✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/03/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक जलदिन* 💥 ठळक घडामोडी :-  १८६८ - रॉबर्ट मिलिकेन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. १८६९ - एमिलियो अग्विनाल्डो, फिलिपाईन्सचा पहिला राष्ट्राध्यक्ष. 💥 जन्म :- १९८४ - प्रभाकर आत्माराम पाध्ये, मराठी पत्रकार, लेखक. 💥 मृत्यू :-  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *जम्मू-काश्मिरच्या कुपवाडा येथे अतिरेक्यांसोबतच्या चकमकीत चार जवान शहीद. चार अतिरेक्यांना कंठस्नान. तिघांचा शोध सुरू.* ----------------------------------------------------- 2⃣ *यवतमाळ : नगरपरिषदेने थकीत वीज बिलाचे एक कोटी रुपये भरल्याने बुधवारी होणारी वीज कपातीची नामुष्की टळली. नगरपरिषदेकडे दोन कोटी ८१ लाख रुपये थकीत.* ----------------------------------------------------- 3⃣ *जळगाव : मनपाच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा सलग दुसऱ्या दिवशी बंद. कोट्यवधींची उलाढाल ठप्प.* ----------------------------------------------------- 4⃣ *जगभरातील रेल्वेगाड्यांना ‘चाकण’चे इंजीन, जर्मनीतील प्रकल्प येणार भारतात* ----------------------------------------------------- 5⃣ *हिंगोली : कर न भरल्याने औंढा नागनाथ येथील महावितरण कार्यालयास महसूल विभागाने सील ठोकले.* ----------------------------------------------------- 6⃣ *चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे लवकरच न्यायालय सुरू होणार, राज्याच्या मंत्रिमंडळाने यासंदर्भात घेतला निर्णय* ----------------------------------------------------- 7⃣ *सलग दोन वेळा मि. इंडिया 'किताब जिंकणाऱ्या सुनीत जाधवला पुण्यात हॅटट्रिक नोंदवण्याचा विश्वास* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक जलदिन निमित्ताने..* पाणी म्हणजे जीवन वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/04.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रमेश देव*  हे मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. मराठी अभिनेत्री सीमा देव त्यांची पत्‍नी असून अभिनय देव आणि अजिंक्य देव ही यांची मुले आहेत. राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *"मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ."* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  पंजाबची राजधानी कोणती ?* 👉 चंदीगड *२) चंद्रपूरच्या अभयारण्यचे नाव काय आहे ?* 👉   ताडोबा *३)  महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?* 👉 पुणे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 रमेश कत्तूरवार, पत्रकार, धर्माबाद 👤 सनीदेवल जाधव 👤 शंकर वर्ताळे 👤 गणेश मैद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *गोंधळ* रोजच्या गोंधळाला लोक हसत असतात अंधारात केलेल्या गोष्टी उजेडात येत असतात अंधारात करा की उजेडात गोंधळ बाहेर येतो आपल्याला वाटत नसला तरी चर्चेचा विषय होतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एका सोनाराच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हटले,,"दादा, आपले दुःख खरे तर एकसमान आहे. दोघांनाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?"* *लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघांनाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाही एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुस-याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."* *"माणसांचेही तसेच आहे, आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो."* ••●❤‼ *रामकृष्णहरी* ‼❤●•• ❤❤❤❤❤❤ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जर प्रत्येकाने आपल्या कामाचे नियोजन पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले तर ते काम यशस्वीपणे पार पडेल. अन्यथा कामामध्ये व्यवस्थितपणा राहणार नाही.कामाचा दर्जाही घसरेल,मनाची घालमेल होईल, कामामध्ये लक्ष राहत नसल्यामुळे आणि एकाग्रता नसल्यामुळे स्वत:मध्ये चिडचिडेपणा येऊन आपला राग समोरच्या व्यक्तीवर काढायला लागतो.या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कामात पूर्वनियोजन करायला हवे.तरच आपल्याला मानसिक समाधान मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *हत्ती गेला नि शेपूट राहिले* - कार्याचा मोठा भाग पार पाडून, थोडेसे कार्य शिल्लक राहणे. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सवयीचा परिणाम* एका माणसाने त्‍याच्‍या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्‍या पोपटाला चांगले खायलाप्‍यायला मिळत असे व पोपट बोलका असल्‍याने घरातील लोकांकडून त्‍याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्‍या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्‍य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्‍या माणसाने पोपटाला खाणे देण्‍यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्‍याच्‍याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्‍याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्‍या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्‍याने त्‍याला फारसे नीट उडताच येत नव्‍हते. एका झाडावर गेला असता त्‍याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्‍याने त्‍याला पोपटांची भाषा येत नव्‍हती म्‍हणून इतर पोपटही त्‍याला सहकारी मानत नव्‍हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्‍याने त्‍याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्‍याने तो आजारी पडला व मरून गेला. तात्‍पर्य : - जास्‍त काळ पारतंत्र्यात (गुलामगिरीत) राहिल्‍याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्‍कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्‍वातंत्र्य टिकवण्‍यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्‍या संस्‍कृतीचे चांगले काही घेताना आपल्‍या संस्‍कृतीचे विस्‍मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment