बोधपर कथा

🌸  बोधपर कथा 🌸
 🐕 कुत्र्या कडून मैनेजमेंट लेसन :

एक दिवस एक 🐕 कुत्रा जंगलात रस्ता  चुकला.
त्याने पाहिले एक वाघ 🐅
त्याच्या दिशेने येत होता.
🐕 कुत्रा घाबरला.
आता आपली धडगत नाही.
हा आपल्याला खाणार.
समोर काही हाडे पडली होती.
🐅 वाघाकडे पाठ करुन
त्यातले एक हाड उचलून कुत्रा
🍖 🐕चोखू लागला.
आणि जोराने म्हणू लागला

"वा !👌👌 वाघाला खाण्याची
मजा काही औरच.
अजुन एखादा वाघ 🐅 मिळाला
तर खुप छान होईल !"
असे म्हणून एक जोराचा ढेकर दिला.
वाघ हे ऐकून घाबरला.
हा तर वाघाचा शिकारी आहे.
आपले काही खरे नाही.
आणि तो तिथून निघुन गेला.
हे सर्व झाडावर बसलेल्या
🐒माकडाने पाहिले होते.
 त्याने विचार केला की 🐅 वाघाशी मैत्री करण्याची ही चांगली संधी आहे. त्याला खरे खरे सगळे सांगितले तर आयुष्य भर कधीच वाघ आपल्याला त्रास देणार नाही.
ते माकड 🐒🐅 वाघाच्या पाठोपाठ लगेच निघाले.
🐕 कुत्र्याने वाघाच्या 🐅 मागे 🐒 माकडाला जाताना पाहिले
आणि कुत्रे मनात म्हणाले
"काही तरी गडबड आहे"

तिकडे वाघाला भेटून माकडाने
सर्व हकीकत सांगितली
आणि कुत्र्याने तुला कसे फसवले
ते दाखवुन दिले.
वाघाला 🐅 आता कुत्र्याचा 🐕
खुप राग आला.
तो माकडाला म्हणाला
"चल माझ्या सोबत आज
 कुत्र्याचा खेळ कसा संपवतो ते बघ"

असे म्हणून माकडाला
पाठीवर घेवून कुत्र्याच्या
दिशेने निघाला.
वाघाला माकडा 🐅🐒सहित येताना पाहुन  🐕 कुत्रा
परत त्या दिशेला पाठ करुन बसला. आणि जोराने वाघाला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला
 "या माकडाला पाठवून
तास होऊन गेला
एका वाघाला फसवुन
इथे घेवून येवू शकत नाही हा!"
हे वाक्य ऐकताच वाघाने
पहिले काय केले असेल
याची कल्पना आली असेलच

👉 तात्पर्य :
आपल्या आजुबाजुला अशीच
अनेक माकडे 🐒 🐒असतात,
त्यांना ओळखायला हवे.
हुशार राहून संकटांचा सामना करायला हवा.

No comments:

Post a Comment