✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://nasayeotikar.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/03/2018 वार - शनिवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 घडामोडी :- १९६९ - गोल्डा मायर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. 💥 जन्म :- १९२६ - सीगफ्रीड लेन्झ, जर्मन लेखक. १९४५ - मायकेल हेडन, सी.आय.ए.चा निदेशक. 💥 मृत्यू :-  १८८२ - विष्णुशास्त्री चिपळूणकर, आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *राज्यात गुढीपाडव्यापासून प्लास्टिक बंदी, विक्रेत्यांसोबत प्लास्टिक वापरणा-यांवरही करणार कारवाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची घोषणा.* ----------------------------------------------------- 2⃣ *अविश्वास प्रस्तावासाठी टीडीपीला शुभेच्छा. प्रस्ताव सभागृहात मांडला गेल्यास मतदानावेळी शिवसेना तटस्थ राहणार: सूत्रांची माहिती* ----------------------------------------------------- 3⃣ *भाजपाचा स्थापनादिनी म्हणजे 06 एप्रिल रोजी मुंबईत ‘महा भाजपा महामेळावा’, भाजपा प्रदेशाध्यक्ष  रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *औरंगाबाद : केंद्र सरकारचे उप सचिव निपुण विनायक यांची महापालिका आयुक्तपदी बदली.* ----------------------------------------------------- 5⃣ *पी. व्ही. सिंधूची ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यफेरीत धडक, उपांत्यपूर्व लढतीत जपानच्या नोझोमी ओकुहारावर केली मात* ----------------------------------------------------- 6⃣ *पंजाब - मानवी तस्करी प्रकरणात दलेर मेहंदी दोषी, पतियाळा कोर्टाचा निर्णय,थोड्याच वेळात शिक्षेची सुनावणी.* ----------------------------------------------------- 7⃣ *अटीतटीच्या लढतीत श्रीलंकेला नमवून बांगलादेश फायनलमध्ये* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी :- कंधार येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा ख्यातनाम कवी डॉ. माधव कुद्रे यांना राज्यस्तरीय साहित्य सेवारत्न पुरस्कार चंद्रपूर येथे प्रदान* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गुढीपाडवा - विकारी विचारावर विजयाचा दिवस* http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_12.html पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या रंगातील अक्षरावर टिचकी मारा. अभिप्राय जरूर द्या ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वेरूळची लेणी* महाराष्ट्रातील मराठवाडा भागात औरंगाबाद पासून ३० किमी अंतरावर वेरूळ हे एक  गाव असून येथे प्राचीन लेणी आहेत.  येथे १७ हिंदू, १२ बौद्ध आणि ५ जैन अशी  एकूण ३४ लेणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे मूळ गाव वेरूळ आहे. वेरूळची लेणी साधरणत:  इसवी सनाच्या पाचव्या ते दहाव्या   शतकाच्या  कालखंडात कोरली असून प्राचीन भारतातील हिंदू ,बौद्ध आणि जैन धर्मातील परस्परसंहिता प्रकर्षाने या लेण्यामध्ये दिसून येते  वेरुळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी, आणि जैन लेणी अशी विभागणी केली आहे. हिंदू लेण्यामध्ये शिल्पकारांनी कातळात कोरलेली अतिप्रचंड शिल्पे आहेत. यातील बरीचशी लेणी वरपासून खालपर्यंत कोरीवकाम करीत निर्मिलेली आहेत. अशी लेणी  कोरण्यासाठी कारागीरांच्या  अनेक पिढ्या खर्ची  पडल्याचा उल्लेख आहे. हिंदू लेण्यामधील वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर जगातील सर्वात मोठे कोरीव शिल्प असून या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर निर्मिलेली आहे. मंदिर निर्माण करायला अंदाजे दोन लाख टन वजनाचा एक अखंड खडक वापरण्यात असून तो उघडपणे वरून खाली म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून  कोरण्यात आला असला पाहिजे.  