✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01/02/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी⌛ १८८४ : ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचीपहिली आवृत्ती प्रकाशित. तेव्हापासून ऑक्सफर्डच्या कोशांचे काम अव्याहतपणे चालूच आहे.💥 जन्म :-⌛१८८४ : सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार.💥 मृत्यू :-⌛२००३ : कल्पना चावला, महिला अंतराळवीर.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'विशाखापट्टणम' आंध्र प्रदेशची नवी राजधानी; मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आसाराम बापूला बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा, गांधीनगर न्यायालयाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील अस्थिर राजकारणाचा परिणाम राज्याला भोगावा लागतोय : आमदार बच्चू कडू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यातील पोटनिवडणुका महाविकास आघाडी लढवणार, अजित पवारांनी केलं स्पष्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; 56 टेबलवर उद्या होणार मतमोजणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्कार रकमेत वाढ, दहा लाख वरून पंचवीस लाख करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा nirnayq*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/aB0Ipn0I8RE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला*http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंतराळवीर कल्पना चावला*• काही लोक निधनांनतरही आपल्या आठवणीत सदैव जिवंत राहतात. अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे.• 17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.• 1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982 साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनीअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या.• 1984 मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीतून वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं.• अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था The National Aeronautics and Space Administration (NASA) इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली.• नासामध्ये काम केल्यानंतर ओवरसेट मेथड्स कंपनीत उपप्रमुख म्हणून रुजू झाल्या. त्याठिकाणी त्यांनी एरोडायनॅमिक्समध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांचे रिसर्च पेपर अनेकदा चर्चेत राहिले.• नासाने 1994 साली संभाव्य अतंराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला. मार्च 1995 साली अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नासाच्या जॉनसन एरोनॉटिक्स सेंटरमध्ये प्रशिक्षण चालू केलं.• त्या दरम्यान त्यांना अंतराळवीरांच्या 15 व्या फळीत ठेवण्यात आलं. तसंच एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचं काम देण्यात आलं.• नोव्हेंबर 1996 मध्ये नासानं एक घोषणा केली. त्यामध्ये ATS-87 मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना याच्याकडं सोपवण्यात आली.• शेवटी तो दिवस उजाडला. 19 नोव्हेंबर 1997. त्यादिवशी हरियाणाच्या मुलीनं अंतराळात झेप घेतली. त्यावेळी त्यांनी 376 तास आणि 34 मिनिटं अंतराळात घालवली.• एका महत्त्वपूर्ण योजनेचं नेतृत्व करणाऱ्या कल्पना आणि त्यांच्या टीमने पृथ्वीला 252 फेऱ्या मारल्या म्हणजे त्यांनी 1 कोटी 46 हजार किमीहून अधिक प्रवास केला.*कल्पना यांचा शेवटचा प्रवास*• नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्याच्याकडं देण्यात आली.• जानेवारी 2003 च्या 16 दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेषतज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते.• 1 फेब्रुवारी 2003 ला कोलंबिया अंतराळयानाने पृथ्वीकडं येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडं झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सुट घातला. त्यावेळी सर्व योग्यरीत्या सुरू होतं.• त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या 8.40 वाजता कोलंबिया यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते.• 22 मिनिटांत ते यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं.• तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं.।। विनम्र अभिवादन ।।संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" उत्पतीशिवाय स्थिती नाही, स्थितीशिवाय लय नाही, लयावाचून पुनःउत्पती नाही."*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत ?२) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ( UNEP ) चे मुख्यालय कोठे आहे ?३) 'विक्टर सिटी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?४) राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा केला जातो ?५) ऑस्ट्रेलियन महिला ओपन टेनिस स्पर्धा २०२३ चे जेतेपद कोणी पटकावले ?*उत्तरे :-* १) ५३ २) नैरोबी, केनिया ३) सलमान रश्दी ४) २५ जानेवारी ५) आर्यना सबालेंका, बेलारूस *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शेख एम. बी. केंद्रप्रमुख👤 नारायण गायकवाड👤 शिवानंद सूर्यवंशी👤 कवी गजानन काळे👤 अतुल भुसारे👤 शिवम पडोळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रघुनायकावीण वांया शिणावे। जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥ सदा सर्वदा नाम वाचे वसो दे। अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥२४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दोन्ही हात एकत्र आले की 'नमस्कार' होतो. हा नमस्कार म्हणजे एक सोपस्कारही असतो. कधी कधी तो उजवा हात छातीला लावून स्मित करूनही केला जातो. या नमस्कारामागे एक प्रमुख भावना दडलेली असते, ती म्हणजे ज्येष्ठांचा 'आदर आणि स्वागत.' या नमस्कारामध्ये इतरही भाव दडलेले असतात. कधी चरणस्पर्श तर कधी अगदी गुडघ्यापर्यंत स्पर्श करून हे नमस्कार होतात. छोट्यांचे मोठ्यांना नमस्कार व मोठ्यांचे थोरांना नमस्कार यात फरक असतो. त्यात स्त्रीयांचे नमस्कार वेगळे व बालकांचे नमस्कार वेगळे. शरीराची अष्टांगे जमिनीला लावून साष्टांग नमस्कार केले जातात किंवा सुर्य नमस्कार होतात.**देवाला केलेल्या नमस्कारात थोडा फरक पडतो. त्यात कृतज्ञतेची भावना येते. दोन्ही हात नम्रतेने जोडले जातात. डोळे अर्धोन्मीलित होतात. मन करूणात्मक याचकाच्या भुमिकेत जाते. हातात ओंजळभर फुले येतात, ओठ पुटपुटू लागतात, कदाचित श्लोक किंवा एखादे स्तोत्र सवयीने ओठांवर येते, एखादी आरती आठवते. कधी नवस बोलले जातात तर कधी ते फेडले जातात. अशा अनेक नमस्कारांची रांग लागते. यात मागण्याच जास्त असतात.**"भक्त परमेश्वराकडे असंख्य मागण्यांचा ओघ सुरू ठेवतो, हजारो नमस्कार देवाचरणी ठेवून निघून जातो."*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सूर्यासारखी तेजस्विता आणि सक्रीयता, चंद्रासारखी शीतलता आणि शांतता, धरतीसारखी संयमता व सहनशिलता हे जसे गुण या तिघांमध्ये आहेत तसेच गुण आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तर आपणही त्यांच्यासारखे आपल्या  जीवनामध्ये यशस्वी स्थान निर्माण करुन इतरांच्या जीवनात आपले अढळ स्थान निर्माण करु शकतो हे निश्चितपणे सांगता येईल.ह्या गुणांचे अनुकरन करणे म्हणजे आपल्या जीवनासाठी एक ऊर्जाच आहे.ती ऊर्जा आपण आपल्या जीवनात कधीही कमी होऊ देऊ नये© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सम्राट आणि साधू*एक सम्राट रात्रीच्‍या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्‍याच्‍या कुटीत पाण्‍याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्‍हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्‍याच्‍याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी त्‍याला विचारले,’’तुमच्‍याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्‍ती वगैरे काहीही नसतानासुद्धा तुम्‍ही इतके का जागता आणि सावधान राहता,’’ साधू म्‍हणाला,’’ राजा, आपण आपल्‍या महालात जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्‍यामुळे मी सदैव सावध राहतो.’’ राजा म्‍हणाला,’’ माझ्याकडे असलेल्‍या हत्ती घोडे, हिरे दागिने, सोने चांदी याला तुम्‍ही कचरा समजत आहात’’ साधूने उत्तर दिले,’’ ज्‍याला आपण अमूल्‍य समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्‍याकडून हिसकावून घेऊ शकते पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्‍यामुळे मी स्‍वतला सावधान करतो, माझ्या मनात मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे मन हे ईश्‍वराने दिल्‍याप्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा स्‍पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्‍हणून मी रात्री स्‍वतलाच सांगत असतो नव्‍हे माझ्या आत्‍म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील.’’ साधुचे ते विचार ऐकून राजा त्‍याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्‍थान दिले.*तात्पर्य*मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांची संगत न घेता जर जीवन जगण्‍याचा प्रयत्‍न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून आपले संरक्षण होते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment