✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 19/08/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📷 *जागतिक छायाचित्रण दिन* 💥 ठळक घडामोडी :-◆ १९८७ - युनायटेड किंग्डमच्या हंगरफोर्ड शहरात मायकेल रायनने सोळा व्यक्तींना गोळ्या घालून नंतर स्वतःचा जीव घेतला.◆ १९९१ - सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुट्टीवर असताना नजरकैदेत घातले गेले.💥 जन्म :-◆१९०३ - गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.◆ १९२२ - बबनराव नावडीकर, मराठी गायक.◆ १९८७ - आयलीना डिक्रुझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.💥 मृत्यू :-◆ १६६२ - ब्लेस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *दही हंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा.. शासकीय नोकऱ्यांमध्ये खेळाडूंच्या आरक्षणासाठीही गोंविदा पात्र, दहीहंडी दरम्यान अपघात झाला तर मिळणार आर्थिक मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ * 'बेस्ट'चं आधुनिक पर्व सुरू; देशातील पहिल्या एसी डबलडेकर बसचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *खऱ्या दागिन्यांच्या जागी बनावट दागिने; अमरावतीमध्ये युनियन बँकेच्या लॉकरमधील तीन कोटींचे दागिने बेपत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतियांना मतदानाचा अधिकार, काश्मीरमध्ये बाहेरच्या 25 लाख मतदारांनाही मतदारयादीत मोकळीक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारकडून 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक; 7 भारतीय आणि 1 पाकिस्तानच्या चॅनलचा समावेश, प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी यूट्यूबचा केला जात होता वापर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रात पुन्हा घातपाताचा प्रयत्न? श्रीवर्धनमध्ये एका बोटीत आढळल्या एके-47, ओमानमधून एके-47 सह बोट रायगडच्या किनाऱ्यावर, सागरी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह! रायगडमध्ये सापडलेल्या बोटीचा दहशतवाद्यांशी संबंध नाही; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *शिखर-शुभमनची अभेद्य भागिदारी, भारताचा झिम्बाब्वेवर 10 गडी राखून विजय, मालिकेतही 1-0 ची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Body Parts Class 3rd Chapter 1.2👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/YP-bqnOfJMA~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लघुकथा - कुलदीपक* शिल्पाला मुलगा झाला ही बातमी तिच्या सासूच्या कानावर गेली तशी तिची सासू कमलाबाई खूपच आनंदून गेली. वंशाला दिवा मिळाला म्हणून शेजारी पाजारी आनंदाने सांगत सुटली. शिल्पा सरकारी दवाखान्यात होती, सोबत तिचा नवरा दीपक देखील हजर होता. घरातील काम आटोपून कमलाबाई लगेच दवाखान्यात.........लघुकथा पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे.https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_16.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पिटूनिया*फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) या शास्त्रीय नावाच्या वंशातील काही जाती बागेत शोभेकरिता विशेषेकरून लावलेल्या आढळतात. एकूण जाती सु. ४० (ए.बी. रेंडेल यांच्या मते १४) असून त्यांचा प्रसार द. आणि उ. अमेरिकेतील उष्ण प्रदेशांत आहे. भारतात काही जाती बाहेरून आणून लावल्या आहेत.बागेतील शोभा वाढविण्यासाठी अनेक संकरज प्रकार आज उपलब्ध आहेत; तथापि त्या सर्वांचा उगम अर्जेंटिनातील पिटूनियाच्या निक्टॅजिनिफ्योरा, व्हायोलॅशिया, अक्सिलॅरिस व इंटिग्रिफोलिया या जातींच्या संकरात आहे. दुहेरी पाकळ्यांचे व अनेक भडक रंगांचे आधुनिक प्रकार संकरातून व निवडीने काढले गेले आहेत. मूळच्या जाती सु. ३०-४५ सेंमी. उंच, सरळ वाढणार्‍या, वर्षायू (एक वर्षपर्यंत जगणार्‍या) ओषधी [ ® ओषधि ] असून पाने साधी, मध्यम आकारमानाची, आयत, समोरासमोर आणि खोडाच्या टोकाकडे बिनदेठाची तर बुंध्याकडे लांब देठाची, कधी सर्वच आखूड किंवा बिनदेठाची असतात.सर्व भागांवर प्रपिंडीय (ग्रंथियुक्त) केस असतात. फुले एकेकटी, विविध रंगांची, तुतारीसारखी व कक्षास्थ (पानांच्याबगलेत) असतात; केसरदले पाच असून इतर सामान्य शारीरिक लक्षणे ð सोलॅनेसी कुलात (धोतरा कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड बिया अथवा दाब कलमांनी करतात. बी ऑगस्ट ते ऑक्टोबरात किंवा मैदानी प्रदेशात मार्च ते जूनमध्ये व डोंगराळ भागात मार्च ते एप्रिलमध्ये पेरतात; महिन्याने रोपे दुसरीकडे वाफ्यात (कडेने किंवा मध्ये) लावतात. दुहेरी पाकळ्यांच्या जातींची लागवड कलमांनी करतात.लावल्यापासून तीन ते चार महिन्यांनी फुले येऊ लागतात व ती बराच काळ येत राहतात. खिडकीजवळ केलेल्या वाफ्यांत ही झाडे अधिक शोभिवंत दिसतात; कुंड्यांतूनही लावतात. पिटूनिया हायब्रिडा हा संकरज प्रकार लोकप्रिय आहे. टोमॅटो व बटाट्याजवळ ही झाडे लावू नयेत कारण उपद्रवकारक अशा कीटकांपासून त्यांना इजा पोहोचणे शक्य असते *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" उत्तम चरित्र आणि प्रामाणिकपणा हे माणसाचे कधीच न संपणारे धन असते..! "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) सर्वाधिक वेळा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणारे भारतीय प्रधानमंत्री कोण ?२) संस्कृतच्या कोणत्या शब्दापासून 'रुपया' हा शब्द बनला आहे ?३) RBI ने पहिली नोट कोणती व केव्हा छापली ?४) निर्माणाधिन जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची उंची किती मीटर आहे ?५) गिनीज वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद झालेली राष्ट्रध्वजाच्या आकारातील जगातील सर्वात मोठी मानवी साखळी कोठे तयार करण्यात आली ?*उत्तरे :-* १) पं. जवाहरलाल नेहरू २) रुप्यकम ३) ५ रू. ( १९३८ ) ४) ३५९ मी. ५) चंदीगड क्रिकेट स्टेडियम, ( ५८८५ विद्यार्थी ) *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● उत्तम सदाकाळ, साहित्यिक● संभाजी पाटील● महेश हातझडे, गोंदिया● शिवा टाले, नांदेड● संदीपराजे गायकवाड, बिलोली● योगेश मठपती● प्रीती माडेकर, यवतमाळ● संतोष कडवाईकर● मन्मथ चपळे● मोहन शिंदे● विलास वाघमारे● अमोल चव्हाण● आकाश बोर्डे● मोहनराव पाठक, पुणे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*तरूणपणी आईवडिलांचा, पुढे पत्नीचा आणि त्यानंतर पुत्रांचा विरह भगवान रामाला सहन करावा लागला. यात काय दु:ख नव्हते? इच्छामरणी असूनही आणि आयुष्यभर दु:खाशी संग्राम करूनही भीष्मांना अखेरीस शरपंजरी व्हावे लागले. कुटुंबातील यादवी आणि एकमेकांचे जीव घेणारे सोयरे पाहण्याची वेळ युगंधर कृष्णावर येते, आणि पारध्याच्या बाणाने आयुष्याची अखेर होते. रामायण आणि महाभारत यामधील अनेक पात्रे दु:खाने आणि वेदनेने वाहताना दिसतात. तरीही ही महाकाव्य जीवनाच्या विविध अंगाना स्पर्श करून दिव्यत्व जगविण्याची आणि जागविण्याची प्रेरणा देतात.**लहानसहान गोष्टींपासून आपला त्रागा सुरू होतो आणि माझ्याच नशीबी हे का? हा प्रश्न पडतो. तुम्हाला जशा समस्या आहेत तशा दुस-यांनाही आहेत. त्यांचे स्वरूप वेगळे आहे. 'जगी सर्व सुखी असा कोण आहे' या समर्थ रामदासांच्या प्रश्नाला उत्तर मिळत नाही. त्या उत्तरासाठी सुखाचा सदरा आपणच तयार करायला हवा, आणि तो जसा परिधान करायला हवा तसा अंतर्मनातील दु:खाच्या अंधारावर चांदण्यांचा वर्षावही करायला हवा. आपणही दु:खाचे शंभर धागे मोजत बसणार की सुखाचा धागा धागा विणत जाणार? व्यक्तीगत दु:खापासून सार्वजनिक दुराचारापर्यंत आपण भ्रष्टतेचे, नष्टतेचे पोकळ शंख फुंकणे थांबविले पाहिजे आणि दिव्याने दिवा पेटणारा प्रकाश पेरला पाहिजे.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••सोहळा कृष्णजन्माष्टमीचाश्रीकृष्णजन्माष्टमीचा सणबाळकृष्णाचा हा जन्मदिनपाळण्यात हलवूनी कान्हागाऊया श्रीहरीचे गुणगानसावळा हा मुरली मनोहरयशोदेचा लडिवाळ कान्हाअवखळअल्लड खोड्यांनीफुटतो यशोदेला प्रेमपान्हासुंदर हासरे ते मुखकमलशांत निजला वेणूगोपाळशोभे हातात सुवर्ण कंकनपायी वाजवितो तोडे चाळमूर्तिमंत डोळे आकर्षतीबाळाची स्नेहाळ ती दृष्टी बाजूबंद शोभे दंडामध्येमुखकमलांतच वसे सृष्टी कुरळे कुंतल तान्हुल्याचेत्यावर मोरपिसाची मायायशोदामैयाची प्रेमपाखरकन्हैया वर जणू छत्रछायासौ.भारती सावंत, मुंबई•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अधिकचा मोठेपणा सांगणे*एक इसम फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला. व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून आणि अधिकाधिक मोठेपणा करून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, 'मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.' ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, 'अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.' हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.तात्पर्य - आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही. म्हणून माणसाने मोठेपणाचा जास्त आव आणून वागू नये आणि बोलू नये. वाजवीपेक्षा जास्त बढायी करणे म्हणजे फजीती करणे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment