कविता ( निवांत )

*🌷🌷क- कवितेचा🌷🌷*

    *🌹निवांत*🌹
*☘🍀☘🍀☘🍀☘🍀*

✍ शांततेशी मैत्री करणे,
शिकायला पाहिजे.
कधीतरी आपणही,
शांत बसायला पाहिजे.

बोलून बोलून शब्द झिजले,
अर्थ काय कुठे हरवले,
हरवलेले अर्थ शोधायला पाहिजे,
शब्दांची किंमत करायला पाहिजे.
कधीतरी आपणही,
शांत बसायला पाहिजे...

दरवेळेस बोलून दाखवून,
होत नसते काही,
काही गोष्टी जन्मोजन्मी,
जशास तशा राही,
हवे हवे तर हवेच आहे,
नको नकोही झेलायला पाहिजे...
कधीतरी आपणही,
शांत बसायला पाहिजे.

असलेल्या गोष्टी ,
समजून घेतल्यावर,
सगळे सोपे होते.
थंड डोके नी शांत मन,
सर्वच सावरून घेते.
एकट्यात जरा वेळ घालवून,
व्यक्त झाले पाहिजे.
कधीतरी आपणही,
शांत बसायला पाहिजे.

स्वतः स्वतःशी मैत्री करून,
मोकळा श्वास घेतला पाहिजे.
स्वभावाला औषध नाही,
कळायला पाहिजे,
नकळणार्या गोष्टी ,
सोडून द्यायला पाहिजे,
कधीतरी आपणही,
शांत बसायला पाहिजे........
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

No comments:

Post a Comment