*अर्धांगिनी* पहाटेचा गारव्यात झुंजुमुंजु सोनसकाळी कुजबुजली गाणी पक्ष्यांची मंजुळवाणी दूर मंदिराच्या दारी घुमे नाद निर्मल्याचा हे पावित्र्याचे सूर मन मंदिरी देई उभारी लगबगीनं निघाली अर्धांगिनीची सवारी धन्यासंग कष्ट करी धरणीचा उदरी हे आभाळं निळसंर कस झाल पिवळंसर हा पिवळ्याचा गोळा आला डोंगर माथ्याला येता सांजवातीला चिमणं बिलगती अंगाला घेऊन कवेत लेकराला समाधानं लाभी तिला. 〰〰〰〰〰〰 ©✍ प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment