*❝गाढव व माळी❞*
*शहराजवळच्या वस्तीवर राहणार्या गाढवाचे शेपूट एके दिवशी कोठेतरी तुटून पडले.*
*शेपटी नसल्याने त्या गाढवाला स्वतःची फार लाज वाटू लागली. तो आपली शेपटी शोधण्यासाठी म्हणून हिंडू लागला.*
*तो एका बागेतून चालला असता तेथील माळ्यास वाटले की हे गाढव आपल्या फुलझाडांची नासाडी करण्यासाठीच आले आहे. म्हणून तो रागारागाने त्या गाढवाच्या अंगावर धावून गेला व त्याने झाडे कापायच्या कात्रीने गाढवाचे दोन्ही कान कापून टाकले.*
*शेपूट हरवल्यामुळे आधीच दुःखी झालेल्या त्या गाढवाचे दोन्ही कान गेले म्हणून त्यास फारच दुःख झाले.*
*❝ तात्पर्य ❞*
*~दुःखाच्या भरात अविचाराने एखादी गोष्ट केली जाते व त्यामुळे जास्तच संकटे निर्माण होतात.~.*

No comments:
Post a Comment