*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग . १९२*
〰〰〰〰〰〰〰
*🌺 अचूक निर्णय* 🌺
=================
चार जण प्रवासाला निघाले होते. चौघांनी मिळून एकच मोठी बॅग घेतली होती. त्यात त्यांचे कपडे, पैसे, सर्व सामान त्यांनी ठेवले होते. वाटेत एका म्हातारीचे घर लागले. तिच्या घरी ती मोठी बॅग ठेवून ते चौघेही जेवायला गेले. जातांना त्यांनी त्या आजीला सांगितले होते. "आजी, आम्ही चौघे मिळून तुझ्याकडे येऊन बॅग मागू तेव्हाच तू आम्हाला बॅग दे. आमच्या चौघांपैकी बॅगची मागणी करतांना एकही जण कमी असल्यास तू बॅग देऊ नकोस"
आजीने मान डोलावली नंतर असे घडले की, त्या चौघांपैकी एक जण आजीकडे आला आणि त्याने बॅग घेऊन तो तात्काळ पसार झाला.
मग ते तिघे आजीकडे आले. आणि त्यांना समजले की, त्याच्यापैकी चौथ्या माणसाने ती बॅग त्या आजीकडून नेली. ते तिघे संतापले. तेनाली रामनकडे गेले. घडलेली सर्व हकीकत त्यांनी सांगितली. आजीकडून नुकसान भरपाई त्यांनी मागितली. तेनाली रामनने त्या तिघांना एक प्रश्न विचारला, तुम्ही चौघे मिळून बॅग मागितल्या नंतर म्हातारीने तुम्हला बॅग द्यावी, अशी तुमची अट होती ना ?
"होय" तिघेही म्हणाले.
"आजी तुम्हाला नुकसान भरपाई न देता तुमची बॅगच तुम्हाला परत करू इच्छिते. सबब, तुम्ही चौघे मिळून या ! तेनाली रामनने निकाल जाहीर केला.
या निकालाने न्यायालयात हशा पिकला आणि त्या तिघांना कळून चुकले की, ते आपला दावा हरले आहेत.
*तात्पर्य - सर्व बाजूंनी पाहून विचार करुनच चोख निर्णय द्यायला हवा.*
*------------------------*
*📝 शब्दांकन/संकलन*

No comments:
Post a Comment