माझी छकुली

बाबा बाबा शाळा उघडली
पेन नाही नाही वही
लेकरा मागच्या वर्षाच बघ काही
माझ्या खिशात रूपया नाही

बाबा वह्या भरल्या
दफ्तरही लय जुन झाल
बूटाच तळ निसटल
कापड थिगळ लावून जोडल

बाबांच्या डोळ्यात पाणी
बोलताना हादरली वाणी
कशी सांगू बाळा कहाणी
दुष्काळान सार नशीब फाटल

बाळा तू शिक माणूस व्हय मोठा
शेतात राबून जिंदगीचा तोटा
लय कष्ट करीन मी पुरवीन नोटा
पण बाळा तू शिक माणूस व्हय मोठा

बाबांच्या डोळ्यात आसू दाटल
पोराला सार समजल
फाटक दप्तर भरल
मोठा माणूस होण्यासाठी शाळेला निघाल


#शेतकऱ्याची_पोरं
#शिक्षण
#दुष्काळ

No comments:

Post a Comment