🌺🌺महाराष्ट्रीयन🌺🌺 एकदा एक भारतीय नोकरीसाठी अमेरिकेत गेला. काही दिवस खटपट करून त्याला एका सुपर मॅालमध्ये सेल्समन म्हणून नोकरी मिळाली. मालकाने त्याला बोलावले व पूर्वानुभवाबद्दल चौकशी करून त्याला नोकरी दिली. दुस-या दिवशी तो गृहस्थ कामावर आला. दिवसभर काम भरपूर करावं लागेल असे मालकाने सांगितले. मॅालची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ अशी होती. पहिल्या दिवसाचे काम संपल्यावर मालक त्याच्याकडे आला व किती ग्राहक केले असे विचारले. त्या भारतीयाने सांगितले की फक्त एकच ग्राहक केला. मालक चिडला व म्हणाला बाकीच्यांनी प्रत्येकी पंधरा ते वीस ग्राहक केले आणि तू फक्त एक ! तुझा असा परफॅार्मन्स असेल तर मला तुझ्या बाबत विचार करावा लागेल. मालक चिडूनच पुढे म्हणाले किती डॅालरचा व्यवसाय केलास ? कारण एका ग्राहकाकडून असे कितीसे मिळाले असतील...? असा विचार मालकाने केला. तो गृहस्थ म्हणाला दीड लाख डॉलर ! क्काय ! मालक जवळजवळ ओरडलाच ! बाकीचे सेल्समनही अचंबित झाले. मालक म्हणाले, काय विकलेस तू त्याला ? तो म्हणाला एक मासे पकडायचा गळ विकला. पण त्याचे एवढे पैसे कसे..? मी त्याला फिशिंग रॅाडही विकला. मग गळाला लागणारे खाद्य विकले. मासे जास्त जिथे मिळतात त्या ठिकाणचे पाणी खोल आहे व तो भाग दुर्गम आहे, त्यामुळे बोटीने जावे लागेल, म्हणून आपल्या बेसमेन्टमधल्या गोडावूनमधून एक डबल इंजीनवाली मोटरबोट विकली. तिकडे आठवडाभर रहाव लागेल म्हणून पुरेल एवढे खाद्य पदार्थ व दोन क्रेट बीयरही त्यालाच विकली सर ! एव्हाना मालकाचा ऊर आणि डोळे दोन्ही भरून आले होते. मालक म्हणाले, कसला रे माणूस आहेस तू ? केवळ एक गळ विकत घ्यायला आलेल्या माणसाला तू हे विकून दाखवलेस...! तो गृहस्थ म्हणाला, नाही सर, तो माणूस डोकेदुखीवरचे औषध व बाम मागत होता. मी त्याला पटवून सांगितले की, डोकेदुखी घालवायची असेल तर फिशींग करा. आणि हे सर्व घडून आले. मालक म्हणाले, आजपासून तू माझ्या खुर्चीत बस बाबा ! गुरु आहेस तू कुठे काम करत होतास भारतात ! तो म्हणाला, महाराष्ट्र राज्यात शिक्षक होतो !!!!

No comments:

Post a Comment