हे प्रचंड कोरीव काम पुरे करण्यासाठी अनेक दशके लागली असतील. वेरूळची बौद्ध लेणी येथील सगळ्यात जुनी लेणी आहेत. ही  लेणी विहार स्वरुपाची असून काही विहारात पूजेसाठी मूर्तीही आहेत. या सर्व लेण्यांमध्ये विश्वकर्मा लेणी प्रसिद्ध आहेत. हे अत्यंत सुबक व नाजूक कोरीव काम असून जणू दगडा ऐवजी लाकूड कोरले आहे असे वाटते. या स्तूपात भगवान गौतम बुद्धाची धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील मूर्ती आहे. जैन लेणी हिंदू व बौद्ध लेण्याच्या तुलनेत  असून या लेण्यामधून जैन धर्माची वैराग्य भावना  दर्शवितात. या बरोबरच बारीक कोरीव काम व चित्रे ही या जैन लेण्यांची महती सांगतात. प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी, क्वचित मंदिरे सुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गावर विश्रांतीसाठी  उभारण्यात येत असत त्याचा उद्देश वाटसरुंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. सोबतच त्यांना राजाश्रय, धर्माश्रय, लोकाश्रय प्राप्त असे ह्यासाठीच या लेण्याची निर्मिती केली असावी.  वेरूळ लेण्याला भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬  *"प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी"* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) भारतातील सर्वात लांब नदी कोणती?* 👉🏼    गंगा नदी *२) ही नदी कोणत्या दोन देशातून वाहते?* 👉🏼    भारत व बांग्लादेश *३) या नदीची लांबी किती आहे?* 👉🏼     २,५२५ कि. मी. *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 गंगाराम ( बाबू ) गुरुपवार, बिलोली 👤 अंगद मारोती कांडले, बिलोली 👤 विलास पाटील, देगलूर 👤 जयानंद मठपती, धर्माबाद 👤 अमरसिंग चौहान, भंडारा *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जिद्द* पराभव झाला तरी प्रयत्न करत राहिले पाहिजे प्रयत्न करत यशाचे स्वप्न पाहिले पाहिजे पराभव झाला म्हणून हिंमत हारायची नसते संकटाशी जिद्दीनेच लढाई लढायची असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचार धन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र यांच्या जीवनात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ नेहमीच असतात. जीवनसरिता पुढे पुढे वाहात जाते. पाणी पुढे वाहात जाते तेव्हा मागील काळ हा भूतकाळ असतो. पाण्याला पुढे जायचे असते तेव्हा पुढचा काळ हा भविष्यकाळ असतो. जीवनप्रवाहाचे तसेच आहे. एखादे मुल वाढत असते, ते मोठे होते, तरूणवयात हे मुल असते, तैव्हा बालपण हा भूतकाळ असतो. तारूण्य हे वर्तमान असते, वृद्धावस्था हा भविष्यकाळ असतो. ग.दि.माडगुळकर यांनी या काळाचं सुंदर वर्णन एका गीतात शब्दांकित केले आहे...* *मुकी अंगडी बाळपणाची* *रंगीत वसने तारूण्याची* *जीर्ण शाल मग उरे शेवटी* *लेणे वार्धक्याचे...* *एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे।* *जीवनात खरी प्रगती करायची असेल, तर भूतकाळाला कधीही विसरता कामा नये; कारण भूतकाळ हा इतिहास असतो. एका तत्ववेत्त्याने फार सुंदर शब्दात भूत, भविष्य आणि वर्तमान या काळांचे आपल्या जीवनातले महत्व सांगितले आहे. भूतकाळाच्या खांद्यावर बसूनच वर्तमानकाळ, भविष्यकाळाची सुंदर स्वप्ने पाहू शकतो. म्हणून भूतकाळ मागे टाका; पण त्याला विसरू नका, वर्तमान जगा; पण भूतकाळाला आठवा तरच उज्ज्वल भविष्य घडविता येईल, हा विचार खरंच मोलाचा आहे.* ••●🔰 ‼ *रामकृष्णहरी* ‼🔰●•• 🔅🔅🔅🔅🔅🔅 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          *मोबाईल - 9167937040* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *  व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..८०८७९१७०६३/९४२१८३९५९० ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎡 *म्हणी व त्याचा अर्थ* 🎡 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शेरास सव्वाशेर* - समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस*. नांदेड सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ===== ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *छोटी संधी* एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकोप्तर येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो.  तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, " मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलीकोप्तर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस." पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या.  मित्रानो, तुमच्या आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते. एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment