✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30/01/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *हुतात्मा दिवस*💥 ठळक घडामोडी :- १९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.१९९९: पण्डित रविशंकर यांना भारतरत्‍न जाहीर.💥 जन्म :-१९२९: हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म.💥 मृत्यू :- १९४८: राष्ट्रपिता महात्मा गांधी*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ज्वारी आणि बाजरी आरोग्यासाठी उत्तम, 'मन की बात'मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं तृणधान्याचं महत्त्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा किशोर दास यांचा अपोलो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षकानं केलेल्या गोळीबारात ते जखमी झाले होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महावितरण ग्राहकांना देणार दरवाढीचा शॉक! MERC कडे 37 टक्के दरवाढीचा प्रस्ताव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचे मतदान आज, 5 मतदारसंघात चुरस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *70 टक्के मागण्या पूर्ण झाल्यानं लिंगायत समाजाचा आझाद मैदानातला मोर्चा स्थगित, मात्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी लढा सुरुच राहणार असल्याचं जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियनमध्ये नोव्हाक जोकोव्हिचने जिंकले विक्रमी २२ वे ग्रँडस्लॅम जेतेपद, राफेल नडालच्या विक्रमाशी साधली बरोबरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेत भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकलं, अंडर १९ महिला टी-२० विश्वचषकात भारताचा विजय, इंग्लंडवर ७ विकेट्सनी मात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/zI_Z8omB9No~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - वेळ नाही मला*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_14.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *नबा किशोर दास*ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि  बिजू जनता दल (बीजेडी) ज्येष्ठनेते नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते 60 वर्षांचे होते. पश्चिम ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात आज ब्रजराजनगरमध्ये दिवसाढवळ्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाने नबा दास यांच्यावर गोळीबार केल्याने गंभीर जखमी झाले होते.  दास यांच्यावर अपोलो हॉस्पिटमलमध्ये उपचार सुरु होते.नबा किशोर दास यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. 2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ओडिशातील झारसागुडा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तिथं त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांनी 2014 आणि 2019 च्या निवडणुका जिंकत विजयाची हॅट्रिक केली.सध्या ते बिजू जनता दलमध्ये होते. ते नवीन पटनायक यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नबा किशोर दास हे देशातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक होते. मुख्यमंत्र्यांनंतर मंत्रिमंडळातील ते दुसरे सर्वात श्रीमंत मंत्री होते. काही दिवसांपूर्वीच नबा किशोर दास यांनी शनिशिंगणापूरच्या शनि देवाला एक कोटी रुपयाचा कलश अर्पण केला होता. एक किलो सातशे ग्रॅम सोने आणि पाच किलो चांदीचा उपयोग करून हा कलश तयार करण्यात आला होता.💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••"मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जास्वंद हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे ?२) आंतरराष्ट्रीय टी - २० मध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम कोणी केला ?३) सर्व आदिवासींना मूलभूत कागदपत्रे उपलब्ध करून देणारा देशातील पहिला जिल्हा कोण ठरला आहे ?४) भारताने पुन्हा कोणत्या देशासोबत १०० हून अधिक चित्ते हस्तांतरित करण्याचा करार केला आहे ?५) आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) मलेशिया व दक्षिण कोरिया २) सूर्यकुमार यादव, भारत ( ६८ षटकार ) ३) वायनाड ४) दक्षिण आफ्रिका ५) २४ जानेवारी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 प्रा. बालाजी कोंपलवार, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 राजेश पटकोटवार, धर्माबाद👤 सचिन रामदिनवार, मुखेड👤 सौ. सारिका सब्बनवार, कुंडलवाडी👤 बालाजी पुलकंठवार, धर्माबाद👤 मगदूम अत्तार, सहशिक्षक👤 देवराज बायस👤 सुरज एडके👤 सतीश गणलोड👤 शिवकुमार माचेवार👤 अंकुश निरावार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न बोलें मना राघवेवीण कांहीं। जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥ घडिने घडी काळ आयुष्य नेतो। देहांतीं तुला कोण सोडूं पहातो? ॥२३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.* *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जर प्रत्येकाने आपल्या कामाचे नियोजन पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले तर ते काम यशस्वीपणे पार पडेल. अन्यथा कामामध्ये व्यवस्थितपणा राहणार नाही.कामाचा दर्जाही घसरेल,मनाची घालमेल होईल, कामामध्ये लक्ष राहत नसल्यामुळे आणि एकाग्रता नसल्यामुळे स्वत:मध्ये चिडचिडेपणा येऊन आपला राग समोरच्या व्यक्तीवर काढायला लागतो.या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कामात पूर्वनियोजन करायला हवे.तरच आपल्याला मानसिक समाधान मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंगीकारलेली माणुसकीची वागणूक*एका सिंहाने एक हरिण मारले व त्यास तो फाडून खाणार इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता. तो चोर सिंहाला म्हणाला, 'अरे सिंहा, या हरणाचं अर्ध मांस तुझ व अर्ध माझं.' हे ऐकून सिंह त्यास म्हणाला, 'अरे, निगरगट्ट माणसा, तुझा इथे काहीही संबंध नसता, एकदम पुढे येऊन मी मारलेल्या हरणाचं अर्ध मांस तू मागतोस, या तुझ्या वागण्याबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू इथून चालता हो, नाही तर फुकट मरशील.' हे ऐकून तो चोर भिऊन पळून गेला.इतक्यात दुसरा एक भला माणूस त्या वाटेने चालला असता सिंहाला पाहून त्याला टाळण्यासाठी दुसर्‍या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंहाने त्याला आदराने हाक मारली व म्हणाला, 'अरे भल्या माणसा, भिऊ नकोस. तुझ्या चांगल्या वागण्यामुळे या हरणाच्या मांसाचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहेस. ये आणि हा वाटा घेऊन जा.' सिंहाने दोन वाटे केले. एक त्यास देऊन दुसरा त्याने स्वतः खाल्ला व अरण्यात निघून गेला.*तात्पर्यः**माणसाची एकनिष्ठता आणि प्रामाणिकपणाचे वागणे पाहून सभ्य व भिडस्त लोकांना इतरजण आपण होऊन मान देतात त्या दिलेल्या  मानाचा मान टिकवून ठेवणे हे आपल्या वागण्यावर असते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment