✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/03/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९४६ - बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण. १९४८-गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना. १९६१- अमेरिकेत शांतीदलाची स्थापना १९६२ - अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १ हे विमान न्यूयॉर्कजवळ कोसळले. १९९८-एकूण १अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला. 💥 जन्म :- १९३०-उद्योगपती राम प्रसाद गोयंका १९४२-रिचर्ड्स मायर्स,अमेरिकन सेनापती १९६८ - सलिल अंकोला, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८९-वसंतदादा पाटील,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री १९९१-एडविन लँड, अमेरिकन संशोधक २००३ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची आज सुटका करणार - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात १०,००१ जागा भरण्यासंदर्भात पवित्र वेब पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आल्याने मुंबईतही सर्व महत्त्वपूर्ण स्थळांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दिल्ली- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनच्या परिषदेसाठी यूएईला रवाना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आजपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ, मागील वर्षीपेक्षा यंदा राज्य माध्यमिक मंडळातर्फे इयत्ता 10 वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 50 हजाराने कमी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सुरक्षा यंत्रणेवर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी अधिवेशन स्थगित करत आहोत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा : मुंबईचे बिरु बिंद, प्रथमेश नाडकर, मृणाल झारेकर अंतिम फेरीत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परीक्षार्थीना शुभेच्छा.....!* https://b.sharechat.com/aivK3qKgGU स्तंभलेखक नासा येवतीकर •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *गौरी देशपांडे* गौरी देशपांडे यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९४२ रोजी झाला.  या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवाद सुद्धा प्रकाशित झाले आहेत. प्रसिद्ध लेखिका, संशोधक इरावती कर्वे या गौरी देशपांडे यांच्या मातोश्री होत. दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील. जाई निंबकर या इंग्रजी व मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे जनक महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व गौरी देशपांडे यांचे आजोबा होते. ’समाजस्वास्थ्य’ या लैंगिक शिक्षण देणार्‍या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे गौरी देशपांडे यांचे सख्खे काका. गौरी देशपांडे यांचे पुण्यातच प्रामुख्याने वास्तव्य राहिले आहे. काही काळ मुंबई, बऱ्याचशा परदेशवाऱ्या व विंचुर्णी, तालुका- फलटण येथेही त्यांचे वास्तव्य होते. दिनांक ०१ मार्च २००३ मध्ये त्यांचे निधन झाले.       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञान हाच सर्व सामाजिक व राजकीय क्रांतीचा पाया आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचे राष्ट्रपती कोण आहेत ?* मा.रामनाथ कोविद 2) *भारतातील एकूण राज्य किती ?* 29 राज्य 3) *भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?* राजस्थान 4) *भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ?* गोवा 5) *भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत ?* मा.वैंकैय्या नायडू *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  अमोल अलगुडे •  साहेबराव बोणे •  राहुल मॅडमवार •  राजेश्वर बालकोंडवार •  संतोष चिद्रावार •  प्रभाकर गोरे •  आशा तेलंगे •  विक्रम अडसूळ •  नरेश बकवाड •  साहेबराव गुंजाळ •  साईप्रसाद ढेले •  सखाराम देवरे •  नरेश सुरकूटवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कानकोंडे* चांगल्याला चांगले वाईटाला वाईट भेटतात लुबाडलेली सारे आपसात वाटतात वाटून खाल्ले की दोघेही कानकोंडे होतात एकमेक पुढे शेपटी खाली घालून राहतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निराशावादी लोक टोकाचा नकारात्मक विचार करतात. छोट्या संकटाला आकाश कोसळले समजले जाणारे भित्र्या सशासारखे असतात. झाडाचं पान पडलं तरी आकाश कोसळल्याच्या भ्रमाने जीव मुठीत घेऊन पळतात. हताश, निराश, उदास माणसं स्वत: निष्क्रिय होतात व दुस-याला काळजीच्या दरीत लोटत राहतात. अशांना सहानुभूती देण्यापेक्षा धैर्य देणं महत्वाचं. उलटपक्षी वस्तुनिष्ठ माणसं ! 'जीवन त्यांना कळले हो' पठडीतील असतात. ती आशेने हुरळत नाहीत नि निराशेने हताश होत नाहीत. ती व्यक्तिगत भावभावनांच्या कल्लोळात स्वत:स ना विसर्जित करतात, ना हारतात. 'अत दीप भव' म्हणत ती स्वत: अंधा-या वाटेवर पणतीच्या उजेडात चालतात. त्यांच्या हातातल्या मेणबत्तीची मशाल कधी झाली हे त्यांचे त्यांनाही कळत नाही.* *अशी माणसं सतत अंतर्मुख होऊन सिंहावलोकन करत विहंगमावलोकनाने नवी स्वप्न कवटाळत ती सत्यात उतरवत राहतात. ते पूर्वग्रहदूषित असत नाहीत नि दुस-यावर विसंबतही नाहीत. वास्तवाचं भान हा त्यांच्या जगण्याचा आधार असतो. भावनेपेक्षा तर्कावर जगणारी ही माणसं खाली जमीन न वर आकाशाचं भान ठेवून जीवन घडवतात. 'मी' आणि 'तू' याच्या पलिकडे आपण असा सामूहिक सद्-भाव व सभ्यता जोपासणारी ही तटस्थ माणसं. त्यांच्या वेदना नि संवेदना दोन्ही क्षितिजे विश्वव्यापी. अशा माणसांना मग दगडातल्या देवापेक्षा माणसातली माणुसकी महत्वाची वाटते. 'जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनि सोडावे सकलजन' असा त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     पर नारी पैनी छुरी,  मति कौई करो प्रसंग रावन के दश शीश गये, पर नारी के संग। सारांश       पर नारी तीक्ष्ण धार असणार्‍या सुरीसारखी असते. तिच्या सोबत संगती करता कामा नये. तिच्या सोबत संग करणे तर  दुरच राहिले. परनारीचा मनात निर्माण विचारही माणसाची शांती व समाधान हिरावून घेतो. आमचं लोकबोलीचं धन म्हणजे संस्काराचा ठेवाच आहे. जात्यावरच्या ओव्या मधून सुद्धा संस्काराचं दर्शन घडतं. घरची अस्तुरी जसा हळदीचा गाभा पराया नारीसाठी रहातो वळचणीला उभा ।        पोथी पुराणांमधून परनारीचा मोह बाळगणार्‍यांची काय अवस्था होते, याचे दाखले  वाचायला मिळतात. महारती लंकाधीश राजा रावनाने मंदोदरी सारखी पतिव्रता पत्नी असताना परनारीचा मोह केला. सीता पळवून नेली गेली. सीतेचा शोध घेताना क्रोधीत हनुमानाकडून लंका दहन केली जाणे, राजा रावणाचीच दाडी जाळली जाणे. यातूनही सावध न होण्यामुळे  रामायण घडले . क्षुल्लक कुंभकर्णासारखा बलशाली भाऊ, इंद्रजितासारखा कुशल मुलगा मारल्या गेला. मोहापायी राज्य बुडालं सेना मारल्या गेली. रावणाची दहाही शीरं उडवल्या गेली. परनारीच्या नादात अख्ख्पा साम्राज्याचा विनाश झाला.  तिथं सामान्य माणसाचं काय होईल ? याची कल्पनाच न केलेली बरी.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• भवाच्या भये काय भीतोस लंडी। धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥ रघूनायकासारिखा स्वामि शीरीं। नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥२७॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *विस्टन चर्चिल* लहानपणी विन्स्टन एकदा विहिरीत पडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्‍याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अपघातातून आपण वाचलो म्हणून त्याने नि:श्‍वास तर टाकला, पण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडपड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आपल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत प्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आपल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस पाण्यावर शांतपणे तरंगताना दिसतो. पण तेव्हाच तो पाण्याखाली तितक्याच जलद गतीने पायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस पाण्याखाली एखाद्या यंत्राप्रमाणे झपाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अपरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून पेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’  पुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले. एकदा त्यांना ऑक्सफर्ड विद्यापिठात पदवीप्रदान सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. जेव्हा त्यांना व्यासपिठावर भाषणासाठी बोलावले तेव्हा ते त्या जनसमुदायासमोर ३० सेकंद नि:शब्द उभे राहिले. सभागृहात एकच शांतता पसरली. नेहमी उत्कृष्ट भाषण देणारे व्यक्तिमत्त्व बोलत का नाही, असा प्रश्‍न सर्वांना पडला. तितक्यात विन्स्टन चर्चिलच्या तोंडातून शब्द बाहेर पडले- ‘‘माघार घेऊ नका. कधीही माघार घेऊ नका.’’ त्यांनी भाषणाला सुरुवात करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा ते पुन्हा ३० सेकंदांसाठी नि:शब्द झाले आणि पुन्हा उद्गारले- ‘‘माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका.’’ क्षणभर त्यांनी सर्व प्रेक्षकांवर एक कटाक्ष टाकला. सर्वांशी ते नजरेने बोलले आणि धन्यवाद म्हणून त्यांनी व्यासपीठ सोडले. लोकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले आणि एका महान नेत्याचे सर्वात लहान, पण अत्यंत प्रभावी भाषण म्हणून या भाषणाचा उल्लेख केला जातो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment