✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि.30/10/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०१३ - आंध्र प्रदेशच्या महबूबनगर जिल्ह्यातील पालेम गावाजवळील पुलाच्या कठड्याला धडकून बसगाडीला लागलेल्या आगीत ४५ ठार, ७ जखमी. 💥 जन्म :- १८८१ - नरेंद्र देव, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते १९०९ - डॉ.होमी भाभा, भारतीय शास्त्रज्ञ १९४९ - प्रमोद महाजन, भारतीय जनतापक्षाचे नेते 💥 मृत्यू :- १९२८ - लाला लजपतराय, भारतीय स्वातंत्र्यसेनानी १९७४ - बेगम अख्तर, गझल गायिका 'मलिका-ए गझल' १९९६ - प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये, मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते १९९८ - विश्वनाथ चिंतामण ऊर्फ विश्राम बेडेकर मराठी साहित्यिक आणि चित्रपट दिग्दर्शक १९९९ - वसंत हळबे, व्यंगचित्रकार २०११ - अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : दोन दिवसांच्या जपान दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जम्मू-काश्मीरमधील लडाख परिसरात सव्वा आठच्या सुमारास 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *जळगाव - दूध उत्पादकांना ५ रूपये अनुदानाला ३ महिने मुदतवाढ, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नाशिक : आजपासून सलग 3 दिवस दारणा धरणातून 15 हजार क्यूसेस तर गंगापूर धरणातून 3 हजार क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *श्रीलंका : सुरक्षा रक्षकाने आंदोलकांवर गोळीबार केल्याप्रकरणी श्रीलंकेचे माजी कर्णधार तथा पेट्रोलियममंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताने चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा २२४ धावांनी केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. https://sharechat.com/post/nkJ3P0p Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. होमी भाभा* डॉ. होमी भाभा भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते मानले जाते. भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तिमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम व्यक्ती होते. त्यांचे प्राथमिक ते पदवीपयर्ंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनीयर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रेच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनीयरिंगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रिज विद्यापीठातून इ.स. १९३0 साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करून इ.स. १९३३ साली त्यांनी डॉक्टरेट मिळवली. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली. इ.स. १९४0 साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मुलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु ऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक पर्शिमांमुळेच भारत देशात अणुभट्टीची स्थापना होऊ शकली. अणूचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणुभट्टय़ा सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. संयुक्त राष्ट्रच्या सभेला जाताना २४ जानेवारी, इ.स. १९६६ या दिवशी फ्रान्सच्या हद्दीत असताना त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर ट्रॉम्बे येथील अणू संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणू संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) तेराव्या वित्त आयोगाची स्थापना कधी झाली ?* नोव्हेंबर २00७ *२) 'गांधी : अँन इलिस्ट्रेटेड बायोग्राफी' या पुस्तकाचे लेखक कोण ?* प्रमोद कपूर *३) 'नॅसडॅक'चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?* न्यूयॉर्क *४) विश्‍वाच्या निर्मितीचा शोध घेण्यासाठीच्या महाप्रयोगाचे नाव काय ?* लॉर्ज हॅड्रॉन कोलायडर *५) महाराष्ट्रातील शेकरू खारीसाठी प्रसिध्द अभयारण्य कोणते ?* भीमाशंकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  शैलेंद्र सुरकूटवार ●  पंकज गादेवार ●  श्याम स्वामी, हिंगोली ●  संग्राम टेकाळे ●  बसवराज पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धीर* कधी धरावा लागतो आपला आपण धीर कठीण प्रसंगी रहावे फक्त काही काळ स्थीर धिराने राहिल्यावर मन स्थिर रहाते मन स्थिर असेल तर केवढेही संकट दूर पळून जाते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••● *विचारधन* ●•• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• *मडक्यासाठी लागणारी माती आणण्याला कुंभाराने गाढव पाळलेले असते. गाढव जेव्हा रिकामे असते तेव्हा ते मालकाच्या अंगणात थांबत नाही. ते सरळ उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात बसते. पालापाचोळा साली-टरफले सारे ते मटकावते. प्रत्येक प्राण्याच्या काही त-हा असतात. खाण्याच्या काही सवयी असतात. गाढवाला अगदी गूळपाण्यात भिजवलेली डाळ दिली तरी ते मनापासून खाणार नाही. उकिरड्यावर पडलेले उष्टे अन्न मनापासून खाईल.* *माणसांचेही तसेच असते, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या त-हा असतात, सवयी असतात. "विशिष्ट व्यक्तिला विशिष्ट गोष्टीच आवडतात, आणि विशिष्ट व्यक्ति विशिष्ट ठिकाणीच सापडते. त्यांना दुसरीकडे शोधायचे कारण नाही."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 48* कबीर संगी साधु का, दल आया भरपूर । इन्द्रिन को तब बाँधीया, या तन किया धर । अर्थ : खर्‍या संतांच्या संगतीने माणसाच्या वर्तनात बदल होतो. संत संगतीमुळे मानवाला कल्याणकारी मार्ग सापडतो. संत द्वेष, माया, मोह ,विकार, वासना यापासून अलिप्त राहतात. संताचे ठायी विचार , विवेक, वैराग्य, दया, क्षमा, समता , निरामयता इ सद्गुणांची खाणंच असते. त्यांच्या कृपा कटाक्षाने सुद्धा काळीज फुटेतो धावणार्‍याला शांती मिळते व तो समाधानाच्या मार्गावर येतो. विज्ञानाचा पदवीधर असणार्‍या नरेंद्राच्या मस्तकी गुरू रामकृष्ण परमहंसांचा स्यर्श झाला. मनाची चंचलता नाहीशी होवून नरेंद्र अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारा पहिला तत्ववेत्ता ठरला. अध्यात्म व विज्ञानाने एकमेकांच्या हातात हात घेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मानवतेला विकासाची जोड मिळेल व विज्ञानाच्या बुद्धि प्रामान्यतेला सहृदयता मिळेल. हे संपूर्ण जगाला सांगणारा तो विज्ञाननिष्ठ संन्यासी 'स्वामी विवेकानंद' होतो . किती मोठी अद्भूत शक्ती संचरत असते, खर्‍या साधूंच्या ठायी ! खरे साधू भौतिक सुखांच्या सान्निध्यात वावरूनही त्यांची कधीच आस धरीत नाहीत. संन्यासी वृत्तीनं जगताना इंद्रीयांच्या अधिन असणार्‍या मनालाच हे संन्यस्त जिंकून घेतात. मनाला विकारी न होवू देता विवेकपूर्ण जगत निरामयतेचा अंगीकार करून हे दिव्यत्वानं जगालाच भारून टाकतात. त्यांचं क्षणभराचं सान्निध्यही माणसाला दिव्य दृष्टी बहाल करून जातं. खर्‍या संत, सज्जनाच्या सहवासाने जीवनाला मानवतेची जोड मिळते. माणूस विकारमुक्त होऊन विवेकानं जगायला लागतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात मौल्यवान वस्तू सांभाळून त्यात वेळ वाया घालवतो, त्यामुळे मानसिक अवस्थाही चलबिचल होते, एवढे सांभाळूनही कधी कधी जीवाला ही धोका पत्करावा लागतो आणि आपली झोपही उडून जाते.हे सांभाळण्यापेक्षा जीवनात चांगली माणसं भेटली तर त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करायला हवा.कारण ती आपल्या जीवनात आलेल्या कोणत्याही संकटकाळात आपल्या मदतीला धावून येतील.तीच खरी आपली मौल्यवान संपत्ती आहे. त्यांना आपल्या जीवनात मौल्यवान दागिण्यापेक्षा अधिक जपायला हवे.त्यांच्यापासून आपल्या जीवीताचे रक्षणही होईल,मन चलबिचल होणार नाही , निवांतही झोप लागेल आणि चांगली माणसे आपल्या जीवनात आली म्हणून समाधानही वाटेल.अशा माणसांना आपल्या काळजामध्ये स्थान देऊन त्यांचे जतन केले पाहिजे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संगत - Compatible* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सखोल अभ्यास खूप वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. भारतावर इंग्रजांचे राज्‍य होते. माणसांनी खच्‍चून भरलेली एक रेल्‍वे प्रवास करत होती. प्रवाशांमध्‍ये जास्‍तीत जास्‍त भरणा हा इंग्रजांचाच होता. एका डब्‍यात एक भारतीय गंभीर चेहरा करून बसलेला होता. सावळ्या रंगाचा, मध्‍यम उंचीचा हा मनुष्‍य साधारणप्रतीचे कपडे घालून प्रवास करत होता. त्‍याच्‍या रंगाकडे आणि एकूणच अवताराकडे बघून डब्‍यातील बहुतांश इंग्रज त्‍याची चेष्‍टामस्‍करी करत होते. त्‍याला खेडूत, अडाणी समजून त्‍याच्‍या अवताराची ते टिंगल करत होते. पण त्‍यांच्‍या त्‍या चेष्‍टामस्‍करीकडे, टिंगल करण्‍याकडे त्‍या भारतीयाचे लक्ष नव्‍हते. तो त्‍याच्‍या नादात मग्‍न होता. अचानक तो भारतीय उठला आणि त्‍याने रेल्‍वेची साखळी ओढली. वेगात धावणारी ती आगगाडी तात्‍काळ थांबली. गाडीतले प्रवासी त्‍याला काहीबाही बोलू लागले. थोड्याच वेळात गार्डही तेथे आला व त्‍याने विचारले,’’ कोणी साखळी ओढून ही रेल्‍वे थांबविली’’ त्‍या सावऴया रंगाच्‍या व्‍यक्तिने उत्तर दिले,’’मी ओढली साखळी, मी थांबवली रेल्‍वे’’ गार्डने या कृतीचे कारण विचारले असता ती व्‍यक्ति उत्‍तरली,’’माझ्या अंदाजानुसार इथून काही अंतरावर रेल्‍वे पट्ट्या खराब झाल्‍या आहेत.’’ गार्डने विचारले,’’ हे तुला कसे कळले’’ ती व्‍यक्ति म्‍हणाली,’’ माझ्या अनुभवानुसार रेल्‍वेच्‍या गतीमध्‍ये काही फरक पडला आहे आणि त्‍यामुळे रेल्‍वेचा जो विशिष्‍ट आवाज येतो तो न येता आवाज न येता वेगळा आवाज येऊ लागला आहे. असा आवाज फक्त रेल्‍वे पट्ट्या खराब असतानाच येतो हे माझे गणित आहे. आपण याची खात्री करून बघू शकता.’’  गार्डने याची खातरजमा करून बघण्‍यासाठी त्‍या व्‍यक्तिला बरोबर घेतले व पुढे जाऊन पाहतात तो काय, एका ठिकाणी खरोखरीच रूळाच्‍या पट्ट्या निसटून रूळ सटकले होते. तेथील नटबोल्‍टही तेथूनच बाहेर पडलेले दिसून येत होते. हे सर्व होत असतानाच रेल्‍वेत त्‍या माणसाची टिंगल करणारे प्रवासीही तेथे येऊन पोहोचले व हे सर्व पाहून ते आश्‍चर्यचकित झाले. केवळ त्‍या माणसाच्‍या ज्ञानामुळे आज त्‍यांचे प्राण वाचले होते हे जाणवून ते सर्व आता त्‍या माणसाची प्रशंसा व स्‍तुती करू लागले. गार्डने त्‍यांचे आभार मानले व विचारले,’’ सर, मी तुमचे नाव व हुद्दा जाणू शकतो काय’’ त्‍या माणसाने शांतपणे उत्तर दिले,’’ माझे नाव डॉ.एम. विश्र्वेश्‍वरैय्या असून मी व्‍यवसायाने इंजिनियर आहे.’’ त्‍यांचे नाव ऐकताच सगळेचजण स्‍तब्‍ध झाले. कारण त्‍याकाळात विश्र्वेश्‍वरैय्या यांना संपूर्ण देश एक हुशार इंजिनिअर म्‍हणून ओळखत होता. टिंगल करणा-या लोकांनी त्‍यांची क्षमा मागितली. तात्पर्यः सखोल अभ्यास असलेल्या व्यक्ती अतिशय सयंमी शांत व वैचारिक दृष्टीने उच्च असून दूरदृष्टी ठेवून वागतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment