*शृंगार मराठीचा*
*शृंगार मराठीचा नववधू परी,*
*अनुस्वाराचं कुंकू भाळावरी.*
*प्रश्न चिन्हांचे डूल डुलती कानी,*
*स्वल्पविरामाची नथ भर घाली.*
*काना काना जोडून राणी हार केला,*
*वेलांटीचा पदर शोभे तिला.*
*मात्र्यात गुंफिले चाफ्याचे फूल*
*वेणीत माळता पडे भूल*
*उद् गारवाचक छल्ला असे कमरेला*
*अवतरणाची लट खुलवी मुखड्याला*
*उकाराची पैंजण छुमछुम करी*
*पूर्णविरामाची तीट गालावरी.*
*शृंगार मराठीचा नववधू परी,*
*अनुस्वाराचं कुंकू भाळावरी.*
*प्रश्न चिन्हांचे डूल डुलती कानी,*
*स्वल्पविरामाची नथ भर घाली.*
*काना काना जोडून राणी हार केला,*
*वेलांटीचा पदर शोभे तिला.*
*मात्र्यात गुंफिले चाफ्याचे फूल*
*वेणीत माळता पडे भूल*
*उद् गारवाचक छल्ला असे कमरेला*
*अवतरणाची लट खुलवी मुखड्याला*
*उकाराची पैंजण छुमछुम करी*
*पूर्णविरामाची तीट गालावरी.*
Very nice making poem of Marathi shrungar
ReplyDelete