जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
*लोभ* हा माणसाचा भयंकर शञू आहे. मानवाच्या संग्रही वृत्तीला मर्यादा नाही.

*काम , क्रोध , लोभ* ही तर माणसाच्या नरकाची व्दारे आहेत.माणूस कितीही क्रोधी झाला तरी वाघाइतका क्रोधी होऊ शकत नाही.
परंतु मनुष्याच्या लोभाची बरोबरी कोणीच करू शकत नाही.

जेव्हा गरिबी असते , तेव्हा मनुष्याला अल्प वस्तूची गरज असते , विलासवैभव आले की, त्याच्या गरजा पुष्कळ वाढतात.

परंतु जेव्हा मनुष्य *लोभी* बनतो तेव्हा त्याच्या गरजांना अंतच राहत नाही.अशा लोभी माणसाला सर्व सुखे प्राप्त झाली तरी कधीच समाधान लाभत नाही.

*म्हणूनच संत कबीर यांनी वैराग्याची शिकवण नव्हे तर साध्या व्यवहाराची शिकवण सांगितली आहे.  " पानी वाढो नाव में, घरमें बाढो दाम l दोनों हात उलीचिये , यही सयानो काम ll"*

नावेत पाणी वाढल्याने जसा धोका होतो तसाच घरात धन वाढण्यात धोका आहे .
नावेला पाण्याची गरज आहे. पण ते नावेच्या खाली पाहिजे , आत नको.
*त्याचप्रमाणे माणसाला धनाची गरज आहे पण ते घरात नको , समाजात पाहिजे.*
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷

*〰〰〰〰〰〰〰*
*प्रत्येक माणसाचा एक खास स्वभाव असतो.*
त्याच्या  जीवनातील कार्यावर त्याच्या स्वभावाची छाप पडत असते.

आपले जीवन सुखी , आनंदी, संपन्न , निर्भय ठेवायचे असेल तर आपल्या सुस्वभावाचा बगीचा आपल्या मनात फुलला पाहिजे.आपल्यातील प्रसन्नता,  आनंदी वृत्ती ही आपल्या आत्म्याची शक्ती आहे. 😊

आपला स्वभाव आपण सतत प्रफुल्लित ठेवायला पाहिजे. माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही म्हणूनच स्वभावाला औषध नाही असे म्हणतात.
प्रत्येक माणूस आपल्या स्वभावानुसार प्रत्येक प्रसंगाचं मूल्यांकन करत असतो.
आपल्यातील यश अपयशाची कारणे पण आपल्या स्वभावावर अवलंबून असतात.

*यश आणि अपयश यामधील फरक सांगतांना आचार्य विनोबा भावे म्हणाले  की , ' यशाने नम्रता आणि अपयशानं उत्साह येतो.'*

एकूण माणसांच्या स्वभावाचं गणित नक्की काही मांडता येणार नाही.आपण आपल्यातील सुस्वभावाविषयीच विचार केला पाहिजे. 😇
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

कथा क्रमांक १९४

*माझी शाळा माझे उपक्रम*

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग . १९४*
〰〰〰〰〰〰〰
*🌺जीवन दरीतील दूरावा*🌺
=================

एक छोटा मुलगा आईवर रागावला व म्हणाला ,"मला तू आवडत नाहीस ,मला तू आवडत नाहीस "शिक्षेच्या भितेतून तो घरातून पळाला व एका दरिजवळ गेला .तिथे तो पुन्हा ओरडला ,"मला तू आवडत नाहीस "दरीतून आवाज आला मला तू आवडत नाहीस .आयुष्यात पहिल्यांदा त्याने प्रतिध्वनि ऐकला होता .आपण कोणाला तरी आवडत नाही हे एकुण  तो नाराज झाला व पळत आई कड़े गेला व घडलेला सर्व प्रसंग त्याने आईला सांगितला.

 आईला म्हणाला त्या दरित कोणीतरी दृष्ट माणूस  आहे व त्याला मी आवडत नाही. आईला सर्व काही समजले ती म्हणाली तू पुनः दरिजवळ जा व म्हण की मला तू आवडतोस.

 मुलगा दरिजवळ गेला व म्हणाला ,"मला तू आवडतोस. "दरीतून आवाज आला ,"मला तू आवडतोस."मुलाला आनंद झाला तो आई कड़े आला व आई ची माफ़ी मागु लागला व म्हणाला ,"आई मला तू फार आवडतेस."आईने त्याला घट्ट मिठी मारली .आईच्या डोळ्यात आनंद अश्रु आले.

*तात्पर्यः*
*आयुष्य हे प्रतिध्वनि सारखे आहे जे आपण देतो तेच आपल्याला परत मिळते.म्हणून आपण कोणाशी कसे वागावे ते आपले आपणच ठरवावे.कारण व्देषाने व्देष वाढते आणि प्रेमाने प्रेम वाढते.*
*-----------------------------------*
*📝 शब्दांकन/संकलन*

गीत ( आजोळ) संकलन

आजोळ किती
छान होतं... भावंडांशी
होती गट्टी...
     सा-यांशीच दो
     नव्हती कुणाशी तेव्हा
     कट्टी...
मामीच्याही कपाळावर
नव्हत्या तेव्हा आठ्या
कितीही खाल्या जरी
पापडाच्या लाट्या....
     आजीचे सांधे दुखत नव्हते
     नव्हते कुलर ए.सी
     ऊन्हाळ्याची सुट्टी तेव्हा
    वाटे हवीहवीशी....
पत्त्यांचे खेळ रंगत
माडीवरती अंगत पंगत
माचवलेल्या आंब्यांची
हवीहवीशी होती संगत....
      नदीवरती डुंबत होतो
      खरबुजांवर ताव होता
      गर्द अमराईत वसलेला
     माझ्या मामाचा गाव होता...
नाही आता ती वनराई
रूक्ष रस्ते ठाई ठाई
ओसाड वाडे..पडक्या भिंती
आजही पाणावते आई....
       भाग्यवंत आम्ही जाहलो
        आजोळाचे भाग्य लाभले..
        धाबे अन् कौलारू छपरे
       आठवणींशी बोलू लागले...
🌳🌳🌳🍋🍉🌳🌳🌳

संकलन

कथा क्रमांक १९३

अभ्यास  कथा क्रमांक १९३*

*अनुभवाच्‍या जोरावर यश*

         एका व्‍यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्‍यापार करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍याच्‍या शेजा-यानेही तोच निर्णय घेतला. पहिला व्‍यापारी म्‍हणाला, भाई आपण दोघेजण एकत्र जाण्‍याने अडचण निर्माण होईल एक तर तू पहिल्‍यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे. दुस-या व्‍यापा-याने विचार केला, आपण पहिल्‍यांदा जाण्‍यात फायदा आहे, रस्‍त्‍याने सरळ गेलो तर बैलांना चारापाणी मिळेल. मनाला वाटेल त्‍या किंमतीवर सामान विकेन. त्‍याने पहिल्‍यांदा जाण्‍याचा निर्णय घेतला. पहिल्‍या व्‍यापा-याला वाटले, या व्‍यापा-याच्‍या जाण्‍याने गाडीवाट चांगली तयार होईल. याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल. नव्‍या खोदलेल्‍या विहीरीचे पाणी प्‍यायला मिळेल. शिवाय चांगल्‍या किंमतीवर सौदा करता येईल. दुस-या व्‍यापा-याच्‍या माणसांनी पाण्‍याने भरलेल्‍या घागरी बरोबर घेतल्‍या आणि प्रवासाला सुरुवात केली. वाटेत काही भिजून आलेले लोक त्‍यांना भेटले, त्‍या लोकांनी व्‍यापा-याला सांगितले, पुढे पाऊस खूप आहे, पाणी घेऊन जाण्‍याची गरज नाही. व्‍यापा-याने त्‍यांचा सल्‍ला ऐकला. त्‍या रात्रीच त्‍या व्‍यापा-याचा काफिला लुटला गेला. व्‍यापारीही मारला गेला.एक महिन्‍याने पहिला व्‍यापारी पण प्रवासाला निघाला, तेव्‍हा दरोडेखोराच्‍या माणसांनी त्‍यालाही खोटे बोलून भुलविण्‍याचा प्रयत्‍न केला पण पहिला व्‍यापारी त्‍यांच्‍या बोलण्‍याला भुलला नाही. व्‍यापा-याच्‍या माणसांनी दरोडेखोरांची माणसे कशी काय ओळखली असे व्‍यापा-याला विचारले असता व्‍यापारी म्‍हणाला, अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी डोक्‍यात आणला व दरोडेखोरांची माणसे मला कळून आली. व्‍यापारी पुढे गेला व त्‍याच्‍या धंद्यात अशा छोट्याशा गोष्‍टींमुळे तो यशस्‍वी झाला.


*तात्‍पर्य* :- अनुभवाने माणूस यशस्‍वी होतो.

  *संकलन*

कविता संकलन

*शृंगार मराठीचा*

*शृंगार मराठीचा नववधू परी,*
*अनुस्वाराचं कुंकू भाळावरी.*
*प्रश्न चिन्हांचे डूल डुलती कानी,*
*स्वल्पविरामाची नथ भर घाली.*
*काना काना जोडून राणी हार केला,*
*वेलांटीचा पदर शोभे तिला.*
*मात्र्यात गुंफिले चाफ्याचे फूल*
*वेणीत माळता पडे भूल*
*उद् गारवाचक छल्ला असे कमरेला*
*अवतरणाची लट खुलवी मुखड्याला*
*उकाराची पैंजण छुमछुम करी*
*पूर्णविरामाची तीट गालावरी.*

कविता ( निवांत )

*🌷🌷क- कवितेचा🌷🌷*

    *🌹निवांत*🌹
*☘🍀☘🍀☘🍀☘🍀*

✍ शांततेशी मैत्री करणे,
शिकायला पाहिजे.
कधीतरी आपणही,
शांत बसायला पाहिजे.

बोलून बोलून शब्द झिजले,
अर्थ काय कुठे हरवले,
हरवलेले अर्थ शोधायला पाहिजे,
शब्दांची किंमत करायला पाहिजे.
कधीतरी आपणही,
शांत बसायला पाहिजे...

दरवेळेस बोलून दाखवून,
होत नसते काही,
काही गोष्टी जन्मोजन्मी,
जशास तशा राही,
हवे हवे तर हवेच आहे,
नको नकोही झेलायला पाहिजे...
कधीतरी आपणही,
शांत बसायला पाहिजे.

असलेल्या गोष्टी ,
समजून घेतल्यावर,
सगळे सोपे होते.
थंड डोके नी शांत मन,
सर्वच सावरून घेते.
एकट्यात जरा वेळ घालवून,
व्यक्त झाले पाहिजे.
कधीतरी आपणही,
शांत बसायला पाहिजे.

स्वतः स्वतःशी मैत्री करून,
मोकळा श्वास घेतला पाहिजे.
स्वभावाला औषध नाही,
कळायला पाहिजे,
नकळणार्या गोष्टी ,
सोडून द्यायला पाहिजे,
कधीतरी आपणही,
शांत बसायला पाहिजे........
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

कथा क्रमांक १९२

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग . १९२*
〰〰〰〰〰〰〰
*🌺  अचूक निर्णय* 🌺
=================

चार जण प्रवासाला निघाले होते. चौघांनी मिळून एकच मोठी बॅग घेतली होती. त्यात त्यांचे कपडे, पैसे, सर्व सामान त्यांनी ठेवले होते. वाटेत एका म्हातारीचे घर लागले. तिच्या घरी ती  मोठी बॅग ठेवून ते चौघेही जेवायला गेले. जातांना त्यांनी त्या आजीला सांगितले होते. "आजी, आम्ही चौघे मिळून तुझ्याकडे येऊन बॅग मागू तेव्हाच तू आम्हाला बॅग दे. आमच्या चौघांपैकी बॅगची मागणी करतांना एकही जण कमी असल्यास तू बॅग देऊ नकोस"
आजीने मान डोलावली नंतर असे घडले की, त्या चौघांपैकी एक जण आजीकडे आला आणि त्याने बॅग घेऊन तो तात्काळ पसार झाला.
   मग ते तिघे आजीकडे आले. आणि त्यांना समजले की, त्याच्यापैकी चौथ्या माणसाने ती बॅग त्या आजीकडून नेली. ते तिघे संतापले. तेनाली रामनकडे गेले. घडलेली सर्व हकीकत त्यांनी सांगितली. आजीकडून नुकसान  भरपाई त्यांनी मागितली. तेनाली रामनने त्या तिघांना एक प्रश्न विचारला, तुम्ही चौघे मिळून बॅग मागितल्या नंतर म्हातारीने तुम्हला बॅग द्यावी, अशी तुमची अट होती ना ?
 "होय" तिघेही म्हणाले.
       "आजी तुम्हाला नुकसान भरपाई न देता तुमची बॅगच तुम्हाला परत करू इच्छिते. सबब, तुम्ही चौघे मिळून या ! तेनाली रामनने निकाल जाहीर केला.
         या निकालाने न्यायालयात हशा पिकला आणि त्या तिघांना कळून चुकले की, ते आपला दावा हरले आहेत.
*तात्पर्य - सर्व बाजूंनी पाहून विचार करुनच चोख निर्णय द्यायला हवा.*
*------------------------*
*📝 शब्दांकन/संकलन*


कथा क्रमांक १९१

 बोधकथा

एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम
आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात
असताना रात्रीच्या वेळी काहीच
न कळाल्याने रस्ता चुकले.
जंगल घनदाट होते, तेथे न पुढे
जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा.
तेव्हा तिघांनीही असा निर्णय
घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे.
    तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.
पहिली पाळी सात्यकीची होती.
सात्यकी पहारा करू लागला

 तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू
लागले.
  पिशाच्चाने बोलावलेले पाहून
सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.

एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व
त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले.
सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला  दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.

पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व
मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले
व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट
झाली शेवटी आकार लहान होत
होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद
त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले.
  *_सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,.

......_*

 *_"तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता,_*
*_कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध आहे._*
*_क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो._*
*_मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे. ’’_*

*_तात्पर्य :_*

*_क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो._*
*_क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे,_* *_प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते._*
*_क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून,  आपल्या विचारातच वसत असते.🌼🌺_*

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

    *🌺जीवन विचार*🌺
〰〰〰〰〰〰〰 📚
शिकलेला समाजच देशाची सुधारणा करु शकतो. *देशाची शिकलेली , सुसंस्कृत ,स्वच्छ , सदाचारी, प्रामाणिक , शिष्टाचारी आणि शिस्तप्रिय लोक किती आहेत यावरुनच देशाची किंमत ठरत असते.*
 ' देशासाठी जगावं ' हा शिक्षणाचा महत्त्वाचा विचार आहे.म्हणूनच शिक्षणातून शीलसंपन्न आणि सामर्थ्यसंपन्न माणसं निर्माण करण्याच काम शिक्षणाचं असतं.
📚📚

    *तीन गुरू प्रमाणे माझी तीन उपास्थ दैवतही आहेत.*

📚माझे पहिले उपास्थ दैवत *विद्या.*
 विद्येशिवाय काही होऊ शकत नाही.
अन्नाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरूरी आहे . खरा प्रेमी ज्या उत्कंठेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो ,तशा उत्कटतेने माझे पुस्तकांवर📚 प्रेम आहे .
 शत्रूलाही कबुल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संपादिले पाहिजे.

  📚 माझे दुसरे उपास्थ दैवत *विनयशीलता* हे आहे. *विनय म्हणजे लीनता ,लाचारी नव्हे.*

माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे  असे मला वाटते . *चरितार्थासाठी कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही.*
मी माझ्या बुध्दीप्रमाणे चालतो. 🙏 परमेश्वराला काय वाटेल याचा मी कधी विचार केलेला नाही.

📚 *शीलसंवर्धन* हे मी माझे तिसरे उपास्थ दैवत समजतो.

  📚📖- *डाॅ. बाबासाहेब आंबेडकर* 📚🖊
==================
*'सत्य आणि न्याय याहून कुठलाही धर्म मोठा नाही.'*
📚  📙  📖  📚  📝
*〰〰〰〰〰〰〰*
🙏🏼 *शब्दांकन/संकलन* 🙏🏼

🖊

डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा सर्वांना शुभेच्छा

📘📕📒📔📙📕📒📘
युगायुगांचा तिमिर भेदुनी उगवलास तू प्रज्ञासूर्या
उजेड अमुच्या जीवनामध्ये फुलवलास तू प्रज्ञासूर्या

परंपरेच्या दगडांवरती उपेक्षितांचा फुटला माथा
विचार तेथे मानवतेचा रुजवलास तू प्रज्ञासूर्या

बा, करुणेने जवळ घेउनी, पंचशील हृदयास पाजुनी
 मग प्रज्ञेचा घास अम्हाला भरवलास तू प्रज्ञासूर्या

एकजुटीची करून मशागत संघर्षाचे बीज पेरले
ह्या मातीत मळा समतेचा पिकवलास तू प्रज्ञासूर्या

तुझ्या स्मृतींनी मन गहिवरते ; तुझ्यापुढे नतमस्तक होते
काठ पापणीचा नकळत रे भिजवलास तू प्रज्ञासूर्या … !!

*📚📘डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व*
*सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा!*💐💐👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शुभेच्छूकः💐💐 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे  (शिंदे)
🙏👏👏🙏
(म.रा.प्रा.शिक्षक महिला आघाडी संघ जिल्हा सरचिटणीस नांदेड.)

कविता संकलित

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

मातृ म्हणा मदर म्हणा
*आई* शब्दात *जीव* आहे ....

पिता म्हणा पप्पा म्हणा,
*बाबा* शब्दात *जाणीव* आहे

सिस्टर म्हणा दीदी म्हणा
*ताई* शब्दात *मान* आहे ....

फ्रेंड म्हणा दोस्त म्हणा
*मित्रा* शब्दात *शान* आहे ....

एन्ड म्हणा फिनिश म्हणा
*अंत* शब्दात *खंत* आहे .....

दिवार म्हणा वॉल म्हणा
*भिंत* शब्द *जिवंत* आहे

रिलेशन म्हणा रिश्ता म्हणा
*नातं* शब्दात *गोडवा* आहे

एनेमी म्हणा दुश्मन म्हणा
*वैर* शब्द जास्त *कडवा* आहे..

हाय म्हणा हॅलो म्हणा,
*हाथ* जोडणे *संस्कार* आहे

सर म्हणा मॅडम म्हणा
*गुरु* शब्दात *अर्थ* आहे

ग्रँड पा ग्रँड माँ शब्दात
काही मजा नाही
*आजोबा,आणि आजी*
सारखे *नाते* सुंदर जगात नाही..

गोष्टी सर्व सारख्या
पण *फरक* फार *अनमोल* आहे

*अ ते ज्ञ शब्दात*
  *ज्ञानाचे भांडार आहे*..

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

कथा क्रमांक १९०


*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग १९०*
〰〰〰〰〰〰〰
*🌺"कर भला तो हो भला"* 🌺
=================
〰〰〰〰〰
गंगा नदी के पास एक पीपल का पुराना पेड थाl उस पेड पर एक दिन एक कबूतर बैठा हुआ नदी की लहरें देख रहा थाl अचानक उसकी नजर पेड के नीचे वाले पानी में बहती जा रही चींटी की तरफ गयीl वह पानी से बाहर आने की कोशिश कर रही थी l  कबूतर ने अपने चोंच से एक पत्ता तोडकर पानी में चींटी की तरफ फेंका l चींटी पत्ते पर चढकर किनारे की तरफ आ गई और इस प्रकार उसकी जान बच गई l

     अब दोनों में मिञता हो गईl
अचानक एक दिन चींटी ने शिकारी को अपने मित्र कबूतर पर निशान साधते हुए देखा, उसने तुरंत शिकारी का पैर काट लिया l शिकारी का निशाना चूक गया l और गोली की आवाज से कबूतर उड गया l इस प्रकार चींटी ने कबूतर की जान बचाई l

*सीखः भलाई का बदला हमेशा भलाई ही होता हैl यदी हम भलाई करेंगे तो हमारी भी भलाई होंगीl*
*-----------------------------------*
*📝 शब्दांकन/संकलन*


कथा क्रमांक १८९

  अभ्यास कथा

 लोकराजा
आठवडी बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून
घराकडे निघाली होती. आया-
बाया चपला फरफटत पाय उचलत होत्या.
धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती.
म्हातारी आजी पाटी कमरेवर घेऊन ताठ
उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून
त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट
झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली.
लाडवांची पुरचुंडी प्लास्टिकच्या पिशवीत
चुंबळीच्या पदराखाली सरकवली.
आजी एस्.टी.च्या खांबाशी पोहोचते,
तो एस्.टी.निघून गेली होती. बांगडीवाल्या मुलाने
तिला हटकलंच,
म्हातारे, आज उशीरसा?'
माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज
बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं
खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं
सांगावं, असं तिला पण वाटत होतं. तेवढ्यात
समोरुन मोटार येताना दिसली.
आजीने चकटनं विचार केला, एस्.टी.ला दोन आणे
पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ. पण
अंधारायच्या आतं घरी तर पोहोचू!
आजीने आपला काळा फाटकोळा हात
झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून
थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदार गडी वाटला.
तो आजीकडे बघून हसला.
"काय पायजे आजी?" त्यानं
विचारलं.आजीला त्यातला त्यात बर वाटलं.
म्हणाली, "माका सत्तर मैलार जांवचा आसा.
सोडशील रे? "यष्टी चुकली बग!'
ड्रॉयव्हर खाली उतरला.
म्हातारीची पाटी डिकीत
टाकली आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर
बसायला सांगितलं. आजी हरकली. चक्क पुढं
बसून जायचं? आणि गाडीत कोणी पॅसेंजर्च
नाही. पण तिला हळहळपण वाटली.
बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही.
ती म्हणाली, "ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता.
मियां तुका तीन आणे देतयं. चलात?''
ड्रॉयव्हर हसत म्हणाला, "आजी, तुला परवडतील
ते दे. तू मला मायसारखी ''
आजीचाजीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच
हक्कानं ऐसपैस बसली. गाडी सुरु
झाली.बांगडीवालामुलगा तोंड वासून आश्चर्यानं
पाहत होता. गाडी हलली तसा तो ओरडलाच, "अगे
म्हातारे..... -पण आजीला आता त्याच्याकडे
बघायला सवड कुठं होती?
मऊ गादीवर आजीला फार सुख वाटलं,
एस्.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही.
गाडी कशी भन्नाट निघाली होती. आजीनं
मनातल्या मनात ड्रॉयव्हरला मार्क देऊन टाकले.
दिवस भराच्या उन्हान,धुळीनं ती थकली होती.
आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली.
"आजी, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघं.
इथंच उतरायच ना?"
आजी खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून
ड्रॉयव्हरच्याहातावर ठेवले. तेवढ्यात त्यान
डिकीतून तिची पाटी काढून दिली.
म्हाताऱ्या आजीला काय वाटलं कोण जाणे.तिनं
अलवार हातानं पुडी उलगडली.
त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला.
ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली,
"खा माझ्या पुता! "
ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं
आणि म्हातारीकडं डोळे भरुन पाहिलं
गाडी निघाली, तसा बाजूला उभा असलेला माणूस
म्हणाला,
"कुणाच्या गाडीतून इलंय?""
"टुरिंग गाडीतनं." आजी म्हणाली
आजीचं बोलणं ऐकून तो माणूस आणखीच
बुचकळ्यात पडला. तशी आजी खणखणीत
आवाजात म्हणाली
"तीन आणे मोजूनदिलंय त्येका",
"त्यांनी ते घेतलं?
अग म्हातारे तुझं डोकं फिरलं काय? टुरिंग कार
नव्हती ती.आपल्या राजांची गाडी.
या आपल्या कोल्हापूरच्या शाहु महाराजांच्या शेजारी बसून आलीस
तू!'' दुसऱ्यानं माहिती पुरवली.
"अरे माझ्या सोमेश्वरा, रवळनाथा'' म्हणत
म्हातारी भुईला टेकली. गाडी गेली त्या दिशेनं
तिन भक्तिभावानं हात जोडले. आपल्याला `माय'
म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू
खाणाऱ्या,त्या लोकराजाच्या आठवणीनं,तिच
अंतःकरण भरुन आलं.
याला म्हणतात " लोकराजा"....!

कथा क्रमांक १८८

पापाचा गुरू कोण?

एक पंडित काशीत अनेक शास्त्रांचे अध्ययन करून आपल्या गावात परतले.
संपूर्ण गावात बातमी पसरली की काशीहून कोणी एक पंडित, शास्त्रांचे
अध्ययन करून आला आहे आणि ते धर्मासंबंधी
कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात.

ही बातमी ऐकून गावातला एक शेतकरी त्याच्याकडे आला
आणि त्यांना विचारू लागला की
"पंडितजी तुम्ही आम्हाला हे सांगा की पापाचा गुरू कोण आहे?"
प्रश्न ऐकून पंडित गडबडले.....

त्यांनी धर्म आणि आध्यात्मिक गुरुंबद्दल तर ऐकलं होतं.
पण पापचाही गुरू असतो हे त्यांच्या समजण्याच्या
आणि ज्ञानाच्या पलीकडे होते.

पंडितजींना वाटलं की त्यांचे अध्ययन अजूनही अपूर्ण राहिलं आहे.
त्यामुळे ते पुन्हा काशीस निघाले.
अनेक गुरूंना भेटले, पण त्यांना
त्यांच्या प्रश्नाचे उत्तर काही सापडले नाही.

अचानक एक दिवस त्यांची भेट एका गणिकेशी झाली.
तिने पंडितजींना त्यांच्या अस्वस्थतेचे कारण विचारले,
तेव्हा त्यांनी तिला आपली समस्या सांगितली. गणिका म्हणाली,
"हे पंडित! ह्याचं उत्तर आहे तर अत्यंत सोप्पं,
परंतु उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला काही दिवस
माझ्या बाजूच्या घरात राहावे लागेल.

पंडितजी ह्या ज्ञानासाठीच तर भटकत होते.
ते लगेच तयार झाले.

गणिकेने त्यांची आपल्या बाजूच्या खोलीत राहण्याची व्यवस्था केली.

पंडितजी कोणाच्याही हाताने बनवलेले अन्न खात नसत.
ते आपले नियम-आचार आणि धर्म प्रपंचाचे कट्टर अनुयायी होते.
गणिकेच्या घरात राहून ते आपले जेवण स्वतःच बनवत होते.

अशा प्रकारे दिवस जात होते.

परंतु प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडले नव्हते.
ते उत्तराची प्रतीक्षा करू लागले.

एक दिवस गणिका त्यांना म्हणाली, "पंडितजी! आपल्याला स्वतः जेवण
बनवण्यात अनेक अडचणी येत असतील.
इथे तुम्हाला बघणारा तर कोणी नाही.
आपली इच्छा असेल तर मी स्नान करून आपल्याला भोजन
तयार करून देऊ शकते.

ती म्हणाली "जर तुम्ही मला ही सेवा करण्याची संधी दिलीत,
तर मी दक्षिणेमध्ये प्रतिदिन आपणांस पाच सुवर्णमुद्रा देईन".

स्वर्णमुद्रांचे नाव ऐकून पंडित विचार करू लागला.
शिजवलेले अन्न आणि त्याबरोबर पाच सोन्याची नाणीही !

अर्थात दोन्ही हातात लाडू आहेत.

तो म्हणाला जशी आपली इच्छा."

पंडित तिला म्हणाला, "फक्त एवढं ध्यानात ठेव की माझ्या खोलीत
जेवण घेऊन येताना तुला कोणी पाहू नये."

पहिल्याच दिवशी अनेक प्रकारची स्वादिष्ट पक्वान्ने बनवून
गणिकेने त्या पंडिताच्या समोर ठेवली.

पण जेव्हा पंडित खाण्यास हात घालू लागला तेव्हा
तिने लगेच पंडितांचे ताट स्वतःकडे खेचले.

तिच्या या वर्तनामुळे पंडित क्रुद्ध झाला
आणि म्हणाला "हा काय मूर्खपणा आहे?"

त्यावर गणिका म्हणाली "हा मूर्खपणा नाही, तर हेच आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे.

इथे येण्याच्या अगोदर आपण भोजन तर दूरच,
पण कोणाच्या हातातले पाणीही पित नव्हतात,

पण स्वर्णमुद्रांच्या लोभाने तुम्ही माझ्या हाताने बनवलेल्या
अन्नाचाही स्वीकार केलात !

तुमच्या प्रश्नाचं हेच तर उत्तर आहे की 'लोभ' हाच पापाचा गुरु आहे..

कथा क्रमांक १८७

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
                 *संघर्षच खरे जीवन*
एका गावात एक म्‍हातारी राहत होती. तिला मुलेबाळे नव्‍हती. ती आणि तिचा नवरा दोघेच होती. पती कसल्‍यातरी आजाराने ग्रस्‍त होता. ती रात्रंदिवस मोलमजुरी करून दिवस काढत होती. या म्‍हातारीबद्दल संपूर्ण गावात सहानुभूती होती. पण म्‍हातारी स्‍वाभिमानी असल्‍याने ती कोणाकडून कसलीच मदत घेत नसे. एकेदिवशी ती जंगलात लाकडे तोडण्‍यासाठी गेली होती. दिवसभर लाकडे तोडून ती दमली होती. लाकडांची मोळी बांधली पण ती मोळी झालेल्‍या श्रमामुळे तिला काही उचलली जाईना. त्‍याने ती वैतागली व मोठमोठ्याने बडबडू लागली,''देवा, आता या उतारवयात ही मोळी जर माझ्याचने उचलली जात नसेल तर मला तरी उचल बाबा.'' तिने तसे म्‍हणायला आणि मृत्‍युदेव तिकडून जायला एकच गाठ पडली. त्‍यांनी ते ऐकले व लगेच तेथे येवून ते म्‍हणाले, मी तुझा आवाज ऐकला आहे मी तुला घेऊन जायला तयार आहे.'' साक्षात मृत्‍यु समोर पाहून म्‍हातारी घाबरली आणि म्‍हणू लागली,'' मला आताच मरायचे नाही, मी जर मेले तर माझ्या आजारी पतीची सेवा कोण करील?. मी काही इतकीच काही म्‍हातारी नाही की मला ही मोळी उचलता येत नाही. मी उगीच गंमत करत होते. पण मला काय माहिती लगेच मला उचलायला तू लगेच येशील देवा. मला सोड बाबा एकटीला, जा तुझा तू.'' हे ऐकताच मृत्‍यूदेव निघून गेले आणि म्‍हातारीने पूर्ण ताकतीने लाकडाचा भारा उचलला व घरी गेली.
                     *तात्पर्य*
जीवनापासून पळ काढणे म्‍हणजे समस्‍येचे निरसन नाही. संघर्षाला सामोरे जाणे, संघर्ष करत रा‍हणे, आपले नित्‍यकर्म करत राहणे यातच मानवी जीवनाचे सूत्र बांधले आहे.
               〰〰〰〰〰〰〰

कथा क्रमांक १८६

*❝गाढव व माळी❞*

         *शहराजवळच्या वस्तीवर राहणार्‍या गाढवाचे शेपूट एके दिवशी कोठेतरी तुटून पडले.*

         *शेपटी नसल्याने त्या गाढवाला स्वतःची फार लाज वाटू लागली. तो आपली शेपटी शोधण्यासाठी म्हणून हिंडू लागला.*

           *तो एका बागेतून चालला असता तेथील माळ्यास वाटले की हे गाढव आपल्या फुलझाडांची नासाडी करण्यासाठीच आले आहे. म्हणून तो रागारागाने त्या गाढवाच्या अंगावर धावून गेला व त्याने झाडे कापायच्या कात्रीने गाढवाचे दोन्ही कान कापून टाकले.*

           *शेपूट हरवल्यामुळे आधीच दुःखी झालेल्या त्या गाढवाचे दोन्ही कान गेले म्हणून त्यास फारच दुःख झाले.*

               *❝ तात्पर्य ❞*
*~दुःखाच्या भरात अविचाराने एखादी गोष्ट केली जाते व त्यामुळे जास्तच संकटे निर्माण होतात.~.*

कथा क्रमांक १८५

अभ्यास कथा ...

*॥ भिक्षापात्र ॥*

"राजमहालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता.
जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती.
प्रसंगच तसा होता.
त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली
भिक्षा मागण्यासाठी आला होता.
राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला.
काय हवं ते माग. मिळेल.
भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे.
त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे.
पण, वचन देण्याआधी विचार कर.
जमेल का?
भिक्षुकाच्या हातातलं अतिशय छोटं भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला,
अरे याचका, माझ्याकडच्या संपत्तीची गणती नाही,
माझ्या राज्याला सीमा नाही. हे छोटंसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण.
राजाने नोकरांकरवी आपल्या खजिन्यातले उत्तमोत्तम जडजवाहीर मागवले
आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितलं...
...संध्याकाळ उजाडली तरी ते भरणं सुरूच होतं...
...राजाचा सगळा खजिना रिता झाला होता,
आपल्या लाडक्या राजावर खजील होण्याची पाळी यायला नको,
म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्यात गायब झाली होती.
रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला,
महाराज, माझ्याकडे हे पात्र भरण्याइतकी संपत्ती नाही.
भिक्षुक म्हणाला, अरेरे, उगाच माझा दिवस वाया गेला.
सकाळीच सांगितलं असतं तर पुढे गेलो असतो.
पात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून तो पुढे निघाला.
राजा धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून त्याने विचारलं,
भगवन्, मला फक्त एक सांगा. या इतक्याशा भिक्षापात्रात
माझा सगळा खजिना रिता झाला, तरी ते भरलं नाही.
असं काय आहे या भिक्षापात्राचं वैशिष्ट्य?
भिकारी म्हणाला,
ते मलाही माहिती नाही.
हे भिक्षापात्र मी माणसाच्या कवटीपासून तयार केलं आहे.
त्यातच माणसाचं मन असतं म्हणतात.
आणि
ते
*कशानेही भरत नाही!!"*

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰 *🌺जीवन विचार*🌺
〰〰〰〰〰〰〰

*संध्याकाळच्या संधीप्रकाशात ही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.*

*'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणुस एकांताला जास्त घाबरतो.*

*'It is better to have loved and lost, than never to have loved at all!'*

*अत्यंत महागडी,न परवडणारी     खर्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य ".*

*जोपर्यंत स्वतःच्या विचांराचा शोध स्वतःलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेल असतं सगळ्यांचं.*
*"आंब्याच्या झाडाला खुप मोहोर येतो; पण फळ थोडे लागते.आयुष्याचे झाडही तसेच आहे.त्याला आशेचा मोहोर खुप येतो".*
 
*म्हणूनच म्हणतात 'आयुष्य ही चैन नसुन एक कर्तव्य आहे*'.
*आणि म्हणून जोपर्यंत आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत नाही, तोपर्यंत आपण  आपले जीवन सार्थकी लागले असे म्हणूच शकत नाही.*

*' जीवन म्हणजे प्रेम, कर्तव्य आणि श्रमरुपी सरितांचा संगम होय'.*
==================
*🙏'वाणी,पाणी आणि नाणी' ह्याचा वापर जपुन करावा.*
🍀💦💦💦💦💦🍀
*〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 शब्दांकन /  संकलन🙏🏼

कथा क्रमांक १८४

*माझी शाळा माझे उपक्रम*
*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग १८४📚*
〰〰〰〰〰〰〰
     *🌺 ईश्वरी स्थान* 🌺

〰〰〰〰〰〰〰
एक वयोवृद्ध शेतकरी डोंगराळ प्रदेशातील शेतावर त्याच्या नातावासोबत राहत होता.
रोज पहाटे आजोबा लवकर उठून भगवद् गीता वाचत बसत. त्यांच्या नातवाची त्यांच्यासारखेच बनण्याची इच्छा होती आणि तो प्रत्येक गोष्टीचे अनुकरण करण्याचा शक्य तितका प्रयत्न करीत असे.
एके दिवशी नातवाने विचारले,
" आजोबा, मी तुमच्यासारखाच गीता वाचण्याचा प्रयत्न केला पण मला ती समजली नाही, आणि जे काही थोडेफार समजले ते पुस्तक बंद करताच विसरले जाते. भगवद् गीता वाचून काय फायदा होतो? "
आजोबा शेगडित कोळसे टाकण्या आधी थोडे थांबले आणि म्हणाले, "ही कोळशाची टोपली घेउन नदीवर जा आणि माझ्यासाठी टोपली भरून पाणी घेउन ये."
नातवाने सांगितल्या प्रमाणे केले पण घरी पोहोचण्या पुर्वीच सर्व पाणी गळून गेले. आजोबा हसले आणि म्हणाले," पुढच्या वेळी तू थोडी घाई कर "आणि पुन्हा एक प्रयत्न करण्या साठी त्याला टोपली घेउन नदीवर पाठविले. या वेळी तो मुलगा जोरात पळत आला पण तरीही घरी पोहोचण्यापुर्वी टोपली रिकामी झाली होती. धापा टाकत त्याने आजोबाना सांगितले की टोपलीतून पाणी आणणे अशक्य आहे आणि तो बादली घेण्यासाठी गेला.
आजोबा म्हणाले," मला बादली मध्ये पाणी नको आहे; मला टोपली मध्येच पाणी हवे आहे. तू पुरेसे प्रयत्न करत नाहीस," आणि तो नातू पुन्हा कसा प्रयत्न करतो हे पाहण्या साठी घराबाहेर आला.
या वेळी, त्या मुलाला ही गोष्ट अशक्य आहे हे माहित असुनही त्याला आजोबाना दाखवून द्यायचे होते की तो कितीही जोरात धावत आला तरीही घरी पोहोचण्यापूर्वी पाणी गळून जाइल.
त्या मुलाने पुन्हा एकदा टोपली पाण्यात बुडविली आणि जोरात धावत आला. परंतु आजोबापर्यंत पोहोचण्यापूर्वी टोपली रिकामी होती. धापा टाकत तो म्हणाला," बघा आजोबा, हे निष्फळ आहे"
आजोबा म्हणाले," तर तुला हे निष्फळ वाटते मग जरा टोपली कडे बघ"
मुलाने टोपली कडे बघितले आणि पहिल्यांदाच त्याला टोपली वेगळी दिसत असल्याचे लक्षात आले. ती कोळशाने काळी झालेली टोपली आता आतून बाहेरून स्वछ झाली होती.
मुला, तु जेव्हा भगवद्गीता वाचतो तेव्हा असच घडते. तू प्रत्येक गोष्ट समजू शकणार नाही किंवा लक्षात ठेवू शकणार नाही, पण जेव्हा तू गीता वाचशील तेव्हा तू देखिल अंतर्बाह्य बदलून जाशील.
आपल्या आयुष्यात ईश्वराचे हेच तर वैशिष्ट आहे.
*-----------------------------------*
*📝 🙏संकलन*🙏

कथा क्रमांक १८३

अभ्यास  कथा ..*

*एक औरत अपने परिवार के सदस्यों के लिए रोज़ाना भोजन पकाती थी और एक रोटी वह वहाँ से गुजरने वाले किसी भी भूखे के लिए पकाती थी..।*

*वह उस रोटी को खिड़की के सहारे रख दिया करती थी, जिसे कोई भी ले सकता था..।*

*एक कुबड़ा व्यक्ति रोज़ उस रोटी को ले जाता और बजाय धन्यवाद देने के अपने रस्ते पर चलता हुआ वह कुछ इस तरह बड़बड़ाता- "जो तुम बुरा करोगे वह तुम्हारे साथ रहेगा और जो तुम अच्छा करोगे वह तुम तक लौट के आएगा..।"*

*दिन गुजरते गए और ये सिलसिला चलता रहा..*

*वो कुबड़ा रोज रोटी लेके जाता रहा और इन्ही शब्दों को बड़बड़ाता - "जो तुम बुरा करोगे वह तुम्हारे साथ रहेगा और जो तुम अच्छा करोगे वह तुम तक लौट के आएगा.।"*

*वह औरत उसकी इस हरकत से तंग आ गयी और मन ही मन खुद से कहने लगी की-"कितना अजीब व्यक्ति है,एक शब्द धन्यवाद का तो देता नहीं है, और न जाने क्या-क्या बड़बड़ाता रहता है, मतलब क्या है इसका.।"*

*एक दिन क्रोधित होकर उसने एक निर्णय लिया और बोली-"मैं इस कुबड़े से निजात पाकर रहूंगी।"*

*और उसने क्या किया कि उसने उस रोटी में ज़हर मिला दिया जो वो रोज़ उसके लिए बनाती थी, और जैसे ही उसने रोटी को को खिड़की पर रखने कि कोशिश की, कि अचानक उसके हाथ कांपने लगे और रुक गये और वह बोली- "हे भगवन, मैं ये क्या करने जा रही थी.?" और उसने तुरंत उस रोटी को चूल्हे कि आँच में जला दिया..। एक ताज़ा रोटी बनायीं और खिड़की के सहारे रख दी..।*

*हर रोज़ कि तरह वह कुबड़ा आया और रोटी ले के: "जो तुम बुरा करोगे वह तुम्हारे साथ रहेगा, और जो तुम अच्छा करोगे वह तुम तक लौट के आएगा" बड़बड़ाता हुआ चला गया..।*

*इस बात से बिलकुल बेख़बर कि उस महिला के दिमाग में क्या चल रहा है..।*

*हर रोज़ जब वह महिला खिड़की पर रोटी रखती थी तो वह भगवान से अपने पुत्र कि सलामती और अच्छी सेहत और घर वापसी के लिए प्रार्थना करती थी, जो कि अपने सुन्दर भविष्य के निर्माण के लिए कहीं बाहर गया हुआ था..। महीनों से उसकी कोई ख़बर नहीं थी..।*

*ठीक उसी शाम को उसके दरवाज़े पर एक दस्तक होती है.. वह दरवाजा खोलती है और भोंचक्की रह जाती है.. अपने बेटे को अपने सामने खड़ा देखती है..।*

*वह पतला और दुबला हो गया था.. उसके कपडे फटे हुए थे और वह भूखा भी था, भूख से वह कमज़ोर हो गया था..।*

*जैसे ही उसने अपनी माँ को देखा, उसने कहा- "माँ, यह एक चमत्कार है कि मैं यहाँ हूँ.. आज जब मैं घर से एक मील दूर था, मैं इतना भूखा था कि मैं गिर गया.. मैं मर गया होता..।*

*लेकिन तभी एक कुबड़ा वहां से गुज़र रहा था.. उसकी नज़र मुझ पर पड़ी और उसने मुझे अपनी गोद में उठा लिया.. भूख के मरे मेरे प्राण निकल रहे थे.. मैंने उससे खाने को कुछ माँगा.. उसने नि:संकोच अपनी रोटी मुझे यह कह कर दे दी कि- "मैं हर रोज़ यही खाता हूँ, लेकिन आज मुझसे ज़्यादा जरुरत इसकी तुम्हें है.. सो ये लो और अपनी भूख को तृप्त करो.।"*

*जैसे ही माँ ने उसकी बात सुनी, माँ का चेहरा पीला पड़ गया और अपने आप को सँभालने के लिए उसने दरवाज़े का सहारा लीया..।*

*उसके मस्तिष्क में वह बात घुमने लगी कि कैसे उसने सुबह रोटी में जहर मिलाया था, अगर उसने वह रोटी आग में जला के नष्ट नहीं की होती तो उसका बेटा उस रोटी को खा लेता और अंजाम होता उसकी मौत..?*

*और इसके बाद उसे उन शब्दों का मतलब बिलकुल स्पष्ट हो चूका था-*
*जो तुम बुरा करोगे वह तुम्हारे साथ रहेगा,और जो तुम अच्छा करोगे वह तुम तक लौट के आएगा।।*

              *" निष्कर्ष "*
           ==========
*हमेशा अच्छा करो और अच्छा करने से अपने आप को कभी मत रोको, फिर चाहे उसके लिए उस समय आपकी सराहना या प्रशंसा हो या ना हो..।*

जीवन विचार

*"चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो:- पण त्यांची साथ  कधी सोडत नाही..*

*आणि वाईट लोकांना देव खुप काही देतो:- पण त्यांना साथ कधी देत नाही..*

*ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही.*

*सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.*
*जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची

सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते.. आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते.....* ✍🏻