थितीचे निरिक्षण करण्याची आकलन शक्ती तर होतीच पण आलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी लागणारी कल्पनाशक्ती पण होती. सर्व अडथळे पार करून ती मुंगी ते पान घेऊन तिच्या वारुळापाशी आली. तिला ते पान आता आत, वारूळात न्यायचे होते. पण वारूळाचे दार म्हणजे एक छोटे छिद्र होते. त्या छोट्या छिद्रातून ते झाडाचे पान काही केल्या आता जाईना. मुंगीने थोडावेळ प्रयत्न केला. पण नंतर तिने तो नाद सोडून तिला व ते पान तेथेच टाकून एकटीच आत निघून गेली. महत्प्रयासाने त्या मुंगीने आणलेले झाडाचे पान काही तिला वारुळात नेता आले नाही. तिची सर्व मेहेनत बेकार गेली याचे त्या व्यापार्याच्या लक्षात आले व याचे त्याला खूप वाईटपण वाटले. पण त्याच्या लक्षात आले की अरे माणसांचे पण असेच असते. माणसे आयुष्यभर निरनिराळी पाने गोळा करत असतात, काहीजण तर यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत असतात. मग ही पाने विद्वत्तेची असोत, डिग्री-डिप्लोमा- सर्टिफिकेट सारख्या शैक्षणीक पात्रतेची असोत, धन-दौलत- श्रिमंतीची असोत, मान-सन्मान-प्रतिष्ठेची असोत, ऍवॉर्ड-बक्षीसे- मानाच्या पदव्यांची असोत नाहीतर अजुन कसलीतरी असोत. पण माणुस जेव्हा मृत्युच्या दारात पोचतो तेव्हा त्याला ही पाने मागेच ठेवावी लागतात, त्याला आपल्याबरोबर ही पाने काही नेता येत नाही. मग माणूस ढेर मेहेनत करून ही पाने का गोळा करत बसतो? आणि यातील किती पाने स्वतःसाठी व किती पाने इतरांसाठी दाखवण्यासाठी असतात? याचा अर्थ माणसाने पाने गोळा करू नयेत असा होत नाही. माणसाने पाने जरूर गोळा करावीत पण त्याचबरोबर जिवनाचा आनंद पण घ्यावा! ती मुंगी पान नेताना इकडे बघत नव्हती की तिकडे बघत नव्हती. तिच्या मार्गात अनेक सुंदर फुलांचे ताटवे येत होते पण त्याकडे तिचे लक्ष नव्हते. त्या फुलांचा सुगंध येत होता तो तीला जाणवत नव्हता. आजुबाजुला अनेक सुंदर दृष्ये होती पण ती तिला दिसत नव्हती. या सर्वांकडे दुर्लक्ष करून वारुळाच्या तोंडापर्यंत नेलेले पान काही तिला वारुळात नेता आले नाही. आपली अवस्था त्या मुंगीसारखी तर होणार नाही ना याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी नाही का? 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🙏महती माऊलीची 🙏* आई तुझ्या कुशीत जगले मी निवांत तुझ्या आठवणीचा वेदना सोसेन मी मनात शांत आई तुझे शिक्षण शाळेहून मोठे जीवनातील वाटेत अडले न मज कोठे नाहीस तु या जगात विलीन झाली अनंतात कुठं टेकू मी माथा सांगाया आयुष्याची गाथा रामकृष्ण आले गेले मीही पामर जाईल तुझी महती या जगी कायमचीही राहील आई तु आहेस मातृत्वाचा झरा तुझ्या नावातच आहे जीवनाचा अर्थ खरा नाही उमगणार आई ज्यास आहे आई डोळे भरुनी येई ज्यास नाही आई चरणी ठेवूनी माथा वंदिते मी तुजला उर भरुनी येते मजला काय सांगू मी तूजला तुझविन नाही कोणी आई तुच आहे या जगतातील माई जगी तुझ्या गातील गाथा म्हणूनच तुज संबोधतात माता 🙏🙏🙏🙏🙏 〰〰〰〰〰〰 *✍ प्रमिला सेनकुडे* ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰

*प्रभु श्रीरामांची वंशावळ* ०० - ब्रह्मा ०१ - ब्रह्माचा पुत्र मरीची. ०२ - मरीची चा पुत्र कश्यप. ०३ - कश्यप चा पुत्र विवस्वान. ०४ - विवस्वान चा पुत्र वैवस्वत मनु. (याच्याच काळात जलप्रलय झाला) ०५ - वैवस्वत मनुचा तिसरा पुत्र इक्ष्वाकु, १० पैकी. (याने अयोध्याला राजधानी व इक्ष्वाकु कुळाची स्थापना केली) ०६ - इक्ष्वाकुचा पुत्र कुक्षी. ०७ - कुक्षीचा पुत्र विकुक्षी. ०८ - विकुक्षीचा पुत्र बाण. ०९ - बाणचा पुत्र अनरण्य. १० - अनरण्यचा पुत्र पृथु. ११ - पृथुचा पुत्र त्रिशंकु. १२ - त्रिशंकुचा पुत्र धुंधुमार. १३ - धुंधुमारचा पुत्र युवनाश्व. १४ - युवनाश्वचा पुत्र मान्धाता. १५ - मान्धाताचा पुत्र सुसंधी. १६ - सुसंधीचे २: ध्रुवसंधी व प्रसेनजित. १७ - ध्रुवसंधी चा पुत्र भरत. १८ - भरतचा पुत्र असित. १९ - असितचा पुत्र सगर. २० - सगरचा पुत्र असमंज. २१ - असमंजचा पुत्र अंशुमान. २२ - अंशुमानचा पुत्र दिलीप. २३ - दिलीपचा पुत्र भगीरथ. (यानेच गंगा पृथ्वीवर आणली) २४ - भागीरथचा पुत्र ककुत्स्थ. २५ - ककुत्स्थचा पुत्र रघु. (अत्यंत तेजस्वी, न्यायनिपुण, पृथ्वीवरचा पहिला ज्ञात चक्रवर्ती. म्हणूनच इक्ष्वाकू कुळ हे *रघुकुळ* म्हणुन प्रसिद्ध झाले) २६ - रघुचा पुत्र प्रवृद्ध. २७ - प्रवृद्धचा पुत्र शंखण. २८ - शंखणचा पुत्र सुदर्शन. २९ - सुदर्शनचा पुत्र अग्निवर्ण. ३० - अग्निवर्णचा पुत्र शीघ्रग. ३१ - शीघ्रगचा पुत्र मरु. (याच्या सत्तेने आताचे अरबस्तान # मारुधर, मरुस्थान किंवा मरूभूमी म्हणून ओळखले जायचे) ३२ - मरुचा पुत्र प्रशुश्रुक. ३३ - प्रशुश्रुकचा पुत्र अम्बरीष. (राजाने कायम संन्यस्त असावे याचा परिपाठ यांनीच घातला) ३४ - अम्बरीषचा पुत्र नहुष. (यांच्यापासुन कुरुवंश सुरु होतो) ३५ - नहुषचा पुत्र ययाति. ३६ - ययातिचा पुत्र नाभाग. ३७ - नाभागचा पुत्र अज. ३८ - अजचा पुत्र दशरथ. ३९ - दशरथचे चार पुत्र *राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न.* ब्रह्माच्या *४०व्या पीढ़ीत* श्रीराम जन्मले. *चाळीस पिढ्यात* *असं झालं नाही, अस केलं नाही,* 👆चाळीस पिढ्या हे वाक् प्रचार यातुन जन्माला आले. अतिषय दुर्मिळ माहीती शेअर करित आहे ती वाचा नक्की आवडेल . ज्याने ही माहीती मिळवली त्याला माझे शतश: प्रणाम.... 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹💐💐💐

बिना लग्नाच्या मुलांची कविता *लग्न* वय झालं तरी अजून जमत नाही लग्न त्यात पोरींच्या अपेक्षांनी आडवं येतय विघ्न काय तर म्हणे ....... " व्यावसायिक नको नोकरीवाला पाहिजे पगार त्याचा सरकारी पाहिजे काळा नको गोरा गोरापान हवा सगळ्या बाबतीत कोरा करकरीत नवा घरा असावे दोन ताळी माडी दारात त्याच्या चार चाकी गाडी खेड्या ऐवजी शहरात असावा सासू सासऱ्याचा थोडाही त्रास नसावा तो असेल राजा मी होईल राणी कुणाचा डिस्टर्ब नको जेव्हा गाईन गाणी गर् गर् फिरणारा जो असेल भवरा माझ्या तालावर नाचेल तोच करीन नवरा ." संख्या कमी म्हणून मुलींचा रूबाब वाढलाय आधीच्या पिढीचा राग त्यांनी आमच्यावर काढलाय आमच्यासाठी आईबापानी मारल्या पोटातच मुली सांगा आता कशा पेटतील आमच्या संसारात चुली

संकलित

*सत्याचा शोध* सत्याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्यांनी धुळीचा कणाइतके नम्र असले पाहिजे.तरच सत्याचा शोध लागतो आणि असत्याचा नायनाट होतो. ✍प्रमिला सेनकुडे हदगाव (नांदेड)

जगी या जन्मी नाही कुणी स्वार्थाची परिभाषा आहे म्हणूनी 〰〰〰〰〰 प्रमिला सेनकुडे हदगाव (नांदेड)

स्वार्थाची परिभाषा जगावे इतके छान नसावा अभिमान स्वार्थाची परिभाषा नसावी अंगात हेच मर्म बाळगावे जीवनात कुणाचा व्देष करुन नेशील तरी काय मानवा हेच वेळ आहे आता तरी सुधारणा कर तु मानवा नको बाळगु तु स्वार्थाची परिभाषा संपून जातील तुझ्या सार्या आशा होईल तुझ्यापासुन नातीगोती पारखी स्वार्थाचा परिभाषेने नको करुस परकी. 〰〰〰〰〰〰 ✍©प्रमिलाताई सेनकुडे हदगाव (नांदेड)

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट झं 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/03/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-   १८५५ - आग्रा आणि कलकत्ता यांदरम्यान तारसेवा सुरू झाली. 💥 जन्म :-  १८८४ - पीटर डेब्ये, नोबेल पारितोषिक विजेता डच रसायनशास्त्रज्ञ. 💥 मृत्यू :-   १९४६ - अलेक्झांडर अलेखिन, रशियन बुद्धिबळ खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷   *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣  *बंगळुरू: कर्नाटक सरकारकडून लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याची घोषणा* ----------------------------------------------------- 2⃣  *नवी दिल्ली - कार्ती चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर* ----------------------------------------------------- 3⃣  *नवी दिल्ली : रामलीला मैदानावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन सुरू.* ----------------------------------------------------- 4⃣  *यवतमाळ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ.* ----------------------------------------------------- 5⃣  *तिरूवनंतपूरम : वरून काटे व आत गोड, रसाळ गरे असलेल्या फणसाला केरळ राज्याने बुधवारी राज्यफळाचा मान बहाल* ----------------------------------------------------- 6⃣  *महाबळेश्वरमध्ये तापमानात कमालीची घट, तापमान 10.3 अंशांवर.* ----------------------------------------------------- 7⃣  *नवी दिल्ली - गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज 27 मार्चपर्यंत स्थगित* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========           *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========               *श्रीरामनवमी विशेष* रघुपती राघव राजाराम ..... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃    *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळ नदीच्या अगदी पात्रात एक समाधी आहे. ती ब्रह्मर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांची आहे. त्यांचे नाव आताच्या पिढीला माहीत नसल्यास आश्चर्य नाही. विधी आणि वैद्यक या शास्त्रांचा अभ्यास केलेले अण्णासाहेब समाजकारणातील आणि राजकारणातील धुरिण होते. इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा दिला. ते अत्यंत तेजस्वी बुद्धीचे स्वदेश व स्वधर्म याबद्दल प्रखर अभिमान बाळगणारे होते. पाश्चात्य संस्कृतीच्या झगमगाटाने दिपून न जाता भारतीय संस्कृतीच्या व संस्कारांच्या तागडीत ती तोलून पाहण्याची बुद्धी त्यांच्यात होती. इंग्रजी राज्य आणि पाश्चात्य संस्कृती यांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी वासुदेव बळवंत फडके यांच्या उठावाला मान देण्यापासून विधवा विवाहापर्यंत आणि परराष्ट्रीय चळवळीपर्यंत सर्व उपक्रम करण्याची त्यांची तयारी होती. यामध्ये संस्था स्थापन करणे, वृत्तपत्रे काढणे कारखाने उभारून स्वदेशी उत्पादन करणे या सर्व गोष्टींचा त्यात अंतर्भाव होता.- जगदीश विष्णू जोशी *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक  📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) ज्ञानेश्वरी कोणी लिहिली ?*            संत ज्ञानेश्वर *2) अभंगवाणी कोणाची प्रसिद्ध आहे ?*           संत तुकाराम  *3) मनाचे श्लोक कोणी लिहिले ?*           संत रामदास *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂    *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सोमनाथ वाळके, सहशिक्षक, बीड 👤 राम मठवाले,सहशिक्षक *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========             *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ=========       *ध्यास* काही काहींना सतत नव्याचा ध्यास असतो  यशस्वी होण्याचा तोच तर खरा श्वास असतो  ध्यास धरणाराला खरं  यशस्वी होता येत  ख-या अर्थाने यशाचं गाणं त्याला गाता येत     शरद ठाकर   सेलू जि परभणी  8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'रियाज' म्हणजे आपल्यातील आपलाच शोध. या शोधातूनच कलावंताला आपल्या निर्मीतीचे कंद प्रतीत होतात. नव्या पायवाटांचे मागमूस कळतात. नव्या स्विकार-नकारांचे ध्वनी ऐकू येतात. नव्या प्रकाशाची किरणं मनाच्या आकाशात फाकू लागतात. सहस्त्ररश्मींचा मोरपिसारा मनामध्ये फुलून येतो. माणसाचं कवित्व रियाजानं अधिक प्रगल्भ आणि सहज सुलभ होतं. गाणं आधिक सकस आणि लयतत्व साकारत जातं.* *रियाज' आपल्यातील शक्यतांचा विस्तार नजरेत आणणारा विधी होय. आपल्या निर्मितीची किती क्षितीजं आपल्यासमोर उभा करतो तो. तो आनंदसोहळा होतो. हा आनंद हिंदोळ्यावर झोके घेतो. रसिकांच्या रसिकत्वाला आवाहन करीत राहतो. त्यांच्या चित्तवृत्ती पुलकित करीत राहतो. रियाजामुळे मनावर चढलेली पुटं नाहीशी होतात. ज्ञानेंद्रियांना अनेकविध चेतना मिळतात. त्या चेतनेने सारा भवताल 'चैतन्यपूर्ण' होतो.*                       🌹 *॥ रामकृष्णहरी  ॥* 🌹     🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ=========      ज्यांना वादच करायचा असतो त्यांना कोणतेही कारण लावून करता येतो.अशा वादांमुळे माणसांचे असलेले चांगले संबंध विनाकारण बिघडून जातात.पण ज्यांना सुसंवाद साधायचा असतो ते मात्र एखादे चांगले कारण शोधून जीवनात काही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आहे त्या जीवनात इष्ट बदल घडवून नवे करण्याची जीवनाला मिळावी व जीवन समृद्ध व्हावे यासाठी एक सुसंवादातून दिशा मिळते.म्हणून जीवनात वाद करण्यापेक्षा सुसंवाद साधण्याचे  अधिक प्रयत्न करायला हवेत. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *जशी देणावळ तशी धूणावळ* - जशी मजुरी द्याल, तसेच काम होईल.  *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ========ஜ۩۞۩ஜ= 〰〰〰〰〰〰 *मूल्यांकन* एका महात्म्याच्या शिष्यांमध्ये एक राजकुमार आणि एक शेतकऱ्याचा मुलगा होता. राजकुमाराला राजपुत्र असण्याचा अहंकार होता.मात्र शेतकऱ्याचा मुलगा विनम्र आणि कर्मठ होता.राजकुमाराचे वडील अर्थात तेथील राजा दरवर्षी एका स्पर्धेचे आयोजन करीत असत. त्यात बुद्धिमत्ता आणि दृष्टीची पारख केली जात असे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूरदूरचे राजकुमार येत असत. अध्ययन पूर्ण झाल्यावर राजकुमाराने शेतकऱ्याच्या मुलालाही या स्पर्धेत सामील होण्याचे आमंत्रण दिले. कारण त्याला तेथे बोलावून त्याचा अपमान करण्याचे त्याच्या मनात होते. जेंव्हा शेतकऱ्याचा मुलगा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला तेंव्हा त्याला राजकुमार आणि राजपुत्रांमध्ये बसण्यास मनाई केली       शेवटी शेतकऱ्याचा मुलगा वेगळा बसला. राजाने प्रश्न विचारला,"तुमच्यासमोर जर जखमी वाघ आला तर तुम्ही त्याच्यावर उपचार कराल का त्याला तसेच सोडून निघून जाल ?" सर्व राजपुत्रांचे उत्तर हे एकच होते. "आम्ही आमचा जीव धोक्यात घालून वाघावर उपचार करणार नाही." मात्र शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला," मी जखमी वाघावर उपचार करेन कारण जखमीचा जीव वाचविणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. माणूस होण्याच्या नात्याने माझे हे कर्म आहे. मांस खाणे हे जर वाघाचे कर्म असेल तर तो बरा झाल्यावर माझा जीव का घेईना ? त्यात त्याचा दोष नाही. माणूस म्हणून मी त्याच्यावर उपचार करणे हे माझे आद्यकर्तव्य आहे." हे उत्तर ऐकताच राजाने त्या मुलाला विजयी घोषित करून राज्याचे मंत्रिपद दिले. *तात्पर्य-व्यक्तीचे मुल्यांकन हे त्याच्या विचारातून होत असते. त्याच्या राहणीमानावरून किंवा त्याच्या दिसण्यावरून होत नसते. कधी कधी साधारण दिसणारी माणसे असाधारण कार्य करतात.* 〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✍ *मै झुकता हूँ, क्योंकि मुझे रिश्ते निभाने का शौक है...;* *वरना* *गलत तो हम कल भी* *नहीं थे और आज भी नहीं हैं...* *मैं अपने गम में रहता हूँ,* *नबाबों की तरह..!* *परायी खुशियों के पास* *जाना मेरी आदत नहीं...!* *सबको हँसता ही देखना* *चाहता हूँ मैं*, *किसी को धोखे से भी* *रुलाना मेरी आदत नहीं..,* *बाँटना चाहता हूँ, तो बस* *प्यार और मोहब्बत...,* *यूँ नफरत फैलाना मेरी* *आदत नहीं...!!* *जिंदगी मिट जाए, किसी* *के खातिर गम नहीं,* *कोई बद्दुआ दे मरने की* *यूँ जीना मेरी आदतनहीं...!* *दोस्ती होती है, दिलों से* *चाहने पर*, *जबरदस्ती दोस्ती करना,* *मेरी आदत नहीं..!* *नाम छोटा है, मगर दिल* *बड़ा रखता हूँ...,* *पैसों से उतना अमीर नहीं हूँ...,* *मगर,* *अपने यारों के गम...* *खरीदने की हैसियत रखता हूँ।*

*विंचा पीडी नांगी ।* *ज्याचा दोष त्याचे अंगी ।।१।।* *केला पाहिजे विचार ।* *मन मित्र दावेदार ।।ध्रु.।।* *मधुरा उत्तरीं ।* *रावा खेळे उरावरी ।।२।।* *तुका म्हणे रेडा ।* *सुखें जाती ऐशा पीडा ।।३।।* *विवरण:* संत तुकाराम महाराज म्हणतात- मी सुखी असेल, तर याला कारण माझा स्वभाव असतो. आणि मी दुःखी असेल, तर यालाही कारण माझा स्वभावच असतो. मला सुख माझ्यामुळं, आणि दुःख मात्र दुसऱ्यांमुळं... असं नसतं. आपल्या सुख-दुःखाच्या कारणांविषयी स्वतःच स्वतःच्या बाबतीत विचार केला पाहिजे, यासाठी तुकाराम महाराज 'विंचू, पोपट आणि रेडा' यांच्या स्वभावाच्या चांगल्या वाईट परिणामांचा परिचय करून देताना म्हणतात... .... आपल्या अंगातले गुणदोषच आपल्या सुखदुःखाला कारण असतात. "जसं, विंचवाच्या नांगीत विष असतं, त्यामुळं तर लोक विंचवाला पाहिल्याबरोबर त्याला मारायचा विचार करतात." अर्थात विंचवाच्या दुःखाला कारण त्याच्याच नांगीतील विष असते. यावरून, आपलं मनंच आपला मित्र आणि आपला शत्रू असतो; असा प्रत्येकानं विचार केला पाहिजे." आपल्या त्रासाला, दुःखाला आपला स्वभाव म्हणजेच मन आहे, असा विचार करून 'दुरुस्ती दुसऱ्याची नाही, तर स्वतःचीच केली पाहिजे. ..... विंचवाच्या विपरीत पोपटाचं उदाहरण देताना तुकोबा म्हणतात, "पोपट गोड बोलतो, म्हणून तर लोक त्याला जवळ करतात आणि तोही लोकांच्या मस्तपैकी अंगाखांद्यावर खेळतो...अर्थात पोपटाच्या सुखाला कारण, त्याचंच गोड बोलणं असतं. ... आता विंचवाच्या दुःखाचं आणि पोपटाच्या सुखाचं कारण सांगून तुकोबा रेड्याविषयी बोलताना सांगतात, "रेड्याच्या अंगी कोणताही लोकप्रिय गुण नाही आणि कोणताही लोकप्रिय दोषही नाही. त्यामुळं, त्याला पोपटासारखं कुणी अंगाखांद्यावर खेळवावं असं सुख नाही आणि त्याला पाहून कुणी मारून टाकण्याची इच्छा धरावी, असं विंचवासारखं दुःखही नाही. विंचवाला दुःख त्याच्याच नांगीमुळं होय. पोपटाला सुख त्याच्याच गोड बोलण्यामुळं होय. रेड्याला सुख आणि दुःख दोन्हीही नाही, याला कारण त्याचाच स्वभाव होय. यावरून तुकोबांना म्हणायचं आहे की, 'माझ्या सुखाला आणि दुःखाला कारण दुसरं कुणीच नाही तर, माझाच स्वभाव आहे आणि असाच प्रत्येकानं विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्या दुःखाचे दोष आपण आपल्याच जवळच्या माणसांना देऊन त्यांना दुःखी करणार नाही.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/03/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक हवामान दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९३१ - भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी. 💥 जन्म :- १९३८ - मेनार्ड जॅक्सन, अटलांटाचा पहिला श्यामवर्णीय महापौर. १९७९ - इमरान हाश्मी, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :-  २००७ - श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक. २००८ - गणपत पाटील, मराठी चित्रपट अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *शेतकऱ्यांना एकूण 3373 कोटी 71 लाख रूपयांची मदत जाहीर, केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे उचलणार खर्चाचा भार* ----------------------------------------------------- 2⃣ *संसदेकडून  'पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी (Payment of Gratuity) कायद्यात सुधारणा सुचविणाऱ्या विधेयकाला मंजूरी देण्यात आली, त्यामुळे भविष्यात २० लाख रुपयापर्यंत ग्रॅच्युईटी करमुक्त असेल. यापूर्वी ही मर्यादा 10 लाख रुपये इतकी होती* ----------------------------------------------------- 3⃣ *उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरींचं नाव; खडसेंच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - उबेर टॅक्सीचालकांचा संप मागे, बहुतांश मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तीन दिवसांनी संप घेतला मागे* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक- गोदावरी नदीसह कोणत्याही नदीत रासायनिक पाणी सोडल्यास उद्योजकावर कारवाई करणार. प्रसंगी कारखाने सील करणार. आयुक्त तुकाराम मुंढे यांची उद्योजकांना तंबी.* ----------------------------------------------------- 6⃣ *मोहम्मद शामीवरील मॅच फिक्सिंगचे ग्रहण सुटले, बीसीसीआयकडून क्लीन चीट* ----------------------------------------------------- 7⃣ *तिरंगी मालिकेत भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्महत्या : एक चिंतन* ......जेंव्हा जगणेच मुश्कील होऊन बसते आणि यापेक्षा मेलेले बरे असा जेंव्हा विचार मनात येतो तेंव्हा आपोआप ती पाऊले आत्महत्येकडे वळतात. एकाच बाबीवर जास्तीत जास्त वेळा विचार केला की माणूस टोकाची भूमिका घेऊ शकतो. माणसासमोर अनंत कष्ट आणि अडचणी असतात. त्या सर्व समस्येवर कुठे ना कुठे पर्याय असतो. मात्र ही समस्या सुटणार नाही आणि माझे काही खरे नाही असे जेंव्हा आपल्या मनाला वाटते तेंव्हा माणूस जीवन संपविण्याचा मार्ग धरतो. मात्र आजची वेळ उद्या नसते........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_22.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= कल्‍पना चावला ( मार्च १७ इ.स. १९६२:कर्नाल, हरयाणा -- फेब्रुवारी १ इ.स. २००३:टेक्सासवर अंतराळात ) ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. कल्पना चावला यांचा जन्म १ जुलै 1962 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांना मित्र मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीपला जाण्यात रस वाटे. त्यांना बाहेरच्या जगात फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने ‘मोट’ असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जसजशी प्रगती होत जाते, तसतशा प्रगतीच्या मर्यादा जास्त जास्त जाणवू लागतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *1) गीतांजली कोणी लिहिले ?* रवींद्रनाथ टागोर *2) आनंदमठ कोणी लिहिले ?* बंकिमचंद्र चॅटर्जी *3) श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण ?* साने गुरुजी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 मल्लिकार्जुन शिवाजी तांदळे रा.तांदुळवाडी जि. परभणी 👤 सूर्यकांत आचार्य, निवृत्त शिक्षक 👤 साईनाथ सूत्रावे, करखेली 👤 विनायक नरवाडे 👤 अशोक गड्डमवार 👤 संजय मनुरे, हिंदी कवी, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *लोखंड* लोखंड गरम आहे तोवर घाव घालता येतो दक्ष राहून विरोधकाचा कसाही डाव टाळता येतो योग्य वेळी माणसाला घाव घालता आला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा सहज योग्य तुकडा केला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजच्या प्रसारमाध्यमांनी मनातल्या भावनांना बंदीस्त करुन टाकले आहे. मनातले विचार प्रकट करण्यासाठी संधीच उपलब्ध करून देत नसल्यामुळे माणसांच्या विचारांची देवाणघेवाण होत नाही. त्यामुळे चांगल्याही विचारांना मनातून बाहेर येण्यासाठी बांध घातला गेला आहे. त्यामुळे सुखी कोण..? आणि दुःखी कोण..? हे शोधणे अवघड होऊन बसले आहे. या सा-यांतून सुटका करायची असेल तर या प्रसारमाध्यमांपासून थोडे दूर राहून प्रचलित प्रसारमाध्यमांबद्दलचा मोह थोडा दूर ठेवला पाहिजे.* *त्याऐवजी थोडा संवाद, चर्चा, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करुन आपुलकीचे, प्रेमाचे, स्नेहाचे संबंध जोडण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. तरच प्रत्येकाला एकमेकांबद्दलची मनातली असणारी ओढ पूर्वीसारखी कायमची राहील. माणूस माणसाला विचारायला लागेल आणि जीवनव्यवहार सुरळीत चालायला लागतील. हाच माणुसकीचा धर्म जीवंत राहील अन्यथा माणसांपासून माणूस दूर जावून माणसामध्ये दडून बसलेली विकृती जन्मास येऊन सर्वत्र नैराश्याचे वातावरण निर्माण होईल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्ही केलेला एक चांगला विचार तुम्हाला तर आनंद देतोच आणि त्या तुमच्या आनंदाबरोबरच इतरांनाही तुमच्या चांगल्या विचारांमुळे आनंद आणि प्रेरणा मिळते.म्हणजे तुम्ही केवळ तुमच्या आनंदी जीवनाचा विचार करत नाही तर इतरांच्याही आनंदी जीवनाचा विचार करत आहात हे लक्षात असू द्या. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *हलवायाच्या घरावर तूळशीपत्र*- दुसर्‍याच्या जिवावर स्वतः उदार पणा दाखवणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कर्म आणि धर्म* भगवान गौतम बुद्ध यांना एका गावी प्रवचनासाठी निमंत्रण दिले होते. ज्या शेतकऱ्याने निमंत्रण दिले होते तो अत्यंत भाविक होता. आपणाबरोबर आपल्या गावातील लोकांना याचा लाभ व्हावा हि त्याची इच्छा होती. गावाबाहेरच्या एका विस्तीर्ण अशा मोकळ्या पटांगणात एक वृक्ष होता. त्याला पार होता. तेथे प्रवचन घेण्याचे ठरले. ज्या दिवशी प्रवचन सुरु होणार त्यादिवशीच त्या शेतकऱ्याला चिंतेने ग्रासले, त्याचा सर्वात लाडका बैल हरवला. शेतात बांधून ठेवला असता दावं तोडून बैल निघून गेला. शेतकरी बैलाला शोधायला बाहेर पडला. कोस-दोन कोस चालला. गावापलीकडच्या डोंगराशी कुरण होते. तिथे त्याने बैलाला शोधलं मात्र डोक्यात विचार प्रवचनाचे चालू होते. खूप वेळ निघून गेला होता. शेतकऱ्याला प्रवचनाला जाता आले नाही. तोपर्यंत प्रवचन संपले होते. गावकरी घरी निघून गेले होते. बैल मिळाल्याचा आनंद आणि प्रवचन हुकल्याच दुख असे दोन्ही भाव त्याच्या मनात होते. दुसऱ्या दिवशी मात्र शेतकरी वेळेत प्रवचनाला हजर राहिला. प्रवचन संपल्यावर विनम्रपणे गौतम बुद्धांच्या पाया पडून तो म्हणाला," महाराज, मी काल प्रवचनाला येवू शकलो नाही. क्षमा करा. माझा बैल हरवला होता. पण बैलाला शोधतानासुद्धा माझे प्रवचन हुकले व चांगले विचार ऐकण्यापासून वंचित राहिलो याचे दुख मनाला डाचत होते." यावर बुद्ध मंदस्मित करीत म्हणाले," चांगल्या गोष्टी ऐकण्यापासून वंचित राहिल्याचे दु:ख तुला झाले यातच तुझे भले आहे. आणि बैलाला शोधणे हे तुझे कर्तव्य आहे. तू बैलाला शोधात असताना सुद्धा प्रवचनाचा विचार करत होता म्हणजेच तू कर्म करत असताना धर्माचा विचार करत होता, कर्म करणे हेच धर्माचे मुख्य सार आहे." तात्पर्य- कर्माचे पालन म्हणजे धर्माचे पालन होय. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?* 🙏🏼👇🏼 एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?" या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. " असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली. सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले. जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे. या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले. भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या. एका विहरीभोवती चार विहीरी होत्या. चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती. हे पाहून भीम चक्रावून गेला. नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे. जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली. पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते. खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले. तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते. हे पाहून नकूल गोंधळून गेला. सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली. ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली. यावेळी सहदेवही चकीत झाला. या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला. श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला. "कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती. कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील. श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही. कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले. कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले." 🙏राम कृष्ण हरी🙏 *"जसे कर्म, तसे फळ."* *"कितीही विरोध होऊदेत, चांगल्या व योग्य गोष्टींनाच आपला पाठींबा द्या."* 🌹🌺 🌺🌹

*काळोखातील धुमारे* नभातील चंद्राला काळोखाचे धुमारे भारलेल्या स्वरांना कैफल्याचे वाहते वारे सगळेच तारे कैसे भकासलेले अन् चुकलेल्या पक्ष्यांचे कैफात वार झाले कुणाचा बेत अन् कुणाचे वार केले वेड्या जिवाचे माञ हाल कैसे झाले 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे 〰〰〰〰〰〰

*आटलेले झरे* 💧 थेंबाथेंबाने मी साचतो गरज तुमची भागवतो माझे मोल जाणावे तुम्ही तुमचा जीव वाचवेन मी 🌴☘ ☘ 🌴☘🌴 लागवड वृक्षांची करा तुम्ही पावसाचे पाणी साचवा तुम्ही 💦 आटलेल्या झर्याला पाणी येईल तेव्हाच मानवीजीवन सुखी होईल. 💧 पुनर्भरनाची उपाययोजना भरभरून करा नाहीतर पुढच्या पिढीला शोधावा लागेल झरा 💧 आटलेला झरा सांगतो तुम्हा थेंब थेंब पाण्याचे मोल तुम्ही जाणा 💧 पावसाच्या पाण्याची वाट तुम्ही पहा पण त्याअगोदर एक तरी झाड लावा आणि जगवा. ☘🌴☘🌴☘🌴 〰〰〰〰〰〰 *✍प्रमिलाताई सेनकुडे* 🙏🙏 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/03/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक जलदिन* 💥 ठळक घडामोडी :-  १८६८ - रॉबर्ट मिलिकेन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. १८६९ - एमिलियो अग्विनाल्डो, फिलिपाईन्सचा पहिला राष्ट्राध्यक्ष. 💥 जन्म :- १९८४ - प्रभाकर आत्माराम पाध्ये, मराठी पत्रकार, लेखक. 💥 मृत्यू :-  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *जम्मू-काश्मिरच्या कुपवाडा येथे अतिरेक्यांसोबतच्या चकमकीत चार जवान शहीद. चार अतिरेक्यांना कंठस्नान. तिघांचा शोध सुरू.* ----------------------------------------------------- 2⃣ *यवतमाळ : नगरपरिषदेने थकीत वीज बिलाचे एक कोटी रुपये भरल्याने बुधवारी होणारी वीज कपातीची नामुष्की टळली. नगरपरिषदेकडे दोन कोटी ८१ लाख रुपये थकीत.* ----------------------------------------------------- 3⃣ *जळगाव : मनपाच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा सलग दुसऱ्या दिवशी बंद. कोट्यवधींची उलाढाल ठप्प.* ----------------------------------------------------- 4⃣ *जगभरातील रेल्वेगाड्यांना ‘चाकण’चे इंजीन, जर्मनीतील प्रकल्प येणार भारतात* ----------------------------------------------------- 5⃣ *हिंगोली : कर न भरल्याने औंढा नागनाथ येथील महावितरण कार्यालयास महसूल विभागाने सील ठोकले.* ----------------------------------------------------- 6⃣ *चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे लवकरच न्यायालय सुरू होणार, राज्याच्या मंत्रिमंडळाने यासंदर्भात घेतला निर्णय* ----------------------------------------------------- 7⃣ *सलग दोन वेळा मि. इंडिया 'किताब जिंकणाऱ्या सुनीत जाधवला पुण्यात हॅटट्रिक नोंदवण्याचा विश्वास* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक जलदिन निमित्ताने..* पाणी म्हणजे जीवन वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/04.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रमेश देव*  हे मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. मराठी अभिनेत्री सीमा देव त्यांची पत्‍नी असून अभिनय देव आणि अजिंक्य देव ही यांची मुले आहेत. राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ."* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  पंजाबची राजधानी कोणती ?* 👉 चंदीगड *२) चंद्रपूरच्या अभयारण्यचे नाव काय आहे ?* 👉   ताडोबा *३)  महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?* 👉 पुणे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 रमेश कत्तूरवार, पत्रकार, धर्माबाद 👤 सनीदेवल जाधव 👤 शंकर वर्ताळे 👤 गणेश मैद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *गोंधळ* रोजच्या गोंधळाला लोक हसत असतात अंधारात केलेल्या गोष्टी उजेडात येत असतात अंधारात करा की उजेडात गोंधळ बाहेर येतो आपल्याला वाटत नसला तरी चर्चेचा विषय होतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एका सोनाराच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हटले,,"दादा, आपले दुःख खरे तर एकसमान आहे. दोघांनाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?"* *लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघांनाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाही एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुस-याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."* *"माणसांचेही तसेच आहे, आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो."* ••●❤‼ *रामकृष्णहरी* ‼❤●•• ❤❤❤❤❤❤ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जर प्रत्येकाने आपल्या कामाचे नियोजन पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले तर ते काम यशस्वीपणे पार पडेल. अन्यथा कामामध्ये व्यवस्थितपणा राहणार नाही.कामाचा दर्जाही घसरेल,मनाची घालमेल होईल, कामामध्ये लक्ष राहत नसल्यामुळे आणि एकाग्रता नसल्यामुळे स्वत:मध्ये चिडचिडेपणा येऊन आपला राग समोरच्या व्यक्तीवर काढायला लागतो.या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कामात पूर्वनियोजन करायला हवे.तरच आपल्याला मानसिक समाधान मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *हत्ती गेला नि शेपूट राहिले* - कार्याचा मोठा भाग पार पाडून, थोडेसे कार्य शिल्लक राहणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सवयीचा परिणाम* एका माणसाने त्‍याच्‍या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्‍या पोपटाला चांगले खायलाप्‍यायला मिळत असे व पोपट बोलका असल्‍याने घरातील लोकांकडून त्‍याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्‍या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्‍य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्‍या माणसाने पोपटाला खाणे देण्‍यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्‍याच्‍याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्‍याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्‍या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्‍याने त्‍याला फारसे नीट उडताच येत नव्‍हते. एका झाडावर गेला असता त्‍याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्‍याने त्‍याला पोपटांची भाषा येत नव्‍हती म्‍हणून इतर पोपटही त्‍याला सहकारी मानत नव्‍हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्‍याने त्‍याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्‍याने तो आजारी पडला व मरून गेला. तात्‍पर्य : - जास्‍त काळ पारतंत्र्यात (गुलामगिरीत) राहिल्‍याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्‍कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्‍वातंत्र्य टिकवण्‍यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्‍या संस्‍कृतीचे चांगले काही घेताना आपल्‍या संस्‍कृतीचे विस्‍मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

कारभारी राजाचा राजवाड्यात असतात कारभारी म्हणूनच राज्यकारभार सुरळीत चालतो दरबारी प्रमिला सेनकुडे हदगाव (नांदेड)

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/03/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९३ - डन्स स्कोट्सला पोप जॉन पॉल द्वितीयने संतपद बहाल केले. २००५ - मिनेसोटाच्या रेड लेक गावातील हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याने १० व्यक्तींना गोळ्या घालून ठार मारले. 💥 जन्म :- १९७८ - राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री. 💥 मृत्यू :-  १६१७ - पोकाहोन्टास, मूळ अमेरिकन स्त्री, पोव्हाटनची मुलगी. १८४३ - ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीत नागरिकांना अडचणीला तोंड द्यावे लागू नये यासाठी मोठ्या प्रमाणात कापडी पिशव्या बाजारात आणण्याची कार्यवाही सुरू आहे. बृहन्मुंबई महापालिकेला त्यासाठी ५ कोटी रुपये निधी देण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत सांगितले.* ----------------------------------------------------- 2⃣ *ऊर्जा निर्मिती व रेल्वेसाठी लागणारी इंजिन्स पहिल्यांदाच तयार होणार भारतात. फोर्स मोटर्स आणि रोल्स रॉईस यांच्यात 300 कोटींचा करार* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई-नाशिक, पुणे-नाशिक विमानसेवा तांत्रिक कारणांमुळे 15 मार्चपासून बंद. जळगाव-मुंबई विमानसेवाही बंद.* ----------------------------------------------------- 4⃣ *औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३२० कोटी ७ लाख रूपयांचा अर्थसंकल्प वादळी चर्चेनंतर अनेक कपात सुचना मान्य करत मंजूर* ----------------------------------------------------- 5⃣ *अहमदनगर : माळीनगर भागातील मारुती कुरिअरच्या कार्यालयात पार्सलमध्ये स्फोट, तीन जण जखमी, पोलिसांकडून तपास सुरु.* ----------------------------------------------------- 6⃣ *आजपासून महाविद्यालयाच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या पुर्नपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू, एक तास उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा केंद्रात मिळणार प्रवेश* ----------------------------------------------------- 7⃣ *चॅम्पियन्स ट्रॉफी 20 षटकांची व्हावी, ही तर आयसीसीची इच्छा; बीसीसीआयचा मात्र विरोध* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========       *कमवा आणि शिका* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.  http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========    *तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी* तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (जानेवारी २७, १९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते. त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता.  वेद, उपनिषदे, रामायण, महाभारतइत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"हसता हसता सामोरे जा आयुष्याला* *तरच घडवू शकाल भविष्याला* *कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही* *आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  मुंडा आदिवासी जमात अधिक वास्तव्य असणारे राज्य कोणते?* 👉      झारखंड *२)  दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात?* 👉     संयूग *३)  संयूगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या सौजन्या व अणूंची संख्या यांच्या साहाय्याने संयूगाच्या केलेल्या लेखनास काय म्हणतात?* 👉    रेणूसुत्र *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 स्नेहलता कुलथे, साहित्यिक 👤 पी. अनिल, तेलंगणा 👤 शिवा जी. गुडेवार 👤 प्रवीण बडेराव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *क्षमा* लक्षात ठेवा दुबळ्यांना फक्त द्वेष करता येतो दुस-या विषयी मनात आकस धरता येतो वीर मात्र चूकणाराला क्षमा करत असतात चूकणाराला क्षमा करणारे श्रेष्ठ ठरत असतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'स्पर्शसुख' म्हणजे प्रेम नक्कीच नाही. तो प्रीतीचा मुळ रंग नव्हे. तो नुसता अभिलाषेचा तवंग ! एक सवंग लालसा ! जाता येता भेटत राहते, जाणवते. स्पर्शाची ही लालसा रोज ऑफिसला जाताना लोकलमध्ये सहन करावी लागते. रस्त्याने चालताना लादली जाते. बुकिंग क्लार्कने तिकीट देताना स्पर्श करावा, बस कंडक्टरने तेच, वाण्याने पुड्या देताना तेच, ऑफिसरने फाईल देताना तेच. हीच लालसा ऑफिसच्या लिफ्टमध्ये सुध्दा सुटाबुटात चिकटुन जाते. वर पुन्हा ‘सॉरी’चं गुलाबपाणी शिंपडायचं आणि एक औशट हास्य. सगळीकडेच ही लालसा थैमान घालताना दिसते. ऑफिसच्या कामासाठी फोन करावा तर पलिकडचा पुरूषी आवाज अकारण मवाळ होतो. नजरा तर दुसरं काही ओकतच नाहीत. स्त्री देहावर त्या अर्थपूर्ण नजरांची पुटं चढलेली असतील.. पुटं !* *महाभारततील युध्द समाप्तीनंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रथम रथामधून उतरायला सांगितलं. अर्जुनाला नवल वाटलं. तरी कृष्णाचं ऐकुन तो उतरला. त्यानंतर श्रीकृष्ण उतरताच, अर्जुनाचा रथ जळून गेला. त्यावर श्रीकृष्णाने सांगितलं, ‘कौरव सैन्याने टाकलेल्या अस्त्रांचा परिणाम रथावर झालेला होता. जर मी अगोदर उतरलो असतो, तर हा रथ तुझ्यासकट जळून गेला असता.’ आयुष्यभर "स्त्रीदेहाचं संरक्षण असाच कुणी अज्ञात कृष्ण करीत असला पाहिजे. नाहीतर पुरूषांच्या नजरांनी तो देह चितेवर चढण्यापूर्वीच जळून गेला असता."* *~वपुर्झा* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔱🔱🔱🔱🔱🔱 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सत्तेपुढे शहाणपण नाही* - ज्याच्या हाती सत्ता आहे :त्याच्या मतापूढ़े इतरांच्या मताला काहीच किंमत नसणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= एकदा *एका उंदराने हिरा* गिळला. हिऱ्याच्या मालकाने त्या *उंदिराला मारण्यासाठी* एका शिकाऱ्याला कंत्राट दिले. शिकारी जेव्हा त्या उंदिराला मारण्यास पोहचला तेव्हा *सगळे उंदिर एक घोळका* करून एका दुसऱ्यावर *चढून दाटीवाटीने* बसले होते, पण एक उंदिर त्यांच्यापासून *वेगळा बसला* होता. शिकाऱ्याने सरळ जाऊन त्या वेगळ्या बसलेल्या त्याच *उंदिराला पकडले ज्याने हिरा गिळला होता.* हिरामालक आश्चर्यचकित झाला त्याने शिकाऱ्यास विचारले, तुम्ही हजारो उंदरातून ज्याने हिरा गिळलाय त्याच *उंदराला कसे काय ओळखले?* शिकाऱ्याने उत्तर दिले खूप सोपं काम होत, *जेव्हा मूर्ख धनवान बनतो तेव्हा तो इतरांशी संपर्क तोडतो..!* आयुष्यात *धन, दौलत, ऐश्वर्य, संपत्ती,नाव आणि सगळं काही कमवा* पण *आपण ज्या समाजात वाढलो, जगलो, मोठे झालो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो.* आपण ह्या *समाजामुळेच मोठे झालो हे कधीच विसरू नका..* नाहीतर त्या *मूर्ख उंदिरामध्ये* आणि *आपल्यात* काहीच *फरक* उरणार नाही..! *माणसे जोडा* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🦅🦅🦅🦅🦅🦅 *साद चिऊताईची* 🦅🦅🦅🦅🦅🦅 दिसामागून दिस गेली संख्या माझी ढळत गेली अजुनही मानवी मनाला साद कशी नाही आली 💧💦☘💧💦☘ अशी व्यथा माझी कोणी बर केली मुक्या जीवा माझा वेदना ही सोसेना झाली ☘💦☘💧☘💧☘ एकएक करूनी वाढायचे सोडूनी कमी होत चाललो आम्ही आभायातुनी ☘💧💦💧☘💧 आमच्या जीवाची हाक तुम्हांला सांगू तुमच्या सोयीसाठी जीव नका आमचा टांगु छपरावर घराचा दाणा पाणी मला ठेवा हाच माझा जीवनातील अनमोल मेवा ☘🌴💧☘💦💧☘ जिव माझा वाचेल तुमच्या हातुन हीच साद घालुनी येते मी परतूनी ☘💧💦☘💧☘ अशी चिऊचिऊची साद मि घालते अंगणी येते आनंदाने बागडते 🦅🦅🦅🦅🦅 🙏🙏🙏🙏 *✍©प्रमिलाताई सेनकुडे* 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 20/03/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक चिमणी दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १७३९ - नादीरशहाने दिल्ली लुटली. मयूरासनासहित नवरत्ने लुटून इराणला पाठविली. 💥 जन्म :- १७२५ - अब्दुल हमीद पहिला, ऑट्टोमन सम्राट. 💥 मृत्यू :-  १९३४ - एम्मा, नेदरलँड्सची राणी. २००४ - जुलियाना, नेदरलँड्सची राणी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *अंगणवाडी सेविकांचं निवृत्तीचं वय 65 वर्ष. मानधनही 1500 रूपयांनी वाढवणार. पंकजा मुंडे यांची विधानसभेत घोषणा.* ----------------------------------------------------- 2⃣ *पंजाब सरकारने घेतला राज्यात हुक्का बारवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣ *औरंगाबाद : पैठणगेट येथे किसानपुत्र आणि शेतकरी संघटनेच्या वतीने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी प्राध्यापक, विद्यार्थी, वकील आदींचा उपोषणात सहभाग.* ----------------------------------------------------- 4⃣ *दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नितीन गडकरींची मागितली माफी. नितीन गडकरींकडून पटियाला हाऊस कोर्टातील खटला मागे.* ----------------------------------------------------- 5⃣ *चारा घोटाळा: राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव चौथ्या खटल्यातही दोषी* ----------------------------------------------------- 6⃣ *विशेष टाडा कोर्टाने फारुख टकला याला सुनावली 28 मार्चपर्यंत पोलिस कोठडी* ----------------------------------------------------- 7⃣ *आयसीसी टी-20 क्रमवारीमध्ये भारताचा फिरकीपटू युजूवेंद्र चहलची 12 स्थानाची कमाई करीत दुसऱ्या स्थानावर झेप* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी : जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने धर्माबाद येथे पक्षीमित्र क्रांती बुद्धेवार यांचेकडून पक्षी चित्रप्रदर्शनाचे आयोजन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने* क्रांती बुद्धेवार यांच्या कॅमेराने काढलेल्या विविध पक्ष्याच्या छायाचित्राचे चित्र प्रदर्शन दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 10 ते 04 या वेळात धर्माबाद येथे होणार आहे. तरी आपण सर्वजण उपस्थित राहावे ही विनंती. https://m.facebook.com/story.php?story_fbid=1462945973832172&id=100003503492582 वरील facebook वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर* द.रा. कापरेकर (जन्म : डहाणू-ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, १७ जानेवारी १९०५; मृत्यू : १९८६) हे देवळाली(नाशिक)मध्ये राहणारे एक जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले रँग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळच्या देवळाली येथे शिक्षक होते आणि १९६२मध्ये निवृत्त झाले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही कापरेकरांचा गणितातील आकड्यांशी खेळ चालूच होता. नोकरीच्या काळात त्यांची यासाठी हेटाळणी होत असे. महाविद्यालयीन स्तरावर अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध होतात, पण शालेय स्तरावर आणि शाळा मास्तरांकडून असे लेख लिहिले जाणे अतिशय अपवादात्मक असते. दत्तात्रेरय रामचंद्र कापरेकर यांचे लेख हे त्यांतले एक होते. १९७५ साली अमेरिकेतील प्रा. मार्टिन गार्डिनर यांनी कापरेकरांच्या संशोधनाची दखल घेतली आणि त्यांच्या संशोधनावर आधारित Mathematical Games या सदराखाली Scientific American या मासिकात लेख लिहिला, आणि द.रा. कापरेकर भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  भारतातर्फे राष्ट्रकुलस्पर्धेत कोणत्या कुस्तीपटूने सुवर्णपदक पटकाविले?* 👉     सुशीलकुमार *२)  देशातील पहिला हरीत रेल्वेमार्ग कोणता?* 👉     रामेश्वरम-मनामदुराई *३)  दतमहात्म्य' हा सात हजा ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉     वासुदेव बळवंत फडके *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 जी. ए. अडकीने, केंद्रप्रमुख, बिलोली 👤 योगेश राजापुरकर, सहशिक्षक, येताळा 👤 रामदयाल राऊत, सहशिक्षक 👤 नागेश चिंतावार, सहशिक्षक, बिलोली 👤 गणेश गुरुपवार, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *खरे खोटे* खोटं बोलणाराला लोक समजतात चतूर ख-याला मात्र लोक होतात इथे फितूर खरं काय खोटं काय पडताळता आलं पाहिजे खरं खोटं काय ते स्पष्ट झालं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?*' *त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ, शोभीवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्‍हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.* *"मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणा मागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये."* ••✹✹‼ *रामकृष्णहरी* ‼✹✹•• 🌲🌲🌲🌲🌲🌲 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे. कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात. हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *साखरेचे खाणार त्याला देव देणार* - भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिच अनुकूल असते. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *'विद्या विनयेनं शोभते'* *आईवडिलांची पुण्यायी* राजा ज्ञानसेनच्‍या दरबारात दररोज शास्‍त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्‍त्रासंबंधी चर्चा करण्‍यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्‍त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्‍हणून घोषित केले जात असत त्‍यांना राजा धन आणि मान देऊन सन्‍मानित करत असे. एक दिवस राजा ज्ञानसेनाच्‍या दरबारात असाच शास्‍त्रार्थ चालला होता. त्‍या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्‍यात आले. राजाने त्‍याचा भरसभेत सत्‍कार केला व मान देण्‍यासाठी त्‍याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्‍याच्‍या विद्वत्तेच्‍या सन्‍मानार्थ राजा स्‍वत: त्‍याला चव-या ढाळत त्‍याला घरापर्यंत सोडण्‍यास आला. भारवी एवढ्या मोठ्या सन्‍मानाने घरी आला हे पाहून भारवीच्‍या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले. घरी आल्‍याबरोबर भारवीने मातेला साष्‍टांग नमस्‍कार केला पण पित्‍याला मात्र उपेक्षेने उभ्‍याउभ्‍याच नमस्‍कार केला. त्‍याच्‍या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्‍याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्‍मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्‍वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे. पित्‍याने त्‍याच्‍या त्‍याही नमस्‍काराचा स्‍वीकार केला आणि त्‍याला चिरंजीवी भव असे म्‍हटले. गोष्‍ट इथेच संपली असे नाही. मात्‍यापित्‍यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्‍या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्‍हते. याचे कारणही स्‍पष्‍ट होते की भारवीला यश पचविता आले नव्‍हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्‍या धुंदीत शिष्‍टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्‍याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्‍हणाली,’’ तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्‍यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास. तू शास्‍त्रार्थ करायला जाणार होतास त्‍याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्‍या काळात ते परमेश्‍वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्‍यांनी कितीतरी स्‍वत:च्‍या इच्‍छा दाबून ठेवल्‍या व तुला शास्‍त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्‍मत्त होऊन तू त्‍यांची उपेक्षा केलीस हेच आम्‍हा दोघांच्‍या खिन्नतेचे कारण आहे.’’ हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्‍याने मातापित्‍याच्‍या चरणावर अक्षरश: लोळण घेतली. अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्‍यात पुन्‍हा कधीही त्‍याने मातापित्‍यांची सेवा करण्‍यात कसूर केली नाही. तात्‍पर्य :- आयुष्‍यात आपल्‍याला कितीही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करण्‍यास मिळाली तरी त्‍यापाठीमागे आपल्‍या आईवडीलांची पुण्‍याई असते हे प्रत्‍येकानेच समजून घेतले पाहिजे. यश कितीही मिळाले तरी उन्‍मत्त होऊ नये कारण विद्या ही नेहमी विनय असणा-यांकडेच शोभून दिसते. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/03/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  २००४ - तैवानच्या राष्ट्राध्यक्ष चेन शुइ-बियान वर हल्ला. २०१३ - राष्ट्रीय महामार्ग १७वरील खेडजवळ जगबुडी नदीवरील पुलावरुन बस नदीपात्रात कोळून ३७ ठार, १५ जखमी. 💥 जन्म :- १९८४ - तनुश्री दत्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :-  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राज्यात कर्करोगाचे रुग्ण वाढत आहे. कर्करोगाचे त्वरित निदान झाल्यास उपचाराचा खर्च कमी होतो व रोगाची गुंतागुंतही कमी होते, कर्करोगाच्या उपचारांसाठी भरीव मदत देणार - मुख्यमंत्री ददेवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - देशातील प्रत्येक धर्मातील तरुण आणि तरुणांच्या शक्तीशिवाय देश बदलणे शक्य नाही : राहुल गांधी ,काँग्रेस अध्यक्ष* ----------------------------------------------------- 3⃣ *नागपूर -2022 पर्यंत देशाला मोतीबिंदू मुक्त करणार - केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा* ----------------------------------------------------- 4⃣ *पाटणा - बिहारमधील सीतामढी येथे बस उलटून झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू* ----------------------------------------------------- 5⃣ *पालघरमध्ये रात्री 11 वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू, वीजपुरवठा खंडित* ----------------------------------------------------- 6⃣ *नागपूर : विदर्भाच्या संघाने रणजी करंडकापाठोपाठ इराणी करंडकावरही कोरलं नाव* ----------------------------------------------------- 7⃣ *फायनलमध्ये भारताचा थरारक विजय, बांगलादेशचा केला चार विकेटने पराभव, निदाहस मालिका जिंकली.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========            *राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========         *गणेश हरी खरे* गणेश हरी खरे ‍‌‍‍‍‍‍‍‍‍(जन्म १० जानेवारी १९०१ - मृत्यू०५ जून १९८५)  हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक  📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  नुकतेच निधन झालेले नीरज व्होरा कोणत्या क्षेत्राशी निगडित होते?* 👉    चित्रपट *२)  दादाभाई नौरोजीनी कोणता सिध्दांत मांडला?* 👉     संपत्तीचे अपहरण *३)  नुकताच कोणत्या देशाने चित्रपटगृहावरून बंदी उठवली आहे?* 👉     सौदी अरेबिया *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 केदार ढगे, बिलोली तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, पत्रकार 👤 अशोक सोनवणे, मूर्तिकार तथा सहशिक्षक जिल्हा परिषद धुळे 👤 व्यंकटी पावडे, नांदेड 👤 मंजूषा देशमुख, अमरावती 👤 मनोज शेटकार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *अनुकूल प्रतिकूल* प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट कधीच अनुकूल नसते एकाला अनुकूल गोष्ट दुस-याला प्रतिकूल असते प्रतिकूल गोष्टींनाही अनुकूल करायचं असतं प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी ठरायचं असतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= ••● *ॐ 🚩 विचार धन 🚩 ॐ* ●•• *वसंतोत्सवातील उधाण आणि नवचैतन्याचा भर थोडा शमत येतो. झाडांना आलेली कोवळी पालवी चकचकीत रूप धारण करते. विविध रंगाची फुलं मनाला मोहून टाकतात. नव-अनुभूतीच्या स्पर्शानं मनाला उभारी येते आणि चैत्रपालवीच्या साक्षीनं नवीन वर्षाचा आरंभ होतो, _'वर्षप्रतिपदा !'_ घराघरातून गुढी उभारून त्याच्या आगमनाचं आम्ही स्वागत करतो. हिंदू मान्यतेप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. जीवनातील कोणत्याही नवीन कार्यप्रकल्पाची सुरूवात करण्यासाठी 'शुभदिवस.'* *खरं पाहता हा क्षण असतो गतकाळातील जीवनचक्राच्या पूर्ण झालेल्या एका फे-यात आम्ही काय मिळवलं, याचा शोध घेण्याचा. आत्मपरिक्षण करण्याचा आणि भविष्याचा वेध घेऊन नवा संकल्प निर्धारित करण्याचा. मानवनिर्मित फे-यांच्या वेदनादायी संघर्षातून स्वत:ची मुक्तता केली तरच जीवन आनंददायी होऊ शकेल. गुढीपाडव्याला आपण सर्वांनी आपल्या जीवन-जाणिवांची पुनर्तपासणी करण्याची आवश्यकता आहे. गरज आहे ती मानवनिर्मित अभिलाषांमधून स्वत:ची मुक्तता करून घेणा-या _'संकल्प गुढी'_ उभारण्याची !* ••●🚩 *रामकृष्णहरी* 🚩●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩         •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•••     🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹     *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे प्रत्येक फुलाचा आकार, रंग आणि सुगंध वेगवेगळा असतो त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तींची शारिरीक रचना,आचार आणि विचार हे वेगवेगळे असतात.याचे कारण जरी वेगळे असले तरी  आपण एकमेकांना आपल्या जीवनात स्वभावानुसार समजाऊन घेऊन आपले जीवन व्यवहार अगदी व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करायला हवा.काही अंशी कमी-जास्त असलेतरी ते आपण आपल्या स्वभावानुसार आणि विचारानुसार ओळखून जीवनात एकोप्याने राहण्यातच आपले खरे कौशल्य आहे.म्हणून कुणालाही आपल्यापेक्षा कमी लेखून आपले वर्चस्व इतरांवर लादू नये.त्यातील एखादा आपल्याला हवा असलेला गुण शोधून आपल्या जीवनात आचरणात आणून एकमेकांना समजावून घेऊन आपल्या जीवनाबरोबर घेऊन आनंदी जीवन जगण्यात धन्यता मानावी. हाच आपला व आपल्या माणुसकीचा खरा धर्म आहे. ज्या विविधतेत एकता असते त्या  एकमेकांच्या भावना दुखावण्यात नसते.तेव्हा आपण वेगवेगळे जरी असलो तरी अनेक विचारांना एकत्रीत बांधून एकतेचे दर्शन घडवू शकतो.हा विचार नित्यासाठी आचरणात आणायला हवा.त्यात आपल्यातही दडलेल्या चांगल्या विचारालासुध्दा इतरांमध्ये सामावून घेण्याची संधी मिळेल.एकमेकांना हीन समजून 'मी 'चे अस्तित्व वृध्दिंगत करणे अयोग्य आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌻🌺🌸🌼🌹🌷🌻🌺🌸🌼🌹 =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *मुलाचे पाय पाळण्यात दिसतात* - एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========        *मनाची एकाग्रता* एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्‍याच्‍या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्‍याला कोणत्‍याही प्रकारच्‍या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्‍याची ख्‍याती सर्वत्र पसरली होती. त्‍याने त्‍याच्‍या शिष्‍यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्‍यास सुरुवात केली होती. त्‍याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्‍गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्‍पर्ध्‍याचे कच्‍चे दुवे ओळखून त्‍याला सहज पराभूत करण्‍यात त्‍याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्‍याने वृद्ध योद्धा सोडल्‍यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्‍याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्‍याच्‍या मनात अहंकार जागृत झाला. त्‍याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्‍य' हे बिरूद लावून मिरवू. त्‍याने वृद्ध योद्ध्याला आव्‍हान दिले. शिष्‍यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्‍याचे आव्‍हान स्‍वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्‍या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्‍यातील विजयाची कल्‍पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्‍ये त्‍याच्‍यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्‍या प्रत्‍येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्‍याने वृद्धाला अपशब्‍द वापरण्‍यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्‍याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्‍याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्‍याने स्‍वत:हून हार पत्‍करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्‍यावर शिष्‍यांनी व वृद्धाच्‍या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्‍हाला अपशब्‍द वापरत होता तरी तुम्‍ही शांत कसे राहिलात'' तेव्‍हा वृद्ध गुरु म्‍हणाला,'' मुलांनो कोणत्‍याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्‍वाची असते. कोणत्‍याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.'' तात्‍पर्य : मनाची एकाग्रता साधल्‍याने बरेचशी कामे साध्‍य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्‍यास हमखास यश मिळतेच. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*ओढ मायेची* मायेच्या माणसांची असते कशी ओढ म्हणूनच जगात नाही त्याला तोड.. मायेच्याच ओढीने मिळतो जीवनाला खरा अर्थ म्हणूनच त्यात नसतो कुठला स्वार्थ.. मायेच्याच आधारावर जग चालते म्हणूनच जीवन जगण्याचे ते अमृतच असते... मायेची माणसं आपली असो वा परकी म्हणूनच आपल्यालाही वाटत असतात हवीहवीशी सारखी मायेच्या माणसांना नसतो कुठलाही स्वार्थ जगण्याच्या आयुष्यातला हाच खरा अर्थ... मायेच्या माणसाचे उपकार कधीच नाही फिटत जीवन संपत आले तरी त्यांची आठवण नाही मिटत 〰〰〰〰〰〰〰 ••●===◆==◆===●•• *✍प्रमिलाताई सेनकुडे*

युगे युगे क्रीडेत रंगले अवकाशाचे असीम अंगण तेजोनिधिभोवती फिरतसे अचूक ग्रहगोलांचे रिंगण. धूमकेतुही येती जाती नक्षत्रांच्या रचना सुंदर उल्का तेजे क्षणिक तळपती खेळ चालला असा निरंतर मंथर गती या वसुंधरेची साथीला छोटासा चंदर प्रदक्षिणेची होता पूर्ती म्हणतो आले नव संवत्सर दिन रजनीचे येणे जाणे सहा ऋतूंचे सहा तराणे गतीमान त्या हिंदोळ्यावर तुमचे अमुचे झुलते जगणे. आदि अंत ना या जिवनायाखेळाच्या वळणावरती या थांबुन करुया नववर्षाला नवा सलाम 👏👏👏👏👏👏👏👏

संकलित

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 दारी घालू सडा रांगोळी चैतन्याची उभारू ऊंच गुढी मराठमोळे करूया स्वागत नववर्ष करेल सुखाची बरसात मनी धरूया नवी स्वप्ने लावुन झाडे करु हिरवी राने साथ देऊ एकमेका मिळुनी प्रगती एकच हेका नांदो आरोग्य,संपदा घरोघरी हिच मागणी ईश्वरचरणी .

🌿🎸 *लाखमोलाचं वाक्य* 🎸🌿 ✍ *ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!* *जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.* *आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आणी मन स्वच्छ असावं .* 🙏🙏 *👉नातं रक्ताच असो किंवा मानलेल....* *मदतीच्या वेळी जे आधार देत ते खरं नातं.

*चारोळी* *आयुष्याच्या वेलिवरती* *फुले फुलावी स्वप्नाची* *दुःख जाओ आनंद राहो* *साथ असो नात्यांची* *गोडी वाढो नव्या दिनीची* ✍📚 *शब्द संपत्ती वाढवुया* *गुढी ज्ञानाची उभारुया* 💐💐💐💐 *हीच शुभेच्छा मनी!* *नूतन वर्षाभिनंदनी !* 💐💐💐💐💐💐 *शुभेच्छूक* ✍प्रमिलाताई सेनकुडे म.रा.प्रा.शि.महिला आघाडी संघ जिल्हासरचिटणीस नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://nasayeotikar.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/03/2018 वार - शनिवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 घडामोडी :- १९६९ - गोल्डा मायर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. 💥 जन्म :- १९२६ - सीगफ्रीड लेन्झ, जर्मन लेखक. १९४५ - मायकेल हेडन, सी.आय.ए.चा निदेशक. 💥 मृत्यू :-  १८८२ - विष्णुशास्त्री चिपळूणकर, आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *राज्यात गुढीपाडव्यापासून प्लास्टिक बंदी, विक्रेत्यांसोबत प्लास्टिक वापरणा-यांवरही करणार कारवाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची घोषणा.* ----------------------------------------------------- 2⃣ *अविश्वास प्रस्तावासाठी टीडीपीला शुभेच्छा. प्रस्ताव सभागृहात मांडला गेल्यास मतदानावेळी शिवसेना तटस्थ राहणार: सूत्रांची माहिती* ----------------------------------------------------- 3⃣ *भाजपाचा स्थापनादिनी म्हणजे 06 एप्रिल रोजी मुंबईत ‘महा भाजपा महामेळावा’, भाजपा प्रदेशाध्यक्ष  रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *औरंगाबाद : केंद्र सरकारचे उप सचिव निपुण विनायक यांची महापालिका आयुक्तपदी बदली.* ----------------------------------------------------- 5⃣ *पी. व्ही. सिंधूची ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यफेरीत धडक, उपांत्यपूर्व लढतीत जपानच्या नोझोमी ओकुहारावर केली मात* ----------------------------------------------------- 6⃣ *पंजाब - मानवी तस्करी प्रकरणात दलेर मेहंदी दोषी, पतियाळा कोर्टाचा निर्णय,थोड्याच वेळात शिक्षेची सुनावणी.* ----------------------------------------------------- 7⃣ *अटीतटीच्या लढतीत श्रीलंकेला नमवून बांगलादेश फायनलमध्ये* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी :- कंधार येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा ख्यातनाम कवी डॉ. माधव कुद्रे यांना राज्यस्तरीय साहित्य सेवारत्न पुरस्कार चंद्रपूर येथे प्रदान* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गुढीपाडवा - विकारी विचारावर विजयाचा दिवस* http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_12.html पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या रंगातील अक्षरावर टिचकी मारा. अभिप्राय जरूर द्या ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वेरूळची लेणी* महाराष्ट्रातील मराठवाडा भागात औरंगाबाद पासून ३० किमी अंतरावर वेरूळ हे एक  गाव असून येथे प्राचीन लेणी आहेत.  येथे १७ हिंदू, १२ बौद्ध आणि ५ जैन अशी  एकूण ३४ लेणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे मूळ गाव वेरूळ आहे. वेरूळची लेणी साधरणत:  इसवी सनाच्या पाचव्या ते दहाव्या   शतकाच्या  कालखंडात कोरली असून प्राचीन भारतातील हिंदू ,बौद्ध आणि जैन धर्मातील परस्परसंहिता प्रकर्षाने या लेण्यामध्ये दिसून येते  वेरुळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी, आणि जैन लेणी अशी विभागणी केली आहे. हिंदू लेण्यामध्ये शिल्पकारांनी कातळात कोरलेली अतिप्रचंड शिल्पे आहेत. यातील बरीचशी लेणी वरपासून खालपर्यंत कोरीवकाम करीत निर्मिलेली आहेत. अशी लेणी  कोरण्यासाठी कारागीरांच्या  अनेक पिढ्या खर्ची  पडल्याचा उल्लेख आहे. हिंदू लेण्यामधील वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर जगातील सर्वात मोठे कोरीव शिल्प असून या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर निर्मिलेली आहे. मंदिर निर्माण करायला अंदाजे दोन लाख टन वजनाचा एक अखंड खडक वापरण्यात असून तो उघडपणे वरून खाली म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून  कोरण्यात आला असला पाहिजे.  हे प्रचंड कोरीव काम पुरे करण्यासाठी अनेक दशके लागली असतील. वेरूळची बौद्ध लेणी येथील सगळ्यात जुनी लेणी आहेत. ही  लेणी विहार स्वरुपाची असून काही विहारात पूजेसाठी मूर्तीही आहेत. या सर्व लेण्यांमध्ये विश्वकर्मा लेणी प्रसिद्ध आहेत. हे अत्यंत सुबक व नाजूक कोरीव काम असून जणू दगडा ऐवजी लाकूड कोरले आहे असे वाटते. या स्तूपात भगवान गौतम बुद्धाची धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील मूर्ती आहे. जैन लेणी हिंदू व बौद्ध लेण्याच्या तुलनेत  असून या लेण्यामधून जैन धर्माची वैराग्य भावना  दर्शवितात. या बरोबरच बारीक कोरीव काम व चित्रे ही या जैन लेण्यांची महती सांगतात. प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी, क्वचित मंदिरे सुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गावर विश्रांतीसाठी  उभारण्यात येत असत त्याचा उद्देश वाटसरुंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. सोबतच त्यांना राजाश्रय, धर्माश्रय, लोकाश्रय प्राप्त असे ह्यासाठीच या लेण्याची निर्मिती केली असावी.  वेरूळ लेण्याला भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬  *"प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी"* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) भारतातील सर्वात लांब नदी कोणती?* 👉🏼    गंगा नदी *२) ही नदी कोणत्या दोन देशातून वाहते?* 👉🏼    भारत व बांग्लादेश *३) या नदीची लांबी किती आहे?* 👉🏼     २,५२५ कि. मी. *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 गंगाराम ( बाबू ) गुरुपवार, बिलोली 👤 अंगद मारोती कांडले, बिलोली 👤 विलास पाटील, देगलूर 👤 जयानंद मठपती, धर्माबाद 👤 अमरसिंग चौहान, भंडारा *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जिद्द* पराभव झाला तरी प्रयत्न करत राहिले पाहिजे प्रयत्न करत यशाचे स्वप्न पाहिले पाहिजे पराभव झाला म्हणून हिंमत हारायची नसते संकटाशी जिद्दीनेच लढाई लढायची असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचार धन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र यांच्या जीवनात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ नेहमीच असतात. जीवनसरिता पुढे पुढे वाहात जाते. पाणी पुढे वाहात जाते तेव्हा मागील काळ हा भूतकाळ असतो. पाण्याला पुढे जायचे असते तेव्हा पुढचा काळ हा भविष्यकाळ असतो. जीवनप्रवाहाचे तसेच आहे. एखादे मुल वाढत असते, ते मोठे होते, तरूणवयात हे मुल असते, तैव्हा बालपण हा भूतकाळ असतो. तारूण्य हे वर्तमान असते, वृद्धावस्था हा भविष्यकाळ असतो. ग.दि.माडगुळकर यांनी या काळाचं सुंदर वर्णन एका गीतात शब्दांकित केले आहे...* *मुकी अंगडी बाळपणाची* *रंगीत वसने तारूण्याची* *जीर्ण शाल मग उरे शेवटी* *लेणे वार्धक्याचे...* *एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे।* *जीवनात खरी प्रगती करायची असेल, तर भूतकाळाला कधीही विसरता कामा नये; कारण भूतकाळ हा इतिहास असतो. एका तत्ववेत्त्याने फार सुंदर शब्दात भूत, भविष्य आणि वर्तमान या काळांचे आपल्या जीवनातले महत्व सांगितले आहे. भूतकाळाच्या खांद्यावर बसूनच वर्तमानकाळ, भविष्यकाळाची सुंदर स्वप्ने पाहू शकतो. म्हणून भूतकाळ मागे टाका; पण त्याला विसरू नका, वर्तमान जगा; पण भूतकाळाला आठवा तरच उज्ज्वल भविष्य घडविता येईल, हा विचार खरंच मोलाचा आहे.* ••●🔰 ‼ *रामकृष्णहरी* ‼🔰●•• 🔅🔅🔅🔅🔅🔅 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          *मोबाईल - 9167937040* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *  व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..८०८७९१७०६३/९४२१८३९५९० ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎡 *म्हणी व त्याचा अर्थ* 🎡 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शेरास सव्वाशेर* - समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस*. नांदेड सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ===== ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *छोटी संधी* एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकोप्तर येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो.  तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, " मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलीकोप्तर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस." पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या.  मित्रानो, तुमच्या आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते. एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*" नातं कसं असावं "* नातं सन्मानित करणारे असावे, अपमानित करणारे नसावे। नातं प्रेरणा देणारे असावे, वेदना देणारे नसावे। नातं बळ देणारे असावे, घाव देणारे नसावे। नातं साथ देणारे असावे, स्वार्थ पाहणारे नसावे। नातं सुखावणारे असावे, मन दुखावणारे नसावे। नातं बदल घडवणारे असावे, बदला घेणारे नसावे। नातं समज देणारे असावे, गैरसमज वाढवणारे नसावे। नातं कौतुकास्पद असावे, संशयास्पद नसावे। नातं विश्वसनीय असावे, प्रशंसनीय नसावे। नातं खोडकर असावे, बंडखोर नसावे। नात्यात वाद असावा, राग नसावा। नात्यात परखडपणा असावा, परकेपणा नसावा। नात्यात प्रामाणिकपणाला वाव असावा, आविर्भाव नसावा। नात्यात उपकार असावा, अहंकार नसावा। नात्यात मोकळीक असावी, देख-रेख नसावी। नात्यात मर्यादा असावी, बांधिलकी नसावी। नात्यात परिचय असावा, संशय नसावा। नात्यात चिडवणे असावे, फसवणे नसावे। नात्यात रूसणे असावे, नात्यात उसणे नसावे। नात्यात विचारपूस असावी, चौकशी नसावी। नात्यात तृष्णा असावी, वासना नसावीl नात्यात ओढ असावी, नको ती खोड नसावी। नातं समाधानकारक असावे, बंधनकारक नसावे। नातं उपायकारक असावे, अपायकारक नसावे। नातं शोभनीय असावे, उल्लेखनीय नसावे। नातं म्हणजे संवाद, नसे ते अपवाद। नात्यात असे शब्दांना जाग, भासे आठवणींचा भाग। नातं म्हणजे तात्पुरता सहवास नसावा, आयुष्यभराचा प्रवास असावा। नात्यांमुळे जीवनाला अर्थ, नात्यांविना सारं काही व्यर्थ।l *Relation is Great* *Creation of the God !!!* 💐🌳👌☘☘👍🌱🌴👏🌴🌱☘☘🌳💐💐

*पाऊसाच येणं* 💧🌧🌧🌧💦💧☔ असा पाऊस लेकाचा कळेना झाला म्या मनल एकाले काहो ऋतु कोणता आला थो मने मले काय सांगू तुमाले मार्चचा टॕक्स बसला असेल उन्हाळ्याले. असं पावसाच येणं बघा अचंबित झाल उन्हाळा आहे का पावसाळा काही कळेनासं झालं माणसावानी पाऊस वाटला कसा आज इकडे तर उद्या तिकडे दिसला जसा म्या मनलं त्यायले काहो अस म्हणता माणसाच्या परीने आणि पावसाचा सरीने बदलतील वाटा ☘🌴🌳🌲☘🌴 निसर्गाच्या रक्षणासाठी करावे लागेल कष्ट नाहीतर होईल बघा सार हळूहळू नष्ट 〰〰〰〰〰〰〰 *✍ ©प्रमिलाताई सेनकुडे* हदगाव (नांदेड)

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/03/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  २००५ - सम्राट कनिष्क या एर इंडियाच्या विमानावर बॉम्बहल्ला करून ३२९ प्रवासी व कर्मचाऱ्यांना मारल्याच्या आरोपातून रिपुदमनसिंग मलिक व अजायबसिंग बागरी यांची कॅनडाच्या न्यायालयाने सुटका केली. 💥 जन्म :- १८७७ - मोहम्मद रझा शाह पेहलवी, इराणचा शहा. १९४१ - रॉबर्ट ग्वेई, कोटे दि'आयव्होरचा हुकुमशहा. 💥 मृत्यू :-  १९४५ - गणेश दामोदर सावरकर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राज्यातील शहरांपैकी १५२ शहरांसाठी १८५६ कोटींचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *कोकणासह मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज. राज्यात हलका पाऊस होण्याची शक्यता.* ----------------------------------------------------- 3⃣ *पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत आणखी एक घोटाळा झाल्याची तक्रार. 9.9 कोटींचा घोटाळा झाल्याची पोलिसात तक्रार दाखल.* ----------------------------------------------------- 4⃣ *महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा ही जागा बिनविरोध* ----------------------------------------------------- 5⃣ *संभाजी भिडेंना 26 मार्चपर्यंत अटक न केल्यास मोर्चा काढू; प्रकाश आंबेडकरांचा इशारा* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : बिलोली पालिकेचे तत्कालिन मुख्याधिकारी अजितकुमार डोके यांचा जामीन अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला. 60 लाखांच्या घोटाळ्यात मुख्य आरोपी असल्याचा न्यायालयाचा अभिप्राय.* ----------------------------------------------------- 7⃣ *टी-20 मध्ये युवराज सिंगचा 74 सिक्सर्सचा रेकॉर्ड तोडणारा रोहित शर्मा ठरला भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========             *बोलण्याचे संस्कार* आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========         *कवयित्री इंदिरा संत* इंदिरा संत (जानेवारी ४, १९१४, इंडी - जुलै १३, २०००, पुणे) या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक  📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  महाराष्ट्राचा मॅगनीज खनिज साठ्यात भारतात कितवा क्रमांक लागतो?* 👉     प्रथम *२)  मेरी तेरेसा बोझॉंक्झ्यु यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?* 👉    मदर तेरेसा *३)  दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?* 👉     सिंकदराबाद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रा. डॉ. सुरेश तेलंग, यशवंत महाविद्यालय, नांदेड 👤 अँड. कैलाश देशमुख गोरठेकर, उमरी 👤 अनिलकुमार जैस्वाल, कुपटी, माहूर 👤 अनिल कांबळे, जि. प. नांदेड 👤 कैलास एम. राखेवार, नांदेड 👤 बबलू भुसेवार, नांदेड 👤 सशिवम भंडारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्मविश्वास* अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो खोटा खोटा विश्वास नुकसान करू शकतो आत्मविश्वास असावा पण खोटा नसला पाहिजे आत्मविश्वास म्हणजे आत्मविश्वास असला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *शांतता खूप बोलते. आधी कानांचा ताबा घेते, मग मनाचा. सर्व काही 'शांत' असते तेव्हा खूप काही 'आवाज' मूकपणे आपल्याभोवती फिरतात. शांततेत समुद्राची गाज हितगुज करते, माडामाडातून फोफावणारा वारा संवाद साधतो. शांततेत कधी आत्ममग्नतेची समाधी लागते तर कधी उत्तुंग विचारांच्या लाटांची भरती येते. दुपारच्या शांततेत घामाचे नितळ थेंब ओथंबलेले असतात तर संध्याकाळच्या कातरवेळच्या शांततेत एकाकीपणाची हुरहुर आठवणींचा कानोसा घेते. मध्यरात्रीच्या शांततेतून कधी असंख्य दुष्ट-सुष्ट विचारांची संगत पंगतीने बसते, तर कधी आयुष्याच्या उजळणीचे पाढे अंधारातून संततधारेसारखे प्रकटतात.* *शांतता सर्वत्र व्यापून आहे, तरीही तिचा शोध घ्यावा लागतो. शहरातली दुर्मिळ शांतता एखाद्या खेड्यात मुबलक सापडेल. शहरात गर्दीचा आवाजच कधी कधी शांततेची हौस पुरवतो. शांततेची ओळखही कान विसरतात. गर्दीतला आवाज सहज होता येते, मात्र शांततेत मूकपणे सहभागी व्हावं लागते. पण माणूस शांततेत सहभागी होण्याऐवजी तो ती भंग करण्यात धन्यता मानतो. एखाद्या शांत देवळात प्रथम घंटा वाजते. आपले अस्तित्व तो असे जाणवून देतो. क्वचित काही मंदिरात शांतता उदबत्तीच्या अस्तित्वात धीराने उभी असते. तिथे जिज्ञासू भक्तांचा मेळावा शांततेचा विलक्षण शोध घेत असतो. हीच शांतता काही चर्च व मशीदीतही सापडते, तेव्हा तिथे 'ईश्वरचा' अंश मुक्तपणे वावरत असतो.* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• ☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनंदिन जीवनात नाना प्रकारची माणसे सहवासात येतात.त्यापैकी काही माणसांचा सहवास नित्य हवासा वाटतो कारण त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला शिकायला मिळते. ते उदार अंतःकरणाने कशाचीही अपेक्षा न करता देत असतात.ते कधीही गर्वाने किंवा कसल्याही अपेक्षेने कार्य करत नाही. ते स्वत:ही शांत आणि संयमी वृत्तीने वागत असल्याने जणू विशाल सागराप्रमाणेच रहाणे पसंत करतात.प्रत्यक्ष जीवनात इतरांनाही घेऊन चालतात.अशांचा सहवास लाभणे म्हणजे एक भाग्यच असावे लागते. तर काही माणसे अशी भेटतात की,त्यांचा सहवास नकोसा वाटतो.त्याचे कारणही तसेच असते. सतत काही ना काही काम नसताना निरर्थक बोलणारी,मी म्हणजेच सारे काही म्हणणारी अहंकाराने भरलेली,जे काही चालते ते माझ्यामुळेच अशी म्हणणारी, अशा माणसांचा स्वभाव म्हणजे एखाद्या उथळ पाण्यासारखा खळखळणारा असतो तो काही काळ खळखळ वाहतो आणि नंतर आवाज बंद होतो. अशा माणसांकडून काय अपेक्षा करणार आणि त्यांचा कोणता गुण घेणार असा प्रश्न उपस्थित राहतो.अशांचा सहवास आपल्या जीवनात कधीकधी घातक होऊ शकत़ो. म्हणून आपल्या जीवनाचे खरेच सार्थक करुन घ्यायचे असेल तर योग्य विचार करुनच योग्य सहवासाची निवड करावी व आपले जीवन चांगल्या पध्दतीने जगावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *शितावरून भाताची परीक्षा* - एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========         संत राबिया संत राबियाची ईश्‍वरभक्‍ती प्रसिद्ध आहे. ती मनोभावे ईश्‍वराचे स्‍मरण करत असे. प्राणीमात्रांना ईश्‍वरनिर्मिती मानून त्‍यांची सेवा करत असे. एका रात्री ती निद्रिस्‍त असताना तिच्‍या घरात चोर घुसला. त्‍याला राबियाच्‍या घरी धन तर सापडणार नव्‍हते. त्‍याने खूप शोधाशोध केली. पण हाती काहीच लागले नाही. त्‍याने समोर पडलेली चादर उचचलली. चादर घेऊन तो जात असताना त्‍याला एकाएकी चक्कर आली, डोळ्यांना अंधारी आली, काही दिसेनासे झाले, त्‍याने डोळे चोळून पाहण्‍याचा प्रयत्‍न केला पण त्‍याचा काहीच फायदा झाला नाही. त्‍याने तेथेच बैठक मारली आणि चादर बाजूला ठेवून डोक्‍याला थोपटून पाहिले. तेव्‍हा त्‍याला बरे वाटले. चादर उचलून तो चालू लागला की तेव्‍हा पुन्‍हा त्‍याची तीच अवस्‍थ झाली. चादर खाली ठेवली की त्‍याला बरे वाटत असे. तो हैराण झाला. तेव्‍हा त्‍याला कोणीतरी म्‍हटल्‍याचा भास झाला,’’ तू स्‍वत:ला का अडचणीत टाकतो आहेस, राबियाने स्‍वत:चे अस्तित्‍व माझ्याकडे सोपवून दिले आहे. जेव्‍हा एक मित्र झोपतो तेव्‍हा दुसरा जागा असतो. मग त्‍याची कोणतीही वस्‍तू चोरीला जात असताना मी शांत कसा बसेन’’ चोराने तेथे निद्रिस्‍त असलेल्‍या राबियाचे चरणस्‍पर्श करून दर्शन घेतले व तिची चादर तेथेच टाकून तो निघून गेला. तात्‍पर्य :-ईश्‍वराशी आपण एकरूप झालो की ईश्‍वरही आपली मनापासून काळजी करतो. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्‍याच्‍या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्‍याला कोणत्‍याही प्रकारच्‍या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्‍याची ख्‍याती सर्वत्र पसरली होती. त्‍याने त्‍याच्‍या शिष्‍यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्‍यास सुरुवात केली होती. त्‍याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्‍गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्‍पर्ध्‍याचे कच्‍चे दुवे ओळखून त्‍याला सहज पराभूत करण्‍यात त्‍याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्‍याने वृद्ध योद्धा सोडल्‍यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्‍याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्‍याच्‍या मनात अहंकार जागृत झाला. त्‍याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्‍य' हे बिरूद लावून मिरवू. त्‍याने वृद्ध योद्ध्याला आव्‍हान दिले. शिष्‍यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्‍याचे आव्‍हान स्‍वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्‍या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्‍यातील विजयाची कल्‍पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्‍ये त्‍याच्‍यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्‍या प्रत्‍येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्‍याने वृद्धाला अपशब्‍द वापरण्‍यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्‍याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्‍याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्‍याने स्‍वत:हून हार पत्‍करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्‍यावर शिष्‍यांनी व वृद्धाच्‍या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्‍हाला अपशब्‍द वापरत होता तरी तुम्‍ही शांत कसे राहिलात'' तेव्‍हा वृद्ध गुरु म्‍हणाला,'' मुलांनो कोणत्‍याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्‍वाची असते. कोणत्‍याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.'' तात्‍पर्य : मनाची एकाग्रता साधल्‍याने बरेचशी कामे साध्‍य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्‍यास हमखास यश मिळतेच.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/03/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १८२७ - टोरोंटो विद्यापीठाची स्थापना. 💥 जन्म :- १६३८ - शुंझी, चीनी सम्राट. १७६७ - अँड्र्यू जॅक्सन, अमेरिकेचा ७वा राष्ट्राध्यक्ष. १७७९ - विल्यम लॅम्ब, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. 💥 मृत्यू :-  १९३७ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नाशिक : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्यावतीने गोदा काठावर दोन हजार वादकांकडून ढोल ताशांचे महावादन जल्लोषात सुरू* ----------------------------------------------------- 2⃣ *नेपाळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या 51 वर पोहचली, तर 20 जणांवर उपचार सुरु आहेत.* ----------------------------------------------------- 3⃣ *अयोध्या प्रकरणाची न्यायालयात 23 मार्चपासून सुरू होणार सलग सुनावणी* ----------------------------------------------------- 4⃣ *उत्तर प्रदेश - गोरखपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचा उमेदवार 21 हजार 961 मतांनी विजयी* ----------------------------------------------------- 5⃣ *सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यात सर्वत्र अवकाळी पाऊस ; आंबा काजू बागायतदारांवर अर्थिक संकट.* ----------------------------------------------------- 6⃣ *अभिनेता नरेंद्र झा यांचे वयाच्या 55 व्या वर्षी मृत्यू आणि शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्ज यांचं निधन.* ----------------------------------------------------- 7⃣ *निदाहास ट्रॉफी 2018 : बांगलादेशवर 17 धावांनी मात करत भारत तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये केला प्रवेश* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========           *सोन्याचे बिस्कीट* माधवराव आज खूप खुश दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ती खुशी स्पष्ट दिसत होती. कारण काल रात्री शेतात विहीर खणत असताना एक पेटी मिळाली होती आणि त्यात एक चमकदार अशी बिस्किटच्या आकाराची वस्तू दिसली. तसे त्यांचे डोळे दिपुन गेले. होय...ते सोन्याचेच बिस्किट होते ! हे मनाशी समजून घेतल्यावर त्यांचे पाय जमिनीवर नव्हतेच. कधी एकदा घरी जातो आणि पत्नी माधवीला सांगतो, असे झाले होते. तसा तो तडक घराकडे जायला निघाला. दोन कि.मी. चा रस्ता कधी........ https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/sonyachi-biscuit वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *डॉ. जगदीशचंद्र बोस* पूर्वबंगालमधील डाक्का  जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले. जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पुरा करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक  📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  २०२० साली होणारे ऑलिंपिक कोणते देशामध्ये होणार आहेत?* 👉      जपान *२)  दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?* 👉     यमुना *३)   हेमाडपंत मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता?* 👉      यादवांचा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 राजेंद्र महाजन, सहशिक्षक 👤 विलास फुटाणे, प्रकाशक 👤 संतोष कळसकर, देगलूर 👤 बालाजी मामीलवाड, मुखेड 👤 लक्ष्मण चिंतावार, बाळापूर 👤 लक्ष्मीकांत धुप्पे, नांदेड 👤 अंबादास पवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *शब्द* कोणी शब्द दिला की विश्वास ठेवला जातो लगेच विश्वास ठेवला की वेगळा अर्थ लावला जातो शब्द देणारा कडून शब्द पाळला जात नाही नंतर आरडून ओरडून काही फायदा होत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *विरेंद्रराजे या नावाचे एक संस्थानिक होते. नगरप्रदक्षिणा करण्यासाठी ते आपला दरबारी लवाजमा घेऊन पहाणी करीत होते. एक दगडफोड्या अत्यंत एकाग्रतेने दगड फोडण्याचे काम करीत होता. राजा समोर येऊन उभा राहिला तरी त्याचे लक्ष नव्हते. शरीरातून घाम गळत होता, त्याचा घण आघात करीत होता. राजा गुणग्राहक होता, त्याला त्याची एकाग्रता भावली. राजाने त्याला आपल्या दरबारात काही काम दिले. प्रत्येक काम तो एकनिष्ठेने, प्रामाणिकपणे व चोखपणे करू लागला. राजाची त्याच्यावर मर्जी बसली, बढती देता देता राजाने त्याला प्रधानपद दिले.* *प्रधानाने राज्याला प्रगतीशिल बनवले. राजाने त्याचा सत्कार केला. अनेक चित्रकारांकडून प्रधानाची उत्कृष्ट चित्र काढली. त्यातील तीन उत्कृष्ट चित्रांतून प्रधानाला एक सर्वोत्तम चित्र निवडायला सांगितले. प्रधानाने एक चित्र निवडले, राजाने त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला..पूर्वी मी दगडफोड्या होतो, या चित्रात दगडफोड्याही दाखवला आहे, माझा भूतकाळ उभा केला. म्हणून हेच चित्र सुंदर आहे. प्रधान आपला भूतकाळ विसरला नव्हता.* ••●🌟‼ *रामकृष्णहरी* ‼🌟●•• 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात यश आणि अपयश हे आपल्या कर्मानुसार अथवा कृतीनुसार मिळत असते.जर तुम्ही तुमच्या निवडलेल्या  कामात मन लावले आणि एकाग्रता ठेवली तर ते काम अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडले जाऊ शकते. त्याबरोबरच तुम्हाला यशाकडे घेऊन जाते.जर का तुम्ही कामात कामचुकारपणा केला की,नक्की समजून घ्या तुम्हाला अपयशाकडे घेऊन जात आहे. म्हणून यश अपयश मिळवणे हे आपल्या करणा-या ब-यावाईट कर्मानुसार मिळत असते.मग आपणच ठरवावे की,आपण जीवनात यशस्वी व्हायचे की अयशस्वी ..! *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *लेकी बोले, सुने लागे* - एकाला उद्देशून, पण दुसर्‍याला लागेल असे बोलणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एके दिवशी एका शेतकऱ्याचा घोडा शेतातल्या कोरड्या विहिरीत पडला, जखमी झाल्यामुळे तो मोठ्याने ओरडत होता.लोकं जमा झाले शेतकरी धावत आला त्याने बराच विचार केला फार प्रयत्न केले.* *त्या घोड्याला त्या विहीरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले,पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत नव्हते.दिवस मावळायला आला होता.शेतकरीही आता थकला होता आणि कंटाळला होता त्याने विचार केला.आता हा घोडातर तसाही म्हातारा झाला आहे असेही निरुपयोगी आहे.आणि ती विहिरही कोरडीचं आहे ...* *त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून द्यावे... विहीरीत माती लोटावी...घोड्याचा प्रश्न ही सुटेल आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल......."* *मग काय जमलेल्या सर्व लोकांकडून त्याने मदत मागीतली.आणि सगळे कामाला लागले,कुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात झाली.....मध्ये* *पडलेल्या त्या जखमी घोड्याला काही कळेनासे झाले ...विहीरीत पडल्याने शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात भर म्हणजे आयुष्यभर ज्या मालकाची चाकरी केली.त्याची ओझी वाहीली आज तोचं मालक जिवावर उठला...ते दुखा:ने अजून मोठयाने ओरडू लागला* *वरुन माती पडतचं* *होती...काही वेळाने घोड्याचा ओरडण्याचा आवाज थांबला.....सागळ्यांना वाटले घोडा मेला बहुतेक शेतकर्याने सहज विहीरीत डोकावून* *पाहीले,तर तो पहातचं राहीला...अंगावरची माती झटकत घोडा उभा राहीला होता.* *लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु केले...परत पाहीले तर घोडा त्याचा तोच मग्न होता तो वरुन माती पडली की, झटकायचा आणि त्या पडलेल्या मातीच्या थरावर उभा रहायचा.....* *असं करता करता कोरडी विहीर बरीचं भरली आणि कठडा जवळ येताचं तो घोडा तो कठडा ओलांडून बाहेर आला....* *आयुष्यात वेगळे तरी काय होतं ???* *आपण खड्यात पडलो तर, आपणास काढायला कोणीतरी एकचं येते पण आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात पडल्यावर माती लोटणारे आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेचं भेटतात.* *म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा ....आपले डोके नेहमी शांत ठेवा समस्या कीतीही मोठी असो....शांत मनाने ती हाताळा.... खड्ड्यात,पडलो आणि कोणी पाडलं ह्या बद्द्ल दुखः करण्यापेक्षा,त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा.....* *झटका ती माती आणि त्या मातीची एक एक पायरी करत... हळूहळू यश प्राप्ती करीता वर या.* *मस्त रहा,आनंदी जगा....हेच जीवनाचे सार आहे.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🦅☘हरवली पाखरं*🦅☘ उंच उंच आभायातुनी इवल्या इवल्या पंखानी झेप घेत दाही दिशांनी परतशील काय तु नभातुनी असा ओलावा मायेचा ओढ लावी जिवाला खोप्यामधील पिलाला आणशील तु खायला उंच उंच आभायातुनी इवल्या इवल्या पंखानी झेप घेत दाही दिशांनी परतशील काय नभातूनी रानीवनी फिरुनी काडी काडी जमा करुनी घरटी तुझी बांधशील असा तुझा जीव टांगशील उंच उंच आभायातुनी इवल्या इवल्या पंखानी झेप घेत दाही दिशांनी परतशील काय नभातूनी किलबिल पाखरांची बघा झाली पहाट हरवलेल्या पांखरांना मिळाली पुन्हा वाट 〰〰〰〰〰〰〰 स्वरचित काव्य ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰

*👩🏻भातुकली*👳‍♂ जन्मोजन्मीचा संसार थाटला होता मनात भातुकलीचा खेळावानी मोडून पडला क्षणात सुखदुःखाचे धागेदोरे जुळले होते सगेसोयरे विसरू कशी मी तरी रे सोडूनी तू गेला जरी रे आईबापाचा आधार मागितला जरी जीवनभर सोडूनी गेले मज जरी वात्सल्याची ही नजर खेळ मांडूनी मायेचा सारा संसार विस्कटला पिलासाठी जीव तुझा का नाही गुंतला जन्मोजन्मीचा बंधनाचा धागा हा जुळला भातुकलीचा खेळ माझा स्वप्नासारखा तोडला साकडं तुझ्या वचनाच बंधन बांधून जन्माच आहे भास तुझा मनात येशील रोज स्वप्नात. 〰〰〰〰〰〰 *स्वरचित* *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/03/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९४ - लिनक्सची १.० आवृत्ती प्रकाशित. १९९८ - इराणमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. 💥 जन्म :- १९६५ - आमिर खान, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :-  १८८३ - कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *कोरेगाव-भीमा हिंसाचारावर विधानपरिषदेत निवेदन, सरकार 9 कोटी 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती* ----------------------------------------------------- 2⃣ *सर्वोच्च न्यायालयाने वाढवली आधार कार्ड लिंक करण्याची मुदत ; यापूर्वी आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती.* ----------------------------------------------------- 3⃣ *दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात कडक कायदा. तीन वर्ष शिक्षेची तरतूद करणारा कायदा आणणार. अन्न-औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांची माहिती. विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना केली घोषणा.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली - समृद्ध जीवन फूडचा प्रमोटर महेश मोतेवार याची 101.30 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त.* ----------------------------------------------------- 5⃣ *बारावी रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत तब्बल 4 चुका. या चुकांमुळे विद्यार्थ्यांना 7 मार्क मिळण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 6⃣ *यवतमाळ - जिल्ह्यात १७ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा, १२७ विहिरींचे केले अधिग्रहण, पाणीटंचाईने धारण केले उग्ररुप* ----------------------------------------------------- 7⃣ *एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी कर्णधार सरदार सिंगलाच हॉकी संघातून डच्चू, संघाचे नेतृत्व मध्यरक्षक मनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आले आहे.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========   *मुलांच्या प्रगतीसाठी .........!* शाळेची गुणवत्ता खराब आहे किंवा शाळेतील मुलांना काही न येणे ह्यासाठी फक्त शिक्षक जबाबदार नाहीत असे यूनेस्कोने नुकतेच आपल्या न्यू ग्लोबल एजुकेशन मॉनिटेरिंग रिपोर्टमध्ये म्हटले आहे. शिक्षक हा एक .................... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *अरुंधती रॉय* अरुंधती रॉय ( जन्म: २४ नोव्हेंबर, इ.स. १९६१ - हयात ) या भारतीय विरोधी साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज या रॉय यांच्या कादंबरीने इ.स. १९९७ यावर्षीचा बुकर पुरस्कार जिंकला होता. रॉय यांच्या दोन पटकथा आणि अनेक लेखसंग्रहही प्रसिद्ध आहेत. अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक आणि राजकीय मुद्द्यांवर रॉय यांचे लेखन भारतात वादग्रस्त ठरले आहे. अरुंधती रॉय यांचा जन्म भारतात  शिलाँग, ,मेघालय येथे झाला. त्यांचे हिंदूधर्मीय वडील रणजित रॉय हे चहामळ्याचे बागायतदार तर आई मेरी रॉय या मल्याळी ख्रिश्चन आणि स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. अरुंधती रॉय यांचे बालपण केरळमध्ये अयमानम येथे गेले. कोट्टायम आणि तमिळनाडूतील लव्हडेल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. नवी दिल्लीतील स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथे त्यांनी वास्तुविशारदाचा अभ्यासक्रम केला; तेथेच वास्तुविशारद गेरार्ड डाकुन्हा यांच्याशी त्यांची भेट झाली. ते त्यांचे पहिले पती होत. दुसरे पती चित्रपटनिर्माते प्रदीप किशन यांच्याशी रॉय यांची भेट इ.स. १९८४ मध्ये झाली. त्यावेळी त्यांनी किशन यांच्या मेसी साहब या पुरस्कारप्राप्त चित्रपटामध्ये एका ग्रामीण मुलीची भूमिका केली होती. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज कादंबरीच्या यशानंतर व आर्थिक स्थैर्य प्राप्त होईपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली, क्लासेस घेतले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) सतीची प्रथा कोणी बंद केली?* 👉      राजा राममोहन रॉय *२)  गीतांजली कोणी लिहिली ?* 👉      रविंद्रनाथ टागोर *३)  सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?* 👉       महात्मा फुले *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संजय भोसले 👤 धर्मपाल धरम 👤 व्यंकट भंडारे 👤 पार्थ पवार 👤 भगवान कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *गंडे दोरे* अशिक्षितासह सुशिक्षितही गंड्या दो-याच्या मागे जातात गंड्या दो-याच्या नादाने बळी गेल्यावर जागे होतात सुशिक्षितही अशिक्षिता सारखे वागू लागतात सुशिक्षित म्हणून हे असे कसे जगू शकतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.* *राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= चार अर्थपूर्ण वाक्य एकत्र आली की,सुंदर अर्थपूर्ण रचना किंवा परिच्छेद तयार होतो.अर्थात एक वाक्य दुस-यावर आधारीत असते त्यामुळेच एकमेकांचा एकमेकांशी सुसंगत अर्थ जुळतो. त्याचप्रमाणे चार माणसे एकत्र आली आणि एखाद्या चांगल्या आणि विधायक विषयावर चर्चा घडवून आणली तर एकमेकांचा जीवनव्यवहारही व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकतो.म्हणून माणसाने एकत्र येऊन विचार विनिमय केल्यास जीवनविषयक असणारे प्रश्नही सहज सुलभतेने सोडविण्यासाठी मदत होईल.त्यासाठी माणसाने एकत्रीत येण्याची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *लहान तोंडी मोठा घास* - आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वावलंबन* एक माणूस कामासाठी दुस-या शहरात गेला. प्रवासात त्‍याची काही लोकांशी ओळख झाली. तेही कामानिमित्ताने त्‍याच शहरात चालले होते. त्‍यांच्‍यापैकी काहीजण पायी तर काही घोड्यावर स्‍वार होते. बोलत चालले असताना एका घोडेस्‍वाराच्‍या हातून चाबूक खाली पडला. त्‍या व्‍यक्तिने त्‍या घोडेस्‍वारास खाली उतरू न देता, चाबूक देण्‍याची तयारी दर्शविली पण त्‍या सहका-यास नम्रपणे नकार देत स्‍वत: खाली उतरून त्‍या घोडेस्‍वाराने चाबूक स्‍वत:च हातात घेतला. खालून मदत करणा-या व्‍यक्तिने याचे कारण घोडेस्‍वारास विचारले असता घोडेस्‍वार उत्तरला,''आपण ज्‍यावेळी घोड्यावर बसतो तेव्‍हा चाबूक आपणच सांभाळावा लागतो. आपण प्रत्‍येक गोष्‍टीत स्‍वयंपूर्ण राहिलो तरच आपल्‍याला यशाची खात्री आहे असे समजावे.'' तात्‍पर्य :- कुणावरही विसंबून न राहता स्‍वावलंबनाचा स्‍वीकार केल्‍याने यश मिळतेच. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/03/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९७: मदार तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली 💥 जन्म :- १९२६: ललित लेखक रवींद्र पिंगे  💥 मृत्यू :-  १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री १८९९: दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशी हवाई कंपनीच्या विमानाचा भीषण अपघात, 40 जणांचा मृत्यू ; मृतांचा आकडा वाढण्याची भीती* ----------------------------------------------------- 2⃣ * सरकारने शेतक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिले असल्याचे सांगितले. तसेच, यासंदर्भात मुख्य सचिवांच्या सहीचे पत्र देण्यात आले असून उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत पटलावर सर्व पूर्ण मागण्या मांडणार असल्याची माहिती जे.पी. गावित यांनी सांगितली.* ----------------------------------------------------- 3⃣ *संजय गांधी निराधार योजनेतील मानधन वाढवणार : अशोक ढवळे* ----------------------------------------------------- 4⃣ *देशातील एक टक्के लोकांच्या हाती चार वर्षापूर्वी ४९ टक्के मालमत्ता होती, त्याचे प्रमाण आत्ता ७३ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. अर्थात सरकारच्या नितीमुळे गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत - सिताराम येचुरी* ----------------------------------------------------- 5⃣ *परभणी : पाथरी येथे 15 पथकाद्वारे महावितरणची विशेष वसुली मोहीम सुरु. पहिल्या दिवशीच केला 350 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित, यात पाथरी पंचायत समितीचाही समावेश* ----------------------------------------------------- 6⃣ *अहमदनगर : महापालिकेकडून दरमहा मिळणारे पाच लाख प्रमाणे ८० लाख रुपये थकल्याने अभिकर्ता संस्था यशवंत अॅटोने सोमवारी सकाळपासून शहर बससेवा केली बंद.* ----------------------------------------------------- 7⃣ *निदाहास चषक -भारताचा श्रीलंकेवर 6 विकेट्सनं विजय* ----------------------------------------------------- *निधन वार्ता : धर्माबाद जि. नांदेड येथील जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक मोहन नारसिमलू कामिनवार यांचे निधन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *शिक्षकांना शिकवू द्या ...* शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *गोपीनाथ गणेश तळवलकर* गोपीनाथ गणेश तळवलकर  (२९ नोव्हेंबर, इ.स. १९०७ - ७ जून, इ.स. २०००) हे मुलांच्या आनंद मासिकाचे संपादक व एक ख्यातनाम बालसाहित्यिक होते. प्रौढ साक्षरांसाठीही त्यांनी लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबर्‍या, ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांचे काही लिखाण ’गोपीनाथ’ या टोपणनावाने केलेले आहे. आकाशवाणीवरील बालप्रिय बालोद्यान या कार्यक्रमातील नाना म्हणजेच गोपीनाथ तळवलकर. तळवलकर हे पुणे केंद्रावर बालविभागप्रमुख होते. बालोद्यान हा मुलांचा कार्यक्रम ते आयोजत. दर रविवारी सकाळी दहा वाजता बालगोपाळांच्या गच्च उपस्थितीत हा कार्यक्रम होत असे. यास स्टुडियोचे दार जेमतेम बंद करता येण्याइतकी गर्दी होत असत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अनेक वेळा चांगले क्षण, आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  पिनकोडचे विस्तारीत रूप काय आहे?* 👉      postal Index Number *२)  पिनकोडमध्ये किती अंक असतात?* 👉      ६ *३)  भारतात पिनकोड कधीपासून सुरू झाला?* 👉      १५ ऑगस्ट १९७२ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 भगवान कांबळे, पत्रकार, धर्माबाद 👤 रुस्तुम शेख *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *बळी* कोणी कोणाचा उगीच अंत पहायला नको अंत पहायला म्हणून नुकसान व्हायला नको अंतच पहात गेलो की उलट परिणाम होतो वाईटा बरोबर चांगल्याचा मग त्यात बळी जातो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.* *समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.* *"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या घरात संस्कार आणि संस्कृतीचे जतन केले जाते त्याचबरोबर आदर्श नैतिक जीवनमूल्यांची  जोपासना केली जाते अशा घरात नेहमी शांती, समाधान, स्थैर्य आणि समृद्धी लाभत असते.तेथे कधीही वादविवाद,दुरावा, भेद,मत्सर यांना वाव मिळत नाही.अशा घरातल्या शेजारी आपले घर आणि सहवास लाभला तर आपलेअहोभाग्य  समजावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *मनी वसे, ते स्वप्नी दिसे* - जशी इच्छा असेल, तशी स्वप्ने पडणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= एका लांडग्याने एक बकरा डोंगराच्या उंच कड्यावर चरताना पाहिला. तेव्हा तेथे आपल्याला जाता येणार नाही हे लक्षात घेऊन तो बकर्‍याला म्हणाला, 'अरे तू अशा उंच आणि अवघड जागी सगळा दिवस चरतोस, हे बरं नाही. एखादे वेळी पाय घसरून खाली पडलास तर तुझा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. त्यापेक्षा या मैदानात कोवळे गवत आणि गोड अशी झाडाची पानं आहेत ती खा, त्याने तुला जास्त समाधान मिळेल.' त्यावर बकरा म्हणाला, 'बाबा रे, तू म्हणतोस ते खरं, पण मला तू भुकेला दिसतो आहेस, म्हणून तू जिथे आहेस त्या ठिकाणी येऊन मी आपला जीव धोक्यात घालू इच्छित नाही.' तात्पर्य : - जे लोक स्वार्थी असतात, त्यांनी आपल्या हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांच्यावर विश्वास ठेवूं नये, कारण त्यात काहीतरी कपट असते. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/03/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १८४९ - अब्राहम लिंकन यांचा पेटंट साठी अर्ज; अमेरिकन राष्ट्रपतींचा पहिलाच असा अर्ज. १८७६ - पहिला दूरध्वनी संपर्क (अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ने थॉमस वॅटसन शी संपर्क साधला). 💥 जन्म :- १८१२ - विक्टर तेश, बेल्जियन वकील व कायदा मंत्री. १९५७ - ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक. 💥 मृत्यू :-  १९१३ - हॅरियेट टबमन, अमेरिकन क्रांतिकारी. १९९८ - लॉईड ब्रिजेस, अमेरिकन अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *उत्तर प्रदेश पोटनिवडणूक : लोकसभेच्या पोटनिवडणुकीत फुलपूरमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ३८ टक्के तर गोरखपूरमध्ये ४३ टक्के मतदान* ----------------------------------------------------- 2⃣ *पनवेल शहराचा तापमान तब्बल ३९ अंशावर पोहचल्याने नागरिकांची चांगलीच काहिली उडाली* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक, शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा करणार ; विविध खात्यांचे पदाधिकारी चर्चेत उपस्थित राहणार : गिरीश महाजन* ----------------------------------------------------- 4⃣ *रायगड: राेहा येथे शरद पवार यांच्या 50 वर्षांच्या संसदिय कारिर्दिवरील विशेष लघुपटाचे प्रकाशन व प्रसारण* ----------------------------------------------------- 5⃣ *अहमदनगर : राज्याचा अर्थसंकल्प लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपच्या एकाचवेळी ३६ जिल्ह्यात पत्रकार परिषदा, नगरमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी दिली योजनांची माहिती.* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड - नांदेड शहारासह माहूर हदगाव, अर्धापुर, नायगाव मध्ये जोरदार पाऊस. शहरात वादळी वा-यासह पाऊस, अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत* ----------------------------------------------------- 7⃣ *नेमबाजी विश्वचषक : अखिल शेओरान याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल प्रकारात जिंकले सुवर्णपदक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========             *सेमी इंग्रजीची समस्या* राज्याचे शिक्षण सचिव मा. नंदकुमार यांनी नुकतेच बीड मध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, अजून दोन वर्षे या पदावर राहिलो तर सेमी इंग्रजी बंद करू कारण अर्धे हे अर्धे ते असे नको तर आपणास दोन्ही भाषा चांगल्या प्रकारे अवगत असणे गरजेचे आहे. सचिव साहेबांनी हा सेमी इंग्रजीचा मुद्दा खरोखरच विचारात घेणे आवश्यक आहे. कारण भविष्यात सेमी इंग्रजी ही एक समस्या बनून समोर येऊ नये.............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_7.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========                 *आशापूर्णा देवी* आशापूर्णा देवी ( 8 जनवरी 1909-13 जुलाई 1995) भारत से बांग्ला भाषा की कवयित्री और उपन्यासकार थीं, जिन्होंने 13 वर्ष की अवस्था से लेखन प्रारम्भ किया और आजीवन साहित्य रचना से जुड़ीं रहीं। गृहस्थ जीवन के सारे दायित्व को निभाते हुए उन्होंने लगभग दो सौ कृतियाँ लिखीं, जिनमें से अनेक कृतियों का भारत की लगभग सभी भाषाओं में अनुवाद हो चुका है। उनके सृजन में नारी जीवन के विभिन्न पक्ष, पारिवारिक जीवन की समस्यायें, समाज की कुंठा और लिप्सा अत्यंत पैनेपन के साथ उजागर हुई हैं। उनकी कृतियों में नारी का व्यक्ती-स्वातन्त्र्य और उसकी महिमा नई दीप्ति के साथ मुखरित हुई है। उनकी प्रमुख रचनाएँ हैं स्वर्णलता, प्रथम प्रतिश्रुति, प्रेम और प्रयोजन, बकुलकथा, गाछे पाता नील, जल, आगुन आदि। उन्हें 1976 में ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित किया गया था। यह पुरस्कार प्राप्त करने वाली वे पहली महिला हैं। *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक  📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं."* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?* 👉   आंबोली *२)  धातूच्या वाहकामध्ये भारवहनाचे कार्य कोण करतो?* 👉      इलेक्ट्रॉन *३)  महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे?* 👉    लोणार *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सशिवराम पेंडकर, येवती 👤 विठ्ठल हिवराळे 👤 मधुकर काठेवाडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *अरुंद मनं* आता आमचे रस्ते  रूंद झाले आहेत  पण आमचे मनं अरूंद झाले आहेत रस्त्यां सारखेच मनं वाढवावे लागतील माणूस म्हणून जगणारे  घडवावे लागतील    शरद ठाकर  सेलू जि परभणी  8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान*    *ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान।* *ज्ञान आणि कर्म यांचा जीवन व्यवहारात अन्योन्य संबंध कसा असावा आणि त्यानं जीवनविकास कसा घडवावा, हा अर्थपूर्ण संदेश या गीतात आहे. ज्ञान आणि कर्म हे दोन वेगवेगळे मार्ग नाहीत, तर ज्ञानानं कर्मशील व्हावं आणि कर्मानं ज्ञानवान व्हावं, असा संदेश या गीतात आहे. सर्व विद्यामंदिरात ज्ञानसाधना कर्ममार्गानंच झाली पाहिजे, कर्ममार्गावर ज्ञानामृताचे झरे असले पाहिजेत, तरच ज्ञानाचा उपयोग जीवन उभारणीसाठी होईल.* *विज्ञानानं कितीही प्रगती केली, तरी जर विनाशाचा मार्ग दाखवला, तर ते विज्ञान आणि ती विज्ञानाची प्रगती नसलेलीच बरी. विज्ञानानं करूणेच्या चरणाशी नत व्हायला हवं; कारण करूणा हा सामाजिक, सामूहिक उत्थानाचा शांतीमार्ग असतो. या शांतीमार्गाने मानवतेच्या मंदिराची उभारणी करायची असेल, तर ' ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान ' हा संदेश सर्वांनी अंगी बाणवला पाहिजे.*          ••●🌴‼ *रामकृष्णहरी* ‼🌴●••      🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे सुगंधीत असलेल्या फुलांना आम्ही सुगंधीत आहोत म्हणून तुम्ही आमच्याकडे या आणि सुगंध घ्या असं कधीच म्हणावं लागतं नाही.आपोआपच सुगंध असणा-या फुलांकडे लोक आकर्षित होतात. त्याचप्रमाणे सज्जन माणसे कधीच कुणाला म्हणत नाहीत की,तुम्हीआमच्याकडे आमच्या सहवासात या आणि आमचे सद्गुण घ्या. आपोआपच सर्वसामान्य माणसे सज्जनांच्या सहवासात जाऊन आपल्यातील असलेल्या दुर्गुणावर मात करुन सद्गुणी होण्याचा प्रयत्न करतात. तात्पर्य असा की सद्गुणांचा सहवास हाच दुर्गुणावर मात करु शकतो.त्यासाठी  आपली मानसिकता असावी  लागते. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸 =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही* – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                   *आत्म-भाव*      एक आदमी संत तुकाराम का कीर्तन सुनने तो नित्य ही आता पर उनसे बहुत द्वेष रखता। वह मन ही मन किसी अवसर पर संत तुकाराम को नीचा दिखाने की ताक में रहा करता था।एक दिन तुकाराम की भैंस उसके बाग के कुछ पौधे चर आई। बस वह आकर लगा गालियाँ सुनाने। इस पर भी जब संत उत्तेजित न हुए तो उसे और भी गुस्सा आया और एक काँटों वाली छड़ी लेकर तुकाराम को इतना पीटा, कि रक्त बहने लगा। फिर भी तुकाराम को न क्रोध आया, न प्रतिरोध ही किया।            संध्या समय जब वह व्यक्ति नित्य की भाँति कीर्तन में नहीं आया तो संत तुकाराम स्वयं उसके घर गए और स्नेहपूर्वक भैंस की गलती की क्षमा माँगते हुए उसे कीर्तन में ले गए।       अब वह व्यक्ति तुकाराम के चरणों में पड़ा और क्षमा-याचना कर रहा था। 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩 *११ मार्च - धर्मवीर शंभूराजे बलिदान दिन...* *संभाजी महाराज..... एक वादळी आयुष्य....* *संभाजी महाराजांचे एकूणच आयुष्य अनेक वादळांनी भरलेलं होत... परंतु अश्या सगळ्याचं वादळांना कायम झुंज देत ते लढत राहिले...म्हणूनच इतिहास त्यांना, "सर्जा" आणि "रौद्रशंभू" सारख्या नावांनी ओळखतो...शिवराय आणि सईबाईंच्या संसारवेलीवर "शंभू" नावाचे "सूर्यफुल" जन्माला आले.. हो, हो त्यांना सूर्यफुलच म्हणावे लागेल... कारण त्यांच्यात जशी सूर्याची आग आणि तेजस्वीपणा होता.... तसेच फुलासारखे कोमल कवीचे हृदय, कविमन सुद्धा होते...असे हे सूर्यफुल अजाणते पणाच्या वयातच आपल्या आईच्या मायेला पारखे झाले... हा होता नियतीचा पहिला आघात...जिजाऊ मांसाहेबांच्या छत्रछायेखाली, आणि शिवरायांच्या, महाराजांच्या सोबतीत शंभूराजे मोठे झाले...छत्रपतींचेच संस्कार त्यांच्यावर झालेलं... मग मावळ्यांच्या सोबतीला ते कसे पारखे होतील ??? लहानपणापासूनच शंभूराजेंना, रयतेची मावळ्यांची ओढ होती... त्यातूनच रायाप्पा महार सारखे जिवलग हिरे ह्याच मावळ खोर्यातून त्यांनी निवडले होते...वाढत्या वयाच्या तिप्पट वेगाने, मनाने आणि मेंदूने शंभूराजे वाढत होते... ज्या वयात मुलं खेळ, आणि बाजारगप्पा मध्ये रमतात... त्या वयात शंभू राजांनी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहून सगळ्यांना अवाक करून सोडले होते... नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक या ग्रंथांची सुद्धा त्यांनी निर्मिती केली..त्यांची समशेरीवरची पकड... त्यांच्यातल्या योद्ध्याची जाणीव करून द्यायची.... त्यांनी घोड्यावरची मांड ठोकून बसण्याची पद्धत त्यांच्यातल्या वायुवेगाची चुणूक दाखवायची... त्यांनी घोड्यांचा वापर फक्त युद्धासाठी केला नाही तर त्याचे अश्वप्रेम सुद्धा त्याच तोडीचे होते...आई नकळत्या वयात गेल्यानंतर, जिजाउंच्या मायेची पाखर त्यांच्यावर होती,,,, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसात हि मायेची पाखर सुद्धा हरपली...* *हा होता नियतीचा दुसरा आघात...यानंतर अनेक राजकारणी आघात सुद्धा त्यांनी सोसले पण ते खंबीरपणे उभे राहिले... पण जेव्हा शिवरायांचे निधन झाले... तेव्हा त्यांचा उरला सुरला भक्कम आधार सुद्धा नाहीसा झाला... आणि ते पूर्ण खचून गेले... पण त्यांच्या या मनावरच्या आघाताचा त्यांनी स्वराज्यावर परिणाम होऊ दिला नाही....रौद्रशंभू, दुप्पट तेजाने उजळून निघाले... एकाच वेळी पाच पाच शाह्या मोडून काढण्यासाठी ते जोमाने उभे राहिले.... त्या दरम्यान त्यांच्या आयुष्यात, बुऱ्हाणपूर वरील छापा, मुरुडजंजिरा, आरमार उभारणी, यासारखी अनेक आव्हाने आणि घटना घडून गेल्या...केवळ ९ वर्षाच्या कारकिर्दीत, स्वराज्यातील एकही किल्ला वैऱ्यांच्या ओटीत त्यांनी पडू दिला नाही. शिवरायांच्या आरमारात अधिक भर टाकली; पण महासंकटांच्या दर्यातही आपल्या पित्याचे एकही जहाज बुडू दिले नाही.मातीसाठी लढलेल्या ह्या राजाने मातीसाठी आपला देह ठेवला... स्वराज्यासाठी आपल्या शरीराचे अक्षरश: तुकडे तुकडे करून मृत्यूला मिठी मारली...* *ते "शिवपुत्र" म्हणून जन्माला आले... पण "सिंहाचा छावा" बनून जगले...स्वराज्याच्या ह्या दुसर्या रणधुरंधर, राजबिंड्या वादळास माझा मानाचा मुजरा...* *जय जय रौद्रशंभो !!* *जय जय शंभुराजे !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *शंभूराजांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.......🙏🙏🙏*

माझी मुलगी मोठी झाली. एके दिवशी सहज म्हणाली, *"पप्पा मी तुम्हाला कधी रडवलंय का?"* मी म्हटलं, "का रे पिल्लू असं का विचारतेस?" ती : "काही नाही असंच." मी : "नीट आठवत नाही. पण एकदा " ती : "कधी?" तिनं अधिरतेनं विचारलं. मी म्हणालो, "तू एक वर्षाची असताना मी तुझ्यासमोर पैसे, पेन आणि खेळणं ठेवलं. कारण मला बघायचं होतं की, तू काय उचलतेस? तुझी निवड ठरविणार होती की, मोठेपणी तू कशाला जास्त महत्व देतेस. जसे *पैसे* म्हणजे संपत्ती, *पेन* म्हणजे बुद्धी आणि *खेळणं* म्हणजे आनंद. मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होतो. मला बघायची होती तुझी निवड. तू एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतीस आणि मी तुझ्या पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होतो. तू रांगत-रांगत पुढे आलीस. मी श्वास रोखून पहात होतो आणि क्षणार्धात तू त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या मिठीत शिरलीस. माझ्या लक्षातच नाही आलं की, "या सगळ्यांबरोबर मीसुद्धा एक *निवड* असू शकतो." ती पहिली वेळ होती जेव्हा तू मला रडवलंस. *खास मुलींच्या पप्पांसाठी.* खरंच मुलगी पाहिजेच. One of the best message received.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*ज्याने रचना केली त्याला 1,00,000 वेळा सलाम करतो..* छान कविता..... 👍👍👍🙏👌👌👌 घरटे उडते वादळात बिळा, वारूळात पाणी शिरते कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? 🐜🕊 म्हणून आत्महत्या करते ? प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनूदान मागत नाही 🐅 घरकुला साठी मुंगी करत नाही अर्ज स्वतःच उभारते वारूळ कोण देतो गृहकर्ज ?🎭 हात नाहीत सुगरणी ला फक्त चोच घेउन जगते स्वतःच विणते घरटे छान कोणतं पॅकेज मागते ?🕴 कुणीही नाही पाठी तरी तक्रार नाही ओठी निवेदन घेउन चिमणी फिरते का कोणत्या योजनेसाठी ? घरधन्याच्या संरक्षणाला धाऊन येतो कुत्रा लाईफ इन्शुरन्स काढला का ? अस विचारत नाही मित्रा 🐕 राब राब राबून बैल कमाउन धन देतात सांगा बरं कुणाकडून ते निवृत्ती वेतन घेतात ?🐂 कष्टकर्याची जात आपली आपणही हे शिकलं पाहिजे पिंपळाच्या रोपा सारखं पाषाणावर टिकलं पाहिजे🤕 कोण करतो सांगा त्यांना पुरस्काराने सन्मानित तरीही मोर फुलवतो पिसारा अन कोकिळ गाते मंजुळ गीत🐧 🐝मधमाशीची दृष्टी ठेव फुलांची काही कमी नाही मधाच्या पोळ्यासाठी मित्रा कोणतीच रोजगार हमी नाही घाबरू नको कर्जाला भय, चिंता फासावर टांग जिव एवढा स्वस्त नाही सावकाराला ठणकाऊण सांग😎 काळ्या आईचा लेक कधी संकटापुढे झुकला का ? कितीही तापला सुर्य तरी समुद्र कधी सुकला का ?🌊💦 निर्धाराच्या वाटेवर टाक निर्भीडपणे पाय तु फक्त विश्वास ठेव पुन्हा सुगी देईल धरणी माय🎑 निर्धाराने जिंकु आपण पुन्हा यशाचा गड आयुष्याची लढाई फक्त हिमतीने लढ👊 फक्त हिमतीने लढ👊 🌺🌷!!

🌺🌺महाराष्ट्रीयन🌺🌺 एकदा एक भारतीय नोकरीसाठी अमेरिकेत गेला. काही दिवस खटपट करून त्याला एका सुपर मॅालमध्ये सेल्समन म्हणून नोकरी मिळाली. मालकाने त्याला बोलावले व पूर्वानुभवाबद्दल चौकशी करून त्याला नोकरी दिली. दुस-या दिवशी तो गृहस्थ कामावर आला. दिवसभर काम भरपूर करावं लागेल असे मालकाने सांगितले. मॅालची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ अशी होती. पहिल्या दिवसाचे काम संपल्यावर मालक त्याच्याकडे आला व किती ग्राहक केले असे विचारले. त्या भारतीयाने सांगितले की फक्त एकच ग्राहक केला. मालक चिडला व म्हणाला बाकीच्यांनी प्रत्येकी पंधरा ते वीस ग्राहक केले आणि तू फक्त एक ! तुझा असा परफॅार्मन्स असेल तर मला तुझ्या बाबत विचार करावा लागेल. मालक चिडूनच पुढे म्हणाले किती डॅालरचा व्यवसाय केलास ? कारण एका ग्राहकाकडून असे कितीसे मिळाले असतील...? असा विचार मालकाने केला. तो गृहस्थ म्हणाला दीड लाख डॉलर ! क्काय ! मालक जवळजवळ ओरडलाच ! बाकीचे सेल्समनही अचंबित झाले. मालक म्हणाले, काय विकलेस तू त्याला ? तो म्हणाला एक मासे पकडायचा गळ विकला. पण त्याचे एवढे पैसे कसे..? मी त्याला फिशिंग रॅाडही विकला. मग गळाला लागणारे खाद्य विकले. मासे जास्त जिथे मिळतात त्या ठिकाणचे पाणी खोल आहे व तो भाग दुर्गम आहे, त्यामुळे बोटीने जावे लागेल, म्हणून आपल्या बेसमेन्टमधल्या गोडावूनमधून एक डबल इंजीनवाली मोटरबोट विकली. तिकडे आठवडाभर रहाव लागेल म्हणून पुरेल एवढे खाद्य पदार्थ व दोन क्रेट बीयरही त्यालाच विकली सर ! एव्हाना मालकाचा ऊर आणि डोळे दोन्ही भरून आले होते. मालक म्हणाले, कसला रे माणूस आहेस तू ? केवळ एक गळ विकत घ्यायला आलेल्या माणसाला तू हे विकून दाखवलेस...! तो गृहस्थ म्हणाला, नाही सर, तो माणूस डोकेदुखीवरचे औषध व बाम मागत होता. मी त्याला पटवून सांगितले की, डोकेदुखी घालवायची असेल तर फिशींग करा. आणि हे सर्व घडून आले. मालक म्हणाले, आजपासून तू माझ्या खुर्चीत बस बाबा ! गुरु आहेस तू कुठे काम करत होतास भारतात ! तो म्हणाला, महाराष्ट्र राज्यात शिक्षक होतो !!!!

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 〰〰〰〰〰〰〰 *🌺जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰 सत्यनिष्ठेसाठी निर्भयतेची गरज असते आणि निर्भयतेसाठी स्वावलंबनाची गरज असते.नम्रता म्हणजे 'मी' पणाचा आत्यंतिक क्षय. निर्भयतेने प्रगती करून घेता येते व नम्रतेने बचाव होतो.आपण स्वतःस वाचवु शकतो. नम्रतेच्या कोंदनातच अभय खुलून दिसते.आणि उदार वृत्ती वाढीस लागते."नम्रता म्हणजे लवचिकपणा. यामध्ये जिंकण्याची कला आहे आणि शौर्याची पराकाष्ठा आहे ". *नम्रतेच्या उंचीला मोजमाप नाही*. 🙏 महात्मा गांधी नी म्हटलं आहे " सत्याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्याने धुळीच्या कणापेक्षाही नम्र झाले पाहिजे. नम्रता ही अहिंसेची तेजस्वी मूर्ती आहे ". smt.pramilatai senkude. नम्र माणूस दुसऱ्याचा विचार करतो. पाणी ज्याप्रमाणे रस्त्यातला खड्डा भरून काढल्याशिवाय पुढे सरत नाही , त्याचप्रमाणे दुसऱ्याचे जीवन संपन्न केल्याशिवाय तो राहणार नाही. म्हणूनच कन्फ्यूशियसने म्हणले आहे 'फळांनी लहडलेल्या वृक्षांच्या शाखा ज्याप्रमाणे खाली वाकतात, त्याप्रमाणे महान लोक त्यांच्या महानतेने लीन बनतात.' ================= 🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼 *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 💐🍀💐🍀💐🍀💐

रानफूल झाले मी पहाटेचा मंदधुंद वार्याने सूर्याच्या आगमनाने रानफूल झाले मी आज पाहून सृष्टीचा साज. 〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰

🙏📚✍ *विद्येची खरी देवता..!* *ज्यांनी आपले आयुष्य गोर-गरीब, उपेक्षित घटकांच्या उध्दारासाठी वाहून घेतले..!* *स्त्री शिक्षणासाठी अनंत अडचणीवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला !* *अशा या महान व्यक्ति...* _*'सावित्रीमाई फुले'*_ *यांच्या पूण्यतिथीनिमित्त...* _*विनम्र अभिवादन..!!!*_ 💐💐💐🙏🏻💐💐💐 smt.senkude. 🙏

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/03/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १८४९ - अब्राहम लिंकन यांचा पेटंट साठी अर्ज; अमेरिकन राष्ट्रपतींचा पहिलाच असा अर्ज. १८७६ - पहिला दूरध्वनी संपर्क (अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ने थॉमस वॅटसन शी संपर्क साधला). 💥 जन्म :- १८१२ - विक्टर तेश, बेल्जियन वकील व कायदा मंत्री. 💥 मृत्यू :-  १९१३ - हॅरियेट टबमन, अमेरिकन क्रांतिकारी. १८९७ - सावित्रीबाई फुले १९९८ - लॉईड ब्रिजेस, अमेरिकन अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मलेरिया निर्मुलनासाठी गोव्यासह देशभरात मदत करण्याची अमेरिकेच्या निओडॉक्टो फाउंडेशन कंपनीने दाखवली तयारी* ----------------------------------------------------- 2⃣ *काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. पंतगराव कदम यांचे मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन* ----------------------------------------------------- 3⃣ *महापुरुषांचं साहित्य वेब पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी ४ कोटींची तरतूद.* ----------------------------------------------------- 4⃣ *जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी ५० कोटींची तरतूद. स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी तरुणांचा टक्का वाढवण्यासाठी उपाययोजना.* ----------------------------------------------------- 5⃣ *नंदुरबार- दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला शहादा सेंटरवर कॉपी पुरविणारे तीन शिक्षक निलंबित. व्ही.के.शहा विद्यालयातील केंद्रावर घडला होता प्रकार.* ----------------------------------------------------- 6⃣ *हरियाणा- फरिदाबादमधील कृष्णा कॉलनी सेक्टर 25मधील पूल कोसळला. जडवाहन जात असताना घडली घटना. जिवीतहानी नाही.* ----------------------------------------------------- 7⃣ *कोणत्याही खेळाडूची कॉपी करु नका - अंजिक्य रहाणेचा सल्ला* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= मराठी हस्ताक्षर लेखन स्पर्धेत सहभागी प्रमाणपत्र http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_3.html सहभागी सर्व स्पर्धकांनी हे प्रमाणपत्र download करून घ्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= सावित्रीबाईनी  ज्योतीबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथना आश्रय मिळवा हि त्याची कार्यक्षेत्र त्यांच्या श्रद्धेने प्रभावी झाली . सामजिक कार्यात पुढाकार घेणे हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळेच १८७६ – ७७ मधल्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाने बळी  ठरल्या. आणि १० मार्च १८९७ मध्ये त्यांना मृत्यू आला. समाजातल्या दिनदलितांना मायेने जवळ करणाऱ्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपडनाऱ्या सावित्रीबाई खर्या अर्थाने ज्योतिबाच्या सहचारणी म्हणून शोभल्या . त्याच्या थोर सामजिक कार्य विषयाची कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो."* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) बावनकशी हे पुस्तक कोणी लिहिले ?* सावित्रीबाई फुले *02) सावित्रीबाई फुले यांचा जन्म केंव्हा झाला ?* 03 जानेवारी 03) हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?* बालिका दिन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 शिवराज सावंत, सहशिक्षक, रत्नागिरी 👤 वीरभद्र मिरेवाड, सहशिक्षक तथा कवी 👤 साईनाथ शिरपूरे, भाजपा कार्यकर्ता 👤 नागनाथ लाड, सहशिक्षक, कुंडलवाडी 👤 विठ्ठल नवाथे, सहशिक्षक, सायखेड 👤 संतोष पवार 👤 उमाकांत बांगडकर 👤 शिवाजी जाधव, साहित्यिक, मरखेल 👤 तुळशीराम सिरमलवार, सहशिक्षक 👤 माधव आप्पा पडोळे, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *तुलना* तुलना करावी पण अवहेलना करू नये तुलना म्हणजे कोणाची अवहेलना ठरू नये अवहेलना केल्याने व्यक्ती एकदम खचतो अवहेलनात्मक शब्द त्याला सारखा बोचतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *अनेक उच्चपदस्थ, उच्चभ्रू म्हणवले जाणारे प्रतिष्टित सुर्यास्ताबरोबर स्वत:ला काचेच्या पेल्यात बुडवतात. तरूण मुला-मुलींपुढे कुठले आदर्श आपण ठेवणार आहोत ? कोवळी, मिसरूड फुटलेली मुलं अलिकडे व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यांना कुणीतरी थांबवलं पाहिजे. त्यांची शक्ती विधायक कार्यासाठी संघटित व्हायला हवी. जगाची दारं आज त्यांच्यासाठी खुली आहेत. त्यांनी त्या दारापर्यंत पोहोचायला हवं.* *खरं म्हणजे आनंद-दु:ख, यश-अपयश व्यक्त करण्याची अनेक माध्यमं आहेत. मदिराप्राशन, हे माध्यम उचित ठरू शकत नाही. प्रत्येकानं मात्र आवडीचा छंद जोपासण्याची धुंदी चढू द्यावी. श्रमण्यातून मिळालेल्या यशाचा कैफ काही औरच असतो. दुस-याच्या दु:खानं गुंगी जरूर यावी नि, ती सोडविण्याचा अंमलही असावा. प्रेमाचा वर्षाव करत झिंगावं त्यानं आप्त-मित्रांसह, आणि जगण्याची खरी... नशा.. चढू द्यावी...!* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼ ★●•• 🔰🔰🌺🌺🔰🔰 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= स्वप्न पहायला परिश्रम,वेळ आणि पैसा कधीच लागत नाही परंतु पाहिलेली स्वप्ने साकारण्यासाठी वेळ, परिश्रम आणि पैसा हा लागतोच तेव्हा कुठे स्वप्न पूर्ण होतात.केवळ स्वप्नांना कल्पनेत न ठेवता ती प्रत्यक्षात उतरावयाची असतील तर हे तुम्हाला करावेच लागेल.अन्यथा स्वप्न स्वप्नच राहतील. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये* - एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *हरिण व कोल्हा* एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.' तात्पर्यः  'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.' 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 09/02/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९५९ - बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात. १९६७ - जोसेफ स्टालिनची मुलगी स्वेतलाना अलिलुयेवाने अमेरिकेला पळ काढला. 💥 जन्म :- १९२९ - डेसमंड हॉइट, गुयानाचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष. १९४३ - बॉबी फिशर, अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू. 💥 मृत्यू :-  १८८८ - कैसर विल्हेम पहिला, जर्मनीचा सम्राट. १९७१ - के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 📺📺📺📺📺📺📺📺📺📺 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *तारापूर एमआयडीसी मधील रामदेव केमिकल ह्या कंपनीला आग लागून बॉयलरचा स्फोट, बोईसर,पालघर,सातपाटी आदी 20 किमी क्षेत्रात जाणवले हादरे, भूकंप झाल्या* ----------------------------------------------------- 2⃣ *राज्याचा 2018-19 चा अर्थसंकल्प आज विधिमंडळात होणार सादर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी साधला संवाद* ----------------------------------------------------- 3⃣ *नागालँड- नवनिर्वाचित सरकारचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो व मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई- राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून प्रकाश जावडेकर यांना भाजपाकडून उमेदवारी* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई- 1993 बॉम्ब स्फोटातील फारूख टकलाला मुंबईत आणलं. 1993 च्या बॉम्बस्फोटात फारूखचा हात. टकलाला 1995 साली दिली होती रेड कॉर्नर नोटीस.* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - तेलगू देशम पार्टीच्या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी दिले राजीनामे* ----------------------------------------------------- 7⃣ *निदाहास चषक 2018 : भारताचा बांगलादेशवर सहा विकेटने विजय, धवनचे अर्धशतक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *वेळ नाही मला* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_14.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *विद्याधर गंगाधर पुंडलिक* मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला, आणि मृत्यू ९ऑक्टोबर १९८९ रोजी. पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुले आहेत' हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दु:ख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. 'बापलेकी' या विद्या बाळ आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकात, मोनिकाबाईंनी लिहिलेल्या लेखात त्यांनी त्या दिवसांबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे. साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांमध्ये पुंडलिकांचा अधूनमधून सहभाग असायचा, पण संमेलनाध्यक्षपदाच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. चाहत्यांकडून त्यांना आग्रह होत नसे असे नाही. पण त्यांनी तो विषय नेहमीच हसण्यावारी नेला. आणीबाणीअखेर झालेल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या प्रचारात पुंडलिकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा पद्धतीने भाग घेतला. पण त्यांची भूमिका स्पष्ट होती. अलीकडच्या काळातील साहित्यिकांप्रमाणे राजकारण्यांची हुजरेगिरी त्यांनी कधीच केली नाही, मात्र मनापासून वाटले तेव्हा, १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनाही स्वच्छ पाठिंबा देणारा उत्कृष्ट ललितशैलीचा लेख त्यांनी लिहिला. अशा प्रकारे, राजकीय भूमिका घेण्याचे आणि तरीही सवंग राजकारण व राजकारण्यांपासून दूर राहण्याचे व्रत पुंडलिकांनी अखेपर्यंत जपले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *श्वास व विश्वास दोन्हीं अदृश्य आहेत, परंतु दोघांत इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीला शक्य बनवून देतात* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो?* 👉      २४ नोव्हेंबर *२)  स्थानिक स्वराज्य संस्था सुरू  करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?* 👉      राजस्थान *३)  मनरेगा योजनेअंतर्गत लाभार्थ्याना मजूरी वाटप करण्याची जबाबदारी कोणाची असते?* 👉      ग्रामसेवक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 शिवा वसमतकर, वसमत 👤 शिवाजी साखरे 👤 अरविंद फुलसिंग आडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *अहंकार* अहंकाराच्या गोष्टी स्वतःलाच मान्य होतात अहंकार येतो तेंव्हा तुम्ही शून्य होतात अहंकाराच्या अंधारात मोठा माणूस छोटा होतो अहंकार सुटला की माणूस फार मोठा होतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.* *संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...? आहे....?...की.....?"* 😢 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 😢 😰😰😰😰😰😰😰😰😰 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *भीक नको : पण कुत्रा आवर* - ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता, उलट संकट ओढवणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल.मला कायम आनंदी ठेवेल. अखेर एका फकिराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.कळाल्यावर दुष्ट प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार. त्या क्षणी त्याला फकिराच्या अंगठीची आठवण आली.ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते, "This too shall pass " म्हणजे "हाही क्षण निघून जाईल" केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले.सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला. ते परतले.राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला. विजयाचा जंगी समारंभ चालू असताना, नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति-उत्साहित न होता प्रशांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले, " महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे." राजा म्हणाला, " नाही, आता मला माझ्या मंत्राचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही राहात नाही, दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले आहे.म्हणून दुःखात खचू नये, सुखात नाचू नये." This too shall pass ! हे क्षणही निघून जातील. ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्लीच इथे दिलेली आहे. ही कथा पासवर्ड आहे आनंदी आयुष्याचा. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *🌺 जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰 *जगातील सर्व माणसं सुखासाठी धडपडतात.अनेक संकटांना तोंड देतात.कधी हरतात ,तर कधी जिंकतात. जिंकण आणि हरणं हे शेवटी एका क्षणाचं असतं.हे जेव्हा कळतं तेव्हा माणूस अंतर्मुख होऊन विचार करतो.* *आपल्या आत्मयाचा आवाज परमात्मयापर्यंत घेऊन जाण्यासाठी तो देवापुढं काही मागणं मागतो.अस मागण म्हणजे तो प्रार्थना करतो.* smt.pramilatai senkude. *या प्रार्थनारुपी हाकेतून आत्म्याची निश्चित उत्कंठा करतो.प्रार्थना ही पण दोन प्रकारे केली जाते.सकाम आणि निष्काम प्रार्थना.जेव्हा आपण देवापुढ काही मागतो ते सकाम प्रार्थना आणि जेव्हा आपलं काही देवापुढ मागणं नसतं आहे त्यात समाधान मानने असते ही झाली निष्काम प्रार्थना.* *प्रार्थना ही धैर्य आणि आत्मबलाची जननी आहे.आपले जैविक आणि आत्मबल वाढविण्याचे सामर्थ्य प्रार्थनेत* *आहे.स्वार्थारहित खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना होय.* *संत तुकाराम महाराज म्हणतात , 'न लगे मुक्ती धनसंपदा ' संत तुकाराम महाराजांनी देवापुढं मुक्ती मागितली नाही तर भक्ती मागितली.ईश्वराविषयीचा उत्कट प्रेमातून प्रार्थना जेव्हा जन्म घेते तेव्हा ती खरीखूरी भक्तीमय प्रार्थना असते.*👏🙏 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 🙏श🔶ब्दांकन/संकलन🙏* ✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे) सह.शिक्षिका जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 08/03/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक महिला दिन.* 💥 ठळक घडामोडी :-  १९४३ - दुसरे महायुद्ध-बोगनव्हिलची लढाई - जपानी सैन्याने प्रतिहल्ला सुरु केला. १९८८ - फोर्ट कॅम्पबेल, केन्टकी येथे दोन हेलिकॉप्टरची टक्कर. १७ सैनिक ठार. 💥 जन्म :- १९६३ - गुरशरणसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९८८ - अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 📺📺📺📺📺📺📺📺📺📺 *ही audio* ऐकण्यासाठी खालील लिंकला क्लिक करावे. https://drive.google.com/file/d/1P5wSFlTAzNcKDSzWhtG0oFFpLlp2P_yx/view?usp=drivesdk *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी मे महिन्यात सिंगापूर आणि इंडोनेशियाचा दौरा करणार असल्याची सुत्रांची माहिती.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई - आजारपणावरील उपचारांसाठी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अमेरिकेला रवाना* ----------------------------------------------------- 3⃣ *समाजवादी पक्षाकडून जया बच्चन यांना राज्यसभेची उमेदवारी.* ----------------------------------------------------- 4⃣ *अमरावतीत तयार होणार विमान हल्ला विरोधी तोफा, 540 एकरावर, 400 कोटींची गुंतवणूक, भारत डायनॅमिक्स लिमिटेड चे अध्यक्ष व्ही. उदय भास्कर यांनी दिली माहिती* ----------------------------------------------------- 5⃣ *नंदुरबार : अपंग युनिट अंतर्गत बोगस शिक्षक भरती प्रकरणी विधान परिषदेत लक्षवेधीवर चर्चा, एसआयटी द्वारे चौकशी करण्याची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा* ----------------------------------------------------- 6⃣ *उस्मानाबाद : बोगस परीक्षार्थीला बसवून सरकारी सेवेत रुजू झालेले 15 अधिकारी अटकेत.* ----------------------------------------------------- 7⃣ *गौतम गंभीरची दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कॅप्टनपदी नियुक्ती.* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी : मराठी राजभाषा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या मराठी हस्ताक्षर लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर, डॉ. शरयु शहा, अथर्व सुतार, रुचिता महानोर आणि दीप्ती क्षीरसागर यांना प्रथम क्रमांकाचे पुरस्कार* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= साहित्य स्पंदन आणि आपली माणसं समुहाकडून जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित *मराठी हस्ताक्षर लेखन स्पर्धा* निकाल .....! निकाल ......! निकाल ..... http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_13.html पूर्ण निकाल पाहण्यासाठी वरील ब्लॉगला भेट द्यावे. =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक महिला दिन* महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. १९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करावा यासाठी आवाहन केले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे. पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागते."* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) यूनोने जाहिर केलेले जागतिक महिला वर्ष कोणते ?* 1975 02) जगात पहिला महिला दिन केव्हा आणि कुठे साजरा झाला ? २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क  *03) भारतात जागतिक महिला दिन केव्हा पासुन सुरुवात झाली ?* 1943 *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साईनाथ नुतिवाड, पेंटर, नायगांव ध. 👤 संभाजी पाटील, सहशिक्षक, जळगाव 👤 बालाजी कदम, चिरली 👤 मारोती भोसले, सहशिक्षक, धर्माबाद 👤 उत्तम शिंदे, सहशिक्षक, नायगांव 👤 श्रीनिवास भुतावळे, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *स्त्री शक्ती* बाहेर फक्त घोषणा देतो स्त्री म्हणजे शक्ती आहे माय माऊलीला खरंच घरात किती मुक्ती आहे कर्मात अन् विचारात तिला मुक्ती असावी वरवर दाखवण्या पुर्ती महिला भक्ती नसावी महिला दिनाच्या शुभेच्छा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 दि.08:03:2018 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.* *संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...? आहे....?...की.....?"* 😢 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 😢 😰😰😰😰😰😰😰😰😰 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= चांगल्या आणि उच्च विचारांची पायाभरणी ही आपल्यावर झालेल्या संस्कार आणि शुद्ध आचरणावरच अवलंबून असते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *भित्यापाठी ब्रह्मराक्षस* - भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *माझी वाटचाल* स्त्री जन्माला आली तु हीच आहे तुझी पुण्यायी घेऊन नवी दिशा नवी वाट आज महिला दिनाची आहे मंगलमय पहाट जीवन असले आपुले संघर्षाचे वाटेत काटे रुजतील धोक्याचे कुणास न घाबरता जग तू अभिमानाने यशाचा शिखरावर जा तू प्रयत्नाने जीवनाच्या या लढाईत आहेस तू मजबूत सक्षम होऊनी चालूया समानतेचा हक्काने जगूया स्त्री जन्माला आली तू हीच आहे तुझी पुण्यायी 〰〰〰〰〰〰〰 *✍स्वरचित काव्य* *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.(सहशिक्षिका)* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव जिल्हा नांदेड.* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

स्वरचित काव्यरचना *माझी वाटचाल* स्ञी जन्माला आली तु हीच आहे तुझी पुण्यायी घेऊन नवी दिशा नवी वाट आज महिला दिनाची आहे मंगलमय पहाट जीवन असले आपुले संघर्षाचे वाटेत काटे रुजतील धोक्याचे कुणास न घाबरता जग तू अभिमानाने यशाचा शिखरावर जा तू प्रयत्नाने जीवनाच्या या लढाईत आहेस तू मजबूत सक्षम होऊनी चालूया समानतेचा हक्काने जगूया स्ञी जन्माला आली तू हीच आहे तुझी पुण्यायी 💐🌺🌹☘🌹💐🌹 *महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा!* 〰〰〰〰〰〰 *✍स्वरचित काव्य* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.(सहशिक्षिका) जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰

चारोळी आकाशात खुलला चंद्र आज शुभ्र चांदण्यानी केलाय साज रंग नभी तुझे शोभून दिसे त्यापुढे चांदण्याही फिक्या असे. ✍ ©श्रीमती प्रमिला सेनकुडे

फुलवूया ज्ञानाचा मळा ज्ञानाचा मळा आहे तुझी माझी शाळा आपल्याच मेहनतीने लागेल बालकास लळा llधृll मराठी शाळेची गोडी आहे बघा न्यारी; जिल्हा परिषद शाळा आमची लई लई भारी ! नवी दृष्टी ,नवी सृष्टी लाभते ही ग्रामीण भागाला; विशाल करुनी भावविश्वा सुंदर करते जीवनाला. ध्यास लागला शाळेचा फुलवू मळा गुणवत्तेचा; सार्थक होईल जीवनाचे, करुनी उद्धार बालकाचा.. 〰〰〰〰〰〰 ✍स्वलिखित रचना श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.(सह.शिक्षिका) जि.प.प्रा.शाळा वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड.

*✍चारोळी* *माणुसकीचा रंगात रंगुनी* *माणसाचे सारे माणूसपण जपूणी* *प्रेमाचे,जिव्हाळ्याचे नाते जोडूनी, आपण* *होळीत जाळुनी टाकावे सारे मीपण.* 〰〰🌺🌸🌺〰〰〰 *होळीच्या आपणास अंतःकरणपूर्वक शुभेच्छा* 💐💐💐💐💐💐 ✍ *©🙏🙏 〰〰〰〰〰〰〰

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 〰〰〰〰〰〰〰〰 *🌺 जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰〰 *जोवर प्रकृतीच्या वर उठण्याची धडपड करीत आहे तोवर माणूस हा माणूसच असतो.ह्या प्रकृतीतही अंतःप्रकृती व बहिःप्रकृती अशी दोन उभयविध भाग असते.बाह्य प्रकृतीला जिंकणे ही फार चांगली आणि फार मोठी बाब आहे ह्यात काही शंका नाही.पण आपली अंतःप्रकृती जिंकणे ही खचितच त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आहे.* आपल्या ह्या उपयुक्तततावादी जीवनात आपले चांगले कर्मच आपल्या सोबत आपल्या अंतदायी स्वरुपात आपल्या दृष्टीआड कामी पडतील कारण आपल्या जीवनाचा जाळ फार मोठ्या विपरीत तान्या-बान्यानी विनला गेला आहे.जे दृष्टीगत होते ते वास्तविक नाही आणि जे आम्हाला दिसत नाही ज्याच्याशी आमचा संबंध नाही ते वास्तविक आहे. सत्य आहे दोन विपरीत किनाऱ्यांच्या मध्ये वाहनार्या नदीचे नाव जीवन सरीता आहे पूर्वेने पश्चिमेकडील याञेवर निघणाऱ्या सूर्याचे नाव🌞जीवन आहे . लोक उगवत्या 🌞सूर्याला तर🙏प्रणाम करतात.परंतु डुबत्या सूर्याला कोणी प्रणाम करत नाही.हीच जीवनाची भूल आहे.जन्म आणि मरणाच्या मध्ये जीवनाचे नीर वाहते,या दोन तटांमध्ये जीवनाची धारा वाहते. जसे जन्माच्या सोबत मृत्यू आणि मृत्यूच्या सोबत जन्माची छाया चालते. सावलीला कोणी पण कधीही वेगळे करू शकत नाही.कोणाच्या सावलीवर पाय ठेवून उभे राहून जा सावली पायाच्या वरती येवून जाईल डोक्याच्या वरती येऊन जाईल परंतु नष्ट होणार नाही.मृत्यूची पण हीच स्थिती आहे. आपण जेव्हापर्यंत संसारामध्ये कर्माच्या सूर्याच्या खाली चालत आहात.तेव्हापर्यंत जन्म मरणाच्या छायेचा अंत करू शकत नाही. म्हणून आपले चांगले कर्मच आपल्या कामी येतात. "मनुष्याच्या रुपामुळे किंवा कुळामुळे त्याचा गौरव वाढत नाही.माणसाच्या कार्यामुळे,त्याच्या कर्तूत्वामुळेच त्याचा गौरव वाढत असतो." *शेवटी 🙏'कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो'*. *'कर्मे ईशू भजावा'.*🙏 ================== 🙏🏼शब्दांकन /संकलन🙏🏼 ✍ प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे) जि.प.प्रा.शा. वाटेगाव, हदगाव, नांदेड 〰〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 💐🍀💐🍀💐🍀💐

 जीवनातली रंगपंचमी साजरी होते ती त्यातील माणसांच्या सहभागामुळे, विविध रंगांमुळे....!!! आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसे आपल्यात सामील होतात.... आपल्या आयुष्याला बहरायला, फुलायला, रंगीबेरंगी करायला ही माणसेच हातभार लावतात...... प्रत्येकाचे रंग निराळे....!!!               मग हे रंग कधी शहाणपणाचे कधी वेडेपणाचे; कधी उत्साहाचे तर कधी नैराश्याचे... कधी शांततेचे...धीरगंभीरतेचे....आतुरतेचे तर कधी विरहाचे.......अशी ही आयुष्यातल्या छोट्या छोट्या प्रसंगांनी सजलेली रंगपंचमी आपल्या आयुष्यात कधी आपल्याला हसवते...कधी रडवते...खिन्नता आणते...विचार करायला लावते... विचारहीन बनवते... कधी अपराधी बनवते...हतबल बनवते... संयमी बनवते.... अचानक गप्प बसवते...आणि या विविध मानवी भावनांच्या कल्लोळात अचानक एकटं पाडते.... पुढच्याच क्षणी आपल्या एखादया दडवून ठेवलेल्या आठवणींचं रान मोकळं करते, अन् मग सुरु होतो पुन्हा एक लढा.... भूतकाळ आणि वर्तमानात दोलायमान झालेल्या मनाचा.... आणि पुन्हा त्या मनाला सावरण्याचा....!!! मात्र या सगळ्यातून एक मानवी मन किती अन् काय काय शिकतं, जे आयुष्यभराची शिदोरी म्हणून कायम रहातं........ एक माणूस म्हणून घडताना......!!!!

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/02/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९६४ - कॉन्स्टन्टाईन दुसरा ग्रीसच्या राजेपदी. १९७५ - अल्जियर्सचा तह - ईराण व इराकने सीमाप्रश्नी संधी केली. 💥 जन्म :- १९५७ - अशोक पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १८९९ - व्हिक्टोरिया कैउलानी, हवाईची राजकुमारी. १९३२ - जॉन फिलिप सूसा, अमेरिकन संगीतकार. १९५० - आल्बेर लेब्रन, फ्रांसचा फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष. १९५४ - पॉल, ग्रीसचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= ह्या बातमीपत्राची audio खालील लिंकवर ऐकता येईल. https://goo.gl/8jnrr8 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडें यांच्याविरुद्ध विरोधी पक्ष आणणार अविश्वास ठराव.* ----------------------------------------------------- 2⃣ *नांदेड : पॅथॉलॉजिस्ट विना सुरु असलेल्या नांदेड शहरातील 22 पॅथॉलॉजींचे परवाने मनपा आयुक्तांकडून निलंबित* ----------------------------------------------------- 3⃣ *अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन अध्यक्षपदी डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड केली आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे बारावी पेपर तपासणी बहिष्कार आंदोलन मागे* ----------------------------------------------------- 5⃣ *'द शेप ऑफ वॉटर' ठरला ऑस्कर 2018 यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट* ----------------------------------------------------- 6⃣ *मॉस्को येथे सुरु असलेली ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०१८ भारताचा माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने जिंकली.* ----------------------------------------------------- 7⃣ *मेक्सिको येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनू भाकेर हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टर प्रकारात पटकावले सुवर्णपदक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्त्री जन्माचे स्वागत करू या* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= लोणावळा हे, भारतातील राज्य महाराष्ट्रातील, पुणेजिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे. लोणावळा पुण्यापासून ६४ किमी तसेच मुंबई पासून ९६ किमी अंतरावर आहे. तेथील चिक्की हा एक सुप्रसिद्ध चवीने गोड असलेला पदार्थ आहे आणि हे मुंबई व पुण्यामधील एक महत्वाचे स्टेशन आहे. पुण्यामधील उपनगरीय क्षेत्रामधून येथे येण्यासाठी लोकल रेल्वेगाड्या असतात. तसेच मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो. तसेच लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजी चे मुख्यालय आहे. मुंबई-पुणे महामार्गावर ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्‍या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळयात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते. लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजमाचीपॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर ही त्यापैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"उद्योगी मनुष्य जीवनात यशस्वी होतो व त्याची भरभराट होते."* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) जालियनवाला बाग हत्याकांड कुणी घडविले ?* जनरल डायर *02) पोलाद तयार करताना कशाचा वापर होतो ?* मँगनीज *03) वन डे वंडर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?* कपिल देव *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुरेश बावनकुळे, सहशिक्षक, माहूर 👤 श्रीकांत संतोष येवतीकर 👤 दत्ताहरी शिवलिंग दुड्डे, चिकना *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *बुडबुडे* कितीही छान दिसो बुडबुडा फुटत असतो एकदा बुडबुडा फुटला की पुन्हा जुटत नसतो उगीच कोणी असे भ्रमात रहायला नको नको ते स्वप्न पाहून स्वप्नभंग व्हायला नको शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एकदा एक गृहस्थ आपली कैफियत घेऊन संत एकनाथांकडे गेला व म्हणाला...मला कसं जगावं हे समजत नाही, गोंधळल्यासारखं होतं. आपण त्याविषयी काही सांगावं. एकनाथ शांतपणे म्हणाले- "अरे तू तर थोड्या दिवसांचा सोबती आहेस. आठ दिवसांत तुझा मृत्यू होणार आहे. तू परोपकाराची कृत्य कर. जमलं तर दानधर्मही कर. म्हणजे लोक तुला दुवा ही देतील. जेवढं चांगलं करता येईल तेवढं कर, तुझं आनंदी आयुष्य तुला परत मिळेल.* *त्याप्रमाणे तो सारं करत राहिला. त्यात तो पूर्णपणे मग्न होऊन गेला. हळूहळू आठ दिवस संपले. आठव्या दिवशी तो झोपेतून जागा झाला, आपण जिवंत आहोत हे त्याच्या लक्षात आले. तो एकनाथांना म्हणाला..मी आठ दिवसांनीसुद्धा जिवंत आहे, हे कसे काय? संत एकनाथ म्हणाले-* *"त्यालाच तर आयुष्य म्हणतात. आठ दिवसांतील तुझे वर्तन-क्रिया आठवून बघ, म्हणजे आयुष्याचा अर्थ कळेल."* ⛳ *॥ रामकृष्णहरी ॥* ⛳ 🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻 *संजय नलावडे, चांदिवली,मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काही लोकांचे म्हणणे असे आहे की, रंगमंचावरील कलाकार हे सगळ्यात आनंदी आणि सुखी असतात. पण माझे म्हणणे असे आहे की,सगळेच आनंदी आणि सुखी असतीलच असे नाही. कारण कलाकार हा आपल्या जीवनातल्या दु:खाला प्रेक्षकांसमोर किंवा जगासमोर कधीच येऊ देत नाही.तो फक्त लोकांच्या जीवनात असलेले दु:ख आपल्या कलेच्या माध्यमातून दूर करणे एवढेच काम करतो. तो आपल्या कलेच्या सहाय्याने निखळ मनोरंजन करणे व त्यांना आनंदी ठेवणे एवढेच माहीत असल्यामुळे आपल्या जीवनातले दु:खरे दु:ख मांडत बसलो तर प्रेक्षक म्हणतील घरी ते दारी काही जीवनात फरक आहे का ? कलाकार हा काही काळापुरता का होईना तो प्रेक्षकांच्या समोर असतो तेव्हा त्याचे सारे दु:ख विसरतो आणि रममाण होतो. म्हणून मला इथे म्हणायचे आपले दु:ख इतरांसमोर मांडून दु:खी न करता इतरांना कसे सुखात आणि आनंदात कसे पाहता येईल याचा विचार आपण सदैव करायला हवा, ज्यातून आपल्यालाही काही काळ सा-यांच्या सहवासात आपले असलेले दु:ख विसरून आनंदात घालवता येईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *बळी तो कान पिळी* - बलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *दूरदृष्टी* एका डोंगरमाथ्यावर एक शेतकरी राहात होता. कडाक्याची थंडी पडली होती. बरेच दिवस तो शेतकरी बाहेर पडला नव्हता. झोपडीत होते तेवढे धान्य संपले. उपासमार होऊ नये म्हणून त्याने आपल्या एकेक मेंढीला कापून खाल्ले. मेंढया संपल्यानंतर बैल मारले. हे त्याचे कुत्रा रोज पहात होता. त्याने मनाशी विचार केला. 'माणूस किती कृतघ्न असतो? स्वत:चे प्राण वाचविण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन पोहोचतो, धान्य संपले, मग मेंढया, मेंढया संपल्यावर बैल, कदाचित बैल संपल्यावर हा आपल्यालाही मारून खाईल, त्यापेक्षा आपण इथून पळून जाणेच चांगले' असा विचार करून कुत्रा तेथून पळून गेला. तात्पर्य 'अडचणीत सापडलेला मनूष्य स्वत:ची सुटका करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन पोहोचतो. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*सात कोड्यांना आई ने आपल्या मुलांना दिलेली उत्तरे* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *या जगात सगळ्यात टोकदार वस्तू कोणती..??* *मुले म्हणाली ,तलवार...* *आईने सांगितले.. जीभ..* *कारण या जिभेमुळे माणूस सहजपणे दुसर्याचा अपमान करतो, दुसर्याला दुखावतो, दुसर्याच्या भावनांना धक्का पोचवतो.* 💝💝 *या जगात आपल्यापासून सगळ्यात दूर काय आहे..??* *एकजण म्हणाला, सूर्य, चंद्र, आकाशगंगा...* *आई म्हणाली...भूतकाळ.* *माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो भूतकाळात जाऊ शकत नाही.त्यामुळे आपण आजच्या दिवसाचा आणि आपल्या आयुष्यात येणार्या पुढील सगळ्या दिवसांचा चांगला उपयोग केला पाहिजे.* 💝💝 *या जगातील सगळयात मोठी गोष्ट कोणती..???* *दुसर्याने सांगितले की, पृथ्वी, पर्वत, सूर्य.* *आई म्हणाली, जगातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे..हाव.* *लोक दुःखी होतात त्यामागील कारण त्यांच्या मनातील न संपणारी हाव. ही हाव पूर्ण करण्यासाठी त्यांची कुठल्याही थराला जाण्याची तयारी असते. त्यामुळे हाव करताना काळजी घ्या.* 💝💝 *पृथ्वीवर सगळ्यात वजनदार वस्तू कोणती...???* *तिसर्या ने उत्तर दिलं... पोलाद, लोखंड, हत्ती.* *आई म्हणाली, सगळ्यात कठिण वस्तू... वचन.* *वचन देणे सोपे असते पण ते पाळणे कठिण.* 💝💝 *पृथ्वीवरील सगळ्यात हलकी वस्तू कोणती..??* *चौथा म्हणाला .. कापूस, हवा, धूळ, पाने.* *आई म्हणाली, सगळीकडे मी आणि मीपणा हलका असतो.* *पैसा, पद आणि प्रतिष्ठेच्या मागे धावणार्यांकडे पहा. काही जणांनाच हा मीपणा सोडता येतो.* 💝💝 *पृथ्वीवरील माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट कोणती..???* *पाचव्याने सांगितले, आई, वडिल, मित्र, नातेवाईक.* *आई म्हणाली, माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे 'मृत्यू'.* *कारण कुठल्याही सेकंदाला मृत्यू येण्याची शक्यता असते.* 💝💝 *शेवटचा प्रश्न..* *या जगात करता येण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती...??* *मुले म्हणाली खाणे, झोपणे, फिरायला जाणे.* *आईने नम्रतेने सांगितले सगळ्यात सोपी गोष्ट आहे, आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांना देणे. संकलित *

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 05/02/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १०४६ - पर्शियन कवी व प्रवासी नसीर खुश्रोने आपल्या सात वर्षांच्या मध्य-पूर्वेच्या भ्रमंतीची सुरुवात केल. या प्रवासाचे वर्णन त्याने सफरनामा या आपल्या पुस्तकात करून ठेवलेले आहे. २००१ - मक्केत हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरुन मृत्यू. 💥 जन्म :- १९४२ - फेलिपे गॉन्झालेझ, स्पेनचा पंतप्रधान. १९५९ - वाझ्गेन सर्ग्स्यान, आर्मेनियाचा पंतप्रधान. 💥 मृत्यू :-  १५३९ - नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मेघालयचे पुढचे मुख्यमंत्री असणार कोनराड संगमा, नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद नाही- हिमंत बिस्वा, भाजपा* ----------------------------------------------------- 2⃣ *पुणे : बीड येथील गटसाधन केंद्रात दहावी व बारावीच्या परीक्षेतील १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या आहेत, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही असे राज्य मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी स्पष्ट केले आहे.* ----------------------------------------------------- 3⃣ *त्रिपुरा तसेच नागालँडमधील विजयानंतर  कर्नाटकमध्ये भाजपाच बाजी मारणार- अमित शहा* ----------------------------------------------------- 4⃣ *उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भात गारांचा पाऊस पडणार, हवामान विभागाचा इशारा* ----------------------------------------------------- 5⃣ *विविध कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात व भारावलेल्या वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली.* ----------------------------------------------------- 6⃣ *आयपीएल : दिनेश कार्तिकची कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार म्हणून निवड.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारताकडे स्नूकरचे पहिले विश्वविजेतेपद, पाकिस्तानवर दणदणीत विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मतदार जागृती आवश्यक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_11.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========     🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *अलिबाग* अलिबाग (इंग्रजी - Alibaug) हे रायगड जिल्ह्याचे शासकीय मुख्यालय आहे. अलिबाग शहर समुद्रकिनार्‍याला लागून आहे. हे शहर महाराष्ट्रातील कोकण विभागात येते.अलिबाग हे शहर सतराव्या शतकात मराठा साम्राज्याचेसेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसवले. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा होते. आताचा रामनाथ परिसर हे तेव्हाचे मुख्य गाव होते. रेवदंडा, चौल, नागाव, अक्षी, वरसोली, थळ, किहीम आणि आवास ही गावे त्या वेळी अष्टागरे म्हणून ओळखली जात. त्या काळात येथे बर्‍याच लढाया झाल्या. १७२२ मध्ये इंग्रज व पोर्तुगीज यांनी कुलाब्यावर एकत्रित हल्ला केला होता, पण ते ती लढाई हरले होते. १८५२ मध्ये अलिबागला तालुक्याचे ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"उच्चारावरून विद्वता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते."* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) महाराष्ट्रात खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे ?* लोणार जि. बुलढाणा *02) सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती ?* चार *03) फिरोजशहा कोटला मैदान कोठे आहे ?* नवी दिल्ली *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 माणिक आहेर, सहशिक्षक, नाशिक 👤 गंगाधर मदनूरकर, सहशिक्षक 👤 बाळू भगत 👤 अशोक कहाळेकर 👤 गं.बा. नुकूलवार, सहशिक्षक, देगलूर 👤बालाजी तिप्रेसवार, उमरी 👤 रमेश मेरलवार, करखेली 👤 समाधान शिंदे, कवी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *समर्पण* महत्त्व असेतच त्याग अन् समर्पणाला कोणाचे काय समर्पण माहित असते मनाला समर्पणा शिवाय कोणत काम होत नाही समर्पण नसेल तर त्यात राम रहात नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस जाणतो की तो स्वार्थधुंदीत असत्याचा प्रयोग करीत आहे; पण सुखकर जगण्याच्या नादात त्याला अंतर्मनाविरूद्ध व्यवहार करावे लागतात. म्हणूनच आजही आपण पहातोच की जो 'नंबर दोन'चे धंदे करतो त्याच्याकडे संपत्ती-सुखे नांदताना दिसतात. आणि जो सत्य घेऊन बसला तो जागोजागी निराश, हताश होत दु:ख भोगताना दिसतो. कालपरवापर्यंत सामान्य जीवन जगणारा माणूस राजकारणात सत्तापदी पोहचताच पाहता-पाहता तो संपत्तीच्या राशीवर लोळताना दिसतो. मग 'सत्यमेव जयते'चे काय? सत्याचाच विजय होतो हे माणूस जाणत असूनही तो असत्याचा कैवारी का होतो? का होतोच नव्हे, तर होत आला, होत आहे आणि होत राहील.* *माणूस असा का वागतो? चोरी, भ्रष्टाचार ही पापकृत्य माहित असूनही तो का अंगीकारतो? त्याचे बाह्यमन अंतर्मनापासून अंतर ठेवून वागत असते तेव्हा ते बेडर आणि बेपर्वा झालेले असते. तेव्हा माणूस अपकृत्यात यशस्वी होणे ही अक्कलहुशारी समजून असत्याच्या नरकातील राज्यपद भोगत जातो. पण एक क्षण केव्हातरी त्याच्या जीवनात असा येतो की तो आपली असत्य कार्ये आपल्या अंतर्मनाजवळ मान्य करतो. कबुलीजबाब देतो. पश्चातापदग्ध होतो. परंतु काही लोक मरेपर्यंत अंतर्मनाशी संवाद करू शकत नाहीत. अशांना त्यांच्या पापकृत्यांची तमा नसेल तर त्यांचे अंतर्मनही मुक्ती मिळू देत नाही. कारण मुक्तीचा मार्ग हा अंतर्मनातून जातो.* ••●☀‼ *रामकृष्णहरी* ‼☀●•• ☀☀☀☀☀☀ *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षणामुळे केवळ माणूस शहाणा होत नाही तर त्याच्यामध्ये असणारा अज्ञानपणा,अयोग्य दिशेने जाणारे पाऊल,आपल्यात असलेला कमीपणा दूर करण्याचा मार्ग आणि जीवनात कसे जगायचे याचे शास्त्रशुध्द ज्ञान शिक्षणामुळे मिळते.तसेच सुखी व समृद्ध जीवन म्हणजे काय याबद्दलचीही जाणीव शिक्षणामुळे मिळते.म्हणून शिक्षणाचा खरा मार्ग आपल्या जीवनासाठी आपल्या प्रगतीचे केंद्र मानून स्वीकारणे काळाची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रयत्नांती परमेश्वर* - कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांती साध्य होते. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *गर्विष्ठ मेणबत्ती* एकदा एका गृहस्थाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलाविले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठया मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते, ते पाहून मेणबत्तीला स्वत:चा अभिमान वाटला, आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली, "ज्या वेळी व ज्या ठिकाणी सूर्यचंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही. त्या वेळी व त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो, चंद्रसूर्यही माझ्यापुढेही क्षुद्र वाटतात.' तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली. त्यातला एक जण उठला. त्याने खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली व मेणबत्ती विझली. नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटविली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, 'अगं वेडे आता तरी प्रकाश दे, एवढयाशा झुळकेने विझतेस, चंद्रसूर्याला क्षुद्र समजतेस त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची मिजास करतेस. चंद्रसूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झुळकेने विझून गेले आहेत का?' तात्पर्य : आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/03/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९७३ - भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट. 💥 जन्म :- १४५५ - जॉन दुसरा, पोर्तुगालचा राजा. १८३९ - जमशेटजी टाटा, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :-  १७०७ - औरंगझेब, मोगल सम्राट. २००० - रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी बोगस; केंद्रीय मनुष्य विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचा गौप्यस्फोट* ----------------------------------------------------- 2⃣ *कीर्ती चिदंबरमची मॅरेथॉन चौकशी, सीबीआयने पुरावे दाखवत मागितले स्पष्टीकरण * ----------------------------------------------------- 3⃣ *डार्विनचा सिद्धांत हा अपूर्ण म्हणू शकतो पण चुकीचा मानता येणार नाही, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर* ----------------------------------------------------- 4⃣ *वॉशिंग्टन- अमेरिकेतल्या सेंट्रल मिशिगन युनिव्हर्सिटीत झालेल्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू- एएफपी.* ----------------------------------------------------- 5⃣ *नांदेड : शहरात होळी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. यावेळी शिख बांधवांनी प्रतिकात्मक हल्लाबोल मिरवणूक काढली. सचखंड गुरूद्वारा याठिकाणी "अरदास" करुन या मिरवणूकीला सुरूवात झाली.* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : प्रसिद्ध उद्योजक गणपतराव बळीराम मोरगे यांचे मुंबई येथील लीलावती रुग्णालयात अल्पशा आजाराने झाले निधन, आज त्यांच्या मूळ गावी होणार अंत्यविधी* ----------------------------------------------------- 7⃣ *कराची : बीसीसीआयने या वर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानात होणाऱ्या आशिया इमर्जिंग नेशन कपसाठी संघ पाठवण्यास दिला नकार. * ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कॉपी म्हणजे एक कलंक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= रंजना देशमुख (जन्मतारीख अज्ञात, इ.स. १९५५ - मार्च ३, इ.स. २०००; मुंबई,  महाराष्ट्र ) ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री होती. इ.स. १९७०-१९८० च्या दशकांत अनेक मराठी चित्रपटांत तिने अभिनय केला. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संध्या ही रंजना हिची आत्या होय. आपल्या आत्येप्रमाणेच रंजना हिने व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून इ.स. १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली. अरे संसार संसार या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजनेला राज्यसरकारचा इ.स. १९८० सालचा 'उत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार मिळाला. इ.स. १९८३ साली हाच पुरस्कार तिला गुपचुप गुपचुप या चित्रपटासाठी मिळाला. सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा, चानी हे तिचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कीर्तीची अतिरेकी अभिलाषा माणसाला विवेकशून्य बनविते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) नोटा व पोस्टाची तिकीटे छापण्याचा कारखाना कोठे आहे ?* नाशिक *02) राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ?* उपराष्ट्रपती *03) लोकहितवादी या टोपणनावाने प्रसिद्ध व्यक्ती कोणती ?* गोपाळ हरी देशमुख *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 रुबिना शेख, सहशिक्षिका, पुणे 👤 दादाराव कदम, सहशिक्षक, धर्माबाद 👤 एकनाथ पाटील 👤 परमेश्वर वाघमारे, चिरली 👤 कैलास माधवराव गंगुलवार 👤 जयश्री उमरीकर, वसमत 👤 गोविंद चव्हाण 👤 सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद 👤 सुरेश कटकमवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *वाटोळ* इथे कुंपणच शेत खात आहे म्हणून व्यवस्थेच वाटोळ होत आहे कुंपण शेत खायला लागले नको ते प्रकार व्हायला लागले शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जन्माला येणारा नवजीव या सृष्टीतील पहिला अनुभव घेतो तो 'मातृस्पर्शाचा.' या स्पर्शातून दृढ होत जातं नातं एकमेकातलं आणि जोपासली जाते मातृत्वाची जाणीव... आजन्म कृतज्ञतेने..! पुढे त्याला वेगवेगळ्या स्पर्शांची ओळख होत जाते. विविधांगी स्पर्श देत जातात उभारी त्याच्या जीवनाला. कधी बंध गुंफला जातो माणसा माणसांशी ! जोडला जातो तो नवचैतन्यानं पशु-पक्षी, झाडं-फुलं या नैसर्गिक तत्वांशी ! वात्सल्याचे स्पर्श आजही मोरपीस फिरवतात मनावर, बाळाच्या जावळांचे स्पर्श आजन्म पिच्छा पुरवतात.. लक्षात राहतात असे स्पर्श..!* *पण काही डंख मारणारे, नकोसे असलेले रस्त्यांवरचे स्पर्श थरकाप उडवतात. कधी कधी स्पर्श होतात विचारांचे, स्वातंत्र्याचे, अभासी जगातून वास्तवतेचा स्पर्श देणारे. देऊन जातात भान कळत-नकळत मानवतेचे..! खुणावतात स्पर्श अवकाशात उंच भरारी घेण्याचे. असे स्पर्श हवेच असतात प्रत्येकाला... कुठल्याही गंधानं लिप्त नसणारे, फक्त अनुभूतीनं गोडी वाढवणारे नि संजीवनी ठरणारे...मानवी स्पर्श !!* *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*  📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षणामुळे केवळ माणूस शहाणा होत नाही तर त्याच्यामध्ये असणारा अज्ञानपणा, अयोग्य दिशेने जाणारे पाऊल, आपल्यात असलेला कमीपणा दूर करण्याचा मार्ग आणि जीवनात कसे जगायचे याचे शास्त्रशुध्द ज्ञान शिक्षणामुळे मिळते. तसेच सुखी व समृद्ध जीवन म्हणजे काय याबद्दलचीही जाणीव शिक्षणामुळे मिळते.म्हणून शिक्षणाचा खरा मार्ग आपल्या जीवनासाठी आपल्या प्रगतीचे केंद्र मानून स्वीकारणे काळाची गरज आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..9421839590/8087917063. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *पुढच्यास ठेच, मागचा शहाणा* - दुसर्‍याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= बिल गेट्स पेक्षा श्रीमंत कोण आहे. कुणीतरी बिल गेट्सना विचारलं, की तुमच्या पेक्षा श्रीमंत कुणी आहे का? ते म्हणाले, हो एकच आहे. बर्याच वर्षांपूर्वी माझी नोकरी गेली होती आणि त्यानंतर मी न्यूयॉर्क विमानतळावर गेलो. मी तेथे वृत्तपत्रांचे शीर्षक वाचले. मला त्यापैकी एक आवडले आणि मला ते विकत घ्यायचे होते. पण माझ्याकडे सुटे पैसे नव्हते. मी सोडून दिले, अचानक, एक सावळा मुलगा मला बोलावून म्हणाला, "आपल्यासाठी हे घ्या वृत्तपत्र." मी म्हणालो, पण माझ्याकडे सुटे पैसे नाहीत. तो म्हणाला, "काही हरकत नाही, मी तुला हे मोफत देतो आहे" योगायोगाने ३ महिन्यांनंतर मी पुन्हा तिथे गेलो. ती गोष्ट पुन्हा अगदी तशीच घडली आणि त्याच मुलाने पुन्हा एकदा मला आणखी एक वृत्तपत्र मोफत दिले. मी म्हणालो, मी स्वीकारू शकत नाही. परंतु तो म्हणाला, "मी हे तुला माझ्या नफ्यातून देतोय" १९ वर्षांनंतर जेंव्हा मी श्रीमंत झालो तेंव्हा मी त्या मुलाला शोधण्याचा निर्णय घेतला. सुमारे दीड महिन्यानंतर मी त्याला शोधले. मी त्याला विचारले, तू मला ओळखलेस? तो म्हणाला, "होय, आपण प्रसिद्ध बिल गेट्स आहात." मी म्हणालो, तु खूप वर्षांपूर्वी मला दोनदा मोफत वृत्तपत्र दिले होतेस. आता मला ते भरुन काढायचे आहे. मी तुला जे पाहिजे ते सर्व देईन. सावळा तरुण माणूस म्हणाला, "आपण ते भरपाई करू शकत नाही!" मी म्हणालो, का? तो म्हणाला, "मी तुम्हाला स्वतः गरीब असताना जे दिले, ते तूम्ही स्वतः श्रीमंत झाल्यावर मला कसे परत देऊ शकता?" बिल गेट्स म्हणाले, मला वाटते की तो सावळा तरुण माझ्यापेक्षा श्रीमंत आहे. आपल्याला दान करण्यासाठी श्रीमंत असण्याची किंवा श्रीमंत होण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आपल्यात दानत्व असायला हव. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*"उड़ा भी दो सारी रंजिशें इन हवाओं में* *यारो"* *"छोटी सी जिंदगी है नफ़रत कब* *तक करोगे"* *"घमंड न करना जिन्दगी मे तकदीर बदलती* *रहती है"* *"शीशा वही रहता है बस तस्वीर* *बदलती रहती है"* *रंगोका त्योहार आपकी जिंदगी में हमेशा रंगों की बरसात करता रहे* *होळी की ढेर सारी मुबारक* 🌹