आज परत एकदा *नकळत* *मुंगी* तळ्यात पडली स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं *पान* आणि *कबुतराची* वाट पाहू लागली. मीच का सतत हिला वाचवावे ..? हा कबुतराचा *अहंकार* आड आला. झाडावरच बसून *असहाय्* मुंगीला मरताना पाहू लागले... कबुतराने *मदत* करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली...तरी कबुतर आपल्याच विचारात मश्गुल होते. मुंगी असहाय्तेमुळे *गतप्राण* झाली... कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं... *पारधी* येणार हेच विसरून गेलं... पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाणा साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणि निशाणा चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला....! कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. *झाड* मात्र त्या दिवशी खूप रडले. मुंगी,कबुतर मेल्याचं दुःख होतंच ..... पण त्याहूनही *परोपकाराची भावना मेल्याचं होतं !* *अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते !

No comments:

Post a Comment