*👩🏻भातुकली*👳‍♂ जन्मोजन्मीचा संसार थाटला होता मनात भातुकलीचा खेळावानी मोडून पडला क्षणात सुखदुःखाचे धागेदोरे जुळले होते सगेसोयरे विसरू कशी मी तरी रे सोडूनी तू गेला जरी रे आईबापाचा आधार मागितला जरी जीवनभर सोडूनी गेले मज जरी वात्सल्याची ही नजर खेळ मांडूनी मायेचा सारा संसार विस्कटला पिलासाठी जीव तुझा का नाही गुंतला जन्मोजन्मीचा बंधनाचा धागा हा जुळला भातुकलीचा खेळ माझा स्वप्नासारखा तोडला साकडं तुझ्या वचनाच बंधन बांधून जन्माच आहे भास तुझा मनात येशील रोज स्वप्नात. 〰〰〰〰〰〰 *स्वरचित* *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment