जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷

*〰〰〰〰〰〰〰*
*प्रत्येक माणसाचा एक खास स्वभाव असतो.*
त्याच्या  जीवनातील कार्यावर त्याच्या स्वभावाची छाप पडत असते.

आपले जीवन सुखी , आनंदी, संपन्न , निर्भय ठेवायचे असेल तर आपल्या सुस्वभावाचा बगीचा आपल्या मनात फुलला पाहिजे.आपल्यातील प्रसन्नता,  आनंदी वृत्ती ही आपल्या आत्म्याची शक्ती आहे. 😊

आपला स्वभाव आपण सतत प्रफुल्लित ठेवायला पाहिजे. माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही म्हणूनच स्वभावाला औषध नाही असे म्हणतात.
प्रत्येक माणूस आपल्या स्वभावानुसार प्रत्येक प्रसंगाचं मूल्यांकन करत असतो.
आपल्यातील यश अपयशाची कारणे पण आपल्या स्वभावावर अवलंबून असतात.

*यश आणि अपयश यामधील फरक सांगतांना आचार्य विनोबा भावे म्हणाले  की , ' यशाने नम्रता आणि अपयशानं उत्साह येतो.'*

एकूण माणसांच्या स्वभावाचं गणित नक्की काही मांडता येणार नाही.आपण आपल्यातील सुस्वभावाविषयीच विचार केला पाहिजे. 😇
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

No comments:

Post a Comment