जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
*लोभ* हा माणसाचा भयंकर शञू आहे. मानवाच्या संग्रही वृत्तीला मर्यादा नाही.

*काम , क्रोध , लोभ* ही तर माणसाच्या नरकाची व्दारे आहेत.माणूस कितीही क्रोधी झाला तरी वाघाइतका क्रोधी होऊ शकत नाही.
परंतु मनुष्याच्या लोभाची बरोबरी कोणीच करू शकत नाही.

जेव्हा गरिबी असते , तेव्हा मनुष्याला अल्प वस्तूची गरज असते , विलासवैभव आले की, त्याच्या गरजा पुष्कळ वाढतात.

परंतु जेव्हा मनुष्य *लोभी* बनतो तेव्हा त्याच्या गरजांना अंतच राहत नाही.अशा लोभी माणसाला सर्व सुखे प्राप्त झाली तरी कधीच समाधान लाभत नाही.

*म्हणूनच संत कबीर यांनी वैराग्याची शिकवण नव्हे तर साध्या व्यवहाराची शिकवण सांगितली आहे.  " पानी वाढो नाव में, घरमें बाढो दाम l दोनों हात उलीचिये , यही सयानो काम ll"*

नावेत पाणी वाढल्याने जसा धोका होतो तसाच घरात धन वाढण्यात धोका आहे .
नावेला पाण्याची गरज आहे. पण ते नावेच्या खाली पाहिजे , आत नको.
*त्याचप्रमाणे माणसाला धनाची गरज आहे पण ते घरात नको , समाजात पाहिजे.*
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

No comments:

Post a Comment