जगण्याच सूत्र चुकतंय का ?

' जगण्याचं सूत्र चुकतंय का? '
---------------

माणूस काही अहंकार
सोडायला तयार नाही
जगण्याचं " सूत्र " चुकतंय
पण खोडायला तयार नाही

भाऊ काय बहीण काय
नुसता फापट पसारा
कोण कोणाला विचारतय
कुणालाही विचारा

कुणी कोणाकडे जाई नं
कुणी कुणाकडे येई नं
जगलात काय मेलात काय
माया कुणाला येई नं

संवेदनशीलता  आता
फारशी कुठं दिसत नाही
बैठकीत किंवा वसरीवर
गप्पाची मैफिल बसत नाही

पॅकेज , इनक्रिमेंट , सॅलरी
इन्व्हेस्टमेंट , विकएन्ड
यातच हल्ली माणसाचा
होत आहे   the  end

Luxury मधे लोळताना
फाटकं  गाव नको वाटतं
जवळचं नातं असलं तरी
सांगायलाही नको वाटतं

उच्च शिक्षित असूनही
माणूस आज mad वाटतं
इंटेरियर केलेल्या घरामधे
लुगडं , धोतर odd वाटतं

सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे
कसे काय posh असतील
पार्लर मधून आणल्या सारखे
चिकणे चोपडे ब्युटी दिसतील

उन्हा तान्हात तळणारी
माणसं काळी पडणारच
गरिबिन गांजल्यावर
चेहऱ्याचा रंग उडणारच

कुरूप ते नाहीत
कुरूप तू झालास
प्रेम नात्यावर करायचं सोडून
दिसण्याला भुलून गेलास

काळी असो गोरी असो
माय ही माय असते
बाप स्वतःला गाडून घेतो
म्हणून तुझी मजा असते

पात्र कितीही मोठं झालं
तरी गंगेच मूळ विसरू नये
सुख असो का दुःख असो
आपल्या माणसाला विसरू नये

दिसण्यावर प्रेम करू नकोस
आपलं समजून जवळ घे
एरव्ही नाही आलास तरी
दिवाळीला तरी घरी ये

कॉम्पुटरच्या भाष्या खूप शिकल्यास
आपल्या माणसावर प्रेम करायचं शिक
नसता मानसिक आरोग्यासाठी दारोदार मागत फिरशील भीक

दुसऱ्याचा  छळ करून
तुम्ही सुखी होणार नाही
पॅकेज कितीही मोठं असू द्या
जगण्यात मजा येणार नाही

जग जवळ करतांना


आपली माणसं तोडू नका
अमृताच्या घड्याला
अविचाराने लाथाडू नका

No comments:

Post a Comment