✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ दि. 27/01/2023 वार - शुक्रवार=========ஜ۩۞۩ஜ=========🌷    .  *दिनविशेष* .   🌷=========ஜ۩۞۩ஜ=========💥 ठळक घडामोडी :- १९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.💥 जन्म :-१९०१: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी१९२२: हिन्दी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित१९२६: भारताचे १३ वे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य💥 मृत्यू :- २००९: भारताचे ८ वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9404277298=========ஜ۩۞۩ஜ=========   🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷=========ஜ۩۞۩ஜ=========1⃣ *देशभर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, कर्तव्यपथावर देशाच्या सामर्थ्याचं आणि संस्कृतीचं दर्शन*-----------------------------------------------------2⃣ *इस्रोचे  यान बदलणार युद्धाची पद्धत, अंतराळात भारताची ताकद वाढणार*-----------------------------------------------------3⃣ *पुण्यात स्वारगेट परिसरात दुकानांना भीषण आग, 3 दुकाने आगीत जळून खाक*-----------------------------------------------------4⃣ *दहावी-बारावी परीक्षा शुल्कातून बोर्डाला मिळाले तब्बल साडेतेरा कोटी रुपये; शुक्रवारपासून मिळेल प्रवेशपत्र*-----------------------------------------------------5⃣ *देशात धर्म-जातीच्या नावावर जास्त दिवस राजकारण चालणार नाही; कॉंग्रेस नेत्या आराधना मिश्रा यांची भाजपवर टीका*-----------------------------------------------------6⃣ *आज रांचीच्या मैदानात खेळविला जाणार भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 सामना*-----------------------------------------------------7⃣ *Hockey World Cup 2023 : भारताकडून जपानचा दारुण पराभव, 8-0 च्या फरकाने सामना घातला खिशात*-----------------------------------------------------*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300=========ஜ۩۞۩ஜ========= 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*=========ஜ۩۞۩ஜ=========*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/sQ9gjdaKcrE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~=========ஜ۩۞۩ஜ=========         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*=========ஜ۩۞۩ஜ=========               *कमवा आणि शिका*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.htmlआपले अभिप्राय जरूर द्यावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद*~~~~~~~~~~~~~~~~~~~=========ஜ۩۞۩ஜ=========          🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃=========ஜ۩۞۩ஜ=========           *तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी*तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (जानेवारी २७, १९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले.संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता.  वेद, उपनिषदे, रामायण, महाभारतइत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.*संकलन*=========ஜ۩۞۩ஜ=========              *""फ्रेश सुविचार""*=========ஜ۩۞۩ஜ=========ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.=========ஜ۩۞۩ஜ=========            *आजची प्रश्नमंजुषा*=========ஜ۩۞۩ஜ=========१) नुकत्याच झालेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताने न्यूझीलंडला किती फरकाने हरविले ?२) बॅटरी निर्मितीत जगातील अव्वल क्रमांकाचा देश कोणता ?३) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते ?४) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा २३ जानेवारी हा जन्मदिवस कोणता दिवस साजरा केला जातो ?५) ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?*उत्तरे :-* १) ३ - ० २) चीन ३) शिपकीला पास ४) पराक्रम दिवस ५) महाराष्ट्र *संकलन* जैपाल भै. ठाकूर जि.प.व.प्राथ.शाळा भोसा,ता. आमगाव, जि. गोंदिया (९७६५९४३१४४)=========ஜ۩۞۩ஜ=========🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂=========ஜ۩۞۩ஜ=========👤 दत्तराम बोमले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ]*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*📱9423625769=========ஜ۩۞۩ஜ=========🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟=========ஜ۩۞۩ஜ=========*जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.**आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!*   ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●••             🍁🍁🍁🍁🍁🍁    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040=========ஜ۩۞۩ஜ=========      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*=========ஜ۩۞۩ஜ=========इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे.*व्यंकटेश काटकर,नांदेड.*  संवाद..९४२१८३९५९०/            ८०८७९१७०६३.=========ஜ۩۞۩ஜ=========🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭=========ஜ۩۞۩ஜ=========               *जंगलचा राजा !*एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.अस्वलाला वाटलं...'आपण ही जंगलचा राजा व्हावं. सिंहासारखं रुबाबात फिरावं.'अस्वलानं ठरवलं... आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा. तो कसा चालतो? तो कसा बसतो? तो कसा खातो? तो कसा फिरतो? हे नीट पाहायचं. मग आपण ही तसंच करायचं. जंगलचा राजा व्हायचं. तेव्हापासून रोज ते अस्वल, सिंहाच्या पाळतीवर राहिलं. लांबून झाडामागून सिंहाच्या बारीक सारीक गोष्टी पाहू लागलं.सिंहाचं ऐटित चालणं. झाडाखाली त्याचं डौलदार बसणं. सिंहाची भरदार आयाळ. त्याचं राजा सारखं जंगलात फिरणं.पण, चार-पाच दिवसात अस्वल कंटाळलं. अस्वलाला वाटलं...खरं म्हणजे जंगलचा राजा मीच व्हायला पाहिजे. कारण सिंहापेक्षा मी जाडजूड आहे. सिंहाला तर फक्त मानेवरच आयाळ आहे.माझ्यातर सर्व अंगावर सिंहासारखी आयाळ आहे. आणि मी पण झाडाखाली डौलात बसतोच की! जंगलामधे फिरतोच की!पण...मला सिंहासारखं चालता येत नाही म्हणून मी जंगलचा राजा होत नाही! मी सरळ चालतना मागे वळून पाहात नाही म्हणून जंगलचा राजा होत नाही!बस्स!! आता ठरलं तर... आज पासून चालताना मधे-मधे मागे वळून पाहायचं आणि जंगलचा राजा व्हायचं. त्या दिवसापासून ते अस्वल चालताना मागे वळून पाहू लागलं. आपण चालताना मागे वळून पाहातो, हे इतर प्राणी पाहतात की नाही? हे पण पाहू लागलं.'मी किती जाडजूड आहे पाहा. माझी अंगभर आयाळ पाहा. माझं रुबाबदार चालणं पाहा. आता तरी मला राजा म्हणा..असं भेटेल त्या प्राण्यांना सांगू लागलं.पण...तरीही जंगलातले छोटे मोठे प्राणी त्याला राजा म्हणेनात.अस्वलाच्या पाठी हेच प्राणी ख्वॅ ख्वॅ, फॅक्वॅक फॅक्वॅक करुन हसायचे. शेपट्या हलवून, तोंडं वाकडी करुन त्याला चिडवायचे.अस्वल वैतागलं. भलतंच चिडलं. चराचरा केस खाजवत, कराकरा दात चावू लागलं.अस्वलाने ठरवलं... 'आजच काय तो फैसला करू.जंगलातल्या या चुटूक पुटूक प्राण्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपला रुबाब, आपली चाल त्या सिंहालाच दाखवू. सिंहाशीच सरळ सरळ पंगा घेऊ. माझी राजेशाही चाल पाहताच सिंह आपोआपच मान खाली घालून जंगलातून निघून जाईल. मग या जंगलचा मीच राजा होईन!! अस्वल जे घरातून उठलं ते तरातरा सिंहासमोरच गेलं. सिंह झाडाखाली सुस्तावला होता. अस्वल सिंहाच्या सरळ समोर जाऊन ऊभं राहिलं. सिंहाने शेपटी उडवत अंगावरच्या माशा हाकलल्या. मान वाकडी करत डाव्या पायाने आयाळ खाजवली.अस्वल सिंहासमोरच सिंहासारखं चाललं. म्हणजे थोडसं चालून त्याने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहिलं. चालताना सिंहासारखं ऐटित चालण्याचा प्रयत्न केला.आता...'हा कोण नवीन रुबाबदार राजा?' असं म्हणत सिंह चवताळून उठेल. किंवा... आपली ऐटबाज चाल पाहून सिंह हे जंगल सोडून पळूनच जाईल, असं अस्वलाला वाटलं होतं.पण....सिंहाने अस्वलाकडे पाहिलं ही नाही! त्याला काही किंमतच दिली नाही. सिंह आपल्याच मस्तीत होता. सिंह आरामात शेपटी उडवत माशा हाकलवत होता. आता मात्र अस्वल भलतं म्हणजे भलतंच चिडलं. त्याच्या अंगावरचे केस ताठ झाले. त्याने उजव्या हाताची नखं झाडावर कराकरा घासली. अस्वलाने ठरवलं... आता आपण सिंहापेक्षा वरचढ व्हायचंच. राजा सिंह सरळ चालताना मधे मधे मागे वळून पाहातो. ठीक आहे. पण आपण आता.. मागे मागे बघतच सरळ चालायचं. आणि जंगलचा राजा व्हायचं. अस्वल मागे मागे पाहात पुढे चालू लागलं. राजा होईन म्हणता म्हणता सरळ खड्यात पडलं!〰〰〰〰〰〰〰〰〰*📝   संकलन*  📝*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेडजि.प.प्रा.शा.गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment