*'वाद'आणि 'चर्चा' यात फरक काय..?*
वादातून "भांडणं" होतात;
चर्चेतून "गोष्टी स्पष्ट" होतात.
वाद "अहंकार आणि संकुचित मनातून" होतो; तर चर्चा "मोकळ्या मनातून" होते.....
वादात "अज्ञानाची देवाणघेवाण" होते, तर चर्चेत "ज्ञानाची देवाण घेवाण" होते.
वाद ही "रागाची अभिव्यक्ती" आहे;
तर चर्चाही "तर्काची अभिव्यक्ती" आहे...
वादातून कोण बरोबर हे "सिध्द करण्याचा प्रयत्न होतो"
तर चर्चेतून' "काय बरोबर हे सिध्द करण्याचा" प्रयत्न होतो
वाद "निरर्थकच" असतो..
*"वादा" पेक्षा "चर्चेने" आणि "चर्चे" पेक्षा, "संवादाने" प्रश्न "मार्गी" लागतात.*
No comments:
Post a Comment