✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/10/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- 1969 - अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना 💥 जन्म :- 1916 - लोकशाहीर अमर शेख 1963 - नवज्योतसिंग सिद्धू 1978 - वीरेंद्र सेहवाग 💥 मृत्यू :- 1974 - प्रतिभावान गायक मास्टर कृष्णराव  1999 - समाजवादी नेते, पत्रकार माधवराव लिमये *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळं दुष्काळाचं सावट आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतून मदत करू, शिर्डी साई समाधीच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शब्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जम्मू-काश्मीर - बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *ओडिशा - तितली वादळात नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली १ हजार कोटींची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *देशाचे संविधान जगात सर्वोत्तम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन दीक्षाभूमीच्या विकासासाठी ४0 कोटींचा धनादेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पंजाब : अमृतसरमध्ये रावणदहनासाठी जमलेल्यांना भरधाव ट्रेनने उडवले, 50 हून अधिक जणांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *चीनने ब्रम्हपुत्रेचे पाणी अडवले, अरुणाचलमध्ये दुष्काळाचे सावट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *क्रिकेट विश्वामध्ये भारतीय करतात सर्वात जास्त सट्टेबाजी; आयसीसीचा मोठा खुलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल. Follow me on Share Chat https://b.sharechat.com/RsYQB4kJ9Q *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गावाकडच्या आठवणी ...* https://b.sharechat.com/gYLkILcR8Q आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोकशाहीर अमर शेख*      ख्यातनाम मराठी लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. आईचे नाव मुनेरबी. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टरविनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०—३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला(१९४७).स्वतः एकश्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याला काय लिहावं यापेक्षा काय लिहू नये हे कळतं तोच खरा लेखक ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) सहय़ाद्री पर्वत राज्याच्या कोणत्या दिशेने पसरला आहे ?* दक्षिण-उत्तर *२) न्यूझिलंडची राजधानी कोणती ?* वेलींग्टन *३) वॉल स्ट्रीट हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ कोठे आहे ?* न्यूयॉर्क *४) तामिळनाडूतील थंड हवेचं ठिकाण कोणतं ?* कोडाईकॅनॉल *५) इंडियन मिलिटरी अकादमी कोठे आहे ?* डेहराडून *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  गजानन वडजे ●  राजेश्वर वावधाने, मुखेड ●  संदीप भंडारे, येवती ●  आनंद बलकेवाड, येवती ●  लक्ष्मण आगलावे, धर्माबाद ●  ओम धूळशेट्टे ●  अरुण निलावार ●  दत्ता सूर्यवंशी ●  बंडू अमृतवार ●  शिवाजी पाटील ●  अतुल जाधव ●  इम्तियाज शेख *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *असे जगा* जीवन असे जगा जे इतरांच्या कामी येईल तुमची ओळख फक्त तुमच्या नामी होईल इतरांसाठी जगलात तर तुमची ओळख राहील कोल्ह्या कुत्र्या सारखी नस्ता आपली गत होईल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण मित्राला बोलतो, 'उद्या मला सकाळी फोन कर, मग आपण ठरवू या.' असं म्हणताना आजची रात्र सुखरूप पार करून उद्याची सकाळ आपण अनुभवणार आहोत यावर आपला ठाम विश्वास असतो. असे छोटे छोटे विश्वास ठेवल्याशिवाय गाडा पुढे हाकता येत नाही.* *एक बस स्टँडच्या फलाटाला लागते. आपण गावाच्या नावाची पाटी वाचून खात्री करून घेतो आणि बसमध्ये चढतो. तिकीट काढतो. सोबतचा घडी केलेला पेपर उघडून वाचायला लागतो किंवा डोळे बंद करून डुलक्या घेतो. हलणा-या बसमध्ये निवांतपणे खिडकीतून बाहेर बघत बसतो. काही वेळा चिल्लर पैशांवरून कंडक्टरशी वाद होतात. वळण घाटाचा रस्ता पार करून आपल्या थांब्यावर बस आणून सोडते. या सगळ्या प्रवासात बस चालवणा-या ड्रायव्हरचा चेहराही आपण पाहिलेला नसतो. त्या ड्रायव्हरच्या भरोशावर आपण बसमध्ये निवांतपणे बसलेलो असतो. कंडक्टरशी रुपया आठाण्यावरून वाद करणारा प्रवासी स्वत:चा जीव, चेहराही न पाहिलेल्या ड्रायव्हरच्या हवाली करतो. किती विश्वास ठेवतो आपण अनोळखी माणसावर.. 'विश्वास' फार महत्वाचा असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *क्रमांक 41* *हीरा परखै जौहरी* *शब्दहि परखै साध ।* *कबीर परखै साध को* *ताका मता अगाध ॥* अर्थ: हिरा म्हणजे काय असतो बरं ! अज्ञानी माणसाच्या दृष्टीनं तो कोळशाचाच प्रकार. परंतु कोळशाआड दडलेला हिरा ओळखण्याची दृष्टी एखाद दुसर्‍याकडे म्हणजेच जवाहिर्‍याकडे असते. अन इत्तरांंच्या दृष्टीत कोळसा असणार्‍या हिर्‍यांचं मोल जवाहिर्‍याचं जाणतो. त्याप्रमाणे शब्दांचं मोल जाणण्याचं सामर्थ्य विवेकी साधू सज्जनांच्या विचारवंताच्याच्या ठायी असतं. महात्मा कबीर सांगतात की जो सज्जन व दुर्जनांना पारखून घेतो. त्याचे मत अधिक गहन गंभीर असते. ज्याच्या उक्ती अन कृतीमध्ये फरक नसतो. तिच व्यक्ती खर्‍या अर्थाने वंदनीय असते. त्याच्या ठायी लोक कल्याणाची सद्भावना दडलेली असते. ती माणसंच लोकनायक म्हणून अजरामर झाली आहेत. अशा नायकांना पारखून त्यांचे समर्थन करणारेही कौतुकास पात्र ठरले आहेत. याउलट ज्यांनी सत्तेचा व पदांचा दुरूपयोग केला. लोक कळवळा दाखवत लोकांना कळा सोसायला लावल्या असे राजे व त्यांच खरं रूप कळूनही त्यांचा उदो उदो करणारे भाट पात्रे सदैव तिरस्कार व अवहेलनेचेच धनी बनले आहेत किंबहुना ती खलनायक व दुष्टपात्रे म्हणूनंच दुष्किर्ती पावली आहेत. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे पाण्याचे महत्त्व तहान लागल्यावर कळते आणि ते आपल्या जवळ नसते तेव्हा अधिक कळायला लागते. जेव्हा आपल्याजवळ खूप असते तेव्हा त्याची किंमतही आपण करत नाही. अशाचप्रकारे काही सज्जन माणसांच्या बाबतीत असते.जेव्हा सज्जन आणि मोठ्यांच्या उपदेश करणा-यांच्या सहवासात राहतो तेव्हा आपल्याला त्यांनी केलेल्या उपदेशाची किंमत कळत नाही पण ती माणसे आपल्या पासून निघून जातात आणि मग कुठेतरी आपले चुकत आहे असे कळायला लागते तेव्हा त्यांची गरज आहे असे वाटायला लागते. अशावेळी मग त्यांना शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो तेंव्हा ती माणसे भेटत नाहीत. मग अशावेळी आपल्या जीवनात जीवन जगण्यासाठी जसे पाणी महत्त्वाचे आहे तसे आपल्या जीवनाला चांगला मार्ग दाखवणा-या सज्जन आणि मोठ्या उपदेशी करणा-या माणसांची गरज आहे. या दोघांनाही आपल्या जपायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मौल्यवान - Valuable* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वस्तूची किंमत* खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक कामगार आपल्या गाढवासोबत जंगलातून चालला होता. इतक्यात रस्त्याच्या बाजूला त्याला काही चमकताना दिसलं. त्यानं जवळ जाऊन पाहिलं तर तिथे एक चमकणारा दगड पडलेला होता. त्यानं तो उचलून आपल्या गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि पुढे चालू लागला. समोरून येणाऱ्या एका हिरे व्यापाऱ्यानं गाढवाच्या गळ्यात अडकवलेला तो मौल्यवान दगड बघितला. मग त्यानं गाढवाच्या मालकाला विचारलं, ‘भाऊ मला हा दगड विकत घ्यायचा आहे. तुम्ही याचे किती पैसे घेणार?’. कामगाराला दगडाच्या किंमतीबाबत काहीच कल्पना नव्हती. फक्त शंभर रूपये घेईन, असं त्यानं सांगितलं. त्यावर हिरे-व्यापारी म्हणाला ‘शंभर रूपये तर खूप जास्त आहेत. मी फक्त पन्नास रूपयापेक्षा अधिक रक्कम नाही देणार.’ कामगारानं थोडा विचार केला आणि शंभर पेक्षा कमी रुपये घेणार नाही, असं सांगितलं. व्यापाऱ्याला वाटलं की या मौल्यवान दगडासाठी त्याला कोणी गिऱ्हाइक मिळणार नाही. मग हा कामगार ५० रुपयात हा दगड विकण्यासाठी आपल्या मागं येईल. थोडावेळ जाऊनही कामगार त्या व्यापाऱ्याजवळ आला नाही. अखेर व्यापारीच त्याच्या शोधात निघाला. त्याला दिसलं की दुसरा एक व्यापारी त्याच्याकडून तो मौल्यवान दगड विकत घेत आहे. तो व्यापारी पळत कामगाराजवळ पोहोचला. तोपर्यंत व्यवहार पूर्ण करून समोरचा व्यापारी निघून गेला. त्या व्यापाऱ्यानं कामगाराला विचारलं की, ‘तो दगड तू किती रुपयांना विकला?’. कामगार म्हणाला, ‘२०० रुपये’. व्यापाऱ्यानं त्याला म्हणाला, ‘अरे मुर्खा तो दगड अत्यंत मौल्यवान होता आणि तू अवघ्या २०० रुपयांना विकलास!’ त्यावर कामगार उत्तरला, ‘मूर्ख मी नाही, तुम्ही ठरलात. कारण मला तर तो दगड रस्त्याच्या बाजूला पडलेला मिळाला होता आणि त्याची किंमत माहित नव्हती. पण तुम्हाला त्याची किंमत माहित असून देखील तुम्ही अवघ्या ५० रुपयांच्या हव्यासापोटी तो दगड विकत घेतला नाही. १०० रुपयात तो दगड विकत घेतला असता तर भविष्यात तुम्हाला मोठा फायदा मिळाला असता.’ *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment