✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/03/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९७३ - भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट. 💥 जन्म :- १४५५ - जॉन दुसरा, पोर्तुगालचा राजा. १८३९ - जमशेटजी टाटा, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :-  १७०७ - औरंगझेब, मोगल सम्राट. २००० - रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी बोगस; केंद्रीय मनुष्य विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांचा गौप्यस्फोट* ----------------------------------------------------- 2⃣ *कीर्ती चिदंबरमची मॅरेथॉन चौकशी, सीबीआयने पुरावे दाखवत मागितले स्पष्टीकरण * ----------------------------------------------------- 3⃣ *डार्विनचा सिद्धांत हा अपूर्ण म्हणू शकतो पण चुकीचा मानता येणार नाही, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर* ----------------------------------------------------- 4⃣ *वॉशिंग्टन- अमेरिकेतल्या सेंट्रल मिशिगन युनिव्हर्सिटीत झालेल्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू- एएफपी.* ----------------------------------------------------- 5⃣ *नांदेड : शहरात होळी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. यावेळी शिख बांधवांनी प्रतिकात्मक हल्लाबोल मिरवणूक काढली. सचखंड गुरूद्वारा याठिकाणी "अरदास" करुन या मिरवणूकीला सुरूवात झाली.* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : प्रसिद्ध उद्योजक गणपतराव बळीराम मोरगे यांचे मुंबई येथील लीलावती रुग्णालयात अल्पशा आजाराने झाले निधन, आज त्यांच्या मूळ गावी होणार अंत्यविधी* ----------------------------------------------------- 7⃣ *कराची : बीसीसीआयने या वर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानात होणाऱ्या आशिया इमर्जिंग नेशन कपसाठी संघ पाठवण्यास दिला नकार. * ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कॉपी म्हणजे एक कलंक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= रंजना देशमुख (जन्मतारीख अज्ञात, इ.स. १९५५ - मार्च ३, इ.स. २०००; मुंबई,  महाराष्ट्र ) ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री होती. इ.स. १९७०-१९८० च्या दशकांत अनेक मराठी चित्रपटांत तिने अभिनय केला. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संध्या ही रंजना हिची आत्या होय. आपल्या आत्येप्रमाणेच रंजना हिने व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून इ.स. १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली. अरे संसार संसार या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजनेला राज्यसरकारचा इ.स. १९८० सालचा 'उत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार मिळाला. इ.स. १९८३ साली हाच पुरस्कार तिला गुपचुप गुपचुप या चित्रपटासाठी मिळाला. सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा, चानी हे तिचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कीर्तीची अतिरेकी अभिलाषा माणसाला विवेकशून्य बनविते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *01) नोटा व पोस्टाची तिकीटे छापण्याचा कारखाना कोठे आहे ?* नाशिक *02) राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ?* उपराष्ट्रपती *03) लोकहितवादी या टोपणनावाने प्रसिद्ध व्यक्ती कोणती ?* गोपाळ हरी देशमुख *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 रुबिना शेख, सहशिक्षिका, पुणे 👤 दादाराव कदम, सहशिक्षक, धर्माबाद 👤 एकनाथ पाटील 👤 परमेश्वर वाघमारे, चिरली 👤 कैलास माधवराव गंगुलवार 👤 जयश्री उमरीकर, वसमत 👤 गोविंद चव्हाण 👤 सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद 👤 सुरेश कटकमवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *वाटोळ* इथे कुंपणच शेत खात आहे म्हणून व्यवस्थेच वाटोळ होत आहे कुंपण शेत खायला लागले नको ते प्रकार व्हायला लागले शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जन्माला येणारा नवजीव या सृष्टीतील पहिला अनुभव घेतो तो 'मातृस्पर्शाचा.' या स्पर्शातून दृढ होत जातं नातं एकमेकातलं आणि जोपासली जाते मातृत्वाची जाणीव... आजन्म कृतज्ञतेने..! पुढे त्याला वेगवेगळ्या स्पर्शांची ओळख होत जाते. विविधांगी स्पर्श देत जातात उभारी त्याच्या जीवनाला. कधी बंध गुंफला जातो माणसा माणसांशी ! जोडला जातो तो नवचैतन्यानं पशु-पक्षी, झाडं-फुलं या नैसर्गिक तत्वांशी ! वात्सल्याचे स्पर्श आजही मोरपीस फिरवतात मनावर, बाळाच्या जावळांचे स्पर्श आजन्म पिच्छा पुरवतात.. लक्षात राहतात असे स्पर्श..!* *पण काही डंख मारणारे, नकोसे असलेले रस्त्यांवरचे स्पर्श थरकाप उडवतात. कधी कधी स्पर्श होतात विचारांचे, स्वातंत्र्याचे, अभासी जगातून वास्तवतेचा स्पर्श देणारे. देऊन जातात भान कळत-नकळत मानवतेचे..! खुणावतात स्पर्श अवकाशात उंच भरारी घेण्याचे. असे स्पर्श हवेच असतात प्रत्येकाला... कुठल्याही गंधानं लिप्त नसणारे, फक्त अनुभूतीनं गोडी वाढवणारे नि संजीवनी ठरणारे...मानवी स्पर्श !!* *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*  📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षणामुळे केवळ माणूस शहाणा होत नाही तर त्याच्यामध्ये असणारा अज्ञानपणा, अयोग्य दिशेने जाणारे पाऊल, आपल्यात असलेला कमीपणा दूर करण्याचा मार्ग आणि जीवनात कसे जगायचे याचे शास्त्रशुध्द ज्ञान शिक्षणामुळे मिळते. तसेच सुखी व समृद्ध जीवन म्हणजे काय याबद्दलचीही जाणीव शिक्षणामुळे मिळते.म्हणून शिक्षणाचा खरा मार्ग आपल्या जीवनासाठी आपल्या प्रगतीचे केंद्र मानून स्वीकारणे काळाची गरज आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..9421839590/8087917063. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *पुढच्यास ठेच, मागचा शहाणा* - दुसर्‍याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= बिल गेट्स पेक्षा श्रीमंत कोण आहे. कुणीतरी बिल गेट्सना विचारलं, की तुमच्या पेक्षा श्रीमंत कुणी आहे का? ते म्हणाले, हो एकच आहे. बर्याच वर्षांपूर्वी माझी नोकरी गेली होती आणि त्यानंतर मी न्यूयॉर्क विमानतळावर गेलो. मी तेथे वृत्तपत्रांचे शीर्षक वाचले. मला त्यापैकी एक आवडले आणि मला ते विकत घ्यायचे होते. पण माझ्याकडे सुटे पैसे नव्हते. मी सोडून दिले, अचानक, एक सावळा मुलगा मला बोलावून म्हणाला, "आपल्यासाठी हे घ्या वृत्तपत्र." मी म्हणालो, पण माझ्याकडे सुटे पैसे नाहीत. तो म्हणाला, "काही हरकत नाही, मी तुला हे मोफत देतो आहे" योगायोगाने ३ महिन्यांनंतर मी पुन्हा तिथे गेलो. ती गोष्ट पुन्हा अगदी तशीच घडली आणि त्याच मुलाने पुन्हा एकदा मला आणखी एक वृत्तपत्र मोफत दिले. मी म्हणालो, मी स्वीकारू शकत नाही. परंतु तो म्हणाला, "मी हे तुला माझ्या नफ्यातून देतोय" १९ वर्षांनंतर जेंव्हा मी श्रीमंत झालो तेंव्हा मी त्या मुलाला शोधण्याचा निर्णय घेतला. सुमारे दीड महिन्यानंतर मी त्याला शोधले. मी त्याला विचारले, तू मला ओळखलेस? तो म्हणाला, "होय, आपण प्रसिद्ध बिल गेट्स आहात." मी म्हणालो, तु खूप वर्षांपूर्वी मला दोनदा मोफत वृत्तपत्र दिले होतेस. आता मला ते भरुन काढायचे आहे. मी तुला जे पाहिजे ते सर्व देईन. सावळा तरुण माणूस म्हणाला, "आपण ते भरपाई करू शकत नाही!" मी म्हणालो, का? तो म्हणाला, "मी तुम्हाला स्वतः गरीब असताना जे दिले, ते तूम्ही स्वतः श्रीमंत झाल्यावर मला कसे परत देऊ शकता?" बिल गेट्स म्हणाले, मला वाटते की तो सावळा तरुण माझ्यापेक्षा श्रीमंत आहे. आपल्याला दान करण्यासाठी श्रीमंत असण्याची किंवा श्रीमंत होण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आपल्यात दानत्व असायला हव. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment