गीत ( आजोळ) संकलन

आजोळ किती
छान होतं... भावंडांशी
होती गट्टी...
     सा-यांशीच दो
     नव्हती कुणाशी तेव्हा
     कट्टी...
मामीच्याही कपाळावर
नव्हत्या तेव्हा आठ्या
कितीही खाल्या जरी
पापडाच्या लाट्या....
     आजीचे सांधे दुखत नव्हते
     नव्हते कुलर ए.सी
     ऊन्हाळ्याची सुट्टी तेव्हा
    वाटे हवीहवीशी....
पत्त्यांचे खेळ रंगत
माडीवरती अंगत पंगत
माचवलेल्या आंब्यांची
हवीहवीशी होती संगत....
      नदीवरती डुंबत होतो
      खरबुजांवर ताव होता
      गर्द अमराईत वसलेला
     माझ्या मामाचा गाव होता...
नाही आता ती वनराई
रूक्ष रस्ते ठाई ठाई
ओसाड वाडे..पडक्या भिंती
आजही पाणावते आई....
       भाग्यवंत आम्ही जाहलो
        आजोळाचे भाग्य लाभले..
        धाबे अन् कौलारू छपरे
       आठवणींशी बोलू लागले...
🌳🌳🌳🍋🍉🌳🌳🌳

संकलन

No comments:

Post a Comment