✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/03/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९२ - भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे. आर. डी. टाटा यांना भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १९९८ - सी-डॅक ने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला. 💥 जन्म :- १८९२ - कार्नेली हेमन्स, फ्रेंच-बेल्जियन शरीरशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेता. १९१० - इंग्रीड, डेन्मार्कची राणी. 💥 मृत्यू :-  १९९२ - आचार्य आनंद ऋषीजी, स्थानकवासी जैन धर्मगुरू. १९९७ - श्रीमती पुपुल जयकर, सामाजिक कार्यकर्ता, भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या २००० - शांताराम द्वारकानाथ देशमुख उर्फ राम द्वारकानाथ देशमुख, नामवंत अर्थतज्ञ आणि लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये 12 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम,व्हीव्हीपॅटचा वापर करणार - निवडणूक आयोग* ----------------------------------------------------- 2⃣ *अॅट्रॉसिटीच्या निर्णयातील बदलांविरोधात केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात जाणार* ----------------------------------------------------- 3⃣ *रायगडमधील भिरा येथे उच्चांकी तापमानाची नोंद. भिराचं तापमान 45 अंश सेल्सिअस.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - बँकांना फक्त दोन दिवस सुट्टी, नवीन परिपत्रकानुसार फक्त गुरुवार आणि शुक्रवारी बँकांना सुट्टी* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई - मुंबईतील कमाल तापमानात घट, उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा* ----------------------------------------------------- 6⃣ *औरंगाबाद - पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ गंगाधर विठोबाजी पाणतावणे यांचे आज दुःखद निधन* ----------------------------------------------------- 7⃣ *स्मिथच्या प्रकरणामुळे राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी : एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी 2 लाख भाविक दाखल.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जुनी पेंशन योजना* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/10/blog-post_21.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. गंगाधर पानतावणे* गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचा जन्म 28 जून 1937 रोजी नागपुरात झाला. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नागपुरातच झालं. 1956 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी बी ए आणि एमएची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी तत्कालिन मराठवाडा विद्यापीठातून पीएचडीही प्राप्त केली. महत्त्वाचं म्हणजे त्याच विद्यापीठात म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम पाहिलं. खरं तर पानतावणे यांनी मॅट्रिकनंतर लिखानाला सुरुवात केली होती. दलित साहित्य हा त्यांचा जवळचा विषय होता. यामध्ये त्यांचा भरपूर अभ्यास होता, त्यामुळेच त्यांनी विपुल लेखन केलं. त्यांनी लिहिलेले `धम्मचर्चा` `मूल्यवेध` , मूकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, प्रकृती आणि प्रवृत्ती,  शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे. अस्मितादर्श नावाचे नियतकालिक देखील त्यांनी चालविले. गंगाधर पानतावणे यांनी 2009 मध्ये अमेरिकेत झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *आपले।दैनंदिन कर्तव्य रोजच्या रोज आणि वेळेवर पूर्ण करा त्यामुळे कामात सुसूत्रता येते.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  मन:स्ताप हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?* 👉      विसर्ग संधी *२)  लोकसभा सभापतीची निवड कोण करते?* 👉      लोकसभा सदस्य *३)    सजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचा जनक कोण?* 👉     कार्ल लिनिअस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 जयश्री पाटील, वसमत सहशिक्षिका तथा लेखिका 👤 स्वानंद बेदरकर, नाशिक 👤 प्रल्हाद धडे 👤दीपक कैवारे 👤 रमेश राजफोडे 👤विपुल पाटील जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *मन* आपण जसे असतो तसे प्रत्येकजण असत नाही कोणाच्या मनात काय आहे कोणालाच दिसत नाही कोणाच्या मनाचा कोणाला ठाव घेता येत नसतो अनुभवल्या शिवाय कोणाला भाव देता येत नसतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.* *ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर फिरणा-या चक्राच्या मध्यभागी........* *जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !* *एक कवी लिहून जातो.....* *......सदियाॅ बित गयी टूटी* *हुई डोर को थामे* *शायद कोई वजह मिल* *जाए जिने की....!* ‼ *॥ रामकृष्णहरी ॥* ‼ 🔶🔶🔶🔶🔶🔶 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= शेतकरी शेतात बियाणे टाकून येणा-या किंवा उगवणा-या धान्याची वाट पाहणे हे सत्य आशा आहे. कारण त्याला त्याच्या केलेल्या कामावर, मेहनतीवर विश्वास आहे. तो कधीही राशीचक्रावरील राशीनुसार लिहिलेल्या भाकितावर विश्वास ठेवत नाही किंवा त्यानुसार चालतही नाही. जे राशीनुसार चालतात ते मात्र त्यावर विसंबून राहून आपल्याच जीवनात चांगल्याप्रकारे चाललेल्या संसारगाड्याला खीळ बसवतात. त्यामुळे व्हायची ती प्रगती होत नाही आणि करता येत नाही. म्हणून माणसाने कोणत्याही भाकितावर विश्वास न ठेवता आपण आपले काम प्रामाणिकपणे आणि सातत्याने जीव ओतून केले तर नक्कीच जीवनात यश मिळते तसेच जीवन सुखी व समृद्ध होते यात संशय नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *पाच ही बोटे सारखे नसतात* - सर्व माणसे सारख्या स्वभावाची नसतात. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आयुष्याची दिशा* भूदान चळवळीच्‍या काळातील ही गोष्‍ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्‍यांची पदयात्रा सुरु होती. आपल्‍या काही शिष्‍यांसह विनोबाजी मीराजींच्‍या आश्रमात थांबले होते. अल्‍पशा विश्रांतीनंतर त्‍यांची पदयात्रा पुन्‍हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्‍हती. त्‍यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्‍यामुळे त्‍यांना खुर्चीत बसवून नेण्‍यात येत होते. मध्‍ये मध्‍ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्‍हा एक शिष्‍य त्‍यांच्‍याजवळ येऊन म्‍हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्‍हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्‍ही काय करत होता असे त्‍या व्‍यक्तीने विचारले. विनोबाजी म्‍हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्‍ट आली. जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध एखादी गोष्‍ट आली जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध गोष्‍ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्‍हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्‍यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.'' *तात्‍पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्‍याला योग्‍य दिशा देते.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment