🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩 *११ मार्च - धर्मवीर शंभूराजे बलिदान दिन...* *संभाजी महाराज..... एक वादळी आयुष्य....* *संभाजी महाराजांचे एकूणच आयुष्य अनेक वादळांनी भरलेलं होत... परंतु अश्या सगळ्याचं वादळांना कायम झुंज देत ते लढत राहिले...म्हणूनच इतिहास त्यांना, "सर्जा" आणि "रौद्रशंभू" सारख्या नावांनी ओळखतो...शिवराय आणि सईबाईंच्या संसारवेलीवर "शंभू" नावाचे "सूर्यफुल" जन्माला आले.. हो, हो त्यांना सूर्यफुलच म्हणावे लागेल... कारण त्यांच्यात जशी सूर्याची आग आणि तेजस्वीपणा होता.... तसेच फुलासारखे कोमल कवीचे हृदय, कविमन सुद्धा होते...असे हे सूर्यफुल अजाणते पणाच्या वयातच आपल्या आईच्या मायेला पारखे झाले... हा होता नियतीचा पहिला आघात...जिजाऊ मांसाहेबांच्या छत्रछायेखाली, आणि शिवरायांच्या, महाराजांच्या सोबतीत शंभूराजे मोठे झाले...छत्रपतींचेच संस्कार त्यांच्यावर झालेलं... मग मावळ्यांच्या सोबतीला ते कसे पारखे होतील ??? लहानपणापासूनच शंभूराजेंना, रयतेची मावळ्यांची ओढ होती... त्यातूनच रायाप्पा महार सारखे जिवलग हिरे ह्याच मावळ खोर्यातून त्यांनी निवडले होते...वाढत्या वयाच्या तिप्पट वेगाने, मनाने आणि मेंदूने शंभूराजे वाढत होते... ज्या वयात मुलं खेळ, आणि बाजारगप्पा मध्ये रमतात... त्या वयात शंभू राजांनी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहून सगळ्यांना अवाक करून सोडले होते... नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक या ग्रंथांची सुद्धा त्यांनी निर्मिती केली..त्यांची समशेरीवरची पकड... त्यांच्यातल्या योद्ध्याची जाणीव करून द्यायची.... त्यांनी घोड्यावरची मांड ठोकून बसण्याची पद्धत त्यांच्यातल्या वायुवेगाची चुणूक दाखवायची... त्यांनी घोड्यांचा वापर फक्त युद्धासाठी केला नाही तर त्याचे अश्वप्रेम सुद्धा त्याच तोडीचे होते...आई नकळत्या वयात गेल्यानंतर, जिजाउंच्या मायेची पाखर त्यांच्यावर होती,,,, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसात हि मायेची पाखर सुद्धा हरपली...* *हा होता नियतीचा दुसरा आघात...यानंतर अनेक राजकारणी आघात सुद्धा त्यांनी सोसले पण ते खंबीरपणे उभे राहिले... पण जेव्हा शिवरायांचे निधन झाले... तेव्हा त्यांचा उरला सुरला भक्कम आधार सुद्धा नाहीसा झाला... आणि ते पूर्ण खचून गेले... पण त्यांच्या या मनावरच्या आघाताचा त्यांनी स्वराज्यावर परिणाम होऊ दिला नाही....रौद्रशंभू, दुप्पट तेजाने उजळून निघाले... एकाच वेळी पाच पाच शाह्या मोडून काढण्यासाठी ते जोमाने उभे राहिले.... त्या दरम्यान त्यांच्या आयुष्यात, बुऱ्हाणपूर वरील छापा, मुरुडजंजिरा, आरमार उभारणी, यासारखी अनेक आव्हाने आणि घटना घडून गेल्या...केवळ ९ वर्षाच्या कारकिर्दीत, स्वराज्यातील एकही किल्ला वैऱ्यांच्या ओटीत त्यांनी पडू दिला नाही. शिवरायांच्या आरमारात अधिक भर टाकली; पण महासंकटांच्या दर्यातही आपल्या पित्याचे एकही जहाज बुडू दिले नाही.मातीसाठी लढलेल्या ह्या राजाने मातीसाठी आपला देह ठेवला... स्वराज्यासाठी आपल्या शरीराचे अक्षरश: तुकडे तुकडे करून मृत्यूला मिठी मारली...* *ते "शिवपुत्र" म्हणून जन्माला आले... पण "सिंहाचा छावा" बनून जगले...स्वराज्याच्या ह्या दुसर्या रणधुरंधर, राजबिंड्या वादळास माझा मानाचा मुजरा...* *जय जय रौद्रशंभो !!* *जय जय शंभुराजे !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *शंभूराजांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.......🙏🙏🙏*

No comments:

Post a Comment