कथा क्रमांक १९४

*माझी शाळा माझे उपक्रम*

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग . १९४*
〰〰〰〰〰〰〰
*🌺जीवन दरीतील दूरावा*🌺
=================

एक छोटा मुलगा आईवर रागावला व म्हणाला ,"मला तू आवडत नाहीस ,मला तू आवडत नाहीस "शिक्षेच्या भितेतून तो घरातून पळाला व एका दरिजवळ गेला .तिथे तो पुन्हा ओरडला ,"मला तू आवडत नाहीस "दरीतून आवाज आला मला तू आवडत नाहीस .आयुष्यात पहिल्यांदा त्याने प्रतिध्वनि ऐकला होता .आपण कोणाला तरी आवडत नाही हे एकुण  तो नाराज झाला व पळत आई कड़े गेला व घडलेला सर्व प्रसंग त्याने आईला सांगितला.

 आईला म्हणाला त्या दरित कोणीतरी दृष्ट माणूस  आहे व त्याला मी आवडत नाही. आईला सर्व काही समजले ती म्हणाली तू पुनः दरिजवळ जा व म्हण की मला तू आवडतोस.

 मुलगा दरिजवळ गेला व म्हणाला ,"मला तू आवडतोस. "दरीतून आवाज आला ,"मला तू आवडतोस."मुलाला आनंद झाला तो आई कड़े आला व आई ची माफ़ी मागु लागला व म्हणाला ,"आई मला तू फार आवडतेस."आईने त्याला घट्ट मिठी मारली .आईच्या डोळ्यात आनंद अश्रु आले.

*तात्पर्यः*
*आयुष्य हे प्रतिध्वनि सारखे आहे जे आपण देतो तेच आपल्याला परत मिळते.म्हणून आपण कोणाशी कसे वागावे ते आपले आपणच ठरवावे.कारण व्देषाने व्देष वाढते आणि प्रेमाने प्रेम वाढते.*
*-----------------------------------*
*📝 शब्दांकन/संकलन*

1 comment: